Friday, May 7, 2010

(((((...))))) ( किंवा कं(स) )

१.
हल्ली (तसं म्हटलं तर ब्लॉग सुरु केल्यापासून असं नाही, आधीपासूनच) मला (इतरांबद्दल बोलण्याचं आपल्याला काय प्रयोजन?) असं (तसं, वगैरे वगैरे) जाणवायला (आम्हालाही जाणवतात गोष्टी. जाणीवा जागृत आहेत आमच्याही) लागलं (जास्त जोरात नाही पण अगदी हळूही नाही) आहे (?.. खरं तर नाही. पण लोकांनी नाही नाही ते बोलून भाग पाडलं आम्हाला विचार करायला) की (!) मी (खरं तर आम्ही लिहायला पाहिजे होतं पुन्हा, पण पुन्हा लोकं विचारतात की आम्ही म्हणजे कोण कोण. घ्या काय बोलणार यावर आता !!) कंसांचा (मामा, मला वाचवा) फारच (हेही खरं तर खोटं आहे. पण लोकेच्छेचा मान राखून आम्ही (या आम्ही बद्दल आधीच स्पष्टीकरण दिलेलं आहे. आठवा (म्हणजे लक्षात घ्या या अर्थी) आठवा (एकाच अर्थाचा शब्द लागोपाठ दोनदा वापरण्यात काय हशील. तेव्हा या शब्दाचा अर्थ अर्थातच (अर्थ अर्थ द्विरुक्ती झाली रे :( ) आठ क्रमांकाचा या अर्थी आहे) कंस..)) तो शब्द जसाच्या तसा (कारण लोकांच्या शब्दात बदल करून छापणे आमच्या स्वभावात बसत नाही !!) ) अवाजवी (खरं तर हेही आम्हांस मान्य नाही. कारण वाजवी/अवाजवी हे कितीही झालं तरी सापेक्ष नाही का?) वापर (यात कुठलाही आप-पर भाव नाही.) करायला (करायला गेलो एक आणि झालं .... !!) लागलो (त्याने एवढं काही बिघडलं नाही म्हणा) आहे (खरं तर नाहीच... !!). त्यामुळे (काय काय करावं लागतं बघा !!) निदान (जमेल का?) एकतरी (ओवी अनुभवावी) सलग (आणि सजग) वाक्य (अनेकही चालतील. पण आधी एक तरी जमलं की मग पुढचं बघू.) बिनाकंसांचं (हाय हाय रे दुर्दैवा) लिहायचं (पक्षि टंकायचं) असं (च) ठरवून (वचने किं दरिद्रता) प्रयत्न ((प्र)यत्न तो देव जाणावा) केला (झाला एकदाचा). बघा (उर्फ वाचा) जमलंय (जमलंय जमलंय) का (इथे का हा प्रश्नार्थक नाही. विध्यर्थ म्हणून वापरला आहे.) !!

एक अक्षरही कळलं नसणार याची मला खात्री आहे. ही पोस्ट टंकायला सुरुवात करताना खरं तर मला असं म्हणायचं होतं की

२.
हल्ली मला असं जाणवायला लागलं आहे की मी कंसांचा फारच अवाजवी वापर करायला लागलो आहे. त्यामुळे निदान एकतरी सलग वाक्य बिनाकंसांचं लिहायचं असं ठरवून प्रयत्न केला. बघा जमलंय का !!


पण एकदा टंकायला लागलो की अनंत विचार मेंदूची द्वारं फोडून झिरपत झिरपत बोटांमार्गे कधी कीबोर्डवर उमटतात कळत नाही आणि बघता बघता स्क्रीनवरचं वाक्य (अ)शक्य (अ)वाचनीय  होतं. (आता हेच बघा ना. खरं तर 'अशक्य अवाचनीय' असं लिहायचं होतं. पण सवयीने दोन्ही '' कंसात गेले चुकून :( (हा कंस नाही, रडका स्मायली आहे... रडका स्मायली. कसला विरोधाभास आहे नाही? )). तरी बरं मी साधे सोप्पे कंसच वापरतो. ते महिरपी आणि चौकोनी कंस आपल्याला झेपतच नाहीत. आपले साधे सोपे. आधी जेवढे उघडलेत (शक्यतो न चुकता) तेवढेच शेवटी मिटायचे ;-) (पुन्हा एकदा.. हा कंस नाही. हा 'डोळे मिचकावू' स्मायली आहे. चला सुदैवाने यात विरोधाभासही नाही..)

