जनाब राहुलमियां गांधी,
अस्सलाम वालेकुम. यहावहा मुडेबिना सरळ मतलबकीच बात करतो. कालच्या अखबारमध्ये तुमचे खयालात वाचले. और हाय. बहोत बुरा लगा. बहोत बहोत बुरा लगा. दिल को ठेच पहुची. हम आपको अपना समझते थे. तुम्ही आमचेच होतात. आमच्यातलेच होतात. निदान आम्ही तरी असेच सोचत होतो. पर हाय. वो एक ख्वाबही था. एक सपना था. पण हे तुम्ही बोललात? "आरएसएस आणि सिमीमध्ये बिलकुल फर्क नाही" ही तुमची जबानी आहे? यकीन नाही होत क्षणभर. पण अखबारवाले म्हणतात म्हणजे सच असेल. पक्का सच असेल. जे काय असेल ते असो पर हम तो इतनाही कहेंगे के आपको 'मुव्हमेंट' समझीही नही. 'मुव्हमेंट' चे इरादे, 'पाक' खयालात कधी तुमच्यापर्यंत पोचलेच नाहीत. तुम्ही सिर्फ कहनेके लिये आमच्यात होतात, आमच्यातले होतात. पण या अल्लाह, तुम्हाला 'मुव्हमेंट' कधीच कळली नाही. काय हे? कळली नव्हती, समजली नव्हती, ध्यानमध्ये आली नव्हती तर निदान एक बार आम्हाला विचारायचंत तरी. एक दफा तो पुछा होता. 'मुव्हमेंट' ची महती तुम्हाला समजावून सांगायला आम्ही काहीही केलं असतं. कितीही वक्त जाया झाला असता तरी बेहत्तर. 'इस्लाम खतरे मे' असताना जिहादाचा लढा लढणारा, त्याचं महत्व सांगणारा इतका 'पाक' ग्रुप दुसरा कुठला ठाऊक आहे का तुम्हाला? क्या आप जानते भी है?? त्या अर्ध्या चड्डीवाल्या काफरांशी आमची तुलना? हो आता 'आमची' च म्हणणार. 'आपली' नाही म्हणणार. तुम्ही आता आमच्यातले राहिलाच नाहीत राहुलमियां.. आणि एवढं झाल्यावरही एका रिपोर्टरने तुमसे पुछा था के "आपको क्या वाकई असंच म्हणायचं आहे? 'मुव्हमेंट' वर बंदी आहे, काफरांच्या संघावर बंदी नही है. फिर भी वो एक कैसे?"... विचारलं होतं ना असं? पुछा था के नही? और आपने क्या कहा.. आपने कहा "मुझे उससे कोई लेना देना नही.".. या अल्लाह.. तुम्हाला लेना देना नसेल. पण तुम्ही गलत बोलता आहात आणि तुमच्या त्या म्हणण्यामुळे कौमच्या नजरेत, आमच्या कौमच्या नजरेत 'मुव्हमेंट'ची इमेज खराब होते आहे हे तुमच्या दिमागमध्ये तरी येतंय का? आणि त्यामुळेच तुम्हाला लेना-देना असलं-नसलं तरी आम्हाला लेना-देना आहे. आप गलत हो आणि तुमची गलती तुम्हाला स्पष्टपणे दाखवणं ये मेरा काम है. मेरा इमान है. मागे एकदा तुम्ही "हा हा क्यो नही? कोई भी मुसलमान शक्स प्रधानमंत्री बन सकता है, जरूर बन सकता है, हर्ज ही क्या है उसमे?" असं बोलून आमचं दिल जितलं होतंत. बाप, दादी, परदादा आणि त्याचा तो पंचेवाला मित्र या सगळ्यांप्रमाणे हा छोकरा पण आपलं आणि फक्त आपलंच भलं करणार इस बातका हमे यकीन हो गया. दिल खुश हो गया था. पर हमे क्या पता था के यही छोकरा एक दिन हमारी मुव्हमेंट को काफारोंके संघसे जोडेगा. आर एस एस शी आमची तुलना?? या अल्लाह. या खुदा. बडा ही बदतमीज लौंडा है ये. हमारा तो खून खौल रहा है. पर 'जो हुआ सो हुआ' असं म्हणून हम चूप नही रहेंगे. आणि त्यासाठीच खास हे खत लिहायला घेतलं. आम्ही म्हणजे संघ का नाही आणि संघ म्हणजे आम्ही का नाही आहोत याची एक भलीमोठी यादीच आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुव्हमेंट म्हणजे आरएसएस नाही आणि आरएसएस म्हणजे मुव्हमेंट नाही क्योंके
१. मुव्हमेंट सिर्फ और सिर्फ इस्लामसाठी काम करते. (तुमच्या आरएसएसला इस्लाम आणि जिहाद म्हणजे काय ये मालूम भी है?)
