Friday, October 1, 2010

कंपोस्ट : १

कधीकधी उगाच लांबलचक, मोठमोठ्या पोस्ट्समुळे फार 'कं' यायला लागतो ....... वाचणार्‍याला...... अर्थात लिहिणारा माझ्यासारखा असेल तर मग हमखासच. अर्थात माझा मलाही 'कं' येतोच लिहिताना.. पण तरीही कधी कधी सगळं तपशीलवार लिहिल्याशिवाय विषय पोचत नाही, पोस्ट चांगली होत नाही. याच्या उलट कित्येकदा अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यांचा एका स्वतंत्र पोस्टएवढा काही जीव नसतो. पण त्यावर लिहावसं तर वाटत असतं. अर्थात असं करता करता त्या डोक्यातून निघून जातात. त्यामुळे आजपासून मी एक नवीन प्रयोग सुरु करतोय. छोट्या पोस्ट लिहिण्याचा.. (नियमित नाही हो.. कधीकधी, अधून मधूनच किंवा प्रसंगाच्या मागणीनुसार ;) .. एवढेही सुदैवी नाही आहात तुम्ही लोक)

तर या छोट्या पोस्ट म्हणजे छोटी गोष्ट तपशीलात मोठी करून लिहिण्याचा कंटाळा आलेल्या पोस्ट म्हणून कंपोस्ट... 'कं'पोस्ट .. अर्थात या कंपोस्टीतही श्लेष आहे. म्हणजे वरिजनल वाला श्लेष नव्हे पण त्याच अर्थाचा काहीसा. या कंपोस्टी अगदी छोट्या तर असतीलच पण त्या (माझा) 'कं' या विषयाला पूर्णतः वाहिलेल्या असतील. थोडक्यात कं वरच्या छोट्या पोस्टी म्हणजे कंपोस्टी... छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्याला कसा कं येतो आणि (जमल्यास) त्या छोट्या गोष्टी अजून सोप्या करण्यासाठी सांगितलेली छोटीशीच पोस्ट... तर या कंपोस्ट सिरीजमधलं आजचं हे पाहिलं पुष्प (आयला काय भारी वाटतं असं म्हटलं की)

ब्लॉगपोस्टवर प्रतिक्रिया देताना व्हेरिफिकेशन वर्ड इनेबल केलेल्या समस्त ब्लॉगरांची क्षमा मागून सांगतो की मला हा प्रकार बिलकुल म्हणजे बिलकुल आवडत नाही. वैताग येतो नुसता. छान लेख वाचून झाल्यावर मस्त प्रतिक्रिया द्यावी तर हे गुगलबाबा चष्म्याच्या दुकानात जाऊन डोळ्यांची चाचणी केल्याच्या थाटात चित्रविचित्र अक्षरं (न् कधी कधी आकडेही) वेड्यावाकड्या आकारात समोर आणतात आणि म्हणतात "वाचून दाखव बरं हे आणि पुन्हा लिही हेच खाली"... आणि ३-४ अक्षरी शब्द असेल तर गुगलचा शेअर जणु १०० डॉलरांनी खाली येत असल्याच्या आवेशात ते शब्दही चांगले ७-८ अक्षरी असतात. सुरुवातीला प्रामाणिकपणे मन लावून मी अख्खा शब्द टाकायचो. कारण तोवर 'कं' ने टंकण्याचा (ही) ताबा घेतलेला नव्हता. पण होता होता हे वाढायला लागलं. गुग्ल्याचे मोठमोठे शब्द आणि ते आम्ही मन लावून कॉपी करणं हे प्रकार चालूच राहिले.. आणि आणि आणि तो आलाच. "तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं" च्या थाटात एके दिनी 'कं' ने सगळी सूत्र हातात घेऊन माझ्या डोक्यात एक भुंगा सोडून दिला. तुम्हालाही सांगतो. पण "उतू नाका, मातू नाका, पूर्ण व्हेरिफिकेशन वर्ड (कधीही) टाकू नका."

तर गुग्ल्याने असा मोठा व्हेरिफिकेशन वर्ड दिला ना की सरळ डोळे मिटून ए बी सी किंवा ए ए ए किंवा १ २ ३ असं कायपण लिहून टाकायचं. गुग्ल्या गंडतो.. त्याला वाटतं आपल्याला नीट कळला नाही शब्द. आणि त्यामुळे मग तो एकदम सोपा शब्द देतो. म्हणजे आधीचा आठ अक्षरी असेल तर पुढचा थेट चार अक्षरी. अगदी आपली कीव केल्यासारखी. पण ठीक्के कीव करायची तर कर विश्वविजयी 'कं' जिंकतो हे सत्य कसं नाकारशील?

