नारद मुनींच्या उपदेशाने पश्चाताप झालेला वाल्या कोळी तप करायला बसला आणि १२ वर्षं तप केल्यावर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला.वाल्मिकी ऋषींनी "रामायण" लिहिलं. त्यानंतर रामजन्म, स्वयंवर, सीता हरण, राम-रावण युद्ध, रावणाचा वध वगैरे वगैरे गोष्टी रामायणात सांगितल्याप्रमाणे घडत गेल्या.
ओके. रिवाईंड रिवाईंड....
नारद मुनींच्या उपदेशाने वाल्या कोळ्याचे डोळे उघडले. तो नारद मुनींना शरण गेला तेव्हा त्यांनी त्याला १२ वर्षं "राम राम" असा जप करायला सांगितला. वाल्या कोळ्याने केलेल्या अनेक पापांमुळे त्याला "राम राम" (देवाचं नाव असल्याने) म्हणता येईना. तेव्हा नारद मुनींनी त्याला "मरा मरा" असं उलट म्हणायला सांगितलं जेणे करून आपोआपच त्याच्या तोंडून देवाचं नाव येईल. अशा तऱ्हेने १२ वर्षं तप केल्यावर वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी झाला.
शंका क्र. १ : वाल्मिकींनी रामायण लिहिल्यानंतर श्रीरामाचा जन्म झाला हे लक्षात घेतलं तर नारद मुनींनी वाल्या कोळ्याला (कमीत कमी) १२ वर्षांआधीच रामाचा जप करण्यास सांगितलं हे कसं शक्य आहे? तेव्हा तर राम (राम नावाचा देव) अस्तित्वातच नव्हता.
शंका क्र. २ : वाल्मिकींनी आधीच लिहिलेलं रामायण श्रीरामाच्या काळात कोणीच कसं बघितलं नाही. ते बघितलं असतं तर कदाचित सीता हरण, सीतेला वनात सोडणे यासारखे प्रसंग टाळता आले असते. नाही का?
डिस्क्लेमर :
१. मी नास्तिक नाही. माझा देवावर विश्वास आहे.
२. मी अ.नि.स. किंवा इतर कुठल्याही तत्सम संस्थेशी/संघटनेशी संबंधित नाही.
वर दिलेले प्रश्न हे मला जेन्युईनली पडलेले प्रश्न आहेत.
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Wednesday, January 6, 2010
Tuesday, January 5, 2010
संमेलनं ... वैचारिक गुलामगिरीची !!
राष्ट्रकुल देशांमधील संसद सभागृहांचे अध्यक्ष आणि पीठासीन सभापतींच्या संमेलना विषयीची बातमी आत्ताच वाचली. त्यात म्हटल्याप्रमाणे
"त्यात ४२ (राष्ट्रकुल) देशांच्या संसदांचे ५० अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी भाग घेत असून ३४ संसदीय महासचिवांसह २५० प्रतिनिधी दिल्लीत आले आहेत. भारतातील राज्यांचे ३४ विधानसभा अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारीही यामध्ये सहभागी होणार आहेत."
बातमीत पुढे म्हटलंय कि
"राष्ट्रकुल देशांच्या प्रतिनिधींना भारतीय लोकशाहीच्या विविध पैलूंचे दर्शन घडवण्यासाठी एक खास प्रदर्शन आयोजिन करण्यात आले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या संमेलनात सभागृहाच्या अध्यक्षांची मध्यस्थाची भूमिका, कामकाजातील निष्पक्षतेचे रक्षण, संसदीय कामकाज प्रणालीचा विकास व संवर्धन, संसदीय कामकाजात नव्या तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी विषयांवर चर्चासत्रे होतील."
