Saturday, October 30, 2010

अरुदेवीची कहाणी

ऐका ऐका अरुदेवी तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब स्त्री रहात असे. अरु तिचं नाव. अरु भारी बडबडी होती. सतत बडबडत असे. दिसेल त्याबद्दल बोलायची, वाटेल त्या विषयावर बकबक करत राहायची. बकबक बकबक बकबक बकबक.. बास.. दुसरं काही करीत नसे. प्रत्येक विषयावर तिचं एक मत असे.. पण काहीही बोलण्याआधी आजूबाजूचे लोक त्या विषयावर काय बोलतायत हे ती बघे, सर्वांचं म्हणणं कान देऊन एके आणि त्यानंतर आपलं मत सांगे. तर तिच्या बोलण्यात एक मोठी मौज होती. ती अशी की आसपासच्या दहा लोकांनी दगडाला दगड म्हटलं की ती दगडाला पाणी म्हणीत असे, झाडाला झाड म्हटलं की ती माती म्हणीत असे, नदीला नदी म्हटलं की ती छप्पर म्हणीत असे. लोकांनी तिला सुरुवातीला समजावयाचा प्रयत्न केला. पण ती ऐकेचना. आपला हेका सोडीच ना. लोकांनी खूप समजावून पाहिलं, चुचकारून पाहिलं. पण ती काही बधली नाही. बडबडीचा घेतला वसा काही तिने सोडला नाही. मग लोक कंटाळून निघून जात. असं वारंवार होऊ लागलं. मग तिची भीड चेपली. एकदा तिने हाच प्रयोग पन्नास लोकांसमोर करून बघितला. समोरच्या झाडाच्या पानांचा रंग काळा आहे असं पन्नास लोकांसमोर बिनदिक्कतपणे म्हणाली. पुन्हा तेच सुरु झालं. लोक समजावायला लागले. पण नेहमीप्रमाणे अरु ऐकेना. त्या पन्नासमध्ये आधीच्या दहामधलेही काही लोक होते. त्यांनी उरलेल्या चाळीस लोकांना हिच्या नादी लागणं म्हणजे आपला वेळ वाया घालवणं कसं आहे आहे हे समजावून सांगितलं. ते ऐकून नेहमीप्रमाणे पुन्हा लोक पांगले. अरुची भीड चेपतच गेली. हाच प्रयोग तिने पुढे शंभर, पाचशे, हजार लोकांपुढे करून बघितला आणि योगायोगाने, सुदैवाने दर वेळी जिंकलीही. एकदा तर तिने संपूर्ण गावाविरुद्ध बोलायला सुरुवात केली. सारं गाव तिला समजावत होतं पण हिचा हेका कायमच. हिचं बोलणं असं असे की समोरच्याला निरुत्तर व्हावंच लागे. म्हणजे कितीही खोटं असो पण त्यात इतका शब्दच्छल असे, शब्दांची इतकी फिरवाफिरवी असे, इतक्या गोंडस आवरणात शब्द लपेटलेले असत, इतके नवनवीन वेगवेगळे शब्दप्रयोग वापरलेले असत, ते इतक्या अलंकारात लपेटलेले असत की बघता बघता समोरचा निव्वळ शब्दसामर्थ्य कमी असल्याने काही करू शकत नसे, निरुत्तर होत असे आणि निरुपाय होऊन निघून जात असे. बोलणार्‍याची मातीही विकली जाते पण न बोलणार्‍याचं सोनंही विकलं जात नाही म्हणतात ना त्याप्रमाणे जडजड, मोठमोठे शब्द वापरणारा मनुष्य हिरवा रंग काळा आहे, दगड म्हणजे पाणी आहे असं काहीही समजावून देऊ शकतो हे त्या गावकर्‍यांच्या लक्षात आलं. हळूहळू त्यांनी तिच्या नादाला लागणं सोडून दिलं. त्याने तिला अजूनच जोर चढला. निरपराध लोकांची हत्या करणार्‍या भक्ष(ल)वादी लोकांची ती बाजू घेऊ लागली. राजाने त्यांच्याशी लढायला सैन्य पाठवलं याबद्दल ती राजाचा निषेध करू लागली. हे अन्यायकारक आहे असं म्हणू लागली. हकनाक जीव गमावणार्‍या निष्पाप लोकांच्या जीवाचं महत्व, त्यांचा 'जगण्याचा अधिकार' वगैरे वगैरे ती नेहमीप्रमाणेचच सोयीस्करपणे विसरली. भक्ष(ल)वाद्यांना 'गांधीबाबाची लेकरं' म्हणू लागली. राजाने काहीही न करता दुर्लक्ष केलं.

