सकाळचे ७:००
तो : झाली तयारी?
ती : म्हणजे काय? बघितलंस का वाजले किती ते?
तो : हॅ हॅ हॅ
ती : म्हणजे तू तयार नाहीयेस... नाहीयेस?
तो : आहे ग.. नेहमीची गाडी...
ती : नेहमीची जागा.. बाय.
तो : बाय
सकाळचे ७:१५
ती : नशीबच पोचलास. मला वाटलं की गेली आज पण गाडी.
तो : ए.. आज पण काय? आज म्हण. फक्त आज. आणि तीही गेलेली नाहीये.
ती : बरं बरं.. आली गाडी.. जा आता पटकन..
तो : ओके. दुपारी फोन करतो.
ती : दुपारी नाही. आज मंगळवार. एक्स्ट्रॉ लेक्चर असणार आज. संध्याकाळी कर.
तो : अरे हो.. विसरलोच. तुला जमलं तर तू कर दुपारी.
ती : यस. ट्राय करते नक्की.
सकाळचे ९:१५
तो : हॅलो. कोण?
ती : मी
तो : आयला. तू? आत्ता? कुठून बोलते आहेस?
ती : हो. रे इथे आल्या आल्या कळलं पाहिलं लेक्चर फ्री. मग काय बाहेर पडलो आम्ही भटकायला. पीसीओ दिसला. म्हणून म्हटलं पटकन तुला फोन करुया.
तो : मजाए. तुम्ही भटकताय. आणि आम्ही इथे कामं करतोय.
ती : ही ही.. तुम्हीही भटका मग.
तो : आहा.. म्हणे भटका.
ती : ए चल मी ठेवते. बिप बिप वाजायला लागलंय.
तो : आयला मग कॉइन टाक की. वाजायला लागलं की लगेच ठेवायचं असतं की काय?
ती : अरे कॉइन पण नाहीये माझ्याकडे.
तो : शी.. त्यात काय.. त्या रीमाकडून घे ना.
ती : नको. मी जाते. त्या ऑलरेडी हसतायत. चिडवतायत मला.
तो : ई हसायला काय झालं त्यात. काहीही.
ती : बरं असुदे काहीही. ठेवते मी.
तो : ए थांब थांब.. आता कधी? संध्याकाळी?
ती : अर्थात.
तो : ओके.
ती : गेले रे. बाय..
संध्याकाळचे ५:३०
तो : अरे. तू आलीस पण घरी? मी असाच करून बघितला. उगाच सहज. माझ्या डोक्यात पण नाही की कोणी फोन उचलेल.
ती : अरे. एक क्षण झाला घरात पाउल टाकून. अजून सँडल्सही काढले नाहीयेत. दार उघडते तोवर फोन वाजायला लागला. अरे आजचं एक्स्ट्रॉ लेक्चर कॅन्सल झालं. त्यामुळे मस्त लवकर आले घरी.
तो : सहीये बाबा. पाहिलं लेक्चर फ्री आणि शेवटचं कॅन्सल. जाता कशाला तुम्ही लोक कॉलेजला?
ती : ए.. शेवटचं एक्स्ट्रॉचंच होतं. त्यामुळे ते कॅन्सल झालं तर त्यात काय एवढं बिघडलं?
तो : काही नाही बिघडलं. बरं. संध्याकाळी नेहमीच्या जागी?
ती : नेहमीच्या वेळी.
तो : ओके.. बाय.
ती : बाय.
रात्रीचे ८:००
ती : आई ग्ग. कसली सही तिखट पाणीपुरी बनवलेली भय्याने.. मस्त चव आली तोंडाला.
तो : मला वाटतं आईस्क्रीमने अजून चांगली चव येईल ना??
ती : हेहे.. आय सोSS थॉट इट. खात्री होती मला :)
तो : अग आईस्क्रीम शिवाय पाणीपुरीला मजा येत नाही.
ती : हे उगाचंच. काहीही अगदी.
तो : बरं आईस्क्रीमच्या आधी पाणीपुरी खाल्ली की आईस्क्रीम चांगलं लागतं ना... ओक्के? झालं? जिंकली पाणीपुरी?