२. मुव्हमेंटके लिये जिहादसे बडा और कुछ नही.
३. इंडियाके मुस्लीमोंको पश्चिमी दुनियाके चाकाचौंधसे बल्की इंडियासेभी दूर रखके सिर्फ इस्लाम और अल्लाह येही उनके मसिहा है ये खयालात उनके दिलोदिमागमे पैदा करना, इस्लामके तौरतरीकोंसे उन्हे वाकीफ करना और काफरोंके साये से भी उन्हे दूर रखना ये मुव्हमेंटका सबसे बडा एम है. (क्या आरएसएस ये कर सकता है?)
४. इंडियन सरकारने घाबरून जाऊन मुव्हमेंटवर बंदीही आणली होती.अर्थात कोर्टाच्या निर्णयाने घाबरून जाऊन वो उठानी भी पडी थी. (हा. आरएसएसभी तुम्हारी दादीने एक दफा बंद करवाया था लेकिन उसका मतलब ये तो नही की वो हमारे बराबरी के हो गए !!)
५. आमच्या मुव्हमेंटचं स्लोगन तुम्ही कधी वाचलं आहेत का? "Allah is our Lord, the Quran is our constitution, Mohammed is our leader, Jihad is our way". (तुमच्या त्या आरएसएसच्या संस्कृत की कुठल्याशा भाषेत लिहीलेल्या, इंडियाला खुदा मानणार्या गाण्यापेक्षा हे किती महान आहे पाहिलंत तरी का?)
६. मुव्हमेंट का ये मानना है के हुजूर-ए-आला लादेन साहेब हे इस्लामचं एक सबसे अहम उदाहरण आहेत. ते एक सच्चा मुसलमान आहेत आणि प्रत्येक मुसलमानाने वैसे बननेकी ठान लेनी चाहिये. (तुमच्या त्या केशव टोपीवाल्या किंवा माधव दाढीवाल्याला आमच्या लादेन साहेबांची सर कशी येणार?)
७. मुव्हमेंटमध्ये काम करणारे कित्येक जवान प्रत्यक्ष लादेनसाहेबांच्या कैदाच्या फौजमधले आहेत. (तुमच्या आरएसएस मध्ये कोणाची तरी इतकी लायकी आहे का?)
८. मुव्हमेंट नुसती बकबक करत नही. मुव्हमेंटचं कार्य और करिष्मा खूप मोठा आहे. २००६ के बंबई ब्लास्टस, २००८ के अहमदाबाद, जयपूर, दिल्ली ब्लास्ट्स या सगळ्यात मुव्हमेंटने दिखाई हुई हिम्मत काबिले तारीफ है. (क्या कमसकम एक ब्लास्ट करनेकी भी तुम्हारे आरएसएसकी औकाद है?)
९. आरएसएस काफरोंके लिए काम करते. इंडियाला देवी, भगवान काय काय मानते. हमने पहलेकी कहा है के मुव्हमेंट एक अल्लाह छोडके किसीको खुदा नही मानती.
१०. तुम्हारे आरएसएसने इंडिया के फ्रीडम फाईटमेभी हिस्सा लिया था. (मुव्हमेंट तो तब पैदाभी नही हुई थी.)