एकदा तिने असंच दगड, पाणी, माती, झाड वगैरे वगैरेच्या गोष्टी लिहिल्या आणि अचानक तिला शेजारच्या देशातून 'भूकड' पुरस्कार मिळाला. तिचा भाव अजूनच वधारला. मिजास अजूनच वाढत गेली. आपण म्हणू तेच खरं, आपण करू तीच पूर्व दिशा असं तिला वाटू लागलं. बडबड वाढू लागली. बकबकीचा परीघ विस्तारू लागला. एकदा राजाच्या मोठ्या राजवाड्यावर हल्ला झाला. हल्ला करणारे पकडले गेले आणि त्यांच्या प्रमुख 'गुरु'जींना देहदंडाची शिक्षा झाली. गुरुजींना देहदंड मिळालाच पाहिजे असं सर्व गावांमधल्या सगळ्याच लोकांचं मत होतं. लोकांचं असं मत आहे हे कळल्यावर, ते शांतपणे ऐकून घेतल्यावर तिने तिच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्याच्या विरुद्ध मत मांडायला सुरुवात केली. देहदंड देणं कसं अयोग्य आणि चुकीचं आहे याचे डिंडिम पिटायला सुरुवात केली. तेव्हाही राजाने तिच्यावर काहीच कारवाई केली नाही. अर्थात राजालाही देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्याची अजिबातच इच्छा नव्हती. पण येनकेनप्रकारेण आपला इतरांपेक्षा वेगळा आवाज, मत मांडायची संधी तिने बरोबर साधून घेतली.

होता होता आपल्या कुठल्याच गोष्टीला कोणीच, अगदी राजाही, आक्षेप घेत नाही हे पाहिल्यावर तिचा उत्साह अजूनच दुणावला. ती देशाशी द्रोह करू लागली, राष्ट्राचे तुकडे करू पहाणार्‍यांच्यात उठबस करू लागली. भाषणं ठोकू लागली. ज्या देशाने तिला रोजचं दोन वेळचं खाणंपिणं दिलं त्या देशाला सरळ भूखा-नंगा म्हणू लागली. या देशाचे प्रांत विभागलेच पाहिजेत, प्रदेश वेगळे केलेच पाहिजेत, हा देश तोडलाच पाहिजे असं याच देशात राहून बोलू लागली. एवढंच नाही तर काही प्रदेश हे देशातले कधीच नव्हते असं म्हणू लागली. लोक पुन्हा चवताळले. तिच्या म्हणण्यावर राग व्यक्त करू लागले. पण तिने तिच्या नेहमीच्या शैलीत आपणच कसे बरोबर आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु केला. तुम्ही ज्याला देशद्रोह म्हणता त्याला मी माझं मत म्हणते, तुम्ही ज्याला राष्ट्रद्रोह म्हणता तेच मत त्या प्रदेशातल्या लोकांचं आहे असं उघडपणे म्हणू लागली. वास्तविक त्या प्रदेशातल्या काही लोकांचंच ते मत होतं अन्य जनतेचं नव्हतं हे तपशील ती सोयीस्करपणे विसरली. तिच्याच देशातले तिच्यासारखे देशफोडे, तुटक्या विचाराचे, फुटक्या अकलेचे आणि नजरेचे 'गिल्ली', 'वरवर' सारखे लोक तिच्याबरोबर तिच्या हो ला हो करायला होतेच. होता होता हा ही वाद राजापर्यंत गेला. राजाने नेहमीप्रमाणे आपली जात दाखवली, पळपुटेपणा सिद्ध केला. बुळचटपणे शांत राहत तिला वेळच्यावेळीच रोखली नाही, तिची जीभ हासडली नाही की तिला हद्दपारही केलं नाही. होताहोता अरुची अरुताई आणि अरुताईची अरुदेवी झाली. थोडक्यात ज्याप्रमाणे अरुदेवीला आपलंच म्हणणं खरं करता येई, ती ज्याप्रमाणे बडबड करीत राही, शब्दच्छल करीत राही, हेकेखोरपणे वागीत राही, देशद्रोह करी पण हे सगळं चांगल्याचुंगल्या शब्दांच्या वेष्टनात गुंडाळूनच करी त्याचप्रमाणे हेच गुण तुमच्यातही येओत आणि अरुताईप्रमाणेच तुमच्याही केसाला धक्का न लागता तुमच्यावरही पुरस्कारांची खैरात होवो !! सत्तरा उत्तराची कहाणी नवा उत्तरी सुफळ संपूर्ण.. (सत्तरा आणि नावाच्या ऐवजी इतर काही वापरलंत तर ते कसं चूक आहे हे स्वतः अरुदेवी प्रगट होऊन दाखवून देईल तेव्हा सांभाळून !!)