ती : हे पण खरं तर काहीही आहे. पण ठीक्के. पाणीपुरी जिंकली ना बास. आता माझी आईस्क्रीमला ना नाही.
तो : अति होतंय..
ती : होऊ दे.
तो : हॅ हॅ हॅ
ती : चल रे. नऊ वाजत आलेत.
तो : मग?
ती : मग काय? घरी जायचंय आपल्याला........ आपापल्या.
तो : मग?
ती : चूप रे. पकवू नको उगाच..
तो : हेहे
ती : रात्री कर कॉल
तो : यस मॅडम. रात्री बोलू.
ती : बाय
तो : बाय
रात्रीचे ९:३०
ती : तुलाच करत होते फोन. जस्ट जेवण झालं.
तो : आता नको करूस. एंगेज लागेल.
ती : कित्ती फालतू !
तो : किती?
ती : शी.. गप् रे.. तुझं झालं जेवण??
तो : नाही ताट हातात घेऊनच बोलतोय.
ती : काय????? अरे ओरडेल ना आई.
तो : हा हा हा हा हा हा हा हा..
ती : शी.. काहीही. मला खरंच वाटलं एकदम. जाम पकाऊ आहेस.
तो : मग का बोलते आहेस माझ्याशी? अजून पकायला?
ती : नाही. तुला सुधारीन म्हणते.
तो : बा SSS र्र
******
ती : ए झाली का तयारी? कितीला निघताय?
तो : मी नाही येणारे. मला जमत नाहीये.
ती : शी.. प्रचंड फालतू होता हा. आणि अंगठी कोणाला घालू ती? हॉल पण बुक झालाय हां आता. येऊन पटकन जा हवं तर.
तो : हा हा हा हा हा
ती : हे हे हे हे हे
तो : बरं बाई. तू इतकी मागे लागली आहेसच तर येतो आता.
ती : शी...... बाई काय?
तो : जीवनातलं एक शाश्वत सत्य सांगतो. प्रत्येक मुलगी ही शुगरबॉक्सनंतर बाई आणि लग्नानंतर काकू होते. लक्षात ठेव !!
ती : डोंबलाचं शाश्वत सत्य. यात शाश्वतही काही नाही आणि सत्यही.
तो : कळेल कळेल.
ती : काही नकोय कळायला. ते जाऊ दे. आम्ही निघतोय अर्ध्या तासात. वेळ मिळाला तर ये अंगठी घालून घ्यायला.
तो : स्वयंवर आहे का?
ती : ते लग्नात असतं. आज फक्त पुडा आहे.
तो : हाहाहा
ती : टाटा..
तो : बाय. प्लान चेंज. येतोय मी.
तो : ओव.. सो काईंड ऑफ यु !!
******
तो : झोपली होतीस का ग?
ती : उहू. जस्ट उठले.. तू कुठे आहेस?
तो : निघेन जरा वेळाने
ती : अजून ऑफिसमध्येच आहेस?
तो : हो ग. आता पहिल्याच दिवशी कसं लवकर निघणार?
ती : लवकर नको निघुस. अरे पण वेळेवर तरी? साडे नऊ होऊन गेले असतील ना?
तो : हो होतायत.
ती : तुझ्या क्लायंटला सांग अमेरिकन असलात तर तुमच्या घरी. मी काही लेट बिट बसणार नाही.
तो : सांगतो हं काकू. नक्की सांगतो.
ती : काकू?????? याआक्क्क्क..
तो : शाश्वत सत्य !!
ती : बरं बरं.. जेवायचं काय करणार आहात आज? रुमीज बरे आहेत का?
तो : बघू. घरीच करू काहीतरी. रुमीज मस्त आहेत. विकएंडला इथे आल्याने चांगल्या ओळखी झाल्या. त्यामुळे इथला पहिला दिवस आहे असं वाटतही नाहीये.
ती : वा ते बरं आहे एक. संपवा तीन महिने पटपट एकदाचे.
तो : मी हातातल्या घड्याळाचे काटे फिरवतोय भराभर. लगेच संपतील तीन महिने.
