दिवस : काही वर्षांपुर्वीचा शनिवार
वेळ : दुपारच्या जेवणाची वेळ होऊन बरेच तास उलटून गेलेली आणि रात्रीच्या जेवणाला अजून बराच अवकाश असलेली अशी अधली मधली.
स्थळ : तेव्हाचा डोंबिवलीतला एकमेव एसी हॉल
प्रसंग : जाम भूक लागली होती. (तरीही) मी ताटातला पहिला घास घेतला. घेतला म्हणजे हातात घेतला.. आणि बायकोला भरवला. तो पहिला घास भरवताना इतकं छान रोमँटिक वाटत होतं ना की घास भरवणं हे आयुष्यातलं सर्वात सुंदर काम आहे आणि आयुष्यभर असंच घास भरवत रहावं असं वाटून गेलं.
दिवस : काही आठवड्यांपुर्वीचा शनिवार
वेळ : दुपारच्या जेवणाची
स्थळ : घरातला हॉल, बेडरूम, किचन (आणि प्रसंगी बाथरूमही)
प्रसंग : जाम भूक लागली होती. (तरीही) मी ताटलीतला पहिला घास घेतला. घेतला म्हणजे हातात घेतला.. आणि ..... ................ आणि ओरडलो "कुठे पळतोयस? हा एवढा भात खाल्ल्याशिवाय इथून हलायचं नाही." त्याने (पुन्हा) भोकाड पसरला.
ओरडणं आणि भोकाड सोडलं तर वर्तुळ पूर्ण झालं होतं. काही वर्षांपूर्वी रोमँटिक वाटणारं घास भरवण्याचं काम आता मात्र भयानक कंटाळवाणं आणि कटकटीचं वाटायला लागलं. थांबा थांबा.. "काय हा मुर्खपणा..", "निष्ठुर बाप", "लहान मुलावर ओरडतात का असं कधी" असे वाग्बाण सोडण्याआधी या वर्तुळाचे टप्पे (म्हणजे क्रम याअर्थी बॉलचे टप्पे नव्हेत.) बघुया का जरा आपण? पण अर्थातच ही पोस्ट (लेकाला) घास भरवण्याविषयी (आणि लेकाने भरवून घेण्याविषयी) असल्याने मी तुम्हाला आत्ता, साधारण चौथ्या (की पाचव्या?) महिन्यात उष्टावण झाल्यावर त्याला आम्ही भाताची पेज देणं कसं सुरु केलं, तो पेज पिताना कशी नाटकं करतो आणि करायचा, पेज पाजायला आई आणि समोर नकला करायला, गाणी म्हणायला, हातवारे करायला बाबा तैनात असल्याशिवाय तो तोंडही कसं उघडायचा नाही, चार चमचे खाऊन झाल्यावर उलटी आल्यासारखा आवाज खोटा खोटाच कसा काढायचा, मग ते खोटं खोटं आहे हे कळेपर्यंत आम्ही सुरुवातीला त्याला त्याने उलटीचा आवाज काढून ऑँ ऑँ असं केल्यावर लगेच त्याला कसं उठवून बसवायचो, पेज पाजायला आणल्यावर त्याला अचानक आई आणि बाप नकोसे कसे व्हायचे, अचानक किचन आणि बेडरूमीतल्या सगळ्या वस्तूंबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण होऊन तो त्या दिशेने कसा पळायचा (पक्षि रांगायचा) हे सांगून किंवा पेज पाजायला मांडीवर आडवं घातलं की त्या क्षणापासून तो 'भुताचा भाऊ' मधल्या अशोक सराफ काकांसारखा (त्याचा काकाच ना अशोक? आयला... त्याचा काय माझाही) भुर्रर्रभ्र्रूम भुर्रर्रभ्र्रूम (हे दर वेळी वेगळं असतं थोडंफार.. अशोकचं नव्हे म्हणजे अशोक काकांचं नव्हे... आदितेयचं) असे भुरके कसे मारायचा, ते भुरके मारल्यावर त्याच्या तोंडातली सगळी पेज उडून त्याचे आणि आमचे हात, पाय, चेहरे कसे रंगून जायचे, ते भरलेले चेहरे बघितल्यावर आम्ही (मी) त्याला उचलून रागाने सिंककडे जायला लागलो की तो खुश होऊन कसा टाळ्या पिटायचा (अजूनही पिटतोच.. पाण्यात खेळणं प्रचंड प्रिय... पण ते नंतर बघू... हे वाक्य संपत नाहीये च्यायला...), त्याचं हे खोट्या उलटीचं नाटक आमच्या लक्षात यायला लागल्यावर त्याने खोटं खोटं झोप येण्याचं नवीन शस्त्र कसं उगारलं, आणि तेही खोटं आहे हे आम्हाला कसं उशिरा समजलं, पेज पाजायला मांडीवर घेतल्यावर त्याचं लक्ष वळवण्यासाठी तात्पुरतं त्याच्या हातात दिलेलं खेळणं त्याची जिवाभावाची इस्टेट कशी बनून जायची आणि पेजेपेक्षा त्या खेळण्यावरचं त्याचं अमाप प्रेम कसं ओथंबून वाहायला लागायचं हे सगळं (अजून) सविस्तरपणे सांगून तुम्हाला पकवणार नाही.........
