Thursday, December 30, 2010

दृष्टीआड .... !!

तारीख : ३१ डिसेंबर २०२०

प्रति,
मायबाप सायेब

विषय : बरगड्डी संघटना अहवाल २०१०-२०

मायबाप सायेब,

आपल्या हुकुमापरमाने बरगड्डी संघटनेच्या गेल्या धा वर्षांतल्या महत्वाच्या विजयांचा रिपोर्ट पाठवत आहे. सांगन्यास लय आनंद वाटटू की तुमी येळोयेळी सांगितल्या परमानं वागल्यानंच संघटनेला हा दिस दिसला आनी तेच्याबद्दल म्या धनाजी गनपत पवार (श्यान्नव कुळी मराठा-कुनबी) बरगड्डीचा अध्यक्ष या नात्याने माज्या सर्व बेडर, निडर, धाडसी बरगड्डी मावळ्यांच्या वतीने आपले लय लय आभार मानतो.

२०१० : दादू कुल्कर्न्याच्या नावाचा पुरस्कार आपन आधीच बंद पाडला व्हता. त्यानंतर त्याच तापलेल्या वनव्यात दाद्याचा लाल म्हालातला पुतला करकरीत कट्टरन्ये कापून उखडून टाकला.

२०११ : शिवाजी म्हाराजांनी रामदाश्या ठोसरला सज्जनगड वस्तीसाठी दिल्याचा कुठलाही पुरावा बाब्या पुरंदर्‍या, ब्येडेकर वेगेरे न देऊ शकल्याने  रामदाश्याच्या सज्जनगडावरच्या मठाची नासधूस.

२०१२ : रामदाश्या ठोसर नावाचा कोनी साधू अस्तीत्वात असल्याचाही पुरावा न भेटल्याने त्याच्या नावावर खपवलं जानारं दासबोध नावाचं फडतूस पुस्तक चिंध्या करून शिवथर घळीच्या धबधब्यात बुडवून टाकलं. आनी शिवथर घलीत जाळपोळ व तोडफोड.

२०१३ : ज्ञान्या कुल्कर्न्याने भगवद्‌गीतेची कापी करून त्याला स्वःताचं नाव देऊन 'ज्ञानेश्वरी' नावाचं पुस्तक काढलं होतं हे बरगड्डीच्या संशोधक मंडळाने पुराव्यानिशी शाबित करून दाखवल्यानंतर 'जाळा मनुस्मृती-जाळा ज्ञानेश्वरी' या महायोजनेची हाक.

२०१४ : (तुमी सांगितल्यापरमानं) दादू कुल्कर्न्याच्या येळी वापरलेलं कटर वापरूनच भगवद्‌गीतेची कापी करनार्‍या ज्ञान्या कुल्कर्न्याचं नेवाश्याचं मंदिर जमीनदोस्त.

२०१५ : स्वःताला 'तेल्यातांबोळ्यांचा नेता' अशी जातीद्वेषक पदवी लावून मिरवनार्‍या बाळ टिळकाचा निषेध करन्यासाठी भव्य 'टिळक धिक्कार सभे'चं  आयोजन आनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठावर हल्ला. बाळ टिळक खरोखरीच 'लोकमान्य' होता याचा कुठलाही पुरावा न भेटल्याने टिळकाच्या अलिकडे 'लोकमान्य' हा शब्द लावन्यास बंदी घालन्यासाठी जनजागृती.

२०१६ : शेंगडावरचा टिळक बंगला बाळ टिळकाने रामलाल नाईक यांच्याकडून बळजबरीने काढून घेतल्याचे पुरावे बरगड्डी संशोधक मंडळाला भेटलेले असल्याने 'टिळक बंगल्या'चं नाव बदलून 'नाईक बंगला' करावं यासाठी भव्य रॅली.

२०१७ : वासुदेव फडक्या आद्यच काय पर सादा क्रांतिकारक बी असल्याचे कुटलेबी पुरावे बरगड्डी संशोधक मंडळाला भेटले नसल्याने फडक्या हा इंग्रजांचा 'साधारन चाकर' होता हे सिद्ध होतं. त्यामुळे फडक्याचं नाव क्रांतिकारकांच्या यादीतून वगळन्यासाठी भव्य जनआंदोलन.

२०१८ : भटाबामनांच्या हिंदू धर्माला सर्वश्रेष्ठ धर्म म्हनवनार्‍या आनी बहुजनांच्या डोळ्यात धूळ फेकनार्‍या सावरकराचा धिक्कार करन्यासाठी 'सावरकर महानिषेध ब्रिगेड' ची स्थापना. सावरकराला 'स्वातंत्र्यवीर' न म्हनन्याचा फतवा बरगड्डीतर्फे जारी.

२०१९ : भटुरड्या आनी छंदीफंदी असलेल्या पहिल्या बाजी पेशव्याच्या निषेधार्थ आनी भटुरड्या माधव पेशव्याच्या निषेधार्थ त्या दोघांवरच्या 'राऊ' आनी 'स्वामी' इत्यादी पुस्तकांवर बंदीची मागनी. 'गोखले प्रकाशन'च्या ऑफिसवर एक हजार निडर बरगड्डी मावळ्यांचा हल्ला. 'राऊ' आनी 'स्वामी' च्या सगळ्या प्रती जाळल्या.

२०२० : सरकारी कागदपत्रात 'ब्राह्मण' या शब्दाऐवजी 'बामन' असा योग्य शब्द वापरला जावा अशी मागनी. २०१० च्या जातीनिहाय गननेनुसार 'बामन' म्हनून नोंदनी केलेल्या व्यक्तींना २०% 'बामन कर' भरावा लागन्याची मागनी आनी त्यासाठी भव्य 'बामन करसक्ती रॅली'चं आयोजन.

सायेब, यापुढेही बरगड्डी संघटना आनी आमचे मावळे आपल्या आदेशापरमानं काम करन्यास सदैव तय्यार असतील अशी मी शपथ घेतो. जय जिजाऊ जय शिवाजी.

आपला निडर मावळा,
धनाजी गनपत पवार (श्यान्नव कुळी मराठा-कुनबी)
अध्यक्ष
बरगड्डी संघटना, जिजाऊ ब्रिगेड, बहुजन क्रांती समिती, मराठा महासेवा मंडळ वेगेरे वेगेरे वेगेरे..

-------------------------------------------

अहवाल वाचून संपवल्यावर साहेबांच्या चेहर्‍यावर संतोषाची स्मितरेषा झळकून गेली. सगळं कसं चोख घडत गेलं होतं. आपली चतुराई, ताब्यात असलेलं गृहखातं आणि दिल्लीचा वरदहस्त या सर्वांच्या अनोख्या संगमाने आपण बामनांची कशी पळताभुई थोडी केली या विचाराने साहेब मनोमन सुखावले. स्वतःच्या हुशारीचा त्यांना पुन्हा एकदा अभिमान वाटला. सगळं कसं ठरवल्याप्रमाणे घडलं होतं. दर वर्षाच्या शेवटी पुढच्या वर्षाच्या योजना आखल्या जात आणि बरगड्डीला वापरून त्या बरहुकूम काम पार पाडलं जाई. स्वतःच्या हुशारीचं पुन्हा एकदा कौतुक करून घ्यावसं वाटून मंद स्मित करत त्यांनी टेबलचा ड्रॉवर उघडून त्यातून एक कागदाचं जुनाट चिटोरं बाहेर काढलं आणि उघडून वाचू लागले.

