मी : म्हणजे????
त्याच्या प्रश्नातल्या चारी शब्दांसाठी एकेक प्रश्नचिन्ह वापरत मी मोठा आ वासत प्रतिप्रश्न केला. कारण "पुन्हा" म्हंटल्यावर "आधी कधी?" , "घालवली" म्हंटल्यावर "उरली कधी होती?" आणि "पठ्ठ्याने" म्हंटल्यावर "नक्की कोणी? श्रीशांतने की उनाडकतने?" असे अनेक प्रश्न माझ्या डोक्यात उभे राहिले.. पण माझ्या "म्हणजे?" वाल्या प्रश्नाने त्याला (,त्यांना आणि अनेकजणांना) एवढे तीन-तीन प्रश्न सोडा, काहीच अर्थबोध झाल्याचं दिसेना. त्यामुळे मग मी डोक्यात उभे राहिलेले ते प्रश्न तोंडावाटे उभे केले.
पहिल्या दोन प्रश्नांना साफ बगल देत तिसर्या प्रश्नावर फिस्सकन हसत तो (,ते आणि अनेकजण) म्हणाला "अरे ते दोघे कशाला घालवतायत मॅच? सच्च्याने घालवली ना." शिव्या घालतानाही जवळीक दाखवण्याचा मोह न सुटलेल्या त्या (, त्यांच्या आणि अनेकजणांच्या) अश्राप जीवाकडे सौहार्दपूर्ण नजरेने पाहून मी न समजल्यासारखं करत पुन्हा विचारलं..... "म्हणजे?"... यावेळी कदाचित त्याला प्रश्न समजला असावा. तोंडाच्या पुरचुंडीची गाठ सोडून तो (, ते आणि अनेकजण) बदाबदा बोलायला लागला.
"अरे काय यार. एवढं करून स्वतःसाठीच खेळला ना. स्वतःचे शंभर होण्यासाठीच !! स्वतःची पन्नासावी सेंच्युरी मारण्यासाठी सगळी धडपड. मग मॅचचं काहीही होऊदेत." या चिरपरिचित सुरुवातीवरून गाडी आता स्वार्थी खेळ, स्वतःपुरते विक्रम, मॅचविनर नाही, प्रेशरखाली खेळत नाही, दुसर्या इनिंगमध्ये परफॉर्मन्स देत नाही वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वगैरे वाल्या घिसापीट्या विषयाकडे वळणार हे माझ्या लक्षात आलं.
अशा फालतू बडबडीला गप्प करण्यासाठी मी नेहमी ही महान वेबसाईट वापरतो. ज्याप्रमाणे असं म्हणतात की दासबोधात समर्थांनी आपल्यासारख्या सामान्यांना सुचणारही नाहीत इतक्या शंका काढून स्वतःच त्या शंकांची उत्तरं दिली आहेत त्याप्रमाणे या वेबसाइटवाल्यांनी त्याच्या (, त्यांच्या आणि अनेकजणांच्या) सारख्यांना पडलेले प्रश्न, शंका, संशय यांची धूळधाण तर उडवली आहेच पण इतरही अनेक कुशंकांना आपणहून उत्तरं दिली आहेत.
थोडक्यात अशा बाष्कळ बडबडीकडे दुर्लक्ष करण्याचं, त्यांना अनुल्लेखाने मारण्याचं कसब गेल्या एकवीस वर्षांत सचिनकृपेने माझ्या ठायी एकवटलं आहे. मात्र ती बडबड पुन्हा एकदा ऐकून यावेळी मात्र असह्य होत होतं !
तो (,ते आणि अनेकजण) बोलतच होता... "शेवटच्या दिवशी त्याने सगळी सूत्रं हातात घेणं आवश्यक होतं, त्याने जास्तीत जास्त बॉलर्सना फेस करणं आवश्यक होतं, तर उलट हा एक रन घेऊन या नवीन लोकांना बॉलर्सच्या तोंडी देत होता."
