ते वर वृत्तपत्रीय लिहिलंय तिथे खरं म्हणजे वृत्तपत्रविषयक हवंय. पण ठीके. (दुर्दैवाने) मराठी वृत्तपत्रं वाचत वाचतच लहानाचे मोठे झालेल्या माझ्या पिढीतल्या मराठी वाचक/ब्लॉगरच्या हातून ब्लॉगपोस्ट लिहिताना एखादा शब्द इकडचा तिकडे झाला म्हणून फारसा काही फरक पडत नाही. संपूर्ण वृत्तपत्रात अचूक शब्द, शुद्ध वाक्य, योग्य व्याकरण 'आवाहन' दिलं तरी सापडणार नाही याची खबरदारी घेणाऱ्या तथाकथित संपादक, उप-संपादक आणि सहायक संपादक यांनी अशा फुटकळ कारणांवरून समस्त ब्लॉगविश्वाला धारेवर धरण्याची 'आवशक्यता' नाही.
आता ही परवाचीच गोष्ट बघा ना.
पेपर : मटा
दिनांक : ३० एप्रिल
सदर : अग्रलेख.... (होय होय अग्रलेख.. संपादकीय पान !!)
शीर्षक : लक्ष्मणाला वनवास
आता यातल्या शेवटच्या परिच्छेदातली पहिली ओळ वाचा.
"११ वर्षे हा प्रदीर्घ काळ आहे आणि लक्ष्मण आता या शिक्षेला आवाहनही देतीलच."
शिक्षेला आवाहन??? आमच्या मराठीच्या बाईंनी आम्हाला शिक्षेला आव्हान की कायसंसं शिकवलं होतं. पण ते चूक असावं. संपादक साहेब कसे चुकतील??
आता कोणी म्हणेल "बरं बाबा चुकला एक शब्द. मग त्यात एवढं विशेष? भलेही संपादकीयातला असला म्हणून काय झालं? त्याच्यासाठी वेगळी पोस्ट टाकण्याची काय 'आवशक्यता' ? सॉरी.. काय आवश्यकता?"..... म्म्म्म्म वो ही तो बात हय.. सचिनची प्रत्येक धाव हा ज्याप्रमाणे नवीन विक्रम असतो त्याप्रमाणे मटानेही संपादकीयात अशी (म्हणजे अर्थ पार बदलून टाकणारी) मोठी चूक करून स्वतःचे आधीचे सगळे विक्रम मोडून टाकलेत. पूर्वी कसं छोट्या छोट्या बातम्यांमध्ये, (कदाचित) शिकाऊ पत्रकारांनी केलेल्या चुका असत पण यावेळी खुद्द संपादक महाशयच त्यांना सामील आहेत !! हा विक्रम मराठी वृत्तपत्रविश्वात पुढची दहा हजार वर्षं कोणी मोडू शकणार नाही याची आम्ही गवाही सॉरी.. ग्वाही देतो !!!
तर वेगळी पोस्ट टाकण्याचं कारण हेच की हा शंभरावा घाव होता. आधीच्या नव्व्याण्णव घावांची जंत्री आम्ही सर्व बझर/ब्लॉगर मंडळींनी पूर्वी बझवर मांडली होती. आज ती यादी समस्त ब्लॉगर वाचकांना खुली करून देण्याची वेळ आलीये.. कारण शेवटची आशा म्हणजे संपादक होते पण ते साहेबही अखेरीस त्यांच्या शिकाऊ पत्रकारांच्या साच्यातलेच बनलेले आहेत हे दुर्दैवाने उघड झालं.
आता कोणी म्हणेल की "आम्ही हे असंच लिहिणार!! एवढा त्रास होतो तर कशाला वाचता वर्तमानपत्र. नका वाचू ना." तर अशांना आमचं एवढंच सांगणं आहे की "हा ब्लॉगही आमचा आहे आणि आम्ही असेच लिहिणार.. नसेल झेपत तर ..... !!!! "
असो. तर हा त्या बझचा दुवा. खाली पूर्ण बझही चिकटवतो आहेच. आम्ही शोधलेली प्रत्येक चूक कुठल्या बातमीतली आहे याचे दुवेही सुदैवाने आम्ही संग्रहित करून ठेवले होते. त्यामुळे उगाच आकसापोटी हे काही चाललंय अशातलाही भाग नाही... सगळं अगदी "पुराव्याने शाबीत करीन!!" ;)
साधारण एक वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल २०११ मध्ये हा बझ चालू झाला आणि जवळपास पुढचे ८-१० महिने हा चालू होता, वहात होता अक्षरशः आणि (दु)सुदैवाने तो असाच वाहता राहील याची जीवापाड काळजी मटा (आणि अधून मधून लोकसत्ता, सकाळ इ इ ) नी घेतली. शेवटी आम्ही कंटाळलो आणि थांबवला तो बझ. पण अर्थातच मटा काही थांबला नाही आणि ते त्यांनी आज 'आवाहन' देऊन सिद्ध केलंच आहे. खेदपूर्वक एवढंच सांगावंसं वाटतं की आम्ही मटाचे संपादक आणि ऑनलाईन संपादक यांच्याशी वैयक्तिक संपर्क करून हा प्रकार थांबवण्याविषयी कळकळीची विनंती केली होती. परंतु काहीही फरक पडलेला नाही हे आपण पाहतोच आहोत !!! असो... एन्जॉय..
