Friday, April 9, 2010

चिदुभाऊ आणि नन्ना !!

"वाहिनी, चिप्या आहे का घरात?" त्याने आत शिरता शिरताच विचारलं.
"भाऊजी तुम्ही? अहो याना आत. इश्श आणि हे कधी नसतात घरात? बसा तुम्ही. मी बोलावते त्यांना. ते झोपले आहेत आतमध्ये"
"तो झोपला असेल तर नंतर येऊ का मी?"
"अहो छे हो त्यात काय."

जरा वेळाने चिप्या बाहेर आला. मित्राचा चेहरा बघताक्षणीच त्याने ओळखलं की काहीतरी गडबड आहे म्हणून.

"काय झालं?"
"अरे नेहमीचंच रे. खडूस बॉस, विचित्र ऑफिस अवर्स, अशक्य डेडलाईन्स आणि या सगळ्याचं आउटपुट म्हणजे सतत वैतागलेली बायको. ती चिडून माहेरी गेलीये. मी वेळेवर घरी यायला लागल्याशिवाय परत येणार नाही म्हणते. सारखं तुझं उदाहरण देऊन म्हणते की चिप्या भाउजी कसे वेळेवर येतात. वहिनी तिला भेटतात तेव्हा नेहमी सांगतात की तू कसा लवकर घरी येतोस, बायकोमुलांना वेळ देतोस, त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये, पिक्चरला जातोस. ते सगळं ऐकून तर ती माझ्यावर अजूनच चिडलीये. चिप्या, प्लीज मला मदत कर."
"ते चिप्या म्हणणं बंद कर बघू आधी. तू मला सरळ सरळ नावाने हाक मार किंवा स्पष्टपणे 'चिदुचा पीए' असं म्हण. हे चिप्या नको उगीच."
"बरं पण प्लीज सांग ना तुला हे सगळं कसं जमतं? ऑफिसचं काम, टेन्शन्स सगळं सांभाळून तुला कसा वेळ मिळतो?"
"अरे सोप्पं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला ऑफिसात काम नाही, टेन्शन नाही. माझा बॉस झक्कास आहे एकदम. त्याला कुठलंही काम करायचं नसतं. सगळ्याला नकारघंटा वाजवतो. मला काय त्याच्या नकारघंटेचा थोडा अभ्यास करून, थोड्या कारणांचा मीठ-मसाला टाकून फक्त भाषण टायपून द्यायचं असतं."
"म्हणजे"
"अरे कुठलंही काम, जवाबदारी आली की नन्नाचा पाढा वाचायचा. झालं काम.
"म्हणजे?"
"एक मिनिट थांब" असं म्हणून चिप्याने शेजारच्या टेबलावरची 'अहवाल' असं लिहिलेली फाईल उचलली. ती मित्रासमोर उघडून धरत त्याला ती वाचायला सांगितली. तो वाचू लागला.


=========================================
** (नन्ना) अहवाल क्र. १

विषय : परराष्ट्र आणि हल्ले
कालावधी : १ डिसे ०८ ते २८ फेब ०९

तपशील : ही सगळी शेजारील राष्ट्राची कारस्थानं आहेत हे आम्हाला ठाऊक नाही असं कोणीही समजू नये. त्यांच्या दहा जणांनी आमच्या शेकडो जणांचा जीव घेतला असला तरीही आम्ही त्यांच्यावर हल्ला करणार नाही. आमचं राष्ट्र हे शांतताप्रिय राष्ट्र आहे, आमचं सरकार, आमचे नागरिक शांतताप्रिय आहेत हे कोणीही विसरू नये. आम्ही प्रसंगी त्यांच्या (म्हणजे आमच्याच नागरिकांच्या) जीवाचं बलिदान देऊ पण भ्याडपणे युद्ध पुकारणार नाही. त्या दहामधला एकजण अशाच एकाच्या बलिदानामुळे आमच्या हाती गवसला आहे आणि त्याची योग्य पद्धतीने चौकशी करून, योग्य ते न्यायालयीन रितीरिवाज पार पाडून, त्याला उचित न्याय  देणं हे आमचं कर्तव्य असून त्यात आम्ही कसूर करणार नाही. आम्ही त्यांना सगळे पुरावे दिले आहेत व तेच पुरावे घेऊन मी त्या मोठ्या गोर्‍या साहेबाकडे जाऊन दाद मागितल्याशिवाय राहणार नाही. अशा या पुस्तकी आदर्श पद्धतीने न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आम्ही सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेऊन त्यांच्या मनात (आमच्या) शेजार्‍यांबद्दल योग्य ती जागृतता निर्माण करणं ही वाटते तेवढी कठीण गोष्ट नाही. न्याय हा झालाच पाहिजे आणि तोही योग्य पद्धतीनेच आणि त्यासाठी वर्षानुवर्षे थांबावं लागलं तरी आम्ही डगमगणार नाही. आमचं शांत राहणं म्हणजे आमची दुर्बलता आहे असं कोणीही समजू नये !!
प्रसिद्धी : इथे आणि इतर अनेक ठिकाणी.