२०१० :
राष्ट्रकुल, आदर्श, २-जी, बँक कर्ज - २०० कोटी

२०११ :
शेतजमीन स्कीम, ३-जी - ३०० कोटी

२०१२ :
शेतकरी मदत योजना, पूर पॅकेज, दुष्काळ पॅकेज  - ५६९ कोटी

२०१३ :
खेडी-जोडणी रस्ता महायोजना - ८४० कोटी

२०१४ :
दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी क्रेडीट कार्ड योजना, दुष्काळ पॅकेज - ९०० कोटी

२०१५ :
ऑनलाईन लॉटरी स्कीम, दुष्काळ पॅकेज, पूर मेगापॅकेज - १००० कोटी

२०१६ :
'गाव तिथे इंटरनेट' योजना - १२२० कोटी

२०१७ :
रिझर्व्ह बँक स्कीम, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी घरबांधणी महायोजना - १४५५ कोटी

२०१८ :
सॅटेलाईट-केबल मेगास्कीम, हमरस्ते बांधणी योजना : १६८० कोटी

२०१९ :
नलिकागॅस मेगास्कीम, 'सर्वांसाठी केरोसिन' योजना : १९४३ कोटी

२०२० :
मेडिकल इंश्युरन्स मेगास्कीम, बेघरांसाठी महाकर्ज योजना : २४०० कोटी

-------------------------------------------

'क्या ब्बात है' अगदी एकास एक झालं होतं सगळं. स्वीस बँक अकाउंट भरून फुगून वहात होतं नुसतं. दर वर्षाअखेरीस निवडक पक्षसदस्यांना विश्वासात घेऊन त्यांना नवीन योजना सांगायची आणि काही महिन्यांतच पुढच्या वाटचालीची दिशा बरगड्डीला दाखवायची. एकदम सुपरस्पेशल प्लान होता. आणि गेली अनेक वर्षं तो बिनबोभाटपणे यशस्वी होत होता. पण यावेळचा प्लान जरा जास्तच डेंजर होता. इतल्या वर्षांच्या अनुभवावरून यावेळी साहेबांनी थोडी जास्तच लांबची उडी मारायचं ठरवलं होतं. एकाच वेळी तिन्ही सैन्यदलाच्या शस्त्रास्त्र खरेदीत, रिझर्व्ह बँकेत, शेअर बाजारात, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये आणि सरकारी कर्मचार्‍यांच्या पेन्शन योजनेत अशा सगळ्या ठिकाणी एकाच वेळी हात मारायचा म्हणजे जरा व्यवस्थित प्लानिंग लागणार होतं. पण पुष्कळ विचारांती ते साहेबांकडे तयारही होतं. गृहखातं हातात होतं आणि दिल्लीचा वरदहस्त डोक्यावर होता त्यामुळे तशी काही चिंता नव्हतीच. प्लान अगदी छोटासाच होता अगदीच दोन ओळींचा..... त्यांनी तो प्लान बरगड्डीला देण्यासाठी कागदावर उतरवायला सुरुवात केली.

-------------------------------------------

माज्या बरगड्डी भावांनो,

१. बामन टिळकाने सुरु केलेल्या गनपती उत्सवातली गनपतीची मूर्ती कधी व्यवस्थित बघितली आहेत का? नीट बघा... त्या मूर्तीच्या गळ्यात जान्हवं आहे.. भट वापरतात तसलं जान्हवं, भटांची ओळख पटवनारं जान्हवं !! थोडक्यात हा गनपती बी बामनच हाये. भटच हाये. भटांचा देव असलेल्या भट गनपतीचा निषेध करा. देवळं तोडा, मुर्त्या फोडा....... !!!!!!!!!!  सुरुवात करा या पाच ठिकाणांपासून....... प्रभादेवी, लालबाग, दगडूशेठ, केशवजी नाईक चाळीतला गनपती आनी सारसबागेतला गनपती.

२. जे भट-बामन आड येतील त्या सगळ्यांना सरळ कापत सुटा. कोणालाही सोडू नका !!!

जय जिजाऊ जय शिवाजी !!!!

तुमचा,
साहेब

-------------------------------------------

83 comments:

  1. मला कळतंय तुला काय वाटतंय... पण शेवट.......... बाकी जसे लिहिले आहेस तसे घडल्यास आश्चरय वाटायला नको.. प्रश्न हा आहे की ह्या विरोध कोण काय करतोय हा!!!
    मी काल एक पोस्ट केलाय... http://itihasachyasakshine.blogspot.com/2010/12/blog-post.html

    ReplyDelete
  2. संताप झालाय ना? नक्की कुठे चाललोय आपण तेच काळात नाहीये! :(
    लिखाणातून उद्वेग पुरेपूर उतरलाय. परिणामकारक.
    कोणी वाचली तर देशाच्या भवितव्यात काही फरक पडेल ह्या विचारात पडलेय मी!

    ReplyDelete
  3. रोहणा, खरंच लाहीलाही होते आहे !!! शेवट लिहिताना मलाही त्रास झालाच.. पण सध्या ज्या वेगाने विचित्र घटना घडताहेत ते पाहता अजून दहा वर्षांत काहीही होऊ शकेल !!

    तुझ्या दोन्ही पोस्ट्स वाचल्या.. दोन्ही अप्रतिम !! कमेंटलोय..

    ReplyDelete
  4. अनघा, खरंच प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड संताप झालाय.. काही मुठभर लोक बेशरमासारखे वागतात त्याचा संताप तर आहेच पण त्या माथेफिरूंना उघड उघड मिळणारा सरकारचा पाठींबा बघून तर अजूनच चीडचीड होते. सरकारच्या या छुप्या सहकारामुळे काहीही भयंकर घडू शकतं आपल्या देशात !! :(

    ReplyDelete
  5. पोस्ट वाचले आणि काय करावे ते सुचतच नव्हते. चिडचीड , संताप, वैफल्य सगळ्या भावना एकदम मनात आल्या.

    नक्षलवाद ज्या प्रकारे एका नेत्याला पुरेसे माइलेज मिळाले नाही म्हणून त्याने सुरु केला, तसाच प्रकार वाटतो हा. देशाला कुठे घेऊन जाईल तेच सांगता येत नाही.

    ReplyDelete
  6. अरे वा कॉमेंट पोस्त झाली की आज.. :)

    ReplyDelete
  7. काका, खरंच आजि सोनियाचा दिनु.. चक्क तुमची प्रतिक्रिया दिसते आहे इथे.. मधून मधून ब्लॉगर.कॉम च्या काय अंगात येतं काय माहित :)

    परवाची ती भ्याड घटना वाचून ज्या काही चीडचीड, संताप, फसवणुकीच्या भावना मनात आल्या होत्या त्या सगळ्या तशाच्या तशा उतरल्या पोस्टमध्ये !!

    ReplyDelete
  8. बी.जे.पी. . . . .अरे बाबा म्हंजी भावना जोरात पोहचल्या.

    मा.सत्यवान वटवटे,

    तुमी लय वटवटायला लागले आहात. तिकडे च्यामेरिकेत बसुन काय बोलता???अवो इतिहासात शोध लावायच म्हंजी किती अवघड आसत ठाव हाय का??? अवो संघटेनीची प्वार तयार करायची म्हंजी काय वटवटी एवढ सोप्प नाय.तुमी जर परत आमच्या इरोधात काही लिवल तर बगा...च्यामेरिकेत पण आमच्या सायबांची माणस हायेत हे इसरु नका.