असो. तर १ आणि २ वाचल्यावर तुम्हाला कळलंच असेल की कंसांचे कसे अनंत फायदे, उपयोग आहेत. एकाच वेळी मनात उत्पन्न होणार्‍या असंख्य कल्पनांना शब्दबद्ध करून ब्लॉगावर टाकणं हे कंसांशिवाय कसं अशक्य आहे. (अजूनही कळलं नसेल तर १ आणि २ पुन्हा वाचून बघा आणि कळेपर्यंत वाचत रहा. आणि तरीही नाही कळलं तर काय करायचं ते मी कंसात आपलं सॉरी कानात सांगेन).. म्हणूनकंस जिंदाबाद !!!

जाता जाता एक श्लोक आठवला तो सांगतो. (लहानपणी खरं तर हा श्लोक मला आवडायचा नाही कारण त्यात कंसाला मारलं आहे. पण कालांतराने मी इतके कंस वापरायला लागलो की असं लक्षात आलं की कंस तर अजूनही स्मृतीरुपाने आपल्या (लिखाणा) बरोबर आहेच ;-) काळजी नको.)

वसुदेव सुतं देवं कंस चाणूर मर्दनं |
देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगतगुरूं ||


किंवा अगदी सुयोग्य शब्दांत कंसांची थोरवी गायची तर


कंसेवीण फळ नाही ||
कंसेवीण राज्य नाही ||

- बाबा वटवट कंसवान


(श्रीताईच्या प्रतिक्रियेला उत्तर देताना मला हा नवीन (!!) श्लोक (!!) सुचला (??).. आधी पोस्ट टाकली तेव्हा अ‍ॅक्च्युअली तो पोस्ट मध्ये नव्हता. पण बरा जुळत होता म्हणून मग पोस्टमध्ये अपडेट करून टाकला ;-) )

41 comments:

  1. कंसाच्या बादशहा, जियो!! :) हा हसरा स्माईली आहे....का ते कळले असेलच... सगळे कंस उघडत... मिटवत... संदर्भ लावत संपली एकदाची पोस्ट... :D हुश्श... :( आता हा रडका... किती रे तुझे कंसावर( कृष्णानेही केले नसेल इतके )प्रेम...हे कमी की काय म्हणून स्मृतीरुपानेही.... हा हा... आता मी कंसाला शरण जाण्याआधी गाशा गुंडाळते झालं.

    ReplyDelete
  2. श्रीताई, पुराणातली (वानगी) वांगी कशी महत्वाची (आणि अर्थपूर्णही) आहेत हे या कंसाच्या उदाहरणावरून कळतंच :) ..

    बाकी,

    कंसेवीण फळ नाही ||
    कंसेवीण राज्य नाही ||

    - बाबा वटवट कंसवान

    ReplyDelete
  3. भाग:१ वाचताना प्रचंड मनस्ताप झाला. अजुनही काही कळले नाहीये. कंस वापरण्यावर राष्ट्रव्यापी चळवळ करुन बंदी आणायला हवी :)) **कंस सुरुवात** हा जोरजोरात हसण्याचा स्माइली होता **कंस शेवट**

    ReplyDelete
  4. बोलो बाबा वटवट कंसवान की जय हो!!!!

    कंसाच पण पेटंट घेऊन टाक रे...

    तुझ्या कंसावरील पुस्तकांची नाव कशी असतील....

    १. कंसपुराण
    २. जावे कंसाच्या गावा
    3.मैं और मेरा कंस

    अशीच खूप सारी...