** (नन्ना) अहवाल क्र. २

विषय : 'गुरु'चा निकाल आणि अर्ज
कालावधी : १ मार्च ०९ ते ३१ मे ०९

तपशील : 'गुरु'चं काय करणार असं सारखं सारखं विचारून त्रास देऊ नका. त्याने 'दयेचा अर्ज' दाखल केला आहे आणि 'दयेच्या अर्जांच्या' यादीत एकूण २८ जण आहेत आणि गुरुचा क्रमांक २२ आहे हे कदापि विसरू नका. त्या क्रमाने त्याचा नंबर जेव्हा येईल तेव्हा त्याच्या अर्जावर विचार करण्यात येईल हे तुम्हाला आधी सांगितलं नाहीये का? तर हे २२ आणि २८ हे दोन अंक तुम्ही कधीही विसरू नका !!! त्या यादीप्रमाणे त्याचा नंबर येईपर्यंत आम्ही काहीही करू शकत नाही.
प्रसिद्धी : इथे आणि इतर अनेक ठिकाणी

** (नन्ना) अहवाल क्र. ३

कालावधी : १ जाने १० ते ३१ मार्च १० (आणि इतरही अनेक प्रसंगी)
विषय : नक्षलवादी आणि भ्याडपणा

तपशील : नक्षलवाद्यांनी या देशातल्या कितीही लोकांना, पोलिसांना, निरपराध आदिवासींना हालहाल करून ठार मारलं आणि ते स्वतःला या देशाचे नागरीक समजत नसले तरीही आमच्यासाठी ते या देशाचे नागरीकच आहेत. नक्षलवाद्यांना बाहेरच्या देशातून, तेथील अतिरेकी संघटनांकडून कितीही मदत मिळत असली तरीही ते अतिरेकी नाहीत. अजूनही असे कितीही भीषण आणि भ्याड हल्ले झाले तरीही आम्ही त्यांच्याविरुद्ध लष्कराला पाचारण करणार नाही, हवाईहल्ले करणार नाही, कडक कारवाई करणार नाही. त्यांच्याशी लढण्यास पोलीस सक्षम आहेत. त्यांच्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर म्हणजे चर्चा आणि फक्त चर्चा. 'चर्चा करून प्रश्न सोडवणे' (कितीही सुटला नाही तरी निदान तसं चित्र निर्माण करणे) यावर आमचा पूर्ण विश्वास आहे.
प्रसिद्धी : इथे आणि इतर अनेक ठिकाणी

=========================================

हे आणि असे इतर अनेक छोटे छोटे तपशील, प्रसंग चिप्याच्या मित्राला अहवालांच्या फाईलमध्ये मिळाले आणि ते पाहून त्याने चिप्यासमोर अक्षरशः हात जोडले आणि म्हणाला "चिप्या, तुझा चिदुभाऊ खरंच महान आहे रे. कित्ती चुटकीसरशी सगळे प्रश्न सोडवतो. बाकीच्यांना झाला तरी त्याला आणि त्याच्या हाताखालच्यांना काहीच त्रास नाही. झक्कास नोकरी आहे बघ ही. बघ ना जरा चिदुभाउंना 'असिस्टंट चिप्या' हवाय का ते. मिळेल त्या पगारात नोकरी करायला तयार आहे मी." !!

----------

वरील सगळ्या प्रसंगांना चिदुभाऊ एकटेच जवाबदार आहेत असं आमचं मुळीच म्हणणं नाही. पण अनेक महत्वाच्या प्रसंगांत आणि निर्णयात देशाचे गृहमंत्री या नात्याने त्यांनी केलेली बेफिकीर, पळपुटी आणि बोटचेपी विधानं दुर्दैवाने सरकारची निष्क्रियता, ठोस आणि कडक निर्णय घेण्यातलं दौर्बल्य वेळोवेळी अधोरेखित करतात.

१. जसं २६/११ च्या तपासानंतर झालेल्या गोष्टी. आम्हाला सतत संयम राखण्याचं आवाहन करणारा गृहमंत्री (आणि संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री आणि पंतप्रधान वगैरे वगैरे) नकोय. काहीतरी ठोस कृती करण्याचं नुसतंच आश्वासन न देता तशी कृती करणारा आणि ती कृती जनतेच्या नजरेस आणून जनतेचा आत्मविश्वास आणि सरकारवरचा विश्वास वाढवणारा नेता हवाय. पुरावे आणि सुरक्षा अहवालांच्या कागदांची बाडं भारतातून अमेरिकेत नेऊन तिथल्या साहेबासमोर ती मांडून तीच आपल्या नोकरीची आणि जीवनाची इतिकर्तव्यता मानणार्‍या कुरियरबॉय आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यात काहीतरी ठळक फरक दिसायला नको का?

२. किंवा "अफझल गुरुच्या दयेच्या अर्जाचा क्रमांक २२ आणि आणि आधीच्या २१ अर्जांचा निकाल लागल्यावर त्याचा नंबर येईल" असली शाळकरी गणितं शिकवणारा गृहमंत्रीही नकोय. कारण २२ नंबरच्या व्यक्तीने जो भीषण गुन्हा केलाय तसा गुन्हा आधीच्या २१ व्यक्तींनी केलाय का हे तपासून बघून त्या अनुषंगाने उगाच लालफितीत न अडकता बाविसाव्या नंबरला विशेष घटना म्हणून बघून ताबडतोब त्या दृष्टीने काही हालचाल करणारा आणि संबंधितानांना हालचाल करायला भाग पडणारा आणि त्या दृष्टीने सारासार विचार करणारा नेता हवाय.

