बरं मला एक सांगा. तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का? खरं तर 'बरं' या शब्दाने पोस्टच्या पहिल्या वाक्याची सुरुवात करत नाहीत पण थेट "तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का?" असला काहीतरी प्रश्न विचारून कशी सुरुवात करणार?? म्हणून मग जरा आधाराला, टेकायला म्हणून 'बरं' वापरला..... बरं का !! ;)
रंगीला
रंगीत
रंगारी
रंगीबेरंगी
रंगकर्मी
तर सांगा बघू या शब्दांचे अर्थ माहित आहेत का? म्हणजे प्रत्यक्ष अर्थ नका सांगू फक्त अर्थ माहित आहेत की नाही तेवढंच सांगा. होय की नाही. ते पत्त्यांच्या जादूत जादूगार समोरच्याला नाही का म्हणत की "हे पान बघा आणि लक्षात ठेवा. मला नका सांगू" .. अगदी तसंच..
------
या जगात प्राथमिक रंग किंवा प्रायमरी कलर तीनच. पिवळा, निळा आणि लाल. या रंगांपासून इतर सगळे रंग बनतात, तयार करता येतात. हे तीन रंग म्हणजे मूळ रंग आणि उरलेले सगळे ते सगळे मिश्र रंग. त्यामुळेच मला या तीन प्राथमिक रंगांबद्दल जेवढं प्रेम (वाचा ज्ञान) आहे तेवढंच इतर रंगांबद्दल अजिबात नाही. अर्थातच हे तीन रंग कळले की झालं आणि इतर रंगांवाचून आपलं काही अडत नाही असं माझं ठाम मत (वाचा अज्ञान) काही वर्षांपूर्वीपर्यंत होतं. तर हे प्राथमिक रंग लक्षात ठेवून बाकीचे उरलेले रंग म्हणजे त्याच रंगांना डार्क किंवा फिकट/फेंट चे प्रिफिक्स लावून मी ओळखायचो. थोडक्यात सुर्यफुल म्हणजे डार्क पिवळा आणि लिंबू म्हणजे फेंट किंवा फिक्कट पिवळा. झालं संपलं. उगाच त्या लेमन यलो, क्रोम यलोच, यलो ऑकरच्या (या 'यलो ऑकर'ला कोणी कोणी 'हगरा' रंगही म्हणायचे. आम्ही म्हणायचो नाही हे सांगण्यासाठीच मुद्दाम 'कोणी कोणी' या शब्दाची योजना केली आहे हे चाणाक्ष वाचकांनी .... ) भानगडी नाहीत. कालांतराने फेंट किंवा फिक्कट हेही फार 'व्हर्नाक्युलर' वाटायला लागलं. त्याच्याऐवजी फेड म्हणजे जरा भारीतलं (म्हणजे अर्थ फिकटच हो. शब्द भारीतला म्हणतोय मी) वाटायला लागलं. तर असं फिक्कट-फेंट-फेड करत करत का होईना पण आमचं प्राथमिक रंगांशी असलेलं नातं कायमच तसंच टिकून राहिलं....... थेट लग्न होईपर्यंत !! पण त्यानंतर ...