-- काही संदर्भ विकीपिडियावरून

49 comments:

 1. वा. मस्तच. पण मला कळत नाही की या अरुदेवी कडे इतकी शक्ती कुठून आली. मागे राजाच्याच एका मंत्र्याने त्याच्या राज्यातील रथांचा आणि बग्ग्यांचा (रेल्वेचा) उल्लेख बैलगाड्या (कॅटल क्लास) असा केला होता तेव्हा त्याला उशिरा का होईना बरखास्त केलं होतं. त्याचा न्याय हिला क नाही लागला असा विचार आला की अरुदेविच्या ताकदीचा अंदाज येतो. नव्हे राजाचा पाठीचा कणा कसा गायब झाला आहे हे कळतं. धन्य आहे.
  तुम्ही सांकेतिक भाषेत सगळं लिहिलंत म्हणून मला ही चेव आला तुमची रीघ ओढण्याचा. मस्त झालंय हे अरुदेवीचं प्रकरण. धन्यवाद.

  ReplyDelete
 2. वा. मस्तच एकदम. लई झ्याक. अरे, ही अरुदेवी म्हणजे बारा गावचं पाणी प्यायलेली बाई. ती इतरांना थोडीच ऐकणार? आणि तिच्यावर कारवाई तरी कशी होणार रे? ज्या राज्याचा राजपुत्रच अशी खळबळजनक विधानं करण्यात धन्यता मानतो ते राज्य या बाईवर कारवाई काय करणार? अरे, जिथे राजपुत्रच म्हणतो की, देशभक्त आणि देशद्रोही संघटना सारख्याच तिथे बाकीच्यांची काय कथा?

  ReplyDelete
 3. Aru is gay thats why she speaks against society

  ReplyDelete
 4. टवळीची टकळी चाल्लीये... चालू दे... काही दिवसांसाठी नवे मनोरंजन मिळाले.

  ReplyDelete
 5. अरुदेवी काही गरीब नाहियेत!! तिला तिच्या पुस्तकांची अमाप रॉयल्टी मिळते. वडीलोपार्जित जमीन वगैरे सगळं आहे. आणि ह्या कुठल्याही गोष्टीवर अरुदेवीने पाणी सोडलं नाही

  ReplyDelete
 6. ऍंड हेरंब ईज ब्याक :)

  हेरंबा आपल्या देशात वाट्टेल ते वागायची, बोलायची मुभा आहे किंबहूना फॅशन आहे बघ... आणि जरा प्रवाहाविरुद्ध बोललं की लोकं लक्ष देतात आणि प्रसिद्धी फार सोपी होते.... मग हे असले प्राणी ताळतंत्र सोडतात आणि बरळत सुटतात....लोकशाही है बाबा!!!

  पोस्ट नेहेमीप्रमाणेच उत्तम!!!

  (आजकाल ब्लॉगरने वर्ड्प्रेसचा रुसवा सोडलाय वाटतं कारण ब्लॉगाच्या नावाने कमेंटा जाताहेत, तेही एका झटक्यात... :) )

  ReplyDelete
 7. खूप खूप मस्त पोस्ट...एकदम perfect हेरंब दादा style...
  आणि राजा काही action घेत नाही म्हणून तर ह्या अरुदेवी सारख्या लोकांचे फावते... :-(

  ReplyDelete
 8. भाषेबद्दल आधीच क्षमस्व पण ती बाई म्हणजे रस्त्याच्या बाजूला असणारा शेणाचा पो आहे. त्यात दगड मारला तर दुर्गंधीच वाढणार. गुहा म्हणतात ते काही खोटे नाही. "ती डाव्या बाजूची शौरी आहे."

  ReplyDelete
 9. तुमचा लेख... लेख या अंगाने खूप चांगला लिहिलाय... मस्तच पण... पण हा प्रश्‍न आहे. पहिल्यांदा ब्लॉगवर आलेल्या प्रतिक्रीयांना प्रतिक्रीया देतो....
  अरुंधती रॉय काही गांधी नाहीत सगळ्या गरीबांसाठी सुती साडी नेसावी... सुती साडी नेसावी... आणि का असावे.... त्या ज्या पैसे मिळविताहेत त्या त्यांच्या कष्टाने, ज्ञानाने तो सर्वांचाच अधिकार आहे आणि तो त्यांचाही आहे. आपल्याकडे एखाद्याने एखाद्या घटकाविषयी काम करायचे म्हटले तर त्याने किंवा तीने त्या घटकांसारखेच जगले पाहिजे हा अट्‌टहास का?....
  नक्षलवाद्यांना अरुंधती रॉय यांचा जाहीर पाठिंबा आहे... पण का? हा प्रश्‍न आपण का नाही विचारत.... ज्या पध्दतीने देशात सरकार नावाची व्यवस्था चालती आहे. तिच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघितले की केवळ नंगानाच दिसेल....म्हणजे अरुंधती रॉय बोलतात ते सगळेच मान्य करावे असे नाही... पण त्यांच्यावर टिका करतानाही हे अंकुश आहेत म्हणून हत्ती उधळत नाही हे लक्षात ठेवावे...