३. 'वंदे मातरम' इस्लामविरोधी असल्याचे कारण देत, मुस्लिमांनी हे गीत गाऊ नये, असा फतवा जमात-ए-उलेमा हिंद या मुस्लिम संघटनेने चिदुभाऊंच्या उपस्थितीत काढला अशी बातमी जेव्हा आली तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्या संघटनेचा निषेध करून हे अयोग्य असल्याची जाणीव त्या संस्थेला कडक शब्दात करून देणं आवश्यक होतं. असं केल्याने जनतेसमोर त्यांची प्रतिमा उजळली असती. असला बेअक्कल आणि देशद्रोही फतवा काढणं हे जेवढं धक्कादायक होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक हे धक्कादायक होतं की हा फतवा केंद्रीय गृहमंत्र्यांसमोर काढला जातो (निदान बातमी तरी अशीच होती.). परंतु अशा वेळी त्या संस्थेचा जाहीर निषेध करण्याऐवजी चीदुभाऊ पूर्ण वेळ रमले होते ते हे दाखवण्यात की असा असा फतवा जेव्हा निघाला तेव्हा मी तिथे कसा नव्हतो, माझ्या उपस्थितीत हे असलं काहीही झालेलं नाही हे दाखवण्यातच. अरे पण त्या फतव्याबद्दल तुमचं (आणि सरकारचं) अधिकृत मत काय हे सांगण्याची तसदी त्यांनी घेतल्याचं (निदान मला तरी) कधीच स्मरत नाही.

४. ही सर्व मूळं आत्ता उकरून काढण्याचं एकमेव कारण म्हणजे पुन्हा एकदा तीच निष्क्रियता आणि आम्ही कसे शांततेचे उपासक आहोत हे दाखवण्याची अहमहमिका आणि त्यापायी असंख्य निरपराध नागरिकांचा आणि पोलिसांचा नक्षलवादी जीव घेताहेत हे पाहताना, वाचताना होणारी सामान्य माणसाची तडफड. चिदुभाऊ आणि त्यांचे सहकारी आणि पगडीवाले साहेब लोक गेले कित्येक महिने कंठशोष करत आहेतच की "आम्ही नक्षलवाद्यांविरोधात हवाईहल्ला करणार नाही, लष्कराची मदत घेणार नाही, हे करणार नाही आणि ते करणार नाही.". काय करणार नाहीस ते कळलं. पण भल्या माणसा, काय करणार आहेस ते सांग की. काय करणार आहेस जेणेकरून अंगाची चाळणी होईपर्यंत गोळ्या घालून ठार मारणार्‍या, मुंडके कापून धड पाठवून देणार्‍या, अत्यंत कमी संख्येत असणार्‍या पोलिसांना चहुबाजूंनी घेरून त्यांना अतिशय क्रूर प्रकारे ठार मारणार्‍या, निरपराध आदिवासी लोकांना वेळोवेळी भीती घालून, धमक्या देऊन अनेकदा त्यांच्याही जीवाशी खेळणार्‍या नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट करू शकशील?? आदल्या दिवशी नक्षलवाद्यांना 'भ्याड' संबोधल्यावर दुसर्‍या दिवशी बदला म्हणून हजाराच्या वर नक्षलवाद्यांनी ७६ पोलिसांना घेरून त्यांना अत्यंत क्रूरपणे ठार मारल्यावरही दुसर्‍या दिवशी पुन्हा बोलताना "आम्ही हवाईहल्ला करणार नाही, लष्कराची मदत घेणार नाही, त्यासाठी पोलीस सक्षम आहेत" अशी निर्लज्ज विधानं करताना तुमची जीभ उचलली तरी कशी जाते??? बोला चिदुभाऊ, द्या उत्तर... !!

51 comments:

  1. या सगळ्या प्रकारात ज्या निरपराधींचा जीव जातो त्यातही तुमच्या चिदुभाऊंच्या खाती किंमत नाही(बोल्डमध्ये) हेच खरंय....असंच होत राहिलं तर अशा प्रकारांचा सामना करायला कुणी पोलिसखात्यात जावं असंही झालं तर आश्चर्य नको...सगळाच नन्नाचा पाढा...

    ReplyDelete
  2. हो ना.. आणि असे प्रसंग घडल्यावर चिदुभाऊ जी मुक्ताफळं उधळतात ना त्यामुळे तर फारच संताप होतो.. लोकांचा जीव महत्वाचा की यांच्या पक्षाची धोरणं???

    ReplyDelete
  3. मा. वटवट राव,
    आपण जे काही लिहलय त्याचा विचार करण्यासाठी निवृत्त न्यायधीशाची एकसदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे. ते आपल्या लिखाणाचा सखोल अभ्यास करून त्यावर एक अहवाल तयार करतील. तो अहवाल आम्ही मॅडम कडे पाठवू. मॅडम कडून हिरवा झेंडा मिळाल्यानंतर आम्ही तो अहवाल संसदेत मांडु. त्यावर विरोधी पक्षाच मत घेऊ. त्यानंतर अहवाल मिडीया कडे पाठवू. मिडीया व विरोधी पक्ष यांना जो जो आक्षेप असेल तो आम्ही खोडून काढण्याचा प्रयत्न करू. यानंतर लवकरच आम्ही त्या अहवालाची प्रत आपणास पाठवू. तो पर्यंत आपण रामदेव बाबा किंवा श्री श्री रवि शंकर अथवा तुमची ज्या कोणावर श्रद्धा असेल त्यांच्या कडे जाउन मन शांती साठी अभ्यास करा.

    आपला,
    चिदु भाउ.

    ReplyDelete
  4. मा. वटवट राव,
    आपल्याला हे लिहाण्यासाठी विरोधी पक्षाचा किंवा परकीय शक्तीचा काही मदत आहे का?? याची आम्ही पडताळणी सुरू केली आहे. आमच्या राजकीय अनुभवावरून तरी आमचा असा कयास आहे की हा विरोधी पक्षाचा आम्हाला बदनाम करण्याचा कट आहे.