"लक्ष्मण आणि इशांतच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोहाली टेस्टमधल्या ऐतिहासिक मॅचविनिंग भागीदारीत इशांत लक्ष्मणपेक्षा अधिक चेंडू खेळला असल्याचं आणि त्याबद्दल काही दिवसांपूर्वीच आपण त्या दोघांचंही कौतुक केलेलं असल्याचं एवढ्यातच विस्मृतीत गाडणार्या हे महान पामरा" हे सगळं मनातल्या मनात म्हणून मी प्रकटपणे एवढंच म्हणालो "अरे पण त्यामुळे मॅच वाचली असती का? बाकीच्या विकेट्स धडाधड पडत असतानाही सचिन खेळतच होता आणि नाबादही राहिला याबद्दल त्याला स्वार्थी संबोधून दोष देणं म्हणजे मास्तरांनी वर्गात हजर असलेल्या मुलांनाच गैरहजेरीबाबतचे खडे बोल सुनावण्यासारखं नाहीये का ?"
तो (,ते आणि अनेकजण) काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. असे लोक कधीच काहीच ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतात. असो..
"अरे पण तो तर देव आहे ना तुमचा? तुम्ही त्याला देव मानता ना? मग त्याला हे का शक्य नाही? खरं तर त्याला सगळं शक्य असलं पाहिजे, सगळं जमलं पाहिजे, त्याने सगळ्या मॅचेस जिंकून दिल्या पाहिजेत. आणि अशा अवघड प्रसंगात तर त्याची किमया, चमत्कार दाखवून स्वतःला सिद्ध केलंच पाहिजे."
"तुझ्याकडे गाडी आहे?" माझ्या अचानक आलेल्या प्रश्नाने तो (,ते आणि अनेकजण) गोंधळला.
"काय?"
"गाडी रे.. कार.. कार.."
"हो आहे ना. ऑल्टो आहे."
"ओके.. आणि घर?"
"काय बडबडतो आहेस तू? किती वेळा तू घरी येऊन गेला आहेस."
"बरं ते जाऊदे. बँकबॅलन्स किती आहे?"
"काहीही काय बडबडतो आहेस? आहे पुरेसा.."
"समजा मी तुला आत्ता तुझ्या ऑल्टोऐवजी एक मर्सिडिझ, तुझ्या घराऐवजी पाच हजार स्क्वेअरफीटचा बंगला आणि दहाकोटीचा बँकबॅलन्स हे सगळं दिलं तर घेशील? की तू आत्ता आहेस त्यात सुखी आहेस?"
"काहीही प्रश्न विचारतोयस. वेड लागलंय तुला. कायतरी बडबडतो आहेस."
"बोल ना."
"अरे अर्थात !! कोणीही घेईलच. मी आत्ता कितीही सुखी असलो तरी या सगळ्या गोष्टींना कोण नाही म्हणेल? या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळाव्यात, कधीतरी आपल्या व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटतं. तुलाही वाटत असेलच."
"बरोबर"
"पण या सगळ्याचा मॅचशी काय संबंध??"
मी जवळजवळ दुर्लक्ष करत... "बरं देवाला मानतोस?"
"हो ही आणि नाहीही. थोडं फार मानतो"
"बरं मला आता एक सांग की आस्तिक असलास तर देव आणि नास्तिक असलास तर जी कुठली वैश्विक, आंतरिक, सर्वव्यापी, महान शक्ती वगैरे वगैरे तुम्ही म्हणता ती शक्ती यांना एक प्रश्न विचारू आता. तू तुझ्या देवाची/शक्तीची एवढी पूजाअर्चा, प्रार्थना करतोस, तुझी मागणी मागतोस, गार्हाणी घालतोस तरी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात का? सगळी मागणी मान्य होतात का? सगळी गार्हाणी पुरी होतात का? बोल ना? मग का नाही तुझ्याकडे अजून मर्सिडिझ? का नाहीये पाच हजार स्क्वेअरफीटचा बंगला आणि दहाकोटीचा बँकबॅलन्स?"