११. तुमची आरएसएस 'वसुधैव कुटुंबकम्' असलं काहीतरी मानते. (मुव्हमेंटचा असल्या फालतू गोष्टींवर अजिबात विश्वास नाही.)
पढा आपने? वाचलंत हे सारं? आता तरी झाली तसल्ली? जी भर गया? आता तरी तुम्हाला कळलं असेलचं की आरएसएस आणि मुव्हमेंट किती अलग आहेत एकमेकांपेक्षा. सिमीची सर संघाला कशी येणार? अर्थात आधी आम्ही चिडलो होतो. बहोत गुस्सा झालो होतो. खफा झालो होतो तुमच्यावर. पण आता तुम्हाला खत लिहून समजावल्यावर आमचा गुस्सा कमी झालाय. कारण कितीही झालं तरी तुम्ही अजून लहान आहात. बच्चे आहात. मिडियाने 'युवराज युवराज' म्हणून डोक्यावर बसवल्याने तुम्हालाही ते खरं वाटायला लागलं आहे. लोग आपके सामने झुकते है तब आप समजते है के वो राहुल के सामने झुकते है. पण ते राहुलसमोर नही तर राहुल 'गांधी' समोर झुकतात हे तुम्ही विसरताय. जाने दो. तुमच्या बालिशपणावर कसलं रागवायचं? तिकडे कसलं लक्ष द्यायचं? तुमची पार्टी आमच्यासाठी सगळं करते आहे, सगळं करेल. आम्हाला मॅडमवर पूर्ण यकीन आहे. तेव्हा तुम्ही तुमचं काम करत रहा बरं. उगाच काहीतरी छोट्या बच्चासारखं बडबडू नका. तुम्ही कुठल्या त्या दुष्काळग्रस्त, खुदकुशी करणार्या शेतकर्यांच्या घरातून जाऊन राहण्याची नाटकं करा, किंवा मग त्या शेतात काम करणार्या लोकांबरोबर कामं करण्याची नाटकं करा किंवा मग बंबईवर 'आम्ही' केलेल्या हल्ल्यात लढणारे कमांडोज कसे बिहारी होते ते तुमच्या भाषणात ठासून सांगा. तेवढंचं करा. जेवढं जमतंय तेवढं करावं. जो काम अपने बस मे नही उसमे क्यो टांग अडाते हो राहुल मियां? पछताओगे. और क्या कहना !!
आपला,
मीर मसूद मुल्ला मोहम्मद हकीम
प्रेसिडंट, स्टूडंटस इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया
और एक बात : मियां अफझल गुरु साहिब और सरताज-ए-जिहाद कसाब के बारे मे अपनी जो बातचीत हुई थी उसे ना भुले. उन बातोंका और इस खत का कोई ताल्लुक नही. शुक्रिया !!!
तूssssफान झालाय लेख ! झकास युवराजांना मराठी येत असती तर लेख वाचून झालेल्या चुकीबद्दल धायमोकलून रडले असते. छान शालजोडीतले दिलेत.
ReplyDeleteव्वाह... पुन्हा एकदा कड्डक चमाट :D झ्झ्याक्क...
ReplyDeleteAwesome, amazing, अप्रतिम, भन्नाट... अरे, शब्दच कमी आहेत! तुझ्या ब्लॉगची जर सचिनच्या कारकीर्दीशी तुलना करायची झाली तर आजचा लेख म्हणजे त्याची आफ्रिकेविरुद्धची ग्वालियरमधली द्विशतकी खेळी आहे. एकदम मस्त. आणि हो, Right Alignment हा मास्टरपीस आहे आजच्या लेखातला... :-)
ReplyDeleteरोमी साहेबांनची ही अशी व्यर्थ वटवट आपल्याला नवीन नाही...तरी त्याला मागे सांगितला होत भाषण आईच्या पीए कडून लिहून घेत जा, पण हा ऐकेल तर शप्पथ ;)
ReplyDeleteपोस्ट फुल टू हेरंब स्टाइल ने झालीय.
>> Right Alignment हा मास्टरपीस आहे आजच्या लेखातला... :-) +टेन रेज़ टू इन्फिनिटी :D
jabardast!!