-------------------------------------------------------------------
abhijit n - अरे वा ! मी आताच प्रतिक्रिये मध्ये शिव्या हासडून आलो आणी तुझी पोस्ट पाहिली. मला न सापडलेल्या चुका तू शोधल्या आहेस. छान.
Nisha Bidkar - त्यामुळे सामन्यांद्वारे मिळणारे आथिर्क उत्पन्न नाही..........आथिर्क ...... अरे ते आर्थिक असे पाहिजे ना?
हे असलं वाचून मला माझ्या शुद्धलेखनाबद्दल शंका यायला लागली आहे!!!!
Anish Sane - आथिर्क!!!
हे म्हणजे आशीर्वाद ला आर्शिवाद किंवा औद्योगिकीकरण ला औद्योगीकरण म्हणण्यासारखं झालं
Anish Sane - आठ ते तीन सामन्यांना मुकावे लागेल!
"तीन ते आठ सामन्यांना मुकावे लागेल" असं म्हणायचं असावं
Vidyadhar Bhise - प्रचंड आवरा आहे यार... मला नोकरी द्या राव मटात.. मटाचा द इकॉनॉमिस्ट करून दाखवेन मी ;)
Raj Jain - 13 Apr 2011 ची बातमी व राष्ट्रीय सुरक्षा वार्षिक अहवालाचा घटक असलेल्या हा इंडेक्स परराष्ट्र मंत्री एस . एम . कृष्णा १९ एप्रिल २०१० रोजी प्रसिद्ध करणार आहेत
अवघड मटाचे...
abhijit n - पुन्हा तेच ही बातमी http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7970346.cms >>पण पुजा-यांच्या अधिका-यात आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, असे समितीचे म्हणणे आहे
अधिका-यात?
abhijit n - आणखी एक http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7971561.cms
>>वादग्रस्त बहुमजली आदर्श इमारत पाडावी, असा आदेस केंद्रीय पर्यावरण खात्याने आदर्श सोसायटीलाच दिला होता.
आदेस??
>>आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी
अमलबजावणी की अम्मलबजावणी?
>>परवानग्या एमएमआरडीने दिल्या असल्याने इमारत पाडण्याची कारवाई ...
एमएमआरडीने की एमएमआरडीएने??
हेरंब ओक Heramb Oak - च्यायला कोणाच्या ओळखीचा मटावाला असेल एखादा तर त्याला फॉरवर्ड करा हा बझ... त्याला सांगा की मालकाला म्हणावं पेपर (!!!???) बंद करा !!
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7778148.cms >> अशा प्रकारे एकाच घोटाळ्यात लष्कराचे तब्बल दहा वरिष्ठ अधिकारी सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे, असे लष्करच्या कोर्टाने सांगितले.
लष्करच्या की लष्कराच्या? ( क्षणभर हे लष्कर ए तोयबा बद्दल बोलत आहेत का काय असे वाटले)
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7718898.cms
खालील वाक्याचा अर्थ लावता येत नसल्याने मटा पुढे हात टेकून चुका शोधणे थांबवत आहे.
>>सीबीआयच्या अधिका-यांनी फाटक कुटुंबियांच्या नावावर मुंबईत ३ आणि दिल्लीतील १ अशा चार लॉकर्सच्या चाव्या तसेच , ५० लाखांच्या फिस्क्ड डिपॉडिस्टची कागदपत्रे , २७ बँक अकांऊंट्सबाबतची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
abhijit n - फॉन्टचा प्रॉब्लेम नसावा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7968302.cms >>शिर्डीच्या रामनवमी उत्सवाच्या शतक महोत्सवानिमित्त मंगळवारी शिडीर्मध्ये भक्तांची अलोट गदीर् उसळली होती.
शिडीर्मध्ये?? गदीर् ??
पहिल्या शब्दात शिर्डी व्यवस्थित लिहिता येते मग नंतर का नाही?
Devdatta देवदत्त Ganar गाणार - Matachya marathi/devanagari font cha problem ahe.. Paper cha nahi
असे कसे? आपण तर ते शब्द बरोबर लिहिलेत आणि इतर संकेतस्थळेही ह्याच फाँटवर चालतात. ते कसे बरोबर असतात? :)
abhijit n - नवा दिवस नव्या चुका
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7981165.cms >>पाणीपुरीवाले भय्ये पुरीशी स्वच्छता बाळगत नसल्याचे कारण देत....
