तिने हातातली पिशवी टेबलवर ठेवली. कडेला ठेवलेल्या टिश्यु पेपरच्या रोल मधून मोठा कागद फाडून घेऊन त्याने टेबल खसाखसा घासून पुसून स्वच्छ केलं. उकळत्या पाण्याने चमचे स्वच्छ धुतले. फ्रिज उघडलं. आतून तीन-चार मोठ्ठ्या पिशव्या काढल्या आणि टेबलवर ठेवल्या. एक पिशवी उघडून त्यातून लेटस (Lettuce) बाहेर काढून तो स्वच्छ धुतला आणि हळूहळू एकेक पान काढत उलगडत तो सोलला. त्याचे छान छोटे छोटे तुकडे केले आणि एका मोठ्या बोलमध्ये ठेवले. दुसर्या पिशवीतून ग्रेप टोमॅटो (छोटे टोमॅटो) काढले आणि ते डिशमध्ये ठेवले. ती डिश सरळ नळाखाली धरली आणि ग्रेप टोमॅटो व्यवस्थित धुतले. छोट्या चाकूने टोमॅटोचे छोटे तुकडे केले आणि तेही बोलमध्ये टाकले. तिसर्या पिशवीतून दोन मोठ्ठ्या काकड्या काढल्या, धुतल्या आणि हळूहळू अगदी काळजीपूर्वक पद्धतशीरपणे एकीची सालं काढली. त्यानंतर सालं काढलेल्या आणि न काढलेल्या अशा दोन्ही काकड्यांचे छोटे छोटे काप केले आणि तेही बोलमध्ये भरले. तिसर्या पिशवीतून अजून एक छोटी पिशवी काढली. त्या पिशवीतून थोडे मक्याचे दाणे बाहेर काढले. धुवून त्यांची रवानगीही बोलमध्ये करण्यात आली. त्यानंतर थोडा पालक घेऊन त्याची पानं तोडून, धुवून तो आधीच्या गोष्टींबरोबर मिक्स केला गेला. त्यानंतर पहिल्या पिशवीतून 'सेलेरी' नामक एक पालेभाजी (जिचं नाव सेलेरी आहे हे आत्ता मला गुगलमहाराजांच्या कृपेने समजलं) काढली. तिची पानं आणि देठ स्वच्छ धुवून, देठाचे तुकडे करून ते दोन्ही बोलच्या मिश्रणात मिक्स केले. त्यानंतर पुन्हा फ्रिज उघडून अजून एक पिशवी बाहेर काढली. त्यातून ब्रोकोली (आपल्या फ्लॉवरची सावत्र बहिण) आणि छोटी गाजरं (बेबी कॅरट्स) बाहेर काढली आणि धुवून आणि कापून झाल्यावर त्यांचीही रवानगी बोलमध्ये करण्यात आली. त्यानंतर कुठलीतरी एक पिशवी (कितवी ते आठवत नाही) उघडली जाऊन त्यातून तीन-चार छोट्या बाटल्या बाहेर काढल्या. त्यातली 'इटालियन ड्रेसिंग' नामक बाटली उघडून त्यातले काही थेंब त्या बोलमधल्या मिश्रणावर उडवले. 'व्हिनेगर', 'फ्रेश लेमन ज्यूस', 'ऑलिव्ह ऑईल' असं काय काय लिहिलेल्या अनेक बाटल्याही त्या पिशवीतून बाहेर पडल्या आणि थेंबाथेंबांचं दान बोलमधल्या मिश्रणाला देत्या झाल्या. त्यानंतर तिने ते मिश्रण सगळं नीट मिक्स झालं आहे अशी खात्री होईपर्यंत चांगलं ढवळलं.
----
मी डबा उघडला, मायक्रोवेव्ह उघडला, त्याच्यावर एक मिनिट सेट करून, बाजूच्या वॉटर कुलर मधून थंड पाण्याची बाटली भरून घेतली. एका मिनिटानंतर मायक्रोवेव्ह उघडून डबा बाहेर काढला. अकराव्या मिनिटाला डबा बंद झाला होता. बाराव्या मिनिटाला पाणी पिऊन कॅफेटेरियामधून बाहेर पडून अर्ध्या मिनिटात मी जणु मध्ये काहीही न घडल्याप्रमाणे पुन्हा माझ्या डेस्कवर होतो.
