या पुस्तकाच्या लेखनासाठी लेखकाने युकेमधील महत्वाच्या मुस्लिमबहुल शहरांमधून प्रवास केला, तेथील सामान्य नागरिक, प्रमुख व्यक्ती, मौलवी, राजकारणी, टॅक्सी ड्रॉयव्हर अशा सर्व लोकांशी चर्चा करून, त्यांना प्रश्नं विचारून, बोलतं करून त्यांच्या अनुभवांचं एकत्रीकरण करून इस्लामचा गेल्या साधारण १०० वर्षांमधला युकेमधला प्रवास शब्दबद्ध केला आणि अमंग द मॉस्क्स या आपल्या पुस्तकातून वाचकांसमोर आणला. ब्लॅकबर्न, ब्रॅडफर्ड, बर्मिंगहम, बेलफस्ट (नॉर्दर्न आयर्लंड), एडिनबर्ग आणि ग्लास्गो (स्कॉटलंड) आणि लंडन या प्रमुख मुस्लिम बहुल शहरांमधील अनेक धक्कादायक अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतात. या पुस्तकात त्या शहरांमधील आणि पर्यायाने ब्रिटनमधील मुस्लिम जीवन, त्यांच्या चालीरीती, कट्टरपणा, धर्मद्वेष्टेपणा या सगळ्यासगळ्याचे हादरवून सोडणारे अनुभव वाचायला मिळतात.
पुस्तकाच्या सुरुवातीलाच
परिचयाच्या प्रकरणात लेखकाने ब्रिटन आणि तेथील मुस्लिम लोकसंख्येचा धक्कादायक
विस्फोट याची सप्रमाण माहिती दिली आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी फक्त दोन मशिदी
असलेल्या इंग्लंडमध्ये आज किमान दोन हजार मशिदी आहेत. इंग्लंडमधील पहिली मशीद
लिव्हरपूलमध्ये सन १८८९ साली उभारण्यात आली. इस्लाममध्ये धर्मपरिवर्तन केलेल्या २०
ब्रिटिश मुस्लिमांनी तिची स्थापना केली होती. शंभर वर्षांपूर्वी फक्त दोन मशिदी असणाऱ्या इंग्लंडमधील
लंडन, ल्युटन, बर्मिंगहम, ब्रॅडफर्ड, ड्यूसबरी, ब्लॅकबर्न, कीली, नेल्सन इत्यादी शहरांचं आकाश आता मशिदींचे घुमट, मिनार, मनोरे यांनी भरून गेलेलं
आढळतं.
ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिकस (ONS) च्या अधिकृत आकडेवारीनुसार २००१ ते २०१६ या पंधरा वर्षांत संपूर्ण ब्रिटनची लोकसंख्या ४.९ कोटींवरून सुमारे ११ टक्क्यांनी वाढून ५.४ कोटींवर जाऊन पोचली मात्र याच कालावधीत ब्रिटनची मुस्लिम लोकसंख्या मात्र पंधरा लाखांवरून थेट बत्तीस लाखांवर गेली.
थोडक्यात १०७.३ टक्क्यांची अविश्वसनीय आणि धोकादायक वाढ !!! सन २०५० पर्यंत ब्रिटनची मुस्लिम लोकसंख्या एक कोटी तीस लाखांच्या वर जाऊन पोचेल असा अंदाज आहे.
बर्मिंगहम, रॉशडेल, ब्रॅडफर्ड, कीली अशा अनेक शहरांमध्ये वर्षानुवर्षं स्थायिक झालेल्या पंजाबी आणि काश्मिरी मुसलमानांच्या हातात त्या शहरांची सर्व सत्ता एकवटलेली आहे. मतांच्या लाचारीपायी राजकारणी आणि स्थानिक नेतेही लाळघोटेपणा करत इथल्या काळ्या कृत्यांकडे दुर्लक्ष करतात.