"क्काय??"
"मी सांगतो.. देव काहीही, मनात येईल ते, वाट्टेल ते करू शकतो... देव आपल्याला हवं ते सगळं देऊ शकतो... हा सगळा निव्वळ भ्रम आहे. म्हणजे देव हे करू शकत नाही असं मला म्हणायचं नाही.. कदाचित करू शकतही असेल पण म्हणून ते त्याने करावंच, केलंच पाहिजे, चमत्कार दाखवून स्वतःला सिद्ध केलेच पाहिजेत, आपलं अस्तित्व दाखवलंच पाहिजे असा घोशा आपण नाही लावू शकत.. थोडंफार आहे त्यात समाधानी राहायला शिकायला हवं.. नाही का?"
"म्हणजे?" गेल्या काही वेळात तो फक्त "म्हणजे" आणि "काय" या व्यतिरिक्त काहीही बोलला नव्हता... !
"म्हणजे हेच रे... १४००० च्या वर कसोटी धावा, ५० शतकं, ५९ अर्धशतकं, ५६ चा अॅव्हरेज, २०१० च्या कॅलेन्डर वर्षात ८५ चा अॅव्हरेज आणि १५०० च्या वर धावा, पाहिलं आणि एकमेव एक दिवसीय द्विशतक करणारा खेळाडू, १७००० एकदिवसीय धावा, अनुक्रमे ४६ आणि ९३ एकदिवसीय शतकं आणि अर्धशतकं, एकवीस वर्षं सतत न दमता, न थकता खेळणारा खेळाडू हे एवढं सगळं खूप आहे रे आमच्यासाठी.. त्यातच आनंद आहे आम्हाला.. देवच आहे तो आमच्यासाठी.. स्वतःचं देवत्व (तुमच्यासारख्यांसाठी) सिद्ध करण्यासाठी कदाचित तो प्रत्येक सामना जिंकून देऊ शकेलही, प्रत्येक सामन्यात शतक करेलही.. पण त्याची काही आवश्यकता नाही रे.. त्याने केलंय तेवढंच खूप आहे त्याला न मागता देवत्व देण्यासाठी.. न मागता हे महत्वाचं यात.. बरं या सगळ्यात त्याचा विनम्रपणा, सदैव जमिनीवर असलेली पावलं, सामाजिक दृष्टीकोन वगैरे तर कुठे धरतही नाहीये मी.. खरं तर नुसतं तेही पुरेसं आहे त्याचं देवत्व सिद्ध करण्यासाठी. तस्मात् देवत्व सिद्ध करणं, स्वतःला सिद्ध करणं वगैरे वगैरे आपण सचिनच्या बाबतीत तरी विसरून जाऊया....... नाहीतर एक आयडिया...!!!!! हे स्वतःला सिद्ध करणं उरलेल्या दहा जणांसाठी का नाही राखून ठेवत आपण... प्रत्येक सामन्यात शतक ठोकून/द्विशतक ठोकून/हॅटट्रिक घेऊन/डावात ५-१० गडी बाद करून सगळे सामने जिंकून द्यायला सांगून ? क्या बोलता?? व्हॉट से??"
-------------------------
तळटीप १ : काल्पनिक............ पण खरंखुरं !!
तळटीप २ : सचिनच्या प्रत्येक विक्रमावर पोस्ट लिहावंसं वाटतंच पण तसं केलं तर पठ्ठ्यासाठी (म्हणजे इथे मात्र सचिनसाठीच) एक नवीन ब्लॉगच काढावा लागेल. त्यामुळे एखाद्या विक्रमासाठी पोस्ट नाही लिहिली तरी चालेल असं म्हणून पन्नासाव्या शतकाबद्दल पोस्ट लिहिणार नव्हतो. जस्ट फेबु,ओर्कुट वर स्टेटस टाकून साजरा करणार होतो तो विक्रम.. पण गेल्या २-३ दिवसात क्रिकइन्फोवरचे काही कॉलम्स, त्याखाली आलेल्या प्रतिक्रिया, काही ट्विटस, काही कोट्स वाचून छान करमणूक झाली. त्यामुळे अखेर पोस्टला पर्याय नाही हे नक्की झालं..
