२६ नोव्हेंबर च्या मुंबई हल्ल्यानंतर तुकड्यातुकड्यात सुचलेली कविता !!
शिल्लक !!
थोडीशी लाज विकत घ्यायची होती
या सत्ताधार्यांना वाटण्यासाठी
या राजकारण्यांच्या तोंडावर फेकण्यासाठी
या सत्तापिपासुंना भीक म्हणुन देण्यासाठी
या झोपेच सोंग घेतलेल्या कुंभकर्णांना उठवण्यासाठी ||१||
थोडीशी माणुसकी विकत घ्यायची होती
मेलेल्या मढयावरचं लोणी खाणार्या
असंख्य बलिदानांवरही खुर्चीची पोळी भाजणार्या
निष्पापांच्या जिवांशी खेळणार्या
जवानांच्या मृत्युला "कुत्र्याचीही" किंमत न देणार्या
या मानवी चेहर्यात वावरणारया श्वापदांसाठी ||२||
थोडं रौद्र थोडं धैर्य थोडं वीर्य विकत घ्यायच होत
या मनगटातल्या ताकदी संपलेल्या
चर्चेची गुर्हाळं चालवून कागदी घोडे नाचावणार्या
पोकळ धमक्यांनी शत्रूला घाबरवल्यासारखं करणार्या
शब्दांचे बुडबुडे उडवणार्या या भेकड युद्धतज्ज्ञांसाठी ||३||
असं बरंच काही मागण्यासाठी देवाकडे गेलो होतो
तर तो म्हणाला यातलं काही शिल्लक नाहीये आता
कारण ते सगळं मी इस्रायलला दिलंय !!!!!!!
हेरंब ओक
१९ जानेवारी '०९

कविता छान आहे. तुझ्या मनातील भावना पोचल्या मित्रा... :)
ReplyDeleteआभार, रोहन !!
ReplyDeleteतर तो म्हणाला यातलं काही शिल्लक नाहीये आता
ReplyDeleteकारण ते सगळं मी इस्रायलला दिलंय !!!!!!!
क्या बात है..!
मस्त कविता.
http://gangadharmute.wordpress.com/
आभार गंगाधरजी !!
ReplyDelete