परममित्र अभिनवगुप्त, उर्फ समीक्षाबाई नेटके, उर्फ (काही काळ) निनावी उर्फ .................... श्री. अभिजीत ताम्हणे यांस सप्रेम वंदे,
ताम्हणे, तुम्हाला एक गंमत सांगतो. लहानपणी मला लपाछपीचा खेळ अजिबात आवडायचा नाय. कारण माझ्यावर राज्य आलं की मला कधीच कोणाला शोधता यायचं नाय. मोठेपणी पुन्हा एकदा लपाछपीचं राज्य येईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण माझ्या सुदैवाने बालपणीची शोधाशोधी करता न येण्याची सवय मी बदलू शकलो त्यामुळे बराच फायदा झाला माझा. तर लपाछपी !!! गेले काही दिवस आपली जी लपाछपी चालू आहे ना... लपाछपी म्हणजे ते नेहमीचंच आपलं की राज्य पुन्हा माझ्यावरच आणि माझी शोधाशोधी चालूच. मनापासून सांगतो ताम्हणे, मला ही लपाछपी खेळायची नव्हती. मला काही प्रश्न विचारायचे होते तुम्हाला, काही गोष्टींवर चर्चा करायची होती, काही शंकांचं निरसन करून घ्यायचं होतं, काही मुद्दे मांडायचे होते. त्यासाठी मोठ्या प्रयत्नाने शोधलं तुम्हाला. आता खरं सांगायचं तर 'मोठ्या प्रयत्नाने' हे म्हणजे फक्त म्हणायची पद्धत म्हणून. प्रत्यक्षात फार प्रयत्न करावे लागले नायत. तर काय सांगत होतो? हां..
- तर तुम्हाला फेसबुकवर शोधलं, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पण तुम्ही काही ती स्वीकारली नाय.
- तुम्हाला 'वाचावे नेटके' च्या आयडीवर पत्र पाठवलं कित्येकदा, त्यालाही उत्तर आलं नाय,
- 'वाचावे नेटके' वर दिलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेत माझा खराखुरा इमेल आयडी दिला होता. पण त्याचाही काही उपयोग झाला नाय.
- शेवटी ब्लॉगवर खुलं (अनावृत) पत्र लिहिलं, परंतु त्यालाही काही पोच आली नाय.
अर्थात मी काही एवढा मोठा माणूस नाय की तुम्ही माझ्या पत्रांना उत्तरं द्यावीत. मी तर एक सर्वसामान्य ब्लॉगर. कोणीही यावं आणि टपली मारून जावं. म्हणून मग अशा परिस्थितीत सर्वसामान्य ब्लॉगर जे करतो तेच करायचं ठरवलं. बास का आता? करून करून करणार काय मी? अजून एक खुलं पत्र लिहिणार.
तर वर म्हटल्याप्रमाणे काही प्रश्न विचारायचे होते. त्याआधी एक सांगतो. मीही डोंबिवलीचाच बरं का. असो.
१. ताम्हणे, आपलं डोंबिवलीत कधी कोणत्याही प्रसंगी, एखाद्या भेटीत, क्रिकेट मॅचमध्ये, नळाच्या रांगेत, वाण्याच्या दुकानात, फडके रोडवर, भागशाळा मैदानात, गणपती मिरवणुकीत वगैरे वगैरे कुठल्याही प्रसंगी भांडण झालं होतं का ओ?
२. मी तुम्हाला माझ्या ब्लॉगवरच्या एखाद्या पोस्टमधून जाणता/अजाणता कधी नावं ठेवली होती का?