प्रसंग १ :
मागे एकदा दिवाळीत आईसाठी एक साडी घेतली होती. त्या साडीचा रंग, डिझाईन, पोत (कन्फेशन : हा पूर्णतः ऐकीव शब्द आहे. आम्हास 'पोतं' माहित आहे किंवा 'पोट'. परंतु हे/हा/ही पोत हे आम्हास पूर्णतः अझेप्य आहे. तेव्हा भावनाओंको समझो) वगैरे आईला आणि तिच्या मैत्रिणींनाही इतकं आवडलं होतं की मी साडी घेण्याच्या बाबतीत फार ग्रेट आहे असा माझा (वाचा माझ्या घरच्यांचा) उगाचच्या उगाचच समज झाला होता. तो उगाचच्या उगाच झालेला समज उर्फ गैरसमज तसाच वाढत वाढत जात कालांतराने इतका दृढ झाला की कसं कुणास ठाऊक पण लग्नानंतर माझ्या बायकोलाही ते खरंच आहे असं वाटायला लागलं. आमचा लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांतला उत्साह आणि तिचा माझ्या साड्यांच्या रंगसंगतीबद्दलचा दृढ विश्वास हे दोन्ही ऐन ऐन ऐन भरात असताना एक दिवस तिच्या साडी खरेदीसाठी आम्ही दुकानात प्रवेश करते झालो. आता पुलंच्या 'असा मी असामी' मधल्या डब्बल घोडा, चिकन, मांजरपाट, बोकड, दंडिया सारखी मौज आमच्या (वाचा बायकोच्या) साडीखरेदीत आली नाही पण उलट ती मौज परवडली असली एक जोरदार फजिती या 'चारुदत्ताच्या' नशिबी आली. आम्ही दुकानात शिरताच शहाडे किंवा आठवले किंवा 'आणि मंडळी' या पैकी कोणीच नसणार्या एका सदगृहस्थांनी आमचं स्वागत केलं. नमस्कार-चमत्कार, काय दाखवू?, बजेट वगैरे प्रश्नोत्तरांचा तास पार पडल्यावर त्यांनी आम्हाला काहीही बोलायची संधी न देता वेगवेगळया रंगांच्या, निरनिराळ्या प्रकारांच्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या साड्या आमच्यासमोर आणून ओतल्या. एकेक साडी निरखून बघत असताना बायकोने मधेच मला विचारलं "कुठली आवडली?". हा प्रश्न साडीच्या संदर्भातला आहे याचं भान ठेवून चटकन भानावर येत मी समोर (न)असलेल्या एका साडीकडे बोट दाखवून "ही फिक्कट लाल बरी वाटत्ये." असं म्हणून कोथळ्याऐवजी बोटांवर सुटका करून घेतली.
"अरे ही गुलाबी आहे."
"हो हो. मला गुलाबीच म्हणायचं होतं. फिक्कट गुलाबी बरी आहे त्यातल्या त्यात"
"मग लाल काय म्हणालास?" तिने (फिदीफिदी) हसत पृच्छा केली.
"अग फिक्कट लाल म्हणजेच गुलाबी. आणि फिक्कट गुलाबी म्हणजे...." काही सुचेना तेव्हा मी क्षणभर गप्प बसलो आणि तेवढ्यात त्या सदगृहस्थांनी दावा साधला
"दुधगुलाबी"
"काय?" मी खेकसलो.
"दु ध गु ला बी..... फिक्कट फिक्कट फिक्कट गुलाबी म्हणजे दुधगुलाबी. म्हणजेच या साडीचा रंग" 'नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या प्रायव्हेट संवादात (साडी विषयी असला तरीही) तोंड खुपसू नये' या सर्वमान्य, जगन्मान्य नियमाला पायदळी तुडवत त्याने मी दाखवत नसलेल्या (मला दिसतही नसलेल्या) एका फिक्कट लाल किंवा त्याच्या भाषेत फिक्कट फिक्कट फिक्कट लाल उर्फ गुलाबी उर्फ दुधगुलाबी साडीकडे बोट दाखवलं.
"काय गुलाबी?"
"दुध.. दुध.."
"उग्गाच कैच्याकै"
"अहो हा रंग दुधगुलाबीच आहे. म्हणजे एकदम हलका हलका गुलाबी"
"मग मी तेच म्हणालो ना !! फिक्कट गुलाबी.... फिक्कट गुलाबी, दुध गुलाबी. काय फरक आहे. पटॅटो.. पोटॅटो.. दोन्ही एकच" माझ्या त्या पोटॅटोवाल्या हल्ल्याने टो सॉरी तो क्षणभर गांगरला असं मला वाटलं पण माझ्या त्या जोकचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही किंबहुना त्याला तो कळलाही नाही हे पाहून वैतागून मी (माझ्याच) कपाळावर हात मारून घेणार एवढ्यात तो पुन्हा म्हणाला.
"साहेब, दुध वेगळं बटाटा वेगळा. मी इथे गुलाबी रंगाविषयी बोलतोय. दुधगुलाबी.. दुधगुलाबी.. रंग रंग.. ही साडी दुधगुलाबी रंगाची आहे." भाजीबाजार, दुधमार्केट ते साड्यांचं दुकान असा बहिर्गोलाकार फेरफटका (आपला लॉंगकट हो) मारत मारत मी पुन्हा साड्यांच्या दुकानात शिरेपर्यंत माझा आणि त्या हिरोचा संवाद ऐकून यथेच्छ हसून झाल्यावर बायको एकदम त्याला म्हणाली.