पुरीशी?
Devdatta देवदत्त Ganar गाणार - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळे आयपीएलला जास्त प्रतिसाद लाभणार अशी चर्चा होत आहे. त्यातच अनेक ठिकाणी स्टेडियममध्ये जागा शिल्लक असल्यामुळे त्यास पुष्टी मिळत आहे, पण आकडे वेगळेच सांगत आहेत
http://72.78.249.107/esakal/20110414/4958660690133934496.htm
जागा शिल्लक आहे म्हणजे प्रतिसाद लाभतोय? आणि आकडे वेगळे सांगत आहेत? वाक्य काही कळले नाही बुवा.
Pravin Patade - Actually it can be read in that way too :) I thought of Madhuri dixit in Prahaar... She keeps saying this one.
abhijit n - मटा सुधारतोय मित्रहो. एक बातमी व फक्त सात चुका. ब्राव्हो !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7988054.cms >>गेले काही दिवस राजकीय आदोंलनाचा
आदोंलन की आंदोलन?
>>या विषयावर निर्णय घेण्यासाठी आजा गृहराज्यमंत्र्याच्या बैठक बोलावली होती.
आजा??
गृहराज्यमंत्र्याच्या??
>>उद्यापासून या निर्णयाची अंमलबाजावणीही होईल.
अंमलबाजावणी??
>>अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे
निर्मुलन की निर्मूलन
>>पुरुषांना गाभा-यात जिथंपर्यंत प्रवेश दिला जातो
जिथं??
>>१० ते ११ : ३० यावेळात
यावेळात की या वेळेत?
>>भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली दहा एक महिलांनी बुधवारी गाभारात प्रवेश केला होता
गाभारात??
Devdatta देवदत्त Ganar गाणार - ते लोक ह्यावरून प्रेरित असतील किंवा मग निदान आपण तरी वाचताना हे लक्षात ठेवू आता ;)
http://www.funny-potato.com/read-this.html
abhijit n - @हेरंब: होय अरे. आता एक दोन सिक्सर नाही मॅचच जिंकून द्यायची आहे. मटा संपादकांना पत्र पाठवलं आहे. @
देगा ऑफिसातून दिसत नाही तो दुवा. घरी गेल्यावर पाहीन.
Devdatta देवदत्त Ganar गाणार - सचिनचं (वान)खडे-खडे शतक, कोचीची धुलाई
मटा ला आवरा..... त्यांची शब्दरचना आता डोक्यात जायला लागलीय...
सिद्धार्थ . - म.टा.ची प्रत्येक बातमी इथे टाकावी लागेल यारो. सोडून द्या कि राव. खाजवून खाजवून खाज बरी नाही होत.
Pravin Patade - या 'होम थिएटर'ची आसनक्षमता पंधरा ते वीस असल्याने कदाचित अख्खी टीम इंडिया सचिनसमवेत एखाद्या सिनेमाचा 'र्फस्ट डे र्फस्ट शो' देखील पाहू शकतो. गौतम गंभीर आणि वीरेंद सेहवाग हे कमालीचे सिनेमा वेडे असल्याने त्यांच्यासाठी हे थिएटर एक सरप्राइजदेखील ठरू शकेल.
एवढी मोठी न्यूज पेपरात टाकल्यावर सरप्राईज ??
सोर्स: अजून कोण? मटा
abhijit n - मित्रहो, आपल्य ह्या बझचा दुवा मटा ऑनलाईन चे चीफ श्री सुहास फडके यांना पाठवला आहे. त्यामुळे या बझवर आपण मटाच्या चुका दाखवून देणे चालू ठेवूया. जेणे करुन या सगळ्यातून काही तरी निष्पन्न होईल व मटा पूर्वी सारखा वाचनीय होईल.
abhijit n - सुधारणा आहे. कालच्या ७ चुकांच्या तुलनेत आज फक्त ६ चुका.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7998116.cms >>अभिषेक काळात पुरुषांबरोबर महिलांनाही गाभा-यात देण्याचा निर्णय शुक्रवारी .....
काय देण्याचा? प्रवेश लिहायचं विसरले वाटतं !
>>
या बातमीतील पहिले दोन्ही परिच्छेद समान आहेत. कोणतीही वेगळी माहिती ते पुरवत नाहीत
>>त्यांच्यासमवेत मनसे महिला आघाडीच्या ११ अकरा महिलाही उपस्थित होत्या
११ अकरा? म्हणजे ११ गुणिले ११ की फक्त अकरा?
