खरं तर राजू परुळेकरच्या (माझ्या याआधीच्या लेखात मी त्यांचा उल्लेख आदरार्थी करत होतो. पण आता ते त्या योग्यतेचे वाटेनासे झालेत ) दुसर्या हलके-मिस्ट्रीला उत्तर देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. सगळ्यांनी त्याच्या लेखावर (आणि त्याच्यावर) एवढी टीका केली होती की त्याचं त्यावर उत्तर येणार हे तर नक्की होतच. आणि ते त्याप्रमाणे आलंच. मीही सवयीप्रमाणे ते वाचलं. सचिनवरील टीकेने बरबटलेली ती हलके-मिस्ट्री वाचून मनातल्या मनात त्यांची (संस्कार आड आल्याने एकेरीवरून पुन्हा आदरार्थी बहुवाचानाकडे वळतोय.. अरे(रे) संस्कार संस्कार) कीव यायला लागली. आणि शेवटी तर टीका करता करता साहेबांची भीड एवढी चेपली कि ते स्वतःची तुलना चक्क तुकाराम महाराजांशी करायला लागले. हे जरा फारच "परुळेकरी" होत होतं.. आता तुकाराम महाराजांचा भक्त असण्यासाठी वारकरी असाव लागत नाही किंवा सचिनवर प्रेम करण्यासाठी क्रिकेटर (परुळेकरी भाषेत खेळ्या) असाव लागत नाही. पण यापैकी कोणाचाही अपमान होत असेल तर तुकोबारायांनीच सांगितल्याप्रमाणे "तुका म्हणे ऐशा नरा मोजुनी माराव्या पैंजारा" हा मार्ग स्वीकारावा लागतो .. आणि त्यासाठीच हा पुनःश्च पत्रप्रपंच..
मी दोन्ही हलके-मिसट्रया पुन्हा पुन्हा वाचून बघितल्या पण सगळ्या unsung aani unhonoured हिरोंना स्मरून सांगतो की सचिनबद्दलचा तीव्र आकस आणि सचिनसारख्या निरुपद्रवी आणि इझी टार्गेट (ऑस्ट्रेलिया मध्ये भारतीयांवर हल्ले का होतात? कारण तेही तिकडे इझी टार्गेट असतात. ते फिरून प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करत नाहीत) असणाऱ्या व्यक्तीवर हल्ला करून जास्तीत जास्त फुकट प्रसिद्धी मिळवण्याचा उद्योग हे दोन्ही केमिसट्रया मधले सामाईक मुद्दे सोडले तर दुसरी केमिस्ट्रीला मला फारच विस्कळीत आणि संदर्भहीन वाटली.. का ते सांगतो. निदान मला तरी दिसलेले त्यांचे प्रमुख मुद्दे असे.
१. तो "खेळ्या" उर्फ "ग्लॅडिएटर" आहे .. त्याचं अधिकाधिक क्रिकेट खेळणं आणि अधिकाधिक सेन्चुर्या मारणं हे राज्यसंस्था आणि समाज यांना शोकांत शेवटाकडे नेणारं आहे.
२. त्याने फेरारीचा कर भरला असता आणि मुंबई ही फक्त महाराष्ट्राचीच आहे असं सांगितलं असतं तर परुळेकरी भाषेत त्याला चांगला भारतीय ग्लॅडिएटर म्हणता आलं असतं. (म्हणजे एवढ करून पुन्हा 'ग्लॅडिएटर'च बरं का )
३. त्याने (पुलेला गोपीचंद प्रमाणे) पेप्सीच्या जाहिराती नाकारल्या असत्या आणि (मुंबईतील मुले दत्तक ना घेता) स्टीव वॉ प्रमाणे कोलकात्यातील मुले दत्तक घेतली असती तर तो परुळेकरी डिक्शनरी प्रमाणे स्वार्थी व्यक्तिमत्व न राहता सेल्फलेस सोल म्हणून मान्यता पावला असता.