----
ही कंपनी जॉईन करताना लंच टाईम एक तास कंपल्सरी आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं.... आज ते स-'लाड' बघून त्या नियमामागची अपरिहार्यता कळली ;)
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
कंपोस्ट :)
ReplyDeleteहा हा.. कंपोस्ट नाही रे... पण यात विशेष काही लिहिण्यासारखं नव्हतंच.. अरे रोज मी आमच्या कॅफेमध्ये बघतो.. या बायका अर्धा अर्धा तास ते सलाड बनवण्यासाठी वाया घालवतात.. तोवर आमचं अख्खं जेवण होऊन आम्ही कॅफे मधून बाहेर पडलेलो असतो !
ReplyDeleteएवढं सगळं करण्यापेक्षा घरूनच का नाही बनवून आणत सलाड? उगीच वेळ घालवतात!
ReplyDeleteसंकेत, अरे लंच टाईम एक तास कंपल्सरी आहे ;)
ReplyDeleteमग तू करतोस काय उरलेला अर्धा तास? डुलकी काढायची एक चांगली... :-)
ReplyDeleteअरे तेव्हाच तर मी ब्लॉग लिहितो ;)
ReplyDeleteअर्ध्या तासात ब्लॉग? वा! शारदादेवी प्रसन्न आहे तुझ्यावर. :-)
ReplyDeleteअरे ते या अशा छोट्या पोस्ट्स साठी. ती मागची ९/११ वाली पोस्ट तर मी जवळपास २ आठवडे लिहीत होतो. :)
ReplyDeleteSalad - अमेरिकी जेवणातला मला प्रचंड आवडणारा एकमेव पदार्थ :)
ReplyDeleteडायट करणे किंवा सलाड खाऊन रहाणं म्हणजे मॅक डी / पिझ्झा /जंक फुडखाऊन झालेलं शरीराचं नुकसान भरून काढण्याचा एक केविलवाणा प्रयत्न वाटतो मला तरी..
ReplyDeleteएक तास लंच स्वतःच्या जेवण्यासाठी दिला आहे.. उगाच दुसर्याच्या जेवणात(?) नाक(?) खुपसू नये.. पुण्यात असता तर (स)लाडासहीत भरवलं असतं ;)
ReplyDeleteः)ः)ः)ः)
च्यामारी एक तास कंपल्सरी.. माझा रूममेट तर तासाभरात जेवण बनवून गट्टमपण करतो...
ReplyDeleteअरे वा लंच टाईम मध्ये जेवणाबरोबर अजून हि बरच काहीबाही करत असतोस म्हणायचं तू ...... वैगेरे वैगेरे....
ReplyDeleteबाकी आमचा लंच वाला (स)लाडा मध्ये फक्त काकडी आणि टोमाटो च देतो.आज जावून त्याला बाकीच्या बद्दल विचारतोच.... :)
>>>>>डायट करणे किंवा सलाड खाऊन रहाणं म्हणजे मॅक डी / पिझ्झा /जंक फुडखाऊन झालेलं शरीराचं नुकसान भरून काढण्याचा एक केविलवाणा प्रयत्न वाटतो मला तरी.. +१
ReplyDeleteमहेंद्रजींशी पुर्णपणे सहमत.....
बाकि खरं सांगू ढीग ड्रेसिंगं घाला, कुठले ऑईलं घाला की व्हिनेगर घाला, हव्या तश्या महागड्या (किंवा स्वस्त) भाज्या घाला ते खाल्लं की वाटतं आपली काकडीची , टोमॅटोची साधीशी कोशिंबीर आणि रोजच्या जेवणातली पानातली डावी बाजू जिंदाबाद!!! स्प्राऊट्स हा ही एक जिव्हाळ्याचा विषय असतो या सलाडवाल्यांचा..... मोड आलेले कडधान्य म्हणजे किती डाऊन मार्केट नई असं माझी एक मैत्रीण म्हणाली होती, तिला स्प्राऊट्स लय आवडायचे पन!!;)
असो, पोस्टच्या आकाराचे पण डाएट झालेय ते सलाड खाऊन :) पण चव उत्तम!!
खुपच लाडात बनवतात रे तुमच्याकडे सलाड...आमच्याइथे पटापट कापाकापी होते...बरोबर आहे मग एक तास कंपल्सरी लंच...मजा आहे रे तुमची...