थोडक्यात म्हणजे फारच मोठा थाटमाट असलेल्या या संमेलनात विविध देशांचे पंतप्रधान, राष्ट्रपती यांसारख्या मोठ्या असामी भाग घेणार आहेत तर. छान छान. कुठल्याही संमेलनाला, कार्यक्रमाला एक सूत्र असतं किंवा अमुक अमूक लोक त्यात भाग घेतील असा नियम असतो. तर त्याप्रमाणे या संमेलनात राष्ट्रकुल देशांच्या प्रतिनिधींची उपस्थिती आहे. राष्ट्रकुल देश म्हणजे जे देश ब्रिटीश वसाहतीचे घटक होते किंवा थोडक्यात ज्या देशांवर ब्रिटिशांनी एके काळी राज्य केलं आहे किंवा जे देश ब्रिटिशांचे अंकित होते असे देश. अशा देशांच्या समूहाला राष्ट्रकुल देश म्हणतात (कॉमनवेल्थ नेशन्स)...जस्ट इन केस.. :-)
हे संमेलन का झाले, कशासाठी झाले, त्याचे उद्दिष्ट काय, त्यातून काय निष्पन्न होईल झाले या सर्व तपशिलात शिरण्याएवढे माझे या विषयाचे ज्ञान नाही आणि तो या लेखाचा विषयही नाही. माझं म्हणणं साधं सोपं आहे. या संमेलनात भाग घेण्याचा निकष काय तर जे देश राष्ट्रकुल-देश आहेत, कॉमनवेल्थ नेशन्स आहेत किंवा जे एकेकाळी इंग्रजांचे गुलाम होते ते देशच यात भाग घेऊ शकतात. यापेक्षा दुसरी मानहानीने बरबटलेली अट नसेल कुठल्याही संमेलनात, कार्यक्रमात, स्पर्धेत भाग घेण्यासाठी. भारतीयांच्या किंवा एकूणच राष्टकुल देशांच्या मानसिक गुलामगिरीचा एक उत्तम नमुना आहे हा. म्हणजे तुम्ही एकेकाळी आमचे गुलाम होतात (आणि अजूनही मानसिक गुलाम आहातच) हे इतर जगाला सांगण्याची सुपीक डोक्याच्या इंग्रजांची पद्धत. आणि आपणही ते मारे एवढे मिरवतो, त्याला एवढ महत्व देतो की आपल्या राष्ट्रपती इंग्लंडला जाऊन इंग्लंडच्या राणीबरोबर राष्ट्रकुल स्पर्धांच्या ज्योतीचं उद्घाटन करतात. मी साधारण हेच मुद्दे माझ्या या पूर्वीच्या "स्पर्धा ... वैचारिक गुलामगिरीची !!" या राष्ट्रकुल स्पर्धांविषयीच्या लेखातही मांडलेले आहेत. (थोडाफार सारखाच विषय असल्याने काही मुद्द्यांची कदाचित पुनरुक्ती होईल त्याबद्दल क्षमा करा.) पण हे राष्ट्रकुल संमेलन म्हणजे मला तर राष्ट्रकुल स्पर्धांपेक्षाही भयंकर वाटतं. राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्या त्या देशांचे फक्त खेळाडूच सामील होत असतात. पण या संमेलनांसारख्या कार्यक्रमात तर वर म्हटल्याप्रमाणे चक्क त्या त्या देशांच्या राष्ट्रपती/पंतप्रधान दर्जाची लोकं उपस्थित असतात.
माझा विरोध त्या संमेलनाला किंवा राष्टकुल स्पर्धेला नाही तर त्याच्या नावाला, त्याच्या निकषाला आहे. हे म्हणजे आपण स्वतंत्र होऊनही ते स्वातंत्र्य नाकारून पारतंत्र्यात असताना आपण सगळे (देश) कसे एकत्र (दु:खात) होतो आणि कसे इंग्लंडच्या राणीशी स्वामीनिष्ठ होतो आणि त्याच समान धाग्याने आपण कसे बांधलो गेलो आहोत वगैरे वगैरे दाखवणारे हे भिकेचे डोहाळे हवेतच कशाला? आता आपण ब्रिटिशांचे सेवक नाही, ती ब्रिटीश बाई आपली राणी नाही हे आपल्या सरकारला माहित्ये ना? , लक्षात आहे ना? पटतंय ना ? मग तरीही ही एके काळच्या परकीय सत्तेच्या खुणा दाखवणारी जोखडं गळ्यात मिरवत फिरण्याची हौस का? आवश्यकता काय त्याची? आणि तेही सरकारी दर्जाचं, आंतरराष्ट्रीय पातळीवर.. कमाल आहे..
संमेलनाचं नाव बदला, निकष बदला आणि छोटे/मोठे, गरीब/श्रीमंत/ मध्यम, हिंदू/मुस्लीम/धर्म-निरपेक्ष, पूर्व/पश्चिम/दक्षिण/उत्तर, आशियातील/आफ्रिकेतील/ अमेरिकेतील देशांचं संमेलन असं किंवा यासारखं कुठलंही साधं पण कुठल्याही शाब्दिक, वैचारिक गुलामगिरीआड लपलेलं नसेल असं नाव द्या.