लंडन, बर्मिंगहम, ब्लॅकबर्न ही ब्रिटनमधील
सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेली काही शहरं आहेत. लुईस कॅसी कमिशनने २०१६ साली
केलेल्या एका सर्वेक्षणात ब्लॅकबर्नबद्दलचे धक्कादायक निष्कर्ष सामोरे आले. या सर्वेक्षणानुसार ब्रिटनमध्ये
अल्पसंख्यांक असलेले लोक (मुस्लिम) प्रत्यक्षात ब्रिटनच्या अनेक शहरांच्या
उपनगरांमध्ये बहुसंख्यांक झाले आहेत आणि त्यात ब्लॅकबर्नचा क्रमांक सर्वात वरचा
आहे. ब्लॅकबर्नच्या बास्टवेल आणि शिअरब्रो प्रभागांत मुस्लिम लोकसंख्या अनुक्रमे
८५% आणि ७८% झाली आहे. २०११
च्या जनगणनेनुसार ब्लॅकबर्नच्या एकूण एक लाख सतरा हजार लोकसंख्येमध्ये सुमारे
पन्नास हजार लोकसंख्या मुस्लिमांची आहे. अजून एक महत्वाची आकडेवारी म्हणजे याच
शहरात बेकारी ही ६% आहे जी ब्रिटनच्या राष्ट्रीय सरासरीच्या मानाने खूप अधिक आहे.
आणि अर्थातच त्यामुळे गुन्हेगारी देखील आपोआपच खूप अधिक आहे. तिथे श्वेतवर्णीय
लोकांवर रस्त्यांत उघडउघड हल्ले केले जातात. ब्लॅकबर्नमध्ये अनेक ठिकाणी
मुस्लिमांव्यतिरिक्त अन्य लोकांना प्रवेश नाही. थोडक्यात ते No-Go Areas आहेत.
ब्लॅकबर्नमध्ये
मशिदींवरच्या भोंग्यांना कुठलीही आडकाठी नाही परंतु श्वेतवर्णीय ब्रिटिश लोकांना
मोठ्या आवाजात गाणी लावायला परवानगी नाही. इतकंच नव्हे तर तेथील नागरिकांना
त्यांच्या देशाचा युनियन जॅक फडकवण्याचीही परवानगी नाही. सरकार मुस्लिमांना
वर्णद्वेषी, जातीयवादी वाटू नये म्हणून घेण्यात आलेली
खबरदारी आहे ही !!
ब्लॅकबर्नमधल्या एका मदरश्यातल्या
शिक्षणाला कंटाळून मदरश्याला रामराम ठोकलेल्या एका तरुण मुलाशी बोलताना लेखकाला
बरीच विचित्र माहिती कळली. खऱ्या जगातील सर्व झगमगाटापासून आणि प्रलोभनांपासून
जाणीवपूर्वक दूर ठेवून फक्त इस्लामचा अभ्यास करायला लागलेल्या या तरुण मुलाला
आपल्या आयुष्यातली महत्वाची पाच वर्षं वाया गेल्याची जाणीव झाली. कारण पाच
वर्षं इस्लामचा अभ्यास केल्यानंतर
त्याच्या हे लक्षात आलं की खऱ्या जगातल्या स्पर्धेला सामोरं जाण्याच्या दृष्टीने
आवश्यक असं कुठलंही शिक्षण किंवा कौशल्य त्याच्या ठायी नाही. त्याच्या पालकांना
पाच वर्षं लुटण्यात आलं. संपत्ती, जमीजुमला, ऐश्वर्य, स्त्रिया या सर्वांना
नावं ठेवणाऱ्या त्याच्या शिक्षकाची स्वतःची मात्र अनेक घरं आणि अनेक बायका आहेत.
नैराश्याने भरून गेलेले असे नवीन पिढीतील अनेक तरुण या शहरात आढळतात.
ब्रॅडफर्ड
त्यानंतर लेखक ब्रॅडफर्ड
या शहरात येऊन पोचतो. ब्रॅडफर्डमधल्या मशिदींचा अधिकृत आकडा हा १०३ आहे. तेथील
उपाहारगृहं, क्लब्ज, बार, डिस्को आता बंद झाली आहेत. १९९१ आणि २००१ साली
शहरात झालेल्या कुप्रसिद्ध दंगलींनंतर शहरातील BMW चं मोठं शोरूम बंद झालं. इतकंच नव्हे तर कुठलाही मोठा कारचा ब्रँड आता त्या
शहरात प्रवेश करत नाही. खुद्द पोलीस स्टेशनच्या बाहेर सुस्वागतम/welcome च्या ऐवजी 'खुशामदीद' लिहिलेले उर्दू फलक लागलेले आहेत.