    ReplyDelete
  5. ((मस्तच)) भन्नाआअट्ट.....
    (कंसेश्वर)वटवट सत्यवानांचा विजय असो!!!!!:) :) :)

    ReplyDelete
  6. panduranga, Vitthala ( bhaag 1 vaachun hich pratikriya hoti majhi...) Are kitti te ( ) (damun gele mi paar vaachataana) bhaag 2 vachun matr sagale clear jhale neet.. ( Husshhh...)
    Aso, tula bolata bolata mich shikale ( ) vaparayalaa....
    Thodkyaat kaay....

    कंसेवीण फळ नाही ||
    कंसेवीण राज्य नाही ||

    - बाबा वटवट कंसवान ( ki jay ) :) :) :)
    ( btw, mi tula fb war reqst paathavali aahe, tu baghitali nahis ka...? Ki tu Blog warachya lokana add karat nahis... ;))

    ReplyDelete
  7. अगदीच बिनडोक...
    बाकी २ वाचताना सारखे हेच वाटत होते..
    '' कंसावाचून अडले सारे कंसाच्या पलीकडले "

    ReplyDelete
  8. कंसानेच तर वाट लावली म्हणून महाभारत झालं..नाहीतर कदाचित महाभारत पण झालं नसतं.
    तेंव्हा कंस आपोआप येइल तर येउ दे. मुद्दाम त्याला आणु नकोस कंसवान!!!

    ReplyDelete
  9. रडका स्मायली हे आवडलं...जबरदस्त आवडलं...
    बाकी..कंसाय तस्मै नमः।

    तळटीप - बाबा हा शब्द वापरण्यापूर्वी १. रामदेव आणि २. मी ह्यांची परमिशन घेणे अत्यावश्यक आहे!

    ReplyDelete
  10. पहिल्या अनुभवातुन बरेच काही शिकलोय...तेन्व्हा हा वाचनीय (समजनीय)झालाय....:)

    ReplyDelete
  11. तू धन्य (आता दुसरं काही म्हणण्याच्या पलिकडे गेलायंस तू) आहेस. तू आणि तुझे कंस (ज्यांची सवय आम्ही करून {की करवून घ्यावी लागली} घेतली) त्यांना तोड (तोडपाणी होतंच नाही ना, यात!) नाही. तुझे लेख (कंसवाले ;-) [डोळे मिचकवू स्मायली नंतर कंस बंद केला तर तो स्माइली जास्तच हसल्यासारखा वाटतो म्हणून हे लिहितेय]) छानच असतात (कधी बरेही असतात पण मित्राचे लेख म्हटल्यावर चलताय) आणि आता तर ते वाचल्याशिवाय चैनच पडत नाही. ह्या मेळाव्याच्या (मेळावा नावाला, संमेलनच आहे ते) कामात तुझी एखाद दुसरी पोस्ट (कदाचित जास्तही असू शकतात) वाचायची राहून गेली (कुठे जाणार ती? तिथेच, त्याच लिंकवर असेल पण आपली एक बोलायची पद्धत..) असेल कदाचित (हेही बोलायची पद्धत म्हणून नाहीतर मला माहित आहे की काही पोस्ट मी खरंच वाचू शकले नाहीये) पण ही कामं उरकली (उपसली म्हणायचं होतं खरं तर मला..) की सवडीने (आणि आवडीने सुद्धा..[काय करणार.. मित्र ना तुम्ही ;-)]) वाचेन.

    ReplyDelete
  12. तू धन्य आहेस. तू आणि तुझे कंस, त्यांना तोड नाही. तुझे लेख छानच असतात आणि आता तर ते वाचल्याशिवाय चैनच पडत नाही. ह्या मेळाव्याच्या कामात तुझी एखाद दुसरी पोस्ट वाचायची राहून गेली असेल कदाचित पण ही कामं उरकली की सवडीने वाचेन.

    ReplyDelete
  13. बाबा वटवट कंसवान की जय :)

    ReplyDelete
  14. मी फ़क्त :):):):)):))अवढेच !!

