Sunday, May 9, 2010

आजचा उचक्या-भूकंप

प्रिय महेंद्र काका, रोहन, कांचन, तसंच त्यांना भरपूर मदत केलेल्या आणि मेळाव्याला हजर असणार्‍या माझ्या प्रिय ब्लॉगु-ब्लगिनींनो,

नुकतेच हाती आलेल्या वृत्तानुसार दासावा येथे झालेल्या ब्लॉगर्स-उचक्यांरूपी भूकंपाचे केंद्र अमेरीकेतील नवीन जर्सी येथे आहे. या घटनेचा सखोल मागोवा घेण्याचे काम चालू आहेच तरीही प्राथमिक शक्यतेनुसार मेळावा चालू असेपर्यंत आणि त्यानंतरही अनेक तास/दिवस हा उचक्या-भूकंप चालू रहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या उचक्या-भूकंपाची तीव्रता आणि वारंवारता कमी करण्याचा एकमेव प्रभावी उपाय म्हणजे भूकंपाची (मेळाव्याची) छायाचित्रे, चलतचित्रे, अहवाल ताबडतोबीने ब्लॉग्सवर टाकण्याचे करावे. सध्या तरी या उचक्या-भूकंपाची तीव्रता कमी करण्याचा हा एकमेव उपाय तज्ज्ञांस ज्ञात आहे. असो.

आता जरा घट्ट टंकतो. घट्ट म्हणजे पांचटपणा कमी करून या अर्थी. :-)


अतीव इच्छा असूनही मेळाव्याला प्रत्यक्ष हजर राहता आलं नाही तरी कुठल्यातरी मार्गे मेळाव्याशी जोडून घेण्याचा, तुम्हा सगळ्यांशी एकतर्फी का होईना संवाद साधण्याचा हा अल्पस्वल्प प्रयत्न !! बाकी, भरपूर मजा करा, चिक्कार गप्पा मारा, भरभरून अनुभव सांगा आणि हे सगळं अगदी आठवणीने ब्लॉगवर टाकायला विसरू नका. फोटो टाका, व्हिडिओ टाका, पोस्ट्स टाका. तुम्हाला दिसलेला, रुचलेला, भावलेला, पटलेला हा मेळावा प्रत्येकाच्या नजरेतून बघायला मला आणि अर्थातच इच्छा असूनही इथे हजर राहू न शकलेल्या प्रत्येकालाच आवडेल. प्रत्येक ब्लॉगरच्या मेळाव्याच्या संदर्भातल्या पोस्टला मी आवर्जून प्रतिक्रिया देईन नक्की :-)

असो.. खूप बडबड झाली. मी तनाने इथे असलो तरी मनाने तुमच्या सगळ्यांच्या बरोबरच आहे. अजून काय लिहू !!! पुन्हा एकदा शुभेच्छा आणि सगळ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. !!

31 comments:

  1. हेरंब

    मेळाव्याला हजर राहू न शकलेल्या सर्वांच्याच भावना व्यक्त केल्या आहेस.

    विवेक.

    ReplyDelete
  2. Are aattach just aale tithun...khoop majja aali..barr vatale sagalyana bhetun...And I really missd YOU alot....really really...! post taken lavakarach......!!!

    ReplyDelete
  3. हेरंब

    मेळाव्याला हजर राहू न शकलेल्या सर्वांच्याच भावना व्यक्त केल्या आहेस.

    +1

    ReplyDelete
  4. >>मी तनाने इथे असलो तरी मनाने तुमच्या सगळ्यांच्या बरोबरच आहे.

    100% सहमत!

    ReplyDelete
  5. विवेक, खरंच सगळ्यांच्या अशाच भावना असणार. नक्कीच !

    ReplyDelete
  6. वा मैथिली, धम्माल.. सहीच.. आणि आर्यन नंतर यंगेस्ट ब्लॉगर तूच असतील ना ;-) ..

    हो ग मी ही हवा होतो तिकडे.. पार नाविलाज्य की क्या इलाज्य.. असो

    भरपूर फोटो टाक आणि एकदम छान मस्त मोठ्ठी पोस्ट टाक.