वर्किंग मेन्स क्लब च्या
जागी आता लाला'ज वेडिंग हॉल आलाय तर मेलबर्न पबची जागा एशियन
फर्निचर शॉपने घेतली आहे. एका जुन्या पबच्या जागी शहाजलाल लतिफीया मशीद आहे तर अन्य एका पबच्या जागी अल-खिद्र कार्पेट्स चं दुकान
उघडण्यात आलंय. मेन्स क्लबच्या जागी आता नौशाही जवीया मशीद आहे तर डॉल्स अँड
डान्सिंग क्लब च्या ठिकाणी धांगरी शरीफ मशीद उभं राहिलंय
या सगळ्या मशिदींमध्ये
काश्मीर, पॅलेस्टाइनमध्ये मुस्लिमांवर होत असलेले
तथाकथित अत्याचार सांगून तरुणांची माथी भडकावण्याची कामं नित्यनियमाने सुरु आहेत.
किताब-अत तवहीद हे खुद्द सौदी सरकारने बंदी घातलेलं इस्लाम आणि सलाफीविषयक जहाल
पुस्तक इथल्या मशिदींमध्ये राजरोसपणे विक्रीसाठी उपलब्ध आहे.
गरीब कुटुंबियांना
सरकारतर्फे दिला जाणारा गरिबी भत्ता हा त्या कुटुंबातील मुलांपर्यंत पोचत नाही. हे
सरकारी पैसे काश्मीरमध्ये पाठवून काश्मीरमध्ये एक तर नवीन दुकानं उघडली जातात किंवा टॅक्सीज घेतल्या जातात.
इथल्या मुलांचे खाण्यापिण्याचे, कपड्यांचे हाल मात्र
होतंच राहतात. अपंग मुलांसाठी देण्यात येणार सरकारी पाकिस्तनी भत्त्याचाही इथले
पाकिस्तानी लोक असाच गैरवापर करतात. इथल्या अनाथ, अपंग मुलासाठी देण्यात आलेले सगळे पैसे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाठवले जातात.
२०१६ मध्ये सलमान रश्दी
यांचं पुस्तक ब्रॅडफर्डच्या रस्त्यावर जाळण्यात आलं. त्याविरुद्ध लेख लिहून आवाज
उठवणाऱ्या 'ड्रमंड रोड स्कुल' या शाळेचे मुख्याध्यापक श्री हनीफर्ड
यांना तडकाफडकीने नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. ब्रॅडफर्डचा तत्कालीन महापौराचं
नाव 'मोहम्मद अजीब' होतं हा खचितच योगायोग नसावा. त्या शाळेला भेट देण्याच्या मिषाने तिथे
पोचलेल्या लेखकाला अत्यंत धक्कादायक अनुभव आले.
'ड्रमंड रोड स्कुल' चं आता IQRA असं नामांतर झालं आहे असं लेखकाला कळलं. दर्शनी
खिडकीवर 'Free
Palestine' असं लिहिलं असलेल्या त्या
शाळेच्या शेजारी आता काश्मिरी हॉल असून दुसऱ्या बाजूला पाकिस्तनी स्टोर आहे.
शाळेच्या समोर मशीद बिलाल मदरसा असून मागच्या बाजूला अल मरकज उल इस्लामी ही शाळा
सुरु झाली आहे.
IQRA हा उर्दू शब्द असून कुराणात त्याचा उल्लेख आहे.