  ReplyDelete
 10. अरूंधती रॉय ही बाई मला कधी कधी मानसिक संतुलन ढळल्यासारखी वाटते. लिबरलीझम हाताबाहेर जाणे म्हणजे काय, ह्याचं ती एक ढळढळीत उदाहरण आहे!

  ReplyDelete
 11. "Jammu and Kashmir was never an integral part of India"!!
  हे अस वेड्यासारख बरळण तिच मानसिक संतुलन बिघडल्याच उदाहरणच आहे.खरच आहे मुभा म्हणुन काहीही बोलायच.बाकी आपल्या सरकार बद्दल काय बोलायच आता...

  ReplyDelete
 12. वेड लागलय रे तिला...आणि राजाबद्दल काय बोलू यार :(
  सोड सगळे एक एक "आदर्श" ठेवत जात आहेत माहीत असेलच....

  ReplyDelete
 13. We need to accept and tolerate such opinions .., every opinion looks 'strange' at the beginning. Giving them too much value shoudl be avoided though..

  ReplyDelete
 14. पांथस्थ, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार आणि ब्लॉगवर स्वागत.

  ही अरुदेवी पक्की पोचलेली आहे.. त्यामुळेच तिला हात लावण्याची कोणाची हिम्मत होत नसावी. असो.

  अशी भेट देत रहा ब्लॉगला. धन्यवाद.

  ReplyDelete
 15. खरंय संकेत. ही बाई खरंच बारा गावचं पाणी प्यायलेली बाई आहे. विकीपेज बघ तिचं. जिथे तिथे खुसपटं काढली आहेत बयेने. आणि तिला तर काय उघड उघड राजाश्रयही मिळतोय. त्यामुळे आपण 'आवरा' म्हणण्याखेरीज काहीच करू शकत नाही !

  ReplyDelete
 16. विकिपेज बघितलं कधीचंच. त्यात तिच्या माहितीपेक्षा तिच्यामुळे उद्भवलेल्या वादांचीच माहिती जास्त आहे. एकूणच विकिपेज वाचल्यावर वाटतंय की, हिला फक्त टीकाच करता येते. छिद्रान्वेषी बाई आहे. प्रत्येक गोष्टीत काहीतरी खुसपट काढतेच!

  ReplyDelete
 17. नितीन, तुमच्या भावना (!!) पोचल्या पण झेपल्या नाहीत. असो..

  ReplyDelete
 18. अगदी अगदी सौरभ. तिच्या या माकडचेष्टांकडे निव्वळ एक मनोरंजन म्हणून बघून सोडून द्यायचं !

  ReplyDelete
 19. विनय, मान्य आहे. ती खरोखरीच गरीब आहे असं म्हणायचं नव्हतं मला. कहाणीत असतं ना की "आटपाट नगर होतं, त्यात एक गरीब ब्राह्मण रहात असे.".. तर त्या फ्लोमध्ये मी तसं लिहिलं. अरुदेवी चांगलीच गडगंज आहे प्रत्यक्षात !!

  ReplyDelete
 20. तन्वी, अगदी योग्य बोललीस !! दहा जण बोलतायत त्याच्या अगदी विरुद्ध बोलायचं म्हणजे मग आपोआपच लोकं आपली दखल घेतात. 'जुन्या' गांधीपासून ते 'नव्या' गांधींपर्यंत सगळेजण हेच करत आलेत. अरुदेवीही त्याच मळलेल्या वाटेचा वापर करते आहे.

  प्रतिक्रियेबद्दल आभार. वर्डप्रेस वरून ब्लॉगरवर एका झटक्यात प्रतिक्रिया जात नसतानाही दर वेळी पुनःपुन्हा प्रयत्न करून आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनःपूर्वक कैच्याकै खूप आभार !!

  ReplyDelete
 21. आभार मैथिली.. :)

  काही कारवाई न करणं हेच तर राजाच्या हिताचं आहे. कारण कारवाई केली तर तोही त्यात अडकेल !

  ReplyDelete
 22. अरविंदा, लोकांच्या मनात खदखदणारा असंतोष (शिवराळ असली तरी) योग्य भाषेत मांडला आहेस. त्या बयेला फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन असेल तर आपल्यालाही ते तितकंच आहे !!!

  ReplyDelete
 23. सुषमेय, प्रतिक्रियेबद्दल आभार.

  >> अरुंधती रॉय काही गांधी नाहीत सगळ्या गरीबांसाठी सुती साडी नेसावी...