४. त्याच्याकडे मर्यादेपलीकडे पैसा आहे आणि तो त्याने (टाटा, पु ल, रॉकफेलर, गेट्स दाम्पत्य यांच्या प्रमाणे) सचिन तेंडूलकर फाउंडेशन काढून त्या फाउंडेशन कडे सुपूर्द करायला हवा होता. आणि त्याने तसं केलं असतं तर रा रा परुळेकरांनी त्याच्या सामाजिक बांधिलकीला जाहीर अप्रुव्हल दिलं असतं
(मी खेळ्या, ग्लॅडिएटर, पत्रकार, विचारवंत यापैकी काहीही नसणारा, पेप्सी पिणारा, मुलांना दत्तक न घेतलेला, हेमलकसात काम न करणारा, कुठल्याही फाउंडेशनचा नसणारा असा एक तुच्छ पामर असल्याने माझी मते ही नक्कीच चुकीची असणार याची परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री मला आहे आणि माझी ही तमाम चुकीची मते बदलण्यात ते नक्कीच यशस्वी होतील याचीही मला परुळेकर साहेबांपेक्षाही जास्त खात्री ........ वगैरे वगैरे.....)
आता पुन्हा एकदा परुळेकर साहेबांच्या मुद्द्यांना मी माझ्या नसलेल्या बुद्धीबाहुल्ल्ल्याने उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
१. सचिनच्या क्रिकेट खेळण्यामुळे समाज रसातळाला जात असल्याने तो आपली बॅट म्यान करून घरी बसला असता तरी गांगुली, द्रविड, धोनी, युवराज, सेहवाग, गंभीर, हरभजन, झहीर, इशांत, हे सगळे खेळत राहिलेच असते ना? का सगळ्यांनीच घरी बसायचं आणि भारतीय टीम आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरू द्यायची नाही आणि समाज रसातळाला जाण्यापासून रोखायचं?? मी खरंच प्रचंड बुचकळ्यात पडलो असल्याने रा रा परुळेकर "सचिनच्या बॅटिंग करण्याने समाज कसा काय आणि का रसातळाला जातो" हे अगदी सोप्प्या भाषेत (तिसर्या केमिस्ट्रीत) सांगतील का?"
२. हरभजन, धोनी, सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी हे आणि परुळेकरांच्या परिचयातल्या असंख्य राजकारण्यांनी इतर अनेक महागड्या गाड्या कर चुकवून आणल्या आहेत. त्यावर परुळेकरांनी किती शाई खर्ची घातली आत्तापर्यंत? आणि परुळेकर साहेबांनी सचिनचं ते वाक्य पुन्हा एकदा तपासून बघाव. अर्थात यावर मी माझ्या पहिल्या पत्रात उत्तर दिलेलं आहेच.
३. सचिनने पेप्सीच्या जाहिराती नाकारल्या असत्या तरी पहिल्या मुद्द्यातील सगळ्या खेळाडूंनी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अमिताभ पासून अक्षय कुमार पर्यंत सगळे जण त्या जाहिराती करत राहिले असतेच त्याचं काय? आणि ज्या अर्थी परुळेकर साहेब सचिनच्या थातुरमातुर (म्हणजे काय रे भाऊ?) सामाजिक कार्यांबद्दलचा उल्लेखही न करण्याचा सज्जड दम भरतात त्या अर्थी तो सामाजिक कार्य करतो हे त्यांनाही माहित आहे फक्त त्याचा उल्लेख त्यांच्या लेखाला आणि हेतूला बाधक आणि अडचणीचा ठरत असल्याने तो करू नये असे त्यांचे म्हणणे आहे काय?
४. लेखात उल्लेखलेली सगळी फाउंडेशन्स हि त्या त्या व्यक्तींनी त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस काढली आहेत. राजे, सचिन अजून चाळीशीचाही नाहीये. आणि प पु परुळेकर साहेबांना माहित नसल्यास सांगतो सत्यमची पण "सत्यम फाउंडेशन " आणि "बायराजू फाउंडेशन" अशा दोन संस्था होत्या. त्याचं काय झालं पुढे हे जग जाणतंच.
हुश्श .. संपला बाबा एकदाचा प्रश्नोत्तराचा तास (त्रास!!)
आता थोडे प्रश्न मी विचारतो परुळेकर काकांना.... परुळेकरांनी राजकारण्यांवर लिहिलेल्या केमिसट्रयांमध्ये बहुतांशी राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच नेते का आहेत हा प्रश्न माझ्या बालमनाला पडला आहे. विधानसभा/लोकसभा निवडणुकांआधी राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचे पडद्यामागे गुलुगुलू चालू असणे आणि परुळेकर (शिवसेनेचे समर्थक असल्याने... आता माहित नाही) यांनी राष्ट्रवादी नेत्यांचे गोडवे गाणे याला निव्वळ योगायोग समजायचं का?