त्याचा अर्थ 'वाच' असा असून ही मोहम्मद
पैगंबरांना कुराण वाचण्याची करण्यात आलेली आज्ञा आहे हे जेव्हा लेखक आपल्याला
सांगतो तेव्हा खरा धक्का बसतो. 'ड्रमंड रोड स्कुल' चं IQRA असं नामकरण का झालं असावं
याचं उत्तर थेट शाळेकडूनच जाणून घेण्याचं लेखक ठरवतो. दुसऱ्या दिवशी शाळेच्या
दूरधवनी क्रमांकावर फोन करून "शाळेचं नामकरण IQRA असं उर्दू भाषेत का झालं?" असा थेट प्रश्न
केल्यावर मिळणारं उत्तर अजूनच चक्रावून टाकणारं असतं. शाळेच्या मते IQRA हा उर्दू शब्द नसून ते Improvement, Quality, Respect and
Achievement याचं लघुरूप आहे.
"उर्दू IQRA शब्दाशी याचा काहीच संबंध नाही का?" अशी थेट पुन्हा एकवार विचारणा केल्यावर शाळेचं उत्तर असतं
की "ही इस्लामी शाळा नसली तरी इथे शिकणारे अधिकतर विद्यार्थी हे मुस्लिम
आहेत. त्यामुळे IQRA
या शब्दाचा दोनपैकी
कुठलाही अर्थ आपण घेऊ शकतो." !!!
बर्मिंगहम
त्यानंतर लेखक आपला
मोर्चा बर्मिंगहम या शहराकडे वळवतो. बर्मिंगहममध्ये Boots, Tesco, Sainsbury’s, Aldi असे कुठलेही लोकप्रिय ब्रिटिश ब्रॅण्ड्स आढळत नाहीत.
मात्र हलाल मटणाची दुकानं, हिजाब/बुरखे विकणारी
दुकानं, इस्लामी पुस्तकं आणि भेटवस्तू विकणारी दुकानं
यांची इथे रेलचेल आहे. बिस्मिल्लाह बिल्डिंगमध्ये असलेल्या जमशेद क्लोदिंग
हाऊसच्या बाहेर चेहऱ्यापासून पायापर्यंत पूर्ण कपड्यांत झाकून ठेवण्यात आलेले
स्त्रियांचे mannequins
आहेत. जुनेद जमशेद या
वादग्रस्त पाकिस्तानी गायकाच्या नावाने असलेल्या कपड्यांच्या दुकानात 'शुद्ध इस्लामी' पद्धतीचे कपडे मिळतात.
मदिना गिफ्ट शॉप नावाची दुकानं तर जागोजागी दिसतात. एकोणिसाव्या-विसाव्या
शतकातल्या जुन्या घरांचं रूप आता बदललंय. सगळी घरं इस्लामी झाली आहेत. जवळपास
प्रत्येक घराच्या अंगणात किंवा खिडकीत 'या रसूल अल्ला', 'माशा अल्ला', 'बिस्मिल्ला' असे फलक लागलेले आढळतात. मक्केच्या काबाचे फोटो तर जवळपास
प्रत्येक घराच्या बाहेर टांगलेले किंवा रंगवलेले आढळतात. इथले अनेक तरुण
सीरियामध्ये जाऊन आयसिस या इस्लामी अतिरेकी संघटनेत सामील झाले आहेत.
बेलफस्ट, एडिनबर्ग, ग्लास्गो आणि इतरही अनेक
महत्वाच्या शहरांमध्ये लेखकाला सर्रास होणाऱ्या इस्लामी लग्ना (निकाह) च्या घटना
आढळल्या. ब्रिटनमधील जवळपास प्रत्येक मशिदीत इस्लाममान्य अशा शरिया पद्धतीने लग्ने
लावली जातात. परंतु यातील कुठल्याही लग्नाची ब्रिटिश कायद्यान्वये नोंदणी केली जात
नाही तर ती फक्त शरिया निकाह
म्हणूनच राहतात. या पद्धतीमुळे स्त्रियांना धोका असतो. ब्रिटिश कायद्यान्वये लग्न
न झाल्याने भविष्यात लग्न मोडायची वेळ आल्यास पुरुष पोटगी, मुलांच्या संगोपनाचा खर्च अशा कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर प्रक्रियेला बांधील
राहत नाही. सरळ तलाक देऊन पुढचं लग्न करण्यास तो मोकळा मोकळा होतो. अशा वेळी
अनेकदा स्त्रियांना स्वतःच्या मुलांचा ताबाही मिळत नाही.
