सूर्या, फावड्या, जोश्या, शिरोडकर, चित्र्या, केवडा, सुकडी, चिमण्या, आंबेकर, घासू गोखल्या, संत्या, मिरीकर, मांडे, बिबीकर, भाईशेटया, आशक्या, जुवेकर, पिंगळ्या, गायकवाड, आप्पा, बेन्द्रीण, मांजरेकर सर, राजगुरू सर, परांजपे बाई.........
इ.. चि.. भ.. ना............ !!! इचिभना इचिभना मला एकदम शाळेतच गेल्यासारखं वाटायला लागलं !!!
शाळा... अंदाजे '७६ सालच्या डोंबिवलीतल्या (संदर्भ डास : डासिवली, मुंब्रा इ. इ. उल्लेख) एका साध्या टिपिकल मराठी शाळेत शिकणार्या पौगंडावस्थेतल्या कथानायकाचं वर्णन आणि त्याच्या व अनेकदा त्याच्या ग्रुपमधल्या त्याच्या वयाच्या मुलांच्या नजरेतून घडणारं तत्कालीन समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं, साध्या सोप्या (वाटणार्या) शब्दांतलं चित्रण !!
मी मुद्दामच 'वाटणार्या' असं म्हणतोय. कारण अगदी साधे शब्द, सोपी वाक्यरचना वगैरे असली तरी वाचत असताना प्रचंड 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करावं लागतं. एकेका ओळीत, एकेका वाक्यात, एकेका शब्दांत त्या परिस्थितीला निरनिराळ्या कोनांतून बघणारे, त्यावर भाष्य करणारे कैक उल्लेख आहेत. जातीभेदावर आहेत, विषमतेवर आहेत, चंगळवादावर आहेत, दांभिकपणावर आहेत आणि अगदी म्हंटलं तर लहान मुलांच्या बाबतीत घेतल्या जाणार्या लैंगिक गैरफायद्यावरही आहेत. पण गंमत म्हणजे या सगळ्या सगळ्यावर काही भाष्य केलं जातोय याचा पुसटसा आभासही यातल्या एकाही वाक्यात नाहीये. वाचताना वाटत राहतं की आपण मराठी शाळेतल्या एका साध्यासुध्या मुलाची वर्षभराची गोष्ट वाचतोय ज्यात त्याचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, शिक्षक आहेत आणि त्याला 'लाईन' देणारी (वाचा आवडणारी, प्रेम करणारी इ. इ.) त्याची एक मैत्रीण आहे. पण प्रत्यक्षात मात्र या सार्या लेखनाचा आवाका समोर दिसतो त्यापेक्षा फारच विस्तृत आहे !!!
या संपूर्ण पुस्तकात मला सगळ्यात आवडलेला किस्सा म्हणजे अथर्वशीर्ष पठणाचा. देववादी, दैववादी, अंधश्रद्धाळू, पूर्णतः नवसावर विसंबून राहणारे वगैरे लोकांवर अत्यंत साध्या शब्दांत पण एकदम खणखणीत, सट्टाकदिशी लागणारा असा एक जबरदस्त फटकारा लेखकाने ओढलेला आहे. आणि त्यातल्याच एका छोट्याशा ओळीत जातीपातींवरही एक खणखणीत फटका ओढलेला आहे. कितीही झालं तरी तो परिच्छेद इथे देण्याचा मोह टाळता येत नाहीये.
================
(आईसाहेबांनी मला सांगितलं होतं की) गणपतीला म्हण की स्कॉलरशिप मिळाली तर एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवीन म्हणून. मला त्यावेळी जाम हसायला आलं होतं. गणपतीला पण आलं असणार. गणपती कशाला असलं काही ऐकतोय ? कारण त्याला माहित असणार की, आईसाहेब उकडीच्या मोदकांऐवजी कणकेच्या तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार. आणि तोसुद्धा सुक्या खोबर्याच्या खुळखुळ्या मोदकांचा.... आमच्या वर्गात फक्त बिबीकरला ती स्कॉलरशिप मिळाली..... नंतर आईसाहेब म्हणाल्या की, गणपतीला नवस करून काही उपयोग नाही. कुलस्वामिनीलाच करायला हवा होता. आता मी दहावीला गेल्यावर तसा त्या करतील.
मला तसं अथर्वशीर्ष येतं म्हणा. आमच्या बिल्डिंगीत पोंक्षेकाकांकडे वर्षातून एकदा सहस्त्रावर्तनाचा कार्यक्रम असतो. तेव्हा ते झाडून सगळ्यांकडचे पाट आणि माणसं गोळा करतात. निकमांकडचे फक्त पाट (ही ओळ म्हणजे तर तीन शब्दांत अक्षरशः उघडं करण्याचा सर्वोत्तम नमुना आहे !!! सलाम बोकीलसाहेब सलाम). पोंक्षेकाकांचा किरण तेव्हा आम्हाला आदल्या दिवशी सांगतो की उद्या आमच्याकडे गणपतीला गंडवायचा कार्यक्रम आहे म्हणून.कारण ते दहापंधरा लोक गोळा करतात. त्यांना साबुदाण्याची खिचडी आणि केळी देतात आणि त्यातल्या एकानं ते अथर्वशीर्ष म्हटलं तरी सगळ्यांनी म्हटलं असं समजतात आणि आकडा वाढवतात. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम दोनतीन तासांत आवरतो. गणपतीला काय हे कळत नसणार? पण ह्यांचं चालूच..."
================
जातीपातींवर दबकत दबकत पण तेवढेच खणखणीत वार केल्याचे अजूनही छोटे छोटे अनेक नमुने आहेत. नरूमामासाठी देशमुखांच्या मुलीचं स्थळ आलेलं ऐकून मुकुंदाच्या आईने "आपल्यातल्या मुली काय मेल्या आहेत का?" या एका वाक्यातच त्या स्थळाची वासलात लावणे..
किंवा मग नरूमामाच्या लग्नात भेटलेल्या आशक्याबरोबरचा एक संवाद. मुकुंदाची आशक्या गायकवाडबरोबर छान गट्टी जमल्यानंतर मुकुंदा जेव्हा त्याला एकदा त्याच्या 'लाईन' बद्दल विचारतो आणि गायकवाड आणि त्याची 'लाईन' चं एकत्र भेटणं, बोलणं, फिरणं वगैरे चालू आहे हे पाहून आशक्या किती भाग्यवान आहे आणि त्याचं सगळं एकदम मस्त जमून गेलंय याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. तेव्हा गायकवाड जे उत्तर देतो ते ऐकून तर एकदम चरकायलाच होतं. गायकवाड म्हणतो "जमलंय कसलं रे..? काही नाही जमलंय. कारण आम्ही 'बीशी' आहोत ना" !!!!!!!
किंवा मग नरुमामाच्या लग्नाविषयी शिरोडकरशी बोलताना मुकुंदाने मुद्दाम आईसाहेबांना कशी 'आपल्यातली'च मामी हवी होती हे सांगताना 'आपल्यातली'च वर विशेष भर देणे वगैरे सगळे प्रसंग अगदी नकळत आलेले पण अगदी लहान लहान मुलामुलींच्याही मनात अजाणतेपणी का होईना खोलवर रुजलेले तत्कालीन समाजातले जातीभेदाचे संस्कार अगदी ठळकपणे अधोरेखित करतात. (आताही यातलं काहीही फारसं बदललेलं आहे असा माझा मुळीच दावा नाही.)
मुकुंदाच्या मनात जो एक सतत वैचारिक गोंधळ चालू असतो तो आवरायला थेट अशी मदत होते ती फक्त नरुमामाचीच. तो मामा कमी आणि मित्र जास्त असल्याने त्याच्याबरोबर इंग्रजी पिक्चर बघणे, बिनधास्त गप्पा मारणे, त्याच्याशी मुलींविषयी बोलणे, त्याला शाळेतल्या मुलींचे किस्से सांगणे असे प्रकार दर भेटीत होत असतातच. अनेक प्रसंगांत नरूमामाच मुकुंदाचं चुकीचं पडलेलं किंवा पडू पाहणारं पाउल जागेवर आणताना दिसतो. उदा 'सुकडी'ला चिडवण्याचा प्रसंग किंवा धीर करून 'शिरोडकर'शी बोलण्याचा प्रसंग. किंबहुना मुकुंदाच्या प्रत्येक कृतीवर, प्रतिक्रियेवर, वागण्याबोलण्यावर नरूमामाचाच प्रचंड पगडा आहे, फार मोठा प्रभाव आहे आणि पुस्तकातल्या वाक्यावाक्यात तो जाणवतो. पानोपानी नरुमामाचे दाखले सापडतात. मुकुंदाच्या प्रत्येक वाक्यात, विचारात, कृतीत, कृतीच्या पुष्ठ्यर्थ नरूमामाची उदाहरणं आहेत. अर्थातच नरूमामा हा त्या काळाच्या तुलनेत विचारांनी अधिक सुधारित असणार्या अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करतो.