३. मी कधी काळी एखाद्या मराठी संकेतस्थळावर कार्यरत असताना आपले काही मतभेद, वादविवाद, बाचाबाची, तूतू-मैंमै वगैरे काही झालं होतं का? हे कारण असेल तर मला तरी ते कधीच कळू शकणार नाय. कारण ते आयडी प्रकरण मला कधीच झेपलं नाय. त्यामुळे तुमचा आयडी कुठला वगैरे मला माहित नाय आणि मी त्या फंदातही पडलो नाय कारण सगळीकडे मी माझ्या नावानेच वावरत होतो. बादवे, आताचा वावर फक्त आणि फक्त ब्लॉग, हे तुमच्या अवांतर माहितीसाठी...
४. मागे तुम्ही प्रहारमध्ये 'समीक्षा नेटके' या नावाने लिखाण करत असताना मी तुमच्या कुठल्या लेखावर कधी काही तुमच्या विरोधात प्रतिक्रिया दिली होती का? किंवा ब्लॉगवर काही (तुमच्या दृष्टीने) आक्षेपार्ह लिहिलं होतं का?
ताम्हणे, मी हे सगळं अगदी मनापासून विचारतोय. कारण या सगळ्या प्रश्नांना माझं उत्तर एकच आहे. "माहीत नाय" !!!!!!..
खरंच सांगा यापैकी काही झालं होतं का? अरे मित्रा, मग कारण तरी काय होतं/आहे असं येता जाता, उगाचच्या उगाच एवढ्या मोठ्या वर्तमानपत्रातल्या, संपादकीय पानावर चालणाऱ्या सदराचा (गैर)वापर करून उगाच माझ्या ब्लॉगला टोमणे मारण्याचं, विचित्र भाषा वापरून लक्ष्य करण्याचं, आडून हल्ले करण्याचं. तू तर महेंद्र कुलकर्णींसारख्या ज्येष्ठ ब्लॉगरलाही सोडलं नायस. तुला ब्लॉगिंग आवडत नसेल. वपु आवडत नसतील, महेंद्र कुलकर्णींचा ब्लॉग आवडत नसेल, माझ्या ब्लॉगकडे तर ढुंकूनही बघायची इच्छा होत नसेल. ठीके रे.. चालतं. त्यात काहीच चूक नाय.. असते एकेकाची आवड निवड. पण म्हणून काय वैयक्तिक हिशोब चुकते करायला (कधीचे हिशोब ते तर फक्त देवच जाणे) 'लीडिंग इंटरनॅशनल मराठी न्यूज डेली' म्हणून मोठ्या मानाने मिरवणाऱ्या पेप्राचा वापर करायचा? (आम्ही त्याला लाडाने 'मिसलीडिंग' म्हणतो), संपूर्ण सदराला वेठीला धरायचं?
असो. क्षणभर, आपण असं समजू की वरच्या चारी प्रश्नांची तुमची उत्तरंही "नाय" अशीच आहेत. अहो फक्त समजा क्षणभरासाठी. तर आपण असं गृहीत धरू की आपल्यात काही एक वाकडं नव्हतं तर मग तुम्ही का केलंत असं? कोणाच्या सांगण्यावरून केलंत? तुमच्या 'मंदीरा'तल्या मित्रांच्या सांगण्यावरून की अन्य 'स्थळांच्या'?? म्हणजे ठिकाणच्या.... असो.
ताम्हणे, मी तुमच्या सदरातले सुरुवातीचे(सुद्धा) लेख वाचले आहेत. एखाद्या 'माहितगाराने' लिहिल्याप्रमाणे माहितीपूर्ण होते पण भारीच शब्दबंबाळ. जड-जड, अगम्य, अतर्क्य शब्दांचा पसारा. अशा विचित्र शब्दांनी भरलेली मोठमोठी वाक्यं. समीक्षा नेटके 'बनून' लिहायचात तेव्हाही असंच करायचात. पण तेव्हा थोडं तरी सुसह्य असायचं. पण आत्ता मात्र जड शब्दांचा नुसता गोंधळ माजला होता. पण शैली मात्र तीच.. समीक्षा नेटकेचीच. पहिल्या लेखातच ओळखलं होतं हो आम्ही सगळ्यांनी की ही म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून समीक्षा नेटकेच च च च.. असो.. मुद्दा तो नाय. तर असे जड शब्दांनी भरलेले त्याहून जड लेख वाचले न गेल्याने सदराला स्वस्तात प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी केलंत का हे? सगळेजण असंच म्हणतायत. (अर्थात मी तर म्हणतोच आहे.)..
