Tuesday, January 4, 2011

कंपोस्ट-२ : बझबझ बसबस

तुम्ही 'बेसिक इन्सटींक्ट' बघितला आहे का? अर्थात बघितला असलात तरी हे असं चारचौघात ब्लॉगवर कबुल कोण करेल म्हणा.. 'बेसिक इन्सटींक्ट' न बघितलेला माणूस (पुरुष या अर्थी) विरळाच आणि तो (म्हणजे पिच्चर) बघितलाय हे असं चारचौघात ब्लॉगवर कबुल करणारा तर अजूनच विरळा. असो.. तर 'बेसिक इन्सटींक्ट' मध्ये मायकल डग्लसने सिगरेट सोडलेली असते. त्याबद्दल त्याची डॉक्टर मैत्रीण त्याला विचारते.

"हाऊ इट फील्स?"
"इट सक्स" जरा वेळ शांत राहून डग्लस उत्तरतो.

बास.. संपला प्रसंग. म्हणजे मला जे सांगायचं आहे त्यासाठी ही एवढी दोन वाक्य पुरेशी आहेत. ते वरचं एवढं मोठं तेल फक्त एवढ्यासाठीच सांडलं होतं. मुद्दा हा की मी बझ 'सोडलाय' हे माहित असलेल्या कोणीही जर मला आज विचारलं "हाऊ इट फील्स?" तर माझं उत्तर हेच असेल.. "इट सक्स" .. !!

बझ किती सही आहे, कशा गप्पा होतात (व्हायच्या), कसं अ‍ॅडीक्टीव्ह आहे वगैरे वगैरे बडबड मागे  एकदा करून झालीच आहे. त्यामुळे ती आत्ता पुन्हा करत नाही. मागे एकदा कुठेतरी एक मस्त वाक्य वाचलं होतं... ब्रह्मचर्य पत्करेल तो सोवळा आणि संसारात पडलेला म्हणजे पापी असं काही नसतं. संसारात राहूनही एकनिष्ठ राहणारा तो सोवळाच.. किंवा सुरुवात सिगरेटच्या उदाहरणापासून केली असल्याने सिगरेटचंच उदाहरण पुढे न्यायचं झाल्यास सिगरेटचं पाकीट खिशात ठेवून सिगरेट सोडण्यात जी मजा आहे ती मजा सिगरेटवाल्यापासून लपूनछपून फिरण्यात नाही.. अर्थात बझ चालू असूनही (सिगरेट खिशात असूनही) बझबझ न करता मोह आवरून कामाच्या वेळी काम करता येण्याएवढा (ती न ओढण्याएवढा) कंट्रोल आला की बझ चालू असलं काय नी बंद असलं काय.. सुदैवाने दोन तीन महिन्याच्या बझ-नातिरेकाने तेवढा कंट्रोल माझ्या ठायी आलाय (असं वाटतंय). आणि तसंही एकदा कंट्रोल करता आला की बझ काय, ब्लॉग काय, ओर्कुट काय नी फेसबुक काय... सगळं सारखंच.. (तुम्हा सर्वांना आधीच ठावं असलेलं हे सत्य मला थोडं उशिराने गवसलं).. त्यामुळे सिगरेटचं पाकीट पुन्हा खिशात ठेवावं म्हणतोय.. थोडक्यात मी मागे.. आय्याम ब्याच्क वुईथ बझबझ लिमिटेड.. म्हणजे लिमिटेड बझबझ !

आत्ता लिहिता लिहिता आठवलं.. बझ बंद केला तरीही अ‍ॅरिस्टॉटल साहेबांनी मांडलेल्या 'म्यान इज अ सोशल अ‍ॅनिमल' वाल्या नियमाला नाकारू शकण्याचं धैर्य अंगी नसल्याने हा पामर (म्हणजे स्वयं.. अ‍ॅरिस्टॉटल नाही) अचानक फेसबुकावर बराच अ‍ॅक्टिव्ह झालाय असं माझं माझ्याच लक्षात आलंय.. !!!