तळटीप ३ : गेल्या २-३ दिवसात काही मस्त कोट्स वाचायला मिळाले. त्यात सर्वात आवडलेला म्हणजे हा.
"Sachin Tendulkar - Reducing the number of atheists since 1989"
आणि हा अजून एक.. हा मीच टाकलेला.. :)
Breaking News : Raju Parulekar and Sanjay Manjarekar attempted suicide..... The 50th Time !!
![]() |
अब तक पच्चास !! |
मस्त लिहिलेस... :) आयुष्यात एकदा सचिनला भेटायचे आहे.. अगदी जवळून.... :)
ReplyDeleteरोहणा, आभार आभार..
ReplyDeleteकुठलाही क्रिकेटपटू/गायक/कलाकार/हिरोईन वगैरे कितीही आवडते असले तरी त्यांना भेटायचंच असं कधीच वाटलं नाहीये आत्तापर्यंत.. रेहमान आणि आपला सचिन हे दोनच अपवाद.. खरंच एकदा तरी भेटायला मिळालं पाहिजे यार !!
वाह..थॅंक्स तुझ्याकडूनच मला ही पोस्ट हवीच होती. :)
ReplyDeleteकोणीही किती वाईट बोला सचिनला पण माझ्या मनातला त्याच्याबद्दलचा आदर तसूभर पण कमी नाही होणार. तो आपला सचिन आहे. सचिन तेंडुलकर, ह्या नावातच एक असामान्य ताकद आहे. त्याला सलाम आणि तुझ्या ह्या शब्दांसाठी मी तुझा नेहमीच आभारी राहीन मित्रा...
रेहमान आणि सचिन यांना मला पण खरच भेटायच आहे रे..मनापासून :) +1
यस्स्स! आहे तो देवच आहे आमचा!
ReplyDeleteआणि "ते" जे त्याच्याबद्दल काहीही बरळतात ते मलाही बरेच भेटलेत, पण त्यांच्या तोंडावर आकडेवारीचे फोर आणि सिक्सेस ठोकायला मी ही कमी नाही करत!
रच्याक...ह्याच पोस्टची वाट पाहत होतो....
ReplyDelete>>आयुष्यात एकदा सचिनला भेटायचे आहे.. अगदी जवळून..+१२३४५६
फ़ेबु वर स्टेटस टाकुन थोड सेलिब्रेशन होतं.
आम्हाला नॅनो वटवट आवडत नाही...वटवट बडी है तो बेहतर है.. :) :) :)
वाह,
ReplyDeleteक्या बोली है,ऐसी बोली है, की जैसी बंदूक की गोली है.
एकदम सही रे.
अरे कधी कळणार यांना त्याने एकट्यानेच सामना जिंकावा अस थोडच आहे. अरे त्याचा खेळ बघा रे स्वत:ला विसरून. एकदम डोळ्याच पारण फिटेल रे.
सुसाट ... एक नंबर...
ReplyDeleteओक्के...क्रिकेटमधलं काssssही कळत नाही! पण जिंकलो की आनंद होतो..आणि कोणामुळे जिंकलोबिंकलो एव्हढं कळतं! :p आणि सचिन तेंडुलकरबद्दल अभिमान, अगदी गर्वबिर्व पण आहे...:) त्यामुळे त्याला देव मानायलादेखील 'आमची' हरकत नाही! :p सचिनचा तो फोटो किती छान आहे न?! :)
ReplyDeleteBreaking News : Raju Parulekar and Sanjay Manjarekar attempted suicide..... The 50th Time !!
ReplyDeleteहा हा हा... :D :D :D
भार्री..