मिडिया नेहमीच सचिन, त्याच्या क्रिकेटची २० वर्षे याला अवास्तव महत्व देते असे परुळेकरांना वाटत असेल तर त्यांनी सचिनला नावे ना ठेवता डायरेक्ट मिडियावरच हल्लाबोल का नाही केला? मिडिया सचिनला अवास्तव महत्व देते तर त्यात सचिनचा काय दोष ? दोष माध्यमांचाच ना??? मग परुळेकरांची लेखणी मिडीयावर का नाही सरसावली?? अरे हो पण परुळेकर पण मिडियावालेच पडले ना. मग जळात राहून माशाशी वैर कस पत्करणार बुवा. उगाच खरं बोलून आणि मिडीयाचे दोष दाखवून आपलं (२० वर्ष पूर करू घातलेलं ) करिअर का बिघडवा? राजे, तेथे पाहिजे जातीचे... म्हणूनच आचार्य अत्रे, नीलकंठ खाडिलकर, बाळासाहेब ठाकरे एकदाच निर्माण होतात. बाकीचे सगळे असतात ते परुळेकर, राउत आणि (बाळ नाही) "बाल" ठाकरे.
आणि सचिनला टार्गेट केल्याचे २ फायदे.. तो बिचारा उलटून बोलत पण नाही आणि टीका करणार्याला (तुमचीच) मिडिया भरपूर प्रसिद्धी पण देते. एक उदाहरण देतो राज ठाकरेंचं. (मला राज ठाकरे यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे हे विसरू नये). राज ठाकरे सगळ्यात जास्त राष्ट्रीय मिडीयाच्या चर्चेत आले ते कधी पासून माहित्ये? सांगतो. मनसेने टॅक्सीवाल्यांना मारलं, रेल्वे परीक्षांना आलेल्या भैयांना मारलं, तलवारी वाटण्याची भाषणं केली त्यापेक्षाही जास्त प्रसिद्धी त्यांना मिळाली जेव्हा त्यांनी अमिताभ बच्चन वर शाब्दिक हल्ला केला. रातोरात त्यांचं नाव सगळ्या हिंदी/इंग्रजी चॅनल्सवर (आधी पेक्षाही जास्त ठळकपणे ) झळकू लागलं. ही त्यांची स्ट्रॅटजी होती. पुन्हा सांगतो मला राज ठाकरेंबद्दल पूर्ण आदर आहे पण लोकप्रियता आणि जनाधार मिळवण्यासाठी त्यांना अमिताभ बच्चनवर शाब्दिक हल्ला करावा लागला हे सत्य मी तरी नाकारू शकत नाही .. एक्झॅक्टली तीच स्ट्रॅटजी वापरून परुळेकर सचिनला लक्ष्य करताहेत..
त्यांचं कुठलही पुस्तक मी वाचलेलं नाही (पण ई टीव्ही वरील संवाद चे जवळपास ७०% एपिसोड्स आणि त्यांचे राज, उद्धव, विजय तेंडूलकर यांच्यावरील आणि इतरही अनेक लेख वाचलेले आहेत ) पण त्या पुस्तकाचं मार्केटिंग करण्याचा किंवा मी कसा इतका हजारो माणसांना भेटलोय आणि मी कसा ग्रेट आहे हे सांगण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना असा एक उगाच संशय येऊन गेला.
परुळेकर जसे अजिबात क्रिकेट ना बघता, किंवा सचिनची बॅटिंग न बघता त्याच्यावर घणाघाती हल्ला करू शकतात तर म्या पामराने त्यांच्याच भाषेत त्यांना उत्तर देण्याचा म्हणजे त्यांची पुस्तके न वाचता त्यांच्या विषयी बोलण्याचा (मी निदान त्यांनी लिहिलेले लेख आणि "संवाद" तरी पहिले आहेत म्हणा) अल्पस्वल्प प्रयत्न केला तर ते वाईट वाटून घेणार नाहीत याची नक्की खात्री आहे.