    अवो तिकड बसुन तुमाला काय इतिहास कळणार???तुमी इकड या मग आमी तुमाला बि-घडवतो.आमच कामच हाय ते ...आमी समद्यांना बि-घडवतो.

    तुमचा,
    अनामिक (मला नाव लिवायची भिती वाटते)

    ReplyDelete
  9. अतिउत्तम. सुंदर मांडणी. Very creative. अगदी मोजक्याच शब्दात बि-ग्रेडची पोल-खोल.

    ReplyDelete
  10. अबे तू आपलं इनोदी लिहीत जा. निषेध करायचा तर परुळेकर मांजरेकर आहेत. हे असलं वाचून दिमाग खराब होतो साला... इथे राहायचं तर अफू, चरस, गांजा (तो पुन्हा साहेबांकडेच मिळेल) मारुन बसायचं... जास्त वटवट नाय करायची.

    ReplyDelete
  11. अस होऊ नये यासाठी आपल्या सर्वांनाच ब्लॉगविश्वापाल्याड जाऊन प्रयत्न करावे लागतील ..

    ReplyDelete
  12. येका भटुकड्याने दिलेल्या अस्ल्या पर्तिक्रीयेणे आमच्या ’बि’ग्रेड ला कायबी वाकडं होनार नाय..... तू वीस वर्षे म्हनतोस, एक लक्शात ठेव, केंद्रात आनी राज्यात आमचंच सरकार हाय, जोपर्यंत आमचे साहेब आनी आता दादा, सोबत आहेत तोवर कितीबी बोंबल, आमच्या केसालाबी धकका लागनार नाय... त्ये गनपतीचं आमच्या डोक्यात हायेच... भटुकड्यांचा देव आहे तो... त्याची सुरूवात त्या टीळकाने केली आनी त्याची तुमी लोग जी आरती म्हनता ’सुककर्ता’ ती त्या रामदाश्याने लिहीलीय... त्यामुळे अजून एक-दोन वर्श जावू दे, गनपती बन्द पाडनार की नाय बघ आमी...बाकी सायबानच्या पैश्याच तुला बामनाला रे का पोटदुखी... कान्द्याची शेती हाय त्यान्ची, बोल काय म्हनतो? आमच्यातल्या कुनीच श्रीमन्त व्ह्यायच नाय असं वाटतं का तुला? लक्शात ठेव, तुमी आता फगस्त ३ टक्के राहला आहात. गप गुपान राव्हा नाहीतर त्या दादू सारका तुम्हालापन एका कापडात गुंडाळूण कुठं फेकून देतील आमचे लोग सान्गता नाय येणार....

    ReplyDelete
  13. हेरंबा अरे अशीच चिडचिड त्रागा संताप संताप होतोय... अतिशय परिणामकारक लिहीलं आहेस...

    हे लोक मुर्ख की आपण असे वाटतेय रे.... समर्थ, शिवबा, गणपती , लोकमान्य वगैरे दैवतं समजून घेण्याची अक्कल ना या लोकांमधे यांच्या महामुर्ख सरकारमधे आहे आणि ना त्यांच्या येणाऱ्या सात पिढ्यांमधे असणार आहे....
    अरे परवापासून टिव्हीवर जो धिंगाणा चाललाय ना नुसती चिडचिड आहे आपली....

    कुठे पोहोचणार आहे भारत समजत नाही अश्याने....

    ReplyDelete
  14. ह्या लोकांनी किती ही कोल्हेकुई करुन ब्राम्हण द्वेष पसरवायाचा प्रयत्न केला तरी त्याचा काही ऊपयोग नाही. लोक आता खर आणी खॊ्टे ओळखण्या
    ईतपत शहाणे नक्कीच आहे वाईट एकाच गोष्टीचे वाटते की राज्यकर्त्यांची ह्या लोकांना फुस आहे

    लेख आवड्ला

    ReplyDelete
  15. बेशरमपणाची हद्द झाली आहे अगदी. संताप संताप आणि आपण फक्त आगपाखड करणार... याचे वैफल्य दाटलेय. हे लोक महामुर्ख मुळीच नाहीत. पध्दतशीर प्रयत्न सुरू आहेत. :(

    जळजळीत वास्तव भेदक मांडलेस.

    ReplyDelete
  16. सगळ वाचून एकच वाटत

    महाराज पुन्हा जन्म घ्या !!!!!

    ReplyDelete
  17. ओकसाहेब...
    आमच्या शब्ददाबकावर सत्यशोधक नावाचा ब्लॉग आहे. तो वाचा जरा. बरगड्डी ब्लॉगिंग!

    ReplyDelete
  18. खरच मला असच वाटतय आधी जन्माला आलो असतो ना तर सगळ्यांना गोळ्या घालून मारुन टाकल असत...देशाची राखरांगोळी करायला आपलीच माणस कारणीभूत होणार असा माहीत असता तर नसता झाला हा देश स्वतंत्र तर बर होत....
    ह्या अश्या यझ लोकांपुढे अब्ज लोकसंख्या असलेला भारत...भारत सोड आपला महाराष्ट्र झुकला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नाला पूर्तता न देता हे सगळा होताना बघतोय ह्याचीच चीड येतेय. आपण परत गुलामगिरी मध्ये जाणार आहोत. लिहून घे.


    :(

    ReplyDelete
  19. मला एक गोष्ट कळत नाही की त्यांना अविनाश देशपांडे चालतो पण दादोजी कोंडदेव चालत नाही, का?
    इतकच वाटत असेल तर शनिवारवाडा तोडून टाका ना.....
    बाकी तसे सगळेच चोर आहेत, शिवसेनेने पिंपरीमध्ये ह्यांच्याच गळ्यात गळे घातले होते....
    सगळे साले चोर आहेत.
    पुणे महापालिका तसेच अजितदादा ह्यांच्या वैचारिक बुद्धीची कीव करावीशी वाटते की त्यांना महाराष्ट्रासमोरचा सगळ्यात गहन प्रश्न शिवरायांचे गुरु हा वाटला

    ReplyDelete
  20. चांगली पोस्ट आहे. "सत्य" पचलेलं दिसत नाही. "हरकत नाय!" होईल सवय सत्य ऐकण्याची आणि पचवण्याची हळूहळू!

    बाकी तुम्ही तुमच्या ब्लॉगचे नाव "सत्यवानाची वटवट" एवजी "नोस्त्राडांबिसची वटवट" ठेवा! (नोस्त्राडांबिस नावाचा एक थोर भविष्यवेत्ता पश्चिमेत होऊन गेला म्हणे!)

    आणि विश्वसनीय सूत्रांकडून हाती आलेल्या माहितीनुसार ह्या नोस्त्राडांबिसने जी जगबुडीची भविष्यवाणी केली ती लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी साहेबांच्याच सांगण्यावरून केली होती.

    (देशी नारायण भटजी कडून भविष्य बघण्याएवजी ख्रिस्त्यांचे लांगुलचालन करणार्‍या अधर्मी सरकारचा निषेध असो! -संपादक, पुरातन प्रभात)

    बाकी चालू द्या!