    ReplyDelete
  15. Sorry Sorry... aattach baghitale tu add kele aahes te... ;)

    ReplyDelete
  16. >> कंस वापरण्यावर राष्ट्रव्यापी चळवळ करुन बंदी आणायला हवी

    अरे अभिलाष, कंस वापरण्यावर बंदी घातली तर लिहायचं काय (माझ्यासारख्या) माणसाने. यकदम अळणी होऊन जाईल सगळं लिखाण :P

    ReplyDelete
  17. हो रे योगेश, या ब्लॉगच्या नादात बरीच पेटंट्स घ्यावी लागणार आहेत. पुस्तकांची नावं आवडली :) :)

    ReplyDelete
  18. तन्वीबाय, यकदम (मनापासून) खूप (खूप) आभार्स :)

    ReplyDelete
  19. मैथिली, कंसांच्या अनेक उपयोगांपैकी अजून एक म्हणजे तुझ्या तोंडी आपोआप पांडुरंगाचं नाव आलं ;-).. तुझ्या पदरी (जिन्सी) पुण्य पडलं.

    अग आणि ते फेसबुक मला विशेष आवडत नाही. फार क्वचित लॉगतो मी तिकडे. ऑर्कुट जरा बरं वाटतं. पण ते ही जास्त नाहीच. पण तुझी फेसबुकची रिक्वेस्ट आधीच accept केली आहे मी. बघ पुन्हा.

    ReplyDelete
  20. हा हा..
    >>कंसावाचून अडले सारे कंसाच्या पलीकडले..

    अरे या कंसांच्या पलीकडलं जग किती मस्त आहे ते मला विचार ;-)

    ReplyDelete
  21. काका :) .. हो ना. आणि या कंसांमुळे दुसरं ब्लॉग-भारत होणार असं वाटतंय :P .. आणि नाही हो या पोस्टीतले कंस मुद्दाम टाकलेले होते, इतर वेळी मी मुद्दाम टाकत नाही (सवयीने येत असतील ;-) )

    ReplyDelete
  22. >> कंसाय तस्मै नमः।|

    अगदी खरं !! :) .. या कंसांपायी आपण सगळ्यांनी या आजच्या एका दिवसातच मराठी भाषेत किती नवीन (??) अनमोल (!!) श्लोक (!!!) जन्माला घातले आहेत बघ..

    अरे आणि हो. ते बाबाच्या परमिशनचं लक्षातच आलं नाय बगा. उद्याच इटलीला (की उटीला?) फोन लावतो. ;-)

    ReplyDelete
  23. सागरा, माझ्या सगळ्या पोस्ट अशाच 'समजनीय' व्हाव्यात असाच प्रयत्न असतो. (पण बर्‍याचदा फसतो ;-))

    ReplyDelete
  24. कांचन :D :D :D :D :D :D :D :D :D :D :D ...

    झक्कास !!!! मस्तच झालंय तुझं कंस-सहित आणि कंस-विरहित विश्व !! (पोस्टपेक्षाही सही !! ;-) )

    ReplyDelete
  25. :D सुहास, ब्लॉगाचं नाव बदलायला लागणार बहुतेक लवकरच (पांचट कंसवान);-)

    ReplyDelete
  26. उद्या तुला कुणी मेरे पास बंगला है, गाडी है.... डायलॉग मारला तर तू मेरे पास 'कंस' है म्हणायला मोकळा सत्यवाना.

    कंसाने होत आहे रे, आधी कंसची पाहिजे.

    ReplyDelete
  27. माउ, माझं पण फक्त एवढंच :):):):)):)) आणि हा एक यक्सट्रा :D

    ReplyDelete
  28. बघ मैथिली. बोललो ना. आता त्या फार्मव्हिले वाल्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे वय (!!!) झाल्याने (नाही नाही) थोडा वेळ लागला असं तुला वाटत असेल पण खरं कारण FB आवडत नाही हेच आहे हे मी नमूद करू इच्छितो ;-) ..

    आणि अग बरेच ब्लॉगर ऑर्कुटवरच आहेत. FB वर त्यामानाने कमीच.

