मला 'कन्फेशन बॉक्स' बद्दल एक सुप्त आकर्षण आहे. आपल्या चुका त्याच्यासमोर
मान्य करून टाकल्यावर आपल्याला अनकंडीशनली माफ करून टाकणारा कन्फेशन बॉक्स !
त्याच्यासमोर सगळं मान्य केल्यावर एकदम कसं हलकं हलकं वाटत असेल नाही? आपल्या देवळात पण चर्चसारखाच कन्फेशन बॉक्स हवा होता !
---------------
मी नेहमीप्रमाणे आमच्या दोघांच्याही आवडीची कालिया आणि कृष्णबाप्पाची श्तोली शांगायला... सॉरी सांगायला सुरुवात करतो. कालियामर्दन होईहोईपर्यंत पापण्या वेटलिफ्टिंगची स्पर्धा हरलेल्या असतात. कोलाहल, कलकलाट, धिंगाणा या सगळ्यांना किमान दहा तासांची विश्रांती मिळणार असते ! त्याच्या शांत चेहऱ्याकडे बघून जेमतेम पंधरा मिनिटांपूर्वी याने माझा ओरडा खाल्लाय यावर माझा स्वतःचाही विश्वास बसत नाही.
छ्या.. उगाच ओरडलो त्याला.... अरे पण त्याच्या भल्यासाठीच ओरडलास ना?
पण तरी इतकं ओरडायला नको होतं..... अरे पण न खाता झोपला असता तर पुन्हा चिडचिड केली असती. नेहमीचं द्वंद्व सुरु होतं....
फोनवर बोलू देत नाही म्हणून खाल्लेला ओरडा... लॅपटॉपच्या कीजशी खेळ केला म्हणून रागावणं... टीव्हीच्य बटनांशी, रीमोटशी, आय-पॅड्शी मस्ती केली म्हणून, पसारा केला म्हणून, पाणी सांडलं म्हणून, जोरजोरात उड्या मारल्या म्हणून, आरडओरडा केला म्हणून, दणादण पाय आपटले म्हणून, खात नाहीस म्हणून, झोपत नाहीस म्हणून ........ म्हणून...... म्हणून........ म्हणून.... म्हणून..... .... म्हणून...
किती कारणांनी ओरडलो रे तुला.. किती कारणांनी ओरडतो रे तुला.. किती वेळा ओरडलो.. तुझी चूक असताना आणि माझी चूक असतानाही !!!
मी एकदम कळवळतो. स्वतःचाच राग येतो...
सॉरी राजा सॉरी.. प्लीज माफ कर मला. पुन्हा असं करणार नाही.. पुन्हा कधीच तुला ओरडणार नाही... !!
अॅण्ड दॅट्स इट.... मला जाणवून जातं. मला त्या चर्चमधल्या किंवा बाहरेच्या कुठल्याही कन्फेशन बॉक्सची गरजच नसते. माझा कन्फेशन बॉक्स माझ्या समोरच असतो. झोपलेलं पिल्लू हाच आपला कन्फेशन बॉक्स.. त्याच्यासमोर बिनदिक्कतपणे आपल्या सगळ्या चुकांची कबुली देता येते, सगळी जंत्री वाचता येते. पण तरीही अपराधीपणाचा गंड जाता जात नाही.
आणि अचानक तो खुदकन हसतो. झोपेतच.... झोपेत जणु तो सगळं बोलणं ऐकत असतो. आणि ऐकून घेतल्यावर हसत हसत म्हणत असतो "बाबा, अरे ठीके रे... एवढं काय त्यात. जाउदे. चुकून झालं ना."
मग मला कळतं की तो माझा कन्फेशन बॉक्सच नाही तर कन्सेशन बॉक्स आहे.. माझ्या एवढ्या सगळ्या चुका माफ करून मला शिक्षेत कन्सेशन देणारा कन्सेशन बॉक्स !!
.
.
.
.
.
पण राहून राहून एक विचार माझा पिच्छा सोडत नाही. ही सगळी कन्फेशन्स तो जागा असताना देऊ शकेन का मी? तेवढं धैर्य आहे माझ्यात?

