Thursday, December 8, 2011

जमलंच पाहिजे !!

बाबा,
.......
.....
...

बाबा,
..
...
..
बाबा,

-हम्म..

बाबा, आज ना...... शालेत........ 

.........
......
द्फ्ग्दफ्ग्द......
...


चॉतलेत..... मी............ 
......
....क्लोपुल्य्त्य्य
....................
....


चिम्मय....... आमी....... ए, बी, शी, दी म्हणत....
.....
...र्तेहेत्रीएव्र
...
...........
.....
....
...व्व्ह्व्र्ग्स्ब
.......


बाबा, .....
.....
...
एप्त्कीएलो


-हम्म

बाआबा आआआआआआआआआआआ....................
 

-ऐकतोय रे बाबा.. पुढे बोल ना.

तल ना मी मद..........
...
.
.
...
अस्द्फेल्ल्गदफ........
...
.......
......

उइऔइलललवी
......
............
......
.....
.
.
..

त्य्द्र्त
..
इओप्क्र
..
.
..

वेलेग्स्द


-हम्म..

मग आलोतने 
..
...
...


माजी.........
....
...
....
कुक्ग्घदेरस
..........
....
.
.......
.....

द्फ्द्गेवइईई

.......
काल...... धेतली आणि....... मद........ मला.........

-हम्म


रात्री ................ चवळीची............... उसळ.............कोशिंबीर............... करू का????????

-हम्म

द्फ्ग्स्द्फ्ह्द्फ.... लिचा.....ची......... दॉल.......तुतली...

-हम्म
 
अरे आज ऋतुजाचा फोन आला होता. ती..................... म्हणाली.............गणेश.......... टूर......................... दोघेही..................दोन आठवड्यांची............... ऑफिस...................काम.....................फिरणार................ आपण...............ही........जायचं...............तुला............विचारते ...................... नंतर ...................... सांगते...............काय?..........चालेल??..............चालेल ना???? लक्ष????????????? कुठे...................?????मी "इंटरनेट/फेसबुक/ट्विटरच्या व्यसनाबद्दलचा आणि त्याच्या आहारी गेल्याने होणार्‍या दुष्परिणामांवरचा" लेख वाचून संपवला. तोवर घरात शांतता झाली होती. काहीतरी एकदम विचित्र असं वाटत होतं.

मग मी लॅपटॉप बंद केला..
मग मी आय-पॅड बंद केला.
मग मी आय-पॉड बंद केला.
मग मी टीव्ही बंद केला.

मग  मला जाणवलं की शांतता नव्हतीच. असलीच तरी भासमान होती. होणारे आवाज, बोलले जाणारे शब्द, चालू असलेली बोबडी बडबड माझ्या लॅपटॉपवर केंद्रित झालेल्या कान, डोळे आणि मेंदूपुढे फिकी पडत होती, असहाय होत होती, निःशब्द होत होती. पण आता..... आता जणु एक न दिसणारं आवरण दूर झालं, अदृश्य पडदे वर उचलले गेले, घरभर चैतन्य पसरलं, गलबलाट सुरु झाला.

बाबा, आद ना तो लुषिकेश आये ना शालेत... त्याता ना बद्दे होता. तल त्याने ना बलपूल चॉकलेतं आनली होती. मद तो, मी, तिम्मय, लाधा, पलाद, लिचा अचा शगल्यांनी  एबीशीदी म्हनत म्हनत ती थाल्ली. थूप मद्दा आली. तेवध्यात तो आलोक आला. त्याने माझी काल घेतली.. आनी ना लिचाची दॉल पन धेतली आनी ना थाली ताकून दिली. माझी काल नाई तुतली पन लिचाची दॉल तुतली. मनून ती थूप लल्ली. मनून मग आमी त्याला चॉकलेतं दिलीच नाई. लिचा माजी फेंद आये.


अरे आज नुसती धमाल माहिते?? ऋतुजाचा फोन आला होता. भरपूर बोललो. मस्त गप्पा एकदम. आनी नंतर बाईसाहेब म्हणतात कशा की आम्ही येतोय तिकडे. गणेशची बिझनेस टूर आहे. दोन आठवड्यांची. तेव्हा ते आपल्याकडेच येतायत. राहायला. चार दिवस तरी नक्की असतील. मी तर ऐकूनच असली खुश झाले ना. तिला म्हंटलंही की एवढी महत्वाची बातमी तू मला  अर्धा तास इकडची तिकडची बडबड करून मग सांगते आहेस !!! त्यांना नायगाराला जायचं आहे. आपणही जायचं त्यांच्याबरोबर असं म्हणाली ती. मग ? चालेल ना? जायचं ना आपणही? तुला काही काम वगैरे नाहीये ना तेव्हा? लवकर सांग मला तसं तिला कळवायला. आणि हो.... चवळीची उसळ चालेल ना आज रात्री? पटकन बोल म्हणजे मला तशी तयारी करायला. 


मग  मी ठरवलं. असाच लॅपटॉप, आय-पॅड, आय-पॉड, टीव्ही बंद करायचा... रोज.. रोजच.. आल्यावर... जमेल का? जमलं पाहिजे. जमलंच पाहिजे !!!!!

टीप : ही माझी कल्पना नाही. मागे एकदा कोणीतरी युट्यूब व्हिडीओ पाठवला होता. त्यात त्यांनी साधारण अशी कल्पना मांडली होती. ती जाहिरात मला प्रचंड प्रचंड आवडल्याने किंचित फेरफार करून ती शब्दांत उतरवायचं तेव्हाच ठरवलं होतं. त्यानुसार हे आधीच लिहून झालं होतं फक्त पोस्ट केलं नव्हतं. त्या व्हिडीओची लिंक शोधण्याचा बराच प्रयत्न केला पण काही मिळाली नाही. त्यामुळे तशीच  पोस्ट टाकतोय. जर कोणाला मी म्हणतोय तो व्हिडिओ कुठला हे लक्षात आलं असेल आणि कोणाकडे त्याची लिंक असेल तर नक्की कळवा..

टीप-२: आज इतक्या महिन्यांनी तो व्हिडीओ अखेरीस मिळाला. म्हणून लगेच इथे अपडेट करतोय.

https://www.facebook.com/photo.php?v=2869250456472

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...