हुश्श.. दमलो... पाणी पिऊन येतो... मिलते हैय ब्रेक के बाद....
आलात? वाटलं नव्हतं (एवढं सगळं झाल्यावर) परत याल. तर "'नेसले सिरेलॅक घासाचा तास (त्रास)' च्या पुढच्या भागात आपलं मन:पूर्वक स्वागत" असं काहीसं मागून ऐकू येत असेल तर तो दोष आमचा वा आदितेयचा नाही. ते रियालिटी शोज बघणं थोडं कमी करून बघा ;-) असो..
"वयात आलेल्या मुलांची (म्हणजे मुलं आणि मुली दोघेही या अर्थी) सगळ्यांत नावडती भाजी कुठली?? अर्थात पालक" हा आम्ही वयात येत असताना सुपरहिट असणारा सुविचार (!) आमच्या लेकाला एवढ्यातच कसा काय कळला आणि एवढा आवडलाही हे कळणं अवघड आहे पण ते शब्दश: खरं आहे. नाहीतर इतर वेळी प्राणप्रिय असणारे आईबाप बरोब्बर जेवणाच्या वेळी नकोसे झाल्यासारखा वागला नसता तो.
भात अजिबात न आवडण्यात तो अगदी बापावर गेला आहे असं त्याच्या मातोश्री म्हणतात. पण तसं तर आरडाओरडा करण्यात, गाढ न झोपण्यात, चीडचीड करण्यातही तो बापावर गेला आहे असंही त्या म्हणतात. आपण किती गोष्टींवर विश्वास ठेवायचा हे आपण आपलं ठरवायचं. मी ठेवत नाही (म्हणून) तुम्हीही ठेवू नका. अरे ब्लॉगर-वाचक म्हणतात ते रिलेशन बिलेशन काय हाय का नाय आपलं???
तर नुकतंच काही महिन्यांपूर्वी त्याची पेज कमी करून त्याला भात, भाज्या, फळं खायला घालायला सुरुवात करायचं ठरल्यावर आता त्या खोट्या उलट्या, ते भुर्रर्रभ्र्रूम भुर्रर्रभ्र्रूमचे खोटे आवाज, ती चेहर्यांची रंगरंगोटी या सगळ्यातून सुटका होणार अशा विचाराने उल्हसित झालेल्या माझ्या मनात आनंदाचं कारंजं थुईथुई नाचायला लागलं. पण अरेरे, ओह नो, अर्रर्र चकचक..... पल्याडचं गवत ह्ये न्येहमीच अल्याडच्या गवतापेक्षा हिरवंगार वाटतं याचा अनुभव नोकरीच्यावेळी येतो तसाच आत्ताही पुन्हा आला आणि यावेळीही नेहमीप्रमाणेच पलीकडे गेल्यावर तो आला हे तर ओघानेच आलं.
जाउदे जाम लांबण लागलीये. ते स्थळ, काळ, प्रसंग टायपात मस्त फटाफट संपेल... तसंच लिहितो आता.
दिवस : प्रसंग बायकोने (अर्थात पुन्हा लेकालाच) घास भरवण्याविषयी असेल तर कुठलाही.. मी (आ म्या) घास भरवण्याविषयी असेल तर विकेंड.