  रॉयने सुटी साडी नेसावी असं मी लेखात म्हटलं नाहीये की कोणी प्रतिक्रियेतही तशी अपेक्षा केल्याचं मला दिसत नाही. तिची तेवढी लायकी नाही हे प्रत्येक जणच जाणतो. नक्षलवाद्यांना पाठींबा देणारा प्रत्येक माणूस माझा व्यक्तिगत शत्रू आहे असं मी मानतो. ते तो पाठींबा का देतात वगैरे वगैरे कारणमीमांसा नक्षलवादाच्या मूळ उद्देश आणि लढाईइतक्याच फसव्या असतात. तरी उलट सरकारने नक्षलवाद्यांच्या बाबतीत फारच मवाळ आणि बोटचेपे धोरण स्वीकारलं आहे हे स्वतः सरकार मान्य करतं. माझ्या मते नक्षलवाद संपवण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे लष्करी कारवाई. मागे म्हणे चिदुभाऊ नक्षलवाद संपवण्यासाठी ३ वर्षांची एक मोठी योजना आखत होते. त्या योजनेचं काय झालं कल्पना नाही पण नक्षलवाद्यांच्या हातून अजूनही निरपराध माणसं मरतच आहेत हे सत्य शिल्लक राहतंच.

  एक प्रश्न : "काश्मीर भारताचा भूप्रदेश नाही" या रॉयच्या विधानाला तुमचा पाठींबा आहे का ??? तुमचं उत्तर ऐकायला नक्की आवडेल !

  ReplyDelete
 24. बाबा, परफेक्ट.. "लिबरलीझम हाताबाहेर जाणे" याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रॉय. तिला लिबरली झोडून 'लिबरल' पाकिस्तानात पाठवली पाहिजे. !!

  ReplyDelete
 25. देवेन, अरे एवढंच नाही तर त्या भाषणात आपल्या भारतमातेला ती बया सरळ सरळ "भुखा-नंगा हिंदुस्तान" म्हणाली. इतकी उपाशी राहतेस भारतात तर सोडून का जात नाहीस भारत? एकच कारण म्हणजे हा एकमेव देश आहे की जिथे राहून आपल्याच देशाबद्दल काहीही गरळ ओकलेली चालते आणि तरीही असल्या देशद्रोही कृत्यांना कुठलीही शिक्षा मिळत नाही !

  ReplyDelete
 26. खरंय रे सुहास. मुर्ख बाई आहे नुसती ! बाईही आणि राजाही..

  हो रे.. आपले जुने आदर्श केरात टाकून नवीन 'आदर्शां'ची सवय करून घ्यायला हवी.

  ReplyDelete
 27. सविताताई, आपण दरवेळी प्रत्येकाचं व्यक्तिस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य नको तितकं जपत जातो. आणि होता होता ते इतकं जपलं जातं की मतस्वातंत्र्य आणि देशद्रोहीपणा यातली सीमारेषाही पुसली जाते. काश्मिरात/पाकिस्तानात होणार्‍या प्रत्येक हल्ल्याला भारतच जवाबदार आहे असं रॉय/गिलानी आणि अशाच अजून कित्येक सडक्या मेंदूंचं मत असेल पण म्हणून त्यांचं मतस्वातंत्र्य म्हणून असली देशद्रोही मतं आपण ऐकून घ्यायची का?

  ReplyDelete
 28. खरंय यार संकेत. अगदी छिद्रान्वेषी बाई आहे. काहीच चांगलं बघवत नाही तिला !

  ReplyDelete
 29. मुळातच कोणालाही,कधीही,कुठेहि,कसेही नि कितीही बोलायचा,वागायचा नि राहावयाचा नि त्याच्या त्याच्या सोयीने सवडीने,आवडीने नि इच्छेने करावयची परवानगी,सूट म्हणजेच लोकशाही,हि भारतीय लोकशाहीची गेल्या ६३ वर्षात झालेली व्याख्या आहे.त्या मुळे अरुताई अस बोलली नसती तरच फार मोठे आश्चर्य वाटले असते.कारण
  जेव्हा शाळेतील शिक्षकांच्या हातातील छडी हद्दपार होते तेव्हा त्यांना आठवी नववी पर्यंत मुलांना पास करण्या शिवाय पर्याय राहत नसतो आणि अरुताई तर आत्ताशी कुठे बालवाडीत प्रवेश घेते आहे.तिचे विविधगुणदर्शनाचे बरेच कार्यक्रम अजून आपल्याला बघणे बाकी आहेत.थोडक्यात काय तर ट्राफिक जाम मध्ये अडकल्यावर त्रागा करीत बसण्य पेक्षा आजूबाजूची गर्दी एन्जॉय करणे उगीचच कमी त्रासाचे वाटते.