    - चिदु भाउ

    ReplyDelete
  5. माननीय चिदुभाऊ,

    त्या अहवालाची प्रत घेण्यासाठी मी माझ्या नातवाला किंवा नातीला पाठवेन म्हणतो. किंवा यासाठी की तो/ती या जगात यायला अजून किमान ३० वर्षं आहेत. आणि त्यांना सज्ञान होण्यासाठी पुढची १८ वर्षं. ४८ वर्षं आपल्याला अहवालाची प्रत पाठवायला पुरेशी ठरवीत अशी माफक अपेक्षा. चला मी श्री श्री च्या आश्रमाच्या दिशेने चाललो.

    आपला कृपाभिलाषी,
    वटवटराव.

    -----

    मनमौजी, जब्बरदस्त प्रतिक्रिया दिली आहेस. माझ्या पोस्ट पेक्षाही मला तुझी प्रतिक्रिया आवडली. अप्रतिम !!

    ReplyDelete
  6. मा चिदुभाऊ,

    नाही हो. परकीय किंवा विरोधी कुठल्याच शक्तीचा हात नाही यामागे. होरपळणा-या संसारांची साथ मात्र नक्की आहे. करा काहीतरी लवकर !! :-(

    - आपला वटवटराव.

    ReplyDelete
  7. होरपळणारे संसार??? काही तरी चुकताय तुम्ही वटवटराव .... आम्ही नुकताच एक सर्वे केलाय त्यानुसार आमच्या कारकिर्दीत कोणताही संसार होरपळला नाही .... अन् जर अस असत तर त्याची झळ आमच्या वातानुकुलीत खोली पर्यंत नक्कीच पोहचली असती अगदी सर्व सुरक्षा व्यवस्था भेदुन. तुम्हाला तो सर्वे हवा असेल तर तुम्हाला ती पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.

    आपला,
    चिदु भाउ.

    ReplyDelete
  8. चिदुभाऊ,

    असं म्हणताय? बरं बरं.. तुमचा सर्व्हे म्हणतोय तसं म्हणजे मग खरंच नसेल होरपळला कुठला संसार. तुम्ही आणि तुमचा सर्व्हे चुकीचा कसा असेल? आमचंच काहीतरी चुकलं असेल. माफी द्या एक डाव.. :-(

    आपला वटवटराव.

    ReplyDelete
  9. मनमौजीची प्रतिक्रिया हीच चिदु किंवा तत्सम नेत्यांची असेल यात शंका नाही, मनमौजी एकदम मस्त...

    ReplyDelete
  10. न्यायाधीश महाराज... आता खरेतरं आपणच राज्यकारभार हातात घ्यायला हवा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे... :(

    राहून राहून मला शिवरायांची आठवण येते आणि आपण आज काय झालोय याची कधी कधी दया सुद्धा येते... लेख मस्त झालाय... मनमौजीच्या प्रतिक्रया सुद्धा मस्त... :)

    ReplyDelete
  11. तुम्ही आम्ही कितीही बोंबललो तरी परिस्थिती बदलणार नाही. गुरूचा नंबर येण्याआधी २०-२५ राजकारण्यांचा नंबर लागावा अशी माफक इच्छा आहे पण ती कधी ही पुरी होणार नाही हे ही माहीत आहे.

    ReplyDelete
  12. "सिलॅबसच्या बाहेरचा प्रश्न : फक्त अटेम्प्ट करा आणि पूर्ण मार्क मिळवा. " आम्ही भारतीय, आम्ही आमच्या या अशा जिवलग तत्वांना जागतो. गुरूची फाशी, कसाब, पाकिस्तान, नक्षलवाद... सिलॅबस जुना होतोय हो, आहात कुठे... आधीचे नापास झाले म्हणून आम्ही सिलॅबसच बदलतोय. प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा जमाना गेला... आता ज्यांची उत्तरं आमच्या हातात आहेत असेच नवनवीन प्रश्न आम्ही निर्माण करतो. पक्षाच्या "२१ अपेक्षित" मधे तुम्ही बावीसाव्याबद्दल विचारलंत तर कसं होणार?

    ReplyDelete
  13. हेरंब आणि मनमौजी, एकच शब्द : कडक !!

    ReplyDelete
  14. सुंदर ,,मस्त ...कडक

    ReplyDelete
  15. आनंद, अगदी खरं आहे. सध्या चिदुभाउंनी राजीनाम्याची जी नाटकं चालवली आहेत त्त्यावरून तर ते स्पष्टच होतं. मनमौजी तर बेष्टच !!

    ReplyDelete
  16. आभार लीना आणि ब्लॉगवर स्वागत !!

    ReplyDelete
  17. सिद्धार्थ, खरंच २०-२५ राजकारणी खपले पाहिजेत एकदम. आणि अर्थात यादीच काढायची झाली तर २०-२५ कशाला .. आकडा १०० च्या ही वर जाईल सहज.. !!

    ReplyDelete
  18. नचिकेत, बरोबर आहे. आपल्याला जुन्या सिलॅबस मधल्या प्रश्नांची उत्तरं सापडली नाहीत म्हणून सिलॅबस खरंच बदलतोय आपण... !!

    आभार ... !

    ReplyDelete
  19. रोहन, तुझ्या प्रतिक्रियेला आधीच उत्तरं दिलं होतं पण दिसतच नाहीये :( .. पुन्हा टाकतो.