अजून एक म्हणजे अरुंधती जोशींच्या मताला/लेखाला उत्तर देण्या ऐवजी "अमेरिकेतल्या मराठी माणसांना काय कळतंय, त्यांनी गप्प बसावं.. उगीच "आमच्या" भारतातल्या गोष्टींत लुडबुड करू नये" हा जो सूर आहे ना तो तर अतिशय उबग आणणारा आहे. (मी पण अमेरिकेतूनच लिहित असल्याने त्यांनी माझं उत्तरही तो गंड मनात ठेवून वाचलं तर मग विषयच संपला)
परुळेकरांचे (वर उल्लेखिलेले आणि इतरही अनेक) अप्रतिम लेख वाचून, लेखांच्या मांडणीवर आणि त्यातल्या मुद्द्यांवर बेहद्द खुश होऊन मी अनेकदा तोंडात बोटे घातली होती.. पण सचिनवरच्या या २ हलके-मिसट्रया वाचून तीच बोटे तोंडातून काढून खिशात लपवून ठेवावीत कि त्यांच्याच दिशेने उगारावीत या संभ्रमात असताना पर्याय २ चा प्रभाव अधिक ठरल्याने पत्रोत्तर दिले. केवळ सचिनचा, त्याच्या खेळाचा,त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या गुणांचा अतिशय तीव्र चाहता म्हणूनच नव्हे तर एक मराठी माणूस म्हणून पण मी त्यांचा आणि त्यांच्या लेखाचा अनेकवार निषेध करतो. मूर्तीभंजन केल्याचा आव आणत आणत फुकटची प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करता करता जनक्षोभाच्या रेट्याने त्यांचे लेखणीभंजन न होवो हीच सदिच्छा
जाता जाता : (पेप्सीच्या जाहिराती करत असल्याने आणि फेरारीचा कर माफ करण्या विषयी विनंती केल्याने) परुळेकर यांना सचिन जर एक महान माणूस वाटत नसेल तरी त्याच्या महान खेळ्या (परुळेकरी डिक्शनरीतला "खेळ्या" नव्हे, "खेळी"चे अनेक वचन या अर्थी), आकडेवारी, संदर्भ हे सर्व नजरेखालून घातल्यावर परुळेकरांना सचिन हा एक सार्वकालिक महान खेळाडू आहे हे तरी नक्की जाणवेल. तेव्हा पुढच्या कुठल्याही लेखात त्यांनी आमच्या सचिन तेंडूलकरचा उल्लेख खेळ्या, ग्लॅडिएटर असा करू नये हि त्यांना कळकळीची विनंती.. !!
(हाच लेख मी माझी प्रतिक्रिया म्हणून राजू परुळेकर यांच्या इ-मेल आयडी आणि लोकप्रभाच्या इ-मेल आयडी वर ही पाठवली आहे.)
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Showing posts with label राजू परुळेकर. Show all posts
Showing posts with label राजू परुळेकर. Show all posts
Monday, December 14, 2009
Friday, November 20, 2009
अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !!
आत्ताच राजू परुळेकरांची सचिनवरची अल्केमिस्ट्री वाचली. सचिनला नावे ठेवून मोठे, प्रसिद्ध होण्याचा किंवा मोठ्या माणसांना आपल्या अज्ञानामुळे दुर्बोध ठरवून प्रसिद्धीचा झोत आपल्यावर वळवण्याचा दुष्फळ प्रयत्न करणाऱ्या अनेक कपाळ करंट्यान्च्या टीम मध्ये राजू परुळेकर याचंही नाव झळकल तर. सचिनचं कौतुक केल म्हणजे Dr हिम्मतराव बावस्कर किंवा मंदा/प्रकाश आमटे यांचा अनादर केला अस कुठे होत? शेतकरी आत्महत्या करतात यासारखी दुसरी गोष्ट नसेल सरकारला आणि कृषी मंत्र्यांना मान खाली घालायला लावणारी. पण सरकार ते seriously घेत नाही, आत्महत्या, load shading वर उपाय शोधात नाही यात सचिनचा काय दोष? परुळेकर साहेब, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरहि आपण स्वतः आपल्या घरात दोन्ही वेळेला भरपेट जेवताय ना? आपण का नाही करत काही? आपल दोन्ही वेळ च जेवण आणि शेतकयांच्या आत्महत्या यांचा संबंध जोडणं हे जेवढ चुकीच आहे तेवढच सचिन आणि शेतकरी यांचा संबंध जोडण मूर्खपणाच आहे. सचिन जेवढ्या रन्स काढतो, सेन्चुर्या