ती : अमेरिकेत जाऊनही तू तसलेच पकाऊ जोक्स मारतोस हे पाहून मला फार भरून आलंय.
तो : झाकण लाव. सांडेल.
ती : शीई. सकाळी सकाळी अजून किती फालतू पीजे ऐकायचे रे !! त्यापेक्षा लवकर परत ये. तुझ्या शेजारी बसूनच ऐकेन.
तो : नको. मग मला सुचणार नाहीत.
ती : मग काय पीजे सुचावेत म्हणून तिथेच राहणार आहात का आपण?
तो : हो.
ती : ग्रेट. ये परत.. बघते तुला..
तो : हा हा हा. चल मी जातो आता. सकाळी फोन करेन.. म्हणजे माझ्या सकाळी. तुझी सकाळ तर संपेलच आता.
ती : बास रे !! टाटा. नक्की कर फोन
*****
अग तुला सांगितलं का मी?
ब्या ब्या ब्या ब्या ब्या ब्या आआआआंआंआं
अग तो राजन आहे ना... अरे काय झालं?
आआआंआआंआआं एबीशीबी
ओके ओके ए बी सी.. अग राजनचं मेल आलं SSSSSSSSSSS य.. अरे चावतोयस काय तू??????
मन्या, चावतात असं बाबाला?? ओह. काय म्हणाला? कसा आहे? आणि मेधा?
अग तो म्हणत होता..
प्या प्या प्या .. में में में में एम्म आई-बाब्बा... भ्या भ्या भ्या..
अरे सोन्या ओरडतो का आहेस उगाच? तू सायकल चालवतोस? कधी आलंय मेल?
चाक्क्ल चाक्कल चाक्कल..
अग दोन-तीन दिवस.... चाक्कल चाक्कल चाक्कल चाक्कल..... बाSSSSSS ब्याब्याब्या .....
अरे ही काय इथेच आहे ना सायकल.. बस ना. मी मागून ढकलतो...
आबाजीगाबाजी गब.. ब्य्य्या ब्या...
अग हा पुन्हा काहीतरी त्या आबाजीच्या भाषेत बोलायला लागला बघ..
आबाजीगाबाजी गब.. आबाजीगाबाजी आबाजीगाबाजी आबाजीगाबाजी
म्हणजे काय????
ह्या ह्या ह्या ह्या ... बाब्या.. पांई पांई पांई
आता मधेच पाणी हवंय बघ याला.. थांब हां देतो तुला पाणी.. तू मेधाला फोन केलेलास का?
हो ट्राय केलेला गेल्या आठवड्यात. पण लागला नाही. अरे ए SSSS किती पाणी सांडवलं आहेस? काय हे?? सगळे कपडे खराब झालेत. सर्दी होईल न पुन्हा. काय हे राजा?
अग राजन तेच म्हणत होता. ब्या भ्या.. बाब्बाईईई बाब्बाईईई... झ्या झ्या.. दादी.. दादी..
हो.. झाड आहे ना. ख्रिसमस ट्री म्हणतात त्याला.. आणि तो डॉगी आहे.. बरोबर.. तुझ्याकडे पण आहे न डॉगी टीव्हीत दाखवतात तसा... कुठेय रे? काय म्हणत होता रे राजन?
दादी.. दादी.. दादी.. दादी.. दादी.. दादी..
हो हो हो.. आण ना तो तुझ्या खेळण्यांच्या बास्केटमधून.. जा आण.. राजन म्हणत होता....
दादी.. दादी.. दादी.. दादी.. दादी.. दादी..
बरं चल आपण आणूया डॉगी.. थांब एक मिनिट..
बाब्या. ध्या. ध्या.. आबाजी गाबाजी गबगब... एबीशीबी एबीशीबी एबीशीबी...
हे बघ आता.. आता याला एबीसी लावून हवंय. काय रे मन्या??? दोन मिनिटं खेळ की त्या डॉगीशी. मी बोलतोय ना आईशी..
एबीशीबी एबीशीबी एबीशीबी... एबीशीबी... एबीशीबी...