मला माहित नाही पण यात ब्रिटनचा किंवा ब्रिटीशांचा हात असण्याची शक्यता कमीच आहे. अर्थात म्हणजे जेव्हा त्यांचा या देशांवर अंमल होता तेव्हा ठीक आहे पण आता काही ते अशी हाळी देत नसावेत कि आमच्या एके काळच्या गुलाम राष्ट्रांनो, तुमचं संमेलन/स्पर्धा घ्या हो SSS .. आणि समजा आपण धरून चालू कि आपण ब्रिटनच्या सांगण्यावरून/आग्रहावरून अशी संमेलनं/स्पर्धा भरवत आहोत पण मग आपलं सरकार अशा गोष्टींना नाही का नाही म्हणत की "नाही बाबा आम्हाला हे मान्य नाही. आम्ही आता स्वतंत्र आहोत, स्वायत्त आहोत, छुप्या गुलामगिरीच्या या खुणा मिरवत राहायची आमची आता इच्छा नाही. आम्ही आता राष्ट्रकुलातून बाहेर पडत आहोत. राष्ट्रकुल या नावाने आम्हाला कुठलीही विनंती/आदेश/संदेश आला तर आम्ही त्याला सरळ केराची टोपली दाखवू.". इतर सरकारांनी काय करावं हा त्या त्या देशांचा अंतर्गत प्रश्न आहे. आपण आपल्या सरकार विषयीच बोलू. पण आपल्या सरकारला (यात कॉंग्रेस/बिगर कॉंग्रेस सगळे आले) ही छुपी वैचारिक गुलामगिरी आहे हे कळतं का? समजतंय का? जाणीव आहे का? कारण आधी म्हटल्याप्रमाणे इंग्रज मायबाप सरकार देवाचं सरकार होत असे मानणारे, म्हणणारे महाभाग तेव्हाही आणि आत्ताही काय कमी होते/ आहेत?
कोणीतरी ही सुरुवात करायलाच हवी. राष्ट्रकुल देशांमध्ये भारत त्यामानाने बलाढ्य, तुलनेने प्रगत देश आहे आणि समजा नसला तरी आपल्याला मान्य नसलेल्या, आपल्या तत्वात बसत नसलेल्या गोष्टींना कितीही आंतर-राष्ट्रीय दडपणं आली तरी जाहीर नकार देण्यात आपल्याला भीती कसली? कोणाची?
तळटीप : राष्टकुल परिषदेचे इतरही काही विधायक हेतू/निकष असतील तर मला माहीत नाही. पण राष्टकुल म्हणजे इंग्रजांचे एकेकाळचे गुलाम देश एवढा निकष तर मला नक्की माहीत आहे. मुद्दाम मी विकीदादा कडून पण खात्री करून घेतली. माझा मुद्दा चुकला असल्यास जाणकारांनी कमेंट्स मध्ये माहिती टाकावी.
Monday, January 4, 2010
हरकत नाय !!
आधी म्हंटल्याप्रमाणे २ दिवस वाट बघूनही त्या ब्लॉग मालकाचं काहीच प्रत्युत्तर न आल्याने त्याची लिंक देतोय खाली. आणि माझी कविता सुद्धा देतोय. ती माझ्या याच ब्लॉग वर देखील आहे प्रथमा या पोस्ट मध्ये. अर्थातच या ब्लॉगवरचं ते माझं पहिलंच पोस्ट होतं. अर्थात ब्लॉगवर मी ती खूप उशिरा टाकली. ती कधी आणि कशी लिहिली गेली ते तुम्हाला वरचं पोस्ट वाचून कळेलच. थोडक्यात सांगायचं तर ती मी आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थी संघाच्या "संकल्प" या त्रैमासिकासाठी २००८ च्या मध्यावर लिहिली. नंतर ती म.टा. च्या ऑनलाईन अंकात देखील छापून आली. २००८ च्या सुरुवातीच्या ६ महिन्यात महाराष्ट्रात/मुंबईत घडलेल्या स्थानिक दंगली/अतिरेकावर (डोमेस्टिक टेररिझम) वर ती आधारित होती. कुमार केतकरांच्या घरावर संभाजी ब्रिगेडचा हल्ला, शीख धर्मगुरूच्या अंगरक्षकाने गोळीबार केल्यानंतर शीख तरुणांनी जवळपास १२ तास वेठीला धरलेली मुंबई, सनातन प्रभातचे कथित स्फोट आणि मनसेचे भैय्यांवरचे हल्ले इ. इ. असो.
आणि मुख्य म्हणजे ही आहे त्या ब्लॉगची लिंक. आणि तिथे त्या महाशयांनी तिला बाल-कविता असं टॅगलं आहे ते बघून तर मला हसावं कि रडावं ते कळेना. मी आधीच्या पोस्ट मध्ये म्हटल्याप्रमाणे "नेटवर मराठीत जे जे आढळेल ते सरसकट (आणि बरेचदा मूळ लेखकाचे नाव न घालता) आपल्या ब्लॉगवर टाकणे" हा त्यांचा अजेंडा असावा असं मला तरी वाटलं.
मंडळी, शोधून बघा. मला तर वाटतं तिथे आपल्या प्रत्येकाचेच लेख/कविता असं काही काही सापडेल. आणि त्याखाली तुमचं नाव असेल तर तुमचं नशीब भलतंच जोरावर आहे असं समजायला हरकत नाय, हरकत नाय!!!