मारतो तेवढे शेतकरी जास्त आत्महत्या करतात असा काहीसा गैरसमज आपला झालेला नाहीये ना ? उगाच रोमन राज्यकर्ते, त्यांचे gladiators यांचे दाखले देऊन काहीतरी भारदस्त लेख लिहिल्याचा आव आपण आणत असलात तरी ते केविलवाणच जास्त वाटतंय हे कदाचित आपल्या लक्षात येत नसेल. आता सचिन हेमलकसात जाऊन क्रिकेट खेळला नाही,सेन्चुर्या ठोकल्या नाहीत म्हणजे त्या कमीपणाच्या झाल्या का? म्हणजे हेमलकसाच्या आवाराबाहेर कितीही आणि काहीही महान गोष्टी, व्यक्ती घडल्या तरी त्या हेमलकसा मध्ये किंवा इतर प्रयोगशाळांच्या बंद भिंतींआड घडल्या नाहीत (परुळेकरांचेच शब्द) त्यामुळे त्याच महत्व कमी होतं का? हेमलकसा ही यश मोजण्याची एकमेव फुटपट्टी असू शकते का? हेमलकसा आणि आमटे दाम्पत्याबद्दल मला अतीव आदर आहे आणि त्यांचा कुठेही यत्किंचितहि अपमान करण्याचा हेतू नाही. प्रत्येक मनुष्याच्या जगण्याच ध्येय हे ठरलेलं असत किंबहुना तो ज्या गोष्टीत सर्वोत्तम असतो ती गोष्ट पुन्हा पुन्हा, अजून, अधिक तीव्रतेने आणि योग्य पद्धतीने (improvisation) करणं आणि ते आपल्या जीवनाचं ध्येय मानणं यात चूक ते काय? परुळेकर साहेब, आपण पत्रकार आहात. आपल्या पत्रकारितेने किती शेतकऱ्यांचे जीव वाचतात ? किंवा आपण का नाही जाऊन सचिन सारखी batting करत किंवा मग ISRO मध्ये जाऊन संशोधन करत? नाही. कारण आपण त्यात सर्वोत्तम नाही आहात. आपल्याला पत्रकारिता चांगली जमते (??) ती आपण करता सचिनला क्रिकेट चांगल जमत तो क्रिकेट खेळतो. अमुक तमुक पत्रकाराने पत्रकारिता करण्यापेक्षा ISRO मध्ये जाऊन rockets का नाही उडवली किंवा हेमलकसा मध्ये जाऊन आदिवासी लोकांविषयी कार्य का नाही केल अशी बाष्कळ बडबड सचिनने केल्याच मी तरी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. सचिन, Dr बावस्कर, आमटे दाम्पत्य हे सगळे अशा गोष्टींच्या पार पुढे गेलेले आहेत. फार महान लोक आहेत ते. पण तुमच्या सारख्या पत्रकारांना ते जमण किती कठीण आहे ते दिसतच आहे.
राहता राहिला विषय सचिनने मुंबई संबंधी केलेल्या विधानाचा. यात त्याची चूक नाही तर त्याला प्रश्न विचारणार्याची चूक आहे. किंबहुना तुम्हीच तुमच्या प्रश्नाच उत्तर स्वतः च दिलेलं आहे. सचिनला appendix च operation करायला सांगितलं तर तो चुकणारच. कारण ते त्याच क्षेत्रच नाही. त्याप्रमाणेच मुंबई कोणाची हे ठरवण हे त्याच काम नाही तर राजकारण्याचं आहे आणि ते ते योग्य प्रकारे करत नसतील त्यात सचिन चा काय दोष? पत्रकारांना हि सवयच असते. चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचे आणि ती व्यक्ती काही बोलली कि त्यातील चुकीचेच शब्द निवडून ते छापून आणून मग त्या महान माणसाविषयी बोंबा मारायच्या. पण तुम्ही तरी काय करणार? ते शेवटी तुमच्या पोटापाण्याचं साधन आहे ना. आणि दुसर म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सचिन हा आंतरराष्ट्रीय आहेच त्याने कितीही तसा राहण्याचा किंवा न राहण्याचा प्रयत्न केला तरीही. राज ज्याप्रमाणे म्हणतो कि महाराष्ट्र हे माझ कार्यक्षेत्र आहे आणि मी त्यासंबधीच विचार करणार आणि बोलणार आणि आपणही ते मान्य करतो तसच सचिन हा ग्लोबल आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल. (आणि तुम्ही मान्य नाही केलत तरीही तो ग्लोबल आहे आणि राहणार हे सत्य आहेच आणि साऱ्या जगाने ते मान्य केलेलं आहे .)