असं सगळंच जगावेगळं करणार्या नरुमामाने आधी (गंमतीतच) सांगितल्याप्रमाणे ख्रिश्चन मुलीशी लग्न न करता आईसाहेबांना आवडलेल्या 'आपल्यातल्याच' मुलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर सगळ्यात जस्त हिरमोड होतो तो मुकुंदाचा. सामाजिक, वैचारिक जोखडं भिरकावून देऊन वेगळं काहीतरी करणार्या नरूमामाने प्रत्यक्षात मात्र एवढा मोठा निर्णय घेताना मळलेली वाटच चोखाळावी हे नरूमामाकडे एक ग्रेट मित्र, आदर्श माणूस म्हणून बघाणार्या, स्वप्नील आयुष्यात वावरणार्या मुकुंदाला पचवायला जड जातं.
पुस्तकात पानोपानी येणारे आणीबाणी उर्फ अनुशासनाचे उल्लेख आणि त्या अनुषंगाने येणारे प्रसंग हे तर निव्वळ अप्रतिम. १४-१५ वर्षांच्या मुलाच्या दृष्टीकोनातून आणीबाणीकडे बघून त्यावेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती, लोकांची मतं, विचार मांडण्याची कल्पनाच कसली बेफाट आहे !! त्याकाळची परिस्थिती, आणीबाणीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन, त्यांची मतं, आणीबाणीला ठाम विरोध करणारे ग्रुप्स आणि आणीबाणीला अनुशासन म्हणवून त्यापायी येणार्या शिस्तीचं कौतुक करणारे लोक आणि आणीबाणीच्या वेळी लोकांना आलेले अनुभव इत्यादी गोष्टी दहा अग्रलेख वाचून कळणार नाही एवढ्या चांगल्या रीतीने या पुस्तकातून कळतील कदाचित !!
मुकुंदाच्या मनातले गोंधळ शमवू शकणारी किंवा त्याच्या विचारांना चालना देणारी, मदत करणारी अजून दोन पात्रं म्हणजे बाबा आणि चित्र्या. बाबांची थेट अशी मदत फारच कमी होते. परंतु बुद्धिबळाविषयीची आवड वाढीला लावणे किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींशी गैरवर्तणूकीच्या कथित आरोपावरून शाळेतून अगदी नाव काढायची पाळी आलेल्या मुकुंदाला विश्वासात घेऊन, प्रसंग समजावून घेऊन आणि आपल्या मुलाची काहीच चूक नाहीये हे कळल्यावर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून शांत व संयमित आवाजात मुकुंदाची बाजू थेट मुख्याध्यापक आणि तक्रारकर्ते यांना पटवून देण्याची त्यांची हातोटी दाखवणारा प्रसंग वाचून तर त्यांचा मोठेपणा अगदी थेट पोचतोच.
चाळीत टीव्ही आल्याने बुद्धिबळ संपल्यामुळे विषण्ण झालेले बाबा, मोकळ्या जागेत बुद्धिबळ खेळले न गेल्याने आणि टीव्हीपायी लोकं न जमल्याने आजुबाजुच्यांनी अंगणात कचरा टाकायला लागणे यांसारख्या अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगांत चंगळवादावर अतिशय संयत आणि जवळपास शून्य शब्दांत लेखकाने ओढलेला कोरडा चांगलाच लागतो. चंगळवादावर ओढलेला असाच एक आसूड म्हणजे मुकुंदाच्या शाळा ते घर या मार्गावरचं पूर्ण पुस्तकभर डोकावणारं शेत पुस्तकाच्या शेवटच्या पानात एकाएकी नाहीसं होण्याच्या मार्गावर येतं तो प्रसंग.. तिकडे शेती करण्याऐवजी चाळी बांधायचं ठरवलं असल्याचं शंकर्याचे बाबा मुकुंदाला सहज सांगितल्याप्रमाणे सांगतात तेव्हा तर अगदी विषण्णच व्हायला होतं. पुस्तकातल्या निर्जीव पात्रांशीही आपण एवढे एकरूप होऊन गेलेलो असतो हे तोवर आपल्याला जाणवलेलंच नसतं.
मुकुंदाला आवरणारं आणि सावरणारं दुसरं एक महत्वाचं पात्र म्हणजे चित्र्या !! हा चित्र्या म्हणजे एक अवली कार्ट आहे. अतिशय हुशार, प्रचंड अभ्यासू, समजूतदार, परिस्थितीची चांगली जाण असणारं, आईबाबांमधल्या सततच्या भांडणांमुळे त्यांच्या प्रेमाला पारखा झालेलं, 'देवकी' पासून येणार्या कटु अनुभवांनी कंटाळून गेलेलं आणि घरातल्या या विचित्र परिस्थितीला कंटाळून जास्तीत जास्त वेळ त्याच्या आवडत्या वैज्ञानिक प्रयोगांत आणि ग्रुपचा नाका असलेल्या सुर्याच्या बिल्डिंगीत घालवणारं असं हे एक अतिशय इंटरेस्टिंग पात्र आहे. तो मुकुंदाला वेळोवेळी समजावतो, काही महत्वाची गुपितं फक्त मुकुंदाशीच शेअर करतो, आपल्या शांत आणि संयमित वागण्याने, गोड बोलण्याने आणि (मुकुंदाच्या भाषेत) गोर्यागोमट्या चेहर्याचा वापर करून ग्रुपला कित्येकदा मोठ्या संकटांतूनही वाचवतो. थोडक्यात नरूमामाला नियमित भेटता येत नसल्याने आणि त्याच्याकडून नियमितपणे मार्गदर्शन (!!!) मिळवता येत नसल्याने नरूमामानंतर चित्र्या हाच मुकुंदाचा एकमेव आधार असतो.
'शिरोडकर'बद्दल न लिहिता लेख संपवला तर मुकुंदा मला कधीही माफ करणार नाही. ('शाळे'त सर्वस्वी गुंतून गेल्याचा पुरावा यापेक्षा दुसरा देता येणार नाही :) ) .. कारण पुस्तकाचा निम्मा भाग हा शिरोडकरने व्यापलेला आहे. निम्म्या पानात प्रत्यक्षात आणि उरलेल्या निम्म्या पानात मुकुंदाच्या विचारांत, बोलण्यात, गप्पांत सगळीकडे. ही एक अतिशय गोड मुलगी आहे हा आपला विचार प्रत्येक पानागणिक अधिकाधिक पक्का होत जातो. तिचं मुकुंदाशी ओळख करणं, बोलणं, चोरून भेटायला जाणं वगैरे सगळं सगळं एकदम पटून जातं आपल्याला. आणि मुकुंदाची तिच्याबद्दलची इन्टेन्सिटी शाळेतल्या गाण्याच्या भेंड्यांचा प्रसंग, मुकुंदाने तिच्यासाठी मार खाण्याचा प्रसंग, स्काउट कॅम्पचा प्रसंग, तिच्यासाठी लांबचा क्लास लावण्याचा प्रकार इत्यादीमधून अधिकच ठळकपणे समोर येते. तिच्यासाठी चेसची स्पर्धा जिंकणं, तिच्यासाठी जीव खाउन अभ्यास करून निव्वळ शेवटच्या काही महिन्यात अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं वगैरे वगैरे प्रकार प्रचंड आवडतातच आणि पटूनही जातात. किंवा नाईट कॉलेज शोधणं, मुंबईत भाड्याच्या घरात राहण्याची कल्पना करणं वगैरे प्रकार तर पटत नसूनही मुकुंदाच्या विचारांची भरारी आणि त्याची तयारी पाहून मनोमन हसायला आल्याशिवाय राहत नाही..
अर्थात हे पुस्तक नववीच्या एका टारगट ग्रुपविषयीचं असल्याने मुली, त्यांच्याबद्दलचे बिनधास्त उल्लेख, कट्ट्यावरची भाषा, नवीननवीन शब्द, शिव्या, 'ढिंगच्याक' गाणी, वात्रटपणा, आगाऊपणा या सगळ्याचा पुरेपूर वापर पुस्तकात आहे पण तो क्वचित कधीतरीच आक्षेपार्ह वाटतो किंवा बरेचदा वाटतही नाही. कारण सुरुवातीपासूनच आपण या पुस्तकात आणि विशेषतः मुकुंदात एवढे गुंतुन गेलेलो असतो की आपणही त्याच्याबरोबर शाळेत, कट्ट्यावर, सुर्याच्या बिल्डिंगीत, संध्याकाळच्या क्लासला, गुपचूप शिरोडकरच्या मागे, नरूमामाबरोबर इंग्रजी पिक्चरला, केटी आणि विजयच्या रुमवर, शाळेच्या रस्त्यावर असलेल्या शेतात जाऊन पोचलेलो असतो. त्यामुळे तो करतोय ते, बोलतोय ते, वागतोय तसं आपण ऑलरेडी वागायला लागलेलो असतो. आक्षेप घेण्याचा प्रश्न येतोच कुठे !!!!