    ReplyDelete
  7. तन्वी, तुझीही अवस्था काही वेगळी नसणार. जे जे हजर राहू शकले नाहीत त्या प्रत्येकालाच अशीच हुरहूर लागून राहिली असणार.. असो आता आपण फोटो आणि पोस्ट्सची वाट बघत रहायचं.

    ReplyDelete
  8. विद्याधर, तुझा मेळावा तर थोडक्यात हुकला ना :( .. असो आपण सगळे गैरहजर लोक दुसर्‍या मेळाव्यात नक्की भेटू !! :)

    ReplyDelete
  9. हेरंब, >>मी तनाने इथे असलो तरी मनाने तुमच्या सगळ्यांच्या बरोबरच आहे. +१ फोनवर बोलले पण प्रत्यक्ष तिथे हजर राहता आले नाही ... फार फार हुरहूर लागली. आता लवकर फोटो, चित्रफिती व पोस्टस येतील... वाट पाहतेयं. यस्स्स.. आपण सगळे दुस~या मेळाव्यात तरी नक्की भेटूच. :)

    ReplyDelete
  10. खरेच मस्त लिहिले आहेस ... !
    पुढच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा प्रयत्न कर ! :)

    ReplyDelete
  11. आर्यनसकट सगळ्यांनी खुप मजा केली. तू, श्रीताई, तन्वी सगळ्यांनाच खुप मिस केले. अपर्णा लकीली इकडे होती त्यामुळे भेट झाली. खुप बोललो, जाम हसलो. एकुण हा मेळावा एकदम मस्त झाला.
    सोनाली केळकर

    ReplyDelete
  12. पुढच्या मेळाव्याला जर तू आला नाहीस तर गाठ माझ्याशी आहे..समजल?? मला भेटायाच आहे तुला, काही कर :)
    मिस्ड यू ऑल :(:(:(

    ReplyDelete
  13. mi suddha khup miss kela event. Hajar raahnyachi iccha hoti pan nahi jamal:( lawkar yewoo det photo aani iti-wrutant.

    ReplyDelete
  14. तुम्ही थोडं मिस केलं आणि आम्ही तुम्हाला खूप मिस केले... :) मजा आली... आता पुढच्या वेळी जमवा राव...!!!

    ReplyDelete
  15. मेळावा एकंदरीत छान झाला असा वृतांत आहे
    असो पुढच्या वेळी आपण असूच :)

    ReplyDelete
  16. अरे आता तु सुहास आणि काकांच्या ब्लागवर वाचलस असशील आम्ही काय काय मजा केली ती.

    अरे एकदम मस्त झाला आपला कार्यक्रम.
    काचंन ताई ने अगदी अविश्रांत मेहनत घेतली होती बघ.
    तु असतास तर तुला पाहयला मिळालच असते.

    बाकी सर्वाच्या ओळखी झाल्या बघ.कालपर्यत आपण फक्त त्याचा ब्लाग वाचुन आपण त्याना ओळखत होतो त्याची काल प्रत्यक्ष ओळख झाली.एकदम मस्त वाटल.
    आपण आता सर्व एकाच कुटुबातलो आहोत अस वाटल सगळ्याना भेटुन.

    बाकी तुम्हाला खरच आम्ही खुप मिस केल.तुम्ही असता अजुन जास्त मजा आली असती.

    आता जुलै मध्ये सेनापती ट्रेकीगच आयोजन करत आहेत तेव्हा त्यानुसार आता तुझ आयोजन कर म्हणजे पुन्हा आपण सगळे एकत्र य़ेऊ.

    (मी जरा कामात असल्यामूळे तुझ्याशी फोनवर बोलता नाही आल.)

    ReplyDelete
  17. हो ना श्रीताई.. फोनवर बोलून कसलं समाधान होतंय :( .. पण प्रत्यक्ष हजर राहण्याच्या दुधाची तहान या फोनच्या ताकाने भागवायची इतकंच !!

