प्रिय गिरीश कुबेर,
मी गेली अनेक वर्षं असंख्य नावं ठेवत ठेवत का होईना पण लोकसत्ता नियमितपणे वाचतोय. नावं ठेवण्याचं एक सर्वमान्य कारण म्हणजे कु(सु)मार केतकर आणि त्यांचे कॉंग्रेसचं लांगुलचालन करणारे अग्रलेख आणि अन्य बातम्या. कुमार केतकर बाहेर पडल्यानंतर वाचकांना एकांगी नसलेल्या, कॉंग्रेसचा, राहुलचा, सोनियाचा, मनमोहन सिंगांचा अनाठायी उदो उदो न करणाऱ्या निष्पक्षपाती बातम्या वाचायला मिळतील अशा अपेक्षेने माझ्यासारख्या अनेक सामान्य वाचकांनी सुटकेचा भलामोठा निःश्वास सोडला होता. पण तो आमचा भ्रमच आहे असं काहीकाही बातम्या वाचताना सतत जाणवत रहायचं. अर्थात कुमारसेनेच्या काळापेक्षा लोकसत्ताची आत्ताची कामगिरी नक्कीच उजवी होती.... हो.... आता होती असंच म्हणावं लागेल. त्याचं कारण म्हणजे आजचं (शुक्रवार दिनांक १५ जुलै२०११) अन्वयार्थ.
संपूर्ण लेखच प्रचंड संतापजनक आहे. पण काही काही वाक्यं इतकी भयंकर एकांगी, अर्धवट माहितीवर आधारित आणि मुख्यतः परवाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या दुर्दैवी जीवांच्या मृत्यूचा इतका प्रचंड मोठा अपमान करणारी आहेत की त्यासमोर राहुलचं "सरकार प्रत्येक हल्ला रोखू शकणार नाही" वालं बालिश वाक्यही अतिशय समंजस वाटावं किंवा मग दिग्याचं प्रत्येक वाक्य हे एखाद्या मोठ्या विचारवंताच्या थाटाचं वाटावं. ही बातमी (!!!!!) वाचून मला तर क्षणभर असंही वाटून गेलं की दिव्यभास्करात जम न बसू शकल्याने (ऐकीव माहिती आहे. ऐकीव माहितीवर आधारित बातम्या फक्त लोकसत्तेनेचा द्याव्यात असा कुठे नियम आहे??) सुमार केतकरांचं पुन्हा लोकसत्तेत आगमन झालं की काय किंवा मग हल्लीच्या उथळ पत्रकारितेच्या जमान्यातल्या नियमाप्रमाणे केतकरसाहेब अतिथी संपादक म्हणून पुन्हा आमच्या डोक्यावर बसणार की काय. आम्हा वाचकांच्या दुर्दैवाने हे असं काही जर चुकून माकून जरी घडलं ना तर तेव्हा तुम्ही पत्रकार लोक दंडाला त्या काळ्या पट्ट्या बांधून निषेध बिषेध करत हिंडता ना तसेच आम्ही वाचक लोक loksatta.com ला जाण्यापूर्वी काळे गॉगल लावून मगच 'कॉंग्रेस-सत्ता' च्या बातम्या वाचू.
असो.. मूळ मुद्द्याला मी थेटही सुरुवात करू शकलो असतो पण मुद्दाम थोडी पार्श्वभूमी तयार केली जेणेकरून या असल्या कणाहीन पत्रकारांचं दर्जाहीन वृत्तांकन वाचून एक सामान्य नागरिक आणि वाचक म्हणून आमचा किती संताप होत असेल याची एक अतिशय छोटीशी झलक तुम्हाला मिळावी यासाठी एवढी खरडेघाशी केली. मला खात्री आहे की आजच्या या अर्थहीन अन्वयार्थाच्या संदर्भात तुम्हाला पत्र पाठवून निषेध नोंदवणारी मी पहिली व्यक्ती नक्कीच नसेन. सुदैवाने अनेक सजग वाचक महाराष्ट्रात आणि जगभर आहेत. आणि त्या सगळ्यांनी त्यांचं मत मांडताना या अन्वयार्था..... शी.. हा शब्द मला फारच अस्थानी वाटतोय.. खरंतर याला मला कणाहीन पत्रकाराचा दर्जाहीन लेख उर्फ क. प. द. ले. असं म्हणावसं वाटतंय पण ते जाऊदे...... तर त्या सगळ्यांनी त्यांचं मत मांडताना या दुर्दैवी लेखात त्यांना काय काय गोष्टी खटकल्या हे सांगितलंच असेल पण तरीही माझ्या अल्पस्वप्ल्प बुद्धीला सुचलेल्या गोष्टी मी इथे मांडतो आणि तुम्हाला दुर्दैवाने त्या पुन्हा पुन्हा वाचायला लागत असल्याबद्दल तुमची क्षमाही मागतो.
आता या तिरसट लेखातले कुठले मुद्दे मला आवडले नाहीत असं विचारलं तर साला अख्खा लेखच मला कॉपी पेस्ट करून द्यावा लागेल आणि असं करण्यात कितीही तथ्यांश असला तरी मुद्द्याचं गांभीर्य कमी होण्याची नितांत भीती आहे. त्यामुळे मला प्रचंड खटकलेली आणि माझ्या संतापाचा कडेलोट करू पाहणारी निवडक मुक्ताफळंच इथे डकवतो.
>> १. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारी अपयश नाकारले नाही, पण त्याचबरोबर गेल्या ३१ महिन्यांत मोठा हल्ला झालेला नाही हेही लक्षात आणून दिले.
>> २. दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी येतात याची कल्पना सौम्य शब्दात पण पक्की आकडेवारी समोर ठेवून करून दिली.
>> ३. कितीही दक्षता बाळगली तरी दहशतवादी हल्ला थांबविता येत नाही. तो फक्त लांबविता येतो. चिदम्बरम यांना हीच बाब सांगायची होती.