वेळ : पहिला पर्याय असेल तर दुपार, (दुसरा पर्याय क्वचितच असतो म्हणा)
स्थळ : हॉल, बेडरूम, किचन
प्रसंग १ : आई किंवा बाप (थोडक्यात भरवणारा. बरेचदा आईच) जेवणाची डिश घेऊन आली आणि लेकासमोर बसली की ती ज्या दिशेला बसली असेल त्याच्या १८० अंशात तोंड फिरवून पळून जाणे आणि आपलं (म्हणजे त्याचं) त्यांच्याकडे (म्हणजे आपल्याकडे) लक्षच नाही असं दाखवून स्वतःच्याच तंद्रीत राहून एखाद्या (प्रसंगी नावडत्या) खेळण्याशी खेळत बसणे
दि. वे. स्थ. सगळं तेच
प्रसंग २ : पहिल्या प्रसंगावर मात करून त्याच्या तोंडात घास भरवला (उर्फ कोंबला) की तो न चावता तसाच तोंडात ठेवून देणे. (अजून तरी घास थुंकून बिंकून टाकण्याची समज (!!) आलेली नाही)
प्रसंग ३ : प्रसंग २ मधला प्रकार करून करून तोंड दुखायला लागलं तर मग तोंड न मिटता तसंच उघडं ठेवणे जेणेकरून पुढचा घास भरवताच येणार नाही. एकदा त्याने असंच जवळपास १० मिनिट तोंड पूर्ण उघडं ठेवलं आणि मग दुखायला लागलं म्हणून रडारड करायला लागला. पण तोवर आमचा दुसरा घास तयारच होता. :-)
प्रसंग ४ : प्रसंग ३ प्रमाणे व्यूहरचना केल्यास साफ गंडायला होतं हे पुर्वानुभवातून लवकरच लक्षात आल्याने (भलताच शार्प आहे तो. पोरगं कोणाचं आहे शेवटी.. !!) तो चटपट शहाणा झाला. म्हणून पुढच्या वेळेस त्याने घास घेतल्यावर तोंड उघडं ठेवायच्या ऐवजी मारुतीसारखं हुप्प करून मिटून घेतलं. तेही ५-१० मिनिटं नाही.. चक्क २० मिनिटं.. आरडाओरडा नाही, किंचाळणं नाही, गडबड नाही, धावपळ नाही, रडारड नाही. सगळं एकदम शांत,. एकदम संघ दक्ष.. तर असा २० मिनिटं खेळत अगदी शांतपणे (हुप्प करूनच) खेळत राहिला तो.. मला वाटतं गेल्या ८-१० महिन्यातला तो आमचा सगळ्यात शांत अर्धा तास होता.
प्रसंग ५ : एकदा तर त्याला खूप झोप येत होती आणि जाम भूकही लागली होती. (मलाही होतं हो असं बर्याचदा). पटकन खाऊन झोपेल म्हणून त्याला एक घास भरवला पण त्याला झोप एवढी असह्य होत होती की तो घास त्याला चाववेना आणि झोप काही आवरेना. गिळून टाकता येईना आणि थुंकून टाकायची अक्कल नाही अजून (सांगितलं नाही का मगाशी.. ! ).. त्यामुळे जाम रडारड करत, आरडाओरडा करत, एकीकडे थोडं पाणी पीत त्याने तो घास संपवला आणि दुसर्या क्षणी झोपून गेला.
काय बोललो... दि. वे. स्थ. प्र स्टाईलने एकदम फटफट होईल म्हणून. उगाच पाल्हाळ आवडत नाही आपल्याला. कारण वेळ नाही हो मिळत हल्ली. (त्याच्या) दोन घासांच्या मध्ये मिळतो तेवढाच काय तो वेळ. बाकी मग आहेतच प्रसंग १,२,३,४,५ आणि त्या सगळ्यावर दर वेळी मात करताना उडालेली धांदल ;-) ... पळतो आता.. अरेच्च्या हे तोंड काय असं केलंय याने आणि नाचतोय का असा गोलगोल? घास संपला का तोंडातला?? बोंबला... प्रसंग ६ येऊ घातलाय वाटतं. देवा...... आता पुन्हा नवीन हल्ले-प्रतिहल्ले आणि नवीन व्यूहरचना.. पळतोच कसा... !!!