    ReplyDelete
  21. आज प्रथमच तुझ्या post वर reply करते आहे.
    प्रचंड चिडचिड. खंत एकच आपण काहीच का नाही करू शकत?
    संभाजी ब्रिगेड ही संस्था मुस्लीम लोकांची. पण त्यांनी मुद्दाम संभाजींचे नाव संस्थेला दिले कारण लोकांना वाटेल कि ते मराठी लोकांसाठी काम करते. पण खर तर ती मराठी लोकां विरुद्ध काम करते. ह्या संस्थेविरुद्ध अजून कोणीच पावले का नाही उचलती? त्यांच्या web site वर सगळे पराक्रम आहेत , त्यांनी आत्ता पर्यंत केलेले !!!

    ReplyDelete
  22. हेरंब,
    अरे दोष रक्तातच असावा रे.... असे काही घडले कि ज्या वेगाने सळसळते, उसळते, खवळते...
    त्याच्या कित्येक पटीने लवकर थंड होते....
    सहनशीलतेचा परमोच्च बिंदू उद्रेक असतो म्हणे...
    अजून किती आणि काय काय सहन करायचं, हे त्या विश्वेश्वराला ठाऊक....
    तुझ्या post ला काय म्हणू कळत नाहीय, वाचून आनंद नाही झाला.... सत्य वाचायला खरचं कठीण जाते....

    ReplyDelete
  23. अरे ईतिहासाची पुनरावृत्ती होत्ये. जाती/धर्म/भाषांच राजकारण करुन कशी दंगल माजवली जाते ह्याचे आपण प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत.

    ReplyDelete
  24. बी.जे.पी. :)

    खरंय बाबा.. आम्हाला काय कळणार इतिहास !!आम्ही आपले उगाच काहीतरी भटूरडे अर्थ शोधणार त्यात ...

    >> अनामिक (मला नाव लिवायची भिती वाटते)

    हा हा हा हा हा.. हे सगळ्यांत बेस्ट होतं.. सणसणीत बसली असेल त्या अनामिकच्या.. !!

    ReplyDelete
  25. धन्यवाद राजेश..

    दुर्दैवाने त्या ब्रिगेडच्या पोरांना हे कळत नाहीये की 'सायेब' त्याचे घोटाळे लपवण्यासाठी कसा त्यांना वापरून घेतोय !!

    ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा !!

    ReplyDelete
  26. सिद्धार्थ, खरं तर लिहिणारच नव्हतो.. पण अगदीच राहवलं नाही म्हणून जरा उशीरा का होईना खरडलं.. इनोदी लिहिणंच केव्हाही बरं.. साली कटकट नाय डोक्याला !!

    आणि ते 'इतिहास बदलणारे' लोक अफू, चरस, गांजा मारून बसलेत की.. बघत रहा अजून कायकाय बदलेल ते !! :(

    ReplyDelete
  27. सविताताई, आपण कितीही प्रयत्न केले तरी काहीही होऊ शकत नाही. ब्रिगेड टीम म्हणजे सरकारात बसलेल्या सायबाने सोडलेली भटकी कुत्री आहेत. आपण काहीही करू शकत नाही.. ब्लॉग लिहिण्यापलीकडे !!!

    ReplyDelete
  28. विक्रांत,

    च्यायला तू खरीखुरी ब्रिगेडी भाषा बोलायला लागलास ;)

    जोक्स अपार्ट.. हे असलेच संवाद घडत असणार त्यांच्यात... साला आपलाच साहेब आपल्याला वापरून घेतोय हेही यांना कळत नाही याचं दुर्दैव वाटतं.. असो.. अजून किती वर्ष गणपती साजरा करता येतोय बघुया :(

    ReplyDelete
  29. तन्वी, खरंच भयंकर चीडचीड आणि संताप होतोय.. इतका की आता तर ब्रिगेडी डुकरांची कीव यायला लागलीये.. !! हे लोक असलेच वापरून घेऊन फेकून द्यायच्या लायकीचे.. सायबाने ते बरोबर ओळखलंय.. वापरतोय त्यांना !!

    ReplyDelete
  30. सुधीरजी आभार.. लोक खरं खोटं ओळखतात हे तर खरंच पण सरकार त्यांच्या बाजूचं आहे हे सगळ्यांत धोकादायक आहे... अशाने काहीही घडू शकतं पुढे मागे :(

    ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete
  31. श्रीताई, खरंय दुर्दैवाने... सध्या तरी नुसती आगपाखड करण्यापलिकडे काहीच करू शकणार नाही आपण.. आणि जोवर या अंध आणि मुर्ख ब्रिगेडला कळेल की साहेबाकडून आपण फसवले गेलोय तोवर फार उशीर झालेला असेल !!

    ReplyDelete
  32. सागर, महाराजही त्यांच्या नावाची चाललेली विटंबना बघून विदीर्ण होत असतील !!

    ReplyDelete
  33. आल्हाद, शब्ददाबकावरच्या त्या सत्य शोधणार्‍या ब्लॉगवर जाऊन मीच ही लिंक दिली होती.. अपेक्षेप्रमाणे तो येऊन भुंकलाच आहे बघ खाली.. त्याचे दात घशात घालतोच त्याच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना..

    ReplyDelete
  34. Exactly सुहास !! मलाही इच् भीती आहे.. धर्म झाले, भाषा झाल्या आता जातीजातीत जीवघेणे झगडे लावून गंमत बघत बसणार यांचा साहेब.. आणि मग जे अराजक माजेल त्याचा फायदा करून घ्यायला आपले शेजारी टपून बसलेच आहेत !! एवढ्या साध्या गोष्टी कशा लक्षात येत नाहीत यार या ब्रिगेडी मेंदुंच्या !!! :(

    ReplyDelete
  35. योगेश, कारण एकच.. सांगकामेपणा.. बुद्धी आहे कुठे? आणि असली तरी त्यांचं पध्दतशीर ब्रेनवॉशिंग केलं आहे.. साहेब म्हणतो मारा, झोडा, पुतळा फोड आणि हे लगेच निघाले !! अरे पण साहेबाचा किती मोठा स्वार्थ आहे यात ते बघा की जरा.. आणि "सगळे चोर आहेत" हे "सत्यमेव जयते" पेक्षाही मोठं सत्य आहे !!

    ReplyDelete
  36. अरे ए विनीत राजा.. तुझी जात काढून, तुझ्यासारखं तोंडाचं गटार उघडत मीही तुझ्या प्रतिक्रियेला उत्तर देऊ शकतो. पण मग आपल्यात फरक तो काय राहिला?? म्हणजे बुद्धीचा फरक म्हणतोय मी बरं का? नाहीतर पुन्हा जातीवर उतरशील !

    तुझ्या प्रतिक्रियेतल्या शब्दखेळ आणि शब्दमैथुनाला वगळलं तर प्रतिक्रियेत अर्थ तसा काहीच नाही. त्यामुळे उतर देण्याची आवश्यकता नाही..