"जाऊ दे हो. माझा नवरा असाच 'रंगीला' आहे जरा".. एकदम गुदगुल्या झाल्यासारख्या वाटल्या आतमध्ये. साड्या, दुकान, गुलाबी, फिक्कट लाल, दुधगुलाबी, पोटॅटो सगळं सगळं विसरून गेलो क्षणभर.. एकदम हलकं हलकं वाटत होतं.
प्रसंग २ :
एकदा बायकोला हपिसातल्या एकाचा बिनडोक किस्सा ऐकवत होतो. हपिसातला बिनडोकपणाचा किस्सा म्हणजे अर्थातच बॉसचा असणार हे ज्याप्रमाणे आत्ता समस्त वाचकांनी ओळखलं त्याप्रमाणेच माझ्या चतुर चाणाक्ष बायकोनेही ते तेव्हा ओळखलं. त्या दिवशी आमच्या डॅमेजरला काहीतरी कारणासाठी बाहेर जायचं होतं आणि स्वतःचं पेट्रोल हजार रुपये लिटर आणि लोकांचं (वाचा टीममध्ये काम करणार्या साध्याभोळ्या गरीब बापड्या जनतेचं) पेट्रोल दहा रुपये लिटर असा स्वतःचा जाणूनबुजून गैरसमज करून घेऊन तोच कुरवाळत बसत त्याने बाहेर जाण्यासाठी माझी बाईक मागितली. कारण काय तर माझी बाईक पार्किंग लॉटच्या एन्ट्रन्सला लावलेली होती. मला कोणालाही गाडी द्यायला फार जीवावर यायचं (येतं आणि येत राहील). पण निव्वळ बॉसने मागितली या महत्वाच्या कारणामुळे आणि अप्रायजल जवळ आलेलं होतं या त्याहीपेक्षा महत्वाच्या कारणामुळे नाईलाजास्तव, जड अंतःकरणाने, जीवाची काहिली तगमग जे काय म्हणतात ते होत असूनही त्याला चावी दिली. पठ्ठ्या दात विचकत हसला. हसताना त्याचे सुळे माझ्या बाईकचं पेट्रोल पिणार्या आणि बाईकचे लचके तोडणार्या बाईक-ड्रॅक्युला सारखे भासले. अर्थात बिचारा नुसताच प्रेमाने (पक्षि दात न विचकताही) हसला असेल आणि ड्रॅक्युला बिक्युलासारखा वाटलाही नसेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी तरी इतकंच म्हणेन की तुम्ही माझा (एवढा चांगला, छान, मस्त) लेख वाचताय ना? मग बाजू कोणाची घेणार तुम्ही? तुम्हीच ठरवा.. मला नका सांगू.. हां अगदी ते मगाससारखंच किंवा त्या जादुगारासारखंच. असो. तर दात विचकून/न विचकता [इथे काय वाचायचं ते मी तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडतो ;)] तो ड्रॅक्युला बाहेर जाण्यासाठी पुढे सरकणार एवढ्यात मी त्याला म्हणालो. "(अरे ए गधड्या,) गाडीचा नंबर माहित्ये का? XXX-yyyy.. ती निळ्या......."
"हो माहित्ये माहित्ये.. ती बर्गंडी रंगाची आहे तीच"
"काय? बर्गंडी???" आता तो चावी नक्की कुठल्या बाईकमध्ये घालतो (आणि माझ्या चावीची विल्हेवाट लावतो) या विचाराने (आणि त्या भयंकर उच्चाराच्या विचित्र रंगाच्या कल्पनेने) माझ्या बरगडीतून एक मोठ्ठी कळ आली. पण ती कळ ओसरेपर्यंत तो (वायुवेगाने दौडत दौडत वगैरे) दिसेनासाही झाला. तरीही अगदी राहवेना म्हणून जरा वेळाने मी पार्किंग लॉटमध्ये एक फेरी मारून आलो. आणि त्यावेळी मला तीन साक्षात्कार झाले
१. बॉसची बाईक माझ्या बाईकच्या शेजारीच होती
२. बॉसने रंग बरोब्बर ओळखून माझीच बाईक नेली होती आणि
.
.
.
.
.
.
.
३. माझ्या डार्क निळ्या रंगाच्या बाईकला बर्गंडी रंगाची बाईक असंही म्हणतात.

ती बाकी काही न बोलता हसत हसत फक्त एवढंच म्हणाली "जाऊदे रे.. तू असाच रंगारी आहेस."
