Wednesday, December 23, 2009

डकवा-डकवी

अपर्णाने मला डकवलं. बघूया कसं जमतंय KBC चं ब्लॉग व्हर्जन. पटकन त्या डकवलं शब्दाची गम्मत सांगतो. पाचवी किंवा सहावीत असताना मी वर्गात सामान्य विज्ञानाचा धडा मोठ्याने वाचत असताना हा डकवणे शब्द आला आणि मी प्रिंटींग मिस्टेक समजून तो चक्क अडकवणे असा वाचला. बाईंनी पुन्हा वाचायला सांगितल्यावर सुद्धा मी सुरुवातीच्या "अ" चा आधार सोडला नाही. आणि तेव्हा मला सगळ्यांसमोर त्या शब्दाचा अर्थ समजावला गेल्याने पक्का बसला डोक्यात. आणि तेव्हा मला कळलं डकवणे हा एक वेगळा शब्द आहे तर. चिकटवणे या अर्थी. तोपर्यंत माझ्या मेंदूच्या शब्दकोशात तो नव्हताच. असो. घडाभर तेल संपल तरी याच नमन काही संपत नाही असं कोणी म्हणायच्या आत (किंवा सगळ्यांच म्हणून झाल्यावर) आपण ब्लॉग KBC ला सुरुवात करू.

1.Where is your cell phone?
आत्ता उशीखाली आहे. (पण एकंदरीत मुलाच्या तोंडात, माझ्या खिशात किंवा चार्जिंगला नसला की हरवला समजायचा.)

2.Your hair?
काळे, दाट (होते पूर्वी. आता बाळराजांच्या ओढण्यातून किती शिल्लक राहतील हे Fructis च जाणे)

3.Your mother?
माझा आदर्श

4.Your father?
सुपर अक्टिव

5.Your favorite food?
पाव भाजी, बटाटा वडा, अळूच्या वड्या, पिझ्झा (बेसिकली हाताने न घ्यावं लागणारं काहीही)

6.Your dream last night?
मी ८ तास झोपलो आहे.

7.Your favorite drink?
कॉफी, बोर्नविटा (सोमरसाबद्दल म्हणत असाल तर अब्राम्हण्यम !! ;) )

8.Your dream/goal?
म्म्मम्म्म (Instant गोल तर ही प्रश्नावली पूर्ण करणे.)

9.What room are you in?
(माझ्या स्वतःच्या घरातली) बेडरूम

10.Your hobby?
वाचन (व पु, पु ल, मतकरी, रणजीत देसाई आणि जॉन ग्रिशम यांची सगळी पुस्तकं) , ट्रेकिंग (आणि झोपणे, लोळणे, उशिरा उठणे).. आणि हो. भरपूर मुव्हीज बघणे.

11.Your fear?
"भूत" मधली मनजित

12.Where do you want to be in 6 years?
म्म्म्मम... २०१५.. आय गेस

13.Where were you last night?
अर्थात घरीच

14.Something that you aren’t?
हेरंब ओक सोडून काहीही

15.Muffins?
डबल चोकलेटचिप मफीन. केव्हाही, कितीही

16.Wish list item?
आपल्या मुकेशच्या शेजारी त्याच्या पेक्षा १ मजला जास्त असलेलं घर बांधायचं (आणि त्यात राहायचं) .. वचने किं दरिद्रता??

17.Where did you grow up?
आमची डोंबिवली

18.Last thing you did?
आत्ता "पाकिस्तानात" जाऊन आलो.

19.What are you wearing?
टी-शर्ट आणि track pant

20.Your TV?
सोनी.
TV शो म्हणत असाल तर F.R.I.E.N.D.S (दुसरं काय असतं म्हणा बघण्याच्या लायकीच)

21.Your pets?
आय हेट पेट्स

22.Friends
बरेच. पण अगदी जीवाभावाचे फारच कमी. सगळे डोंबिवली, मुंबईत आहेत सुखात

23.Your life?
निवांत.

24.Your mood?
झोपेश.

25.Missing someone?
आई

26.Vehicle?
सध्या तरी पाथ आणि सबवे

27.Something you’re not wearing?
शूज

28.Your favorite store?
स्टोर मध्ये कसलं फेवरेट? काहीही चालतं ..

Your favorite color?
पांढरा. (गाडी मात्र जांभळी आवडते)

29.When was the last time you laughed?
मगाशी चिंटू खांद्यावर डोकं ठेवून झोपण्याचं नाटक करत होता आणि नंतर एकदम जोरात हसत हसत ओरडायला लागला तेव्हा :)

30.Last time you cried?
गेल्या वर्षी दोनदा रडलो. १७ ओगस्ट आणि ९ नोवें

31.Your best friend?
#२२ चं उत्तर बघा साहेब.

32.One place that you go to over and over?
Actually those are two places. ऑफिस आणि घर.

33.One person who emails me regularly?
फार कमी. पण मी कायम पाठवत असतो सगळ्यांना. कर्मण्ये वादिकारस्ते म फलेषु कदाचन ||

34.Favorite place to eat?
चांगला पिझ्झा देणारं कुठलही हॉटेल.

मी आनंद, उन्मेष दादा आणि सचिनला डकवतोय.

7 comments:

  1. (माझ्या स्वतःच्या घरातली)फ़ार महत्वाचा कंस आहे तुमच्यासाठी नाहीतर बायको कंसाचा (व्हिलनचा) ऍवातार...(हे अमेरिकन मेले..इतक्यात हा मुव्ही पाहिला तेव्हापासुन उच्चारच जमत नाहीये....ही...ही....) धारण करेल...
    आता तू म्हणशील मुव्हीचं मला काय सांगते...अरे मूल झालं की दोघांनी मुव्हीला जाणं किंवा इथे लांब राहुन जायला मिळणं म्हणजेच पर्वणीच नाही का??? मग कुणाला तरी टुकटुक करुया...हे हे....
    चल जाऊदे पळते...धागा कुठला मी काय बरळते...काही नाही मला पण आठ तास झोपायचं स्वप्न..................:)

    ReplyDelete
  2. हा हा . ऍवातार.. हो ग. त्या विश-लिस्ट मध्ये मुव्ही बघणे हे पण एड करायला हव होत. ८ महिन्यां पूर्वी पर्यंत भरपूर मुव्हीज बघायचो. आता... विचारूनकोस.

    ReplyDelete
  3. आणि हो ना. बायकोचा कंसाचा ऍवातार.. आणि तो ही बेडरूम मध्ये? नको रे बाबा :P

    ReplyDelete
  4. आठ तास झोपायचेय...हे स्वप्न बहुतेक मुलांच्या १/२ वर्षे वयाच्या स्टेजमधे सगळ्याच आई बाबांच असावं..................सहीये!!!

    ReplyDelete
  5. :) हो ना.. अजून १-१.५ वर्ष तरी लागणारं हे स्वप्न पुरं व्हायला..

    ReplyDelete
  6. २९ चे उत्तर मस्त वाटले. ह्या 'अपर्णा'नेच मला 'टॅग'ल उर्फ़ 'डकवलं' माझी उत्तरे इतके आहेत ... http://foodateachglance.blogspot.com/2010/01/blog-post_06.html

    ReplyDelete
  7. हा हा हा.. तुझ्या त्या पोस्ट वर पण रिप्लाय टाकला आत्ताच. इथे पुन्हा टाकतो. "हा हा हा.. सगळीच उत्तरं भन्नाट आहेत. पण ३१ आणि ३३ तर लाजवाबच.. पण दोन्ही वेगळ्या अर्थाने लाजवाब :)"

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...