    सगळं जाऊ दे.. एक ऐक.. तुझ्या डोक्यावरच्या साहेबाला त्याच्या डोक्यावरचा साहेब सांगतो की तू कसं वागायचंस, काय करायचंस आणि तू ते तसं बिनडोकपणे करतोस.. ऐक जरा.. डोळे उघड.. बघ नीट की हे काय चाललंय.. तुझ्या साहेबाला आत्ताच हे वाद का उकरून काढावेसे वाटताहेत ते.. जरा डोकं चालवलंस तर कळेल ते. अरे तुमच्यामुळे माझ्या भारताची वाट लागणार आहे रे.. अजूनही जरा विचार करा.. तुझ्यासारखा बुद्धिभेद झालेल्या असंख्य ब्रिगेडी किड्यांपैकी एकाला जरी निदान एक क्षण जरी स्वतःला असं प्रश्न विचारावासा वाटला की "मी हे काय करतोय? कशासाठी करतोय" तरी लेख लिहिण्याचा उद्देश सफळ झाला.. विचार करा रे बाबांनो.. उघडा डोळे........ नाहीतर फुटतील !!!!!!

    ताक : पुन्हा इथे येऊन हगला नाहीस तरी चालेल !

    ReplyDelete
  37. दिपू, प्रतिक्रियेबद्दल आभार..

    चिडचिड तर होते आहेच !! पण साध्या तरी आपल्या हातात काही नाही.. कारण हे Govt sponsored आहे !!!

    >> संभाजी ब्रिगेड ही संस्था मुस्लीम लोकांची.

    म्हणजे? हे मला माहित नव्हतं.. निदान मी ऐकलं तरी नव्हतं.. माझ्या माहितीप्रमाणे त्या खेडकर/मेटे च्या डोस्क्यातून पैदा झालेलं हे सडकं बीज..

    हे बघ. http://en.wikipedia.org/wiki/Sambhaji_Brigade ..

    अर्थात विनीतराजा आणि त्याचे चेले काय ते कन्फर्म करतीलच !

    ब्रिगेडचा ब्लॉग वाचलाय मी... खरोखर सगळी दुष्कृत्यं पराक्रम केल्याच्या थाटातच मांडली आहेत.. !!

    असो.. पुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल आभार. आणि ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा..

    ReplyDelete
  38. शाशा, खरंय.. ही तर सुरुवात आहे.. अजून किती आणि कायकाय किडे त्यांच्या मेंदूत वळवळत असतील ते त्यांचं त्यांनाच माहित.. सध्या तरी आपल्या हातात काहीच नाही !!

    मलाही प्रचंड त्रास झाला लिहिताना !! असो.

    ReplyDelete
  39. अगदी बरोबर सौरभ.. पण त्यांना कुठे कळतंय की त्यांच्या डोक्यावर बसलेला बिनबोभाटपणे त्यांना वापरून घेतोय.. आणि कळेल तेव्हा प्रचंड उशीर झालेला असेल !

    ReplyDelete
  40. :-(
    ajun ek kamgiree rahilee na report karayachee-PuNE MUmbai mahamargala tya inodee deshpandyacha bamanacha naav deu nhay dila - isaralat kee rav?? ( doesn't matter that this was govt decision, baragaddee hee govt sponsored-ch ahe after all)
    Anee ase 2011 onwards plan sangun takun tya maThThana naveen naveen ideas detoy ki kay apuN ashee bhitee nahee ka vaTalee???

    ReplyDelete
  41. भारताचा इतिहास हा ब्राम्हणांनी लेखणीच्या जोरावर आपल्याला अनुकूल लिहिला हे त्रिवार सत्य आहे, त्यामुळे सत्य सांगताना ते जातीनिशी सांगावे लागते आणि त्याला आमचा इलाज नाही.

    आमच्या डोक्यावर तुम्ही म्हणता तश्या कुठल्याही साहेबाचा हात नाही, खुद्द शरद पवारांनी आमच्या पुण्यातील दादोजी विरोधी रॅलीला विरोध केला होता. आणि हा वाद बहुजनी कि ब्राम्हणी गेली हजारो वर्षे सुरूच आहे, फरक इतकाच कि आता अंगाशी शेकल्यावर ब्राम्हणी प्रसारमाध्यमांनी त्याला कव्हरेज दिले.

    भारताची वाट लावण्याचे नियोजन ब्राम्हणी काँग्रेसने केव्हाच करून ठेवले आहे, पण आम्ही ते उधळून लावू. आणि तुम्ही आता सत्य स्वीकारायला शिका. तुम्ही म्हणता ब्राम्हण आता बदललेत आणि पुन्हा आधीच्या ब्राम्हणांनी करून ठेवलेल्या चुकांचे समर्थन करता.

    आणि आम्ही पुतळा का हलवला ते पुढील लिंक वर बघा.

    http://bit.ly/htBUOR

    ReplyDelete
  42. पोस्ट वाचून जितकं वाईट वाटलं होतं ना...ते सगळं दुःख 'राजें'च्या प्रतिक्रियांनी हलकं झालं! :)
    राजे अधूनमधून असेच दर्शन देत राहा...मुक्तपीठच्या प्रतिक्रियांना लगाम लागल्यापासून प्रतिक्रियांमधून मिळणार्‍या निखळ मनोरंजनाला आमच्यासारखे प्रतिक्रियाप्रेमी मुकलेत!! :P:P

    ReplyDelete
  43. bhavana veglya ani vastustithi vegali likhan lihatana thod bhan havach

    ReplyDelete
  44. विभि..लोळालोळी....

    राजे जाउ द्या हो झाल ना तुमच्या मनासारख....कशाला एवढा लोड घेताय...तुमाला लई काम असतील...अजुन शनिवार वाडा बाकी आहे.

    BDW मनात एक शंका आली एवढ सगळ करत असताना तुम्हाला कॉलेजच सबमिशन अन अभ्यास करायला वेळ मिळतो का हो???

    ReplyDelete
  45. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  46. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  47. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  48. खरच बाबा, आता इथे मुक्तपीठ रंगणार..पुढच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय.
    :)
    हेरंब, तू काही कितीही बोललास तरी हे लोक इथे हगणारच.
    चालू द्या मंडळी..चालू द्या

    ReplyDelete
  49. हो स्मिता... मुंबई-पुणे महामार्गाचंहीत्यांच्याच डोक्यातलं खूळ असणार नक्की..

    नवीन नवीन कल्पना.. अग ही मंडळी खूप पुढे पोचली आहेत. असे प्लान्स ऑलरेडी तयार आहेत.. दादोजी झाले आता पुढे बाजीप्रभूंची पाळी आहे.. वारीत/कीर्तनात यांचे लोक "ग्यानबा तुकाराम" न म्हणता "नामदेव तुकाराम" म्हणा असा आग्रह ऑलरेडी करायला लागलेत.. आपल्याला वाटतंय त्यापेक्षा फार पुढे गेलंय हे प्रकरण !!

    ReplyDelete
  50. बा सत्यशोधका, तू सतत कॉंग्रेसला ब्राह्मणी कोंग्रेस म्हणून मी करत असलेला आरोप खरा करतोयस हे तुझ्या लक्षात येतंय का? (मी कोणावर आरोप केला आहे हे तरी तुझ्या लक्षात येतंय का? जाउदे, कसल्या अपेक्षा ठेवतोय मी? आणि तेही कोणाकडून..)

    >> खुद्द शरद पवारांनी आमच्या पुण्यातील दादोजी विरोधी रॅलीला विरोध केला होता.

    एक तर तू तरी खोटं बोलतो आहेस किंवा तुझा नीच साहेब तरी.. तूच ठरव.