हरकत नाय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय !!
मारा झोडा ठेचुन काढा
गोळ्या झाडा बाँब फोड़ा
त्यांच डोक आमचा हातोड़ा
ताज्या रक्ताचा पडुदे सडा
एका घावात मागाल पाणी, असे आहोत आम्ही सनातनी
आमच्या देवांची मस्करी करायची नाय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||१||
खसकन उपसा नंग्या तलवारी
दिसूदे आपली ताकद खरी
भेदरल्या पाहिजेत दिशा चारी
थरथर कापेल दुनिया सारी
आमच्या समोर नको अजीजी, उगाच नही आम्हाला म्हणत "पाजी"
आमच्या गुरु च्या वाटेला जायच नाय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||२||
शिवबा आमचा आम्ही त्याचे मावळे
उलट बोलाल तर तोंड करू काळे
आदर व्यक्त करायचे आमचे मार्गच आगळे
फासून डाम्बर घर रंगवू सगळे
मुखी शिवबा हाती ग्रेनेड, अशी आमची राष्ट्रवादी ब्रिगेड
शिवबाचे स्मारक उभारू देत नाही म्हणजे काय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||३||
दिसला भैय्या तर सोडू नका
टँकसया फोड़ा सामान फेका
एकच असा देऊ जोरदार धक्का
की "आपला" खुंटा होइल पकका
नवमहाराष्ट्राची आम्हालाच जाण, आम्ही करू नवनिर्माण
मराठी सोडून दुसर काही बोलायच नाय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||४||
पण थाम्बा हे काय !!
हे सगळ अचानक थांबतय काय?
होय ! कारण मी आहे आजचा तरुण, कुठल्याही झापडांशिवाय
मीच गोविन्दसिंह, मीच कृष्ण आणि मीच शिवराय
आमच्या तरुणाईला फसवयाच नाय
याद राखा गाठ आमच्याशी हाय
ज़ातिधर्माच्या नावाने फूट पाड़ाल तर
होय !! आमची हरकत हाय, हरकत हाय, हरकत हाय !!!
हेरंब ओक
१५ जुलै '०८

Sunday, January 3, 2010
अल्पविराम संपला... पण !!!!
गेला आठवडाभर (न सांगता) घेतलेला अल्पविराम किंवा मध्यंतर/ब्रेक/टाईम-प्लीज वगैरे वगैरे संपला/ली. कोण वाट बघताय म्हणा माझ्या पोस्टची. पण ही अशी सुरुवात केली कि जरा बरं वाटतं आपलं आपल्यालाच. अल्पविरामाचं कारण म्हणजे घर-बदली उर्फ मुव्हिंग. आठवडाभर पॅकिंग, अन-पॅकिंग करत करत शेवटी आलो एकदाचे नवीन घरात. नवीन म्हणजे, कोरं करकरीत वगैरे नाही हो. आधीच्या घराऐवजी आता हे दुसरं घर. म्हणजे नवीनच नाही का. तर हे मुव्हिंग प्रकरण संपवून, नवीन घरात समान लावून, (इंटरनेट सुरु व्हायला २ लागलेले दिवस धरून) जवळपास आज ४ दिवसांनी आलो नेटवर. म्हटलं काहीतरी खरडूया ब्लॉगवर. मुव्हिंग, नवीन वर्ष, स्नोफॉल कशावरही. एकीकडे मेल्स, जुन्या पोस्ट्सवरचे कमेंट्स अप्रूव करणं चालू होतं आणि आपले नेहमीचे मराठी ब्लॉग्स पण चाळत होतो. कमेंट्स टाकत होतो. आणि बघता बघता अचानक कळलं उचलेगिरी झालीये. मी लिहिलेल्या एका जुन्या कवितेची. पुन्हा नीट बघितलं. कविता माझीच होती पण माझा नामोल्लेख कुठेही नाही. वाईट वाटलं थोडं. ब्लॉगच्या मालकाच्या काही खाणाखुणा, नाव-गाव, contact-me वगैरे काही आढळलं नाही सुरूवातीला. ब्लॉगचा फॉलोअर म्हणून जॉईन झाल्यावर एक लिंक मिळाली ब्लॉग-मालकाशी संपर्क करायची. २-३ जण मालक आहेत असं आढळलं. ज्याने माझ्या कवितेचं पोस्टिंग केलं होतं त्याच्या नावाने मायना टाकून त्याला सौम्य शब्दात जाणीव करून दिली आहे. बघुया काही प्रतिसाद मिळतो का. १-२ दिवसात काहीच उत्तर आलं नाही तर नवीन पोस्ट टाकेन त्या ब्लॉगची आणि माझ्या मूळ कवितेची लिंक देऊन.