असो. अजूनही काही बिघडलेलं नाय. एक काम करा. माझ्या ब्लॉगवर 'माझे ब्लॉगु-ब्लगिनी !!' आणि 'मला हे भावतं !!!' हे दोन उल्लेख दिसतायत? त्याखालच्या कुठल्याही दुव्यावर क्लिक करा, कुठलाही लेख उघडा आणि वाचून पहा. किती वेगवेगळ्या प्रकारचं, निरनिराळ्या शैलीत, असंख्य विषयांवर लिहिलंय बघा लोकांनी. काय लिहिलंय ते नव्हतं हायलाईट करायचं मला. दाखवायचं हे आहे की किती साध्या सोप्या सरळ शब्दांत लिहिलंय बघा. उगाच 'विचक्षण' नाय की 'जीवनशैलीची अपरिहार्यता' नाय की 'उद्वेग दाटून येणं' नाय. जे सांगायचं ते उगाच भलत्या शब्दांशी न खेळता, हलत्या भाषेच्या तिरप्या गिरक्या न घेता सरळ वाक्यांत लिहिलंय.
एक काम करा.. अशा साध्या भाषेत लिहून बघा येत्या सोमवारचं 'वाचावे नेटके', नाय उड्या पडल्या वाचकांच्या, नाय धावायला लागलं सदर तर माझा ब्लॉग बंद करेन मी ! मागे एकदा माझ्याच ब्लॉगवर 'तुमच्या मित्रमैत्रिणींना'सुद्धा हे 'माझे ब्लॉगु-ब्लगिनी !!' आणि 'मला हे भावतं !!!' बद्दल असंच सुचवलं होतं मी. त्यांनी वाचलं की नाय याची कल्पना नाय. बहुतेक नसावं वाचलं. म्हणून तर तुम्हाला सुचवलं नाय ना त्यांनी !
कसं आहे ताम्हणे, की तुम्ही तुमच्या सदरात उगाच सगळ्यांचं कौतुक करत सुटावंत, वारेमाप स्तुती करावीत असं कोणाचंच म्हणणं नाय, कोणीच अपेक्षा करत नाय तशी. दोष दाखवा ना, ठेवा नावं. कोण नाय म्हणतंय? पण दोष दाखवायचीही एक पद्धत असते हो. मी म्हणतो म्हणून नाय रीतच आहे तशी. सगळ्या स्त्री ब्लॉगर्सना एका फटक्यात "दुपारच्या मासिकंवाल्या" म्हणणं किंवा मग उगाच चार लेख वाचून पूर्ण ब्लॉगला, त्यातल्या भाषेला अश्लाघ्य भाषेत नावं ठेवणं (आणि वर चार लेख वाचून सदर लिहिण्याच्या पद्धतीचं समर्थन करणं) हे सगळं कोण सहन करेल? आणि कोणी का सहन करावं? आता पुन्हा प्लीज तुमच्या 'त्या मित्रमैत्रिणीं' प्रमाणे म्हणू नका की आंतरजालावरच्या लिखाणावर टीका होणारच वगैरे वगैरे. मी याचं उत्तर आधीच्या लेखात आणि त्याआधीच्या लेखातही दिलं आहे. तुम्ही लोकांकडे ब्लॉग्जच्या शिफारशी मागितल्यात म्हणून तुम्हाला लोकं दुवे (लिंक हो लिंक) देतायत. अर्थात त्या न्यायाने आणि (तुमच्याच) नियमाने तुम्ही माझ्या ब्लॉगबद्दल काहीच लिहायला नको कारण माझा ब्लॉग मी किंवा कोणीही तुम्हाला सुचवलेला नाय. असो.. तर पुन्हा तेच.. शिफारशी मागितल्यात म्हणून दिल्या, प्रत्येक ब्लॉग आवडलाच पाहिजे असं काही नाय. नाय आवडला तर सोडून द्या किंवा योग्य शब्दांत टीका करा ज्यामुळे तो ब्लॉगलेखक खच्ची न होता उलट त्याला अजून लिहायला उभारी येईल. आणि हो.. टीका करताना शक्यतो जमल्यास "बुडाखाली" , "च्यायला" वगैरे शब्द टाळता आले तर बघा. लोकही त्याच शब्दांत उत्तरं देऊ शकतात हो.