>> ४. परंतु दहशतवादी हल्ल्यासारखी संवेदनशील घटना घडली की, नेत्याने जबाबदारीने कसे वागावे हे त्यांच्याकडून सर्वच नेत्यांनी शिकण्यासारखे आहे.
>> ५. ते बॉम्बस्फोट टाळू शकले नाहीत. मात्र देशाचा गृहमंत्री स्थिर बुद्धीने, विचारपूर्वक व संतुलित वृत्तीने परिस्थिती हाताळत आहे, हा संदेश त्यांच्या पत्रकार परिषदेतून गेला.
>> ६. मुंबईतील विशिष्ट समाज वा आर्थिक उलाढालीची केंद्रे यांनाच स्फोटाचे लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू नसावा असा दावा त्यांनी केला. पाकिस्तानवर कोणताही आरोप केला नाही, पण पाकिस्तानच्या प्रतिसादाबद्दल भारत समाधानी नाही हेही लपविले नाही.
>> ७. पोलीस चांगली कामगिरी करीत असले तरी या हल्ल्याबद्दल निश्चित माहिती नव्हती याची कबुली दिली.
>> ८. एकंदर चिदम्बरम यांची पत्रकार परिषद ही संतुलित. जबाबदार आणि आपले काम गंभीरपणे करणाऱ्या नेत्याची पत्रकार परिषद होती. आपले काम व आपल्या मर्यादा यांची त्यांना व्यवस्थित जाणीव आहे हे लक्षात येत होते.
ही दर्जाहीन बातमी छापणाऱ्या कणाहीन पत्रकाराचं नक्की काय म्हणणं आहे? दर ३१ महिन्यांनी आम्ही आमच्या मोबाईलवर रिमायंडर लावायचे का "की बाबा रे आता ३१ महिने झाले. उद्या बॉम्ब फुटणार हो SSSS". कुबेरसाहेब, तुम्हाला खरंच सांगतो. मला पी चिदंबरम यांच्या निष्क्रियतेचा भयंकर राग येतो. बट गेस व्हॉट.. ही बातमी... तेच ते हो.. दर्जाहीन वगैरे.. तर ती वाचून मला चिदंबरमपेक्षाही ही बातमी छापणाऱ्या पत्रकाराचाच विलक्षण राग आला. हे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराची 'रीडिंग बिटवीन द लाईन' करण्याची क्षमता कसली जबरी असेल हाच विचार माझ्या मनात राहून राहून येतोय !!! म्हणजे चिदुभाऊ एक वाक्य बोलले की त्याचा (आमच्यासारख्या) सर्वसामान्य लोकांच्या अधूबुद्धीत शिरू न शकणारा नक्की अर्थ कोणता? ते असं म्हणाले तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचं होतं, त्यामागे असलेली त्यांची भूमिका कोणती?, प्रत्येक वाक्य उच्चारल्यानंतर त्या वाक्याच्या अनुषंगाने (फक्त सदरहू पत्रकाराच्याच) लक्षात येणारे चिदुभाऊंचं कर्तृत्व अधोरेखित करणारे, त्यांच्यात दडलेले सुप्त गुण कोणते इत्यादी इत्यादींचं दहावीतल्या संदर्भांसहित स्पष्टीकरणच्या थाटात वर्णन करताना या बातमीदाराने इतक्या असंख्य अस्पर्श मुद्द्यांना शिताफीने स्पर्श केला आहे की त्याला दहावीत 'संस्प' मध्ये दहापैकी अकरा मार्क नक्की मिळाले असणार याची खात्री पटली !!
आता पहिलाच मुद्दा बघा ना. ए.. क.. ती.. स.. (आकड्यात लिहिलं की पटकन संपल्यासारखं वाटतं म्हणून मुद्दाम अक्षरात लिहितोय.) महिन्यात एकही बॉम्बस्फोट झाला नाही हे सांगायला ना चिदुभाऊची गरज होती ना तुमच्या त्या पेड न्यूजवाल्या पत्रकाराची. काये की सामान्य माणूस बुद्धीने कितीही अधू असला तरी ज्या हल्ल्यांत आपल्या घरातले, नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी, ओळखीचे, आपल्याबरोबर ऑफिसमध्ये काम करणारे लोक गेले तो हल्ला किती वर्षांपूर्वी झाला होता एवढं साधं गणित तो करू शकतो हो. कारण त्याला समांतर म्हणून अजून एक गणित त्याच्या (म्हणजे आमच्याच हो.. तुमच्या त्या संदर्भांसहित वाल्या पत्रकाराच्या नव्हे..) डोक्यात चालू असतं आणि ते म्हणजे गेले ३१ (मुद्दाम आकड्यात लिहिलंय. कारण सरकारच्या दृष्टीने ते फक्त ३१ आहे. पटकन म्हणून होणारं. ए क ती स सारखं लांबलचक नव्हे.) महिने आमच्या आप्तस्वकीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या कसाब नावाच्या किड्यालाही आम्ही पोसतोय.. हे ते गणित. तो अजूनही मेला नाहीये हा संदर्भ आणि तो जिवंत असण्यामागे त्याचा महान धर्म कारणीभूत आहे हे त्याचं स्पष्टीकरण. तर ही एवढी सगळी गणितं डोक्यात घुमत असल्याने ३१ महिन्यात हल्ला झालेला नाही हे आम्हालाही माहित्ये. पण मग ३२ महिन्यात दोन प्रचंड मोठे हल्ले झाले हे साधंसुधं अपयश झालं का? मला तरी खरंच कळलं नाही नीट. तुमच्या त्या पत्रकाराला चिदुभाऊला विचारायला सांगाल का प्लीज? आणि त्यांनी त्याला समजावून सांगितलं की पुढच्या अन्वयार्थमध्ये त्याचं पुन्हा एक भलंमोठं 'संस्प'ही छापायला सांगा..