थोडक्यात पुस्तकभर एवढे चढ-उतार येऊन, टक्केटोणपे खाऊन अचानक शेवटच्या काही पानांमध्ये मुकुंदाची आणि त्याच्या प्रेमाची घडी अगदी सुरळीतपणे बसणार आणि अगदी गोड गोड सुखांत शेवट वाचायला मिळणार असं वाटायला लागतं. आणि तेव्हा ते थोडंसं टिपिकल पुस्तकी वाटतंय की काय असं म्हणेम्हणेस्तोवर शेवटचं पान आलेलं असतं आणि तेवढ्यात.......... काही कळायच्या आत आपल्या पायाखालची चादर सर्रकन ओढली जाते. एकदम चटका बसून आपण वास्तवात येतो. स्वप्न संपल्यागत वाटतं... तसं म्हटलं तर पुस्तकाचा शेवट रूढार्थाने तितकासा काही ग्रेट किंवा जगावेगळा वगैरे नाहीये पण वर म्हटल्याप्रमाणे आपण मुकुंदामध्ये एवढे गुंतून गेलेले असतो की शेवटी मुकुंदाच्या मनावर जेवढा प्रचंड आघात होतो तेवढाच जोरदार धक्का आपल्यालाही बसतो. अगदी वेड्यागत होतं.
वपुंचं पार्टनर वाचताना त्यात शेवटी एके ठिकाणी "पार्टनर हा खराच होता की आपल्याला जसं व्हावंसं, वागावंसं वाटत होतं तसं वागणारी एक काल्पनिक व्यक्ती होती" अशा काहीश्या अर्थाचा एक उल्लेख आहे. त्याचप्रमाणे शाळा वाचताना आणि वाचून संपल्यावरही कित्येकांना अगदी स्वतःच्या शाळेविषयी वाचल्यासारखं, आपल्या त्यावेळच्या आयुष्याविषयी, त्यावेळी केलेल्या मस्ती, धम्माल, दंग्याविषयी आणि खोड्यांविषयी आठवतं, काही जणांना अगदी तसंच्या तसं नाही पण अनेक प्रसंग आपल्या शालेय जीवनाच्या जवळ जाणारे वाटतात किंवा कित्येकांना ही 'शाळा' म्हणजे फक्त पुस्तकात असणारी आणि आपल्या प्रत्यक्षातल्या नववी-दहावीच्या आयुष्यापेक्षा कित्येक मैल लांबची वाटते पण असंच सगळं आपल्यावेळीही आपल्या बाबतीतही घडलं असतं तर खूप धमाल आली असती असंही वाटत राहतं.
पण कुठल्याही स्वरुपात का होईना आपण 'या शाळे'ला आपल्या शाळेशी रिलेट करतोच आणि मला वाटतं हेच 'शाळा' चं सर्वात मोठं यश आहे आणि त्याबद्दल मिलिंद बोकीलांचे कितीही आभार मानले तरी ते मुकुंदाच्या शिरोडकरवर असलेल्या, चित्र्याच्या 'केवडा'वर असलेल्या, 'सुकडी'च्या महेशवर असलेल्या, आंबेकरच्या मांजरेकर सरांवर असलेल्या प्रेमापेक्षा आणि समस्त पोरापोरींच्या मनात बेंद्रीणीबद्दल, आप्पाबद्दल आणि केवड्याच्या बापाबद्दल असणार्या रागापेक्षा कित्येक पटीने कमीच असतील !!!!
* या शाळेचा पहिला वर्ग 'ऋतू हिरवा २०११ ' इथे भरला होता.
पण कुठल्याही स्वरुपात का होईना आपण 'या शाळे'ला आपल्या शाळेशी रिलेट करतोच आणि मला वाटतं हेच 'शाळा' चं सर्वात मोठं यश आहे आणि त्याबद्दल मिलिंद बोकीलांचे कितीही आभार मानले तरी ते मुकुंदाच्या शिरोडकरवर असलेल्या, चित्र्याच्या 'केवडा'वर असलेल्या, 'सुकडी'च्या महेशवर असलेल्या, आंबेकरच्या मांजरेकर सरांवर असलेल्या प्रेमापेक्षा आणि समस्त पोरापोरींच्या मनात बेंद्रीणीबद्दल, आप्पाबद्दल आणि केवड्याच्या बापाबद्दल असणार्या रागापेक्षा कित्येक पटीने कमीच असतील !!!!
* या शाळेचा पहिला वर्ग 'ऋतू हिरवा २०११ ' इथे भरला होता.
शाळा म्हटलं की, त्यातली एकूण एक पात्र आपल्या अवतीभवती वावरणारी, आपण अनुभवलेली, आपण क्कुठेतरी बघितलेली, कुणाकडून ऐकलेली..एकदम जिवंत आणि वास्तववादी.
ReplyDeleteमिलिंद बोकील ह्यांनी, प्रत्येकाला पुन्हा पुन्हा शाळेत जाण्याची सुवर्ण संधी दिली आहे बघ ह्या पुस्तकरुपाने...!!
मस्त पोस्ट.. मी पोस्टची पीडीएफ फाईल करून घेतली आहे :)
तुझे परीक्षण प्रचंड आवडले.अगदी सगळ्याच मुद्द्यांचा उल्लेख आलाय. ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या. मी शाळा सोडून फारसा काळ झालेला नाही, आणि आठवणींचा रवंथ करणे हा माझा आवडता छंद आहे. त्यामुळे मला माझ्या शाळेचे सगळेच प्रसंग जसेच्या तसे आठवतात, आम्ही काय बोलायचो, मनात काय -काय विचार यायचे ते सगळे."शाळा " वाचतांना ठळकपणे जाणवत होते की, बोकील साहेबांनी टीनएजर्सच्या मनाचा अगदी योग्य थांग घेतलाय.ते त्यांचे मोठे यश. आणि सामाजिक परिस्थितीची मुलाच्या नजरेतून जाणीव करू देणे अप्रतिम. अथर्वशीर्षच्या आधी एक प्रसंग येतो बघ. "निकमकाकुंसोबत कितीही पटत असले, आणि पोंक्षेकाकुंसोबत खटके उडत असले तरी सवाष्ण म्हणून आई पोन्क्षेकाकुंनाच बोलावते..."अशा आशयाचे. असे अनेक प्रसंग आहेत. तू एक दिलेलाच !.. "बाटलीशी" संबंधित संवाद प्रचंड वास्तववादी.त्यांची गाणी वगैरे पण...टी व्ही आली आणि खेळ बंद झाले.अनुभवले आहे .. आणि त्याच्या भावविश्वातली शिरोडकर केवळ अप्रतिम !! ज्याच्या मनात ९-१० ला शिरोडकर होती तो हे मान्य करेल.रात्रशाळेत शिकणे वास्तववादी वाटत नसेल तुला, पण असा विचार केलेला असतो रे या वयात पोरांनी ! ;) ;) आणि याच वयात भविष्याची(शिरोडकरच्या संदर्भात)प्लानिंग वगैरे करणे तर रजनीकांत टक्के खरे. तुला हसू आले... सत्यवाना , असे विचार येतात रे मनात. :)
ReplyDeleteत्या आंबेकरसारखीच एक मुलगी नववीत आमच्या वर्गात आली होती. ती नागपुरातून,इंग्रजी शाळेतून आलेली.पहिल्याच दिवशी आम्ही पोट्टे गार ! इंग्रजीचे सर खुश ! 'बघा,अशी असते इंग्रजी भाषा !नाहीतर तुमची बघा... ' आणि ती forward (आमच्या लेखी तेव्हा)असल्याने आमच्या(म्हणजे आमच्या वर्गातल्या, उगाच गैरसमज नको !) पोरी बिचाऱ्या एकदम सुमडीत गेल्या होत्या. शाळा वाचतांना ते सगळे प्रसंग झर्रकन डोळ्यांसमोर आले..
सुकडी -महेश म्हणजे आमच्या शाळेतले गोलू आणि गोली ( खरे नाव माहित नाही, आम्ही या जोडप्याला याच नावाने हाक मारत होतो.)खुल्लमखुल्ला प्यार करेंगे हम दोनो....
ह्या पुस्तकातले कितीतरी प्रसंग मी रिलेट करू शकलो.. आणि आता ही कादंबरी माझी ऑल - टाईम फेव. झालीये. आता तर पारायणे होणारेत.. मी माझ्या कित्येक मित्रांना रेकमेंड केलेय हे पुस्तक..