झाली आमची गोष्ट
आली पहिली कंपोस्ट

किंवा


उपाय सारे सरून जाती नेहमीच जिंकतो कंटाळा
विषय बापुडे मरून जाती सदैव विजयी कंटाळा
हुरूप हरतो, हर्ष थरथरतो दिग्विजयी योद्धा कंटाळा
उर्जा पतते, जिव्हा ढळते रामबाण, ब्रह्मास्त्र कंटाळा

-- आद्य 'कं' पोस्टीकडून साभार

तटी : या प्रथम कंपोस्टीत ओळखीपायी दोन परिच्छेद वाया गेले. पण पुढची कंपोस्ट ही नक्की या कंपोस्टीच्या निम्मी असेल.... अगदी नक्की... कं शप्पत !!!

48 comments:

 1. आम्हीही अगदी अशाच भावनेने एक प्यारेलाल ब्लॉग सुरु केला होता.

  micronachiket.wordpress.com
  पण नंतर छोटे लिहिण्याची चांगली सवय जाउन लाम्बड़ लागायला लागली.

  तुला शुभेच्छा.

  ReplyDelete
 2. हेरंब तू पण ना ... उद्या मी कम्पोस्टिंग कसं करतात ते शिकायला जाणार आहे ... म्हटलं तुला कसं बरोबर समजलं मला या विषयातलं ज्ञान हवंय ते :D :D
  बाकी ‘कं’पोस्ट छानच. (‘कं’ मुळे लिहिलेली कम-पोस्ट?)

  ReplyDelete
 3. "उतू नाका, मातू नाका, पूर्ण व्हेरिफिकेशन वर्ड (कधीही) टाकू नका.">>> १००% मान्य

  ReplyDelete
 4. कंपोस्टा टाकून टाकून ब्लॉगला खत घालतोयस होय रे! :)
  होणार ब्लॉगची चांगली वाढ होणार! :P
  बेस्टच आयडिया!

  ReplyDelete
 5. >>> वर्ड व्हेरिफिकेशन

  डोक्याला शॉट असतो...

  कंपोस्ट टाकुन ब्लॉगची चांगली वाढ होऊ दे.

  ReplyDelete
 6. ज्या ब्लॉग वर्ड व्हेरीफिकेशन असतं तिथे वर्ड प्रेस वाल्यांना कॉमेंट द्यायला खूप त्रास होतो.
  कॉमेंट लिहायचा पण कं येतो. हाच कन्स्पेप्ट पूर्वी मी पण ट्राय केला होता, पण नंतर सोडून दिला तो ब्लॉग .

  ReplyDelete
 7. >> तर या कंपोस्ट सिरीजमधलं आजचं हे पाहिलं पुष्प (आयला काय भारी वाटतं असं म्हटलं की)

  >> आणि ३-४ अक्षरी शब्द असेल तर गुगलचा शेअर जणु १०० डॉलरांनी खाली येत असल्याच्या आवेशात ते शब्दही चांगले ७-८ अक्षरी असतात.

  आयला भारी.. हसायचा कं आला तरी हसावंच लागलं रे ;)

  आवडली कल्पना!

  ReplyDelete
 8. मो प्र कं आ ही छो प्र...

  ReplyDelete
 9. micronachiket ... हा हा हा सहीये नाव.. आणि ब्लॉगही.

  शुभेच्छांबद्दल धन्यवाद. अरे पण मी नेहमी एवढं कमी लिहिणार नाहीये.. लिहूच शकणार नाही :) .. त्यामुळे इलाज नाही ;)

  ReplyDelete
 10. हा हा.. तुमच्या आणि आमच्या कंपोस्टचा काहीही संबंध नाही :P .. आणि खर्‍या कंपोस्टवर मी ज्ञान पाजळायला लागलो तर झालं झाडांचं कल्याण ;)

  कम-पोस्ट ... हा हा हेही सहीये !!

  ReplyDelete
 11. प्रसिक, अरे गुगलला गंडवता येत असेल तर पूर्ण शब्द टाकायची गरजच काय? :)

  प्रतिक्रियेबद्दल आभार.. आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.

  ReplyDelete
 12. बाबा, हा हा .. अरे नियमित कंपोस्टचं खतपाणी नाही रे.. अधूनमधून ;)

  ReplyDelete
 13. यवगेश, खरंय यार.. मला तर जाम वैताग येतो त्याचा.. अधूनमधून एखादी कंपोस्ट आली तर ब्लॉग तेवढाच जरा बाळसेदार होतो :)

  ReplyDelete
 14. खरंय.. कमेंट टाकण्याच्या बाबतीत वर्डप्रेस खरंच खूप चांगलं आणि सोपं आहे. ब्लॉगरची नाटकंच फार !!