दुसरा मुद्दा.. आकडेवारी !!!! हाहाहाहाहा.. चिदुभाऊ खुर्चीत आल्यापासून मी तर त्याला फक्त आकडेवारी मांडतानाच बघतोय. नक्षलवादी हल्ल्यात अमुक इतके पोलीस मेले, अमुक इतके गावकरी मेले, बॉम्बहल्ल्यात इतके इतके लोक आणि तितके तितके पोलीस मेले. अहो आणि दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी येतात याची का आम्हाला कल्पना नाही?? अहो ज्या सामान्य माणसाला तीन आकडी किंमतीच्या भाज्या, तिसऱ्या आकड्याकडे विसावू पाहणारं पेट्रोल आणि चौथ्या आकड्याकडे सरकू पाहणारा गॅस इत्यादी बेसिक गोष्टी आकाशाला भिडलेल्या दारात खरेदी करायला भाग पाडलं जातं (आणि तेही घामाच्या पांढऱ्या पैशाने.. काळ्याबिळ्या नाही हो.) थोडक्यात रोजचं साधं आयुष्य जगतानाही इतक्या असंख्य अडचणींचा मुकाबला करावा लागतो त्याला सरकारच्या अडचणी माहित नसतील हे असं गृहीत धरणं आणि तसं बोलून दाखवणं म्हणजे शुद्ध दिग्विजयपणा झाला. तर ब्रोकन रेकॉर्ड प्रमाणे पुन्हा मुद्दा तोच.. दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी सांगणे आणि आकडेवार्या समोर मांडणे यात एखाद्या व्यक्तीचं गृहमंत्री म्हणून काय कर्तृत्व असू शकतं हो?
खरं तर ज्याप्रमाणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पायात पाय अडकवून वाटचाल चालू आहे त्याचप्रमाणे या बातमीतल्या मुद्द्यांचेही एकमेकांत पाय अडकलेलेच आहेत. कारण आता तिसरा मुद्दा बघा. अहो हा मुद्दा मांडण्यात 'चि'चं काय कर्तृत्व असेल हे तर मला अजूनही लक्षात येत नाहीये !! अर्थात तुमच्या त्या महान पत्रकाराला दिसलंही असेल कर्तृत्व पण त्याने ते अधिक विस्ताराने विस्कटून सांगण्याची काही तसदी घेतलेली नाही... कारण येताजाता अमेरिकेचा जप करणाऱ्या, अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर बनून राहणाऱ्या सरकारने त्याच अमेरिकन सरकारने एकदा झालेल्या महाहल्ल्यांमुळे सजग होऊन सुरक्षा यंत्रणा एवढी बळकट केली की त्यानंतर १० वर्षांत कितीही धमक्या आल्या तरी प्रत्यक्ष हल्ले झाले नाहीत ही बाब "कितीही दक्षता बाळगली तरी दहशतवादी हल्ला थांबविता येत नाही. तो फक्त लांबविता येतो." असं म्हणताना चिदुभाऊ विसरले आणि त्यांचं कौतुक करण्याच्या नादात या असल्या धेडगुजरी मुद्द्यावर आसूड ओढण्याचं तुमचा पत्रकारही विसरला !! असो.. चालायचंच...
खरं तर प्रत्येक मुद्द्याबद्दल प्रचंड विस्ताराने लिहिता येईल आणि इतकं लिहूनही तुमच्या त्या विशाल अंतःकरणाच्या पत्रकाराला त्या प्रत्येक ओळीत सामान्य माणसाला पर्वताप्रमाणे दिसणारे दोष/चुका/अपराध न दिसता त्या प्रत्येक वाक्यात, कृतीत रारा चिदंबरम साहेब यांचं महान कर्तृत्वच कसं दिसलं आणि ते त्याने एका शब्दाबद्दल अनेक शब्द वापरून विस्ताराने उद्धृतही कसं केलं हे माझ्यासारख्या अल्पमती माणसाला न झेपणारं आहे. अर्थात मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि अति झालं आणि हसू आलं (हे माझं सुमार केतकरांच्या बाबतीतलं आवडतं वाक्य आहे. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी) असं माझ्या बाबतीत होऊ नये यासाठी फक्त अजून एकच खूप महत्वाचा आणि प्रचंड खटकलेला मुद्दा मांडून माझं रटाळ पुराण थांबवतो.
तर काय सांगत होतो?? हां.. तो चौथा मुद्दा वाचलात? काय लिहिलंय?? "दहशतवादी हल्ल्यासारखी संवेदनशील घटना घडली की" घडली की???? घडली की??? अशी भयानक घडली की जवाबदारीने वागायचं असतं गृहमंत्र्यासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीने की ती घटना घडायच्या आधी?? किंवा थोडक्यात कायमच?? ही अशी घटना वारंवार (किंवा चिदुभाऊच्या भाषेत दर ३१ महिन्यांनी) होऊ नये म्हणून जवाबदारीने वागणं अपेक्षित आहे की घटना घडल्यानंतर??? मला तर क्षणभर काहीच उमगेनासं झालंय.
आमच्यासारख्या सामान्य जीवांना न कळलेले, कधीच न कळणारे अनेकानेक छुपे अर्थ हे खरे की बातमी वाचून डोक्यात शिरणारा साधासोपा अर्थ खरा? कोण खरं कोण खोटं? माझ्या तरी मते तुमच्या या धडाडीच्या पत्रकाराने पत्रकारितेतले आणि एकूणच पावसाळे आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि किमान बुद्धीच्या वाचकांपेक्षा जास्त पाहिले असल्याने तोच बरोबर असेल असं मला तरी मनोमन वाटतंय. पण पुन्हा बातमी वाचल्यावर आम्हाला जे वाटतंय तेच खरं असावं असंही वाटतंय. थोडक्यात गोंधळ झालाय माझा. खूप मोठा गोंधळ. तुम्ही सोडवू शकाल तो गोंधळ? द्याल उत्तर? किंवा मग साध्या (आणि बिनडोक) वाक्यांतून ओढून ताणून अन्वयार्थ शोधून काढणाऱ्या तुमच्या महान पत्रकाराला तरी विचारा न याचं उत्तर आणि पुढच्या अन्वयार्थ मधून कळवा.. वाट बघतोय. शक्यतो पुढच्या स्फोटांच्या/हल्ल्यांच्या आत दिलंत तर अजून बरं कारण नाहीतर मग आम्हा लोकांचा अजून अजूनच गोंधळ उडत राहील. म्हणून म्हणतो लवकर द्या उत्तर.. द्याल ना?