आमच्या घरात पण आता दोन दोन बाळ आहेत.जुलै मध्ये काका झालो आणि महिन्याभरापूर्वी मामा ...अजून तितक्या उचापती सुरु नाहीत पण बराच वेळ त्यांच्याबरोबरच जातोय त्यामुळे ह्या पोस्टच्या जास्तच जवळ गेलो ... सुंदर पोस्ट आहे रे तशीही आदितेय वर पोस्ट असली कि ... :)
ReplyDeleteअभिनंदन मामाराव आणि काकासाहेब :)
Deleteधन्यवाद रे.. मामा आणि काकाला ते गिल्ट फिलिंग येणार नाही. तस्मात तू सुखी आहेस :)
प्रचंड प्रचंड भारी.. मनातलं एकदम!! :-)
ReplyDeleteप्रत्येक नव्याने झालेल्या (आई)बापाची कथा :)
Deleteआवड्या.
ReplyDeleteधन्स सायबा.
Delete:)
ReplyDeleteआवडली पोस्ट.
लेकीला समज आल्याआल्या मी केलेल्या चुकांची जंत्री वाचली होती तिच्यापुढे...त्यामुळे 'देव'पणातून बाहेर येऊन 'माणूस' म्हणून जगायला मदत झाली.
धन्यवाद :)
Deleteवॉव. ही मस्त आयडिया आहे. बहुतेक ढापेन मी काही वर्षांनी.
मस्त...आवडल :):)
ReplyDeleteआभार्स यवगेशसाई :)
DeleteKharay heramb, jagepani je bolata yet nahi te kadachit pillu zoplyavar mokalepanane mandata yet asava, kadachit hi apanach apalyasathi keleli soy mhanuya hava tar...
ReplyDeletePost avadali :)
धन्यवाद श्रद्धा.
Deleteअगदी खरंय श्रद्धा. आपण आपल्यापुरती केलेली सोय, तडजोड वगैरे वगैरे.
अगदी अगदी! आणि तुला गंमत सांगू का हेओ, अरे तो जागा असतानाही तू असे काही सांगू लागलास नं की तो त्याला काही न समजूनही फक्त तुझ्या केवळ टोनवरुन तुझे गाल गोंजारेल किंवा पाठीवर, ’ ठीकेरे बाबू ’ असे थोपटेल बघ. :)
ReplyDeleteभावलं! :)
आभार्स श्रीताई
Deleteकरून बघतो एकदा :)
उगा ओरडू नको रे पोराला ;)
ReplyDeleteमस्त लिहिलयंस :)
धन्स दीपक..
Deleteअरे त्या वेळी ती मुळीच गरीब बिचारी वगैरे वाटत नाहीत. बिलंदर वाटतात (आणि वागतात) एकदम :)
मस्त मस्त मस्त :)
ReplyDeleteआभार चैतन्य.
Deleteअगदि मनातलं लिहिलत बघा...
ReplyDeleteआभार केदार.
Deleteब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत राहा.
:) :) :) bhaaay tu to senti ho gaya...
ReplyDeleteकभी कभी होनेको मांगता :)
Delete>>अगदी अगदी! आणि तुला गंमत सांगू का हेओ, अरे तो जागा असतानाही तू असे काही सांगू लागलास नं की तो त्याला काही न समजूनही फक्त तुझ्या केवळ टोनवरुन तुझे गाल गोंजारेल किंवा पाठीवर, ’ ठीकेरे बाबू ’ असे थोपटेल बघ. :) ++++
ReplyDeleteमेल करते तूला एक कन्फेशन :)
आपण सारे कन्फेशनर्स !!
Deleteतुझ्या "म्हणून... म्हणून... म्हणून..." च्या लिस्टमध्ये मला आमचे भविष्य दिसत आहे :D
ReplyDeleteबाकी ही पोस्ट खर्या अर्थाने "बाप" पोस्ट झाली आहे ;-)
धन्स सिद्धार्थ..
Deleteम्हणून म्हणून ची यादी न संपणारी आहे रे.
