Friday, November 20, 2009

अल्केमिस्ट् उवाच.. बदनाम हुए तो क्या नाम तो हुआ !!

आत्ताच राजू परुळेकरांची सचिनवरची अल्केमिस्ट्री वाचली. सचिनला नावे ठेवून मोठे, प्रसिद्ध होण्याचा किंवा मोठ्या माणसांना आपल्या अज्ञानामुळे दुर्बोध ठरवून प्रसिद्धीचा झोत आपल्यावर वळवण्याचा दुष्फळ प्रयत्न करणाऱ्या अनेक कपाळ करंट्यान्च्या टीम मध्ये राजू परुळेकर याचंही नाव झळकल तर. सचिनचं कौतुक केल म्हणजे Dr हिम्मतराव बावस्कर किंवा मंदा/प्रकाश आमटे यांचा अनादर केला अस कुठे होत? शेतकरी आत्महत्या करतात यासारखी दुसरी गोष्ट नसेल सरकारला आणि कृषी मंत्र्यांना मान खाली घालायला लावणारी. पण सरकार ते seriously घेत नाही, आत्महत्या, load shading वर उपाय शोधात नाही यात सचिनचा काय दोष? परुळेकर साहेब, इतक्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतरहि आपण स्वतः आपल्या घरात दोन्ही वेळेला भरपेट जेवताय ना? आपण का नाही करत काही? आपल दोन्ही वेळ च जेवण आणि शेतकयांच्या आत्महत्या यांचा संबंध जोडणं हे जेवढ चुकीच आहे तेवढच सचिन आणि शेतकरी यांचा संबंध जोडण मूर्खपणाच आहे. सचिन जेवढ्या रन्स काढतो, सेन्चुर्या मारतो तेवढे शेतकरी जास्त आत्महत्या करतात असा काहीसा गैरसमज आपला झालेला नाहीये ना ? उगाच रोमन राज्यकर्ते, त्यांचे gladiators यांचे दाखले देऊन काहीतरी भारदस्त लेख लिहिल्याचा आव आपण आणत असलात तरी ते केविलवाणच जास्त वाटतंय हे कदाचित आपल्या लक्षात येत नसेल. आता सचिन हेमलकसात जाऊन क्रिकेट खेळला नाही,सेन्चुर्या ठोकल्या नाहीत म्हणजे त्या कमीपणाच्या झाल्या का? म्हणजे हेमलकसाच्या आवाराबाहेर कितीही आणि काहीही महान गोष्टी, व्यक्ती घडल्या तरी त्या हेमलकसा मध्ये किंवा इतर प्रयोगशाळांच्या बंद भिंतींआड घडल्या नाहीत (परुळेकरांचेच शब्द) त्यामुळे त्याच महत्व कमी होतं का? हेमलकसा ही यश मोजण्याची एकमेव फुटपट्टी असू शकते का? हेमलकसा आणि आमटे दाम्पत्याबद्दल मला अतीव आदर आहे आणि त्यांचा कुठेही यत्किंचितहि अपमान करण्याचा हेतू नाही. प्रत्येक मनुष्याच्या जगण्याच ध्येय हे ठरलेलं असत किंबहुना तो ज्या गोष्टीत सर्वोत्तम असतो ती गोष्ट पुन्हा पुन्हा, अजून, अधिक तीव्रतेने आणि योग्य पद्धतीने (improvisation) करणं आणि ते आपल्या जीवनाचं ध्येय मानणं यात चूक ते काय? परुळेकर साहेब, आपण पत्रकार आहात. आपल्या पत्रकारितेने किती शेतकऱ्यांचे जीव वाचतात ? किंवा आपण का नाही जाऊन सचिन सारखी batting करत किंवा मग ISRO मध्ये जाऊन संशोधन करत? नाही. कारण आपण त्यात सर्वोत्तम नाही आहात. आपल्याला पत्रकारिता चांगली जमते (??) ती आपण करता सचिनला क्रिकेट चांगल