>>देवस्थान समिती व देवीच्या पुजारी मंडळीत महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत
मंडळीत??मंडळात म्हणायचे असावे
>>अभिषेक काळात महिलांना गाभा-यात प्रवेश देण्याचा पाच मिनिटांत झाला
काय पाच मिनिटांत झाला? निर्णय लिहिण्याचे विसरले असावेत
>>सरकारकडून प्राप्त होणा-या १२० कोटी रुपयांच्या नियोजन कसे करावे...
रुपयांच्या नियोजन? की रुपयांचे नियोजन
हेरंब ओक Heramb Oak - मटाला प्रचंड प्रचंड प्रचंड आत्मपरीक्षणाची आवश्यकता आहे (किंवा मटाच्या भाषेत आवशक्यता आहे !!! )
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8002683.cms >>केंदीय अर्थमंत्री प्रणव मुखजीर् यांच्या अध्यक्षतेखाली
मुखजीर्?वा वा क्या बात है !
>>स्थापन झालेल्या मसुदा समितीची बहुचचिर्त बैठक शनिवारी येथे उत्साहात पार पडली
बहुचचिर्त?? आता मात्र कमाल झाली
>>ध्वनिमुदणाची फीत नंतर सार्वजनिक केली जाईल.
ध्वनिमुदणाची की ध्वनिमुद्रणाची??
हेरंब ओक Heramb Oak - >> बहुचचिर्त
हाहाहा कमाल आहे !!!
उठा ले उठा ले !!!!!!!!!! इन मटावालोंको !!!!!!!!!!!!!!
हेरंब ओक Heramb Oak - Exactly !!!! ते "नंतर सार्वजनिक केली जाईल" वाचून अगदी हेच डोक्यात आलं होतं माझ्याही !!
Vidyadhar Bhise - मी नेहमी दुबळ्यांची बाजू घेतो.. त्यामुळे मी मटाच्या बाजूनं आहे.. माफ करा रे एक डाव ;)
हेरंब ओक Heramb Oak - बाबा, हे मुर्खांची बाजू घेणं झालं. बाजू घ्यायची असेल तर तर तर.... 'उर्सेगाव बुद्रुकचा बातमीदार' किंवा तत्सम कोणाची तरी घे... अर्थात दर्जाच्या बाबतीत 'उर्सेगाव बुद्रुकचा बातमीदार' हा मटापेक्षा नक्कीच उजवा असेल !! :P ;)
Devdatta देवदत्त Ganar गाणार - काय रे, त्या संध्यानंदला ह्यात खेचता? ते एक वेगळ्या धर्तीचे वृत्तपत्र आहे :)
त्यांचे ही म्हणणे आहे पहा..
Doesn’t compete with any other Marathi daily in the whole state due to different and unique content
हेरंब ओक Heramb Oak - .
नवा दिवस नव्या चुका
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8018239.cms
>> घडवून आणलेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यामध्ये
आत्मघाती??? की आत्मघातकी?
>> त्या सुरक्षा घे-याजवळ असतानाच
सुरक्षा घे-याजवळ??? म्हणजे नक्की कुठे? सुरक्षा चौकीजवळ का? मग तसं म्हणा ना.. हिंदीवाल्या "'सुरक्षा घेरे' कें पास" चा आंधळा अनुवाद कशाला?
>> या स्फोटात ५ सैनिक मारले गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत असले
प्रत्यक्षदर्शी ?? म्हणजे काय? 'साक्षीदार' किंवा सरळ 'घटना पाहणारे' असं म्हणा ना? सरळ सरळ हिंदी शब्द का वापरताय ??
MaTaa is a piece of s%^t !!
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8027899.cms >>महापालिका आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या नेतृत्वाखालील पालिकेचे घटनास्थळी दाखल झाले
पालिकेचे काय दाखल झाले? पथक लिहिण्यास विसरले असावेत.
>> इथे वीजेची व्यवस्था
वीजेची की विजेची?
abhijit n - मटाचे अभिनंदन ! परवाचा सात चुकांचा आकडा गाठण्यात मटा यशस्वी !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8023884.cms >> कलम १४४ अनुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
१४४ अनुसार असा शब्द प्रयोग मराठीत होतो का? सहसा १४४ या कलमानुसार असा वापर मराठीत होतो. ’अनुसार’ हा शब्द गुगल करुन पहा. तो हिंदीत वापरला जातो असे दिसेल.
>>रत्नागिरी बंदच्या समर्थनासाठी शिवसैनिक मोठया प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहे.
आहे की आहेत?
>>शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहे.
आहे की आहेत?
>>सोमवारी पोलिसांच्या गोळीबारात तबरेज या आंदोलकाचा मृत्यू झाला होता....तरबेज यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास
एकदा तबरेज म्हणता एकदा तरबेज म्हणता. कमाल आहे! त्या व्यक्तीचे Tavrez Sejkar असे नाव माझ्या वाचण्यात आले आहे.
>>मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आंदोलकांच्या पुढील मागण्या केल्या आहेत.
आंदोलकांच्या की आंदोलकांनी?