ReplyDelete@ आप,भारी... :)
लंच टाईमला एक तास म्हणजे कमी झाला. मला हळूहळू जेवायची सवय आहे. म्हणजे लग्नात मी पहिल्या पंगतीला बसलो आणि त्यानंतरच्या पंगतीला उठलो असंही झालेलं आहे माझ्या बाबतीत!
ReplyDeleteमाझा अगदी आवडता प्रकार आहे सॅलड म्हणजे ... :)
ReplyDeleteजपानमध्ये एका कस्टमरकडे असा तासाभराचा लंचटाईम असायचा, तर तिथली मंडळी जेवण झालं की चक्क डेस्कवर डोकं ठेवून झोप काढायची लंच अवर संपेपर्यंत!
आपण या वेळी खादाडी ब्लॉगपोस्टचा खो खो खेळायचा की काय अशी शंका मला या पोस्टच्या नावावरून आली....पण वाचल्यावर ही तशीही नाही म्हणून जरा हायस वाटले..
ReplyDeleteकुठलं ऑफिस आहे तुझ लोक घरी करतात तसं सलाड बनवत बसतात?? टेपा लावू नकोस....फूड networkchi रेसिपी पाहत नाव्तास ना???
रच्याक, नाव एकदम लाडिक सुचतात हा तुला...
आम्हाला बी एक तासाची जेवणाची सुट्टी असते पण आमी गप गुमान आप आपल जेवण करुन (इकड तिकड लक्ष न देता ...एक घास ३२ वेळा चावायचा)थोपु वर शेती करत बसतो नाही तर हाफ़िसच्या समोर मोठ्ठी बाग आहे तिथ जाउन टगेगिरी करतो. .(याच त्याच सलाड पाहण्यापेक्षा हे बरं.. ;) )
ReplyDeleteशेवटच वाक्य ह.घे.
चांगले लाड आहेत रे! एक तास सुटी? आम्ही आपलं वीस मिनिटात कसेबसे घास पोटात ढकलून (गिळून) पळायचो. बाकी सलाडच्या बाबतीत मी महेंद्रदादांशी सहमत. आधी लाड म्हणून खा खा खायचं नी मग उगीच आपलं उपरती म्हणुन सलाड खायचं.
ReplyDeleteसलाडसाठी एवढे सगळे जिन्नस बायका कॅरी करतात तिकडे? कमालै ब्वॉ!
काय सही सलाड बनवले त्या ऑफिसमधल्या मुलीने, वाचुनच एकदम Exotic वाटले.
ReplyDeleteस’लाड’(कं-पोस्ट) एकदम मस्त!
एकदम झकास.......हेरंब दादा .......
ReplyDeleteबाकी आनंद जी ,पुण्यावर टिपणी केलीत......
मी असते त्या मुलीच्या/बाईच्या जागी तर :"हे पुणेरी पद्धतीच सलाड नाही !!साधंच आहे !!असा उत्तर दिल असत !!!:):)
@ महेंद्र दादा,एकदम बरोबर.....आणि त्यात आमच्या पुण्यातली हवा इतकी चांगली आहे की बरेचसे लोक साध वरण-भात-भाजी-पोळी खून पण भोपळा होतात....आणि परत मिसळ,वडा-पाव,बर्गर ,पिझ्झा ,भेळ आदी विशेष गोष्टीनी तर मग विचारायला नको......
अरे पहिला पॅरा वाचताना मला वाटलं तूच हल्ली हे (स)लाड स्वाहा करायला लागलास. आठवड्यातून एकदा ठीक आहे पण रोज? आणि तुझ्या डब्यात काय होतं जे तू गरम करून खाल्लस? ते कोण लिहिणारं?
ReplyDeleteखरच सॉलिड लाड आहेत..एक तास.
ReplyDeleteमला जॉब मिळेल का रे तिथे ;)
आवरा लाड आहेत...
ReplyDeleteपण मला सलाड लय लय लय आवडतं!!!! :)
सौरभ, Salad - अमेरिकी जेवणातला मी खाऊ शकेन असा एकमेव पदार्थ :) .. पण तरीही ते करण्यासाठी अर्धा पाऊण तास वाया घालवायचा म्हणजे जरा अति होतं ;)
ReplyDeleteहा हा काका.. अगदी सहमत. हे म्हणजे "(आधी) केले ते (आता) भरावे" असं काहीसं आहे :P
ReplyDeleteआनंदा, तरी सांगत होतो पुण्याच्या चकरा कमी कर जरा.. आता भोग आपल्या कर्माचं फळ (सलाड) ;)
ReplyDeleteहा हा भारत. तेच ना.. मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलं तेव्हा असाच सैरभैर झालो होतो.