हेरंब, मस्तच लिहिलस परीक्षण...तुझी "शाळा" ताजी वाचून झालीय त्याचा फायदा आहे...मी बहुतेक तीन वर्षांपूर्वी वाचल होतं आणि नंतर ते पुस्तक फिली सोडताना एका मैत्रिणीला दिलं, तिचं राहील होतं वाचायचं म्हणून...मला यातला जातीवाद मला कळला पण तुझ्याइतका जाणवला नाही कदाचित त्याच कारण मी ज्या शाळेत शिकले तिथे हिंदू आणि ख्रिश्चन असे दोनच मुख्य भेद होते...आणि राहिले तिथे पण (सुदैवाने)मराठी आणि बाहेरचे हे जास्त बोललं जायाच...आणि मजा म्हणजे आम्ही मराठी असून बाहेरचे अस काही विचित्र.... असो....मिलिंद बोकिलांची आणखी पुस्तकं वाचयला हवीत अस शाळा वाचल्यापासून ठरवलंय......
ReplyDeletegreat job covering the book so nicely....:)
Awesome. Shala wachla ki kharach shalel gelya sarkha vatata. Milind Bokilana email keli hoti 2 varshya purvi, te tar mhanle ki shala lihitana mala far jast maja ali hoti. Tyanchi itar pustake hi far apatim ahet. Sociology varti tar tyani barach vyasanga kela ahe.
ReplyDeleteShala baddal kai boalava. Tula US madhe kuthe milala pan te? Can you somehow share it with me in NC? Parat vachaichi iccha ahe re.
गेल्या भारतवारीहून परतताना मुंबई ते sanfrancisco दरम्यानच्या विमान प्रवासात या पुस्तकाचा फडशा पाडला होता, त्या वेळी ते आवडलं होतं पण एकदम सोल्लिड असं काही वाटलं नव्हत. कदाचित जेट लाग मुळे या दृष्टीने विचारच केला नव्हता. या लेखा बद्दल धन्यवाद, आता ते पुस्तक मी व्यवस्थित रिलेट लारू शकतोय :)
ReplyDeleteएक वास्तववादी भन्नाट पुस्तक. आल्याआल्याच वाचले होते. पोरींचा दृष्टीकोन आणि पोरांचा दृष्टीकोन यातला फरक इतका सविस्तर, जणू मी मुकुंदाच्या ग्रुपमधलीच असल्यासारखा अनुभवला. ( काही ठिकाणी जरा भाषा जास्ती फाटकी वाटते पण ती ओढूनताणून आणल्यासारखी बोचत नाही हे नक्की. किंबहुना, पन्नास पानांनंतर ती वेगळी जाणवत नाही. )
ReplyDeleteतू म्हणतोस तसे दिसायला अतिशय साधे-सोपे-चित्रण आहे. पण अनेक ठिकाणी झणझणीत अंजन घातले जाते. आणि खरे तर काळ कितीही पुढे जावो आपण माणसे अजूनही तिथेच आहोत.उलट बेगडीपणा वाढलाय.
सत्यवाना,परामर्श खणखणीत झालाय. आवडला हे वेगळं सांगायला हव का? :)
पुस्तक काही अजुन वाचले नाही, पण हे परीक्षण वाचुन लगेचच आणणार आणि यी वीकेंडला संपवणार... thanks for sharing..
ReplyDeleteदोनच महिने झाले शाळा वाचून आणि आज तुझा लेख वाचून पुन्हा बोकीलांच्या शाळेत जाऊन आलो. अप्रतिम पुस्तक आहे रे. शिरोडकर मुकुंदला भेटायला गणपतीच्या देवळात येते तेंव्हा मला कोण आनंद झालेला. शिरोडकरची लाईन असो वा सुर्या, चित्र्यासारख्या अवलादी, शाळा वाचताना मुकुंदात इतका गुंतून गेलो की त्या वेळच्या मनातल्या सगळ्या अधुर्या इच्छा मुकुंदच्या रूपाने पूर्ण होत आहेत असं वाटत होतं. शेवट वाचून फार हळवं व्हायला होतं. शाळा चित्रपटाचा ट्रेलर खूप वेळा पाहून झाला आत्ता चित्रपटाची वाट पहातोय.
ReplyDeleteबाकी परीक्षण आणि समीक्षण लिहिण्यात तुझा आणि बाबाचा हात कुणी धरणार नाही.
जितकं सुंदर पुस्तक लिहिलंय तितकाच हा आढावाही सुंदर झालाय... न कळलेल्या अनेक गोष्टींचा तू सविस्तर खुलासा करून पुस्तकातल्या दुसर्या बाजुची माहिती कळवली आहेस... पोस्ट अतिशय आवडली...
ReplyDeleteछान लिहलंस हेरंबा! हे पुस्तक आतापर्यंत तिनदा वाचलं आहे. एकदा हातात घेतलं की शेवटचं पान वाचूनच खाली ठेवतो.
ReplyDelete"शाळा" --> "दुनियादारी" --> "पार्टनर" ही तिन पुस्तके अशी अनुक्रमे वाचावीत.
इचिभना.........मस्त झालीय पोस्ट
ReplyDeleteशाळा वाचून खुप दिवस झालेत पण आत्ता परत एकदा वाचायची सुरसूरी आल्येय.
प्र. ना. संतांच 'वनवास' मिळाल तर वाच नक्की...'लंपन'च भावविश्व रेखाटलय...जबरी आहे एकदम....
वर्षभराआधी शाळा वाचलं होतं.तुमचं परीक्षण वाचल्यावर पुन्हा एकदा वाचावसं वाटतं आहे.खुप सुंदर लिहलय. धन्यवाद.
ReplyDeleteवेड लावणारी कादम्बरी आहे शाळा!!! त्यातली प्रत्येक गोष्ट ही जाम निरागस वाटते, खासकरुन मुकुन्दाबद्दल!!! मला त्याच्याबद्दल आवडणारि अजुन एक गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा तो शिरोडकर सोबत बोलत असतो तेंव्हा त्याला त्यांच्या भोवताली एक ढगासारखे कडे असल्याचे भासत असते, ते जाम unusually romantic आहे. बाकी प्रत्येक छोटे छोटे प्रसंग खूप काही सांगून जातात. आणि शेवट खऱ्या अर्थाने tragic वाटतो. या कादंबरीवर आधारित "गमभन" हे नाटक सुद्धा अप्रतिम होतं.
ReplyDeleteलेख आवडला, म्हणजे संपूर्ण कादंबरीच्या highlights बघितल्यासारखं वाटलं.
तुमचं परीक्षण वाचल्यानंतर पुन्हा एकदा शाळा वाचवसं
ReplyDeleteवाटतं आहे.खुप सुंदर परीक्षण केलं आहे.धन्यवाद.
हेरंब...एकदम जबरदस्त परीक्षण...ही कांदबरी ऑल टाइम फ़ेवरीट आहे.
ReplyDeleteदीपक +१
वाह!!!!!, मस्त वाटले.... शाळाची महती माझ्यामते ही आहे की ती शाळा "जेनेरीक" आहे, मनापासुन ती कादंबरी वाचली की "कॉन्व्हेंट" ते "व्हर्नाक्युलर" शिकलेल्या सगळ्या पोरांना आपापल्या परिवेषातली शाळा आठवल्यावाचुन राहात नाही, शेवटची वाक्ये अक्षरशः भयाण वाटतात, "सु~या अन फ़ावड्या नापास झाले होते, चित्र्या बांद्र्याला जाणार होता, शिरोडकर गेली होती..... शाळा कधीच संपली होती आता फ़क्त दहावीचे भयाण वर्ष उरले होते!!!!".... राजे ही वाक्ये वाचली अन ती डोळ्यात आलेल्या पाण्याने कधी धुसर झाली कळलेच नाही हो.....
ReplyDeleteMastach !
ReplyDeletemaza hi shala he aavdta pustak aahe pratyek veli vachal tevh navin kahitari sapdta hya pustakat Chan paramarsh ghetlat aapan pustkacha
lekh vachun zalyavar asa vatla ki pustak vachun aatach sampavlay
Great Job
मस्तच रे ... जबरी लिहिलंय पोस्ट
ReplyDeleteसिद्धार्थ +
खूपच सुंदर लिहिलंय....
ReplyDelete"शाळे"बद्दलच्या आठवणी ताज्या झाल्या....!!!
मस्तच आहे पोस्ट.. ह्या मस्त पुस्तकासाठी हवी तशी..