>>तरबेज यांच्यावर एकच गोळी झाडली गेली
पुन्हा तरबेज
>>आदेश देणारे प्रातअधिकारी
प्रातअधिकारी की प्रांतअधिकारी
abhijit n - मटा व रफाराचे वाकडे! एका बातमीत तब्बल १३ चुका. (फॉन्टचा प्रॉब्लेम नाही कारण याच बातमीत बरेच रफार बरोबर आले आहेत)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8033249.cms
>>शिवसेनेने मनोहर जोशी, दत्ताजी नलावडे, गजानन कीतिर्कर, रामदास कदम अशी
कीतिर्कर
>>सकाळी ९ वाजेपर्यंत र्कफ्यू जारी केला आहे.
र्कफ्यू?? कसा उच्चार करायचा या शब्दाचा?
>>त्यातच तबरेजच्या मृतदेहाचे पोस्टमॉटेर्म होणार असल्याचे समजताच
पोस्टमॉटेर्म?
>>जमाव संतापला आणि त्यांनी थेट पोस्टमॉटेर्म रूममध्येच
पुन्हा पोस्टमॉटेर्म?
>>यावेळी दोन स्वीपरना जबर मारहाण केली.
स्वीपर? सफाई कर्मचारी हा मराठी शब्द सापडला नाही वाटतं !
>>तबरेजच्या मृतदेहाचे पोस्टमॉटेर्म रोखण्याभोवतीच फिरत होता.
पोस्टमॉटेर्म??
>>कीतिर्कर, कदम यांनी सिव्हिल सर्जन, डॉक्टरांची भेट घेऊन
कीतिर्कर
>>राजकीय दबावाखाली पोस्टमॉटेर्म केल्यास खबरदार
पोस्टमॉटेर्म??
>>अखेर दुपारी तीनला पोस्टमॉटेर्म झालेच
पोस्टमॉटेर्म?
>>यावेळी चचेर्ला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी
चचेर्ला
>>गोळीबाराबरोबरच जैतापूरमधील उदेकामागे कुणाची
उदेकामागे?
>>सभागृहात गाजलेल्या या चचेर्त उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही
चचेर्त
>>असा आरोप केंदीय पर्यावरण मंत्री
केंदीय??
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8032246.cms >>एखाद्या गोष्टींवर एकमेकांची
गोष्टींवर की गोष्टीवर?
>>वानखेडेवर रंगणारी ही लढतीत गुरू व चेला
ही लढतीत?
सागर . - वानखेडेवर रंगलेल्या 'झणझणीत' सामन्यात अखेर मुंबईची भेळपुरी फर्मास, तर पुणेरी मिसळ फिकी पडली.
आवरा
Pravin Patade - काय राव , एकही स्पेलिंग मिस्टेक नसलेलं वाक्य चीअर करायचं सोडून तुम्ही त्याची सुद्धा टेर खेचताय...
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8035597.cms >>यामुळे लंकन खेळाडूंना आयपीएलचा डाव अर्ध्यावरच सोडावा लागणार आहेत.
आहेत???
>>आताही अशीच परिस्थिती उद्भभवल्याने बोर्डाने कडक भूमिका घेत सर्व खेळाडूंना परतीचा आदेश दिला
उद्भभवल्याने? दोनदा भ?
>>कुमार संगक्काररकडे
दोनदा क व दोनदा र ?
रफाराच्या चुकांना वाचक कंटाळू नयेत म्हणून मटाने या आगळ्या वेगळ्या चुका केवळ वाचकांच्या आनंदासाठी आणल्या आहेत!
हेरंब ओक Heramb Oak - >> रफाराच्या चुकांना वाचक कंटाळू नयेत म्हणून आगळ्या वेगळ्या चुका
हाहाहा.. च्यायला मटालाच कंटाळलो आहोत आता !!
abhijit n - हेरंब,निखिल: मला पण आता चुका शोधून शोधून वैताग आला आहे. मटा ऑनलाईन संपादक श्री सुहास फडके यांना हा धागा पाठवला होता. त्यांचे अजून उत्तर आले नाही किंवा पत्र मिळाल्याची पोच पण आली नाही. मटा वाल्यांनाच कशाची पडलेली नाही तर आपण कशाला उगाच जीव काढायचा? असो.
हेरंब ओक Heramb Oak - अगदी अगदी.. मीही म्हणूनच इथे खरडी टाकत होतो. पण मटाला लोकांच्या मताची काही पडली नसेल तर आपण तरी कशाला उगाच बडबड करायची.
आशा करुया की संबंधितांना लवकरच अक्कल येईल !!!