    खरंच सगळ्यांच्या पोस्ट्स आणि फोटोंची वाट बघतोय.

    आणि यस्स.. पुढच्या मेळाव्यात आपण सगळे भेटू हे तर नक्कीच.
    There is always a 'next time' !! :)

    ReplyDelete
  18. धन्स निनाद. हो पुढच्या वेळी काहीही करून येणारच !!

    ReplyDelete
  19. सही ग.. मी जाआआआम मिस करत होतो. जाम हुरहूर लागली होती (आमच्या) काल सकाळी..

    >> खुप बोललो, जाम हसलो.
    जळवा जळवा :(

    हो आर्यनचि मजा वाचली ब्लॉगवर. सगळ्यात छोट्या ब्लॉगर ला सगळ्यात मोठ्ठी कॅडबरी :) .. मजा आहे बाबा .

    ReplyDelete
  20. अरे नक्की सुहास. काही झालं तरी येणार पुढच्या मेळाव्याला. कधी आहे काही ठरलंय का?

    अरे तुझ्याशीच नाही तर माझी स्वतःशीही गाठ आहे जर का पुढच्या मेळाव्याला आलो नाही तर :)

    मी पण जाम मिसलो रे सगळ्यांना :(

    ReplyDelete
  21. खरंय सोनाल. जे जाऊ शकले नाहीत त्या प्रत्येकाला किती हुरहूर लागली असेल याची कल्पना आहे मला.. :(

    सुहास, देवेंद्र, रोहन, देवकाका, निनाद, श्रेयाताई यांच्या ब्लॉग्सवर आहेत वृत्तांत आणि फोटोज. अजूनही बरेच येतील २-३ दिवसात :)

    ReplyDelete
  22. रोहणा, अरे एवढ्या सगळ्या आवडत्या लोकांना एकावेळी भेटण्याची संधी दवडली आम्ही. आम्ही खूऊऊऊउप मिस केलं उलट. पुढच्या वेळी नक्की.. हुकाने नाहीतर क्रुकाने !! ;-)

    ReplyDelete
  23. हो विक्रम. जाम धम्माल केलीये लोकांनी. पुढचं वेळी नक्की भेटू..!!

    ReplyDelete
  24. हो सचिन. सगळे ब्लॉग्स वाचले. आणि काय काय मिस केलं याची (भलीमोठ्ठी) यादी केली पुन्हा पुन्हा..

    खरंच कांचनने खुपच मेहनत घेतली. hats off..

    आधी ब्लॉग्स मग बझ आणि आता प्रत्यक्ष भेटी. सहीये यार. काय हवं अजून !!

    पुढच्या मेळाव्याला/ट्रेकला नक्की येणार. अगदी १००%..

    हो रे... नेमकं आपलं बोलणं नाही झालं फोनवर :( .. असो.. next time..

    ReplyDelete
  25. हेरंब तू असतास तर छान वाटले असते.

    ReplyDelete
  26. खरंय रविंद्रकाका.. मी पण खूप मिस केलं सगळ्यांना :( .. पुढच्या वेळी नक्की भेटू..

    ReplyDelete
  27. हेरंब मिस केल तुला आणि इतर पब्लिकलापण. मेळाव्यात तुम्ही हवा होतात..

    - भारत मुंबईकर (पिंगू)

    ReplyDelete
  28. आभार भारत (पिंगू).. मी पण जाम मिस केलं रे सगळ्यांना :( .. पुढच्या मेळाव्याला नक्की भेटूच आपण.

    आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा नेहमी !!

    ReplyDelete
  29. सुहासच्या प्रतिक्रियेला एकदम अनुमोदन... गाठ आमच्याशी आहे

    ReplyDelete
  30. आनंदा, बास रे. निरगाठी झाल्या आता :) .. पुढच्या मेळाव्याला काही झालं तरी आपण भेटतोय हे नक्की !!

    ReplyDelete
  31. आभार सुभाषजी.. प्रतिक्रियेबद्दल आभार.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...