    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7206080.cms

    "पुणे महापालिकेने लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवल्याने गेल्या आठवड्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. परंतु लाल महालातून पुतळा हटवण्याच्या पुणे मनपाच्या या निर्णयाची शरद पवार यांनी आज पाठराखण केली. एवढेच नव्हे तर, दादोंजींचा पुतळा लोकशाही मार्गांने हलवला आहे आणि हा प्रश्न मला महत्त्वाचा वाटत नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली."

    ReplyDelete
  51. बाबा :D :D :D

    पुतळे तोडाफोडी आणि जातीपातीच्या निंद्य प्रकारातून जाऊनही जर आपल्यासारख्यांच्या तोंडावर हसू शिल्लक राहत असेल तर ते 'राजे' सारख्यांच्या गटारामुळे.. आपलं सॉरी 'प्रतिक्रियांमुळे' असं म्हणायचं होतं मला..

    राजे, आम्ही लोक तुला 'करमणूक' कर देणं लागतो... ओळख पटवून (म्हणजे नावाची ... जातीची नव्हे) घेऊन जाणे.. !!

    ReplyDelete
  52. योगेश, अरे शनिवार वाडाच काय अजून बराच इतिहास खणायचाय.. बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, मोरोपंत पिंगळे, अनाजी दत्तो, बाळाजी आवजी, झालंच तर ज्ञानेश्वर, एकनाथ.. न संपणारी यादी आहे .. वेळ कसा मिळेल त्यांना?

    माझ्याही मनात एक शंका आली.. राजा अजून कॉलेजात आहे?? हत्तीच्यायला... बच्चा आहे अजून.. उगाच बच्च्याच्या नादी एवढा वेळ दवडत होतो.. जा राजे, दुदु पिऊन या.. !

    ReplyDelete
  53. प्रवीण राजगिरे,
    तुझ्या प्रतिक्रिया उडवल्यात हे तुला दिसतच असेल.. मुद्दाम पूर्णपणे उडवल्या नाहीत जेणेकरून तुला आणि तुझ्या इतर चिल्ल्यापिल्ल्यांना कळावं की मी त्या मुद्दाम उडवल्या आहेत.. मी उत्तर देत नाहीये याचा अर्थ असा नाही की मी ते देऊ शकत नाही. मनात आलं तर मीही तुझी आयमाय काढून तुझ्या १०० कुळांची वासलात लावू शकतो. पण तो माझा पिंड नाही. हा ब्लॉग मी त्यासाठी चालवत नाही आणि मी तुझ्याएवढ्या खालच्या पातळीवर येऊही शकत नाही.. Never wrestle with a pig... You both get all dirty but the pig actually enjoyes it !!

    पण एक लक्षात ठेव हरामखोर कुत्र्या, पुन्हा या ब्लॉगवर येऊन तुझ्या उलट्या तोंडाने हगलास तर वाईट परिणाम होतील (थोडं तुझ्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न केला.. बापरे जाम भारी काम आहे. प्रचंड प्रयत्न करावे लागत असतील नै? दिवसभर शिव्याच द्याव्या लागत असतील नै?? अरे हो किंवा शिव्या खात असशील !!)
    ही वाटलं तर धमकी समज.. तुझ्या साहेबालाही सांग हवं तर.. !!

    ReplyDelete
  54. प्रिय अनामिक,
    तुम्ही नावासकट प्रतिक्रिया दिली असतीत तर अधिक आनंद झाला असता.. अर्थात माझं उत्तर तेच राहिलं असतं यात काही शंका नाही.

    कोणाला भान ठेवायला सांगताय? ज्यांनी ते ठेवायला हवं त्यांनी तर कधीच कंबरेचं गुंडाळून डोक्याला बांधलंय.. ते इतिहास बदलतायत, राष्ट्रपुरुषांचा अपमान करतायत आणि संयम आपण बाळगायचा?? जमणार नाही !!

    तुम्ही आम्ही असेच संयमाने घेत राहिलो ना तर मी मांडलेल्या भावना या वस्तुस्थितीत बदलायला वेळ लागणार नाही !!

    ReplyDelete
  55. सुहास, नाही रे.. मी इथे मुक्तपीठ होऊ देणार नाही.. आपण काय टीआरपी वाढवण्यासाठी थोडीच अशा पोस्ट्स लिहितो.. त्यामुळे सोडून द्यायचं.. ते लोक पुन्हा इथे येणार नाहीत याची खबरदारी घेतो मी..

    ReplyDelete
  56. आपली लायकी दाखवतात ही लोक..
    तू निदान ह्या पोस्टसाठी तरी मॉडरेशन चालू कर....

    ReplyDelete
  57. अरे मी आधी एक कॉमेंट दिली होती ती कुठे गेली?
    हेरंब हा तुझा ब्लॉग आहे. सर्व अधिकार तुला आहेत
    पण त्या राजीगिरी च्या कॉमेंट डिलीट करू नकोस .
    लोकांना लायकी कळू देत त्यांची .

    ReplyDelete
  58. सुहास, मॉडरेशन नको.. मॉडरेशन प्रकार मला आवडत नाही.. मी बघतो या लोकांना... अगदीच अति झालं तर कमेंट्स उडवीन त्या राजगिरेच्या उडवल्या तशा..

    ReplyDelete
  59. सागर, तुझी आधीची कमेंट दिसते आहे की.. उत्तरही दिलंय मी.. अजून एखादी कमेंट होती का?

    अरे तो राजगिरया अतीच करायला लागला होता त्यामुळे उडवली. पण तुझा मुद्दा पटला.. निदान लोकांना त्याची लायकी कळण्यासाठी तरी त्याच्या कमेंट्स तशाच ठेवेन यापुढे..

    ReplyDelete
  60. sagaLa solid rajkiya pathimba asatana suddha he lok asa kahee salsud aav anataat kee amhee kitee bharadale jatoy! amachyavar kevadhe anyay kartayat bramhan!! chorachya ultya bomba!

    anee tya blog var jaun te putala halavaNyacha karaN jar vachaas tar hasava kee yanchya mahan budhheemattechee keev karavee he kalenasa hota. mhane: KuNee apalya gharat gurucha aNee aaicha photo ekatra lavel ka?? ata tya putaLyamadhye- jijabai, bal shivajee aNee dadojee Konddev he sonyacha nangar gheun puNyache punaruThThan karatayat asa drushya hota, yaat kay gair kunala disala asel? hya putaLyala 'ekatra' asa mhaNata yeil? najar gaDhul asel tar kahee disu shakata hech khara. sagalee ghaN yanchya basically ghanerdya maNaat bharliye.
    tu mhanatos tasa palkhe emadhye suddha dasbodh aNee dnyaneshwaree ka mhaNun? vagaire mahan abhiyan chalu ahech-
    nusata ekhadya jateecha dvesh karun layakee nahee badlat he bahutek kalanaar naheech. tyamuLe chalu det.karamaNukeela barya ahet yanchya so called kamgiree anee baDhaya!

    ReplyDelete
  61. स्मिता, अग हे सरळ सरळ शरद पवारचं कारस्थान आहे. बी ग्रेडची लोकं येता जाता ब्राह्मणांना, भाजप/सेनेला आणि मुख्य म्हणजे कॉंग्रेसला शिव्या घालत असतात त्यावरूनच कळतं ! सगळा पवारचा खोटेपणा आहे हा !!