VI NE - hey friends
stop this if u wanna read any language paper then go here
http://www.epapergallery.com/index.htm
all may not b there but maximum are available - all scanned - u can feel of reading the original copy of printed paper
note- when u click any title it opens in pop up so afterwards u can copy that in browser or can directly read from pop up
enjoy
म टा - महाराष्ट्राचं टाकावू दैनिक
Devdatta देवदत्त Ganar गाणार - एक मे रोजी प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8132647.cms
मटा ने मोठ्या अभिमानाने सरकारवर टीका करत ही चूक दाखवलीय. पण वृत्तपत्रात छापायच्या आधी त्यांना ती चूक दर्शविण्याचे कष्ट घेतले नाहीत... तसेच्या तसे छापले. ;)
abhijit n - बातमीदार ने घेतला मटाचा समाचार !
http://batmeedar.blogspot.com/2011/04/blog-post_4264.html
abhijit n - एवढी बोंबाबोंब करुनही हे मटाचे कोडगे सुधारलेले दिसत नाहीत. सहज नजर फिरवली तरी १३ चुका सापडल्या. परिस्थिती जैसे थेच आहे. इतर बातम्या पाहण्याचे कष्ट अजून मी घेतले नाहीत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8148208.cms >>गेली १० वषेर् सुरू असलेल्या या मोहिमेला
वषेर्
>>ओबामांच्या कारकिदीर्त यश मिळाल्याने
कारकिदीर्त??
>>पुढील वषीर् होणाऱ्या
वषीर् ??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8146969.cms >>कोणललाच थांगपत्ता लागू दिलेला नाही .
कोणललाच??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8148255.cms >>तालिबानने चचेर्स यावे
चचेर्स ?
>>साथ सोडून चचेर्साठी तयार व्हावे
चचेर्साठी ??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8138973.cms >>तिच्या प्रकृतीला अध्याप कोणताही त्रास जालेला नसून
अध्याप? बाप रे बाप
जालेला? मस्तच की
>>किरणोत्सारी पाणी तात्परत्या साठवण टाकीत
तात्परत्या?? बघा चुका करण्यात मटावाले किती तत्पर आहेत ते
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8147967.cms
>>दीनानाथ नाट्यगृहात झालेल्या समारंभात हा हे डंपर व मदतीचा निधी आनंदवनाच्या हवाली करण्यात आला.
हा हे? हा लिहावे हे की या विवंचनेत असणा-या पत्रकाराने दोन्ही शब्द लिहून आपली विवंचना संपवलेली दिसते.
>>नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि निमिर्ती सावंत यांनी हा प्रयोग मोफत दिला.
निमिर्ती????
>>तसेच ५१हजारांची मदतीचा धनादेशही त्यांनी डॉ. विकास आमटे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला
५१हजारांची???
सुपूर्द की सुपूर्त??
सुपूर्द करण्यात आला? की केला? काय वाक्य रचना आनंदी आनंद गडे !
abhijit n - जैसे थे. आता तर बातमीच्या मथळ्यातही चुका.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8206579.cms >>सोलापुरात व्यापा-यांच्या कडकडीत बंद
व्यापा-यांच्या??
VI NE - i think ma ta uses HIGH QUALITY font which no one has
so ur browser is not able to properly read that font
u ill need RAJANIKANT FONT to read ma ta correctly
Abhishek Shinde - HIGH QUALITY font which no one has
so ur browser is not able to properly read that font >>>>
माझ्या घरी येणार वृत्तपत्राचा कागद पण तो फोन्ट नाही समजू शकत बहुतेक... येडच आहे... कोणाला माहित आहे का अशा कागदा साठी काय इन्स्टाल कराव लागेल! हे हे हे ... !
abhijit n - मटाचा मराठीशी पंगा !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8254170.cms >>मुख्यमंत्री मायावती यांच्याशी घेतलेला हा पंग्यामुळे अखेर रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली.
हा पंग्यामुळे???
हेरंब ओक Heramb Oak - .
च्यायला मटाशीच पंगा घेऊन दंगा करून झाला तरी त्यांना ढिम्म काही फरक पडत नाही.
खरोखरीच मटा आता फक्त पोराटोरांनी उकिडवं बसायला वापरायच्या लायकीचाच राहिलाय !!!!!!!!
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8269922.cms >>राहुल गांधींनी केलेलं धरण आंदोलन ही नौटंकी आहे.
धरण या शब्दाचा मला तरी पाणी अडवण्यासाठी बांधतात तो असा एकच अर्थ माहित आहे.
>>मायावती सरकारविरोधात शेतक-यां छेडलेल्या आंदोलनात
शेतक-यां?? निषाद लावायचे विसरले की काय !
>>ग्रेटर नोएडातील भट्टा पारसूल , भट्टा परसौलमधील घटना
पारसूल की परसौल एकदा काय ते ठरवा हो !
Aparna S - 'धरणं धरणे' हा एक शब्दप्रयोग आहे...पण "केलेलं धरण" हा मटा चमत्कार आहे...निदान "बांधलेलं धरण" म्हणायचं आणि पूर्ण विनोदी तरी करून टाकायचं...