-हेरंब ओक
हेच पत्र गिरीश कुबेर यांना त्यांच्या girish.kuber@expressindia.com या इमेल आयडीवरही पाठवलं आहे. !!
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे
गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
ज ब र द स्त...!!
ReplyDeleteअशीच खणखणीत चपराक मारायला पाहिजे होती. ही लोकं बातम्या (??) लिहिताना मंगळावर असतात काय किंवा स्वतः लिहिलेली बातमी परत एकदा वाचून बघायची कष्ट देखील घेतात काय?
लोकसत्ता - Leading International Marathi News Daily नाहीचं Misleading International Marathi News daily आहे..
हेरंब, तुझं दणक्यात स्वागत, तुझ्याच ब्लॉगवर :) :)
मला वाटते तो लेख चिदुच्या घरात बसूनच लिहला गेला असावा... छान फटके दिलेस, त्याबद्दल ह्या लेखाला दहापैकी अकरा मार्क.... :)
ReplyDeleteसणसणीत मुस्कटात मारली आहेस ! आवडला लेख... :)
ReplyDeleteलेखात म्हणतात की "मुख्य म्हणजे दर दोन तासांनी अधिकृत माहिती देणारी यंत्रणा बसविली. यामुळे अफवांना आळा बसेल"
ReplyDeleteजर दोन आठवड्यांनी देशाच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची यंत्रणा बसवली असती तर दहशदवादाला आळा बसला असता.
आता ज्या देशाचा पंतप्रधान राज्यसभेतुन निवडला जातो आणि गृहमंत्र्याची निवडणुकच वादातील आहे त्या देशात ए क ती स महिने बॉंब स्फोट नाही झाला यासाठी तर सरकारी यंत्रणेपेक्षा त्या दहशदवाद्यांचेच आभार मानायला हवेत.
ज ह ब ह र ह द ह स्त ह !!!!!
ReplyDeleteकानाखाली समई काढलीस ते बरं झालं! ती बातमी (?) वाचून जाळ झाला होता अंगाचा!
Nad Khula..... Bhava...... Ashich Patrakaranchi Laktare Veshivar Tangat Ja............ Tyanantar tari tya sa......na akkal yeil aani Sattadhari Congress chi langulchalan te thambavatil. Samanya manasachya jivashi khel karanarya AATANKVADYALA golya ghalun thar kel phije
ReplyDelete>>> हे असं गृहीत धरणं आणि तसं बोलून दाखवणं म्हणजे शुद्ध दिग्विजयपणा झाला...
ReplyDeleteजब्बरदस्त...
इचिभना... चिद्याच्याच खाली स्फोट करा. कांग्रेसचं तिरंगी रक्त निघेल. पंजाच्या आकाराच्या रक्तपेशी.
ReplyDeleteजबरदस्त !! उत्तर आले की पब्लिश कर रे..
ReplyDeleteसणसणीत...सगळे पेड न्युजवाले आहेत रे...त्यांना काही फ़रक पडत नाही...एकजात सगळे सारखे आहेत....हा कसला घंट्याचा चौथा स्तंभ.
ReplyDeleteथोडक्यात रोजचं साधं आयुष्य जगतानाही इतक्या असंख्य अडचणींचा मुकाबला करावा लागतो त्याला सरकारच्या अडचणी माहित नसतील हे असं गृहीत धरणं आणि तसं बोलून दाखवणं म्हणजे शुद्ध दिग्विजयपणा झाला
ReplyDeleteहे प्रचंड होत
बाकी लेख एकदम रोखठोक
मी पंकजशी १००टक्के सहमत आहे.त्याच बरोबर ळोकसत्त मधे ही होऊन जाउदे ना एक!
ReplyDeleteकुमार केतकर बद्दल माझे ही विचार तुमच्या सारखेच आहेत, पण तुम्ही ते एकदम प्रभावी पणे मांडले आहेत.केतकर स्वतःला काय समज्तात कोण जाणे!
असल्या भोंदु विचार्वंतामुळेच आपले जास्त नुकस्सान होतेय.
मि तर अत लोकसत्त बंद करायच्या विचारात आहे.
kahihi lihito ka be bhenchod...
ReplyDeleteSarv vachkanchya mantil Malmal vyakt kelyabaddal Dhanyavad :)
ReplyDeleteJabtya lekh.
उत्तर देण्याची हिंमत नसेलच तेंव्हा पूर्ण लोकसत्ताची सुरळी करून चिदुच्या तच्याबो घाला. तो लुंगी घालतो त्यामुळे फार कष्ट देखील पडणार नाहीत.
ReplyDeleteघरून निघालो तेंव्हा परत आल्यावर तुझी खरमरीत पोस्ट वाचायला मिळणार हे ठावूक होते. कुबेर इथेच कुठे ठाण्यात राहतात. त्यांचे संस्प उत्तर आले नाही तर दर काही दिवसांनी एक प्रिंट घरी पोचती करावी म्हणतो... :)
ReplyDeleteज्याने कोणी हा अन्वयार्थ(???) लिहिला आहे तो अतिप्रचंड आहे. पण आपण कितीही प्रक्षुब्ध झालो, ओरडलो तरी ह्या लोकांना काही-काह्ही म्हणून फरक पडणार नाही आहे...
..... तुझ्यासारखाच थोडा अगतिक, त्रासलेला, चिडलेला आणि पुढचे ३१ महिने मोजणारा.... एक मुंबईकर...