नंतर सहज म्हणून तो ब्लॉग चाळत होतो. भरपूर लेख, कविता, गाणी, चित्रपट सामिक्षेसारखं काहीतरी असे बरेच प्रकार आहेत. काही ठिकाणी मूळ लेखकाची नावे आहेत तर बऱ्याच ठिकाणी नाहीत. माझा साधारण असा अंदाज आहे कि "नेटवर मराठीत जे जे आढळेल ते सरसकट (आणि बरेचदा मूळ लेखकाचे नाव न घालता) आपल्या ब्लॉगवर टाकणे" हा अजेंडा असावा. असो.
खरंतर काहीतरी चांगलं, नवीन किंवा थोडक्यात मी वर जे काही लिहिलं आहे ते न लिहिता दुसरं काहीतरी लिहायचं होतं. पण उचलेगिरी बघून जरा मूड गेलाय. अर्थात तात्पुरताच. ही नवीन गडबड संपली की लिहीनच पुन्हा.

Friday, December 25, 2009
बरहाताईचा गुगल-दादा (इमे)
गेल्या आठवड्यात एका मित्राने बरहाताईच्या या गुगल-दादाबद्दल सांगितलं. इमे त्याचं नाव. मी कधीपासून डाउनलोड करून ट्राय करणार होतो पण राहून जात होतं. शेवटी आज वेळ मिळाला आणि हे गुगल इनपुट मेथड एडिटर (IME - इमे) डाउनलोड केलं. एकदम झक्कास आहे. बरंचसं बरहा सारखंच आहे. म्हणजे तळाशी लँग्वेज बार उघडतो. तिकडे मराठी निवडायचं. (आणि ही मराठी, हिंदी, कन्नड, तेलुगु भाषा वगैरे आपण डाउनलोड करायच्या वेळी निवडायची.) आणि नेहमीप्रमाणे दाणादण टंकायचं. बरहावाल्यांना कदाचित विशेष आवडणार नाही. पण माझ्यासारखे गुगल भक्त असतील त्यांना नक्की आवडेल. आणि खूप सोयीस्कर पण वाटेल. क्वीलपॅड, बरहा वगैरे मध्ये कॉमनसेन्सचा अभाव आहे असं मला वाटतं. म्हणजे गुगल मराठीतले नेहमीचे वापरातले शब्द आपोआप टिपतं. पण क्वीलपॅड, बरहा ते नाही करत. सोप्प उदाहरण म्हणजे "येतं, जातं, करतं" सारख्या शब्दांमधला शेवटचा अनुस्वार किंवा विंग्रजीत लिवलेले office किंवा camera सारखे शब्द गुगल बरोब्बर टिपतं. अर्थात क्वील/बरहा मध्ये पण असेल अशी काहीतरी सोप्पी सोय किंवा शोर्टकट. पण मला नाही सापडले. अजून एक म्हणजे IME मध्ये आपण शब्द टाईप करायला लागलो कि तिथे तो आपोआप आपल्याला शब्द सुचवतो. म्हणजे समानार्थी वगैरे नाही हो (करेल. ते पण करेल गुगल १-२ वर्षात :P) . म्हणजे word-suggestion. आपल्या मोबाईल मधल्या डिक्शनरी सारखं.
गुगलदादा काय एकेक प्रोडक्टस काढतो यार. (आणि पुन्हा चकटफू) जी-मेल, युट्युब, ओर्कट,पिकासा, अर्थ, जी-टॉक, क्रोम, गुगल maps. गुगल वॉईस. सगळे एकापेक्षा एक. गुगलने जी-टॉक जी-मेलच्या पेज मधेच इंटीग्रेट केल्यावर याहूला पण तसं करावंच लागलं. किंवा पीसी-टू-पीसी वॉईस चॅट पण सुरु केलं ते गुगलने. त्यांनी क्रोम लॉंच केल्या केल्या त्या दिवसापासून मी ते वापरायला सुरु केलं. काय मस्त लाईट-वेट आहे. खरंच अगदी हलकं-फुलकं वाटतं. लॅपटॉपलाही आणि आपल्यालाही.. आता वाट पहायची ती क्रोम ओ.एस. ची.
असो गुगलचा उदो उदो थोडा अति होतोय आणि तो उद्देश नव्हता या पोस्टचा. इमे बद्दल चटकन-पटकन सांगायचं होतं. म्हणून हे क्विक पोस्ट.