Devdatta देवदत्त Ganar गाणार - http://72.78.249.107/esakal/20110511/4849417844979941988.htm
'विकिलिक्स' या संकेतस्थळाने गेला काही काळ अमेरिकी दूतावासांच्या हजारो तारांचा तपशील फोडून जगभर मोठा गदारोळ उठविला होता.
cables चे थेट भाषांतर? :)
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8276381.cms >>आर्थिक घसरणीची भीतीने 'सेन्सेक्स'ही घसरला
घसरणीची भीतीने??
>>वाढत्या महागाईमुळे आथिर्क वाढीला
आथिर्क ??
>>'सेन्सेक्स' निदेर्शांक १८,६१०.०२
निदेर्शांक??
>>औद्योगिक उत्पादनाच्या निदेर्शांकाची आकडेवारी
निदेर्शांकाची
>>उत्पादन घटल्यास आथिर्क वाढ
आथिर्क ?
>>झाल्याचे ब्रोकरेज र्फम्सकडून
र्फम्सकडून??
आणि आता येत आहे मटाची आजवरची सर्वात जबराट चूक !
>>वाढत्या महागाईमुळे रिर्झव्ह बँकेला
रिर्झव्ह??????????????????????????
(मोठ्याने उच्चार करुन पाहू नये. परिणामास बझकार जबाबदार नाही. मटास पकडावे !)
Pravin Patade - रिर्झव्ह??????????????????????????
(मोठ्याने उच्चार करुन पाहू नये. परिणामास बझकार जबाबदार नाही. मटास पकडावे !).... LOL
Saurabh Vaishampayan - मला मटा कधीच आवडला नाही, शिवाय टाईम्सची बॉम्बे टाईम्स ही पुरवणी "बॉम्बे टाईम्स" आहे कि बेंबी टाईम्स आहे हेच समजत नाही, खरतर पेज ३ हा प्रकारच डोक्यात जाणारा आहे. हां एखाद्या कलाकाराने काय चांगले वाईट काम केले, समाजात काय चांगली वाईट कामे केली ते प्रकाशित करेतो ठिकही आहे पण आयच्या घोऽऽऽऽ त्यांच्या पार्ट्या आणि त्यांच्या लफड्यांनी - लग्नांनी आमच्या आयुष्यात काय फरक पडतो?
हेरंब ओक Heramb Oak - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8523711.cms
>>'नभ मेघांनी आक्रमिले'... अशी स्थिती असतानाही रसिकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद पाहून ठाण्यातील भारतीय इनोव्हेशन्सच्या 'द स्वरा शो'च्या पहिल्याच आवर्तनाला उत्तम प्रतिसाद लाभला.
नक्की काय म्हणायचंय??? च्यायला चांगल्या बातमीचीही वाट लावून टाकतात $%^$%&^
हेरंब ओक Heramb Oak - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8558379.cms
>> आसिफ बलवा आणि राजीव अगरवाल हे कुसेगाव फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असून शाहिद बलवाचे त्या कंपनीचा एक भागिदार होती.
या वाक्याचा अर्थ समजावून सांगणार्या व्यक्तीस मटा आयुष्यभर मोफत देण्यात येईल !!!!! ;)
हेरंब ओक Heramb Oak - अरे हो की खरंच.. थांब बदलतो.
त्या व्यक्तीस आयुष्यभर मटोनेअर मोफत देण्यात येईल.
Vidyadhar Bhise - >>शाहिद बलवाचे त्या कंपनीचा एक भागिदार होती.
फार म्हणजे फार भारी.. व्याकरणाची विविध रूपे एकाच वाक्यात समजावून सांगण्याची हातोटी फक्त मटाकडे आहे! :D
Swami Sanketanand - arey, sadhya patrakaranche vaachan shoonya, tyatalya-tat te astat English Medium che , Marathi ji ghari thodifar bolat astil tich !! ase highly qualified patrakar astil tar hech haal honar re !
Swami Sanketanand - One Fact : Sadhya Papermadhe yenarya bahutansh lekhapenksha kityek pat changle lekh bloggers lihitat.. tumhi bloggers na najareaad karu shakat nahi !
महेंद्र . - लोळागोळा.. हसून हसून पुरेवाट झाली.
जबरी पोस्ट होईल.. हे असंच जरी ब्लॉग वर टाकलं तरी एक परीपुर्ण पोस्ट होऊ शकते. लोकांनाही समजेल मटा किती महा टाकाऊ पेपर आहे ते..
Devdatta देवदत्त Ganar गाणार - :)
बातमी आणि जुना संदर्भ बरोबर असला तरी ह्यांचाही थांबा चुकला ;)
लोकलने चुकवला स्टेशनचा थांबा! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8564414.cms
ह्या बातमीत जरी सेवाग्राम एक्स्प्रेसने भांडुपचा थांबा चुकवल्याची घटना ताजी असताना
असे म्हटले आहे तरी मूळ थांबा 'ठाणे' आहे.