हेरंब, एकदम मस्त हजेरी घेतलीस. :D
ReplyDeleteनचिकेत नेहमी म्हणतो, " मैदानात उतरून तळपत्या उन्हात समोरून ९०/१०० मैलाच्या वेगाने येणार्या बॊलला फेस करा कधी आणि मग काय त्या सुचना, वल्गना, टीका-टिपण्ण्या करा. " :)
सुहास, आभार आभार... खरंच बरं झालं लिहिली.. मलाही चैन पडलं नसतं नाहीतर :)
ReplyDeleteअरे आणि जेव्हा जेव्हालोक त्याच्याबद्दल वाईट साईट बोलतात ना तेव्हा तेव्हा तो त्यांचे दात त्यांच्या घशात घालतोच.. त्याच्या बॅटने... :)
आपण सगळे एकदमच भेटूयारे त्यांना ;)
यस्स दीपक.. सही सही... खरंय.. आहेच तो देव.. प्रश्नच नाही..
ReplyDeleteअरे पण अशा लोकांचं निव्वळ आकडेवारीनेही समाधान होत नाही.. ते त्यांचा मुद्दा सोडतच नाहीत !!
हाहा योगेश.. हो रे . मलाही लिहून एकदम बरं वाटलं :)
ReplyDeleteनॅनो वटवट हेहेहे... नॅनो वटवट आमालाबी जमत नाय;)
हाहा पाटील साहेब.. क्या डायलॉग मारेला है..एकदम कडक !!
ReplyDelete>> अरे कधी कळणार यांना त्याने एकट्यानेच सामना जिंकावा अस थोडच आहे.
अरे आणि तेही त्याने असंख्य वेळा एकट्याने जिंकून दिले असताना !!
लीना, एक नंबर आभार :)
ReplyDeleteअनघा, खरं सांगू का.. समोरून घोंघावत येणार्या चेंडूंचा सामना करणार्या फलंदाजाला सोडून तसं कोणालाच क्रिकेटमधलं फार काही कळत नसतं. त्यामुळे कळत नसूनही कळत असल्याचाआव आणून सुर्याला नावं ठेवणार्यांपेक्षा असं लिमिटेड कळलेलंच खूप चांगलं.. ! हेहे
ReplyDeleteजाम सही आहे तो फोटो.. मलाही आवडला प्रचंड... ! पन्नासाव्या शतकानंतर त्याने नेहमीप्रमाणे आकाशाकडे बघून सलामी दिली तो फोटू आहे तो.
मैथिली, धन्स धन्स.. तो राजू परुळेकर त्या लोकप्रभाच्या किश्श्यापासून असला डोक्यात जातो ना माझ्या.. आणि हा मांजरेकरही "सचिनने रिटायर झालंच पाहिजे" चे ढोल बडवत होता गेल्या वर्षीच.. आता सगळ्यांची बोलती बंद झालीये एकदम :)
ReplyDeleteश्रीताई, हो ग घ्यावी लागते अधून मधून.. ;)
ReplyDeleteनचिकेतशी अगदी अगदी १०००००% सहमत... या तथाकथित एक्सपर्टसना विचारतंय कोण !!
बाकी कोणी काहीही बोलो, आपण फक्त एवढंच म्हणायचं.... ‘सचिन, सचिन’ ज्यांची श्रद्धा असते त्यांना देव पावतोच. :-)
ReplyDeleteहाहा संकेत.. एकदम चोक्कस... आपल्याला तर नक्कीच पावतो बाबा तो नेहमी :)
ReplyDeleteमी गेले ७/८ वर्षे क्रिकेट पाहत नाही आहे. मध्ये कधी तरी सामना पाहिला तर फक्त सचिन खेळतो तेच पाहतो. बाकी सचिनच्या खेळाबद्दल टिप्पणी नाही. फक्त मी आधी कधी माझ्या अनुदिनीवर लिहिले होते तेच.