ReplyDeleteशाळेत पुस्तकं वाचायचा कंटाळा होता.. पण आता 'शाळा' पुस्तक वाचून शाळेचा feel येतो..
chaan lihilayas parikshaN . asach ajun ek mala avadalela pustak mhaNaje Prakash Santanch 'Sharada Sangeet'- eka lahan mulachya doLyatun ( mukundapeksha khoop lahan) tyannee je jag depict kelay to ek sense-intensive anubhav ahe. vachala asel tyanna patel, nasel tar jarur vacha.
ReplyDeleteमागवलं आज.. :)
ReplyDeleteसगळं पुस्तक पुन्हा आठवलं मला ! परीक्षण छान. :)
ReplyDeleteमाझी एकूण शिक्षण ह्या विषयावर वा शिक्षणाचा प्रमुख उल्लेख असलेली अशी, एकूण तीन पुस्तके वाचली गेली. दोन आत्मकथा व एक कादंबरी. 'कोणते अधिक आवडले' ह्यानुसार जर त्यांमध्ये क्रमांक लावायचा म्हटलं तर 'ओपन' व 'झोंबी' ह्यात मला प्रथम क्रमांक ठरवणे कठीण जाईल व त्याखाली 'शाळा' असेल. :)
मी आधी "ग म भ न" बघितलं होतं, या कादंबरीवर आधारीत नाटक आहे. त्यावरच - http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2008/06/blog-post_23.html हे लिहिलहि होतं.
ReplyDeleteपुस्तक बेस्ट आहे. त्यातल्या शिव्या खटकत नाहित कुठे. आणि आपण नववीत याच भाषेत बोलायचो हे सुध्दा आठवलं.
मी नक्की alien आहे. मला शाळा आवडलं नाही... :-S
ReplyDeleteखरंय.. काही प्रसंगांत अगदी आपलं शालेय जीवन आठवतं. पण बरेच प्रसंग मी स्वतः रिलेट करू शकलो नाही पण तरीही आवडले. (बहुतेक शाळेत असताना मी प्रचंड म्हणजे मला वाटतंय त्यापेक्षाही चिक्कार बावळट होतो बहुतेक ;) ) म्हणूनच मी शेवटी असं म्हंटलंय की "कित्येकांना ही 'शाळा' म्हणजे फक्त पुस्तकात असणारी आणि आपल्या प्रत्यक्षातल्या नववी-दहावीच्या आयुष्यापेक्षा कित्येक मैल लांबची वाटते पण असंच सगळं आपल्यावेळीही आपल्या बाबतीतही घडलं असतं तर खूप धमाल आली असती असंही वाटत राहतं." .. हे माझं मला स्वतःला उद्देशून आहे.
ReplyDelete>> मस्त पोस्ट.. मी पोस्टची पीडीएफ फाईल करून घेतली आहे :)
अरे वा.. विशेष हाबार्स.. !
धन्यवाद स्वामी. विस्तृत प्रतिक्रियेबद्दल विशेष आभार. मी शाळेत बावळट असल्याने अनेक प्रसंग रिलेट करू शकलो नाही पण आवडले मात्र प्रचंड. अर्थात अनेक प्रसंग तेवढ्याच जोरकसपणे रिलेटही करता आले म्हणा. माझ्या तरी मते शाळा हे एक जस्ट मेटाफोर आहे. बोकीलांना शाळेच्या माध्यमातून तेव्हाची सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती, राजकारण, संस्कार, चंगळवाद इत्यादी विषयांवर मतं मांडायची होती आणि ती १४-१५ वर्षे वयाच्या नजरेतून मांडणं हे त्यांना प्रचंड प्रभावी वाटलं असावं आणि ते प्रभावी ठरलंच (दिसतंच आहे :) )
ReplyDelete>> आता ही कादंबरी माझी ऑल - टाईम फेव. झालीये.
माझीही. शाळा आणि पार्टनर मी कितीही वेळा कॅचू शकेन. पार्टनरची कमीत कमी १० पारायणं ऑलरेडी झालीत :)) आता शाळेचीही होतीलच अनेक.
धन्स अपर्णा. हो. वाचल्या वाचल्या लिहायला घेतलं. आपोआपच लिहीत गेलो कारण वाचतानाच विचारांची एवढी गर्दी झाली होती दिक्यात आणि सगळे महत्वाचे मुद्दे वाचतानाच डोक्यात एवढे फिट्ट बसले होते की ते आपोआपच उतरले पोस्टमधे..
ReplyDelete>> मिलिंद बोकिलांची आणखी पुस्तकं वाचयला हवीत अस शाळा वाचल्यापासून ठरवलंय......
अगदी अगदी सहमत. मी ही असंच ठरवलंय..
प्रियरंजन, प्रतिक्रियेबद्दल आभार. मिलिंद बोकील ग्रेटच आहेत. त्यांनी सोशिओलॉजीवर पीएच डी केलेली आहे. त्यांची इतर पुस्तकं खरंच वाचायची आहेत आता.
ReplyDeleteअरे माझे आई-बाबा आलेत आत्ता. ते येताना घेऊन आले. तुला इथे मिळू शकेल ते.
http://kharedi.maayboli.com/shop/product.php?productid=16280
अजून एक. मला मिलिंद बोकीलांचा इमेल आयडी देऊ शकशील का? त्यांच्याशी संपर्क करायची फार इच्छा आहे. प्लीज.
प्रवीण, शक्य आहे. कदाचित जेटलॅग, थकवा वगैरेमुलेच असेल. कारण माझ्या तरी मते प्रचंड ग्रेट पुस्तक आहेत. आणि मी पोस्ट मधे म्हटल्याप्रमाणे छुपे तपशील आहेत. Reading between the lines is MUST.
ReplyDeleteजमल्यास पुन्हा वाच, अनेक नवीन संदर्भ सापडू शकतील पुन्हा.. प्रतिक्रियेबद्दल आभार.
ख्ररंच.. ते पुस्तक वाचण्यापेक्षा भूतकाळ प्रत्यक्ष अनुभवता येतो हे पुस्तकाचं मोठ्ठं यश.. मी म्हटल्याप्रमाणे आपण एवढे एकरूप होऊन जातो पुस्तकात की भाषा फाटकी वगैरे वाटतच नाही सुरुवातीचा काही काळ वगळता. कारण त्यानंतर आपण त्यांच्यातलेच एक होऊन जातो !!
ReplyDelete>> पण अनेक ठिकाणी झणझणीत अंजन घातले जाते.
आणि हे झणझणीत अंजनच मला प्रचंड आवडलं. एकापेक्षा एक शालजोडीतले दिले आहेत त्यांनी.
प्रतीकेईयेबद्दल आभार श्रीताई.
गौरव, नक्की वाच. आणि एकदा वाचलंस की पुन्हा पुन्हा वाचत राहशील याची खात्रीच !
ReplyDeleteहो ना सिद्धार्थ. एक विलक्षण अनुभव आहे हे पुस्तक म्हणजे.
ReplyDelete>> शिरोडकर मुकुंदला भेटायला गणपतीच्या देवळात येते तेंव्हा मला कोण आनंद झालेला.
अगदी अगदी सहमत. माझंही असंच झालं होतं. मुकुंदा जसा तरंगत असतो तसंच आपलंही होतं.
>> त्या वेळच्या मनातल्या सगळ्या अधुर्या इच्छा मुकुंदच्या रूपाने पूर्ण होत आहेत असं वाटत होतं.
हाहाहा.. पार्टनर संबंधीच्या वाक्यातून मला हेच सुचवायचं होतं :) पूर्ण सहमत..
शेवटी खरंच खड्डा पडतो रे पोटात. फार बिचारा वगैरे वाटायला लागतो जोश्या अचानक.
प्रतिक्रियेबद्दल आभार रे.
आनंदा, अनेक आभार्स..
ReplyDeleteमला तर वाटतं की दर वेळी वाचताना अनेक नवीन गोष्टी सापडतील या पुस्तकात. जेवढं साधं दिसतं तेवढंच ताकदवान आहे हे पुस्तक.
हो दिपक. खरंच अत्यंत सुंदर पुस्तक आहे.
ReplyDeleteशाळा आणि पार्टनरच्या बाबतीत १०१% सहमत. ही दोन्ही माझी प्रचंड आवडती आहेत. दुनियादारीही आवडलं पण खूप असं नाही.
रोहित आभार्स :)
ReplyDeleteवाचून टाक लगेच :)))
'वनवास' बद्दल ऐकलंय बरंच. नक्की वाचतो.
राज, कितीही वेळा वाचलं तरी पुनःप्रत्ययाचा आनंद देणारं पुस्तक आहे हे.
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल अनेक अनेक आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
मनाली, खरंच वेगळंच विश्व आहे ते.
ReplyDelete>> मला त्याच्याबद्दल आवडणारि अजुन एक गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा तो शिरोडकर सोबत बोलत असतो तेंव्हा त्याला त्यांच्या भोवताली एक ढगासारखे कडे असल्याचे भासत असते, ते जाम unusually romantic आहे.