  ReplyDelete
 30. काही लोकांना विनाकारण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायची सवय असते, हा अरु त्यातलाच एक प्रकार आहे, ही अशी काही वक्तव्य दिली तर आपल्याला निशाने पाकिस्तान वगैरे पुरस्कार मिळेल अशी तीची अपेक्षा असावी आणि पुढे मागे नोबेल शांती पुरस्कार मिळॆल असेही कदाचित ती ला वाटत असावे, एकदा मानसिक संतुलन ढळले की माणसाला काय वाटु शकेल काही सांगता येत नाही. ही अरु काय आणि अयोध्येचा निकाल लागल्यावर सुतकी चेहरे करणारे इंग्लिश चॅनेलचे न्युज रिडर आणि पत्रकार काय, एकाच माळेचे मणी...

  ReplyDelete
 31. हेरंब ः विनय यांनी प्रतिक्रीयेत लिहिले आहे ""अरुदेवी काही गरीब नाहियेत. तिला तिच्या पुस्तकाची अमाप रॉयल्टी मिळते. वडीलोपार्जित जमीन वगैरे सगळं आहे. आणि ह्या कुठल्याही गोष्टीवर अरुदेवीने पाणी सोडलेलं नाही. '' या वाक्‍यातून काय अर्थ अपेक्षीत आहे.... हे तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही. आता राहिला प्रश्‍न अरुंधती रॉय यांनी काश्‍मीर या प्रश्‍नावर काढलेले उद्‌गार.... काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. आणि तो कायम राहणार आहे. यात माझ्या मनात शंकाच नाही, पण याचा अर्थ असा नाही की जर कोणी त्याबद्दल आपल्याला न आवडणारी टीका केली तर त्याविषयी आपण खालच्या पातळीवर जाऊन टीका करायला पाहिजे... तुम्ही तुमच्या लेखात जी टीका केली आहे ती मला पटलेली नाही... पण सभ्यपणाच्या भाषेतही आपल्याला आपली मते मांडता येतात हे तुम्ही दाखवून दिले आहेत. मी जी प्रतिक्रीया व्यक्‍त केली होती ती त्यातील अनेक प्रतिक्रेबद्दल त्या प्रतिक्रेत विचारांपेक्षा विकारांवर अधिक भर दिल्याचे जाणवते.... म्हणूनच फक्‍त....
  आता तुम्ही व्यक्‍त केलेल्या प्रतिक्रीयबद्दल सांगतो... नक्षलवाद म्हणजे काय? तो का फोफावला? पंजाबमधील ( अर्थातच भिंद्रनवाल्यांची खलीस्तान चळवळ आणि नक्षलवाद सारखेच आहेत का? नक्षलवाद्यांना पाकिस्तान, चीनमधून पैसा येतो का? येत असेल तर तो कोणत्या मार्गाने... नक्षलवाद्यांच्या रडारावर पुढे काय आहे? व्यवस्था नाकारुन नवी व्यवस्था जी येईल ती या व्यवस्थेपेक्षा चांगली असेल काय? नक्षलवाद्यांनी अवलंबिलेला मार्ग योग्य की अयोग्य? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. लष्करी कारवाई करायचे म्हणजे काय? लिट्‌टेला ज्या प्रमाणात उखडून टाकले त्या प्रकारे नक्षलवाद उखडून टाकला तर काय होईल... असे आणखीही काही पोट प्रश्‍न आहेत. नक्षलवादाला विरोध ठिकच आहे... तो असायलाच हवा.... पण खरेच नक्षलवादी देशविघात कार्य करताहेत काय? हाही प्रश्‍न आहे. ...... प्रत्येक गोष्टीला दोन पर्याय असतात... आपल्याला काय नेमकं काय हवं हे कळलं की मग मोठे प्रश्‍न सोपे वाटतात. देश प्रथम आणि माणूस दुसऱ्या स्थानावर मानले की मग व्यवस्था आणि व्यवस्थेतील घटक, देश आणि माणसांसाठी काम करतात हे मान्य होईल.
  .... अजून खूप लिहिता येईल... पण नंतर कधीतरी..... या सगळ्याचा अर्थ मी नक्षलवादी वगैरे आहे असाही करुन घेऊ नये...बाकी संपादन खूपच छान झाले आहे....

  ReplyDelete
 32. हेरंब, कुणीही यावे आणि टपली मारुन जावे अशी गत आहे आपल्याकडे...अरे बिचार्‍या राजकारण्यांना भूखंड, देवळं झालंच तर खेळांमधले घोटाळे या सगळ्यांतुन वेळही मिळाला पाहिजे नं.......आपण अमेरिकेत मरमर मरुन दादरला खोलीपण घेऊ शकत नाही तिथे ही लोकं बघ अशा बकणार्‍या लोकांकडे न पाहता टाउनमध्ये अख्खी इमारतही घेतील....(असो तुझा पुढचा टॉपिक हा असला तर चालेल मला.....) सो सांगायचा उद्देश हेच ते की कुणीही यावे....