असं तुम्ही बोलताच कसं?
ReplyDeleteचीदू भौना किती मानसिक त्रास्स होत असेल????
ते रिकामे आहेत का बाईंचीपण किती कामं करावी लागतात??
दुसर्या मंत्र्यांच्या घरावर हापिस वर पळत ठेवणे फोन TAP करणे????
असले रिकाम्चोत बॉम्बस्फोट झाले त्याला चीदू काय करणार????
तुम्ही एक य्कीच्षित नागरिक आहात त्या प्रमाणेच वागा.
उगीच आमच्या भाषणाची मीमांसा करू नका.
जो पर्यंत आमच्या घरात स्फोट होत नाहीत तो पर्यंत हे असाच चालणार.
:D
एकदम खणखणीत वाजवली आहेस भावा...रोहन तुझी आयडिया एकदम भारी आहे...
ReplyDeleteसर्वांच्या मनातील विचारच मांडलेत. धन्यवाद.
ReplyDeleteआजच्या 'मेतकुट' मध्ये कणेकरांचा लेख वाचला. ते लेखन, विचार अर्थातच वेगळ्या प्रकाराचे आहेत.
पण योगायोगाने त्यात पत्रकाराचे जे उत्तर आहे तसेच उत्तर तुला (जर मिळाले तर) मिळेल असे वाटते
चमचेगीरीचा अर्क आहे हा. अरे एखाद्याची किती चाटायची? त्याला काही लिमिट आहे की नाही? ,मस्त लिहिलं आहे,सगळ्यांच्याच मनातलं.
ReplyDeleteहेरंब,
ReplyDeleteजबरदस्त लेख ............ गिरीश कुबेर यांनी उत्तर पाठवले की ब्लॉगवर टाक.
चीदुभौनी बत्तीस हा आकडाच डोक्यातून काढलेला दिसतोय , ह्याचं कर्तुत्व एकतीसच्या फुशारक्या मारण्यातच :(
ReplyDeleteएकूणच फटफट सत्यवान जबरदस्तच !
एकदम चाबुक !! जहबरदस्त लिहिलेस भावा !! पेड़ पत्रकारितेची एकदम "अम्मा" केलीस तू .. तो लेख वाचतांना अगदी अशाच भावना होत्या रे..चीदूभौच्या कौतुकात एवढे जास्त लिहिले आहे ना त्या महान "भाटा"ने, की त्याला या स्वामीभक्तीचे मोठ्ठे बक्षीसच मिळणार असले पाहिजे. चाटूगिरीची हद्द होता तो लेख.सुमार केतकर लोकसत्ता सोडून गेले खरे पण आपल्या पाऊलखुणा मागे सोडून गेले. . बास तू अगदी योग्यच केलंस रे.. शाब्बास आणि धन्यवाद...
ReplyDeleteहेओ, सणसणीत चपराक आणि तीही उघड मारलीस.१००% सहमत. शालजोडीतले मारून वाटणारी लाज कलियुगात नसावीच. सामान्यांच्या रोजच्या अडचणी माहीत असायला मुळात ९०% सामान्य जनता नांदते आहे हे जाणून घेतलेले असले पाहीजे नं. घोडे इथेच अडलेय.
ReplyDeleteतो राहुल-सोनिया-चिदुभाउंच्याच XXXXX जेव्हां आपटीबार फुटेल नं तेव्हां कदाचित... पण काही सांगता येत नाही रे... शेवटी ते कलियुगाचे प्रतिक आहेत...
सगळ्यांच्या मनात धगधगलेला संताप इतका नेमका व मर्मावर बोट ठेवत ओकला आहेस... जियो!
हीन पत्रकारितेचे उत्तम उदाहरण आहे हे. :-/
ReplyDeleteBtw...चुकून माकून काही उत्तर आलेच तर पोस्ट कर नक्की...
एक नंबर!!!
ReplyDeleteलोकसत्तेतला लेख वाचला, पूर्ण लेख उपरोधाने लिहिलाय की काय अशी शंका आली २ सेकंद! पण तेवढा नशीब कुठला आलंय आपलं!
धन्यवाद सुहास.. अरे खरंच यार.. हा लेख म्हणजे चाटण्याची परिसीमा होता !!
ReplyDeleteTrue.. IT's misleading.. indeed !!
हाहा देवेन.. शक्य आहे.. असंच वाटतंय..
ReplyDeleteआभार विशाल.. असल्या लोकांना शाब्दिक माराची भाषा कळत असेल का याची शंकाच आहे !
ReplyDeleteहो ना गौरव. अरे काहीही फेकाफेकी आहे रे या लेखात.. आणि समजा दार डोंतासंच्या यंत्रणेची बातमी खरी असली तरी त्याचा आत्ता काय उपयोग? गेले ते गेलच ना जिवानिशी !!
ReplyDeleteखरंय.. दहशतवाद्यांचेच आभार.. त्यांच्याच इच्छेवर आणि दयेवर तर जगतोय सामान्य माणूस !! :((
कानाखाली समई... हा हा :)
ReplyDeleteहो रे माझाही नुसता संताप संताप झाला होता ती बातमी वाचून.. वाचल्या वाचल्या सरळ टाईप करायला घेतलं.. सगळी मळमळ बाहेर पडली !
अनुप, प्रतिक्रियेबद्दल आभार.. कॉंग्रेस कधीच सुधारणार नाही हे नक्कीच.. निदान तथाकथित चौथ्या स्तंभाने तरी सुधारावं ही अपेक्षा !
ReplyDeleteअसो.. प्रतिक्रियेबद्दल पुनःश्च आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा..
धन्यवाद आनंद :) याहून दुसरी चांगली उपमा असूच शकत नाही.. नाही का ? :)
ReplyDeleteखरंय.. चिद्या, मन्या, रावल्या, सोनि सगळ्यांच्या खाली स्फोट केले की सुटलो आपण एकदाचे !!