    खरंच रे भयानक प्रकार आहे. ७६ पोलिसांच्या मृत्यूची बातमी वाचून मी हादरून गेलो होतो आणि तरीही दुस-या दिवशी हे येऊन तोंड वर करून म्हणतात की "आम्ही लष्कराची मदत घेणार नाही, हवाईहल्ले करणार नाही" ... मग काय अजून असेच पोलीस आणि निरपराध नागरिक मारण्याची वाट बघणार? अरे निदान लष्करी कारवाईचि धमकी तरी द्या !!!!!

    खरंच रे शिवराय हवेत. निम्म्यांचा चौरंग आणि उरलेल्यांना टकमक टोकावरून किंवा हत्तीच्या पायी... !!

    आभार.. !

    ReplyDelete
  20. हे ईवढे कसे थंड असतात रे? का आपलच काही तरी चुकतय .?

    ReplyDelete
  21. खरंय रे .. यांचा हा थंडपणा जीवघेणा आहे.. :(

    ReplyDelete
  22. >>पुन्हा एकदा तीच निष्क्रियता आणि आम्ही कसे शांततेचे उपासक आहोत हे दाखवण्याची अहमहमिका आणि त्यापायी असंख्य निरपराध नागरिकांचा आणि पोलिसांचा नक्षलवादी जीव घेताहेत हे पाहताना, वाचताना होणारी सामान्य माणसाची तडफड.

    ---manatala bolalaas re!

    ReplyDelete
  23. विद्याधर, खरंच खूप वाईट वाटलं रे ती बातमी वाचून .. आणि वर दुस-या दिवशी यांची तोंड वर करून उधळलेली मुक्ताफळं आणि राजीनाम्याची नाटकं :-( .. फालतूगिरी आहे साली सगळी...

    ReplyDelete
  24. Mitra mast ch jamlay...

    Naxalvadyancha prashn kai kinva rather kontach prashn kai tyana sodavayacha ch nahiye.

    Tyana fakt to sodavayacha prayatn kela as dakhavayach aahe.

    aani aapan hyavar chid chid karanyapalikade kahi hi karu shakat nahi....

    aapan rajkaranat jau shakato. pan tyasathi personal life sacrifice karayachi tayari havi.

    aani jo manus ashi tayari dakhavato..to natural instinct ne aadhi swatacha aani mag jamalyas lokancha fayada karanyacha prayatn karato.
    Shivaji, Churchil he khup ch dhyeyvadi lok hote rao....

    tyanchya nakhachi hi sar nahi aaj aapalyatalya konalahi.

    aani mala as vatat ki ha global phenomenon aahe.

    so chinta nasavi. aapan so called buddhijivi lok blogging karun maja gheuya....

    in short mi hi fakt samitya ch nemu shakato.

    BLOG_SAMITYA jindabad.

    jar pratikriyene konachya bhavana dukhavalya astil tar kshamasv. ji fact vatali ti lihili.

    ReplyDelete
  25. प्रसन्न, ब्लॉगवर स्वागत आणि एवढ्या तपशीलवार प्रतिक्रियेबद्दल आभार. आणि छे भावना दुखावण्याचा वगैरे संबंधच नाही. तुला जे वाटलं ते तू लिहिलंस.

    पण या बातम्या वाचून चीडचीड आणि संताप तर होतोच. आणि तो घालवायला किंवा निदान अजून काही लोकांना त्या चीडचिडीची ढग जाणवून द्यायला सध्यातरी आपल्याकडे ब्लॉग हेच माध्यम आहे. त्यामुळे जोवर इतर काही करू शकत नाही तोवर नुसतंच गप्प बसण्यापेक्षा निदान ब्लॉगवर तरी काहीतरी लिहायचं इतकंच !!

    ReplyDelete
  26. हेरंब...अगदी योग्य लिहिले आहेस, सर्वांनीच विचार करायला हवा...

    जलजले तो अपने भी खून में है और आँखों में है आंधी...

    ReplyDelete
  27. शेखर, खूप आभार.. सत्तेतल्या पांढर्‍या हत्तींचे डोळे उघडले तर नशीब !!

    ReplyDelete
  28. Saglyachi sarmisal nako

    नैतिकतेचे अस्त्र!
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61585:2010-04-11-14-57-28&catid=30:2009-07-09-02-02-22&Itemid=8

    सुरक्षादलं रक्षन्ति रक्षित:
    http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=61435:2010-04-10-15-34-24&catid=55:2009-07-20-04-00-45&Itemid=13

    Mrunal

    ReplyDelete
  29. There is reason why military option is not utlized against the Naxalites-

    As per the constitution if one has to deploy the arm troop in internal security matter first central govt has to implement- Armed Forces Act 1958. Which gives them power to use force against any group person who takes law in their hand. This is the same law which in place at North East and some part of J &K

    As of now out of the 626 districts of India 200 are affected by Naxalite movement. So we are talking about 1/3 of country being occupied by Armed Forces which is like Military rule in the country

    There are other impacts also for details read the following link-

    http://in.news.yahoo.com/248/20100412/1585/tnl-why-army-can-t-get-green-light-to-ma.html

    Mrunal

    ReplyDelete
  30. तिकडं चिदुभाऊ आणि इकडं आरं आरं आबा…. नक्षलवादी हल्ले करतात, अतिरेकी हल्ला करतात…. दिवसाढवळ्या राजरोस गुन्हे, बलात्कार होतात…. पण आम्ही फकस्त स्टेटमेंट देतो मीडियासमोर! सगळं आलबेल आहे, दोष आमचा न्हाय, आम्ही पुरेशी काळजी घेतली हाय आणि अजून बरंच काय काय….
    रोजच्या ह्यांच्या कोलांट्या उड्या पाहिल्या तर डोंबारी सुध्दा लाजेल!