  ReplyDelete
 15. हा हा .. आभार्स आनंदा. कंपोस्टींमुळे मारून मुटकून का होईना हसायला येतंच ;)

  अरे ट्राय करून बघ हे.. गुग्ल्याला गंडवायला मजा येते जाम ;)

  ReplyDelete
 16. >> ए बी सी किंवा ए ए ए किंवा १ २ ३ असं कायपण लिहून टाकायचं. गुग्ल्या गंडतो..

  मस्तच ! :D

  ReplyDelete
 17. क्षितीज,

  :) :) अरे खरंच.. स्वानुभव आहे.. ट्राय करून बघ..

  ReplyDelete
 18. || श्री आळसोबा प्रसन्न ||
  :) वाह... उडी पडली ती पडली पण तीपण डायरेक्ट कंटाळ्यावर... वाह... भक्कम योगायोग... :)
  r u engg??? कारण कंटाळ्यावर एवढ जिवापाड प्रेम करणारे तेच असतात. :D (ख्यॅंख्यॅं)
  आयला!!! आणि १०६ पोष्टी... हम्म्म्म... हळूहळू करतो फस्त...

  ReplyDelete
 19. अ वा! तु वा आ त ते वा... :-)

  ReplyDelete
 20. सौरभ, इंजिनियर असो, डॉक्टर असो, वकील असो किंवा 'यापैकी नाही' असो या दिग्विजयी कंटाळ्याने कोणालाही सोडलेलं नाही आणि त्याच्यावर प्रेम करत नाही असाहि कोणी नाही. फक्त काहीजण कबुल करतात काही जण नाही ;)

  कर सावकाश फस्त कर.. :)

  आणि हो ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..

  ReplyDelete
 21. सं, हे झे ना (हे झेपलं नाही. जस्ट इन केस तुलाही झेपलं नाही तर ;) )

  ReplyDelete
 22. "कं"पोस्ट वर "कं"प्रतिक्रिया द्यायला हवी...
  एकदम मस्त...घाव वर्मी घातलास...मला पण WV चा कं येतो...मग तिथे प्रतिक्रिया टाकायच्या राहून जातात....(बाबा आप सून राहे हो क्या??)

  ReplyDelete
 23. कंपोस्ट वर कंप ;)

  आयला.. बाबाच्या ब्लॉगवर WV आहे ? आठवत नाहीये मला..

  ReplyDelete
 24. अपर्णा,
  मी तुझं, हेरंबचं आणि अन्य अनेक कंप्रेमींच्या तक्रारी मिळाल्यावर जवळपास तीनेक महिन्यांपूर्वीच WV चं वाजत गाजत विसर्जन केलं होतं...
  तू आत्ताच कॉमेंट टाकलेली असून तुझ्या लक्षात नाही...त्याबद्दल णिषेढ :P

  ReplyDelete
 25. हाहाहा... मला झेपलं तुझं दुसरं वाक्यही. मी म्हटलं होतं, ‘अरे वा! तुला वाचता आलं तर ते वाक्य...’ :-) आणि हो, पहिलं वाक्य मी आधी ‘खूप खूप आभार’ असं वाचलं होतं, पण ते ‘खूप खूप आभार्स’ असं वाचायला हवं होतं नाही? ;-)

  ReplyDelete
 26. >>>>ज्या ब्लॉग वर्ड व्हेरीफिकेशन असतं तिथे वर्ड प्रेस वाल्यांना कॉमेंट द्यायला खूप त्रास होतो. +1

  >>>>>> तर या कंपोस्ट सिरीजमधलं आजचं हे पाहिलं पुष्प (आयला काय भारी वाटतं असं म्हटलं की ....) :)

  एकूण पोस्ट :) :)

  बाकि माझ्या कंटाळ्याबद्दलचा ईतिहास ब्लॉगावर एकदा लिहीलेला आहेच... वो लिखनेको तूच कारणीभूत था वो भाग निराळा....:)

  ReplyDelete
 27. कंटाळाग्रस्त कं कंपनी आता तरी ह्या खतपाणी घातल्याने पुन्हा जोम धरू लागतील हीच प्रार्थना :)
  (काही उपाय सुचव ना मला कं ला दूर पळवून लावायला ;))

  ReplyDelete
 28. बाबा अरे का कुणास ठाऊक मला नेहमी वाटत की अजून तुझ्या ब्लॉगवर ते WV तसच आहे....पण आता तूच म्हणतोस म्हणजे नसेल...ही ही... मला आठवत नाहीये....:)

  ReplyDelete
 29. कंपोस्ट्वर माझी ही ’कं’मेन्ट!! कं मुळे काल ’कं’मेन्टलो नाही..माझ्या ब्लॉगला बघताच कंचा अदांज येतो. नो,९ के बाद सीधा स,१० के पो.