आता 'रंगारी' हा शब्द 'रंगीला' एवढ्या गुदगुल्या वगैरे करणारा काही नाही हे स्वतः 'पेंटरबुवा' पण मान्य करतील पण तरीही 'रंगीला' शब्दाचाच रोमँटीक चुलत मित्र वगैरे याअर्थी मला 'रंगारी' शब्दही जवळपास तेवढ्याच गुदगुल्या करून गेला.
असो. तर त्यानंतर असेच वेगवेगळे, साधे, छोटे किस्से होत राहिले. सगळे सांगून उगाच पकवत नाही तुम्हाला. पण अगदी थोडक्यात सांगायचं तर तो किरमिजी* शर्ट घेताना मला मिळालेली 'रंगीत' ही पदवी किंवा तिचा फिक्कट केशरी उर्फ अबोली* ड्रेस घेताना मिळालेली 'रंगकर्मी' ही पदवी, किंवा मग तिचं मरून रंगाचं नेलपॉलिश घेताना लाभलेली 'रंगीबेरंगी' ही पदवी असे अनेक अनेक किस्से घडले, घडत राहिले आणि मला अशी लाडाची नवीननवीन छोटीमोठी नावं बहाल करत राहिले.
*किरमिजी म्हणजे कुठला रंग हे तर मला अजूनही माहित नाहीये. फक्त बायको म्हणते म्हणून मी त्या शर्टाला किरमिजी शर्ट म्हणतो. थोडक्यात "आमच्या कपाटात किरमिजी शर्ट दाखवा आणि हजार रुपये मिळवा"
(वरच्या वाक्यात किरमिजीच्या ऐवजी अबोली किंवा मरून वाचून ते वाक्य तसंच्या तसं पुढे वाचलंत तरी काही फरक पडत नाही. मतितार्थ, भावार्थ, शब्दार्थ, रूढार्थ वगैरे सगळे 'र्थ' तेच)
पण असं होता होता एक दिवस एक विलक्षण प्रकार घडला.. म्हणजे म्हटलं तर साधासुधाच पण म्हटलं तर फार भयानक. काय म्हणायचं, कुठली बाजू घ्यायची हे तुम्ही ठरवा.. आठवा सद्सद्विवेकबुद्धी वगैरे वगैरे..
त्या दिवशी जेवायला बसलो होतो. माझ्या आवडीची चांगली बटाट्याची भाजी होती. (नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणाच्या आधारे डोंबिवलीहून सीएसटीकडे जाणारी कुठलीही ट्रेन थांबवून आतल्या लोकांच्या बॅगा उघडून त्यातले डबे उघडून बघितले तर शंभरपैकी नव्व्याण्णव लोकांच्या डब्यात बटाट्याची भाजी किंवा कांदा-बटाट्याची भाजी किंवा कांद्यात बटाटा घालून केलेली भाजी किंवा बटाट्यात कांदा घालून केलेली भाजी यापैकी एक आढळते असे मत नोंदविण्यात आलेले आहे. असो..). एवढी आवडती भाजी असूनही मी नीट जेवत नाहीये हे चाणाक्ष, हुशार, चतुर वगैरे वगैरे बायकोने लगेच ओळखलं.
"का रे जेवत का नाहीयेस? आवडली नाही का भाजी? तुझी आवडती तर आहे."
"अग आवडली ग... पण"
"पण?"
"नाही तसं नाही.. पण भाजीचा रंग जरा नीट नाही आलाय"
"नीट म्हणजे?"
"म्हणजे आपला तो छान खमंग पिवळा असा ग."
"अरे हा पिवळाच आहे"
"हो पण नेहमीसारखा छान खरपूस पिवळा रंग नाही आलाय."
"अरे त्यात काय. मिरच्यांचा, हळदीचा रंग वगैरे थोडाफार वेगळा असतो कधीकधी. त्यामुळे वेगळा रंग वाटत असेल. पण त्याने चवीला काय फरक पडतोय. आणि तुझा तो आवडता खमंग, खरपूस का कुठला तो पिवळा रंग नाही म्हणून तू जेवणार नाही की काय?"
"अग तसं नाही ग. पण तो तसा नेहमीचा छान पिवळा रंग असल्याशिवाय चवच येत नाही. मजाच येत नाही खायला"
"रंगाचा आणि चवीचा काय संबंध?"
"अरे वा. असं कसं. संबंध नाही कसा?"