चला. हरकत नाय... ! झालं तितकं पुरे झालं, सांगायचं ते सांगून झालं. बोळा निघाला. पाणी वाहतं झालं..
फॉर द रेकॉर्ड, माझ्या दृष्टीने या प्रकरणावर पडदा पडला !!!
जय ब्लॉगिंग !!!!!!

ReplyDeleteमी फेसबुक वर आपल्या गृप मधे एक पोस्ट टाकलं होतं, कंबरेखाली वार करणारे लोकसत्ताकार म्हणून. त्यावरून आठवलं, की हा तर एकदम छातीवर वार केलाय हेओ ने.
Deleteबंधू. मस्त लेख. ये रे आपल्या सिक्रेट गृप वर. गप्पा मारू.
खास हेंरब श्टाईलने शालजोडीतले हाणलेस!!! :-)
ReplyDeleteहा...हा..हा...च्यामारी एकदम धरुन फ़ट्याक :) :)
ReplyDeleteखळ्ळ्ळ फट्याक.. नुसतं फट्याक नाही रे भावा.
Deleteठ्ठो... ठ्ठो... ठ्ठो...
ReplyDeleteआजवर देवाला ताम्हानात ठेवून अभिषेक करतात हे माहीत होते पण प्रत्यक्ष "ताम्हाणाचा" रुद्राभिषेक आजच पाहिला :D
कॉमेंट ऑफ द ब्लॉग ..लै भारी.
Deleteसिद्धार्थ भो...एकच नंबर :)
Delete"ताम्हाणाचा" रुद्राभिषेक ..... प्रचंड.
Deleteblog spot should now add a like button on comments.... I would super like you comment Sidh... :)
DeleteComment of Da Day .....and Comment of the Blog.....lai lai lai bhari... :)
ह्या अभिजीत ताम्हण्यांच्या फेबु प्रोफाईलवर अबाऊटमधे लिहीलंय की ते, "An art critic since 1998, writes in Marathi and English and specialises in Visual Art, is keen on the Histories of Art and Politics of Art-making." आहेत.
ReplyDeleteम्हणजे हे वाचावे नेटके सदर हे ब्लॉग्जच्या समीक्षणाचं आहे? कधीपासून? कसं काय?
माझीच समीक्षणाबद्दलची समज चुकीची असावी म्हणून मी गूगललो तर हे मिळालं. "Research that involves a formal analysis and evaluation of a text, production, or performance. Critiquing criteria are the standards, rules, or tests that serve as the bases for judgments." रेफरन्स: http://grammar.about.com/od/c/g/critiqueterm.htm
मग ह्या सदरात फॉर्मल ऍनालिसीस कुठंय? बाकी तर सोडूनच द्या. गेली १४ वर्षं "आर्ट क्रिटीक" असणार्या माणसाकडून इतकीही अपेक्षा करू नये.