पोस्ट लिहिताना बापाची खरी कसोटी लागली होती.
कन्फेशनसाठी जागा 'असणं' पुरेसं आहे - ते ऐकण्यासाठी तो 'जागा' असायलाच हवा अशी गरज नाही :-)
ReplyDelete:)
Deleteजागेपणी बोलण्याचं धाडस होणार नाही हेच खरं.
अगदी हळवं.... खूप मस्त.... :)
ReplyDeleteखूप आभार प्राची :)
Deleteछान व्यक्त झाल्या आहेत भावना. आपण त्या ओरडण्याच्या ’गिल्ट’ मध्ये असतो बराचवेळ पण ती भाबडी (ओरडतो तेव्हा वाटलेली नसतात) मुलं आपण ओरडलो हे विसरुन किती अलगद आपल्या कुशीत सामावतात.
ReplyDeleteअनेक आभार मोहना.
Deleteखरंय.. ओरडताना ती अजिबात भाबडी वगैरे वाटत नाहीत. उलट एकदम बिलंदर वाटतात. आणि पाचच मिनिटांनी ती संत बनतात आणि गिल्टच्या खोल खोल खाईत पोचलेलो असतो !
apratim
ReplyDeleteधन्स सुशमेय !
DeleteVery Nice! You have posted after a long time! Why so much gap? I look forward to your posts! Fantastic! Hope to read more frequently!
ReplyDeleteमनापासून आभार, श्रीवत्स.. हो मध्ये बरीच मोठी विश्रांती झाली. आता पुन्हा थोडं नियमित लिहायचा विचार आहे. बघू कसं जमतं !
Deleteमस्त :) :)
ReplyDeleteआता लेखणी थांबवू नकोस परत...तब्बल ५ महिने वाट बघायला लावलीस. ते जीमेलमधले ड्राफ्ट पूर्ण कर आणि इथे पोस्ट कर पटापट :)
आभार सुहास :)
Deleteहोय. आता थोडं पटापट लिहीन म्हणतो.
सगळ्य़ांच्या आयुष्यात येणारा प्रसंग !
ReplyDeleteहदयस्पर्षी झालाय..
धन्यवाद महेंद्रकाका. फार अवघड प्रसंग !
Deleteबर्याच दिवसांनी भेटलात. स्वागत. पोस्ट खरोखरच ‘खरी’ उतरली आहे. बहुतेक सर्व आई-बाबांच्या मनात हा खेळ चाललेला असतो. पण समविचरांची देवाण-घेवाण झाली की कुठे तरी, ‘अरे! म्हणजे असे वाटणारे आपण काही एकटे नाही!" उआ विचाराने बरे वाटते.:)
ReplyDeleteबाकी मस्ती अशीच चालू दे.
खूप खूप आभार अरुणाताई.. बरीच सुट्टी झाली खरी.
Deleteहो जवळपास सगळ्याच पालकांना कधीनाकधी ही अपराधीपणाची भावना येत असणार हे नक्की !
तुम्ही मला प्लीज अहो जाहो नका करू. एकेरीच आवडेल :) (कधीपासून सांगणार होतो पण राहून जात होतं)
चालायचच रे..असाच ओरडा किंबहुदा ह्याहीपेक्षा अधिक मारही आपण खाल्ला आहे. :) त्याशिवाय पोर सुधरत नाहीत.. ;) हे आपल्याला मोठे झाल्यावर कळतेच ना... :D
ReplyDeleteरोहणा, ते तर आहेच रे. नक्कीच.. पण त्याक्षणी जो अपराधीभाव येतो त्यातून निभावणं फार कठीण जातं !
Deleteशब्द जरा चुकतोय असं वाटतंय... कन्फेशन बॉस असा तो शब्द असायला हवा... हो गयी ना गलती?
ReplyDeleteकाय???
Deleteवाह वा, नवीन वर्षात चांगली सुरुवात झाली आहे.
ReplyDeleteमाझ्यासाठी तरी काही प्रमाणात माझा ब्लॉगच कन्फेशन बॉक्स आहे.
धन्यवाद सागर.