सॉलिड... हे लक्षातच आलं नव्हतं. पण आता अगदी व्यवस्थित आठवतंय. छान निरीक्षण.
गमभन बघायचं आहे. लवकरच बघेन.
प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
धन्यवाद राज.
ReplyDeleteआभार योगेशा. निर्विवाद ऑल टाइम फ़ेवरीट !!
ReplyDeleteधन्यवाद गुरुनाथ.
ReplyDeleteखरंच शेवटची वाक्यं म्हणजे पूर्ण हादराच आहे. अक्षरशः पायाखालची चादर सर्रकन खेचली जाते. एकदम भयाण विषण्ण वाटत राहतं !!
प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
>> pratyek veli vachal tevh navin kahitari sapdta hya pustakat
ReplyDeleteअगदी अगदी सहमत. वेगळंच पुस्तक आहे हे.
प्रतिक्रियेबद्दल आभार, हंसराज
सपासाहेब, आभार्स :)
ReplyDeleteगायत्री, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार.
ReplyDeleteआणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
योग, प्रतिक्रियेबद्दल आभार.
ReplyDelete>> शाळेत पुस्तकं वाचायचा कंटाळा होता.. पण आता 'शाळा' पुस्तक वाचून शाळेचा feel येतो..
भारी एकदम.. सहीच.. :))
धन्यवाद स्मिता.
ReplyDeleteहे प्रकाश संतांचं पुस्तक म्हणजे वर रोहित म्हणतोय ते 'वनवास' च का? की हे वेगळं?
नक्की वाचतो आता. धन्यवाद.
काका, वाचून झाल्यावर सांगा कसं वाटलं. कदाचित तुम्हाला अजून काही नवीन गोष्टी जाणवतील.
ReplyDeleteधन्यवाद अनघा. ती दोन्ही सुद्धा नक्कीच वाचायची आहेत मला.
ReplyDeleteयापुढे अनघा आणि पुस्तक म्हंटलं की मला 'ओपन' आठवल्याशिवाय राहणार नाही :)))
सौरभ, वाचलं तुझं गमभन चं परीक्षण. सुंदर लिहिलं आह्से. कमेंटलोय तिकडे.
ReplyDeleteखरंय. शिव्या, भाषा काही काही खटकत नाही कारण आपण इतके एकरूप झालेलो असतो की ते सगळं आपणच जगतोय, करतोय असं वाटत असतं. :)
मी नक्की alien आहे. मला शाळा आवडलं नाही... :-S
ReplyDeleteहाहाहा सौरभ. अरे या न्यायाने मी तर स्वतःला महामहामहामहा-एलियन म्हंटलं पाहिजे.
प्रत्येकाची आवड. आवडलं नाही तरी हरकत नाही. फक्त पुन्हा एकदा सगळे संदर्भ जोडून नीट वाच एवढंच सुचवेन. (आणि तरीही आवडलं नाही तरी तू एलियन नाहीस एवढं मात्र नक्की) ;)
शारदा संगीत आणि वनवास दोन्ही प्रकाश संतांचीच पुस्तक आहेत.मी अजुन शारदा संगीत वाचल नाहीये.पण दोन्हीचा नायक तोच लहान मुलगा आहे-लंपन......नक्की वाच.......
ReplyDeleterohit has already explained about sharada sangeet and Vanavas. Donhee sundar pustaka ahet. Sharada Sangeet madhalya gavat mee kahee varsha rahiliye aNee tya sangeet vidyalayat hee tithalya mulenbarobar geliye tyamule mala jasta relate karata al. Vanavas hee chaanach ahe. after all Indira Santanche suputra Prakash Sant , sensitivities jagavegaLya nasalya tarach naval nahe eka?
ReplyDeletenaav lihayala visarle. vrachee comment mazee ahe -Smita
ReplyDeleteबोकीलांचा एक कथासंग्रह वाचला होता कधीतरी (की कादंबरी? आठवत नाही!!) - ते पुस्तक तितकस आवडल नव्हत म्हणून मग सोडून दिल वाचण. त्यांचे समाजशास्त्रीय लेखन मात्र वाचते मी.
ReplyDeleteशिवाय एकदा वनवास, शारदा संगीत (प्रकाश नारायण संत )अशी पुस्तके वाचल्यावर या विषयावर दुसर काही वाचावस वाटल नाही - हे जरा अतिरेकी मत आहे - कबूल!
पोस्ट उत्तम लिहिली आहेस! मी ५ वर्षांपूर्वी वाचलंय शाळा.. तुझी पोस्ट वाचून एकदम रिफ्रेश झाला!
ReplyDeleteआणि वर रोहित ने सांगितल्या प्रमाणे प्रकाश संतांची ४ पुस्तक नक्की वाच.. वनवास, शारदा संगीत, पंखा आणि झुंबर, याच क्रमाने वाच. चारही पुस्तकांचा नायक एकच आहे- लंपन.
Heramb..pratamtaha tuze aabhar! Shala war ewhdi chikitsak ani pragalbha pratikriya mi pahilyanda waachli.Kityek lokkana hi kadambari mhanje Joshi cha 'first crush' watato.Shala cha aawaka far motha ahe ani tyala anek kangore ahet ani prtyek weli ek nava kangora samor yeto.Pan he jatibhedawishyiche wishleshan mazya pratyayala itke ale nawhate..Tu ek nawa kangora samor aanlas.Shala he anek Joshya,Chitrya,Surya,Shirodkar yancha aatmacharitra ahe ahe ase mala watte.Rud arthane te joshya che mukta chintan asu shakte..Pratyekachi vichar karnyachi paddhat wegli aste.Mi tula couter karat nahi pan tu mhantos tasa joshya mala gondhallela watat nahi,ulat to mala tham ani paripakwa watto.Tyane he gruhit dhrla ahe ki gharun aantarjatiya lagnala virodh honar..mhanun to nite school ,part time nokri ase plan karto ani shirodkar la hi 'aapan pude kay karaycha' asa vicharto.Yat samajik,rajkiya chitran ala asla tari joshyala tyachya shi kahihi dene ghene nahi..tyacha wishwa shirodkar ne wyapun takla ahe..tyamule to je karto..kinwa karat nahi..te sagla shirodkar sathich ! anekanna shala wachun june diwas aathawtat.Tyatle saglech anubhav pratyekala ale nasle tari kahi anubhav pratyekalach alele astat ani te tyachya/tichya halwya kopryala sprshun jatat..to kopra mag shirodkar asu shkto,nakya warcha time pass asu shakto,maghe 2 bench asu shakto,cricket chi match asu shakto,manjrekar sir suddha asu shakto.Shala madhe kontahi aawirbhaw aanlela nahi he kharach ahe pan samajik,rajkiya paristhiti war bhashya karaw asa Milind Bokil yancha uddesh asawa ase watat nahi.Milind Bokil yancha shala warcha ek video ahe youtube war tyachi link dili ahe.
ReplyDeletehttp://www.youtube.com/watch?v=42VW4Die9RI
----------
Narumamcha joshya war pagda ahe he nischit pan tyacha narumama war jasta wishwas nahi.To aaisahebanna sagla sangel asa watun joshya itar mulanchya nawane tyala prashna vicharat rahto.Tasach chitryachya,suryachya gharchi bhadana ani tyancha aaplya gharchya bhandananshi tulanatmak vichar kelela disto.'aamchya ghari kahi kami bhandana hot nahi pan baba sagla aikun ghetat' asha arthach ek wakya ahe te kautumbik paristhiti war bhashya karun jata.Pan ya saglya goshti aapsuk ghadlya ahet ase mala watte.Tasech tyatlya kahi goshti mhanje gangu cha gana,abhanga anawshyak ahe asa watat nahi ulat mala te apariharya watta..! aaplya paiki konihi asa nasel jyane hi gani/kavita aaiklya nahit..ani jo asa asel to 'shalet' gelach nahi asa mi mhanen."Suttit kantala yeto karat tyat shala naste" asha arthach ek wakya pan khup kahi sangun jata.Shala kadambari cha mukha prushta mala joshya sarwat shewti result gheun ghari yet asto..jewha tyachya aayushyat fakta dahavi nawacha bhayan warsha urlel asta..tewha to jewha tya katalawar tekto tewhach ahe asa watta.Shala kadambarichya mage ji caption ahe tyawarun Milind Bokil yanna nakki kay mhanaycha ahe te thodafar sangta yeil..tyanna ti gaichya pathiwar bharnari,baglya pramane mukta asleli pan khup kahi sunder shikwun janari shala bharwaychi hoti..Ti tyanni bharawli!!