रच्याकने, जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणे हा मुद्दा तत्वतः पटला होता. पण त्या दृष्टीने विविध ब्लॉग्जमधली अवतरणं, विविध ब्लॉग्जवरची ब्लॉगिंग का? याचं उत्तर देताना ब्लॉगरने दिलेली मतं वाचायला आवडली असती. आणि त्यानिमित्ताने विचारविमर्षातून काहीतरी ठोस हाती लागलं असतं... पण साडेतीन टक्के व तत्सम रिमार्क्सनी सगळा घोळ घातला. दुर्दैव.
असो. ब्लॉगिंग तर चालू राहीलच.
झक्कास हेरंब!:)
ReplyDeleteकाय ता...म्हणे...पटलं का नाय?
आरे एकच नंबर.. शोधलास एकदाचा त्याला .. आणि मस्त हाणलास बेट्याला....
ReplyDeleteत्याच लिखाण म्हणजे negative critics च उत्तम उदाहरण आहे.. दुसर्यांचा नाडा ओढायच्या नादात आपण फाटकी चड्डी घातलीय हे लक्षातच येत नाहीं या लोकांना...
Any fool can criticize, condemn, and complain but it takes character and self control to be understanding and forgiving.
- Dale Carnegie
अब्राहम लिंकन यांनी म्हटलं आहे " He has a right to criticize, who has a heart to help." हे असल्या उथळ समज असलेल्याला पचनी पडणार नाहीं..
जाळ एकदम ..... फट्याक फट्याक ....
ReplyDeleteआता तरी निदान कुबेरांनी वैयक्तिक लक्ष देऊन मीमांसा करावी हि विनंती.
ब्लॉगबद्दल चांगल वाईट लिहिण्याबद्दल काहीच म्हनण नाहीये.
पण वैयक्तिक शेरेबाजी का ???
हाण तिच्या मारी...
ReplyDeleteशेवटी घावलाच तर तुज्या तावडीत.., चांगला उलटा तांगून पोकळ बांबुने मारलास. लै बरा वाटला बघ हेरंबा :)
विशाल हे पत्र पाठवल गिरीश कुबेरांना :- श्री गिरीश कुबेर यांस,
Deleteस.न.
मी तुम्हाला लिहिलेले वैय्यक्तिक पत्र तुम्ही पेपर मधे ज्या पद्धतिने
वापरले , त्यावर मला काही म्हणावयाचे नाही. फक्त तो तुम्ही माझ्या
कंबरेखाली केलेला वार होता एवढेच मला सांगावेसे वाटते. वैयक्तिक पत्र
पाठवल्यावर वैय्यक्तिक उत्तर अपेक्षित असते, पण कदाचित तुम्हाला तसे
वाटत नसावे.
तसेच त्या नंतर ( म्हणजे माझ्या पत्रानंतर) सुध्दा त्या अभिगुप्तला
त्याच्यावर आणि हेरंब वर वैय्याक्तिक टीका करण्यापासून रहावले नाही.
दुसऱ्या आणि नंतरच्या आठवड्यात पण वैय्यक्तिक टिका केलेली आहे.
तुमच्या बद्दल एक अर्थशास्त्राचा गाढा अभ्यासक आणि चांगला लेखक म्हणून
एक आदर होता/अजूनही थोडा शिल्लक आहे. ज्या तऱ्हेने तुम्ही अभिगुप्तला
सपोर्ट करीत आहात ,त्याच प्रकारे सुरु राहिले तर कदाचित तो पण फार काळ
शिल्लक रहाणार नाही.
ज्या प्रमाणे माझे पत्र तुम्ही प्रसिद्ध केलेत, तसेच हेरंब ओक ने
तुम्हाला एक ओपन लेटर लिहिले आहे,त्याची लिक इथे देतोय.हे पत्र आणि
त्यावरच्या प्रतिक्रिया जर तुम्ही वाचावे नेटके मधे छापल्या तर ते सदर
सध्या ज्या तऱ्हेने सदर जात आहे त्या पेक्षा निश्चितच वाचनिय़ होईल. जर
तुमची खरच हिम्मत असेल छापा ते पत्र जसेच्या तसे.. कॉमेंट्स पण छापल्या
तरी हरकत "नाही".
http://www.harkatnay.com/2012/05/blog-post_13.html
हे पत्र हेरंबच्या या पोस्टच्या आधी लिहिले होते.