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
आयला भारी रे..मला दिसतोय पळताना :) अप्रतिम
ReplyDelete:-) .. आभार सुहास. सही वाट लागते रोजच्या रोज !!
ReplyDeleteतुझा मोठा पंखा झालोय मी... मज्जा आली वाचताना... :) काय एक एक प्रसंग आहेत... :)
ReplyDelete'आलात? वाटलं नव्हतं (एवढं सगळं झाल्यावर) परत याल.' - हे मस्त होतं..
ही ही ही
ReplyDeleteभरडी भरवणे म्हणजे एक शिक्षाच असते आपल्याला.
आगे आगे देखो होता हे क्या!
वा वा.. पाच पाच ब्लॉगचे मालक असलेले खानापती (खादाड सेनापती)पंखा झाले म्हणजे आमचीच मज्जाच म्हणा की. :-)
ReplyDeleteही ही ही
ReplyDeleteभरडी भरवणे म्हणजे एक शिक्षाच असते आपल्याला.
आगे आगे देखो होता हे क्या!
अगदी अगदी... तरी मी तरी सुखात आहे थोडाफार.. अनुजाची तर वाट लागते नुसती !!
ReplyDeleteकाय सही वर्णन आहे, प्रसंग एकदम डोळ्यासमोर राहीले रे...
ReplyDeleteनेसले सिरेलॅक घासाचा तास (त्रास) ... हे..हे..हे.. सहीच...
अदितेयचा विषय म्हणजे तु नेहमीसारखा सुटलेला असतो.. एकदम फॉर्मातला तेंडुलकरच जणू...
बेष्ट!!
हा हा आनंद... तेंडूलकर?? भरून पावलो आज मी आणि ब्लॉग दोघेही ;-) ..
ReplyDelete'घासाचा तास (त्रास)' हे ऐकायला सही आणि कॉमेडी वाटत असलं ना तरी प्रत्यक्षात तेवढंच कंटाळवाणं आहे बाबा.
तुझा ब्लॉगवाचुन 'कंस' हा तुझा सर्वात प्रिय पुराण व्यक्तिमत्व आहे असे वाटते ;-)
ReplyDeletehahahahaha....!
ReplyDeleteहा हा आनंद. खरं आहे. कंसाचा वध झाला ना म्हणून त्याला मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून जपतोय ;-)
ReplyDeleteविद्याधर, दुसर्याच्या त्रासावर असं हसू नये ;-) हा हा
ReplyDeleteहे..हे...हे. . . मस्त रे...भन्नाट लिहलय रे!!! मजा आली वाचताना!!!
ReplyDeleteटाळ्या. एकूण काय तुला आता एक नवीन ड्युटी लागू झाली आहे. अजून मी तो अनुभव घेतलेला नाही. पण तुझे अनुभव वाचून शहाणी होतेय शिवाय मनाची तयारी करून ठेवली आहे.
ReplyDeleteहं.... गेले ते दिवस!!!! हुश्श!! असं म्हणायचं होतं, काही दिवसांनी फक्त बटाट्य़ाची भाजीच हवी किंवा तत्सम काही तरी सुरु होईल बघ... :)
ReplyDeleteसुंदर मस्त ,आदितेयची आठवण येते
ReplyDeleteवाचूनच दमलो. मी माझ्या पुतण्यांचे आणि भाच्यांचे जेवतानाचे चाळे बघितले आहेत. जबरदस्तीने कोंबाल तर ते तितक्याच शांतपणे बाहेर काढतात. पण चवीच काही असलं (आमच्याकडे माश्याचं जेवण) की कसं भसाभसा खाणार.
ReplyDeleteबाकी तू आदितेयला रोज दोन वेळा भरवत जा मग तू दिवसातून चार वेळा तुझा आवडता चीज पिझ्झा हाणलास तरी झिरो फिगर वैगरे राखून ठेवशील.