----

घाबरू नका.. पुन्हा फेसबुकाबद्दल पोस्ट टाकायची वेळ येण्याइतपत सोशल अ‍ॅनिमल प्रकार करणार नाही एवढं नक्की. बझ बंद-चालुच्या पोस्ट्स, फेसबुकची पोस्ट.. च्यायला काहीही लिहितोय मी.. खरंच ही एवढी दयनीय अवस्था कुठल्याही ब्लॉगरवर आणि त्याहूनही कंटाळवाणी अवस्था त्याच्या वाचकांवर २०११ मध्ये येऊ नये एवढ्या माफक शुभेच्छा देऊन थांबतो.. बाकी सुखसमाधानाचे, समृद्धीचे, आनंदाचे, हॅप्पी, हेल्दी, प्रॉस्परस वगैरे वगैरे आपापल्या आवडीने कमी-जास्त घालून घ्या. ज्यांना शुभेच्छा आत्ता नको असतील त्यांना याच शुभेच्छा चैत्राच्या पहिल्या दिवशी दिल्या जातील याची नोंद घेणे..

** ही पोस्ट आठवणीने बझ केली आहे. कसलं सही वाटतंय बर्‍याच दिवसांनी. :D

32 comments:

  1. lay bhaari.... tumche post buzz var vachat rahin ata....

    ReplyDelete
  2. धन्यवाद अनामिक..

    ReplyDelete
  3. रच्याक ...... स्वागत ...

    नवीन वर्षाच्या लय म्हणजे लय शुभेच्छा ....

    ReplyDelete
  4. हेहे सपा.. धन्स धन्स रे..

    तुलाही नवीन वर्षाच्या लयलय शुभेच्छा!!

    ReplyDelete
  5. बझ वर अस नाहीतर नस! मी इथे येऊन वाचणार हे निश्चित! :)

    ReplyDelete
  6. हेरंबराया, स्वागत स्वागत स्वागत :)

    ReplyDelete
  7. हेहे अनघा.. आभार्स.. आता दोन दोन ठिकाणी भेटता येईल :)

    ReplyDelete
  8. सुहासशेठ, धन्स धन्स एकदम धन्स..

    ReplyDelete
  9. >>>>** ही पोस्ट आठवणीने बझ केली आहे. कसलं सही वाटतंय बर्‍याच दिवसांनी. :D

    खरय रे अगदी :)
    पण माझे मत अनघासारखे बझवर अस की नस की फरक पैंदा है... दिवसात निदान एकदा तरी (पोस्ट असो वा नसो) मी आपल्या सगळ्या ब्लॉगांवर टक टक करून जातेच :)

    बझावर आला आहेस त्याबद्दल मनापासून स्वागत.. (मी अश्या थाटात बोलतेय जशी मी भलती ऍक्टिव्ह आहे तिथे..पण तू ओव्हरऍक्टिव्ह होऊ नकोस हा सल्ला [फुकट] आहेच.)

    नव्या वर्षाच्या तुम्हा तिघांनाही अनेक शुभेच्छा :)

    ReplyDelete
  10. दिपकसारखं तुही पुन्हा बझवर आलास हे बघुन उर दाटुन आला... ;)
    जुना सवंगडी भेटला बघ पुन्हा:...

    ReplyDelete
  11. हेरंब
    'बेसिक इन्सटींक्ट' न बघितलेला माणूस (पुरुष या अर्थी) विरळाच आणि तो (म्हणजे पिच्चर) बघितलाय हे असं चारचौघात ब्लॉगवर कबुल करणारा तर अजूनच विरळा. "
    हा सरळ सरळ आरोप आहेच समस्त पुरुष जातीवर. आता मी पण हा सिनेमा काही चार वेळा पाहिला नाही काही.. आणि ते रेप चे सिन्स पण अजिबात पाहिले नाहीत, सरळ फॉर्वर्ड केलेत.. :)

    ReplyDelete
  12. हो ते आहेच तन्वी.. पण असंच जरा सोशल अपडेट्स परत मिळायला लागावेत म्हणून मर्यादित बझबझ करणार :)

    आणि तुमचा सल्ला पुरेपूर अंमलात आणणार आहेच.. काळजी नसावी.. :)
    तुम्हा चौघांनाही नवीन वर्षाच्या अनेक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  13. आका, हा हा .. मी आधी होतो तेव्हा दीपक नव्हता वाटतं बझवर.. पण बरं झालं तोही तात्पुरता संन्यास घेऊन पुन्हा आला ते..

