Saturday, May 19, 2012

साक्षात्कार

किरकिरत्या गजराने चिडचिडतच उठलो..
आन्हिकं उरकली..
नाश्ता झाला, ज्यूस झालं,.. कॉफीही पिऊन झाली.
कपडे करून तयार झालो आणि हापीसला जायला निघालो.
काय माहित पण असं फ्रेश्श नव्हतं वाटत आज............ !!

ट्रेन पकडली, बसायला जागाही मिळाली..
नेहमीप्रमाणे पुस्तक काढून वाचायला घेतलं..
वाचत होतो पण अर्थ डोक्यात शिरत नव्हता..
कंटाळून बंद केलं पुस्तक आणि डोळे मिटून बसून राहिलो.
स्टेशन आल्यावर नाईलाज म्हणून उठून उभा राहिलो आणि उतरलो.
हापीसला पोचलो...
काही कळत नव्हतं का ते पण आज जराही फ्रेश्श वाटत नव्हतं....... !!

कामाला सुरुवात झाली, मेल्स, मिटींग्ज, कॉन्फरन्स कॉल्स सगळं एकामागून एक नेहमीप्रमाणे चालू होतं....
बॉसची बडबड, बॉसच्याबॉसची बडबड, ते मेल्स, एच आरचे टीम-बिल्डिंगचे यंत्रवत मेल्स हेही होतंच...
या सगळ्या गडबडीतून उठून जाऊन एकदा चेहरा चांगला खसाखसा धुऊन आलो...
चांगली लार्ज कॉफी घेऊन डेस्कवर आलो...
पण तरीही.. तरीही मुळीच फ्रेश वाटत नव्हतं आज.......... !!

जेवण झालं, मिटींग्ज, मेल्स, कॉल्सचं चक्र चालूच राहिलं...
ट्रबलशुटींग्ज, एस्कलेशन्स झाले...
भारत-कॉल झाला....
पुन्हा एकदा चेहरा धुवून आणि लार्ज कॉफी घेऊन डेस्कवर आलो...
त.. री... ही... अजिबातच फ्रेश वाटत नव्हतं आज......... !!

पुरेसं राबवून घेऊन झाल्यावर, छळून झाल्यावर दिवस संपत आला...
दिवस संपताना कालच्या दुप्पट मेल्स, इश्युज, प्रॉब्लेम्स हे आपण आज दिवसभरात खरोखर काही केलं की नाही असं वाटायला लावणारे होते...
पण त्या सगळ्यांकडे एक तुच्छ दृष्टीक्षेप टाकून स्क्रीन लॉक केली आणि निघालो.
दिवसभर वाटलं नाही ते आता काय दगड फ्रेश वाटणार होतं म्हणा..... !!

ट्रेनमध्ये बसलो...
दोन पानं वाचून पुस्तक ठेवून दिलं,,..
डोळे मिटून बसून राहिलो...
तेवढ्यात मोबाईल किरकिरला...

आत्ता कोणाचा फोन म्हणून बघायला गेलो तर रिमायंडर वाजत होता.

"पेस्ट घेणे".... स्क्रीनवर शब्द चमकत होते... आयला हा रिमायंडर तर मी काल सकाळी लावला होता.. काल संध्याकाळी टूथपेस्ट विकत घ्यायची आठवण करण्यासाठी. सकाळी अखेरची फाईट मारून झाल्यावर पेस्टने मान टाकली होती. त्यामुळे संध्याकाळी पेस्ट घेतली नाही तर वाट लागणार होती. अरे पण हे सगळं कालचं झालं........... मग आज... आज............... ओह... !!!!!!! रिमायंडरमध्ये कालची तारीख टाकायच्या ऐवजी चुकून आजची तारीख टाकली होती.............

तरीच आज दिवसभर अजिबात अजिबात, जराही, यत्किंचितही, मुळीच फ्रेश वाटत नव्हतं..... !!!!!!!!!! (आणि च्युईंगमचं पाकीटही दुपटीने रिकामं झालं होतं ;) )

58 comments:

  1. हाहा

    ह्या आपल्या भारतीय रक्तात भिनलेल्या सवयी आहेत :)

    ब्रश किंवा अंघोळ केली नाही तर दिवसभर खरच पारोसं वाटत राहत.
    सगळ्यात इरीटेटिंग म्हणजे पेस्ट संपलीये हे नेहमी सकाळी लक्षात येत.
    आणि लागोपाठ तीन दिवस लक्षात ठेवून विसरल्याबद्दल स्वत:चा उद्धार करत वाण्याकडे जावं लागतं.

    माझं भारतीय पोट सुद्धा पिझा किंवा बर्गर खाल्ला तर थोडं चुकचुकत राहत
    पण अर्धी पोळी आणि भाजी खाल्ली तरी मनाला समाधान वाटतं :)

    ReplyDelete
    Replies
    1. एक्सप्रेस प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद, नील.

      संपत आलीये आणि नवीन आणायची लक्षात राहत नाही म्हणून अगदी पुरवून पुरवून वापरत होतो पेस्ट. अखेर संपलीच आणि रिमायंडरनेही बरोबर घोळ घातला.