बरोबर आहे महेंद्रजींचे ...काही दिवसानी ’आज कोणती भाजी आहे, वरण साधे की फोडणीचे’... यावर आज भूक आहे की नाही तेठरेल...इडलीबरोबर सांबार केले तर चटणी हवी किंवा व्हाईस व्हर्सा... एखाद दिवशी भात नसेल तर नेमका भात हवा ही (कुठून कळते राम जाणे!!!) मागणी..... :)
ReplyDeleteथांबते रे बाबा मी ..नाहितर माझ्या कमेंटची पोस्ट होईल...... हुबेहुब वर्णन केलेस रे बाबा!!!
आणि हो ज्या गोष्टी तुला मान्य नाहित त्या आम्हालाही नाहीत हो!!! ब्लॉगर वाचकच रिलेशन हाय बा!!! येक्कदम मान्य.....
बाकि आदितेय तुला आजकाल बाबा त्रास देतोय ना सेरेलॅकचा तास घेऊन तर त्याला सांग एकदा तो वेगाने गारगुट्ट होत जाणारा प्रकार तू वाटीभर संपवून दाखव.....भुर्र भुर्र न करता!!! :)
hahahaa..sahich ekdam sagal kas Dolyaasamore ubhe raahile...mhanje aajakal dhamal udatyey gharat..majjaa..kara kara Njoy !!!
ReplyDeleteaamhi aapale sutalo ekdache mammaam prakaranatun....
आदितेयबद्दल आजवर लिहालेल्या तुझ्या पोस्ट वाचून संदीप-सलीलच्या "दमलेल्या बाबाची कहाणी"च्या ह्या ओळी आठवल्या...
ReplyDeleteबोळक्यात लुकलुकलेला तुझा पहिला दात,
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा मऊ भात,
आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणाला होतास बाबा,
रांगत-रांगत घेतलास जेव्हा घरचा तू ताबा,
लूटू-लूटू उभं राहत टाकलस पाऊल पहिलं,
दूरचं पाहत राहिलो फ़क्त जवळचं पहायचंच राहिलं...
Amazing !! I have a neighbor friend and she was bulky in general since childhood..now she has two kids and she has no other support full time like sasu sasre or aai etc ani dhunbhandi ani kervara sodlyas baki bai pan nahiye thevleli ... guess what she has achieved zero figure without going to gym/yoga etc !! how ??? obvious! her both kids are similar to आदितेय!
ReplyDeletetila post chi print nevun dili tar chalel ka ? (Internet var baslaya vel nahi milat tila !! - again reason obvious)
First of all, Aditey che photos pahile. Kasala goddd aahe to. Shoo shweet...!!! Tu bharatat aalas ki sang han; Mala Aditey la bhetayachay...
ReplyDeleteToparyant convey my LOTS of LOVE to him...!!!!
Aani post baddal tar kaay bolayache... Nehmi pramanech Apratim...
Aani prasang 2 madhala funda solid popular aahe ase distay.. maze sagle bhau-bahin hech shastr waparatat...tyanchi capacity tar 30-45 min. chi aahe... Ghas thunkun takanyapeksha jast irritating aste te..karan ghas thunkun takla tar parat bharavata yeto pan tond ch ughadale nahi tar kahi karta yet nahi...
N e ways...punha ekda tech post peksha comment mothi hot chalali aahe.... tevha aavarate ghyayala have..... :)
कांचन, हा हा.. अग ही नवीन ड्युटी तर आधीच्या ड्युट्यांपेक्षा अजूनच डेंजरस आहे. (असं मी प्रत्येकच नवीन ड्युटीला म्हणतो म्हणा ;-) ) .. तरी मी तसा सुटतो. बायकोची मात्र वाट लागते पार.. :-)
ReplyDeleteपण कितीही म्हटलं तरी हे सगळेच्या सगळे अनुभव म्हणजे अगदी लाईफटाईम आहेत. Fascinating days n sleepless nights !!!
काका, बापरे म्हणजे अजून तयारी करायला हवी. आम्हाला (मला) आत्ताच झेपत नाहीये !
ReplyDelete(महेश)काका, वेबकॅमवर भेटू आज..