"बरं असेल संबंध... पण तुझा आणि रंगाचा काय संबंध?"
"काय?????? काय म्हणालीस???? म्हणजे???" एकता, करण, शाहरुख/सलमान यांच्या सिरीयलींतल्या/चित्रपटातल्या 'हिरविनी' जशा धक्क्याने (म्हणजे धक्का बसून.. धक्का लागून नव्हे) कपबशा फोडतात किंवा कपूर, जोहर, खान यांच्या सिरीयलींतले/चित्रपटातले 'हिरवे' जसे रागाने टीव्ही, कॉफीटेबल वगैरे फोडतात तसं या धक्क्याने (धक्का बसून नाही तर निदान धक्का लागून तरी) निदान एखादा कप तरी फोडावा असा विचार माझ्या मनात येऊन गेला.
"म्हणजे काय? तेच.. तुझा आणि रंगाचा किंवा तुझा आणि एकूणच रंगांचा काय संबंध?"
"अग तूच तर मला 'रंगीला', 'रंगारी', 'रंगीबेरंगी', 'रंगकर्मी', 'रंगीत' आणि असंच अजून काय काय म्हणायचीस ना? त्याचं काय झालं मग आता?
"त्याचं काय झालं? त्याचं काय होणारे?"
"म्हणजे?"
"म्हणजे हेच की तुला जसे रंग अजिबात ओळखता येत नाहीत तसेच या शब्दांचेही अर्थ अजिबात कळलेले नाहीत"
------
बरं मला एक सांगा. तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहिती आहेत का? (लेखाच्या शेवटच्या वाक्याची सुरुवात 'बरं' ने होऊ शकते याची कृ नों घ्या)
रंगीला
रंगारी
रंगीत
रंगीबेरंगी
रंगकर्मी
तर सांगा बघू या शब्दांचे अर्थ माहित आहेत का? पण यावेळी नुसतं 'हो' किंवा 'नाही' असं उत्तर नाही चालणार. तर या शब्दांचे अर्थही सांगा. किंवा मग मीच सांगतो. तुम्ही फक्त टॅली करून बघा.
रंगीला : रंग + इल्ला = ज्याचा रंगांशी काहीही संबंध नाही असा तो
रंगारी : रंग + अरि = रंगांचा अरि उर्फ शत्रू आहे असा तो
रंगीत : रंग + इत (इति) = ज्याच्यापाशी रंगांची इति होते असा तो
रंगीबेरंगी : रंगांना 'बेरंग' करून ठेवणारा असा तो
रंगकर्मी : ज्याला पाहिल्यावर रंग 'कर्म माझं' असं म्हणतात असा तो
तळटीप १ : सदरहू रंगरंगोटी यापूर्वी 'मोगरा फुलला दिवाळी अंकात' ही करण्यात आलेली आहे. परंतु जे वाचक ती तिथे न वाचल्याने स्वतःला उगाचंच सुदैवी समजत होते त्यांच्यासाठी खास !!
तळटीप २ : रंगीबेरंगी (चांगल्या अर्थाने) चित्राबद्दल मोफु क्रिएटीव्ह टीमचे विशेष आभार. खरं तर या आभाराची काही गरज नव्हतीच कारण ज्या माणसाला बर्गंडी रंग ओळखता येत नाही त्याला बर्गंडी चित्र काय (कप्पाळ) काढता येणार ही साधी गोष्ट कळण्यासाठी आभारांच्या उल्लेखाची गरज नाहीच. पण काये की आपण कोणाचा वाटा मारत नाय.. काय?? ;)
तळटीप ३ : या दोन्ही तळटीपा (आणि ही तिसरीही) ताज्या आहेत. अर्थात आधीच्या लेखात नाहीत. :P
तळटीप १ : सदरहू रंगरंगोटी यापूर्वी 'मोगरा फुलला दिवाळी अंकात' ही करण्यात आलेली आहे. परंतु जे वाचक ती तिथे न वाचल्याने स्वतःला उगाचंच सुदैवी समजत होते त्यांच्यासाठी खास !!