ReplyDeletehttp://maajhianudini.blogspot.com/2009/11/blog-post_05.html
देवदत्त, माझंही क्रिकेट पाहणं हल्ली पूर्वी पेक्षा खुपच कमी झालेलं आहे. पण सचिन खेळत असेल तेव्हा आवर्जून पाहण्याचा प्रयत्न करतो..
ReplyDeleteतुझ्या अनुदिनीवरची पोस्ट वाचली. कणेकरांचं म्हणणं अजिबात पटलं नाही.. द. अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बाकीचे फलंदाज धडाधड बाद होत असताना सचिन नाबाद राहिला होता !! त्याने अजून काय करणं अपेक्षित आहे ?? कणेकरांसारख्यांसाठीच मी ही पोस्ट लिहिली आहे ;)
ते वाक्य पटले नसेल. पण मला वाटते, ज्यांच्याकरिता हे लेखन आहे त्यात कणेकर येत नाहीत. :)
ReplyDeleteअसो :)
एकदम चोख उत्तर.
ReplyDeleteपचास मार खान!!!
ReplyDeleteदेवदत्त,
ReplyDeleteकदाचित नसतीलही.. असो :)
खूपच छान. सचिन बद्दल जेवढं लिहावं तेवढं कमी आहे. मागे सचिनने १४००० धावा पूर्ण केल्या होत्या तेव्हा मी ही त्याच्यावर एक पोस्ट लिहिली होती. http://prathameshadvilkar.blogspot.com/2010_10_01_archive.html
ReplyDeleteधन्यवाद SAM. ब्लॉगवर स्वागत !
ReplyDeleteबाबा, एकदम जबरी !! :D
ReplyDeleteधन्यवाद प्रथमेश.. ब्लॉगवर स्वागत.. तुमचा लेख वाचला. छान लिहिला आहे.
ReplyDeleteसर्वप्रथम त्या लिंकसाठी अनेक आभार. प्रतिक्रियेआधी बर्याच लोकांच्या तोंडावर फेकून मारली आणि यापुढे मारत राहीन कारण जित्याची खोड...
ReplyDeleteबाकी "सर सचिन"बद्दल काय आणि कित्ती बोलायचे रे? अगदी दररोज मानाचा मुजरा करावा.
http://dimag-kharab.blogspot.com/2009/11/blog-post_14.html
धन्स सिद्धार्थ... मलाही ती साईट पहिल्यांदा जेव्हा मिळाली होती तेव्हा इतका प्रचंड आनंद झालेला ना की बस.. आपल्यासारख्याच एका सचिनभक्ताने ती मला पाठवली होती.. नेहमी उपयोगी पडेल म्हणून :)
ReplyDeleteतुझा मानाचा मुजरा वाचलाच नव्हता मी.. झक्कास आहे.. प्रचंड आवडला.. इथे तुझ्या कमेंटला उत्तर द्यायच्या आधीच तिकडे कमेंटलो :)
झक्कास..
यावेळी तो वर्ल्ड कप आणणार बघ.. एकटा.. स्वतःच्या जीवावर !!
एकदा नागपुरहून येतांना विमानात होता माझ्याबरोबर. त्याच दिवशी नेमकं कॉम्प्लिमेंट्री अपग्रेड पण मिळालं होतं. एक ऑटोग्राफ पण घेतला होता बोर्डींग पासवर..
ReplyDeleteखरच त्याने आपल्या कर्तुत्वाने हे देवत्व मिळवलं आहे ...धन्य तो देव आणि धन्य हा त्याचा भक्त ...
ReplyDeleteवॉव काका.. सहीच !! ग्रेट !
ReplyDeleteखरंय अगदी.. महान देव आहे तो !
ReplyDeletezakaas bhai....
ReplyDeleteधन्यवाद सुदीप.
ReplyDeleteजबर्या.. लिंक खुप उपयोगी आहे....
ReplyDeleteदेवाला वंदन!
अरे जामच भारी लिंक आहे ती..
ReplyDeleteमाझंही पुनःश्च वंदन !!