कुठल्याही प्रकारच्या
कायद्याचा धाक नसल्याने अशा प्रकारची लग्नं करण्याची प्रक्रियाही अतिशय सोपी आहे.
मुस्लिम स्त्री-पुरुषांचे पासपोर्टस, मेहर (हुंडा) म्हणून
पुरुषाने स्त्रीला काहीएक रक्कम देण्याची तयारी, जन्माला येणारी अपत्यं मुस्लिम म्हणूनच वाढवण्यात येतील अशी खात्री आणि दोन
मुस्लिम पुरुष साक्षीदार (स्त्री साक्षीदार चालत नाहीत) आणले की हे निकाह लावले
जातात. आणि हे अशा प्रकारचे निकाह करण्याच्या प्रकरणांत अगदी सुशिक्षित लोकांचाही
अपवाद नाही. हे सर्रास सगळीकडे, सर्व आर्थिक, सामाजिक स्तरांमध्ये चालतं.
ग्लास्गो
लेखकाला ग्लास्गोमध्ये
आलेला एक अनुभव तर ब्रिटिश मुस्लिमांच्या निष्ठा कुठल्या दिशेने आहेत यावर
सुस्पष्टपणे प्रकाश टाकतो. ग्लास्गोमध्ये एका मशिदीत लेखकाला मेजर अब्दुल्ला बटल
नावाचा एक ब्रिटिश मुस्लिम सैनिक भेटला. त्याने विषण्ण करणारे अनुभव सांगितले.
इराक युद्धातून परत आलेल्या ब्रिटिश मुस्लिम सैनिकांवर इथल्या मुस्लिम जनतेने
हल्ले केले, त्यांच्या अंगावर थुंकण्यात आलं. कारण एकच की
ते मुस्लिम असूनही इराकमधल्या मुस्लिम लोकांशी लढले. मेजर अब्दुल्लाच्या तीन
पिढ्या ब्रिटिश सैन्यात आहेत. आणि तरीही तो सैन्यात आहे हे तो ज्या मशिदीत नमाज
पढायला येतो तिथे उघडपणे कोणालाही सांगत नाही. कारण त्यांच्या दृष्टीने
मुस्लिमांशी लढणारे मुस्लिम सैनिक (ब्रिटिश असले तरी) धर्मद्रोही आहेत.
लंडन
लंडनमध्ये पाहिली मशीद
बांधायला परवानगी देऊन,
वर त्या मशिदीला भरघोस
आर्थिक मदत करण्याचं 'पुण्यकर्म' हे अनेकांना प्रातःस्मरणीय असलेल्या विन्स्टन
चर्चिल याच्या नावे आहे. १९४० साली बांधण्यात आलेल्या या मशिदीकडे आखाती देश आणि
तिथल्या मुस्लिम लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं
पाऊल यादृष्टीने या घटनेकडे बघितलं गेलं.
लंडन हे ब्रिटनमधलं
सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेलं शहर आहे. दुकानं, टॅक्सी, बँका, हॉटेल्स इत्यादी सर्वत्र
त्यांचं वर्चस्व आहे. लंडनमध्ये शिया
जमातीचंही भरपूर प्रस्थ आहे. मोहरमच्या वेळी काढण्यात आलेल्या मोठ्या मिरवणुकीचं
(जलूस) वर्णन करताना लेखकाने त्याला आलेले धक्कादायक अनुभव सांगितले आहेत.
मोहरमच्या आदल्या दिवसापासून लंडनच्या प्रमुख वस्तीत असलेल्या मोठ्या मशिदीपासून
ते मोठ्या रस्त्यापर्यंतचा सगळा परिसर बंद केला जातो. चौकाचौकातून दुसऱ्या
दिवशीच्या मोहरमच्या मिरवणुकीचे फलक पोलीस स्वतः लावतात. दुसऱ्या दिवशी कित्येक
तास आरडाओरडा करत, गोंधळ घालत ती मिरवणूक चालू असते. त्यात शिया
जमातीचा प्रेषित अली च्या मृत्यूनिमित्त शोक व्यक्त केला जातो. पुरुष, लहान मुलं, स्त्रिया स्वतःला जखमा
करून घेतात. मिरवणुकीतही स्त्रियांची जागा दुय्यमच असते. स्त्रिया मिरवणुकीच्या शेवटी चालत असतात.