Deleteअभिजीत:-
ReplyDeleteकंबरेखाली वार करण्याच्या लोकसत्ताच्या संस्कृती विरुद्ध जाऊन सरळ सरळ छातीवर वार केलाय . तुमच्या सारख्या पाठीवर वार करून पळूण जाणाऱ्या लोकांना कदाचित आश्चर्य वाटेल, पण आम्ही ब्लॉगर्स असेच आहोत, विनाकारन वाकड्यात शिरू नकोस रे .तू आ्हेस एमए , आणि करतो चित्रांचं समिक्षण, आणि ब्लॉग चे परिक्षण, हे म्हणजे चांभार कपडे शिवतो असे झाले आहे.
काही पत्रकार पैसे घेऊन चांगले रिव्ह्य़ु देतात चित्रांच्या प्रदर्शनाचे. पण तू त्यातला नाहीस ना?? कारण काही अर्थाअर्थी संबंध नसतांना किंवा त्याचे ज्ञान नसताना त्याचे परिक्षण करतोस म्हणून विचारले.
तसेच ब्लॉग बद्दल चांगलं लिहायला, तुझा रेट किती आहे? की तुझ्या त्या मिसल्पाव मंदीरात येऊन तुझी पाठराखण करायचि, तुझी चमचेगिरी करायची ते एकदा पुढल्या आठवड्यात लोस मधे लिहून टाक म्हणजे बरं होईल.असो. तूर्त इतकेच. पण याच व्लोग वर माझ्या पुढल्या कोमेंटची वाट पहात बस.
क्या बात है. हेरंब मी तुला सांगितले नाही, पण तू शोधून काढलेस. कॉंग्रॅट्स..
हे मिसल्पाव मंदीर काय प्रकार आहे?? did I missed something??
Deleteअमित
Deleteमिसळपाव.कॉम.
heramb bad publicity is publicity indeed! ya drushti ne paha mag bagh tu abhijit la thanku mhanshil.
ReplyDeleteछाया,
Deleteपब्लिसिटीची गरज ही अभिजितला आहे, हेरंबला नाही.
आज पर्यंत कोण ओळखत होतं त्याला? आज पहा बरं, हजारो लोकांपर्यंत अभिजितचं नांव पोहोचवलं हेरंबने. म्हणून अभिजित शुड थॅंक हेरंब.. :)
काका...अगदी सहमत :)
Deleteअभिजित,
ReplyDeleteमला कधीच वाटलं नाही की ते सदर तुझे असेल. असो. खरंच वाईट वाटलं हे समजल्यावर. आपला अर्था अर्थी काही संबंध किंवा भांडण नसतांना का असे केले?
१. ताम्हणे, आपलं डोंबिवलीत कधी कोणत्याही प्रसंगी, एखाद्या भेटीत, क्रिकेट मॅचमध्ये, नळाच्या रांगेत, वाण्याच्या दुकानात, फडके रोडवर, भागशाळा मैदानात, गणपती मिरवणुकीत वगैरे वगैरे कुठल्याही प्रसंगी भांडण झालं होतं का ओ?
ReplyDeleteलैच्च ... एकदम फट्ट्य्याक...
मी एकाला सांगितलेल याला शोधायला पण तू आधीच शोधलास... लई भारी..
पावन सापडलं व्हय!
ReplyDeleteतू नक्कीच काहीतरी खोडी काढली असणार लहानपणी उगाच का माणस अशी पिसाळून लिहितात ? :P
हेरंब आणि 'फाटक्या' ह्यांच्या 'दुष्मनी' ची कारण मिमांसा (का काय म्हणतात ते) करणारी पोस्ट लिहिता येईल एक...