ReplyDeleteधन्स राजे...
ReplyDeleteअरे कुबेरांचं उत्तर लगेच दुसऱ्या दिवशीच आलं. अगदी छोटंसं आहे. पण मेसेज बरोबर पोचला असावा असं म्हणायला हरकत नाही. हे त्यांचं उत्तर..
Dear Herambji...
Many thanks for the mail. I like, i must say, your supre sarcastic style. Your point is, believe me, well taken note of and is being acted upon.
Do stay in touch...
Regards
Girish
योमुं.. हो रे.. सगळंच पेड चालू आहे. अरे चौथा स्तंभ कसला हा..?? ही तर साधी वीटही नाही त्या स्तंभाची.. :(
ReplyDeleteआभार सागरा.. त्या माणसाचं नाव जरी घेतलं त अरी मस्तकात तिडीक जाते नुसती !!
ReplyDeleteअरुणाताई आभार..
ReplyDeleteफार पूर्वीपासून लोकसत्ता वाचतोय त्यामुळे सुमार केतकरांचे जवळपास सगळे लेख वाचलेत.. नंतर नंतर तर इतका कंटाळा यायचा पण तरीही मी त्यांचे लेख/अग्रलेख वाचायचो... फक्त हे बघण्यासाठी की कॉंग्रेस, सोनिया इ च्या पायाशी लाळघोटेपणा करण्यासाठी एक चांगला व्यासंगी, बुद्धिमान माणूस किती खाली घसरू शकतो !!!!
चि. पुणेकर,
ReplyDeleteबालका तू दिलेली प्रतिक्रिया ही ते अन्वयार्थ लिहिलेल्या व्यक्तीसाठी दिली असलीस तर वुई आर ऑन सेम पेज बेटा.. आणि ती माझ्यासाठी असेल तर तुला एकच सांगतो..... गुदद्वारात दम असेल ना तर तुझं सडकं नाव आणि चेहरा न लपवता प्रतिक्रिया दे पुढच्या वेळी.. तू कोण आहेस, कुठून प्रतिक्रिया दिलीस, तुझा आय पी अड्रेस काय वगैरे सगळं मी दोन सेकंदात सांगून तुला नागडा करू शकतो.
आय होप आजच्यापुरता एवढा डोस पुरेसा आहे. पुन्हा इथे येऊन, थोबाड लपवून घाण केलीस तर मग याद राख.. आयुष्यभर घाणीत लोळण्याची पाळी आणेन तुझ्यावर !!!!!!!!!!!!
आभार विक्रम.. सामान्य लोकांना कळतं ते या तथाकथित चर नंबरच्या खांबावर बसणाऱ्या गद्ध्यांना कळत नाही !!
ReplyDeleteसिद्धार्थ, कुबेरांचं उत्तर आलं लगेच दुसऱ्या दिवशीच. वर राजला दिलेल्या प्रतिक्रियेत दिलंय बघ ते... खरंच.. या चिद्याचं काहीतरी केलं पाहिजे यार.. फार माजलाय. सामान्यांच्या जीवाची पर्वाच नाहीये त्याला !!
ReplyDeleteरोहन, कुबेरांचं उत्तर आलं. राजला दिलेली प्रतिक्रिया वाच..
ReplyDelete>> ज्याने कोणी हा अन्वयार्थ(???) लिहिला आहे तो अतिप्रचंड आहे.
हो.. ज्याने कोणी हा गलिच्छ प्रकार लिहिलाय तो एकतर डोक्यावर तरी पडलाय किंवा त्याने कॉंग्रेसकडून बक्कळ पैसा तरी मिळवलाय.. किंवा तिसरा पर्याय म्हणजे दोन्ही.. आणि तिसऱ्या पर्यायाची शक्यताच मला अधिक वाटते !!!
प्रांजल, खरंय.. चिद्याला बाईसाहेबांचीच कामं जास्त करावी लागत असणार. पुढच्या स्फोटात तो त्याच्या बाईबरोबर खपला तर किती बरं होईल या देशासाठी आणि जाताजाता त्या डॉग-विजयलाही घेऊन जा म्हणावं !!
ReplyDeleteअसो. प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.
आभार अपर्णा.. रोहनची आयडिया वाचली :)
ReplyDeleteहाहा देगा.. वाचलं मेतकुट.. सुदैवाने मला व्यवस्थित उत्तर मिळालं.. नशीब कणेकर लोकसत्ताचे संपादक नाहीयेत ;)
ReplyDelete>> चमचेगीरीचा अर्क आहे हा. अरे एखाद्याची किती चाटायची? त्याला काही लिमिट आहे की नाही?
ReplyDeleteकाका अगदी अगदी.. माझाही तो लेख (!!!!!) वाचल्या वाचल्या प्रचंड संताप झाला होता. म्हणूनच तर फोडून काढलंय त्या मठ्ठाला !!
धन्यवाद मेधा.. हो कुबेरांचं उत्तर आलं.. वर राजला दिलेली प्रतिक्रिया वाच..
ReplyDeleteअसो. प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा :)
धन्यवाद सुमेधा.. खरंय.. त्या चिद्याचं खरं कर्तृत्व या असल्याच फुटकळ गोष्टींत आहे.. दुर्दैव आपलं.. दुसरं काय !!
ReplyDelete>> .चीदूभौच्या कौतुकात एवढे जास्त लिहिले आहे ना त्या महान "भाटा"ने, की त्याला या स्वामीभक्तीचे मोठ्ठे बक्षीसच मिळणार असले पाहिजे. चाटूगिरीची हद्द होता तो लेख.सुमार केतकर लोकसत्ता सोडून गेले खरे पण आपल्या पाऊलखुणा मागे सोडून गेले. .