Wednesday, December 23, 2009
डकवा-डकवी
अपर्णाने मला डकवलं. बघूया कसं जमतंय KBC चं ब्लॉग व्हर्जन. पटकन त्या डकवलं शब्दाची गम्मत सांगतो. पाचवी किंवा सहावीत असताना मी वर्गात सामान्य विज्ञानाचा धडा मोठ्याने वाचत असताना हा डकवणे शब्द आला आणि मी प्रिंटींग मिस्टेक समजून तो चक्क अडकवणे असा वाचला. बाईंनी पुन्हा वाचायला सांगितल्यावर सुद्धा मी सुरुवातीच्या "अ" चा आधार सोडला नाही. आणि तेव्हा मला सगळ्यांसमोर त्या शब्दाचा अर्थ समजावला गेल्याने पक्का बसला डोक्यात. आणि तेव्हा मला कळलं डकवणे हा एक वेगळा शब्द आहे तर. चिकटवणे या अर्थी. तोपर्यंत माझ्या मेंदूच्या शब्दकोशात तो नव्हताच. असो. घडाभर तेल संपल तरी याच नमन काही संपत नाही असं कोणी म्हणायच्या आत (किंवा सगळ्यांच म्हणून झाल्यावर) आपण ब्लॉग KBC ला सुरुवात करू.
1.Where is your cell phone?
आत्ता उशीखाली आहे. (पण एकंदरीत मुलाच्या तोंडात, माझ्या खिशात किंवा चार्जिंगला नसला की हरवला समजायचा.)
2.Your hair?
काळे, दाट (होते पूर्वी. आता बाळराजांच्या ओढण्यातून किती शिल्लक राहतील हे Fructis च जाणे)
3.Your mother?
माझा आदर्श
4.Your father?
सुपर अक्टिव
5.Your favorite food?
पाव भाजी, बटाटा वडा, अळूच्या वड्या, पिझ्झा (बेसिकली हाताने न घ्यावं लागणारं काहीही)
6.Your dream last night?
मी ८ तास झोपलो आहे.
7.Your favorite drink?
कॉफी, बोर्नविटा (सोमरसाबद्दल म्हणत असाल तर अब्राम्हण्यम !! ;) )
8.Your dream/goal?
म्म्मम्म्म (Instant गोल तर ही प्रश्नावली पूर्ण करणे.)
9.What room are you in?
(माझ्या स्वतःच्या घरातली) बेडरूम
10.Your hobby?
वाचन (व पु, पु ल, मतकरी, रणजीत देसाई आणि जॉन ग्रिशम यांची सगळी पुस्तकं) , ट्रेकिंग (आणि झोपणे, लोळणे, उशिरा उठणे).. आणि हो. भरपूर मुव्हीज बघणे.
11.Your fear?
"भूत" मधली मनजित
12.Where do you want to be in 6 years?
म्म्म्मम... २०१५.. आय गेस
13.Where were you last night?
अर्थात घरीच
14.Something that you aren’t?
हेरंब ओक सोडून काहीही
15.Muffins?
डबल चोकलेटचिप मफीन. केव्हाही, कितीही
16.Wish list item?
आपल्या मुकेशच्या शेजारी त्याच्या पेक्षा १ मजला जास्त असलेलं घर बांधायचं (आणि त्यात राहायचं) .. वचने किं दरिद्रता??
17.Where did you grow up?
आमची डोंबिवली
18.Last thing you did?
आत्ता "पाकिस्तानात" जाऊन आलो.
19.What are you wearing?
टी-शर्ट आणि track pant
20.Your TV?
सोनी.
TV शो म्हणत असाल तर F.R.I.E.N.D.S (दुसरं काय असतं म्हणा बघण्याच्या लायकीच)
21.Your pets?
आय हेट पेट्स
22.Friends
बरेच. पण अगदी जीवाभावाचे फारच कमी. सगळे डोंबिवली, मुंबईत आहेत सुखात
23.Your life?
निवांत.
24.Your mood?
झोपेश.
25.Missing someone?
आई
26.Vehicle?
सध्या तरी पाथ आणि सबवे
27.Something you’re not wearing?
शूज
28.Your favorite store?
स्टोर मध्ये कसलं फेवरेट? काहीही चालतं ..
Your favorite color?
पांढरा. (गाडी मात्र जांभळी आवडते)
29.When was the last time you laughed?
मगाशी चिंटू खांद्यावर डोकं ठेवून झोपण्याचं नाटक करत होता आणि नंतर एकदम जोरात हसत हसत ओरडायला लागला तेव्हा :)
30.Last time you cried?
गेल्या वर्षी दोनदा रडलो. १७ ओगस्ट आणि ९ नोवें
31.Your best friend?
#२२ चं उत्तर बघा साहेब.
32.One place that you go to over and over?
Actually those are two places. ऑफिस आणि घर.
33.One person who emails me regularly?
फार कमी. पण मी कायम पाठवत असतो सगळ्यांना. कर्मण्ये वादिकारस्ते म फलेषु कदाचन ||
34.Favorite place to eat?
चांगला पिझ्झा देणारं कुठलही हॉटेल.
मी आनंद, उन्मेष दादा आणि सचिनला डकवतोय.