    ReplyDelete
  29. >> कंसाने होत आहे रे, आधी कंसची पाहिजे.
    चला कंसोवीत (कंस + ओवी) अजून एका ओवीची भर पडली !!

    हो ना आणि मेरे पास कंस है म्हंटलं की त्या बिचा-याला कळणारही नाही की काय उत्तर द्यायचं ;-)

    ReplyDelete
  30. कंसाय तस्मै नमः।| सुंदर छ्यान उत्तम कंसाची मज्जा एकदम आवडली ( कंस एक प्रश्न )
    (((((((------))))))))

    ReplyDelete
  31. :) .. काका, धन्स.. !

    ReplyDelete
  32. पांचट कंसवान... हाहाहाहा..
    लेख (एकदम) भारी..
    श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र तुझ्या मागे लागणार आता.. (त्याने) मारलेल्या कंसाला तू अजरामर(?) करायला निघाला आहेस..

    प्रचंड आवडेश.

    ReplyDelete
  33. हा हा *आप* .. धन्स.. अरे कंसाला मारून टाकलं तर अनेक वाक्यांत अर्थांचे अनर्थ होतील.. (माझ्या पोस्ट मध्येच नाही तर सर्वत्र मराठी वाङमयात... टीप : मी माझ्या लेखांस (!!) वाङमय समजतो असा गैरसमज करून घेऊ नये !!)

    ReplyDelete
  34. आईशपथ... त्रास झाला वाचताना... :) पूर्ण नाही वाचू शकतो... एकदा वाटले की कृष्ण अवतार घेउन तुझ्या कंसांचा वधच करावा... :P