ReplyDeleteसंकेत, अरे खरंच यार.. प्रचंड हद्द झाली. लोकसत्ताने यापूर्वीही कित्येकदा कॉंग्रेसचे पाय चाटले आहेत पण हा प्रकार म्हणजे अगदी किळसवाणा होता आणि तितकाच संतापजनक.. मला तर चुकून सुमार परत आले की काय अशीच भीती वाटून गेली होती हे वाचून.. सुदैवाने इतके वाईट दिवस आलेले नाहीत अजून !!
श्रीताई, अग असलं डोकं फिरलं ना तो प्रकार वाचून.. निर्लज्जपणाचा कळस होता तो प्रकार !!
ReplyDelete>> तो राहुल-सोनिया-चिदुभाउंच्याच XXXXX जेव्हां आपटीबार फुटेल नं तेव्हां कदाचित
त्या सुवर्णदिनाची वाट बघतोय मी.. जाता जाता त्या भीक-विज्यालाही घेऊन जा म्हणावं !!
धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल..
>> हीन पत्रकारितेचे उत्तम उदाहरण आहे हे. :-/
ReplyDeleteमैथिली, अगदी अगदी.. सर्वोच्च उदाहरण. कुबेरांचं उत्तर वर पेस्ट केलं आहे बघ..
>> पूर्ण लेख उपरोधाने लिहिलाय की काय अशी शंका आली २ सेकंद
ReplyDeleteकेतकी, हो ना.. काश ऐसा होता.. तसं झालं असतं तर मी त्याला बेस्ट उपरोधिक लेख म्हटलं असतं.. !!
Heramb,
ReplyDeleteLekha baddala che points accepted pan
kholat jaun vichar kela tar paper madhye kaay lihalel aahe tya peksha, chudambramla gruhmantri karnhya sathi aapanach karnibhu t naahee ka? Matadanachya veli kiti vela apan matdan karto? aaplya sarkhe loak matdan karat naheet mhanun he nivdun yetat v POTA,MOKKA sarkhe kayde radd hotat. gunhegaranvar vachak rahat nahee.
Aapan jar 100% vela matdan kele, aaplya kadun laach denyasakha bhrashtachar kela naahee tar paristhitit thodi far sudharana hou shakate.
Pl. dont tkae it otherwise...
Dinesh
दिनेश,
ReplyDeleteतुमची प्रतिक्रिया पटली. पण १००% मतदान हे फार आदर्श झालं जे कधीही होणार नाही. मला वाटतं सरकारने आत्ताच्याआत्ता ताबडतोब चोख उत्तर देणं अपेक्षित आहे !
abhar re..... !! mi loksatta vachat nahi..pan tu je kahi lihilas na..te solllid... te saryanach lagu hota...!!
ReplyDeleteधन्यवाद चैताली.. अग या असल्या पेड न्यूजने भरलेले पेपर तू वाचत नाहीस याबद्दल मला तुझा हेवा वाटतोय ! :)
ReplyDeleteYour article was really provoking I definitely will give great applause to you on the points of paid journalism and article by mr.Kuber which really was a shit,I don't think he can even rhyme the words needed to improve the quality of article.About Kumar Ketkar,he is one of the best journalist ever for me,his articles maybe as you said gives more prestige to congress,but again no one can match the intelligence this guy posses.So I definitely won't like to say anything about that.Talking about P.Chidambaram,again,I will definitely give you on nearly all points but on few I have different perspective.
ReplyDeleteTalking about America issue,we are Russia centric country first of all.No other country blackmails America than we do.They can't have supremacy on India because we are on such a vantage point i.e. between the two countries they most fear.So I will completely disapprove on that point.
Talking about Kasab issue,everyone wants him to be execute,which is what he deserves.I don't find any kind of inability in government work,because it is an asset to pressurise others in global politics,which our country performs excellently.
Talking about Blasts it really was deplorable.We can't even imagine the sorrow of their families.It really shows the inactivity of not just Intelligent agencies but Government too.Which is extremly disappointing especially after big bang happend in Mumbai just 3 years ago.If you are comparing ourselves with america,that country tracks nearly every single person.Can we do the way they do with our great billion population.Can we have a police vehicles making rounds around your road atleast twice a day?Answer definitely is NO,we can't.
I think P.Chidambaram is definitely a man to raise fingers on and later man to forgive(as we every time do),but again that Thirty One quote takes that from him actually.But Heramb,as Rahul Gandhi made a quote on the day of blasts,"We will stop 99 percent of the (militant) attacks. But one percent of attacks might get through and that is what I am saying".This is true you can't really stop 1%.
Again a great article,loved the response to Punekar,that really was a kickass one.
BTW,was your site and profile blocked yesterday 'cause I was unable to redirect at your address
अनी,
ReplyDeleteसर्वप्रथम प्रतिक्रियेला उत्तर द्यायला उशीर झाल्याबद्दल क्षमस्व आणि विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार !
मला केतकरांबद्दलचा तुझा मुद्दा पूर्णपणे मान्य आहे. किंबहुना मला स्वतःलाही माहित आहे की केतकर हे अत्यंत हुशार, विद्वान, व्यासंगी, प्रचंड वाचन आणि अभ्यास असणारे गृहस्थ आहेत आणि किंबहुना त्यामुळेच जास्त वाईट वाटतं कारण त्यांचा सगळा अभ्यास, सगळी हुशारी ही सारासार विचार न करता एका विशिष्ट व्यक्तीवर, पक्षावर स्तुतिसुमनं उधळण्यात वाया जातेय. त्यांनी लिहिलेल्या असंख्य लेखांपैकी कुठलाही लेख वाचून बघ. सतत असं जाणवत राहतं की त्यांनी लेख लिहिण्याआधीच निष्कर्ष काढलेला आहे आणि त्याप्रमाणे ते त्या लेखाची मांडणी करत आहेत. मी आरएसएस, भाजप, शिवसेना वगैरे कुठल्याही पक्षाचा कट्टर वगैरे समर्थक नाही पण म्हणून उगाचच्या उगाच त्यांना धोपटत सुटणं हेही मला मान्य नाही. उलट मी तर म्हणतो की केतकरांच्या अशा तिरपागड्या लेखांमुळे केवळ सहानुभूती म्हणूनच कित्येकांना भाजप/शिवसेना आवडायला लागले असतील !!!