------------
Ha purna blog Milind Sir yanni wachla ahe ani tyannich hi link mala dili.Milind Bokil yanchya email id chi vicharna ya bolgchya thread madhe zali ahe ahe.Konala tyancha email hawa aslyas mazya email war samparka karawa.
meetmak23@gmail.com
---------------------
Shala war 'Hamne jina sikh liya' nawacha masalewaik hindi cinema ala hota pan ata Sujay Dahake cha marathi Shala 2-3 mahinyat yet ahe.Tyache promo youyube war ahet..tyawarun Shala milestone tharel asa wattay.
--------------------
Heramba ani itar sarwa jyani aaple vichar ithe mandle tyache aabhar..!
--------------
ichibhana farcha lambla ki maza likhan..:)
Ani ek goshta..ya purna kadambarit shirodkarcha nav alela nahi..Mi yacha khup vichar kartoy..ticha nav ka ala nasel..?
ReplyDelete---------------
Prteyk shalet pratyek wargat asa ek group astoch jyamadhe ek hushar(madhyamwargiya),ek hushar ani chalakh(sadhan kutumbatil),ek dha ani maramari karnara(shrimanta),ek garib-dha-pan khelat hushar mulga asto..!
एकदम भन्नाट ........मी अजूनही वाचलं नाहीये हे पुस्तक .....पण यावरचे एवढे लेख आणि उल्लेख वाचालेय्त .....कि, ओढ वाढतच चाललेय...
ReplyDeleteपरीक्षण खर्रेच खूप जास्त सहीये... मला पुस्तका पेक्षा जास्त परीक्षण आवडले... ;-)
ReplyDeleteपिक्चर रिलीज व्हायच्या आत वाचतोच आता...परीक्षण तर झक्कास...:)
ReplyDelete' शाळा ' वाचून ५-६ वर्षे झाली. कादंबरीचा विषय आणि मांडणी मुळातच खूप प्रवाही आहे . विषय जिव्हाळ्याचा आहे.. सामाजिक स्तर आणि सनातनी विचारांवर उत्तम कोपरखळ्या मारल्या आहेत. पौगंडावस्थेतल्या मुलांची मानसिक जडणघडण पण छान मांडली आहे. एकंदरच वाचनीय कादंबरी आहे.
ReplyDeleteपुस्तका बद्दल काही लिहीत नाही. मी बरोब्बर नववीत असतानाच वाचलं होतं. म्हणजे ते किती आवडलं असेल याचा विचार कर.
ReplyDeleteपण तू हे पाहिलंस की नाही अजून ?
http://www.youtube.com/watch?v=6IFxDCci564
http://www.youtube.com/watch?v=CqnEbMjUu8I
झकास सिनिमॅटोग्रफी, झकास लोकेशन्स, झकास दिग्दर्शन आणि महत्वाचं म्हणजे झक्कास 'शिरोडकर'
क्यूट हा शब्द फिका वाटतो खूप तिच्यासाठी ! अगदी जशी पुस्तकात आहे तशीच्या तशी.
रिलीज कधी होणार आहे ते मात्र माहीत नाही. फेसबुकच्या कम्यूनिटीवर लिहिलं आहे coming fall 2011
Actually heard a lot about the book,but never got chance to read this one.A movie based on Shala is also coming so after reading your take it is looking like a must read and watch too.Coming on to the point of marathi novels,there is another novel "marmabhed" and "raktapratima" of shashikant bhagwat which are really awesome and you should read those.
ReplyDeleteशाळा घेवून वाच्यण्यामागे हि पोस्ट वाचता यावी आणि उमजावी हे एक कारण होतं
ReplyDeleteशाळा वाचून झाल्यावर पोस्ट वाचली .. कसलं भारी विश्लेषण आहे...
ह्यातले बरेचसे प्रसंग डोळ्यासमोर पाहिलेले,अनुभवलेले,ऐकलेले आहेतच त्यामुळे पुस्तकात कुठे अतिशयोक्ती वाटत नाही ..
उलट पुस्तक कमी आणि कोणा आपल्यापैकी एकाची दैनंदिनी वाचतोय असं वाटायला लागत ..
हि पोस्ट वाचल्यावर खूप खोल दडलेले ते अर्थ अलगद वर येतात ..
पहिल्यांदा जसं वाचल आणि दुसर्यांदा जसं वाचेन त्यामध्ये खूप फरक असणारे .. आणि त्यासाठी तुला धन्यवाद
(रच्याक पार्टनर हे माझंही अतिशय जवळच पुस्तक आहे ..खूप पारायण झालीत...त्यावरही एखादी पोस्ट टाक ना )
रोहित धन्यवाद.. नक्की वाचतो आता.
ReplyDeleteस्मिता, प्रतिक्रियेबद्दल आभार. प्रकाश संतांची पुस्तकं नक्कीच वाचायला हवीत आता !
ReplyDeleteसविताताई, शाळा हेही बोकिलांचं (शाळा विषयापेक्षा) समाजशास्त्रीय विषयावरचंच पुस्तक अधिक आहे असं माझं मत आहे.
ReplyDeleteप्रकाश संतांची पुस्तकं वेटिंग लिस्ट मधे गेलीत आता :)
धन्यवाद केतकी. मला तर आता शाळा पुन्हा पुन्हा वाचावं आणि वाचतच राहावंसं वाटतंय.. :)
ReplyDeleteनक्की वाचतो प्रकाश संतांची पुस्तकं. आणि त्याच क्रमात. अनेक आभार.
समीर, अतिशय विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार. तुझ्या काही मतांशी पूर्ण सहमत आणि काही मतांशी असहमत. पण अर्थात तू म्हणालास त्याप्रमाणे ती आपापली वैयक्तिक मतं आहेत आणि तुझ्या मतांचा मला आदरच आहे.
ReplyDelete>> Ha purna blog Milind Sir yanni wachla ahe ani tyannich hi link mala dili.
पहिल्यांदा प्रतिक्रिया वाचली तेव्हा हे वाक्य अतिशय आवडलं. :)
एका वाचकाने माझ्या ब्लॉगची लिंक मिलिंद सरांपर्यंत पोचवली आणि त्यांनाही लिखाण आवडल्याचं कळलं. सध्या मी मिलिंदसरांच्या संपर्कात आहे. धन्यवाद.
पुन्हा एकदा प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
>> Ani ek goshta..ya purna kadambarit shirodkarcha nav alela nahi..Mi yacha khup vichar kartoy..ticha nav ka ala nasel..?
ReplyDeleteहो. माझ्याही ही गोष्ट लक्षात आलीच होती. पण पोस्टमधे त्याचा व्यवस्थित उल्लेख करायचा राहून गेला. कदाचित ती ही 'पार्टनर' प्रमाणे प्रत्यक्षात अस्तित्वात नसणारी पण अस्तित्वात असायला हवीशी वाटणारी एखादी व्यक्ती असेल. हा फक्त एक दृष्टीकोन झाला. इतरही अनेक दृष्टीकोनातून या पात्राचा विचार करता येऊ शकतो.
धन्यवाद धुंडीराज. अरे नक्की वाच. एकदा वाचलंस की प्रेमातच पडशील... पुस्तकाच्या ;))
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
हाहाहा मैथिली.. कैच्याकै..
ReplyDeleteआभार्स :))
नक्की वाच सागर. एक पूर्णतः वेगळा अनुभव आहे.
ReplyDeleteगौरव, अगदी अगदी सहमत. आणि "सनातनी विचारांवर उत्तम कोपरखळ्या मारल्या आहेत." याच्याशी तर विशेष सहमत.
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
आयला क्षितीज तू तर एकदSSSSSSम परफेक्ट वेळी वाचलंस यार :)
ReplyDeleteहो हे व्हिडीओ पाहिलेत. शिरोडकर खरंच खुपच जास्त क्युट आहे. "छे बाई, आपल्याला नाही असलं काही जमायचं !!" खल्लास !!!!!!!!!!
Heramb..tuza email id milel ka?
ReplyDeleteAnee, This book is NOT must read.. in fact it's a MUST MUST MUST read :)
ReplyDelete>> "marmabhed" and "raktapratima"
Noted and added to wishlist. Thanks bro.
मान्यवर, आभार आभार :)
ReplyDeleteनक्की वाच शाळा. एकदम वेगळा प्रकार आहे तो.
>> "शाळा" , "दुनियादारी" आणि "पार्टनर"
मान्यवर, ही पुस्तकं वाचली नाहीत तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही. (जरा अति होतंय पण नक्की नक्की वाच एवढंच सांगायचंय)
पार्टनरची तर पारायणं झालीत माझी. शाळेत असताना पहिल्यांदा वाचलं होतं. दुनियादारी मला आवडलं पण प्रचंड ग्रेट नाही वाटलं. 'शाळा'ही पारायणं होतीलच आता. पुन्हा घेतलं वाचायला :)
सॉफ्ट कॉपीजबद्दल ऐकलं नाहीये कधी कुठे.