    अग त्या ब्लॉगवर यापेक्षाही अजून हास्यास्पद आणि तितकीच भयावह मुक्ताफळं उधळलेली आहेत. या लोकांचं म्हणजे असं असतं की आधीच तात्पर्य काढून टाकायचं आणि मग ते तात्पर्य सिद्ध करण्यासाठी इतिहासातली ब्राह्मणांशी संबंधित कुठलीही घटना घ्यायची.. पवारला कॉंग्रेसला सळो की पळो करून सोडायचं आहे त्यासाठी ही सगळी थेरं चालली आहेत्त्याची !!

    ReplyDelete
  62. खरच काय चालला आहे रे हेरंबा...खूप संताप येतोय रे ह्यां बातम्या वाचून..पोस्ट वाचतांनाच किती त्रास होत होता पण हे लोक भविष्यात ते करायलाही मागेपुढे पाहणार नाही ...कसलं हे राजकारण ..शी...

    ReplyDelete
  63. देवेन, अरे मला लिहितानाही खूप त्रास झाला. आत्ताच या सडक्या डोक्यांना आवरलं नाही तर भविष्यात हे असं घडण्याची खूप जास्त शक्यता आहे..

    ReplyDelete
  64. राव तुमचा ब्लॉग अतिशय अप्रतिम आहे. आणि लेख तर झकासच....
    आणि कुणाच्याही धमक्यांना भिक न घालता लिखाण चालू ठेव. भुंकणारी कुत्री कधीही चावत नसतात. हातात सत्ता असली की ती कशीही उपभोगली तरीही चालते असा साहेब म्हणतो. या मूर्ख लोकांना हे समजत नाहीये की सायबाने यांना झुंजवून स्वताचा किती फायदा करून घेतलाय ते, बाकी विनायक मेटे किवा इतर मंडळी ही सायबाच्या पटावरची प्यादी आहेत, साहेब ह्यांना वापरून फेकून द्यायचं काम करणार.
    सायबाला हे गुरु वगैरे असल्या गोष्टीविषयी आत्मीयता असायचं काहीही कारण नाही कारण ही दुतोंडी अवलाद आहे, स्वताच्या स्वार्थासाठी साहेब स्वताच्या ****ला सुद्धा विकायला कमी करणार नाही त्याच्याकडून बाकी काय अपेक्षा ठेवणार? (सायबानं आत्तापर्यंत तसच केलंय, आणि सायबाचा हा इतिहास कुठल्या ब्राम्हणाने नाही लिहिलेला.)
    आणि सत्यशोधक ला सांग म्हणावं सायबाकडे जो एवढा पैसा आला तो कुठून आला? त्याच सत्य शोधाव आणि आपल्या ब्लॉगवर मांडाव, शिवरायांचे गुरु कोण ह्यापेक्षा ह्याचीच जगाला जास्त गरज आहे.

    ReplyDelete
  65. धन्यवाद योगेश.. हे खेडकर, मेटे सारखे गोटे साहेबाच्या कृपेने फारच उडतायत.. आणि साहेब तर असला नीच माणूस की जातीपातीत भांडणं लावून रोज नवे घोटाळे करतोय.

    अहो आणि साहेबाकडे एवढा पैसा कुठून आला वगैरे प्रश्न या असल्या शोधकांना पडण्याएवढी बुद्धीची झेप नाहीये हो त्यांच्या... डोळ्याला झापडं लावलेले किडे आहेत ते !!

    असो. प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत !! अशीच भेट देत राहा..

    ReplyDelete
  66. http://kaustubhfrmamb.blogspot.com/2011/01/blog-post.html
    हेरंब!
    सदरचा लेख पण नक्की वाच.....या पवार कंपनी आणि त्याच्या पित्त्यांनी अक्षरश: वात आणलाय्...महाराष्ट्रातल सामाजिक वातावरण कधी नव्हे तितक गढूळ झालय या नालायकांमुळे.जीवाची फार तगमग होते हे सगळ बघुन...आपण हे असल स्वार्थासाठी घाणेरड राजकारण करताना आपण समाजमनावर आघात करतोय ,पुढच्या पिढी साठी प्रशस्त मार्ग न आखता खड्डे खणतोय याचा सुद्धा विचार हि स्वतःला नेते म्हणवणारी मंडळी करत नाहीत्....या बारामतीकर हलकट जाणत्या राजाला आज महाराजांनी टकम़क टो़कावरुन कडेलोटाची शिक्षा दिली असती....तरी बर आयुष्यभर केलेल्या कृष्णकृत्यांमुळे आतुन पोखरलाच जातोय्...पण म्हणतात ना "सुंभ जळला तरी पिळ जात नाही"

    ReplyDelete
  67. अनामिका, धन्यवाद.. वाचला तो लेख. अतिशय योग्य लिहिला आहे.. या पवाराने ना खरंच वाट लावली आहे देशाची. आणि या असल्या माणसाला त्याची पिलावळ 'जाणता राजा' म्हणून महाराजांचा केवढा मोठा अपमान करते आहे हे त्यांचं त्यांना तरी कळतं आहे का??

    मागे एकदा गोध्रा दंगलींच्या पार्श्वभूमीवर विजय तेंडूलकर म्हणाले होते की मला एखाद्या माणसाला गोळी घालायची परवानगी मिळाली तर मी नरेंद्र मोदींना गोळी घालेन.. त्याच धर्तीवर आत्ता मला कोणाला गोळी घालायची परवानगी मिळाली तर मी ती शरद पवारांना घालेन.. अधिक काय लिहिणे !!!

    ReplyDelete
  68. एक साधी गोष्ट आहे.. पुर्वी जरी काही चूका झाल्या असतील तर आता त्या उगाळण्यात काही अर्थ आहे का?
    असो.. हा विषय न संपणारा आहे (किंबहूना संपवू इच्छीत नाहीत) :(

    ReplyDelete
  69. खरंय रे.. एवढी सोपी गोष्ट आपल्याला कळते आणि त्यांना कळू नये? काही लोकं हे संपवू इच्छित नाहीच हेच खरं !

    ReplyDelete
  70. विक्रांत पांडे (विप्र)February 17, 2011 at 11:38 AM

    या काळातील कटु सत्य...
    मी तर असे शिक्षक पाहिलेत जे पहिल्या बाजीरावांबद्दल चांगलं तर काही सांगणार नाहीतच पण मस्तानीचा कुत्सित आणि हेतुपुरस्सर उल्लेख केल्याशिवायही राहणार नाहीत...
    सावरकरांना देशद्रोही आणि stuntबाज सिद्ध करणारे शिक्षकही अनुभवलेत...
    काहीनाही तर ब्राह्मण उपजातींमध्ये कधीकाळी घडलेली भांडणे ब्राह्मण विद्यार्थ्यांसमोर उकरून काढून वाद निर्माण करू पाहणारे शिक्षक माझ्या नशिबी आले आहेत...
    या सर्व घटनांनी वर्षभर भयंकर जळफळाट झाला आहे...
    पण दादा तू हे अतिशय छान लिहिलंय... आपण हे सर्व घडू देणार नाही...
    पण ब्रिगेडीय पशुंकडून तसे प्रयत्न झाल्यास आश्चर्यही वाटणार नाही...