Delete>>माझ्यासाठी तरी काही प्रमाणात माझा ब्लॉगच कन्फेशन बॉक्स आहे.
सहीये.. येऊदेत भरपुर कन्फेशन्स ! ः)
Liked it dude!!!
ReplyDelete"कबूल करणं भुतकाळ बदलत नाही पण मनाची शांतता मिळेल व भविष्यातील कृती बदलतील.." इति बुद्ध उवाच बहुतेक..
ReplyDelete2013मध्ये जास्त लेख वाचायला मिळूदेत.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. :-)
ReplyDeleteधन्यवाद मिलिंद. ह्म्म्म. कदाचित मनाची शांती मिळत असावी..
Deleteतुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !
त्याची चूक नसताना रागावलास तर तो जागा असतानाच सॉरी म्हण एकदा. नेहमीच म्हणत जा. हळुहळु तुझं तुलाच जाणवेल की त्याची चूक नसताना रागावणं कमी झालय.
ReplyDeleteत्याची चुक नसताना कधीतरीच रागावणं झालं होतं.. आणि सॉरीही म्हणतोच.. पण तरीही त्या एक-दोन प्रसंगांचंही वाईट वाटतं !
Deleteekadam patala..
ReplyDeleteaamchee oradaayachee phase yayachiye ajun..
pan tarihee swatahalach asa bajawatey ki kaahihi zala tari tyaachyaawar oradayaca naahee..
baghuyaat kitee jamatay te..
pan zopalelee pora kharach khup cute disatat.. :)
धन्यवाद अवनी. बघता बघता येते ती फेज.
Deleteठरवल्याप्रमाणे करता आलं तर उत्तमच पण बिलिव्ह मी, प्रचंड अवघड असतं ते.. कळेलच तुला :)
he he.. Heramb... perfect... absolutely perfect... 100%!! sorry mhanje sorry mhanje sorry asta... kitihi sorry mhantla tari dusrya divshi punha oradna asta.....ani ratri zoplyavar rojach sorry mhanje sorry mhanje sorry asta!!
ReplyDeleteहाहा राहुल... प्रत्येक बापाची कहाणी :)
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteधन्यवाद यशोधन.
Deleteप्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत !
खूप खूप आवडली पोस्ट...
ReplyDeleteअचानक स्वतःचा कन्फ़ेक्शन बॉक्स ओपन झाला...तुझ्या बॉक्समधल्या काही गोष्टी त्यातही आहेत आणि आता आपलं पोरगं अभ्यास करायला कधी शिकणार म्हणूनचे वाढलेल्या काही इतर गोष्टी...
तुला सांगू कधी तरी एक दिवस मग सगळं मुलांचं ऐकून धिंगाणा करतो आणि तो बॉक्स एकदाच रिकामा करतो...तसं नेमकं कालच केलंय... :)
धन्यवाद अपर्णा. आपल्या प्रत्येकाच्या बॉक्सने अशी किती कन्फेशन्स पचवली असतील ही एक झाकली मूठच आहे !
DeleteRoj ratri hich feeling gheun jhopte ani sakali office madhe pan yete. REally touching and very very close to heart.
ReplyDeleteVidya.
खुपच अंतर्मुख करणारा 'कन्फेशन बॉक्स' ….! खरच आहे आपण कित्येकदा आपल्या पिलांवर केवळ आपल्याला आवडले नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आनंदासाठी केलेल्या कित्येक गोष्टीसाठी आपण रागावलेलो असतो …… ! फटकावलेले असते …! पण ती मात्र आपल्याला किती सहजपणे माफ करतात …! ( खरच माफ करतात की आपला तो "सॉरी" म्हणतानाचा बापूडवाना चेहरा पाहून त्यांना त्यावेळी दया येते…?) पण जसजसे ते बुद्धीने आणि वयाने मोठी होतात त्यांच्यातील मानापमानच्या जाणिवा जाग्या होतात ……!
ReplyDeletekay kiti "yuge" zali lihun heramb saheb ? "hEEEEEEEEEErambh" ...arambh kara ata likhanacha !
ReplyDelete