      च्युईंगमचा शोध लागला नसता तर माझी एक रजा फुकट गेली असती ;)

      Delete
  2. साक्षात्कार म्हणजे उगीचच भव्यदिव्य काही वाटत असतं, बहुधा लहानपणापासून ऐकत असलेल्या गोष्टीत तो देवाशी संबंधित असल्याने असावं. पण खरंच तो रोज किती छोटया छोटया गोष्टीतून होत असतो! फक्त त्याकडे बघायला ही दृष्टी हवी, नाही का?

    ReplyDelete
    Replies
    1. हाहा प्रीति.. खरंय.. शीर्षक जरा भव्य दिव्य टाईप दिलेलं असलं तरी टीपी करणे हा एकमेव हेतू होता :)

      Delete
  3. तरी बरा साक्षात्कार लवकर झाला .... खरच असे काही टिपीकल अनुभव असतात रे... :)

    ReplyDelete
    Replies
    1. सगळी त्या रिमायंडरची कृपा रे ;)

      Delete
  4. :-) I thought you received a call from you family members and then you would ultimately feel fresh!!

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा सविताताई.. This time toothpaste was my ultimate and highest need !! :)

      Delete
  5. हाहाहा... मला वाटले होते कोणाची, कशाचीतरी आठवण वैगरे येतेय म्हणून हे सगळे...किंवा असंच काही तरी serious...
    हे तर कैच्याकै च... :D

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा मैथिली.. एक्झॅकली.. म्हणूनच शीर्षक जरा भरभक्कम दिलं आणि पोस्टही जरा सिरीयस टाईप ठेवली.. कारण शेवटी असा कैच्याकैपणा करायचा होता ;)

      Delete
  6. हां पण तुझ्या आत्ताच्य पोस्ट वाचुन फार फ्रेश वाटतयं बरं... :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. धन्यवाद दीपक..

      (रच्याक, फ्रेश वाटण्याचं कारण म्हणजे मी ताबडतोब नवीन पेस्ट आणली जाऊन ;) )

      Delete
  7. Yaakkk..Heramb at first I was happy about "aanhik" on Saturday ani he mhanje kaay chyaa kaay..
    Looks like next time I m gonna ask you Aanhik aani brush....:D

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. मी अशा एखाद्या प्रतिक्रियेची वाट बघतच होतो... ;)

      दोन नवीन पेस्ट्स आणून दोनदा दात घासून झाल्यानंतरच पोस्ट टाकली आहे. काळजी नसावी ;)

      Delete
    2. सगळ्यांच्या आन्हिकांची काळजी करण्याचं घाऊक कंत्राट माझ्याकडे आहे (घरी तीन मुलगे असण्याचा आणखी एक तोटा खरं तर....कुठली कंत्राटं मिळतात बघ...) :P :D

      Delete
  8. म्हणजे आपण काल बोललो तेंव्हा तू दात नव्हते घासलेस ? ह्म्म्म :p :) :)
    पटापट छानछान पोस्टा येतायत.. :)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. बहुतेक नाही.. आठवत नाही आता ;)

      धन्यवाद धन्यवाद.. गेल्या सहा महिन्यांत टाकल्या नव्हत्या एवढ्या पोस्ट्स गेल्या १९ दिवसांत टाकल्यात.... त्यामुळे आता कधीही बंद पडू शकतं दुकान ;)

      Delete
  9. आजचा साक्षात्कार आवडला.

    ReplyDelete
    Replies
    1. हेहे.. धन्यवाद श्रद्धा :)

      Delete
  10. हा हा हा..एक नंबर..खरंय..एखाद वेळी अंघोळ नाही झाली तरी चालतं कधीतरी पण सकाळी उठल्यावर दात घासणं मस्ट आहे!!

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा चैतन्य. विकांतात तर गोळीच असते आंघोळीची.. दातांची गोळी घेता येत नाही तशी :(

      Delete
  11. हा हा हा .... लैच.

    माझ्यासारखा अजून एक प्राणी असल्याचे बघून भरून आलं :p

    ReplyDelete
    Replies
    1. हेहेहे.. धन्यवाद सुहासशेठ.. आपण सारे भाऊ भाऊ ;)

      Delete
  12. हा हा :D
    कॉलेजमध्ये असताना माझ्याबरोबर असं झालं होतं. कॉलेजला निघेपर्यंत काहीतरी चुकलंय, काहीतरी वेगळं वाटतंय असं वाटत होतं. पण तेव्हा पेस्ट संपली नव्हती, होस्टेलमध्ये सकाळी सकाळी नंबर लावण्याच्या नादात मी ब्रश करायलाच विसरले होते. पण नेमकं निघताना आठवलं काय चुकलं ते आणि तेव्हा अंघोळीनंतर ब्रश करून मी कॉलेजला गेले. नंतर सर्वांना मला चिडवण्यासाठी आठवडाभर हा विषय पुरला...

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा प्राची.. भन्नाटच !!

      असे प्रकार कॉलेजमध्ये वगैरे कळले की संपलंच. सुदैवाने आता ती भीती नाही ;)

      Delete
  13. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज रात्री पेलाभर पाण्यात जिरे भिजवुन ठेवावे. अन रोज सकाळी आन्हिक झाल्यावर ते पिणे.