जमत तो क्रिकेट खेळतो. अमुक तमुक पत्रकाराने पत्रकारिता करण्यापेक्षा ISRO मध्ये जाऊन rockets का नाही उडवली किंवा हेमलकसा मध्ये जाऊन आदिवासी लोकांविषयी कार्य का नाही केल अशी बाष्कळ बडबड सचिनने केल्याच मी तरी आत्तापर्यंत ऐकलेलं नाही. सचिन, Dr बावस्कर, आमटे दाम्पत्य हे सगळे अशा गोष्टींच्या पार पुढे गेलेले आहेत. फार महान लोक आहेत ते. पण तुमच्या सारख्या पत्रकारांना ते जमण किती कठीण आहे ते दिसतच आहे.
राहता राहिला विषय सचिनने मुंबई संबंधी केलेल्या विधानाचा. यात त्याची चूक नाही तर त्याला प्रश्न विचारणार्याची चूक आहे. किंबहुना तुम्हीच तुमच्या प्रश्नाच उत्तर स्वतः च दिलेलं आहे. सचिनला appendix च operation करायला सांगितलं तर तो चुकणारच. कारण ते त्याच क्षेत्रच नाही. त्याप्रमाणेच मुंबई कोणाची हे ठरवण हे त्याच काम नाही तर राजकारण्याचं आहे आणि ते ते योग्य प्रकारे करत नसतील त्यात सचिन चा काय दोष? पत्रकारांना हि सवयच असते. चुकीच्या माणसाला चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टींबद्दल प्रश्न विचारायचे आणि ती व्यक्ती काही बोलली कि त्यातील चुकीचेच शब्द निवडून ते छापून आणून मग त्या महान माणसाविषयी बोंबा मारायच्या. पण तुम्ही तरी काय करणार? ते शेवटी तुमच्या पोटापाण्याचं साधन आहे ना. आणि दुसर म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सचिन हा आंतरराष्ट्रीय आहेच त्याने कितीही तसा राहण्याचा किंवा न राहण्याचा प्रयत्न केला तरीही. राज ज्याप्रमाणे म्हणतो कि महाराष्ट्र हे माझ कार्यक्षेत्र आहे आणि मी त्यासंबधीच विचार करणार आणि बोलणार आणि आपणही ते मान्य करतो तसच सचिन हा ग्लोबल आहे हे तुम्हाला मान्य करावच लागेल. (आणि तुम्ही मान्य नाही केलत तरीही तो ग्लोबल आहे आणि राहणार हे सत्य आहेच आणि साऱ्या जगाने ते मान्य केलेलं आहे .)
आणि सचिनच्या खेळाला नाव ठेवण्यापेक्षा मी तर म्हणेन कि हे तुम्ही स्वतःचं महद्भाग्य समजा कि सचिन ज्या काळात क्रिकेट खेळला त्या काळात तुम्ही या पृथ्वीतलावर अस्तित्वात होतात जेणे करून तुम्हाला त्याच्या खेळाचा आनंद उपभोगता आला. तुम्हाला चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती.
राहता राहिला सचिनच्या खेळाचा विषय. तो गेली २० वर्षे खेळतोय, फलंदाजीतले नवनवे इतरांना नंतरची अनेक वर्ष असाध्य ठरतील असे विक्रम रचतोय त्याला खेळू देत. आणि हो .. सचिन, तू आज च आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ३०,००० धावांचा टप्पा गाठलास. त्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन. तू (इतरांकडे लक्ष न देता) असाच खेळत राहा .. !!!