मिरवणूक संपल्यावर लेखक
त्या मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या अनेक घरांमध्ये जातो आणि तेथील लोकांशी संवाद
साधण्याचा प्रयत्न करतो. ती मिरवणूक, आरडाओरडा, मारामारी, स्त्रियांना दिली जाणारी वागणूक या सर्वांबद्दल सर्व
रहिवाश्यांच्या मनात अतिशय चीड आहे. परंतु त्याविरोधात काहीही करू शकत नसल्याने
सगळेजण हतबलही आहेत. नगरपालिका, पोलीस यांच्याकडे या
विरोधात तक्रार केली तर तक्रारींकडे दुर्लक्ष केलं जातं. कारण मुस्लिमांविरुद्ध
काही कारवाई करण्याचा प्रयत्न झाला तर पोलीस आणि प्रशासनावर जातीयवादी आणि
इस्लामोफोबिक असल्याचे आरोप होतात. त्यामुळे त्या भीतीने त्यांच्या विरोधात कोणीही काहीही कारवाई करत नाही. "हे लोक आमच्या
देशाचा सर्वनाश करणार आहेत!!." अशी तिथल्या नागरिकांची सार्वत्रिक भावना आहे.
२०१२ मध्ये ब्रिटनमध्ये
एक प्रचंड मोठं लैंगिक शोषणाचा प्रकरण (सेक्स स्कॅण्डल)
उघडकीस आलं ज्यात २० ते ५० वयोगटतल्या शेकडो पाकिस्तानी पुरुषांनी संपूर्ण
इंग्लंडभर १२ ते १८ वर्ष वयोगटातल्या सुमारे एकोणीस हजार मुलींचं वर्षानुवर्षं, वारंवार, सतत लैंगिक शोषण केलं, त्यांना धमक्या दिल्या, मारहाण केली, बलात्कार केले. कैक घटनांमध्ये दुर्दैवी मुली
आणि त्यांचे पालक यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे असंख्य तक्रारी केल्या. परंतु एकही
तक्रारीची दखल घेतली गेली नाही. कारण एकच.. "इस्लामोफोबिया आणि जातीयवादी
असण्याचा आरोप होण्याची भीती". या लैंगिक शोषणाच्या दुर्दैवी प्रकरणात सुमारे १९०००
अल्पवयीन ब्रिटिश मुलींवर अत्याचार झाले असा अंदाज आहे.
या लैंगिक शोषणाच्या
प्रकरणावर अनेक पुस्तकं लिहिली गेली, अनेक चित्रपट आणि
माहितीपट प्रदर्शित करण्यात आले.
पुस्तकं
Just a
Child: Sammy Woodhouse
Broken
and Betrayed: Jayne Senior
Pimped
: Samantha Owens
Girl
for Sale: Lara McDonnell
Three
Girls (मिनिसिरीज)
Betrayed
Girls (माहितीपट)
ब्रिटनची
सद्यस्थिती
लंडन, बर्मिंगहम, ब्रॅडफर्ड, ग्लास्गो, मँचेस्टर, रॉशडेल, ड्यूसबरी या आणि अशा अनेक
शहरांमधली हजारो मुस्लिम कुटुंबं बँका ते हॉस्पिटल आणि किराणासामान ते टॅक्सी अशा
रोजच्या व्यवहारात लागणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा या मूळ ब्रिटिश लोकांशी
महिनोंमहिने कुठल्याही प्रकारचा संबंध न ठेवताही सहजपणे उपभोगू शकतात अशी सध्याची
परिस्थिती आहे. कारण मुस्लिमांची हलाल पासून ते बँकिंग, किंवा डेटिंग अप्स पर्यंत अशी स्वतंत्र आणि समांतर अशी अर्थव्यवस्था त्यांनी
उभी केली आहे. इजिप्त, पाकिस्तान इत्यादी देशांमध्ये कदाचित नसेल इतकं मदरश्यांचं
पेव ब्रिटनमध्ये फोफावतंय! शाळा, उपाहारगृह, बँका, अन्नपदार्थ, टीव्ही वाहिन्या या सगळ्या सगळ्या अधिकाधिक 'इस्लामी' बनण्याचा प्रयत्न करतायत.