    मलाही सगळ्यांना पुन्हा भेटून फार्फार भरून आलंय ;)

    ReplyDelete
  14. हा हा हा हा हा हा हा हा हा काका !!!!!!!!

    जबऱ्या हसलो तुमची कमेंट वाचून..

    मीही चार वेळेला पहिला नाही आणि सगळे सीन्स फॉरवर्डच केलेत ;)

    ReplyDelete
  15. Lai bhari ....buzzvar punha ekada swaagat....tujhya mitramandalinaa nakkich aanand hoil..anyways
    tumha tighannaa navin varshachya hardik shubhechhaa !!!!

    ReplyDelete
  16. धन्स धन्स माऊ..

    आणि तुझ्या मित्रमंडळींना काय ग? तू नाहीयेस का माझ्या मित्रमंडळींमध्ये?? :(

    ReplyDelete
  17. Wel-Come Back Dear

    Lai miss kel tula :)

    ReplyDelete
  18. अरे तुझ्या स्वागताला आकाने आज आडस् बझ्झ सुरू केलाय. शालेय जीवनातील आठवणींचा... मी पण आज बरेच दिवसांनी काम फाट्यावर मारुन पडिक होतो तिकडे. खूप दिवसांनी आज एखादा बझ्झ पडेल असे वाटतंय. तेंव्हा हो जा शुरू... उद्या सकाळी आल्या आल्या हेरंबने शाळेत का, कधी आणि किती वेळा मार खाल्ला ते कळलं पाहिजे ;-)
    दिल्ली बहूत दूर नही (मध्येच दिल्ली कुठून आली हे बझ्झ वाचून कळेल)

    ReplyDelete
  19. धन्यवाद सागरा.. म्या बी लय मिसलो व्हतो तुमा लोकांना :)

    ReplyDelete
  20. सिद्धार्थ, वाचला तो बझ आज सकाळी आल्या आल्या.. आणि लोळलो अक्षरशः हसून हसून.. मार खाण्याचे किस्से विशेष नाहीत रे.. निदान आठवत तरी नाहीत.. आठवून आठवून टाकेन तिथे..

    >> दिल्ली बहूत दूर नही

    लोल !!!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
  21. नववर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा! पुन्हा बझबडबड सुरू, :)

    ReplyDelete
  22. श्रीताई, तुलाही नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा.. हो.. लिमिटेड बझबडबड सुरु आता :)

    ReplyDelete
  23. :D aare waah... FB var req sendatoy :)

    ReplyDelete
  24. अरे वाह ...स्वागत स्वागत स्वागत ....

    ReplyDelete
  25. सौरभ, अ‍ॅड केलंय तुला फेसबुकात.. :)

    ReplyDelete
  26. धन्यवाद देवेन.. आज बझची पाडापाडी झाली :)

    ReplyDelete
  27. वेलकम...एव्हरीबडी कम वेलकम...
    वेलकम...टू द पार्टी कम वेलकम...
    वेलकम...
    (तुझे नाना, अनिल अन आमच्या अक्षयचं कम्बाईन गाणं! :P )

    ReplyDelete
  28. हेहेहे... आठव्या आठव्या (8th नाही रे ;) )

    ReplyDelete
  29. दिन का भुला अगर शाम को घर आए तो उसे भुला नही कहते :)

    खुप खुषी झाली...

    ReplyDelete
  30. हेहेहे आनंद.. मला खात्री होती अशी एक तरी प्रतिक्रिया येणारच म्हणून :)

    >>खुप खुषी झाली...<<

    मले बी..

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...