    ReplyDelete
  31. waa bhau.. ekdum mast aani samanyanchya mantla lhilas..... magchya janmat band pathkat vaigire hotas ki kaay re mitra?? Nahi mhanje sagLyanchi ashi mast vajwvtos mhanun mhantla... :)

    ReplyDelete
  32. मृणाल, तुझ्या दोन्ही प्रतिक्रियांना इथेच उत्तर देतो.

    स्वानंद विष्णु ओक यांच्या लेखात त्यांनी सीआरपीएफच्या जवानांनी काय आणि कसं करायला हवं होतं ते लिहिलं आहे परंतु शेवटी ते ही म्हणतात की

    "आणि त्याची जबाबदारी कोणावर (राजकीय व्यक्तीवर!) या सारख्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळत नाहीत. दांतेवाडय़ाच्या चकमकीने
    नक्षलवाद्यांविरुद्ध लढण्यासाठी आपल्याला ‘अर्धशिक्षित पोलीस’ लागणार आहेत की ‘जवान’ हवे आहेत याचा एकदा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. याचा निर्णय योजनाकर्त्यांनी आता केला तरीसुद्धा दांतेवाडय़ाच्या जंगलात बळी गेलेल्या सीआरपीएफच्या जवानांची आहुती कामी आली असे म्हणता येईल."

    सुनील चावके यांचा लेख म्हणजे टिपिकल लोकसत्ता, कुमार केतकर टाईपचा आहे. काँग्रेस म्हटलं की या लोकांना देव, संत असे लोक दिसायला लागतात. अशा लोकांकडून निष्पक्षपाती लेखाची अपेक्षा करणं हे मुळातच चूक आहे. त्यामुळे चावक्यांनी चिदुभाऊच्या राजीनाम्याच्या नाटकाचं कौतुक करणं यात मला तर कुठेही नवल वाटलं नाही. त्यांनी निदान एकदा तरी डोळे उघडून किंवा लोकसत्ताची काँग्रेसची जोखडं झुगारून देऊन मुक्त पत्रकार म्हणून लेख लिहिला तर ते काय लिहितील हे वाचायला मला आवडेल. (ते लोकसत्तामुले काँग्रेसला झुकतं माप देत आहेत असा आपला मी त्यांना संशयाचा फायदा देतोय. असो.)

    Honestly I dont give a damn to constitution and acts and special rights... Please enlight me whether these jargons are for common man or common man is for them? I'm a common man asking for a basic right for living safe life who least cared about what, who and which amendments, acts, rules and laws halts a govt from providing me my rights.

    Another imp thing is common man just didnt get up one fine day and asked govt to do something about naxalites. This so called naxalite movement is few decades old and due to neglegence of govt which keeps calling naxalites as citizens of India (which naxalites dont like them to be called as though) now the common man and cops too are losing their lives. And why still govt doesnt want to take strict military action against them is completely out of my understanding. To sum up, The lives are more imp than the numbers, jargons and statistics. Do something to save the lives, statistics will improve on their own !!!

    ReplyDelete
  33. अगदी योग्य उपमा दिली आहेस अरुंधती. फक्त स्वतःचा विचार करणारे हे निरुपयोगी जीव देशाला काय वाचवणार?? यांच्या या कोलांट्या उड्यांबद्दल मागे लिहिलं होतं एकदा..

    http://www.harkatnay.com/2010/02/blog-post_03.html

    ReplyDelete
  34. आभार अमित. अरे सगळी प्रसार माध्यमं याच लोकांनी विकत घेतलेली. यांच्याविरुद्ध लिहिणार कोण? त्या चिदुभाऊच्या राजीनाम्याला डोक्यावर घेणार हे लोक. त्यामुळे आपल्यासारख्यांनाच वाजवावी लागते अशा लोकांची. आणि अर्थात वाजवताना मी मिडीयाला पण सोडत नाहीच :-)

    ReplyDelete
  35. नक्षलवादी भ्याड आहेत हे सांगायला जाणारे स्वता पोलीस फौजफाटा घेऊन जातात तिथे यावरून नक्की कोण भ्याड आहे हे लक्षात येतेच
    बाकी जोरदार पोस्ट सर्वसामान्य मनात हेच आहे पण हे त्या चिदु भाउला कधी कळणार देव जाणे.

    ReplyDelete
  36. आभार विक्रम.. खरंच. भ्याड कोण हे तर जगजाहीर आहे. चिदुभाउचे डोळे उघडतील तो सुदिन. !! तोवर रोज नक्षलवाद्यांनी अजून किती निरपराध ठार केले हेच वाचणं आपल्या नशिबात आहे.. :(

    ReplyDelete
  37. मृणाल, जमलं तर हेही वाच ..

    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5786010.cms

    ReplyDelete
  38. यशवंत, ब्लॉगवर स्वागत.
    आपली प्रतिक्रिया मला कळली नाही. विस्ताराने सांगू शकाल?

    ReplyDelete
  39. get your facts right...
    Army, air force are specialised for somethings extra. And don't be under impression that Army will solve Naxalites problems to 100%...
    Look at what's happenning in North east...

    Don't just react to the situation be wise enough to suggest the solutions....

    I believe Chidambaram has some serious strategy while dealing with Naxalism...Talk about strategy, criticise his plan....

    Most ridiculous part is that you have said you don't give a damn abt constitution etc....

    Ask what does that mean to someone in Pakistan or ....any place where dictator is ruling (or even China).