मदरसे, मशिदींना अधिकाधिक आर्थिक मदती केल्या जातायत, त्यांना अजून जास्त करसवलती दिल्या जातायत.
लंडनच्या शाळाशाळांमध्ये
इस्लामचं अंधप्रेम आणि अन्यधर्मीय (काफर) विद्यार्थ्यांविषयी कमालीच्या द्वेषाने
भरलेलं वातावरण असतं. मुस्लिम पालक आपल्या पाल्यांना शाळेतल्या नाताळाच्या
कार्यक्रमात भाग घेऊ देत नाहीत. अक्षरशः पाच वर्षांच्या मुलींना सक्तीने हिजाब
बांधून शाळेत पाठवलं जातं. त्यांना त्यांच्या हिंदू मित्र-मैत्रिणींशी खेळायला
मज्जाव केला जातो कारण इस्लामच्या मते हिंदू वाईट/अस्वच्छ असतात. पोहणे किंवा अन्य
कुठल्याही मैदानी खेळांमध्ये मुस्लिम मुलींनी भाग घेण्यास पालकांचा सक्त विरोध
असतो. नाताळच्या वेळी म्हणण्यात येणाऱ्या गाण्यांच्या कार्यक्रमात मुस्लिम
विद्यार्थ्यांनी भाग घेऊ नये अशा सक्त सूचना तर त्यांचे पालक करतातच पण चुकूनही ती
गाणी कानांवर पडू नयेत म्हणून गाणी चालू असताना दोन्ही कानांमध्ये बोटं घालून
बसण्याची शिकवण विद्यार्थ्यांना दिली जाते. यातल्या कुठल्याही प्रकाराला शिक्षक
आक्षेप घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाही. कारण तसं केल्यास त्यांना जातीयवादी किंवा
इस्लामविरोधक ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे हे प्रकार शांतपणे बघत बसण्याव्यतिरिक्त
त्यांना काहीही करता येत नाही.
या असल्या प्रकारच्या
वातावरणात ब्रिटनची पुढची पिढी वाढते आहे. अर्थात ती ही आत्ताच्या पिढीएवढीच
किंबहुना अधिकच कट्टर आणि कडवी होणार हे नक्की. सन २०२० मध्ये ब्रिटिश सुरक्षा
यंत्रणेने घोषित केलं की ते किमान त्रेचाळीस हजार संशयित अतिरेक्यांवर नजर ठेवून
आहेत आणि त्यातले ९०% हे मुस्लिम आहेत.
भविष्य
एकूण चित्र फार विदारक
आहे. सुरुवातीच्या काही शतकांमध्ये तलवारींच्या जोरावर रक्तपात करत जगभर पसरलेल्या
इस्लामला रक्तविहीन क्रांती करण्याचा, संपूर्ण जगाचं रूपांतर 'दार उल इस्लाम' अर्थात इस्लामची भूमी म्हणून करण्याचा एक अतिशय
सोपा आणि तितकाच प्रभावी असा मार्ग सापडला आहे. ते त्यांच्या मार्गाने अविरतपणे
चालतायत. प्रश्न हा आहे की जग डोळे उघडणार आहे का? या अक्राळविक्राळ जागतिक समस्येवर उपाय शोधणं ही तर पुढची बाब झाली पण आधी ही
समस्या अस्तित्वात आहे हे तरी आपण मान्य करणार आहोत का? आपल्या उत्तरावर आपला आणि आपल्या पुढच्या पिढीचा भविष्यकाळ अवलंबून आहे हे
नक्की!
-हेरंब ओक
ज्या ब्रिटिशांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं अँड आपली लूट केली सर्व प्रकारे त्या ब्रिटिश लोंकाच्या स्वतःच्या देशात आजून काय होणार असं वाटते . पेराल ते उगवणार .Karma returns. आपली फाळणी करून जे विष पेरलं कायम करता तेच विष त्यांना प्यावं लागत आहे हे नक्की
ReplyDelete