तळमळला !!
सोमवारी (दर सोमवार प्रमाणेच) उठायला उशीर झाला. वीकेंडचा हॅंगओवर आणि आळशीपणा वगैरे वगैरे.. नाही हो.. सोमरस वाला हॅंग ओवर नव्हे.. आम्ही त्या क्षेत्रात "काला अक्षर भैस बराबर" आहोत. आमचा आपला नॉर्मल वीकेंड वाला हॅंग ओवर. आळशीपणातून आलेला.. असो. उगाच भरकाटतोय. मुद्दा हा की उशिरा उठल्यामुळे डबा नेता आला नाही ऑफीसला आणि दुपारी जेवायला बाहेर गेलो. आमच्या ऑफीसच्या जवळच एक छोटं सॅंडविच शॉप आहे तिकडे जाऊन बसलो. हॉटेल मधे ४-५ जणच होते. तसं सगळं शांत शांत होतं...
मी पण सॅंडविच वर ताव मारण्यात मग्न असताना माझ्या मागेच अगदी जवळ, अचानक धप्प असा आवाज आला. मी पटकन मागे वळून बघितलं. तर एक माणूस आडवा पडलेला दिसला. आधी काही नीट कळलंच नाही. मग पटकन लक्षात आलं की तो बहुतेक तोल जाउन पडला आहे. मी त्याला हात देण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा एक पाय टेबालाखली थोडा अडकल्या सारखा वाटला की ज्यामुळे त्याला हालचाल करता येत नव्हती. आणि तो काही बोलत पण नव्हता. डोळे अर्धवट उघडे होते.. आणि अचानक माझ्या लक्षात आल की हे साधं तोल जाऊन पडण्यातलं प्रकरण नाहीये.. त्याला काहीतरी चक्कर वगैरे आली असावी आणि त्यामुळे तो पडला असावा. तो काही प्रतिसाद देत नाही हे पाहून मी पटकन आजूबाजूला नजर फिरवली. पण तो धप्प आवाज कोणाच्याही कानापर्यंत पोचल्याचं निदान त्यांच्या चेहर्यावरून तरी दिसत नव्हात. (आणि तो माणूस एका कोपर्यात पडला असल्याने तो त्यांना दिसलाही नसावा असा मी आपला संशयाचा फायदा दिला त्यांना). कानाचा पडदा आणि सभोवतालचं जग या मधे आय-पॉड चे हेड फोन्स आल्याने तो धप्प आवाज हेडफोन्सच्या बाहेरच्या आवरणावर एकदा टकटक करून मावळला असणार. शेवटी मी पटकन ऑर्डर द्यायच्या काउंटरवर जाऊन त्या कोपर्याकडे बोट दाखवून काउंटर वरच्या मुलीला झाला प्रकार सांगितला. ती पटकन धावत आली माझ्याबरोबर. तिनेही आधार देऊन त्याला उठवायचा प्रयत्न केला. पण तिलाही ते शक्य झालं नाही.. एकीकडे मोबाइलची बटणं दाबून तिने पटकन इमर्जन्सी अँब्युलंस सर्विसला फोन लावून अँब्युलंस मागवली. आता माझं हळू हळू त्या माणसाकडे लक्ष गेलं. जरा म्हातारेच गृहस्थ होते. म्हणजे आपल्या आजोबांच्या वयाचे असतील. थोडे शुद्धीत आले होते आता. तोवर आम्ही त्यांना हात धरून भिंतीला टेकून बसवलं. त्यांनी डोक्यावरून टोपी काढून ठेवली. चेहर्यावर, कपाळावर चांगलाच घाम तरारला होता. अँब्युलंस काकुंनी त्यांना काहीही-अगदी पाणीही- न देण्याविषयी बजावलं होतं. माझं निरीक्षण चालूच होतं.. आजोबा चांगले उंच होते. सहा फूट तर आरामात असतील. चेहर्यावर छोटी दाढी, हसरे डोळे आणि एकदम धिप्पाड देह असा सगळा डौल होता. तेवढ्यात एक तरुण, उंच पोलिस हॉटेलमधे शिरला. अँब्युलंस काकुंनी त्या एरियातल्या पोलिसांना फोन करून इकडे यायला फर्मावलं होतं वाटतं. त्याने आजोबांजवळ बसून कसं वाटतंय वगैरे विचारून जुजबी चौकशीला सुरूवात केली. Chanton का असं काहीतरी नाव होतं त्यांचं. जवळच्याच चर्च मधे पादरीबाबा होते ते. गेली ३० वर्ष. त्यांचं आय-डी कार्ड दाखवलं पोलिसाला. त्याने वय विचारल्यावर त्यांनी ७८ असं सांगितलं. अरे म्हणजे साधारण माझ्या आजीच्याच वयाचे की. माझे आजोबा मी खूप लहान असतानाच गेल्याने