तळटीप २ : रंगीबेरंगी (चांगल्या अर्थाने) चित्राबद्दल मोफु क्रिएटीव्ह टीमचे विशेष आभार. खरं तर या आभाराची काही गरज नव्हतीच कारण ज्या माणसाला बर्गंडी रंग ओळखता येत नाही त्याला बर्गंडी चित्र काय (कप्पाळ) काढता येणार ही साधी गोष्ट कळण्यासाठी आभारांच्या उल्लेखाची गरज नाहीच. पण काये की आपण कोणाचा वाटा मारत नाय.. काय?? ;)
तळटीप ३ : या दोन्ही तळटीपा (आणि ही तिसरीही) ताज्या आहेत. अर्थात आधीच्या लेखात नाहीत. :P
मस्त एकदम.
ReplyDeleteआवडलेले वाक्य ठळकपणे दर्शवायचे म्हटले तर जवळपास पूर्ण लेखन पुन्हा येथे लिहावे लागेल :)
हेहे देवदत्त.. आभार आभार..
ReplyDeletearee kaay lihile ahes re..bhannaat ekdam...kaay kaay suchat re tula...lai bhaari !!!
ReplyDeletelolzzz... फक्त पिवळ्या ह्या रंगामधे, आंब्यासारखा पिवळा, हळदी, मोसंबी, लिंबासारखा, सोनेरी पिवळा, पितांबरी अश्यापण छटा असतात. हे कमीच आहेत. देवाने अजुनपण पुरुषांचे processor basic 7-16 colors ओळखणारे ठेवलेत. स्त्रियांचे advanced processor मात्र > 265 bits colors recognize करु शकतात.
ReplyDeletesame pinch....like minds post old posts same time...
ReplyDeletehee hee....
तळटीप २....:)
सगळ्या शब्दांचे अर्थ चांगलेच समजले !
ReplyDeleteआय मीन समजावलेस !
सग़ळे अर्थ टॅली केले! तरीच आमच्या ममाने मागच्या वेळी मी तिला घेतलेली साडी अजुन वापरली नाहीए ! :)
हाहाहा,भन्नाट रे ....
ReplyDeleteमला तर फक्त RGB रंगच ओळखता येतात.
टिपिकल हेरंब स्टाइल...मोफुमध्ये ही आवडला आणि तितकाच आता पण..
ReplyDeleteएक एक वाक्य वाचून अशक्य हसतोय.. असाच वटवट करत रहा मित्रा :)
पुढच्या भितीने मला इतक्या सुंदर पोस्टचा आनंद नाही घेता आला ;)
ReplyDelete:) रंगांचा किती हा अभ्यास...फोड तर एकदम छान जमलीय. मी जे. जे.त हे असे शब्द वापरून मास्तरांचा छान ओरडा खाल्ला होता. :) म्हणजे अगदी राणी, शेवाळी वगैरे वगैरे. :)
ReplyDelete:-)
ReplyDeleteआप्पा ला आवरा रे... ;) ;)
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच भन्नाट झाली आहे.
तळ्टीप क्र. २ .. :) :) :)
hahahahahahahahah
ReplyDeletemast zali aahe post. bottle greencha ullekh nahi kelas.
रंगावरची पोस्ट एकदम गडद झाली आहे. किरमिजी सकट जवळपास सगळ्या संशयास्पद रंगांचा उल्लेख आहे. किरमिजीसारख्या रंगाबद्दल बाकीचे जग देखील (वाचा साध्याभोळ्या गरीब बापड्या जनतेचं) तितकेच रंगाधळे असते हे वाचून संतोष जाहला.
ReplyDeleteतुमच्या माजी आणि पाजी बॉसने मध्येच बेरंग केला. बर्गंडी रंग बघायची इच्छा आहे तेंव्हा तुझ्या जुन्या बाइकचा फोटो पाठवून दे. बाइक आणि बॉस वरुन आठवले. एकदा माझा बॉस माझी बाइक घेऊन गेला आणि परत येऊन बाजूच्याला तुझी बाइक ह्याच्या (म्हणजे माझ्या) बाइकपेक्षा चांगली आहे असे म्हणाला. काय बोलणार...
माऊ, धन्स धन्स :) .. रंगांचा 'दांडगा' अभ्यास असल्याने आपोआप सुचला लेख.. लोल
ReplyDeleteहा हा सौरभ !! अगदी कडडक कमेंट. पूर्ण सहमत. निदान एवढी तफावत तरी नक्कीच असणारच नक्की ;)
ReplyDeleteहेहे अपर्णा.. पोस्ट टाकताना माझ्याही डोक्यात अगदी हेच आलं होतं :) हाबार्स.
