अनेक दिवसांपासून मनात असलेल्या मराठी ब्लॉग चा श्री गणेशा अखेरीस झाला तर. बरेच मुद्दे, विषय मराठी, महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी गोष्टींशीच संबंधित असतात आणि ते मराठी ब्लॉग मधे जास्त चांगल्या पद्धतीने मांडता येतील म्हणून हा ब्लॉग सुरू करतोय. खर तर इंग्लीश ब्लॉग नंतर हा ब्लॉग लगेच यायला हवा होता.. पण सुचल नाही, जमल नाही काहीही म्हणा.. दोन्ही ब्लॉग मधे सातत्य राखण्याची इच्छा आहेचं... बघुया कितपत जमतय ते.
अरे हो.. ब्लॉगच नाव (URL) थोडं विचित्र वाटेल खरं. पण त्याची एक गंमत आहे. गेल्या वर्षी (बर्याच वर्षांनी) एक कविता लिहिली आमच्या डोंबिवलीच्या माजी विद्यार्थी संघाच्या संकल्प या त्रैमसिकासाठी. त्या कवितेचं नाव होत "हरकत नाय". कविता '08 च्या पहिल्या 5-6 महिन्यातल्या विविध स्थानिक हिंसा/दंगलींवरआधारित होती. साधारण त्याच सुमारास इंग्लीश ब्लॉग ची पण सुरूवात झाली. (. . लिहिणं हे त्याच्या बरंच नंतर सुरू झालं हा भाग अलाहिदा :) )... कवितेच्या हॅंगओवर मधे असल्याने ब्लॉगला पण तेच नाव द्यायचं ठरवलं आणि "मनातल्या गोष्टी",किंवा माय थॉट्स, किंवा स्वतःचं नाव अशा टिपिकल नावांपेक्षा हे जरा वेगळं पण वाटलं. . मग तेच नाव (किंवा हॅंग ओवर म्हणा हवं तर) पुढे चालू ठेवावं म्हणून नाय च्या स्पेलिंग मधे थोडा बदल करून मराठी ब्लॉगला तेच नाव दिलं :)
पुढे ती कविता महाराष्ट्र टाइम्सच्या ऑनलाइन अंकात पण छापुन आली. बघा आवडते का...
=============================================
हरकत नाय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय !!
मारा झोडा ठेचुन काढा
गोळ्या झाडा बाँब फोड़ा
त्यांच डोक आमचा हातोड़ा
ताज्या रक्ताचा पडुदे सडा
एका घावात मागाल पाणी, असे आहोत आम्ही सनातनी
आमच्या देवांची मस्करी करायची नाय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||१||
खसकन उपसा नंग्या तलवारी
दिसूदे आपली ताकद खरी
भेदरल्या पाहिजेत दिशा चारी
थरथर कापेल दुनिया सारी
आमच्या समोर नको अजीजी, उगाच नही आम्हाला म्हणत "पाजी"
आमच्या गुरु च्या वाटेला जायच नाय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||२||
शिवबा आमचा आम्ही त्याचे मावळे
उलट बोलाल तर तोंड करू काळे
आदर व्यक्त करायचे आमचे मार्गच आगळे
फासून डाम्बर घर रंगवू सगळे
मुखी शिवबा हाती ग्रेनेड, अशी आमची राष्ट्रवादी ब्रिगेड
शिवबाचे स्मारक उभारू देत नाही म्हणजे काय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||३||
दिसला भैय्या तर सोडू नका
टँकसया फोड़ा सामान फेका
एकच असा देऊ जोरदार धक्का
की "आपला" खुंटा होइल पकका
नवमहाराष्ट्राची आम्हालाच जाण, आम्ही करू नवनिर्माण
मराठी सोडून दुसर काही बोलायच नाय !!
हरकत नाय हरकत नाय !!
कुणीही कितीही मेले तरी, कितीही बळी गेले तरी
हरकत नाय हरकत नाय ||४||
पण थाम्बा हे काय !!
हे सगळ अचानक थांबतय काय?