लीना :))))
ReplyDeleteअग पुस्तक कळण्यासाठी लोक पोस्ट वाचतात आणि तू ... हेहेहे..
आभार. यातळे अनेक प्रसंग आपल्या आजूबाजूला घडलेले असतात, आपल्या बाबतीत घडलेले असतात किंवा आपण त्यांचे साक्षीदार तरी असतोच असतो. त्यामुळे आपली कोणाचीतरी दैनंदिनी वाचतोय असंच वाटतं खरंच..
>> पहिल्यांदा जसं वाचल आणि दुसर्यांदा जसं वाचेन त्यामध्ये खूप फरक असणारे ..
अगदी अगदी सहमत. मलाही दुसऱ्यांदा वाचताना ते जाणवतंय.
>> रच्याक पार्टनर हे माझंही अतिशय जवळच पुस्तक आहे ..खूप पारायण झालीत...त्यावरही एखादी पोस्ट टाक ना
माझंही. प्रचंड आवडीचं आणि जवळचं. पार्टनरची भव्यता मला माझ्या पोस्टमधे सामावता येईल का याबद्दल माझी मलाच शंका आहे. त्यामुळे आधी कधीच प्रयत्न केला नाही. पण नक्की करून बघतो. पुन्हा एकदा वाचायला घ्यावं लागेल. :)
हेरंबा मी नाही रे वाचलेले हे पुस्तक अजून :( ... एक पक्कं १५ जुलै पर्यंत पुस्तक मिळवून वाचायला सुरूवात नक्की करणार... पोस्ट पुन्हा वाचणार मग कारण पोस्ट ईतकी मस्त तर पुस्तक किती हा भुंगा आहे तोवर :)
ReplyDeleteतन्वी, नक्की वाचच. भन्नाट प्रकार आहे हा.
ReplyDeleteरच्याक, याचा अर्थ १५ जुलैपर्यंत तुझं 'द अपील' संपतंय तर :)) गुड गुड..
हेरंबा,'शाळा' मी कितीवेळा वाचलंय ते मलाच आठवत नाही.अजूनही कधीतरी हे पुस्तक वाचायची तळाप येते आणि मी लगेच 'शाळेच्या' आहारी जातो.ह्यातल्या कितीतरी गोष्टी आणि संदर्भ आपल्याला आपल्या शालेय जीवनातील घटनांशी रिलेट करता येतात हेच ह्या पुस्तकाच सर्वात मोठ बलस्थान आहे .बाकी ह्या पोस्टसाठी एका सुंदर पुस्तकाच तेवढंच सुंदर परीक्षण अस म्हणेन मी ..
ReplyDelete‘शाळा’ एकदम सही पुस्तक आहे. वाचताना आपण त्यात एवढे गुंगुन जातो की पूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय खाली ठेववत नाही..... हे पुस्तक वाचताना मला तर माझे शाळेचे दिवस आठवत होते. आणि त्यात आमच्या वर्गात ‘शिरोडकर’ आडनावाची मुलगी होती. त्यामुळे तर आमच्याच शाळेतली स्टोरी वाचत असल्यासारखे वाटले.... मिलिंद बोकील.... हॅट्स ऑफ टु यू.....
ReplyDeleteआणि तुम्ही परिक्षणसुध्दा खूप छान लिहलं आहे...
परिक्षण वाचताना परत एकदा शाळेत फिरून आल्यासारखे ताजेतवाने वाटले...
धन्यवाद देवेन.. खरंच शाळा वाचणं हा एक अनुभव आहे.. विलक्षण अनुभव !!
ReplyDeleteधन्यवाद प्रज्ञा.. प्रतिक्रियेबद्दल आभार.. !
ReplyDeleteफार फार सुंदर आहे हे पुस्तक.. एकदा हातात घेतले की मुळीच ठेववत नाही... इतके गुंतत जायला होते की कळतच नाही...
ReplyDeleteशेवट मात्र फारच चटका लावून जातो.. :(
आणि तुमचे पोस्ट वाचून आता पुस्तकाची परत एकदा उजळणी करावी वाटायला लागलयं..
धन्यवाद मधुरा... खरंच अप्रतिम पुस्तक आहे आणि तेवढाच चरकावणारा शेवट.. दुसऱ्यांदा वाचताना तर शेवटी काय होणार आहे हे माहित असतं त्यामुळे अजूनच त्रास होतो शेवटाकडे आल्यावर.
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.
heramb kay perfect parikshan kela aahes mitra... इचिभना... tu changla lekhak hou shakatos... eka bhannat kadambari chi vat baghu ka... keep on writing... thanx!
ReplyDeleteहेहे.. आभार निलेश. तुझी प्रतिक्रिया ब्लॉगवर बघून मस्त वाटलं.. कादंबरी.. बापरे !! फार अति होईल ते माझ्यासाठी.. मी ब्लॉग पाडणंच ठीक :)
ReplyDeleteशाळा वर इतक काही छापून आलेलं आहे आता चित्रपटदेखील.... पण पुस्तकाचं इतकं नेमकं आणि सुरेख विश्लेषण केलेलं आढळलं नव्हत.
ReplyDeleteदेवळातील शिरोडकर आणि मुकुंदाची भेट त्यातला तरल हळुवारपणा बोकील साहेबांनी नेमका लिहिलाय.
खूप आभार.
मनापासून आभार पल्लवी. त्या पुस्तकात इतके छुपे पैलू आहेत ना की कितीही लिहिलं तरी बऱ्याच गोष्टी राहूनच जातात. मला तर आताही पुन्हा वाचताना बरेच मुद्दे लिहायचे राहिले असं वाटून जातं.
ReplyDelete>> देवळातील शिरोडकर आणि मुकुंदाची भेट त्यातला तरल हळुवारपणा बोकील साहेबांनी नेमका लिहिलाय.
अगदी अगदी.. खूप भन्नाट रंगवलाय तो प्रसंग बोकिलांनी. प्रश्नच नाही !
पुन्हा एकदा प्रतिक्रियेसाठी आभार.
फायनली पुस्तक वाचलंय आणि म्हणून इतक्या दिवसांनी कमेंटतोय! :)
ReplyDeleteह्यापेक्षा वेगळं मला इतर काहीही म्हणता येणार नाही! मस्त लेख! जे जे मला वाटलं, जाणवलं, ते सगळं लिहिलं आहेस! :)
चला.. एकदाचं वाचलंस तर :))
Deleteधन्यवाद प्रतिक्रियेबद्दल..
रच्याक, तू 'कोसला' मुळे शाळा वाचायचं टाळत होतास ना? आता सांग कुठलं जास्त आवडलं? :)
ऍक्च्युअली, शाळा न वाचण्याचं दुसरं कारण असं होतं की शाळाची पहिली दोन-तीन पानं टर्न ऑफ आहेत...मी दोनतीनदा सुरू करून ठेवून दिलं होतं.. पण पुढे ते जबरदस्त पकड घेतं हे ह्यावेळेस कळलं :)
Delete'कोसला'मुळे म्हणजे ऍक्च्युअली कोसलाचा हँगओव्हर जबरदस्त होता म्हणून 'शाळा' टाळत होतो.. आणि ते बरंच झालं.. कारण कोसला व्यवस्थित मुरली आणि आता शाळा मुरवतोय :)
पूर्णपणे भिन्न आहेत दोन्ही पुस्तकं.. जातकुळी वेगळी, जरी दोन्ही नरेशन्स आहेत..
दोन्हींची गंमत सारखीच आहे.. शाळा नॉस्टॅल्जिक करून सोडते, पण मी जोशाशी आयडेंटिफाय नाही करू शकत.. पण पांडुरंगशी करू शकलो... का? माहित नाही.. :)
हम्म्म.. माझा पहिल्या पानापासूनच 'शाळा' ने कब्जा घेतल्यागत झालं होतं.. गारुड अक्षरशः !!
Delete>> पूर्णपणे भिन्न आहेत दोन्ही पुस्तकं.. जातकुळी वेगळी, जरी दोन्ही नरेशन्स आहेत..
अगदी पूर्ण सहमत..
>> पण मी जोशाशी आयडेंटिफाय नाही करू शकत.. पण पांडुरंगशी करू शकलो..
किंबहुना मी दोघांशीही तसा थेट जोडू नाही शकलो स्वतःला. जोश्याशी नाही आणि पांडुरंगशी तर नाहीच नाही. मला शाळा आवडलं ते या आयडेंटिफाय होण्या/करण्यापेक्षाही मुख्य म्हणजे त्यातल्या सामाजिक प्रश्न/जातीभेद/विषमता/अंधश्रद्धा इ वर ओढलेल्या जबरदस्त फटक्यांमुळे..
इचिभना??
ReplyDeleteकाय?
Delete