  ReplyDelete
 33. jabarat post! heramb style !! arudevibaddal kay bolalve? shabd apure padatat..buddhijivi ahe re ti.. white collar terrorist navachi ek jamat aste, tula mahit aselach!!!

  ReplyDelete
 34. mynac दादा,

  खरंच रे.. स्वातंत्र्य आणि स्वैराचारातला फरक म्हणतात तो हाच.. यातली सीमारेषा फार पुसत आहे. एकदा ती ओलांडली गेली की संपलंच सगळं. अरुचे हे असले विविधगुणदर्शनाचे कार्यक्रम बघून वैताग आलं नुसता आता.. राजा कधी डोळे उघडतोय देव जाणे !!

  ReplyDelete
 35. गौरव, अगदी बरोबर.. काही कारण नसेल तरी उगाच इतरांपेक्षा मी कशी वेगळी हे दाखवण्याचा अनाठायी अट्टाहास आहे हा ! खरंच निशाने पाकिस्तान च्या दिशेनेच तिची वाटचाल सुरु आहे. ठीके पण मग भारतातून चंबूगबाळं आवरण्याचं बघा म्हणावं !

  >> ही अरु काय आणि अयोध्येचा निकाल लागल्यावर सुतकी चेहरे करणारे इंग्लिश चॅनेलचे न्युज रिडर आणि पत्रकार काय, एकाच माळेचे मणी...

  अगदी अगदी सहमत !!

  ReplyDelete
 36. सुषमेय, कदाचित तुमचा गैरसमज झाला असावा असं मला वाटतंय. विनय यांनी "अरुदेवी काही गरीब नाहियेत." हे जे लिहिलंय ते पोस्टमधल्या "तिथे एक गरीब स्त्री रहात असे." या वाक्याला उद्देशून लिहिलं आहे. आणि मी पोस्टमध्ये तसं का लिहिलं आहे हे विनय यांना उत्तर देताना सांगितलं ही आहे. ते एकदा तुम्ही वाचून बघा.

  >> पण याचा अर्थ असा नाही की जर कोणी त्याबद्दल आपल्याला न आवडणारी टीका केली तर त्याविषयी आपण खालच्या पातळीवर जाऊन टीका करायला पाहिजे...

  प्रश्न हा आहे की तुम्ही म्हणता ती पातळी ठरवणार कोण? तुम्हाला रॉयने बोलताना पातळी सोडलेली नाही असं वाटतं आणि इतरांना त्याच्या अगदी उलट वाटतं. म्हणून मग तिला तिच्याच भाषेत उत्तर दिलं तर राग यायला नको. काश्मीर भारताचा भाग नाही असं जाहीरपणे आणि तेही भारतात राहून म्हणणार्‍याचा/ची आयमाय काढली तरी त्या बोलण्याची पातळी रॉयच्या या मुर्ख विधानांपेक्षा उच्च असेल माझ्या मते.

  तुम्ही म्हणता त्या नक्षलवाद, आतंकवाद, भिंद्रनवाले या सगळ्या सगळ्यांना उपाय एकच. ठोकशाही. लष्करी कारवाई. नक्षलवादीही माणूसच आहेत असल्या फालतू थिअर्‍या तिथे कामाच्या नाहीत. त्यांना सोलूनच काढलं पाहिजे. फालतू समजुती डोक्यात घेऊन जाणूनबुजून देशाशी युद्ध पुकारणारा, देशद्रोह करणारी प्रत्येक व्यक्ती मग ती कितीका निष्पाप, निरागस असेनाका तिला देहदंड ही एकमेव शिक्षा योग्य आहे.

  ReplyDelete
 37. अपर्णा, खरंय.. आणि रॉयच्या बाबतीत तर कुणीही म्हणजे अगदी कुणीही असं प्रकार आहे. एक बुकर सोडलं तर कर्तृत्व काय आहे या बयेचं? तिचं विकीपेज बघ. प्रत्येक देशविघातक, भारतद्रोही कृत्याला तिचा पाठींबा आहे. **वर लाथा मारून हाकलून दिलं पाहिजे असल्या लोकांना. !!

  ReplyDelete
 38. संकेत, खूप आभार रे :)

  exactly !!! ती white collar terrorist जमातीची प्रमुख आहे रे !! असल्या लोकांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत !!