Delete"दुष्मनी ची कारणे" ची लिष्ट बनवूया आपण ..
सत्यवानाच्या लेखणीतुन आज पर्यंत फ़क्त मीच फ़टके खात होतो.माझ्या जोडीला अजुन कोणीतरी आल...फ़ार बर वाटतय...मॅडमला मी एक नारळ अन दीड किलो पेढ्यांचा प्रसाद दाखवणार आहे :)
ReplyDeleteचिदुभाऊ ... संपादकांना पण द्या.
Deleteत्यांच्यामुळेच तुम्हाला जोडीदार मिळाला.
अभिजित "बिबीकर"ला (सॉरी ताम्हाणेला) लोळवलान काय तू !
ReplyDelete्लोळवला काय चक्क पालथा पाडलाय त्याला.
DeleteGreat !!!!
ReplyDeleteI hope this would be the wake up call for loksatta
Nice writing Heramb
हेरंब...तुम्ही खुप उत्तम काम केल आहे. टी.आर.पी.मिळवण्याच्या नावाखाली हा जो काही धंदा चालवलाय त्याला वेळीच आळा बसेल अशी अपेक्षा आहे. गिरीश कुबेर सर आता तरी जागे व्हा.
ReplyDeleteयेडा आहे तो. मूर्ख माणूस आंबेडकरांबद्दल पण काहीतरी पोस्ट केलंय एका साईटीवर. सगळॆ जण तिकडे तुटून पडले आहेत कसं त्या पळशीकर ्च्या कार्यालयावर हल्ला केला ते वाईट झालं म्हणून.आंबेडकरांचे ते कार्टून दिले ते योग्यच आहे म्हणतो हा येडा.
ReplyDeleteहा शहाणा (???) म्हणतो "पळशीकरांसारख्या "संतुलित आणि ज्ञानी " (???) माणसावर हल्ला ही महाराष्ट्रात वाढलेल्या असहिष्णुतेची आणखी एक झलक म्हणता येईल."
संतुलीत आणि ज्ञानी माणसाला साधी मुलाच्या पुस्तकात कसली चित्रं द्यावी हे समजत नसेल तर तो ज्ञानी नाही तर चक्क मूर्ख आहे असे म्हणेन.
आता आमची सटकली रे...
ReplyDeleteहेरंभा... काय लिहिलं राव..सॉल्लिड...!!
अरे वा डोंबिवलीकर ताम्हाणे साहेब क्या बात हे
ReplyDeleteअहो मी पण डोंबिवलीकर आणि हेरबांच्या शाळेतील त्याचा ज्युनियर
पण तुमच्यासारखे प्रसिद्धीचे फंडे मला कसे बरे सुचले नाही.
चिखलफेक करायची नी प्रसिद्धी मिळवायची किती साधा सोपा सरळ यशाचा मंत्र आहे.
आता हेरंभा तूच एखादे ह्या विश्वातील लोकप्रिय नाव सुचव पाहू. ज्याच्यावर मला यथेच्च चिखलफेक माफ करा म्हणजे तोंड सुख घेता येईल
. म्हणजे मग माझे नाव एकदम यत्र ,तत्र ,सर्वत्र होईल.
असो
ताम्हाणे बुआ आपण सगळे डोंबिवलीकर, म्हणून अधिकाराने सांगतो.
झाले गेले गंगेला मिळाले. असे समजून आभसी जगतात माय मराठीतून मनमोकळेपणाने अभिव्यक्त होऊया.
मराठा तितुका मिळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा.
सिद्ध्या भावा महा महा प्रचंड !
ReplyDeleteकाय धुतला यार हेरंबा तू , पार धोबी पछाड!
माझ्या तमाम मराठी ब्लॉगर्स ना एकच सांगण आहे..