  ReplyDelete
 30. हा, हा. मी गुगलबाबाला असंच चकवते. काय पण टायपायचं की दुसरा पेपर एकदम सोप्पा येतो. स्वानुभवातून शहाणं होत मी माझ्या ब्लॉगवरूनही त्या व.वे. ला डच्चू दिला.

  ReplyDelete
 31. कं बोले तो कंट्रोल यार... (आवरा नव्हे बरं, तुमचे चालू दे...) (माझ्या असंबद्ध प्रतिक्रीये मागे सोमवार सकाळचा 'कं' आहे)

  ReplyDelete
 32. हा हा बाबा.. मला वाटलंच होतं की बहुतेक तुझ्या ब्लॉगवर WV नाहीये म्हणून. पण अपर्णा म्हणाल्यावर मी किंचित कम्फूस झालो ;)

  पण तू तिचा एकटीचाच णीशेढ केलास.. वाचलो ;)

  ReplyDelete
 33. संकेत, :) ... अच्छा आता कळलं ते.

  खूप खूप आभार्स !! हा हा हा

  ते ऋयामशेठची कृपा आहे :)

  ReplyDelete
 34. तन्वी, थोडक्यात ब्लॉगर आणि वर्डप्रेस लोकांची एकत्र मागणी आहे की WV बंद करावं ;)

  तुझी 'कं' ची बाधा विसरण्याएवढी 'ग' ची बाधा झालेली नाही मला ;) कारणीभूत कुठलंही भूत असो तू लिहिलं होतंस भन्नाट इसमे कोई श?

  ReplyDelete
 35. हा हा सुहास.. धन्स धन्स.. आणि साक्षात 'कं' प्रेमी ब्लॉगमालकाच्या 'कं'च्या पोस्ट वर कं ला दूर पळवून लावायचे उपाय मागण्याएवढा कृतघ्नपणा केलास तू?? तुझा महाणीशेढ !!!!! ;)

  ReplyDelete
 36. व अपर्णा, आठवत नसताना एवढ्या कॉन्फीडन्टली बाबा ला तू "बाबा, सुन रहे हो?" असं विचारलंस??? मानलं तुला ;)

  ReplyDelete
 37. ’कं’मेन्ट हा हा.. माईंड इट अण्णा भारी एकदम.. अरे आपण सगळेच इथून तिथून 'कं' ग्रस्त.. कोण कोणाला समजावणार ;)

  ReplyDelete
 38. यस कांचन.. एकदम बरोबर.. माझंही हे स्वानुभवातून आलेलंच शहाणपण आहे :) धन्स ..

  ReplyDelete
 39. सिद्धार्थ, आयला.. 'कं' चा हा अर्थ नव्यानेच उलगडला ;) तुला सोमवारच्या खू खू शु ;)

  ReplyDelete
 40. सोनाली केळकरOctober 6, 2010 at 1:51 AM

  मला नव्हत माहीत की गुगल्याला असे गंडवता येते. बरं झालं सांगितलेस ते.
  पण आयडीयाची कल्पना भारी आहे :)

  ReplyDelete
 41. सोनाली, हेहेहे.. अग आधी मला पण वैताग यायचा ते टायपताना. म्हणून मग जरा किडे करून बघितले :)

  ReplyDelete
 42. "उतू नाका, मातू नाका, पूर्ण व्हेरिफिकेशन वर्ड (कधीही) टाकू नका."

  काढले रे बाबा... :D

  ReplyDelete
 43. चला, पोस्ट सत्कारणी लागली म्हणायची ;)

  ReplyDelete
 44. इंडलीच्या वेळी एनेबल केले होते. तसेच राहिले होते.

  आता काढले रे बाबा... :D

  ReplyDelete
 45. चला सेनापती आणि तू अशा दोन विकेटी पडल्या.. एका पोस्टीत दोन विकेटी :P

  रच्याक, इंडली ?? म्हंजी?

  ReplyDelete

हिंसक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं प्रत्ययकारी चित्रण : 'राजकीय हत्या'

आपल्या (तथाकथित!) सुसंस्कृत समाजात नियमितपणे घडणाऱ्या मोर्चे ,  धरणी , आंदोलनं यांसारख्या घटना किंवा अगदी सार्वजनिक उत्सव , समारंभ , मिरवणुक...