    ReplyDelete
  71. विक्रांत !! अरेरे.. हे असले शिक्षक आपल्या इथे आहेत यावर विश्वासच बसत नाही !! पुढची पिढी घडवण्याऐवजी बिघडवण्याचंच काम करतायत हे लोक :(

    खरंय, बिग्रेडी पशूंना आपण असलं काही करू देणार नाही हे नक्कीच. निदान प्रयत्न तरी तसाच असेल. पण सांगता येत नाही कारण बिग्रेडी लोकांना राजकारण्यांचा वरदहस्त जोरदार आहे :(

    ReplyDelete
  72. आपली भाषा मनोवेधक आहे. पण त्याला काही गोष्टींची जोड देणे आवश्यक आहे. उदा. ब्रिगेडचा इतिहासाबद्दलचा खोटारडेपणा! नेमका प्रहार करण्य़ाची गरज आहे.

    नुकताच मी प्रा. हरी नरकेंचा लोकप्रभामधील लेख वाचला. त्यात नेमके प्रहार आहेत. १४ भटांमध्ये कोणत्या जातींचे किती? कितीजण जिवंत? तसेच लाल महालातील शिल्प बसवल्यावर जेम्स लेन भारतात आलाच नाही मग शिल्प बघुन त्याला प्रेरणा कशी मिळणार?

    दुसरे असे की ब्रिगेड काय किंवा त्यांची भावंडे असलेल्या संघटना काय त्या सर्वांच्या अशा विचारसरणीच्या मागे आ. ह. साळुंकेचे साहित्य आहे.
    हे महाशय महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयक धोरण समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळेच सरकारने मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. कारण भटा बामणांची मुले फक्त इंग्रजी शिकतात व बहुजनांसाठी मात्र मराठी माध्यम!! असे यांचे तर्कट आहे.

    सर्व वाचकांना आवाहन

    या प्रवृत्तींमधील नेमका खोटारडेपणा व कार्यपध्दती उघडकीस आणणे जरुरी आहे

    ReplyDelete
  73. >>ब्रिगेडचा इतिहासाबद्दलचा खोटारडेपणा! नेमका प्रहार करण्य़ाची गरज आहे.

    अनामिक, तुमचं म्हणणं बरोबर आहे. परंतु हा लेख एका वेगळ्या शैलीत लिहिलेला आहे. बी-ग्रेड इतिहासाबद्दलचा खोटारडेपणा वगैरे यावर माहितीपूर्ण लेख लिहिणे हा उद्देश नाहीच. ते खोटारडे आहेतच या गृहितकावर तो आधारित आहे. आणि त्यांच्या या खोटारडेपणामुळे (आणि आपल्या निष्क्रियतेमुळे) पुढच्या पिढीला किती भयानक गोष्टींना सामोरं जावं लागू शकतं याचं चित्र मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

    मी या अशाच शैलीत बी-ग्रेडला पूर्वीही धुतलं आहे ते तुम्ही इथे वाचू शकता.. http://www.harkatnay.com/2010/09/blog-post_24.html

    ReplyDelete
  74. लेख उत्तम झालाय! आणि मी सर्वांच्या प्रतिक्रियाही वाचून काढल्या आहेत. तुझ्या लिखाणाबद्दल तर शंकाच नाही. तू उत्तम लेखक आहेस. छत्रपती शिवाजी महाराज आणि दादोजी कोंडदेव यांच्या संबंध होता की नव्हता. ते गुरु होते की शिपाई चर्चा होतात आणि वाद मला तरी सध्याच्या घटकेला योग्य वाटत नाही. मुळात आपल्या राज्यकर्त्यांना राज्याचा विकास करण्यात रस आहे की वाद वाढवून राज्याचे नुकसान करण्यात हेच कळेनासे झाले आहे. अनेक प्रश्न आहेत. मान्य आहे की, चीडचीड प्रत्येकाची होते या विषयामुळे. पण माझ मत तरी अस आहे की, देशाचा-राज्याचा विकास आणि त्यावरील प्रश्न महत्वाचे आहेत अस मला वाटत . बाकी लेख आणि लेखक माझे आवडीचे आहे. :)

    ReplyDelete
  75. हेमंत, प्रतिक्रियेबद्दल आभार. खरंय या वादापेक्षा सध्या तरी राज्याच्या, देशाच्या प्रगतीकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे.. पण लोकांना या असल्या निरर्थक वादांमध्ये गुंतवून ठेवून सत्ताधारी/राजकारणी अब्जावधी रुपयांच्या घोटाळ्यांचं प्लानिंग करताहेत एवढंच सांगायचा प्रयत्न होता माझा. असो..

    प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete
  76. सालं आजकाल बहुजन म्हणून जन्मास न येणं म्हणजे एक मोठं पाप आहे. पूर्वी (आणि बर्‍याच ठिकाणी आत्ताही) अशी प्रथा होती की, मुलगी झाली की तिला मारून टाकायचं. मुलगी झाली की बापाला तिच्या लग्नासाठी होणारा खर्च, द्यावा लागणारा हुंडा, लग्न जमवण्यासाठी झिजवावे लागणारे लोकांचे उंबरठे या गोष्टी आठवायच्या आणि मग मुलीचा जन्मल्याक्षणीच जीव घेतला जायचा. ब्राह्मणद्वेषाची विषवल्ली सध्या एवढ्या वेगाने फोफावतेय की काही वर्षांनी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या मुलांवर आणि मुलींवर अशी परिस्थिती आली तर नवल वाटायला नको.

    छान लिहिलं आहेस. उद्वेग जाणवतोय लिखाणातून. अर्थात मतांच्या राजकारणात अडकलेल्या आपल्या देशात त्यामुळे किती फरक पडेल ही शंकाच आहे. :-(

    ReplyDelete
  77. न्युटनचा तिसरा नियम कधीतरी लागु होइल आणि साहेबांची पळता भुई थोडी होईल अशी आशा आहे.

    ReplyDelete
  78. अँड संकेत इज बॅक वुईथ बँग.. पुन्हा तुझ्या प्रतिक्रियांच्या मेल्सनी माझा मेलबॉक्स भरून गेलाय :) असो..

    चालायचंच रे.. अहि परिस्थिती येऊ नये म्हणून शक्य ते प्रयत्न करत राहणं एवढंच आपल्या हाती !!

    ReplyDelete
  79. विजय, अरे काही होणार नाही रे.. साहेन सुखात जगला आणि सुखाने मरणार. आपण काहीही वाकडं करू शकत नाही त्याचं !! :((

    ReplyDelete
  80. खूपच उशिरा प्रतिक्रिया देतोय. पण आजच हि पोस्त पाहण्यात आली. उत्तम आणि समर्पक लिहिलंय.

    अरे शिवाजी महाराजांच्या वाघ्याला ह्यांनी सोडलं नाही तर दादोजी तर अखंड माणूस होते. कुठे तो महाराजांच्या चितेत उडी टाकणारा वाघ्या आणि कुठे हि घाणेरडी, रस्त्यावरची साहेबांच्या आदेशावर शेपूट हलवणारी कुत्री!

    परखड शब्दांत सांगायचं झालं तर ह्या लोकांची "किळस" वाटते. कुठे अक्कल गहाण ठेवून आलेत माहित नाही? किंवा मग ब्रम्हदेव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा हगायला गेले होते वाटतं (अजून हगणं संपलं नाही आहे - वरच्या काही प्रतिक्रिया बघून).

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद पुष्कर. अशा लोकांकडे विशेष लक्ष द्यायची आवश्यकता नाही. समाजाला लागलेली कीड आहे ही !!

      ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा !

      Delete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...