    ReplyDelete
  35. हा हा .. सर्वात जास्त शिव्या मी या पोस्टला खाल्ल्या असतील :P

    ReplyDelete
  36. झ्याक (हा शब्द वारंवार वापरतो मी. थोडा वापर कमी करायला हवा (टीप: एकच शब्द वारंवार वापरतोय याचा अर्थ माझं भाषाज्ञान कमी आहे असा कोणी काढू नये. मीही मराठी माध्यमातच शिकलेलो आहे. (उपटीप: तुझे लेख आणि त्यावर आलेली मतं वाचून असं वाटतं की इथे बरेच लोक मराठी माध्यमाचे असावेत. म्हणून ’मीही’ म्हटलं आहे. नसाल तर क्षमस्व. (उप‍उपटीप: मराठी भाषाज्ञानाच्या बाबतीत आम्ही मराठी माध्यमवाले इंग्रजी (English ला मराठीत इंग्रजीच म्हणतात ना रे भाऊ?) माध्यमवाल्यांकडे फर्स्ट क्लास (याला वास्तविक प्रथम वर्ग म्हणायला हवं. मराठी माध्यमवाले ना आम्ही!) चा पास (याला मराठीत काय बरं म्हणतात?) असलेल्या माणसाने विदाऊट तिकिट (याला वास्तविक विनापरवाना म्हणतात मराठीत, पण अर्थाला जोर यावा म्हणून परकीय भाषेच्या शब्दांची थोडी मदत घेतली आहे.) माणसाकडे बघावं तसं बघतो. त्यामुळे क्षमस्व लिहिलं नसतं तरी चाललं असतं, पण जरा लोकांना बरं वाटावं म्हणून लिहिलं.)))) झाली (नशीब संपली एकदाची. बराच वेळ वाचत होतो, अर्थबोध होत नव्हता. त्यामुळे लेखकाला (वास्तविक ब्लॉग लिहिणार्‍याला लेखक म्हणणं म्हणजे सदागोपन रमेशला सचिन तेंडुलकर म्हणण्यासारखं आहे. पण आम्ही जनाची नाही तरी मनाची बाळगतो म्हटलं...) खरमरीत (पक्षी: पांढरपेशा (मी... बाकीच्यांबद्दल माहित नाही बुवा आपल्याला) असल्याने ’उथळ’, ’विक्षिप्त’ हे शब्द आम्हांसाठी खरमरीतच आहेत. त्यामुळे जास्त घाबरू नकोस. :-) (ही स्मायली होती, कंस नव्हे! (टीप: हा मात्र कंस आहे, स्मायली नव्हे!!)) ) शब्दांत उत्तर द्यावं अशी झालेली तीव्र इच्छा मी कशी मनातल्या मनात दाबून ठेवली ते माझं मलाच माहित! (स्वगत: आम्ही मनात धुमसतच मरायचे! प्रकट: जनाची नाही तरी मनाची बाळगतो आम्ही. (आम्ही म्हणजे मी. आदरार्थी बहुवचन आहे हे.) (मगाशी एकदा सांगितलं होतं, पण द्विरुक्तीने (इंग्रजी माध्यमवाल्यांसाठी: द्विरुक्ती म्हणजे Repetition) वजन (वाक्याचं!) वाढतं. (हा कंस वास्तविक आधीच्याच वाक्याशी संबंधित आहे. पण आधीच्या कंसाशी मात्र संबंधित नाही. त्यामुळे एक शेपरेट कंस...))) पण तरीही एवढी किचकट पोस्ट लिहिल्याचा निषेध! निषेध! त्रिवार निषेध!) आहे (ही कमेंट खूप लांबतेय. पण नाईलाज आहे. मनातली सगळी मतं मांडल्याशिवाय गप्प राहणार नाही मी! मराठी माणूस आहे ना! (हे आपलं उगीचच... वास्तविक मराठी माणसं मतं न मांडताच गप्प बसतात सहसा. पण मी एक क्रांतिवादी (म्हणजे काय हे इंग्रजी माध्यमवाल्यांनी (आणि अर्थ कळला नसेल तर मराठी माध्यमवाल्यांनीही) विचारू नये. हा एक स्वतंत्र ब्लॉगपोस्टचा विषय आहे. जागेअभावी या प्रतिक्रियेत त्याची व्याप्ती कव्हर (अर्थाला जोर यावा म्हणून इथे इंग्रजी शब्दाचा वापर केला आहे हे सुज्ञांस (हे सूज्ञ नावाचे प्राणी कुठे असतात हो भाऊ? मला आत्तापर्यंत एकाही माणसाने तो सूज्ञ असल्याचं सांगितलेलं नाही.) सांगणे न लगे) करणं अशक्य आहे.) मराठी आहे!)) पोस्ट. (हा शेवटचा कंस आहे बहुतेक. प्रत्येक वाक्याला माझे विचार भरकटतात बुवा. कंसाने मला जेवढा त्रास दिला तेवढा मथुरावासी लोकांनाही दिला नसेल!! (Damn! हा कंसही लांबत जातोय मारुतीच्या शेपटासारखा.) (मायला, कंस महाभारतात मारुती रामायणात! काहीच्या काहीच चाललंय माझं!))

    ReplyDelete
  37. हा हा हा हा हा संकेतभाऊ !!!!!!! क ह ह ह र ह केलात की तुम्ही तर... जब्बरदस्त !

    ReplyDelete
  38. येऽऽऽऽ.... धंदततड धतड धतड धंदततड धतड धतड धंदततड धतड धतड.... (हे ब्यांडाचे बोल (बोल म्हणजे आवाज. खर्रंखुर्रं बोलायला ब्यांड म्हणजे स्त्री नाही किंवा पुरुषही नाही! (किंवा राहुल गांधीही नाही!)) आहेत) अखेर उत्तर आलं. मी देव (खर्रेखुर्रे देव हां... रमेश देव किंवा कपिल देव नाही) पाण्यात बुडवून ठेवले होते. आत्तापर्यंत मूर्तींवरचा रंगही उडाला होता... ;-)

    ReplyDelete
  39. हेहे. देर आये दुरुस्त आये असं मी स्वतःलाच म्हणून घेतोय ;)

    >> ब्यांड म्हणजे स्त्री नाही किंवा पुरुषही नाही! (किंवा राहुल गांधीही नाही!))

    लोल लोल लोल

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...