20 comments:

 1. Totally agree with you. One of the worst article from Raju Parulekar. I have emailed him similar feelings on his email id.

  ReplyDelete
 2. प्रवीण, प्रतिक्रियेबद्दल आभार.. मी पण ही प्रतिक्रिया लोकप्रभा ला पाठवली आणि नंतर तशीच blog वर टाकली. राजू परुळेकर यांच्या कडून अशा लेखाची अपेक्षा नव्हती.

  ReplyDelete
 3. पूर्ण सहमत आहे मी तुमच्याशी. आपल दुखण हेच आहे की आपल्याला ज्याची काही चूक नाही त्याच्याशी लढाई करण्याचाच फक्त पराक्रम गाजवता येतो. सचिन प्रगल्भ आहे आणि तो हे वाद वाढवत बसणार नाही ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब :)

  ReplyDelete
 4. हो ना. खरच सचिन हे सगळ्यात easy टार्गेट आहे. २ गोष्टींसाठी.. १ म्हणजे तो उलटून काही बोलत नाही.. आणि बोलला किंवा नाही बोलला तरी मोठ्या माणसाला नावे ठेवल्याबद्दल का होईना नावे ठेवानार्याच नाव पेपरमध्ये येतच. आणि याच प्रवृत्तीला माझा मुख्य आक्षेप आहे. actually राजू परुळेकरचे पूर्वीचे लेख, मुलाखती बघितल्या तर तो पण मला प्रगल्भ,परिपक्व वाटत असे. पण हाय रे .. बुद्धी फिरली असावी

  ReplyDelete
 5. Kharach, Sachin khup 'easy target' ahe.Hemant,tumachya-amchya sarkhyanech rajusarkhyanchi tonde band karun Sachin la barpur support kela pahije.

  ReplyDelete
 6. धन्यवाद सोपान. अत्यंत टाकाऊ लेख होता तो. राजू परुळेकर यांच्या कडून अशा लेखाची अपेक्षा नव्हती. आणि हो, हेमंत नाही, हेरंब :)

  ReplyDelete
 7. मलाही काहीच कळलं नाही लेख वाचून. मागे परुळेकरांचाच "उद्धव (मर्द) ठाकरे" हा लेख वाचला होता. तो बराच मुद्देसुद आणि विचारपूर्वक लिहाला होता. मात्र सचिन वरचा लेख वाचून त्यांना स्वत:ला देखील आपण काय आणि कशाबद्दल लिहतोय हे समजलेले दिसत नाही. मला तो लेख वाचून परुळेकरांची दया आली.

  ReplyDelete
 8. अगदी बरोबर. परुळेकरांची कीव यायला लावण्याजोगाच लेख आहे तो. माझ्या तरी मते उद्देश २. एक म्हणजे सचिन विषयी तीव्र आकस आणि सवंग लोकप्रियता मिळवण्याचा हव्यास.

  ReplyDelete
 9. उत्तम लेख आहे. मला वाटते कि तुम्हाला असा अजून एक लेख लिहावा लागेल . कारण या वेळच्या लोकप्रभाच्या अंकात सुद्धा परुळेकरांनी असाच लेख लिहिया आहे. पण मागच्यापेक्ष जास्त वाईट आहे तो.

  http://www.loksatta.com/lokprabha/20091218/alke.htm

  ReplyDelete
 10. धन्यवाद अभिजित. हो मी पण वाचला नवीन लेख आज. भयंकरच आहे. कदाचित मी रिप्लाय दिला नसता माझ्या ब्लॉग वरून पण त्यात त्यांनी स्वतःची तुलना तुकारामांशी केली आहे. निदान त्या कारणासाठी तरी उत्तर देण भागच आहे. बघूया कस जमतंय ते.

  ReplyDelete
 11. Mi aatach To lekh vaachala. Mala tya lekhat kahi vishes vaatle nahi. Actually Sachin chaya careerla 20 years zalli mhanun media ne ghatlela Jagar aapan pahilach aasel.