ReplyDeleteउजवी कडे अलाईन करण्याची कल्पना भन्नाट आहे!! नेहमी प्रमाणे, लेख अप्रतिम जमलाय!! एक नंबर! युवराजांना त्यांच्या सेवकांनी (सरदार अशोकराव चव्हाण) पढायला द्यावा ही विनंती. कारण युवराजांना मराठी पढायला जमत नसेल.
ReplyDeleteसुपर्ब! लक्ष्मणच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध्च्या खेळीसारखा झालाय लेख! शब्दच नाहीत! सगळा संताप बरोबर व्यक्त झालाय पण कुठेही आक्रस्ताळेपणा नाही! जबरदस्त!
ReplyDeleteमाग गये भिडू.....क्या मारा....
ReplyDelete*%$^ ##*!@*^$ %$#@&* @@## *&^% (*)
ReplyDeleteवरील वाक्य पोस्ट वाचल्यानंतर उत्स्फूर्तपणे आल्याने 'भ'हर आलेल्या कोकणी भाषेत आहेत. ज्यांच्यावर अल्लातालाची कृपा आहे अशी भाग्यवान लोकंचं ती वाचू शकतात.
हेरंब खान क्या फतवा निकाल्या तुम. हुजूर-ए-आला लादेन साहेबांच्या परवानगीने आपण लवकरच ह्या फतव्याचा एक वीडियो बनवू आणि मीडियाला पाठवून देऊ. आपण बस्स युवराजमियां सारखी दाढी (फक्त दाढी मिशी नको) वाढवा. बाकीचे कॉश्यूम मोहल्ल्यातून पाठवून देण्याची व्यवस्था करतो.
.का बर भन्नाट लैई कल्पना लिहण्याची डावीकडे उजवीकडून हेरंबमियां
ज ब रा !!!!
ReplyDeleteएकदम मस्त झाली आहे पोस्ट. मजा आली.
ReplyDeleteबहोत खूब लिखलं आहेस, हेरंबा! ’पाक’ खयालातची अशा प्रकारे तौहीन करण्याची गुस्ताखी करणार्या त्या राहूलमियाँला तुझा अंदाजे बयांची दखल घ्यावीच लागेल, यात कोई शक नाही.
ReplyDeleteओसामा बिन लादेन से एक याद आलं - त्या काफरांनी लपून छपून पाक मधे शूटींग करून ’तेरे बिन लादेन’ सारखा वाहियात सिनेमा काढला, इसका मतलब ये नही की पाक खयालात पिछे हटतील. उलट सिना तानके सांगतील की, "हॉं, आमच्याकडे सर्रेआम सब्जी, मूली की तरह तवंचे, एके आणि बम मिळतात. मूव्हमेंट साठी, जिहाद साठी तो एक आवश्यक भाग आहे. त्या आर.एस.एस.च्या काफरांनी इंडियामधे अशी हिमाकत करून दाखवली का?"
पोस्ट मुद्दाम शुक्रवारी लिहिली आहे का?
ReplyDeleteजबरदस्त ..लिहिले आहेस . अप्रतिम
ReplyDeleteहेरंबमिया बहोत अच्छे
ReplyDeleteइस राहुलमिया के .... नीचे एक बम फटेगा तो इसे बहुत अच्छी तऱ्ह से फरक मालूम पडेगा :P
खरच जवाब नही मिया तुमचा...
ReplyDeleteलेकीन तुमने ये खात वगैरे नही लीख्या ....
तुमने तो हमारी मनकी गोष्ट लीखून टाकली...
काश हा "फर्मान" सगळे काफिर वाच ले... तरच त्यांना असलीयत कळेल.
मियाँ , क्या खूब लिखें हो आप !! हमारी ज़मूरियत बोलने का हक़ देती हैं इसलियें यह नासमझ बंदा अपनी ज़बान तेग की तरह चला रही हैं ..हमारी अजी़म अंजुमन से RSS का क्या मुका़बला ??? हम आपके शुक्रगुजा़र हैं कि आपने हमारे ज़ज्बा़तों कों अल्फ़ाजो में बयाँ किया ....