बरं साहेब.. लावतो आधी एबीसी. अग लॅपटॉप कुठे ठेवलायस?
एबीशीबी... एबीशीबी...
अरे आतमध्ये आहे.. बेडरूममध्ये... आई एबीशीबी.. पांई..
मिळाला का रे? आता अजिबात पाणी बिणी काही मिळणार नाही.. बघ बाबा लॅपटॉप लावतोय. तू एबीसी बघत बस..
चाक्कल.. चाक्कल.. चाक्कल.. चाक्कल.. चाक्कल.. चाक्कल..
आता सायकल कशाला ? एबीसी कोणी लावायला सांगितलं होतं?
जा मन्या.. लावलं बघ एबीसी... राजनकडे न्यूज.... एबीशीबी... एबीशीबी... एबीशीबी...
क्काय ???
क्का.. क्का ... क्का..
हो?????? वॉव... तू काय क्काय करतोयस? कॉपी कॅट.. :)
अग याने बघ लॅपटॉपच बंद केला.. एबीशीबी... एबीशीबी...
कोणी बंद केला लॅपटॉप? आता काही नाही एबीसी वगैरे. गाणी पण नाहीत.
गांई गांई गांई.... गांई.... भ्यां भ्यां भ्यां...
******
तो : झोपला एकदाचा.
ती : हो ना. किती मस्ती !!
तो : मी म्हणत होतो की..
ती : अरे हो ना.. ते राजनचं राहिलंच.
तो : की... ZZZZzzzzzzzz
ती : काय? zzzzZZZZZZZZZZZZZZ
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
शाश्वत सत्य!
ReplyDeleteअति, महा, प्रचंड, कस्सलं, भयानक... भारी!!!
हाहाहाहा ... लय भारी
ReplyDeleteहेहे! छाssssssन! वैश्विक सत्य! :) ठेवण आवडली! (म्हणजे format म्हणायचंय मला! :) )
ReplyDeletemasssst ... awadesh....(tumcha likhan ani commenta wachun wachun he asa zhalay bagha.. tumha bloggers chya bolit lihayla lagale ahe :) )
ReplyDeleteपामराच्या डोक्यावरुन गेलं....
ReplyDeleteछान, सुंदर, भारी, आवडली,
ReplyDeleteZakkass!!!
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteलई भारी! ये तो शुरुआत है आगे आगे देखो होता है क्या! ११ आणि ८ वर्षाची होऊनही आमची मुलं अजून आम्हाला दोघांना निवांत बोलू देत नाहीत त्यावरून काय तो बोध घ्यावा ! :)
त्या एबीशीबी बाब्याला त्याची 'ती' मिळेपर्यंत तो अन् ती असेच zzzzZZZZ!!!!
ReplyDelete@आका - आपण सुपातले आहात तेंव्हा जात्यातल्यांचे डोक्यावरून जाऊ देऊ नका.
बाब्बो...काय राव काय लिहिलंय....एकदम भारी...
ReplyDeleteहेरंब
ReplyDeleteसहीच रे....आदिदेव लई भारी
अनुभवातून सकस साहित्य निर्मिती होते हे अगदी पटलं मला :-)
ReplyDeleteसहीच_ _ _
ReplyDeleteवाह हेरंब...फर्मास एकदम....काही बोलता बोलता खूप काही बोलून गेलास मित्रा.
ReplyDeleteमस्त पोस्ट ..हॅट्स ऑफ
हाहाहा... प्रचंड भारी. ‘आबाजी गाबाजी गबगब’ हे जाम आवडलं.
ReplyDeleteघरोघरी मातीच्याच चुली कि रे......
ReplyDeleteमस्त, भन्नाट ......
>>>>बिप बिप वाजायला लागलंय.....
हाहाहा
मोबाईल मुळे आत्ता सोप झालय रे पण बील पण जाम येत रे .....:)
हा हा... अरे काय उगाच बॆचलर्स व लगीन होऊ घातलेल्यांना घाबरवतो आहेस... ही असली अंतापर्यंत अव्याहत चालणारी सत्ये गुलदस्त्यातच हवीत. :D
ReplyDeleteमस्तच रे. तुमच्या जांभयांनाही आजकाल काळवेळ नसेल ना... :))
बरीच वैश्विक सत्यं सांगून गेलास की रे :P
ReplyDeleteलईच भारी...फार आवडलं!!!!