    Tu he lihu shakatos aani tuze followers tyachi vah vah karu shakata yache karanach muli constitution chya rule madhye aahet...anyways

    you have freedom to write you whatever you feel like on your blog....without caring about its correctness....

    ReplyDelete
  40. Get YOUR facts right and dont act like stupid media to pickup any statement randomly and blow it out of proportion !!!! You have done it earlier too.. Dont repeat the mistake at least !!
    I didn't mention anything about constitution in my post. While explaining "Why army action is not possible" Mrunal gave a link to some news which was speaking a lot of things about how it is not possible due to some laws and some acts.. Am pretty sure you haven't read it So giving it again here for your benifit.

    --------------------
    As per the constitution if one has to deploy the arm troop in internal security matter first central govt has to implement- Armed Forces Act 1958. Which gives them power to use force against any group person who takes law in their hand.
    --------------------

    The word constitution came in picture from here.. I can't be more clear than this and dont want to be !!

    >> Army, air force are specialised for somethings extra. And don't be under impression that Army will solve Naxalites problems to 100%...

    Per your views whatever naxalites are doing shudnt be considered as special thing or doesnt require a special action by army. i cant help what u think. but I seriously doubt whether u are even closer to understand what those 76 families and thousands of others are goign thru and have gone thru. You think it's not serious coz you, me or anyone in our closer circle havent lost his/her nears n dears coz of naxalites bomb or bullet.
    I never claimed military action will resolve the naxalites prob 100% but am pretty sure the situation wud be much much batter than that of today...


    >>>Don't just react to the situation be wise enough to suggest the solutions.... I believe Chidambaram has some serious strategy while dealing with Naxalism...Talk about strategy, criticise his plan....

    If you carefully read the post again, u'll realised I'm strongly suggesting the army action. If you cant get that due to the the humour factor in it, it's ur problem. Would you be kind enough to enlightenme what 'serious strategy' does Mr Chidambaram have in his mind. Coz at least those are invisible to my bare ears and eyes...

    >>> Ask what does that mean to someone in Pakistan or ....any place where dictator is ruling (or even China).

    I never suggested dictator ruling. Dont put words in my mouth..

    >>>Tu he lihu shakatos aani tuze followers tyachi vah vah karu shakata yache karanach muli constitution chya rule madhye aahet...anyways

    Koni wah wah karanyasathi mi lihit asato tar tula evadh kharamarit uttar dil nasat. tujhya praikriyach hi kautuk ch kel asat. tujha mukhya aakshep 'mi lihilay' tyavar aahe ki 'lokanna te patalay' yavar aahe he mala tari kalalel nahi.

    >>>you have freedom to write you whatever you feel like on your blog....without caring about its correctness....

    At least one thing u got right out of this post.. Yeah.. I have freedom to express my thoughts and i'll do it coz my blog/mind/brain is not run by some corporate media house. am very ordinary man who happened to share common man's feeling and those will reflect in my write-ups.. problem with that? u can stop reading it. doesnt matter to me.

    I challenge you to find out the "incorrect" things in my post or overall blog with proofs and if they are right i'll accept it. Dont just bark without the proofs... !!!

    ReplyDelete
  41. लेख आणि मनमौजींची प्रतिक्रिया दोन्हीही अव्वल...अगदि मनातल लिहलस...अश्या घटना घडत असतांना हे इतके शांत निष्क्रिय कसे राहु शकतात याचच आश्चर्य वाटते,नैतिक जबाबदारी घेउन नुसता राजिनामा दिला कि आल इज वेल अस का वाटत हया लोकांना काही कॄती करायला नको का...कधी कधी डोक अस तापत हा सगळा विचार करुन...अमुक अमुक इतकेच लोक मेले त्या हल्ल्यात किंवा आत्महत्या करणारया शेतकर्यांची संख्या अमुक एक आकड्याने कमी झाली अशी ह्यांची निर्लज्जपणे केलेली विधान ऐकली कि कीव येते हयांच्या मेंदुची...

    ReplyDelete
  42. Don't have enough time so trying to keep it short... Govt has adopted 3 way strategy while dealing with Naxalism. Clear, hold and build. Clear is clearing the densely forested but deeply entrenched area by naxals, hold your control and then based on first 2 steps create / build development.
    Naxal problem is much more complex than any other terrorist activities. Naxalaites are much more cruel, they have well established network and support in rural areas and even enjoy support (voluntary and coerced) from local people. They have lots of arms and ammunition.
    If you happen to know in last 3 years 70% people (of force) have died in land mines / trigger bombs which is a technological innovation and if you have noticed many people in Dantewada also, died because of such mines.
    These mines were placed at the places where covering took places and not on paths....
    Problem is that these Naxalites are so intrinsicly mingled with common people that if Army is invited, it has to wage war against its own people. That's why army chiefs (more articulate was airforce) as well are not so much in favour of leading these operations.

    Greyhounds of Andhra Pradesh (special cell of police) has recorded a impressive record against Naxalism.
    K.P.S Gill could do it with Khalistan terrorists in Punjab...
    Common people in north east India are not too happy with presence of Indian Army there. I hope you remember naked protests against Indian army there.
    I am not taking name of J and K here...

    This naxalite war is supposed to go on for around 3 years and action has just begun.

    What Chidambaram has done is he has shown some real interest in solving the problem. He has gathered support from all the state govts including those of BJP and left parties.