आजी म्हणजे आमचं सर्वस्व होतं. आजी जायच्या आधीचा एक महिना सोडला तर कायम अगदी ठणठणीत होती. बाहेर पडली नाही तरी घरात अगदी व्यवस्थित फिरायची, स्वतःची कामं स्वतः करायची. म्हणजे ८०-८२ वर्षांची झाली तरी शेवटचा एक महिना सोडला तर म्हातारी वगैरे कधीच वाटली नाही.. अरे हो.. आता अजुन १५-२० वर्षातच आई-बाबा पण साधारण त्याच वयाचे होतील की म्हणजे म्हातारे होतील. कोणी सांगावं त्यांच म्हातारपण ८० मधे न येता थोडं आधी सत्तरीतच येईल. नको त्या दिशेला विचार वळतायत हे कळत असून ही मी त्यांना थांबवु शकत नव्हतो. आजी बरोबर तिच्या जवळपास निदान तिची मुलं म्हणजे माझे काका, आई-बाबा, तरी होते. पण आमच्या आई-बाबां बरोबर कोण आहे? त्यांना पण आमच्या बरोबर राहावसं वाटत असणारच ना . नातवला किती दिवस वेबकॅम वरुन बघणार ते? आणि त्यांचं म्हातारपण मला वाटतंय तसं सत्तरी ऐवजी साठीतच आलं तर? म्हणजे आत्ताच.. अरे बाप रे.. विचारांच्या नादात कधी हॉटेल मधून बाहेर पडलो कळलंच नाही. त्याच विचारांनी रस्त्यावरून चालत होतो. २ मिनिटे डोकं जरा दाबून धरलं, चेहर्यावरून हात फिरवला आणि पुन्हा चालायला लागलो.. जागा बदलली, रस्ता बदलला तरी विचार काही बदलत नव्हते.
*****
श्या.. बस झाल.. परत जायला हवं आता.. एक्सपोजर, करियर, लाइफ स्टाइल, एक्सपिरियन्स, मुलांच्या भवितव्यासाठीची तयारी अशी कितीही गोंडस वेष्टणं गुंडाळण्याचा प्रयत्न आपण केला ना तरी आपल्याला पण माहीत असतं की आतली गोळी शेवटी वेगळीच आहे, एकच आहे आणि ती म्हणजे पैसे, अजुन थोडे पैसे, अजुन थोडे जास्त पैसे.
हट्ट.. बस झाल.. कितव्यांदा हा असा विचार करतोय मी गेल्या २ वर्षात? परतीचा मार्ग एवढ्या जवळ नाही हे माहीत असूनही?? तसं म्हटलं तो तेवढा लांबही नाहीये.
ते मागे "सागरा प्राण तळमळला" कोणी लावलंय रे?? बंद करा बघू ते आधी.. की माझ्या मेंदूतच वाजतंय ते?
*****
पार्टनर म्हणाला "अशा संदेशासाठी बिलासारखा कागद नाही"
"असं कसं ?"
"माणूस नुसता काव्यावर जगात नाही. मागची बाजू व्यवहाराचीच"
"....."
"तू जी वेष्टनं म्हणतोयस ती खरोखर नुसतीच वेष्टण आहेत का? असं असेल तर ताबडतोब परत जा. पण तसं नसेल तर ? ती गोळीला पूरक असतील तर? किंबहुना गोळीचाच एक भाग असतील तर? गोळीलाही बिलाच्या कागदासारखीच मागची बाजू आहे हे विसरू नकोस. इतरांसाठी नाही पण निदान स्वतःसाठी तरी !!
(व पुं च्या सदाबहार पार्टनर मध्ये माझी सरमिसळ केल्याबद्दल कुठलीही शिक्षा भोगायला मी तयार आहे.)

Subscribe to:
Posts (Atom)
रहस्यपूर्ण आणि वेगवान कथानकांच्या स्त्रीकेंद्रित कादंबऱ्यांची निर्माती : फ्रीडा मॅकफॅडन
काही महिन्यांपूर्वी पुस्तकांच्या एका ग्रुपवर (वेड्यांचा नाही) ' द हाऊसमेड ' नावाच्या एका पुस्तकाबद्दल वाचलं. रहस्य चांगलं आहे , भरपू...
-
सूर्या, फावड्या, जोश्या, शिरोडकर, चित्र्या, केवडा, सुकडी, चिमण्या, आंबेकर, घासू गोखल्या, संत्या, मिरीकर, मांडे, बिबीकर, भाईशेटया, आशक्या, ...
-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
आम्ही मागे एकदा आमच्या संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त नाटक बसवत होतो. लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळा हौशी मामला होता. पण सगळ्यांना नाटकात काम ...