आणि सचिनच्या खेळाला नाव ठेवण्यापेक्षा मी तर म्हणेन कि हे तुम्ही स्वतःचं महद्भाग्य समजा कि सचिन ज्या काळात क्रिकेट खेळला त्या काळात तुम्ही या पृथ्वीतलावर अस्तित्वात होतात जेणे करून तुम्हाला त्याच्या खेळाचा आनंद उपभोगता आला. तुम्हाला चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती.
राहता राहिला सचिनच्या खेळाचा विषय. तो गेली २० वर्षे खेळतोय, फलंदाजीतले नवनवे इतरांना नंतरची अनेक वर्ष असाध्य ठरतील असे विक्रम रचतोय त्याला खेळू देत. आणि हो .. सचिन, तू आज च आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३०,००० धावांचा टप्पा गाठलास. त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. तू (इतरांकडे लक्ष न देता) असाच खेळत राहा .. !!!
राहता राहिला विषय सचिनने मुंबई संबंधी केलेल्या विधानाचा. यात त्याची चूक नाही तर त्याला प्रश्न विचारणार्याची चूक आहे. किंबहुना तुम्हीच तुमच्या प्रश्नाच उत्तर स्वतः च दिलेलं आहे. सचिनला appendix च operation करायला सांगितलं तर तो चुकणारच. कारण ते त्याच क्षेत्रच नाही. त्याप्रमाणेच मुंबई कोणाची हे ठरवण हे त्याच काम नाही तर राजकारण्याचं आहे आणि ते ते योग्य प्रकारे करत नसतील त्यात सचिन चा काय दोष? पत्रकारांना हि सवयच असते. चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचे आणि ती व्यक्ती काही बोलली कि त्यातील चुकीचेच शब्द निवडून ते छापून आणून मग त्या महान माणसाविषयी बोंबा मारायच्या. पण तुम्ही तरी काय करणार? ते शेवटी तुमच्या पोटापाण्याचं साधन आहे ना. आणि दुसर म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सचिन हा आंतरराष्ट्रीय आहेच त्याने कितीही तसा राहण्याचा किंवा न राहण्याचा प्रयत्न केला तरीही. राज ज्याप्रमाणे म्हणतो कि महाराष्ट्र हे माझ कार्यक्षेत्र आहे आणि मी त्यासंबधीच विचार करणार आणि बोलणार आणि आपणही ते मान्य करतो तसच सचिन हा ग्लोबल आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल. (आणि तुम्ही मान्य नाही केलत तरीही तो ग्लोबल आहे आणि राहणार हे सत्य आहेच आणि साऱ्या जगाने ते मान्य केलेलं आहे .)
आणि सचिनच्या खेळाला नाव ठेवण्यापेक्षा मी तर म्हणेन कि हे तुम्ही स्वतःचं महद्भाग्य समजा कि सचिन ज्या काळात क्रिकेट खेळला त्या काळात तुम्ही या पृथ्वीतलावर अस्तित्वात होतात जेणे करून तुम्हाला त्याच्या खेळाचा आनंद उपभोगता आला. तुम्हाला चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती.
राहता राहिला सचिनच्या खेळाचा विषय. तो गेली २० वर्षे खेळतोय, फलंदाजीतले नवनवे इतरांना नंतरची अनेक वर्ष असाध्य ठरतील असे विक्रम रचतोय त्याला खेळू देत. आणि हो .. सचिन, तू आज च आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३०,००० धावांचा टप्पा गाठलास. त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. तू (इतरांकडे लक्ष न देता) असाच खेळत राहा .. !!!
Subscribe to:
Posts (Atom)
रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन
काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...
-
सूर्या, फावड्या, जोश्या, शिरोडकर, चित्र्या, केवडा, सुकडी, चिमण्या, आंबेकर, घासू गोखल्या, संत्या, मिरीकर, मांडे, बिबीकर, भाईशेटया, आशक्या, ...
-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
आम्ही मागे एकदा आमच्या संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त नाटक बसवत होतो. लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळा हौशी मामला होता. पण सगळ्यांना नाटकात काम ...