ReplyDeleteक्या खूब कलम चलायी हैं आपने !!! करारा जवाब दिया हैं राहुलमियाँ की नासमझी को !!
Right Alignment ची कल्पना अगदी भन्नाट होती रे !! कसे सुचते तुला हे सगळे ?? दंडवत रे तुला !!
खरे तर राहुलला दाद द्यायला हवी.कारण लहान लहान म्हणून खांद्यावर बसून नंतर गुपचूप कानात XXX करता येणे ह्याला सुध्धा हुशारीच लागते.आपण ह्या सगळ्या भानगडीत हे विसरतोय कि राहुलचे हे विधान म्हणजे तो युवा राहिलेला नसून थोराड मध्ये जमा झाल्याचा धडधडीत पुरावा आहे.त्याला माहिती आहे कि पुढची किमान ५० वर्षे अशीच सत्तेचे लोणी चाटत काढायची असतील तर हे नि अशा प्रकारचे वक्तव्य,विधाने अधून मधून आवश्यक आहे नि ह्याचीच गरज असते कारण अशी विधाने करूनच ह्या देशात आपण धर्म निरपेक्ष असल्याचे वारसा हक्काने निर्विवादपणे दाखवता येते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्यात कौतुक खरे तर नंतर इतर काँग्रेसी पुढार्यांचे आहे नि असते,कारण त्यांनी नंतर जे मुग गिळून गप्पा बसायचे असते त्याला खरे तर नेहमी जास्त मार्क असतात.इतकी टोकाची "शिस्त"रक्तात भिनलेला गेल्या ६३ वर्षातला इतर कोणताही पक्ष दाखवा पाहू?
ReplyDeleteबाकी लेख फारच मस्त.
सुपर्ब...... आणि मार्जीन कल्पना अप्रतिम.....
ReplyDeleteप्रचंड कडक आणि चाबूक का काय म्हणतात तसा झालाय लेख. मस्त थोबाडीत मारली आहेस राजकुमाराच्या.
ReplyDeleteराईट अलाईन aflatun idea re.
ReplyDeleteआभार साधक. राहुलमियांचे तुम्ही फार मोठे 'पंखे' आसवात असा आमचा अंदाज आहे. मागे एकदा युवराजांवर लिहिलं होतं तेव्हा प्रतिक्रिया दिली होतीत. त्यानंतर थेट युवराजांच्या आजच्या लेखावर.. :) सहज लक्षात आलं म्हणून लिहिलं. गैरसमज नसावा. पुन्हा एकदा आभार. आणि युवराज धाय मोकलून रडणे हे स्वप्नातही शक्य नाही. तेवढी शरम त्यांचे ठायी नाही !!!
ReplyDeleteसौरभ, बहोत बहोत शुक्रिया :)
ReplyDeleteसंकेत, अनेक आभार्स.. सचिनशी तुलना.. मेलो.. म्हणजे चांगल्या अर्थाने :) .. अनेक आभार.. अरे आधी तर एक एक शब्द उजवीकडून डावीकडे लिहायचा विचार होता पण त्यात खुपच वेळ गेला असता आणि वाचतानाही त्रास झाला असता म्हणून मग फक्त राईट अलाईनमेंटवर भागवायचं ठरवलं. सगळ्यांना एवढं आवडलेलं बघून खूप बरं वाटतंय :)
ReplyDeleteसुहास, इतकं समजावतो आपण त्या रोम्याला. पण त्याच्या डोस्क्यात कधी अक्कल येणार आहे देव जाणे. टेन रेज़ टू इन्फिनिटी धन्स रे.. :)
ReplyDeleteसुदीप, आभार आणि ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत रहा.
ReplyDeleteबहोत शुक्रिया विनय. अहो महाराणी, युवराज आणि त्यांचे सरदार सगळे एका माळेचे मणी. एकाला झाकावं आणि एकाला काढावं ही परिस्थिती. कोण पढणार आणि पढलं तरी कोणाच्या टाळक्यात शिरणार??