ReplyDeleteहो रे सचिन.. सलाडचं निरीक्षण वगैरे. ;) .. त्यामुळे तर पोस्ट लिहिता आली. नाहीतर आपलं डबा उघडला, पोळीभाजी खाल्ली असं काहीतरी लिहावं लागलं असतं. ;)
ReplyDeleteकाय? फक्त काकडी आणि टोमॅटोच??? जा जाऊन धर त्याला आधी. !!
तन्वे,
ReplyDeleteहा हा .. मी ही काकांशी पूर्ण सहमत.. म्हणूनच पोस्टच्या आकारात डायट केलं असलं तरी प्रत्यक्ष खाण्यात हे असलं करण्याचं धाडस फार क्वचित केलंय :) ...
खरंय ग.. कोशिंबीर ती कोशिंबीर.. कुठल्याही महागड्या भाज्या, तेलांची सर त्यांना नाही.. डावी बाजू जिंदाबाद !!
बाकी तुझ्या 'हुश्शार' मैत्रिणीचा मी एकदम पंखा झालो आहे ;)
देवेन, अरे या असल्या लोकांमुळेच त्यांना एक तासाचा लंच कंपल्सरी ठेवावा लागला असेल.. आमची कसली मजा. मी तर १५ मिनिटांत जेवून येतो :)
ReplyDelete'आप' पुणेरी पाट्यांचं 'हैद्राबादी' दुकान काढणार आहे लवकरच ;)
एक तास कमी झाला?? संकेतशेठ, आपण महान आहात ;) .. अर्थात लग्नाच्या पंगतीत जेवताना मीही तासतासभर लावला आहे ;)
ReplyDeleteगौरी, मलाही आवडतं सलाड. पण जेवण म्हणून नाय. अधेमध्ये ठीक आहे. टाईमपास म्हणून. आणि एवढं अर्धा तास मोडणारं प्रकरण तर नकोच :)
ReplyDeleteडेस्कवर झोप...?? मेरा जपान महान ;)
अपर्णा, खादाडी ब्लॉगपोस्टचा खोखो?? आयडिया चांगली आहे.. पुढचा भाग तू टाक ;)
ReplyDeleteटेपा कसल्या आयची आन खरं बोलतोय (लिहितोय).. आणि मी आणि फूड नेटवर्क?? (उपाशी राहून) प्राण जायची वेळ आली तरी शक्य नाही :P
अग आज त्या बयेला सलाड बनवताना बघून नाव आधी सुचलं आणि मग पोस्ट सुचली ;)
यवगेशा, अरे पोट भरण्याच्या दृष्टीने तुमची थोपुवरची शेती जेवढी उपयुक्त तेवढीच उपयुक्तता या सलाडचीही. काही फरक नाही ;)
ReplyDeleteयाचं त्याचं नाही रे.. हिचं तिचं.. पोरांना मी सलाडवर जगताना अजूनतरी बघितलेलं नाही :)
कांचन, अग हो ना. एक तास आहे म्हणून पाऊण तास आपलं ते सलाड बनवण्यातच घालवतात या बायका. अग आमच्या हापिसात सलाडवर जगणार्या प्रत्येकीकडे चांगल्या २-३ पिशव्या असतात आणि उरलेले जिन्नस (सॉस, ऑईल वगैरे) फ्रिजमध्ये.
ReplyDeleteबाकी मलाही फारतर १५ मिनिटं लागतात जेवायला.
उपरती म्हणून सलाड !!! हा हा लोल ..
सोनाली, एक्झॉटिक? तू पण सलाडटीमची मेंबर आहेस वाटतं ;)
ReplyDeleteस'लाड' कं-पोस्टीसाठी ध :)
स्वप्ना, धन्स..
ReplyDeleteआनंदराव हैद्राबादींना पुणेरी स्वप्नाताईंचं जोरदार उत्तर :P
बाकी तू म्हणतेस त्या न्यायाने फिट अँड फाईन राहण्यासाठी पुणेकर फक्त हवेवर जगले तरी चालण्यासारखं आहे तर ;) (ह. घे.)