हे असले फाटके, तुटके कुठेही तुम्हाला हिणवताना दिसले तर ताबडतोब त्यांच्या चिंधड्या करा..
जय ब्लॉगिंग ! जय ब्लॉगर्स !
हाणला जबरदस्त !!
ReplyDeleteहेरंब, हे सगळं म्हणजे जे तू पोस्टमध्ये लिहिलंय ते माझ्यासाठी नवीनच आहे रे...आणखी काही काड्या सुरू आहेत का? मी फ़ेबुवर नाही म्हणून मला काहीच माहित नाहीये... (बरंय असं वाटतं....कुणाला वेळ आहे अशा लोकांच्या मागे जाऊन त्यांचा फ़ाल्तु टीआरपी वाढवायला)
ReplyDeleteतुला जास्त त्रास होत असणार त्यामुळे तू लगोलग दोन पोस्ट टाकल्या आहेत...समजू शकते मी...पण जाऊदे नं आता..
तुझ्या ब्लॉगवरची टिपिकल वटवटही येऊ देत की आता......मला तुझा ब्लॉग पहिल्या पोस्टेपासून खूप आवडला आहे हे वेगळं सांगायला हवंच आहे का.....लिहि आता पण वेगळ्या विषयावर...
निंदकाचे घर तुझ्या जास्त शेजारी आहे पण हत्तीने आपला मार्ग चालावा... ज्यांना भुंकायचंत त्यांची तोंड दुखतील की.
सिद्ध्या, प्र ह चं हं ड ह... ह ह ह ह हा हा हा हा हा .....
मस्त... अन् महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या लेखाखाली आलेल्या एकाही प्रतिक्रियेला उत्तर दिलेलं नाहीयेस... ग्रेट!!
ReplyDeleteमंदार जोशी,फॉर द रेकॉर्ड, माझ्या दृष्टीने या प्रकरणावर पडदा पडला !!!
Deleteतळटीप आहे!:))
Premane, galyat haat ghalun, kahi sangayache asalyas:
ReplyDeleteabhijit.tamhane@expressindia.com
छान वस्त्रहरण अररर.....नामहरण केलेत.
ReplyDeleteFB link not working now :)
ReplyDeleteHere's alternate : http://labs.mirror.me/googleplus/109775916141737002415
बाब्बौ!! हेरंबा अरे तिकडे आयपीएल मध्ये गेलने गोलंदाजाला एवढा धुतला नसेल त्याच्यापेक्षा कैकपटीने ह्या "अतिभीत काम्हणे" ला झोडपला आहेस. देव त्याला त्याच फाटक तोंड लपवण्याची जागा देवो.
ReplyDeleteavval.. attyuchch... :)))))
ReplyDeleteपाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. वर म्हटल्याप्रमाणे हा विषय आता इथेच संपवलेला बरा.. धन्यवाद.
ReplyDeleteफायनली :)
ReplyDeleteगुड!
त्यांचं नाव आपल्याला कळलं हे उत्तमच झालं !
ReplyDeleteare baap re... tya gupte ne prkakarn evdha vadhavala he mahitach navata... bara jhala asa ptra lihilas te... chhapa mhanava...!
ReplyDelete_/\_ _/\_
ReplyDeleteअनघा, कांचन, धन्यवाद... नाव एक्सपोज केलं आणी आता विषय संपला :)
ReplyDeleteधन्यवाद चैताली. हे पत्र ते निश्चितच छापणार नाहीत म्हणा. पण आपले विचार त्यांच्यापर्यंत पोचले हेच महत्वाचं.
तन्वी, आभार :)
धन्यवाद परिचित. अरे तो असलाच आहे यार. काही काही लोकांना प्रत्येक गोष्टींत फक्त आणि फक्त वाईटच शोधायची खोड असते. त्या जमातीतला आहे तो. तू लक्ष देऊ नकोस आणि लिहीत राहा.