ReplyDeleteआदित्य, बाप रे.. लक्ष्मण काय, सचिन काय :) हरभर्याच्या झाडाच्या अगदी माथ्याला पोचलोय मी.. कधीही पडेन :)
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार. उगाच नुसता जळजळीत भाषेत संताप व्यक्त करून काही उपयोग होत नाही. फक्त आपल्यालाच त्रास होतो. असे जरा शालजोडीतले हाणले की तेवढंचं जरा बरं वाटतं :)
अपर्णा, धन्स धन्स.. तेवढीच थोडी ठोकाठोकी :)
ReplyDeleteसिद्धार्थ, 'भ'हर !! हा हा हा हा हा हा.. वाचलो आमच्यावर अल्लातालाची कृपा नाहीये ते ;)
ReplyDeleteसिद्धार्थमियां, हुजूर-ए-आला लादेन साहेब आपल्या या पाक कामात आपल्याला नक्कीच मदद का हाथ देतील.
>> का बर भन्नाट लैई कल्पना लिहण्याची डावीकडे उजवीकडून हेरंबमियां
अरे वर संकेतला म्हटल्याप्रमाणे पूर्ण लेख हा असा लिहायचा होता.. तू लिहिला आहेस तसा. पण खूऊऊऊउप वेळ गेला असता म्हणून मग फक्त अलाईनमेंट बदलली :)
बाबा, आ भा र !!! :)
ReplyDeleteदेविदास, बहोत बहोत शुक्रिया :)
ReplyDeleteएकदम धरुन फ़ट्याक.....मस्त धुतलस....हा राहुलच नाही पुर्ण कॉंग्रेसनेच परत निवडुन आल्यापासुन आपले वेगळेच रंग दाखवायला सुरुवात केलीये...(आयला एवढी भारी पोस्ट वाचायची कशी राहुन गेली....)
ReplyDeleteतौहीन, गुस्ताखी, अंदाजे बयां, वाहियात, सर्रेआम, हिमाकत !!!! वाह कांचनसाहिबा वा.. काश आम्हालाही आपल्यासारखी उर्दू/हिंदीची कारागिरी करता आली असती तर हे खत अजून तेजतर्रार झालं असतं. :)
ReplyDelete'तेरे बिन लादेन' बघण्याची बहोत दिनांची तमन्ना आहे. किस्मत कधी साथ देते ते बघायचं.
बहोत बहोत शुक्रिया !!
हा हा सविताताई.. हे लक्षात नव्हतं आलं.. चला आता पत्राला अजून धार येईल ;)
ReplyDeleteमंगेश, अनेक आभार. तुझ्यासारख्या संघाच्या कसलेल्या कार्यकर्त्याकडून पावती मिळाली हे बघून बरं वाटलं !!
ReplyDeleteशुक्रिया विक्रममियां..
ReplyDeleteवो तो जल्दही फटनेवाला है. राहुलमियां उसीकी तय्यारीमे लागे है ;)
बहोत बहोत शुक्रिया शिवचंद्रमियां.. ये तो हर शक्सके दिल की बात है. बस हमने लिख डाली.. शुक्रिया !!
ReplyDeleteआणि हो ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..
संकेतमियां !! ज़मूरियत, तेग, अजी़म, अंजुमन, ज़ज्बा़त, अल्फ़ाज.. आप भी कांचनसाहिबासे कुछ कम नही !! :)
ReplyDeleteराहुलमियां की बचकनी हरकते दिनबदिन बढती जा राही थी. तो सोचा एक बर दिल की बात कह ही देते है उनसे..