आणि आता चिदंबरम. मला या माणसाच्या निष्क्रियतेचा भयंकर राग आहे. गृहमंत्री असलेल्या माणसाने कसं तडफदार असायला हवं. धडाडीने निर्णय घेता यायला हवेत. तर याचं सगळं उलटच असतं. सगळं मेंगळटासारखं एकदम. आणि त्यात पुन्हा कधी "अफझल गुरु २६ व्या नंबरावर आहे आणि त्या क्रमाप्रमाणेच त्याला फाशी दिली जाईल" अशी मुक्ताफळं उधळतो किंवा मग कधी वंदे मातरम वर बंदी घालण्याच्या ठरावाच्या वेळी देवबंदच्या सभेत उपस्थित राहून वादविवादाला कारणीभूत होतो. किंवा मग कधी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या ठरलेल्या वक्तव्यानुसार हिंदू संघटनांवर दहशतवादाचे आरोप करतो. हे सगळं किती बाष्कळ वागणं आहे रे !!
असो आणि एवढं सगळं असूनही लोकसत्ता सारखं तथाकथित अग्रगण्य वृत्तपत्र असल्या नगांची उघडउघड बाजू घेणारे लेख लिहितं हे बघून तर तळपायाची आग मस्तकात जाते आणि ती मस्तकातली आग मग अशा पत्रावाटे बाहेर पडते.. असो. !!
लेखाची भरपूर तारीफ झालीये आणि तसंही कमेंटायला उशीर होतोय म्हणून त्याबद्दल जास्त लिहिणार नाही. लेख नेहमीप्रमाणेच जबरदस्त अगदी हेरंब स्टाईल , आणि तुला आलेला संतापाची जाणीव करून देणारा आहे.
ReplyDeleteअसो. दिनेशच्या च्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे. १००% मतदान होणे नाही, कारण इथे लोकांना बुडावर काठ्या पडल्याशिवाय जबाबदारी पार पडणे माहित नाही. मतदान कंपल्सरी करावे. न केल्यास फाईन लावावा. नाहीतर 'जबाबदारी पासून पाळणारा नागरिक' -स्तर १ म्हणून सरळ सरळ पगारातून कपात करावी. परत मतदान न केल्यास स्तर वाढवावा. कपात वाढवावी. नागरी हक्क कमी करावे.
दुसरी गोष्ट म्हणजे, आपलं संविधान ब्रिटीश संविधानावरून उचलण्यात आले. पण तिथे आपल्या इतकी विविधता नाहीये. इथे लेकाचा कुणी एक, अमुक एका समाजाला धरून भाषणबाजी करायला लागला, तर लगेच स्वतःची स्वतंत्र पार्टी तयार करू शकतो. ह्या नंबर ऑफ पार्टीज वर सुद्धा आळा असावा. अमेरिकेसारख्या दोनचं पार्ट्या असल्या तरी बेहत्तर.
परत न्याय व्यवस्था जबरी असायला पाहिजे. मी लागणाऱ्या वेळा बद्दल बोलतोय. इथे प्रत्येक नागरीकामागे असलेल्या वकिलाची संख्या इतकी कमी आहे कि त्यामुळे केसचा निकाल लवकर लागत नाही. (वकिलांची वकीलगिरी हा सुद्धा एक स्वतंत्र मुद्दा होईल. पण तिथे शेवटी नैतिकता येते यार.) त्यामुळे सामान्य नागरिक धजत नाही न्याय मागण्यासाठी. माझाच उदाहरण देतो, पुण्याच्या कोथरूड मधल्या दुर्गा कॅफे जवळच्या एस.बी.आय. मध्ये मी शैक्षणिक कर्जाच्या चौकशी साठी गेलो होतो. तिथे मी त्या भल्या गृहस्ताला विचारलं होतं कि कॉलेज ने दाखवलेल्या खर्चेच्या रकमेच्या वर मी पैसे घेऊ शकतो काय? तर तो म्हणतो कसा "घायला तर तू १० लाखही घेशील रे. बँक काय तुमचे चोचले पुरवायला बसली आहे काय?", नंतर वळून शेजारच्याला सांगायला लागला "हि पोर मस्त लाखात कर्ज घेतात आणि ऐश करतात पैशावर." डोक्यातच गेला होतं त्याचा वागणं तेव्हा. १२% व्याज हि देतो म्हणून गप करून आलो होतो तेव्हा त्याला. पण त्यावेळी माहित नव्हतं कि त्याची कम्प्लेंट सुद्धा करता आली असती म्हणून. माझ्या अजाणतेपणामुळे त्याचं फावलं त्यावेळी. आपल्या जनतेसोबत सुद्धा असंच होतं नि हे वरचे माजतात लेकाचे.
विस्तृत प्रतिक्रियेबद्दल आभार, वैभव.
ReplyDeleteमतदान सक्तीचं केलं पाहिजे खरंय. पण तो एकमेव उपाय नाही. तू 'द व्हाईट टायगर' वाचलं आहेस का? जमलं तर वाच. निवडणुकीच्या नावाखाली काय प्रकार चालतात ते त्यात अगदी अप्रतिम तिरकस पद्धतीने मांडलंय. पण अर्थात जास्तीत जास्त मतदान होणं आवश्यकच.
ते सगळं ठीक आहे. पण माझा सगळ्यात मोठा आक्षेप या नेत्यांच्या निष्क्रियतेवर आहे, ढिम्मपणावर आहे आणि त्याच वेळी त्यांच्या चमच्यांनी विकत घेतलेल्या तथाकथित चौथ्या स्तंभाच्या पक्षपाती लेखनावरही आहे
वाह वाह वाह...
ReplyDeleteधन्यवाद सौरभ :)
ReplyDelete