सिद्धार्थ, मी?? नाही रे ब्वा.. हां.. दोन जेवणाच्या मध्ये ठीक आहे.. चालेल ;) .. अरे खरंच.. या बायका रोज हेच खातात लंच म्हणून.. (बिचार्या).. !!
ReplyDeleteओह माझ्या डब्यात? माझ्या डब्यातल्या मुगाच्या उसळी बद्दल पाचव्या खादाडी प्रयोगात लिहीन म्हणतो ;)
सुहास, खरंच यार.. लय लाड आहेत !!
ReplyDeleteअरे मिळेल की.. आरामात मिळेल. नाहीतर एक कर.. तू इंटरव्ह्यूमध्ये 'सॅलरी एक्स्पेक्टेशन' ऐवजी 'लंच अवर एक्स्पेक्टेशन' सांगत जा.. हेहे :P
बाबा, हे लाड आवरायच्या पलीकडे गेलेले आहेत ;)
ReplyDeleteसलाड आवडतं? जेवण म्हणून??
:)
ReplyDeleteहे सलाड प्रकरण मला ऐकून आणि पाहून च छान वाटते.... पण कोणी इतके लाडाने सलाड बनवणार असेल तर बघयालाही झेपणार नाही ते.... :D :P
ReplyDeleteअरे ब्रेकफास्टला वडापाव, समोसा चापणारी मी आणि सलाडटीमची मेंबर?
ReplyDeleteनवर्याने चुकुन जरी वाचले तरी खो खो हसत सुटेल नुसता.
:-)
ReplyDeleteAre dada kay motha popat zala maza, mala vatal sa'lad mhanaje tu kahitari aaditeyavar lihit aahes. tyane table pusale mhanaje mala vatal ki aaditeyane tissue paper gheun khelayala survat keli. ha ha ha jam hasale mi pudhach vachun.
ReplyDeleteरेसिपी चांगली आहे सलाड बाबतीत व कहाणी चागली वाटली
ReplyDeleteमाऊ :)
ReplyDeleteहेहे मैथिली... अग आणि एवढं लाडाने बनवलेलं सलाड आपल्यासाठी नसतंच. हे सलाड म्हणजे स्व-लाड आहेत ;)
ReplyDeleteहा हा सोनाली.. मला जरा शंका आली होतीच.. पण म्हटलं पार्टी बदललीस की काय ;)
ReplyDeleteसविताताई :)
ReplyDeleteहा हा हेमाली.. अग 'त्याने' कुठे? 'तिने' लिहिलंय मी.. पण या टेबल/जमीन पुसण्याच्या प्रकारावर आदितेयवरची एक पोस्ट ड्यू आहेच !!
ReplyDeleteधन्यवाद काका.
ReplyDeleteसही!!! आवडले आपल्याला ’स’लाड !! अन्ना(ना)वर प्रेम करावं रे!!! त्यांना कळतं हे !! सेलेरीच्या आठवणी परत जाग्या केल्याबद्दल धन्स !!
ReplyDeleteसगळे संकेत आरामात जेवतात काय ?? मी पण लहानपणी पहिल्या पंगतीत बसायचो आणि दुसर्या पंगतीत उठायचो.आता मुद्दामच कमी जेवतो.. आतासुद्धा मी जेवायला कमीतकमी अर्धा तास घेतोच(घाई केली तर)..दुर्दैवाने आमच्या कंपनीत अर्ध्या तासाचा लंच टाईम आहे. १ तासाचा असता तर चागलं झालं असतं
@ संकेत,
ReplyDeleteसेम पिंच. आता मीही कमी जेवतो. कारण मी जाडा होत चाललो आहे असं लोकांचं (फक्त लोकांचंच! माझं नाहे. लोक जळतात माझ्यावर) मत आहे. आणि मलाही जेवायला अर्धा तास तर लागतोच. भारतात असताना माझे मित्र म्हणायचे, ’मी अर्ध्या तासाच्या चार मालिका एकत्र पाहिल्यावरच जेवून उठतो’.. पण ते केवळ आकसाने. :-)
@ संकेत(आपटे,[हो आपटेच!! मी स्वत:लाच प्रतिक्रिया कशाला देऊ?? :-D]):-
ReplyDeleteमी जाडा होत चाललोय असं माझं आणि लोकांचंपण मत आहे.. पण मला अजून जाडं व्हायचंय.(लोग जलें तो जलें :-D)घरी जेवतांना तर मी अजूनही अर्ध्या तासाच्या २ मालिका पाहूनच उठतो.. :-)
मेसमधला काका ’लवकर उठ रे’ म्हणून रोजच ओरडायचा कॉलेजच्या दिवसांत. :-)
'अना'वर प्रेम !! हा हा .. अना, मेरे (स)लाड को ना तुम झुठा समझो जाना ;) .. तुला इतकं आवडतं सेलेरी.. सहीये..