आणि राईट अलाईनमेंटचं सुरुवातीपासूनच डोक्यात होतं. कसं सुचलं वगैरे काही कल्पना नाही :) .. अनेक धन्यवाद रे :)
mynac दादा, अनेक आभार.. टोकाची शिस्त !!! हा हा हा.. अगदी बरोबर.. मुग गिळून गप्पा बसण्याची टोकाची शिस्त खरंच वाखाणण्याजोगी आहे यांची. आणि तुझ्या राहुलच्या मतांबद्दल तर पूर्णतः सहमत. त्याला पूर्णतः माहित्ये की सत्तेत टिकून राहण्यासाठी त्याला हे सगळं करणं भागच आहे. सगळं मुद्दाम चाललंय. मागे एकदा या राहु(ल) वर लिहिताना असेच मुद्दे लिहिले होते. वाच एकदा जमलं तर. http://www.harkatnay.com/2010/02/blog-post_02.html
ReplyDeleteआनंद, खूप धन्यवाद.. राईट अलाईनमेंटच्या कल्पनेबद्दल आता मलाही माझंकौतुक वाटायला लागलंय ;)
ReplyDeleteविक्रांत :) :) .. आमची प्रेरणा आपले नेते मंडळी आणि त्यांचे चमचे वगैरे वगैरे ;) .. ते जेवढे जास्त 'परफॉर्म' करतात तेवढी आपल्यालाही जास्त संधी ;)
ReplyDeleteअरे मीही संघाचा कार्यकर्ता नाही पण म्हणून संघ आणि सिमी यात काहीच फरक नाही असलं तद्दन मुर्खपणाचं, भडकावू आणि हिरव्या टाळ्या घेणारं वाक्य फेकण्याएवढे आपण कोणीच मुर्ख नाही. आणि जे लोकं असली वाक्यं फेकतात त्यांचे उद्देश काय आणि लायकी काय हे ओळखण्याएवढे सुज्ञ आपण खचितच आहोत !! राहुलकडे गांधी हे आडनाव सोडून राजकारणात येण्याचं काय क्वालिफिकेशन आहे? अर्थात आपल्या देशात तेवढं एकमेव क्वालिफिकेशन इतर सगळ्यापेक्षा महत्वाचं आहे म्हणा !!
आभार मंदार. प्रचंड कडक, चाबूक धन्यवाद :) .. राजकुमाराची लायकीच ती आहे !!
ReplyDeleteराईट अलाईन फ्यान क्लबतर्फे आभार ;)
आभार देवेन. अरे त्यांनी घोषणा बदलून आता "कॉंग्रेसका हाथ, आम आदमीके 'गले' के साथ" अशी नवीन घोषणा दिली पाहिजे. साले कामाच्या नावाने बोंब आणि उगाच मूर्खासारखं बडबडत असतात.
ReplyDeleteहेरंबा ही पोस्ट कालच पाहिली होती.... उजवीकडून डावीकडे लिहीलेला मामला पाहिला आणि ठरवले हे घाईघाईत वाचायचे काम दिसत नाही... ईसके लिये शांतताच चाहिये... आज शांततेने पोस्ट वाचली आणि स्वत:च्याच निर्णयाचे कौतूक वाटले!!!
ReplyDeleteक्या बात है!!! सणसणीत पोस्ट आणि खणखणीत मुद्दे!!! :)
राहूलमियाँ, घराणेशाही, कॉंग्रेस , राजकारण, दलदल, घाण, लाचारी, हरामखोरी, देशद्रोह, गद्दार, मढ्याच्या टाळ्यावरचे लोणी खाण्याची वृत्ती वगैरे अनेक (समानार्थी) शब्दांवर काही म्हणजे काहीच बोलायला मला नाही रे आवडत त्यामूळे काय कमेंटावे कळेना!!! ;)
थोडक्यात ईतकेच म्हणेन हेरंबमियाँ जिंदाबाद!!!
हेरंब मिया...रच्याक लिखा है...एकदम चाबुक पोस्ट झाली आहे.
ReplyDeleteएकदम जबरदस्त !!
ReplyDeleteजबरदस्त,सुंदर चाबूक अप्रतिम ,राजकुमाराला राजकारणात स्थान पक्के करावयाचे आहे असे वाटते म्हणून असे ते बोलले आहे
ReplyDeleteगुगल भाउंनी माझी प्रतिक्रिया खावून टाकलेली दिसतेय म्हणून परत टाकतोय,
ReplyDeleteहेरंब, मस्तच उपरोधिक झाली आहे पोस्ट. मराठीत एक म्हण आहे, "बालिश बहु बायकांत बडबडला" तसे हा बालिश बहु मिडीयात बडबडला. तो तरी काय करणार म्हणा! संघाला शिव्या देण्याची कॉंग्रेसची परंपराच आहे तीच त्याला पुढे चालवायला हवी ना!