होय ! कारण मी आहे आजचा तरुण, कुठल्याही झापडांशिवाय
मीच गोविन्दसिंह, मीच कृष्ण आणि मीच शिवराय
आमच्या तरुणाईला फसवयाच नाय
याद राखा गाठ आमच्याशी हाय
ज़ातिधर्माच्या नावाने फूट पाड़ाल तर
होय !! आमची हरकत हाय, हरकत हाय, हरकत हाय !!!
हेरंब ओक
१५ जुलै '०८
=============================================
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
पोलादी भिंतीआडच्या प्रा'चीन' देशाला मराठी लेखणीत पकडण्याचा यशस्वी प्रयत्न : भिंतीआडचा चीन
श्रीराम कुंटे या माझ्या मित्राशी एकदा गप्पा मारत असताना मी सहज, आपण अगदी नेहमी एकमेकांना विचारतो त्याप्रमाणे विचारलं, "मग सध्या काय नवी...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
-
** भाग १ इथे वाचा आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी.... रॉस गेलर (डेव्हिड श...
हरकत नाय ... हरकत नाय ... हरकत नाय ... इकडे पहिलीच कमेंट असेल तरी हरकत नाय ... :)
ReplyDeleteरोज काहीतरी नवीन वाचावे या हेतूने नवीन-नवीन ब्लॉग शोधत असतो. कुठलाही ब्लॉग नवीनच वाचायला घेतला की त्या ब्लॉगच्या पाहिल्या पोष्टवर जाउन प्रतिक्रिया द्यायची ही आपली स्टाइल... :D
तेंव्हा अगदी पहील्यावहिल्या पोष्टवर प्रतिक्रिया आल्याचे पाहून दचकू नका.. आता संपूर्ण वाचायचा आहे तुमचा ब्लॉग... :)
अरे वा रोहन. एकदम सुसाट कल्पना आहे. कारण कुठल्याही ब्लॉगरला पहिल्या पोस्ट वर जवळपास कमेंट्स नसतातच किंवा असतील तरी अगदी १-२. त्यामुळे आवडली आयडिया.
ReplyDeleteसगळे पोस्ट्स वाचणार आहेस? वाच बाबा. सगळे पोस्ट्स वाचून झाल्यावर सुद्धा ब्लॉगला पुन्हा पुन्हा भेट देत राहिलास तर सोन्यावर सुहागाच की. ;-)
हेरंब, प्रथम अभिनंदन!
ReplyDeleteतू कविता (देखील) करतोस हे आत्ता कळालं.
तुझा ब्लॉग पहिल्यापासून वाचायचा होता, म्हटलं पहिल्या पोस्ट पासून सुरुवात करावी.
आभार आनंद. आणि पहिल्यापासून ब्लॉग वाचायला घेतल्याबद्दल तर अजून आभार :) .. कविता नेहमी नाही पण अधून मधून करत असतो. एखादा विषय अगदी मनाला भिडला तरच !!
ReplyDeleteमीपण मीपण... म्हटलं सगळ्याच पोस्ट्स वाचायच्या असं ठरवलेलं आहे तर पहिल्यापासून वाचूया. आत्ता सकाळचे ८ वाजून ८ मिनिटं आणि ३२ सेकंद (ह्यूस्टन टाईम... आम्ही अमेरिकेत आहोत हे जाणवून देण्याचा हा एक प्रयत्न... ;-)) झालेले आहेत. तेव्हा आता बघूया सगळ्या पोस्ट्स कधी वाचून होतात ते...
ReplyDeleteसंकेतराव अमेरीकाकर, नोंद घेतली गेलेली आहे.. ;)
ReplyDeleteमाझा ब्लॉग सुरुवातीपासून वाचण्याचं डेरिंग करणार्यांचं मला नेहमीच जाम कौतुक वाटत आलेलं आहे ;) .. शुभेच्छा :P
२५ सप्टेंबर आणि २७ ऑक्टोबर... हीहीही... ;-)
ReplyDeleteहे हे संकेत.. थोडक्यात चुकामुक ;)
ReplyDeletefarach sundar kavita
ReplyDeleteधन्यवाद रसिका..
ReplyDeleteपहिल्या पोस्टवर प्रतिक्रिया आलेली बघून एक वेगळाच आनंद होतो :)
पुन्हा एकवार आभार. आणि हो. ब्लॉगव रस्वागत. अशीच भेट देत रहा !