  ReplyDelete
 39. Bharatat Un-fashionable samajalyajaNarya goshteebaddal tampaNe lihayache dhaDas dakhavalyabaddal tumche koutuk kele pahije
  -Smita

  ReplyDelete
 40. स्मिता, रॉयच्या असल्या मूर्खासारख्या विधानांमध्ये ज्यांना काही आक्षेपार्ह वाटत नसेल अशा महान जीवांना (रॉयबरोबरच) भारताच्या बाहेर हाकलून दिलं पाहिजे !!

  प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 41. psuedo-intellectualism is a major problem with our society. Ekhada /ekhadee karaN nasatana atyanta sahishNu vruttichya apalya deshavar, dharmavar tashere odhatoy he dhaLadhaLeet satya disat asun suddha kuNee jaaaaaraaa tyavar narajee vyakta kelee ki he lagale lagech tyala target karun swata:cha shahaNpaNa dakhavayala.. hypocrisy taree kitee asavee? je je kahee apala te sagaLa kamee mahatvacha , aNee je kuNee tyavar teeka karel to maha- buddhivaan!! ekmev qualification mhaNaje ability to trash your own society/ country/ religion/ language whatever.. we are a classic example of low self esteem!! ata ya blog varachech responses bagha na... mazya office madhye hee asach hota.. media is largely responsible for this alleged intellectual stance I think...( ekda arudevee anee tatsam lokancha lahanpaNeeche reporcard/ mark list/ transcripts baghayacheech ahet mala:-) kitee dive lavat hote te- exceptions asateel puN normally he chadhavun thevalele lok kahee jamala nahee kee ase hukumee ekke vaparatat.)
  Smita

  ReplyDelete
 42. स्मिता, या स्युडो सिक्युलर लोकांपायीच देशाची वाट लागली आहे. तू म्हणतेस ते अगदी खरं.. आपला देश, धर्म, संस्कृती या सगळ्यावर चिखलफेक केली की झाले हे लोक लगेच सेलिब्रिटी !! अरे पण अकला आहेत का डोस्क्यात? ही रॉय सुद्धा असलीच आहे. आपल्याच देशाला नावं ठेवून प्रसिद्ध होणारी हलकट बाई. अशा लोकांना त्या क्षणी ताबडतोब भारतातून हाकलून दिलं पाहिजे. कारण प्रत्येकाच्या मतस्वातंत्र्याचा कितीही आदर करायचा म्हटलं तरीही तिने जे मत व्यक्त केलं आहे ते म्हणजे शुद्ध देशद्रोह आहे. !!! अर्थात आपला महान 'राजा' असलं कुठलंही पाउल उचलणार नाही ही गोष्ट वेगळीच म्हणा.. !!

  ReplyDelete
 43. ती बाई यडचाप वाटते. गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज २५-३० पानांपेक्षा वाचू शकले नाही याचे कारणही तेच असावे.
  शार्लट गिलमनच्या ’द यलो वॉलपेपर’ मधल्या पात्राची आठवण झाली तिचे लिखाण वाचताना..
  विद्याधरशी सहमत.

  ReplyDelete
 44. बाबाच्या मताशी पुर्णपणे सहमत....

  ReplyDelete
 45. ती नक्कीच आहेच यडचाप आहे ग..

  >> गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज २५-३० पानांपेक्षा वाचू शकले नाही याचे कारणही तेच असावे.

  माझंही तेच झालं होतं. 'Algebra of Infinite Justice' मधलं जेमतेम एक प्रकरण वाचू शकलो मी..

  >> शार्लट गिलमनच्या ’द यलो वॉलपेपर’

  हे काय आनि?? एवढं भलं थोरलं विंग्रजीबी वाचत नाय ग आमी ;)

  ReplyDelete
 46. धन्स आनंदा..

  विद्याधरा, आनंदने ती टाळी सव्याज परत केलेली आहे बघ..

  (संदर्भ : http://thebabaprophet.blogspot.com/2010/10/blog-post_21.html?showComment=1287786594592#c4667389907883809422)

  ReplyDelete
 47. मस्त लिहितोस तू..

  ReplyDelete
 48. आभार शीतल. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..

  ReplyDelete
 49. Hi,

  We have shortlisted this article for Netbhet eMagazine Nov 2010. We seek your permission for incorporating this article in magazine.
  Please provide your full name and email id.
  Please write to salil@netbhet.com or call Salil Chaudhary - 09819128167 for more information.

  Regards,
  Sonali Thorat
  www.netbhet.com

  ReplyDelete

हिंसक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं प्रत्ययकारी चित्रण : 'राजकीय हत्या'

आपल्या (तथाकथित!) सुसंस्कृत समाजात नियमितपणे घडणाऱ्या मोर्चे ,  धरणी , आंदोलनं यांसारख्या घटना किंवा अगदी सार्वजनिक उत्सव , समारंभ , मिरवणुक...