ReplyDeleteदीपक, सगळे अर्थ टॅली झाले ना? गुड.. आता बघ अजूनही बर्याच प्रश्नांची उत्तरं मिळत जातील ;)
ReplyDeleteहेहे आभार्स सचिन..
ReplyDelete>> मला तर फक्त RGB रंगच ओळखता येतात.
मलाही.. (हे काय सांगायला हवं?)
सुहास, धन्यु धन्यु.. मलाही पहिल्यांदा ते अर्थ सुचले तेव्हा असंच हसायला येत होतं :)
ReplyDeleteहा हा.. आप्पासाहेबांचा षटकार.. अरे आनंद न घेऊन कसं चालेल. तुझे आनंदाचे अखेरचेच काही दिवस उरलेत. (त्यानंतर अत्यानंद :P)
ReplyDeleteधन्स अनघा.. :) .. फार किचकट अभ्यास आहे बुवा हा रंगांचा. दमछाक झाली लिहिताना.. राणी कलरवरचा एक जोक डोक्यात होता. पोस्टमध्ये टाकायला कुठेच सुट होत नव्हता म्हणून नाही टाकला. इथे सांगतो आता.
ReplyDelete"आमच्या शेजारच्या राणीताईची चित्रकला खूप छान होती. तिने मला लहानपणी सांगितलं होतं की तिची चित्रकला एवढी छान आहे म्हणून सगळ्या चित्रकारांनी तिच्या आवडत्या रंगाला तिचं नाव दिलं आहे आणि तो रंग म्हणजेच राणी कलर !!!! ......... आणि माझा विश्वास बसला होता !!!!!!!!!!"
लोल :)
सविताताई :)
ReplyDeleteयोगेश, अरे आप्पाला आवरणं आता आपल्या हातात कुठे राहिलं? ;)
ReplyDeleteआभार रे :D
हा हा आभार हेमाली..
ReplyDeleteबॉटल ग्रीन वगैरे रंग तर माझ्या लक्षातही नव्हते :)
सिद्धार्थ, अरे किरमिजीबद्दल कालच मला एक मेल आलंय. किरमिजी हा पर्शियन शब्द आहे आणि त्याचा अर्थ लाल असाच आहे. मुगल काळात हा शब्द मराठीत शिरला असावा. इंटरेस्टिंग !!
ReplyDeleteहेहे. बर्गंडी बाईकचा फोटू पाठवतो रे.. अर्थात मीही आहे त्याच्यावर ;)
च्यायला, सगळे बॉस एकसारखेच का रे !!!
>>देवाने अजुनपण पुरुषांचे processor basic 7-16 colors ओळखणारे ठेवलेत. स्त्रियांचे advanced processor मात्र > 265 bits colors recognize करु शकतात.
ReplyDelete+१
खरंच मला एक छटा दुसर्या छटेपासून छटाकभरसुद्धा वेगळी दिसत नाही!
हेहे बाबा... खरंय.. शेवटी सगळं बेसिक रंगांमध्येच तर विलीन होतं नाही का.. ;)
ReplyDeleteहेरंबा कमेंट टायपतीये खरी पण पोस्ट होत होत नुसती धाकधूक आहे... तुझ्या बऱ्याच पोस्टांवर टाईप केलेल्या कमेंटा गायब होताहेत... वर्डप्रेस आणि ब्लॉगरचे जुळलेले नाते पुन्हा काडीमोडाच्या कोपऱ्यावर गेलेय जणू...
ReplyDeleteअसो...
भन्न्नाआअट झालेय हे रंगीबेरंगी पोस्ट!! बाकि बायकांना कळणारे रंग याबाबत समस्त नवरेवर्गाचे एकमत आहे :)
तळटीपा लय म्हणजे लयच भार्री :)
ता.क. आप ची कमेंट आवडली :)
हा हा तन्वी.. आभार्स.. सगळे नवरे सारखेच.. ! आपने तर षटकारच मारला आहे :P
ReplyDeleteआयला पुन्हा ब्लॉगरने वर्डप्रेसशी काडीमोड घेतली का?? अरारा.. तरीच म्हटलं तुझ्या कमेंट्स का येत नाहीयेत.
हा हा हा...सही...घरोघरी मातीच्या चुली... ;-)
ReplyDeleteआई पण असेच कुठलेतरी अगम्य रंग सांगत असते साडी खरेदीच्या वेळी..