    जिरे भिजवायचे आहेत हे लक्षात राहण्यासाठी रोज संध्याकाळी बदाम खात जावे.


    अन संध्याकाळी बदाम खायचे आहेत हे विसरु नये यासाठी बैद्यनाथ शंखपुष्पी घेत जा.

    ReplyDelete
    Replies
    1. महाप्रचंड यवगेशा !! मी हे तिन्ही उपाय संपलेली पेस्ट आणायचं लक्षात ठेवण्यासाठी वापरत जाईन पुढच्या वेळेस पासून ;)

      Delete
  14. hi,
    commenting on your post 1st time.
    i m reading your blog since many days, khup junya post vachlya..bhannat lihita tumhi..and from very long time..wish you many more to come...ani aajacha sakshatkar tar...just FANTASTIC :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद धन्यवाद धनश्री !! :) खूप बरं वाटलं इतकी छान प्रतिक्रिया बघून.

      ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.

      Delete
  15. कसलं सहज आणि सुंदर लिहिलंय...एखादं गूढ उकलावं त्याप्रमाणे...! सकाळची आन्हिकं किती महत्त्वाची होऊन बसतात, इकडे मुलं रात्रीच सगळं आवरून झोपतात आणि सकाळी पटकन ब्रेकफ़ास्ट करून शाळेत जातात हे पाहिलं की मला नेहेमी वाटतं यांना फ़्रेश कसं वाटत असेल? मस्त लिखाण आहे एकदम..! पु. ले. शुभेच्छा..!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रेया :) असाच थोडासा टीपी..

      प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.

      Delete
  16. लई म्हणजे लईच!! (लईछ)!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. आभार्स 'लईछ कुमार' ;)

      Delete
  17. एक दिवस उनाड दिवस फिरून ये.
    एक दिवस फक्त स्वतः साठी जग.
    एक दिवस आत्मकेन्द्री हो.
    एक दिवस मनात येईल ते मनाजोगते वय ,काळ ,स्थळ ह्याची पर्वा न करता वाग.
    आणि दिवसा अखेरी
    कुठे आहेस? असा दूर ध्वनीवर व्यनी आल्यावर आपल्या उबदार घरट्यात परत ये
    एक नवी उर्मी ,उर्जा घेऊन .

    ReplyDelete
  18. मस्त लिहिले आहेस

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद निनाद.. आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.

      Delete
  19. Ekdum sahaj lihita tumhi..Bhari ekdum.. Mhanaje agadi sadha wishay pan mandalay ewadh bhari... Superlike..:)

    ReplyDelete
    Replies
    1. आभार्स कामना. होय साधाच विषय होता त्यात उगाच जरा मालमसाला घातला ;)

      ब्लॉगवरस्वागत. अशीच भेट देत राहा.

      Delete
  20. khupach chan aahe he "aanhik" without brush !!!!!!!!
    ajun barach gostiche tula zalele sakshatkar vachayla aavdtil

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मंदार. लवकरच नवीन साक्षात्कार होईल कदाचित.. माझा 'बॉडीवॉश' संपत आलाय ;)

      ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.

      Delete
  21. तुफान लिहिलंय. मस्तच.

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा... धन्यवाद पुष्कर..

      ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.

      Delete
  22. ही पोष्ट मला का दिसली नव्हती??
    मला तुझ्या पोस्टचा रिमाईंडर उशिरा आला बहुतेक ;)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. स्पेअर पेस्ट शिल्लक आहे ना ते बघून ठेव रे बाबा ;)

      Delete
  23. आपणांस खो पुढे नेण्यासाठी विनंती करतोय.. जरूर लिहा.. संदर्भ - http://durit.wordpress.com/2012/06/25/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दुरित. खो पुढे न्यायला जमेल याची शाश्वती नाही पण हे वाचून एकच पुस्तक माझ्या डोळ्यासमोर येऊ शकतं ते म्हणजे 'कोसला'

      Delete
    2. 'कोसला'वर वाचायला नक्कीच आवडेल..जमलं तर लिहाच.

      Delete
  24. jaam aavdya re !!!!!!

    tuzi post vachun malahi asach kahitari sakhshatkar zalya sarjha vatatoy...........

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा तुळजाराम.. धन्स.. तुही तुझा साक्षात्कार लिहून काढ :)

      Delete
  25. माझंही बऱ्याचदा असं होतं. एकदम देजावू दंतमंजनकथा. :-)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा मिलिंद.. आभार्स !!

      देजावू दंतमंजनकथा... लईच भारी !

      Delete
  26. मी सकाळी दाढी करायला घेतली की मी ब्रश करायचे विसरतो बहुतेकदा ( म्हणजे रविवारी)
    त्यात शेविंग क्रीम आणि टूथपेस्ट बाजू-बाजूलाच ठेवल्याने अर्धवट झोपेत कधीकधी फेसच होत नाही :P

    ReplyDelete
    Replies
    1. हा हा हा.. फुल्टू कहर !

      Delete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...