आवडण्याशिवाय पर्यायच नाही... नेहमीसारखाच!
ReplyDeletemast mast mast... chhan
ReplyDeleteप्रचंड भार्री...!!! :-)
ReplyDeleteआयला तू आमच्या घरी कधी आला होतास??? zzZZZZZZZZZZZZZZZZ
ReplyDeleteकांचन, हेहे.. खूप खूप आभार्स..
ReplyDeleteबर्याच जणां(णीं)ना हे शाश्वत सत्य पटतच नाही ;)
:) आभार आनंदा..
ReplyDeleteहेहे आभार अनघा.. नुसतं 'वैश्विक सत्य' असं लिहिलंस. मान्य आहे की नाही ते 'नरो वा कुंजरोवा' सारखं ठेवलंयस.. हेहेहे..
ReplyDeleteआभार आभार ..
खूप आभार श्रुती.. तुम्हाला आवडेश हे वाचून आम्हालाही आवड्या.. तुम्हीही लिहायला लागा मग असे अजून बरेच नवीन शब्द शोधता येतील :)
ReplyDeleteब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार. अशीच भेट देत राहा.
आका, बास का? उगाच फेकतोयस.. खरं असेल तर मात्र अलार्मिंग आहे ;) सिद्धार्थ काय म्हणतोय बघ :)
ReplyDeleteकाका, खूप आभार.
ReplyDeleteसुदीप, खूप आभार्स..
ReplyDeleteनिरंजन, हेहे.. धन्स धन्स.. बाप रे. पण तू तर मला अजूनच घाबरवतो आहेस.. चांगलाच भितीप्रद बोध आहे हा ;)
ReplyDeleteसिद्धार्थ, अरे तोवर असं म्हणजे बघायलाच नको. असंच राहिलं तर तोपर्यंत तो आणि ती एकमेकांशी बोलायचं विसरून गेले असतील :)
ReplyDeleteआणि आका गंडवतोय रे आपल्याला.. :)
सागर, हेहे. धन्स धन्स.. जे घडतं ते लिहिलं राव ;)
ReplyDeleteसागर, धन्स रे.. महामहाभारी आहे तो !
ReplyDeleteहा हा हा हा सविताताई.. अधून मधून साहित्यनिर्मिती थांबण्याची कारणंही अगदी तीच आहेत :)
ReplyDeleteलीना, खूप धन्स ..
ReplyDeleteसुहास, खूप आभार रे :)
ReplyDeleteजे जे आपणासि ठावे ते ते लोकां सांगावे.. ;)
आभार संकेत. अरे त्या आबाजीचा काही केल्या अर्थ लागत नाही आम्हाला.. कळेल थोड्या दिवसांनी :)
ReplyDeleteआभार सचिन.. अरे तेव्हा कुठले आम्हाला मोबाईल परवडायला !! इनकमिंगला ७ रुपये पडायचे तेव्हाची गोष्ट आहे ही ;)
ReplyDelete>> पण बील पण जाम येत रे
थोडेच दिवस रे आता.. नंतर एकदम कमी येईल :)
अग श्रीताई.. घाबरवत नाहीये ग. त्यांना 'शहाणं करून सोडतोय'.. आपल्या अनुभवाचा फायदा इतरांना व्हायला नको का.. ;)
ReplyDelete>> ही असली अंतापर्यंत अव्याहत चालणारी सत्ये गुलदस्त्यातच हवीत.
चला ही सत्यं मान्य असणारी आणि ते कबुल करणारी पहिली व्यक्ती भेटली .. हेहे
>> तुमच्या जांभयांनाही आजकाल काळवेळ नसेल ना... :))
जांभया देत देतच प्रतिक्रियांना उत्तरं देतोय मी :)
बाबा, तुम्हा लोकांना फार उपयोगी पडणारी सत्यं आहेत ही ;) आभार्स रे :)
ReplyDeleteहा हा हा शेखर.. आवडली प्रतिक्रिया.. खूप आभार..