  Actually tyachi hi kahi garaj navati(physically 20 years khelat rahane comamndable aahe)

  Mala sawatala suddha sachinche vaktavya thode khatklech hote,(parulekarini sachin chaya 20 yrs chya udo udo baadall samjala vagere dosh deun parat tyalach jaat prasidhi dili aahe) mala personally tari vatat nahi rajula sachin badal kahi aakas aasel.

  rather lekha rokh pravrti kade naki vyakti kade.
  Mrunal

  ReplyDelete
 12. मृणाल, सचिनच्या २० वर्षे खेळण्याचा माध्यमांनी जर अतिरेक केला असं आपल्याला वाटत असेल तर माध्यमांना दोषी धरल पाहिजे, त्यांच्या वर टीकेचे आसूड ओढले पाहिजेत. (मला वैयक्तिक २० वर्षे खेळण हे फारच महान काम वाटत कारण मी स्वतः सलग २० मिनिटे धावू पण शकत नाही. आणि इथे खेळण म्हणजे २० वर्ष सरकारी नोकरीत पाट्या टाकणे नव्हे, प्रत्येक खेळीत performance दाखवून देणे आहे.)
  आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे परुलेकारचा रोख जर माध्यमांकडे असेल तर त्याने सचिनचे नाव ना घेता, त्याला खेळ्या, gladiator ना म्हणता नुसतेच मिडीयावर आसूड ओढायला हवे होते. पण नाही. त्याला प्रसिद्धी हवी होती. तू त्याचा दुसरा लेख आणि मी त्याला दिलेलं उत्तर वाच म्हणजे तुला कळेल मला काय म्हणायचय ते. परुळेकर असोत किंवा कोणीही, फुकट प्रसिद्धी कोण सोडेल. माझा "अल्केमिस्त झालासे कळस" हा लेख वाच म्हणजे माझा मुद्दा तुलाकळेल.

  ReplyDelete
 13. he sarva mediawale kay vateltya stories dakhvat astat. tyapeksha sachinvar asleli kontihi news best asanar nahi ka? shevati kay aahe ki " hathi chale apni chal..." parulekarani agadi level sodali (nahi.. nahi.. dakhavili) jabardast uttar dilyabaddal herambche abhinandan !

  ReplyDelete
 14. "हाथी चले अपनी चाल" हे अगदी बरोबर बोललीस प्रियांका.. परुळेकरांनी पुढच्या लेखात तर अजून तारे तोडले होते. त्याला पण मी उत्तर दिलंय. ते इथे वाच. http://harkatnay.blogspot.com/2009/12/blog-post_14.html

  ReplyDelete
 15. तुझा हा लेख राजूने वाचला आहे का रे ??? 'तोंडात मारली आहेस तू त्याच्या' ... हाहा ... जबऱ्या .. आपल्याला जाम आवडला हा लेख... :D

  ReplyDelete
 16. धन्यवाद रोहन :) .. उद्देश तोच होता पण त्याला ती थप्पड पुरेशी बसली असं वाटत नाही कारण त्याने १५ दिवसांनी पुन्हा एक लेख लिहिला आणि त्यात पुन्हा अकलेचे तारे तोडले. मी त्याला पुन्हा उत्तर दिलं. आणि यावेळी जरा जास्तच भारी. :) ते वाच इथे

  http://harkatnay.blogspot.com/2009/12/blog-post_14.html

  ReplyDelete
 17. "...चार क्षण सुखाचे लाभले नाहीतर आपल्या अवतीभवती घडणार्या भयानक, किंवा निराश करणाऱ्या भ्रष्टाचार, अतिरेकी हल्ले, कोडगे राजकारणी इ गोष्टींच्या कोंडाळ्यात निराशेने गाठून आत्महत्या करायची वेळ आली असती."

  ह्यातच सचिनचा मोठेपणा दडलेला आहे.

  ReplyDelete
 18. खरंच रे.. सचिन नसता तर क्षणोक्षणी आपल्या समोर उभ्या ठाकणाऱ्या संकटांनी फ्रस्ट्रेशन आलं असतं !!

  ReplyDelete
 19. Mr. Heramb Oak you have ar lasst proved Sachin is Gladiator of indian republic

  ReplyDelete
 20. Thanks Mr. Mukesh... If you keep your eyes and mind open it's quite visible how Sachin has *proved* what a great soul he is !!!! I know Sachin doesn't even care about erratic opinions of likes of (you and) Mr. Parulekar !!

  ReplyDelete

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...