ReplyDeleteसिद्धार्थ, खरं आहे बाबा. सगळी पोरं एका साच्यातून काढल्याप्रमाणे अचूक कशी काय वागतात देव जाणे.. हा हा. झिरो फिगरचा सगळ्यात सोप्पा मार्ग. सुरु करतो आता ;-)
ReplyDeleteतन्वी, 'मरे हुए को' अजून काय मारत्येस? महेंद्रकाकांच्या नुसत्या बटाट्याची भाजी च्या प्रसंगाने घाम फुटलाय. तू तर एकदम इडली, सांबार, चटणी, फोडणीचे वरण असा चौफेर हल्ला केलास. पण तरी थांकु.. मनाची तयारी झाली की कसं बरं असतं.
ReplyDeleteब्लॉगर वाचकच रिलेशन .... जय हो !!!
अग खरं सांगतो मला सिरेलक आवडायचं. अगदी आत्ताआत्तापर्यंत. माझ्या भाच्याचं सिरेलक खायचो मी बरेचदा :-) पण इथे यांची ही फस्ट फूड्स, सेकंड फूड्स असतात ना ती जरा जास्तच भयानक असतात चवीला. !!
माऊ, सुटलात तुम्ही. बरं आहे..
ReplyDeleteखरंच धमाल चालू आहे गेले काही महिने. :-) म्हणजे त्याची धमाल आणि आमची दमछाक. (तुमचा खेळ होतो आमचा जीव जातो च्या चालीवर ;-) )
सिद्धार्थ, संदीप-सलीलचं ते गाणं म्हणजे समस्त बाप लोकांसाठी नेत्रांजन आहे. खरंच.
ReplyDeleteथोडक्यात, संदीप असो, सलील असो (की हेरंब असो), मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळी पोरं एका साच्यातून काढल्यासारखी अचूक वागतात !!
अरे बिनधास्त दे प्रिंटआउट.. विचारायचं काय त्यात. असा समसुखी भेटला की अजून बरं वाटतं जरा. :-)
ReplyDeleteआणि अगदी खरंय. माझ्या मते 'झिरो फिगर' साठी हा सगळ्यात बेष्ट आणि स्वस्त उपाय आहे. जिम, वर्कआउट, जॉगिंग, योगा काही काही नको ;-) आणि त्याच्याबरोबर बोनस म्हणजे अवर्णनीय आनंद !!!!
धन्यु मैथिली. नक्की. भारतात आलो की भेटूच. मला सगळ्यांनाच भेटायचं आहे. या वेळचा ब्लॉगर्स मेळावा मिस होणार नाहीतर तेव्हाच भेट झाली असती. :-(
ReplyDeleteअरे वा. (वा म्हणण्यासारखं काही नाही म्हणा त्यात ;-)) प्रसंग-२ मधल्यासारखी सगळीच पोरं वागतात तर. कठीण आहे एकूण.
खरंच ग. थुंकून टाकलेला परवडला पण हे तोंडात ठेवलेला घास कधी एकदाचा संपतोय याची वाट बघत बघत त्यांच्या मागे मागे फिरणं महाकठीण काम. (सुदैवाने मला ते जास्त करावं लागत नाही ;-) )
अग कमेंट कितीही मोठी होऊदेत. हरकत नाय. आवडतात आपल्याला मोठ्यामोठ्या कमेंट्स. बाकी तुझा ब्लॉग का झोपलाय सध्या? उठाव त्याला.
va masta,Bolun hasavtos tase vachun hasavales leka,lahanpanchya anuchi athwan ali.aaditey sathi lihilele blog khupch chan hotat
ReplyDeleteआभार काकू. सगळा अनुचाच प्रभाव आहे लेकावर. तिने तुम्हाला त्रास दिला म्हणून हा तिला देतोय ;-)
ReplyDeleteबा हेरंबा ऊगी ऊगी :) भावना पोहोचल्या रे बाबा! हे अस्सं सगळं सेम टू सेम सुरू आहे बघ चालायचंच घरो घरी त्याच पेजा.(घरोघरी मातिच्या चुली) आमच्याकडे सध्या ऐश्वर्या रायची "सोन्याहून सोनसळी" ही लक्सची ऍड प्रचंड आवडती आहे. ही जाहिरात लागली रे लागली की हा आ करून तन्मयतेनं बघतं मग आम्ही संधी साधून त्याच्या तोंडात काही बाही कोंबत असतो. :) बाय दी वे या जाहिरातिचं मोबाईल डाऊनलोड आम्ही सगळे डेस्परेटली शोधतोय कोणाला काही कल्पना आहे का?