ReplyDeleteआल्हाद खूप धन्स रे.
ReplyDeleteमैथिली, प्रचंड हाबार्स..
ReplyDeleteअपर्णा, हेहेहे... घरोघरी !!
ReplyDeleteहेरंब,
ReplyDelete:) :) :)
खरचं घरोघरी....
अगदी हेच आणी अगदी असच आमच्या घरी पण.
AGDICH MAST AAHE RE ! JAAM AAVADAL RE !!!!!!!!
ReplyDeleteKEEP IT UP !!!!!
प्रचंड भारी....बरीच वैश्विक सत्य सांगुन गेला आहात...बोला श्री श्री वटवटे सत्यवान महाराज की जय!!
ReplyDeleteThode diwasani
ReplyDeleteTo: ZZZ
Ti: ZZZ
To: e manya apalyala bolu detoy
Ti: Ho kharach ki nashib kheltoy ekata te
Thodya velane
manya: ZZZZZZ
to aani ti: aayala aaishapath ha shant basun ekata khelat hota ki....
HE KHUPACH DANGER
ओह! असं झालं काय!? अरे, एकदम मान्य! :)
ReplyDeleteसोनाली,
ReplyDeleteतू, अपर्णा, मी, तन्वी या सगळ्या घरांत तर नक्की हे असंच चालत असणार :)
तुळजाराम, खूप खूप हाबार्स !
ReplyDeleteयोगेश, हा हा आभार आभार.. बर्याच जणांना उपयोगी पडणारी सत्यं आहेत ही :)
ReplyDeleteहा हा.. खरंय. हे फारच डेंजर. आत्ताही खेळता खेळता अचानक त्याचा आवाज येईनासा झाला की काहीतरी फार डेंजर घडलेलं असतंच :)
ReplyDeleteअनघा,
ReplyDeleteआंग्गाश्शी.. आता कसं :)
:P प्रत्येक पुरुष हा शुगरबॉक्सनंतर दावणीला बांधलेला बकरा असतो आणि लग्नानंतर अनंतकाळाचा (गुणिले ७ जन्म) दास...
ReplyDelete(तसं बघितलं तर infinity * 7 = infinity, but Rajani has counted to infinity twice... so you can multiply...)
are ho aani aabaji gabaji gab cha arth mi vedvratla vicharate. jasa pranyana pranyanchi bhasha kalate tas balana balanchi bhasha kalat asel. aani tu aaditeyala hyache arth vichar:
ReplyDeleteshuguiya shugui shugu igishtiti igishtiti,
ita ita o o nane nano, be dono papa pe papa pe papa pe, tintini otiti aani ek kavitahi aahe
mi tyala tamil kavita mhanate
tammin u u, tappat u u
ne ne ne ne aamin ambata chimbata
etala utala aa u i ya mani mau. nakki vichar aani mala sang.
aani ho samast tyan kadun vaishwik satya sarvaswi amany.
हा हा हा.. सौरभस्वामींची ही उक्ती ऐकून रा ग गडकरी तिकडे चक्रावले असतील बिचारे :) (हघ्या)
ReplyDeleteबरोब्बर रजनीदेवांनी सांगितलंय म्हणजे नक्कीच यु कॅन ;)
हा हा हा हा.. तुफ्फान हसतोय मी.. हे काये नक्की? बडबड. तमिळ कविता.. बापरे !!! झक्कास.. विचारून बघतो आदितेयला. तो एका मिनिटात सगळ्याचा अर्थ सांगेल.. पण त्याच्या भाषेत.. त्यामुळे आपल्याला कळणार नाहीच पुन्हा :(
ReplyDeleteआणि वैश्विक सत्य मान्य/अमान्य मध्ये तू मायनॉरिटीमध्ये आहेस !
Great,liked that.Still laughing.Come On this really is insane.But as usual typical Heramb!!!