    You will see despite of such dreaded attack, main opposition parties (barring Mulayam Singh) are extending support to govt. And are not playing dirty politics. I am not trying to say what strategy is in place is full proof or killing of 76 CRPF jawans are pardonable....
    Even I don't support all the strategies of Govt. But that doesn't mean govt. is doing nothing. At least in this case, fighting against naxals, we are seeing concerted actions from govt. And you are failing to recognise that.
    Will try to give you some examples where armies failed to curb such movements next time.

    Aso, Whoever is fighting against Naxalites be it army or police has to be specially trained for that.

    baki Vande Mataram, Afzal Guru....mudde ekdam manya. But fight against Naxalism is really taking place and we should recognise that.
    Aso lihita lihita barech lihile....

    ReplyDelete
  43. खरंय देव.. इतकी निष्क्रियता बघून आपलंच रक्त उसळतं पण हे ढिम्म असतात.. :( !!!

    ReplyDelete
  44. Vinod, No comments except I'd have appreciated if this exact comment would have been your first one rather than the actual first one which was clearly pre-determinied, pre-decided, biased and without even making a tiny effort to read my post first (u can deny it now, but it appeared to me like that clearly) !!!!!!!

    >>"I am not trying to say what strategy is in place is full proof or killing of 76 CRPF jawans are pardonable...."

    यातच सगळं आलं. मी पण थोड्याफार फरकाने हेच म्हणत होतो. असो.

    पुन्हा एकदा सांगतो, जनक्षोभाला मुर्खपणाचं, अपरिपक्वतेचं आणि अप्रगल्भतेचं लेबल लावणारे बुद्धिवादी हे या नक्षलवाद्यांएवढेच दोषी आहेत. कारण त्यांच्या बुडाखाली सत्ता असते, हातात (विकलेली) लेखणी असते आणि त्यामुळे जनमत दाबून मनमानी करायला ते मोकळे असतात. इतके वर्षं चालणारी हिंसा पाहून पाहून जनक्षोभ उसळला आणि तो ब्लॉग्स (हो फक्त ब्लॉग्सच, कारण ब्लॉगर्सना स्वतःचा मेंदू आहे, वृत्तपत्रं तर राजकारण्यांची बटिक आहेत.) च्या माध्यमातून पुढे आला तर ब्लॉगर्सना मुर्ख म्हणून हिणवण्यापेक्षा एवढा प्रक्षोभ का उसळला आहे हे सरकारने आणि बुद्धिवाद्यांनी चष्मे उतरवून बघण्याची गरज आहे. !!

    असो. या विषयावरचा/पोस्टवरचा हा माझा शेवटचा प्रतिसाद. याच्या पुढच्या प्रतिक्रियेला मी उत्तर देणार नाही !!

    ReplyDelete
  45. हेरंब, आजकाल मन आणि मेंदू दोघेही बथ्थडच्या पुढच्या स्टेजमध्ये गेलेले असल्याने केवळ उघड्या डोळ्यांनी घडेल ते पाहावे आणि ठेविले सरकारे पाहावे ( दुर्दैवाने-नाईलाजाने-षंढपणे ). राजिनामा देणे हा प्रकार निव्वळ स्वत:ची चामडी बचावण्यासाठीच... तेही अतिशय नाटकीपणे. म्हणजे घडलेली भयंकर घटना राहिली बाजूलाच आणि यांच्या या फालतूपणाचाच सगळीकडे उहापोह. लाज कशी वाटत नाही कोण जाणे... तुझ्या शेवटच्या प्रतिक्रियेतील शेवटून दुस~या पॅराशी १००% सहमत.

    ReplyDelete
  46. श्रीताई, हा सगळा प्रकारच विषण्ण करून टाकणारा आहे. हाकणारं षंढ सरकार आणि मेंढरांसारखे चालणारे आपण :-( .. आणि ते राजीनाम्याचं तर निव्वळ नाटक होतं. कारण दुसर्‍या दिवशी जेव्हा चिदंबरमवर टीका झाली तेव्हा त्याने आधी स्वतःचा बचाव करून, पोलीस कसे चुकले हे सांगून आणि अजून अशीच काहीतरी बडबड केली होती. राजीनाम्याचं सुचलं ते त्याच्या नंतर म्हणजे जेव्हा मिडियाने अजून जोरकस हल्ला केला त्यानंतर..

    ReplyDelete
  47. या अशा नेत्यांना निवडून देणार्‍या लोकांचीच खरी चूक आहे. अजूनही मतदान १००% होत नाही. कधीही आणि कुठेही. सुशिक्षित लोक अजूनही मतदानाला बाहेर पडत नाहीत; उलट मतदानाचा दिवस म्हणजे हक्काचा सुटीचा दिवस असं समजतात. आणि मग एका दारूच्या बाटलीच्या सहाय्याने किंवा ५०-१०० रुपये तोंडावर फेकून एकगठ्ठा मतं विकत घेतली जातात.कशी अपेक्षा करणार या अशा निवडून आलेल्या लोकांकडून काही सेन्सिबल बोलण्याची किंवा करण्याची? अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायचा असेल किंवा प्रतिकार करायचा असेल तर हिंमत लागते, धैर्य लागतं, प्रसंगी जनमताच्या विरोधात जाऊनही आपल्याला हवं ते करण्याची धमक लागते अंगात. दारूच्या बाटलीच्या जोरावर निवडून आलेल्या अशा हिजड्यांकडून ती अपेक्षा कशी करणार?

    ReplyDelete
  48. खरंय.. राजकारण्यांच्या बरोबरीने सामान्य मतदार जवाबदार आहे या सगळ्याला. पण तरीही चिदुभाऊचि चीड आणणारी निष्क्रियता डोक्यात जातेच !

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...