ReplyDeleteबाय दी वे ते स्थळ काळ इत्यादी झक्कास जमलं आहे. पोस्ट उत्तम.
ReplyDeleteवा शिनुबाई.. बरेच समसुखी आहेत तर एकुणात !! बाकी त्या ऐश्वर्याच्या अॅडबद्दल मी कम्प्लीट अनभिज्ञ होतो (आयला वय झालं की काय?) .. बायकोने नुकतीच माझ्या सामान्य ज्ञानात भर घातली. बाकी लेक ऐश्वर्याकडेच बघतोय ना बघुदेत तर मग.. अरे हो आणि तेव्हाच पेज पण भरवून होते.. अजून काय हवं :-)
ReplyDeleteखूप आभार.. !!
As Usual मस्त झाली आहे रे पोस्ट....आदितेय चे फ़ोटो पाहीले असल्य़ने सर्व चीत्र डोल्य़ासमोर येतय..मला भेटायच आहे...
ReplyDeleteधन्स सागर.. :-) रोज असलेच प्रकार चालू असतात !!
ReplyDeleteआम्ही भारतात आल्यावर नक्की भेटूच..
भरपुर कंस असलेला,आदितेयचे पराक्रम दाखवणारा पेटंट हेरंब शैलीतील हा लेख छान जमला आहे... अगदि मनापासुन आवडला..बाकी आदितेयचा विषय असला कि तुम्ही खुपच रंगात येता हे मात्र नक्की...आता पुन्हा नवीन हल्ले-प्रतिहल्ले आणि नवीन व्यूहरचना [दोन्ही पक्षांना आमच्या शुभेच्छा..]
ReplyDeleteसुंदर!
ReplyDeleteहा हा देव.. आभार.. वाट लागते जाम आणि धमालही येते. :) .. अरे शुभेच्छांची गरज तर आम्हाला आहे. दुसरा पक्ष तर काय नेहमीच जिंकतो !!
ReplyDeleteखूप आभार प्रशांत आणि ब्लॉगवर स्वागत !!
ReplyDeleteहेरंब, काय मस्त वाटत होतं वाचताना... हा हा. आदी, लगे रहो. आमच्याकडे ओये ओये - तेच रे त्रिदेववालं गाण्ं लागलं की नुसती पळापळ. भरभर शोमूच्या खूशीने हसणा~या बोळक्यात पेज काय मऊभात काय कोंबायची नुसती तारांबळ चाले... आणि गाणे संपले की हा गधडा सगळे फूर्रर्रर्र.... करून टाके. आदी, बाबा ओरडला तर मला नाव सांग रे त्याचे... :)
ReplyDeleteaamacha Kanad (my son) pan asach hota re.. wachun aathawan zaali sagalyachi.. kase kase diwas aamhi kadhale tyala khayala ghalatana aamhalach mahit..khidakit basawun rastyawarachya sagalya gadya, manas mojun wyayachi pan jewan kahi sampayach nahi..
ReplyDeleteaata bol...
हा हा.. श्रीताई, मला आठवला तो त्रिदेवचा तू सांगितलेला किस्सा. सहीये. प्रत्येकाचा विक पॉईंट असतो. तो नीट पकडला की झालं. हल्ली आमच्या कडे छताला लावलेल्या लाईट्स आणि सिलिंग फॅनचं अप्रूप आहे. त्यामुळे प्रत्येक घास भरवला की सिलिंग फॅन दाखवला की तेवढाच जरा घास पटापट संपतो रडारड न होता.
ReplyDeleteआणि उशिरा रिप्लाय बद्दल सॉरी. पण मी मागेच कमेंट टाकली होती. पण ती इथे दिसत नव्हती हे मला आज कळलं.. :-)
कानद. वा छान नाव आहे.
ReplyDeleteअगदी अगदी. अग इथे सगळं शेम-टू-शेम चालू असतं. सगळी खेळणी, पुस्तकं, गाड्या, रस्त्यावरची माणसं संपली तरी जेवण आणि रडं संपत नाही :-)