ReplyDelete>> हो आपटेच!! मी स्वत:लाच प्रतिक्रिया कशाला देऊ??
लोळालोळी !! :D
संकेत, (मुद्दामच कुठला ते लिहीत नाहीये.. का ते कळेलच ;) ) .. वेगवेगळया नावांचे जुळे भाऊ बिछडलेले (पिक्चरात) पहिले होते पण एकाच नावाचे दोन वेगवेगळे भाऊ पहिल्यांदाच पाहायला मिळाले ब्लॉगच्या कृपेने ;) ..
हो ना. पण आम्ही एकाच वेळी हरवलो नाही. आधी मी हरवलो. म्हणून माझी आठवण म्हणून त्याचं नाव संकेत ठेवलं गेलं. आणि काही दिवसांनी तोही हरवला! आणि नंतर आमची कधी भेट झाली नाही कारण दोघांमधलं अंतर खूप होतं ना. (मी मुंबईचा आणि तो नागपूरचा) पण आता तुझ्या ब्लॉगवर खूण पटली. संकेत, (हा मी नाही हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच!) कधी रे येत आहेस आपल्या दादाला भेटायला? ;-)
ReplyDeleteहेहेहे... (आपटे नसलेल्या) संकेता, दे रे उत्तर ;)
ReplyDeleteआपटे असलेल्या संकेताने आपटे नसलेल्या संकेताच्या मनातली गोष्ट लिहीलीय. अगदी अगदी हेच मी लिहणार होतो... लहानपणी एका जत्रेला सहकुटुंब गेल्याची आठवण आहे मला. पण मी हरवलो नाही, सुखरूप घरी आलो(आणि योग्य त्या माणसाचा[ज्याला बाप या नावाने ओळखले जाते]हात पकडूनच !!) आपटेंच्या संकेताबद्दलच मला आता शंका आहे.हाच हरवलेला असणार !!!
ReplyDeleteहा हा हा.. आता (आपटे असलेल्या) संकेतची उत्तर देण्याची पाळी ;)
ReplyDeleteआरं मंग म्या त्येच तर म्हनलं. मी हरवलो म्हणून याचं नाव संकेत ठेवलं गेलं. (माझ्या स्मृतिप्रीत्यर्थ!) आणि मी मुंबईला आलो. तो नागपूरलाच राहिला. पण आता खूण पटली आहे. तेव्हा बाळ संकेत, (इथे माझ्यापेक्षा लहान म्हणून ‘बाळ’ आणि धाकटा भाऊ सापडला म्हणून प्रेमाने ‘बाळ’ असा दुहेरी अर्थ आहे...) ये रे आता लवकर आपल्या दादाला भेटायला...
ReplyDeleteहा हा.. तुम्ही दोघे फुलटू लागलायत ;)
ReplyDeleteतू सलाडच बघत होतास ना? ;)
ReplyDeleteमीनल, वर्मावर बोट ठेवणे का कायसंसं म्हणतात ते केलंस तू :P
ReplyDeleteआमच्या हॉटेलात तीन कोर्स मेन्यू केफेटेरीयात ( रेस्तोरेंत च्या बुफेतून उरलेले अन्न तसेच गरम अवस्थेत आमच्या स्टाफ साठी खाली आणले जाते. आता ताज च्या आलिशान रेस्तोरोंत ची सर नाहि.पण ठीक आहे )
ReplyDeleteअर्धा तासाच्या ब्रेक मध्ये फन्ना करणारे महाभाग आहेत.
मला मात्र सलाड प्रकरण असो नाहीतर वराह भक्षण भक्षण
भात खाल्याशिवाय पोट भरले हि भावना येत नाहि.
मग उगाच कॉफी आणि केक्स डेझर्ट च्या रुपात खाऊन वेळ काढायचा.
तुझ्यासाठी तर थ्री आणि फोर कोर्स मील्स हा प्रकार रोजचाच असेल :) .. माझं म्हणजे चार पोळ्या खाल्ल्या की झालं जेवण. भात ऑप्शनल आहे :)
Delete