कुसुम्बी , फिरोजी, चिंतामणी...नि काय काय... :-|
आम्ही पण असेच रंगीले असतो तिच्या लेखी... :P
हेहे मैथिली.. चला तूही 'रंगीला गँग'ची सभासद आहेस हे बघून बरं वाटलं ;)
ReplyDelete>> कुसुम्बी , फिरोजी, चिंतामणी...
हे काय आहे? लोल !! ;)
Thanks for explaining such a wonderful meaning of words(hahahaha).Every single woman is of same type man,mom does that a lot while choosing saree.And come on now I won't say anything more about your writing,you just don't need it,you know you're the Best!
ReplyDeleteरंगारंग झाला आहेस अगदी तू. ( माफी, फार उशीरा प्रतिक्रिया देतेय. दोन दिवस अगदी गायबलेच होते. ) आधीही हा लेख मी मस्त यंजॊव केलाच होता. आज पुन्हा एकदा... :) दुधगुलाबी मस्तच.
ReplyDeleteरंगांची उकलण अगदी मनापासून केलीस रे. मस्तच.
Hehehe Anee.. choosing saree is very typical scene with no boundaries of region/age :) .. Glad you liked the meanings..
ReplyDeleteAnd Thanks for the nice complimenting words !!
हाहा श्रीताई.. आभार्स.. अग रंगांची आणि शब्दांची उकलण करावीच लागते ग.. विशेषतः आपण रिसिव्हिंग एंडला असताना :)
ReplyDeleteझकास, भन्नाट, भारी...मस्त झाली आहे पोस्ट.
ReplyDeleteमस्त. भन्नाट. अजूनही हसतोय म्या... :-D
ReplyDeleteएक गंमत आठवली.
ReplyDeleteबायको हा शब्द मूळचा मराठी नाही. फारसी आहे. हा शब्दही मुघलकाळात शिरला असावा मराठीत.
हे हे.. धन्स धन्स अवधूत..
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
हा हा संकेत.. आभार आभार.. :)
ReplyDeleteमंदार!! खरंच सांगतोयस की टीपी?? हे तर मला माहितच नव्हतं.
ReplyDeleteI think the first comment by Devadatta sums up my reaction- kharach kay avDala te lihayach mhNaje kaThen Ahe- puN tareehe- Rangeet, Ranga illa - GREAT!!:-) Hee sagaLee visheshaNa mazya navaryala ( aNee jagatalya sarva ranga illa navaryanna fit hotaat. ekda ek dull gold color chee sundar sadee pahn to Rangeeberangee mala mhaNala hota kee hee khakee ahe na police bayaka nesataat tashee! "karma maza:
ReplyDeletepuN suD ugaVayacha asel tenva mee doodhgulaBee saDee tychya barobar jaun shoDhaNar ahe:-)))
THis was too much!
हेरंब.. अरे काय... प्रसंग १ भन्नाट. दुकान कुठे डोंबिवलीमध्ये काय? हा हा ... दुध गुलाबी??? कैच्याकै!!!
ReplyDeleteप्रसंग २ अजून भन्नाट....... आणि तळटीप खासच... :) हा लेख तुझ्या top १० मध्ये आहे.. :)
कंसधारी,टीपाबहाद्दर,वटवट्या तुला आता रंगसम्राट म्हणायला हरकत नाही ....भन्नाट ,प्रचंड प्रचंड आवडली ही पोस्ट .... :)
ReplyDeleteहा हा.. आभार स्मिता.. डल गोल्ड?? मग तर मीही खाकीच म्हणालो असतो त्या रंगाला ;)
ReplyDeleteदुधगुलाबी साडीने सूड !! हा हा लोल.. फारच रंगारंग सूड असेल तो ;)
रोहण्णा उर्फ खाणापती, हाबार्स.. अरे दुधगुलाबी वाला किस्सा तंतोतंत खरा नाहीये पण साधारण असाच एक किस्सा घडला होता. तेव्हा ते दुधगुलाबी ऐकून मी वेडा झालो होतो यार :D
ReplyDeleteप्रसंग २ मात्र तंतोतंत खरा आहे.. बॉस बरगंडी वगैरे :)
टॉप १०... हा हा आभार आभार..
हा हा रंगसम्राट.. दवाच्या बिंदुने दिलेलं नवीन नाव आवडलं ;) .. धन्स धन्स रे.. पहिलं धन्स नावाबद्दल आणि दुसरं प्रतिक्रियेबद्दल :)
ReplyDelete