शुक्रिया तन्वीसाहिबा ;) राईट अलाईनमेंट फ्यान क्लबतर्फे अनेक आभार ;)
ReplyDeleteअग हा रावल्या असा काहीतरी मुर्खासारखा बडबडतो त्यामुळे आपोआपच खणखणीत मुद्दे मिळतात... ते मुद्दे जसेच्या तसे लिहिले की झाली पोस्ट तयार :) .. आणि तू दिलेल्या सगळ्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणजे कॉंग्रेस.. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा तरी काय करणार दुसरी.. आपलंच दुर्दैव.. असो :(
यवगेशा, एकदम ढिंच्याक आभार रे :)
ReplyDeleteधुंडिराज, अनेक आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा. !
ReplyDeleteकाका, खूप आभार.
ReplyDeleteहो ना.. स्थान तर पक्कं करायचं आहेच आणि त्यामुळेच तो तोंडाला येईल ते बडबडत फिरतो आहे !!
निरंजन, हो बहुतेक.. कारण मला प्रतिक्रिया/मेल काहीच आलं नाही. असो..
ReplyDeleteहा हा.. "बालिश बहु मिडीयात बडबडला" हे अगदी चपखल लागू होतंय रावल्याला.. खरंय.. कॉंग्रेस आयुष्यभर शिव्याच देत आली संघाला पण संघासारखं काम करावं असं काही त्यांच्या डोक्यात कधी शिरलं नाही !!
हेरंब बहोत खूब .
ReplyDeleteवो राहुल मिया भी क्या करना ? एक तो रामजन्मभूमी राम को मिल गयी और बिहार के चुनाव सर पे खडे हय !
ऐसा नय बोलेन्गा तो वोट कैसा मिलेन्गा ?
बाबा ला कुठे काय कळतय ? हि कसेट जाऊन वाजव म्हणाले कि तो वाजवणार. त्याने टायमिंग साधायचा प्रयत्न केलाय पण फेल गेला.
विनायक, अगदी बरोबर.. मियांचं प्रत्येक विधान, प्रत्येक कृती ही सगळा (उलटा) विचार करून केलेली असते !! कोर्टाने राममंदिराच्या निकालाच्या बाबतीत कॉंग्रेसला जे फटकारलं आहे त्याची भरपाई करण्याचा केविलवाणा प्रयत्न या मुर्खाने असलं काहीतरी बडबडून केला आहे आणि स्वतःच्या अकलेची अजूनच शोभा जरून घेतली आहे !!!
ReplyDeleteविनायक, ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा..
Whoa!!!!,Best take on this issue.Hats Off to you dude!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDeleteHey Anee !! Thanks a lot as always :)
ReplyDeleteलाहोल मिला कुवत...
ReplyDeleteराहुलमिया आपने पढा की नाही ये ब्लॉगवाला लोंढा क्या कह रहा है...
अच्छा अपने पाढा लेकीन आपके पास और कूच नाही है बोलणे के लिये... क्यू.. अब मुह बंद हो गया???
रोहण्णा, त्या राहुलमियांचं तोंड निवडणुका संपल्याशिवाय बंद व्हायचं नाही. माय शिकवते लेक बडबडतो झालं.. ;)
ReplyDeleteComment From RAHUL... but thankfully not Gandhi!! CHan ahe re post. Mala ajunhi blog ha prakaar samjat nahi buva, pan adhun madhun (1-2 mahinyatun ekda) tuze blogs avarjun vachto. I really liked this one :). Keep it up.
ReplyDeleteधन्स धन्स राहुल.. नॉट गांधी ;)
ReplyDeleteआवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून आभार रे.. :)
राईट अलाईनमेंट ची आईडिया आवडली... मस्त मस्त बोलून कंटाळा आलं...सो काही बोलणार नाही
ReplyDeleteहाहाहा.. धन्यवाद मंदार..
ReplyDelete