ReplyDeletehehe Anee.. Thanks.. And this is not insane dude.. this is fact :)
ReplyDeleteआज पुन्हा हिमतीने आलेय इथे कमेंटायला कारण या पोस्टवर कमेंटले नाही तर मला महत्पाप लागेल :)
ReplyDeleteहेरंबा सगळ्यात आधि वैश्विक सत्याबद्दल समस्त काकुंमंडळींतर्फे हेरंब अंकलचा निषेध!! :)
बाकि पोस्ट बद्दल काय बोलू रे... काही नाही बरेच काही बोलायचे आहे पण दोन्ही मुलांच्या सुट्ट्या सुरू आहेत त्यामुळे ब्लॉगवरच काय पण कमेंटांमधेही कितपत बोलू शकेन शंका आहे :)
आदि अजून ’च’ ची भाषा, ईंग्लिश, हिंदी, ईंग्लिशमधल्या शब्दांचे नुसते स्पेलिंग्स (म्हणजे s-h-o-u-l-d i b-r-i-n-g इथे बोटाने एक ही खुण - m-o-r-e p-o-l-i वगैरे भाषा जेव्हा मुलांचे जेवण होताना)शिकला नाहीये ते पण मुलांना समजायला लागतात तेव्हा पुन्हा एक पोस्ट लिहावी लागेल... बरं माझा सध्याचा वैताग म्हणजे जे गौराला समजत नाही ते प्रॅक्टिसने ईशानला समजते, मगं कार्ट भोळसट पणाचा आव आणत मुद्दाम ते जोरात बोलतं... :)
ता.क. हल्ली आम्ही अरेबिक बोलतोय... त्यात लोचा असा की ते अमित आणि ईशानला समजतं , माझी गती शोई शोई (थोडे थोडे ) :)
पोस्ट मनापासून पटली रे थोडक्यात आणि समजली तुझी व्यथा :)
हेहे.. महत्पाप.. चार्जेस मागे घेण्यात आले आहेत ;)
ReplyDelete>> समस्त काकुंमंडळींतर्फे
चला म्हणजे तू वैश्विक सत्याशी सहमत आहेस तर ;)
बापरे 'ईंग्लिशमधल्या शब्दांचे नुसते स्पेलिंग्स' असं वगैरेही करावं लागतं? संपलं.. थोडक्यात आम्ही अजून नर्सरीतही नाही तर.. !! आणि तुझी तर वाट लागत असेल. दोन वेगवेगळया वयाची पोरं म्हणजे एकाचे उपाय दुसर्याला उपयोगी ठरत नाहीत !! कठीणच आहे सगळं एकूण..
हा हा अरेबिक !! अरेबिकसाठी शुभेच्छा !! तुला :)
>>>> हा हा अरेबिक !! अरेबिकसाठी शुभेच्छा !! तुला :)
ReplyDelete:)
अरे अरबांनाही दे ... त्यांच्या मातृभाषेची तोडमोड करायला सरसावलेय मी आता :)
you have a loooooooooong way to go!! eadhyatach ZZZZZZZZZ hot asel tar kaTheeN ahe:-) agay agay dekho hota hai kya?:-)
ReplyDeleteअरबांना कशाला हव्यात शुभेच्छा.. तू पुढची पोस्ट अरबीत टाकशील बघ ;)
ReplyDelete(मनातल्या मनात : अरबांनो, तुम्हाला शुभेच्छा. :P )
हे हे स्मिता.. हो ते आहेच. होईल हळूहळू सवय. पण सवय होईपर्यंत ZZZZzzz :)
ReplyDeleteसुसाट... भ..न्ना..ट... :) मी सध्या कुठल्या फेजला आहे ते सध्या पुन्हा बघून येतो... :)
ReplyDeleteशाश्वत सत्य..... :)
ReplyDeleteलय लय लय भारी हेरंबा ....युवराज आदितेयकि जय हो.... ;)
रोहण्णा, अरे शेवटची विस्कळीत फेज सोडली तर त्याआधीच्या सगळ्या फेजेस जवळपास सारख्याच :)
ReplyDeleteदेवेन, हाबार्स.. बर्याच जणांना शाश्वत सत्य पटलं आणि त्यामुळेच रुचलं असं दिसतंय :)
ReplyDelete