त्यांनी स्वतःचीच बातमी नीट वाचली नाही :)
'सेवाग्राम' विसरली ठाण्याचा थांबा! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8157498.cms
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8558877.cms >>जोपलीन येथील मिसौरी शहराला चक्रीवादळाने तडाखा दिला आहे
मिझुरी शहर केव्हा पासून झालं?
>>कन्सास, मिसौरी, डल्लास, टोपेका आणि विचिता, ओक्लाहोमा शहर व टुल्सा या शहरांनाही धोक्याचा इशारा दिला आहे.
सब घोडे बारा टक्के. स्टेट असो वा शहर सगळ्यांना शहर बनवून टाकले आहे. उच्चार तर कसले भारी कन्सास डल्लास मिसौरी ! आय हाय क्या बात है ।
Devdatta देवदत्त Ganar गाणार - मटावर पहिल्यांदा http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8587462.cms ह्या बातमीत एखाद्या संकेतस्थळाचा पत्ता नीट रोमन अक्षरात दिसला. :)
Devdatta देवदत्त Ganar गाणार - लोकसत्ताही स्पर्धेत उतरायच्या तयारीत आहे का?
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=159303:2011-05-25-19-25-56&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राच्या अतिरिक्त साह्य निधीतील उर्वरित रक्कम रोखण्यात आली आहे, असे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री सौगत राय यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
abhijit n - सकाळही मागे नाही
>>http://72.78.249.107/esakal/20110526/4698720559456139118.htm
जनतेला आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याचा उद्दिष्ट.
महारा÷ट्रातून केंद्रात आल्यानंतर
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8986680.cms >>या गाडीची किंमत ८७ हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे चार कोटी रुपये असल्याचं समजतं
करा गणित करा ८७०००*४५ =३९,१५,००० चाळीस लाख म्हणजे काही चार कोटी नव्हे. मटावाले गणितात पण नापास !
महेंद्र . - चाटे गुरुजींचे क्लासेस लावा म्हणावं आता!! प्रचंड मुर्खपणा, राष्ट्रीय पातळीवर छापील स्वरूपात!!!
सिद्धार्थ . - जास्त मनावर घ्यायचे नाही. अहो आदल्या दिवशी सचिनला 'कडकी' लागली म्हणून त्याने फेरारी विकली, दुसऱ्या दिवशी मुलाच्या घरासाठी त्याने कर्ज काढले अश्या आवरा बातम्या छापल्या नंतर त्यावर उतारा म्हणून चाळीस लाखाचे चार करोड केले. आले मटाच्या मना तेथे कुणाचे चालेना.
महेंद्र . - आता फेरारी विकतांना विकत घेणाऱ्याने एंट्री टॅक्स ( जो सचिनला माफ केला गेला होता ) भरला म्हणूनही बातमी येऊ शकते..
Devdatta देवदत्त Ganar गाणार - कुणीतरी मला ह्या वाक्याचा अर्थ सांगा. :)
या प्रकाराबाबत अनेक ग्राहकांनी मोबाईल कंपन्यांच्या कारभारात सुधारणा झालेला दिसत नाही
http://www.esakal.com/esakal/20110627/4840611939287415951.htm
Devdatta देवदत्त Ganar गाणार - ह्यालाच द्रष्टा म्हणतात ना?
याआधी रविवारी ( २६ जुलै २०११ ) जुन्या मुंबई-पुणे हायवे जवळ असलेल्या माऊंट व्ह्यू रिसॉर्टवर रेव्ह पार्टी सुरू झाली
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9015086.cms
महेंद्र . - हे वाचलं का?? आधे लोग, बायें जाओ, आधे दायें, बाकी मेरे पिचे आवो...
तसंच हे वाक्य :-
"पार्टीत सहभागी झालेल्या २३१ तरुण आणि ५९ तरुणींना रक्ताचे नमुने घेऊन सोडून देण्यात आले आहे आणि बाकीच्यांना ताब्यात ठेवण्यात आले आहे. पार्टीत तब्बल ३०० जण सहभागी झाले होते."
२३१+५९=३००
मग बाकी किती राहिले ज्यांना सॊडून देण्यात आले??
हेरंब ओक Heramb Oak - हाहाहा.. मटावाले चांगलेच जाड कातडीचे आहेत. हा बझ वाचून एखाद्याने पेपर काढणं बंद केलं असतं एव्हाना ;)
abhijit n - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9015571.cms >>क्लबमधील तरणतलाव , स्पा , मजास , रेस्टारन्ट अशा उपक्रमांना ना नफा ना तोटा तत्वावर ....
मजास? मटाला काही बोलण्याची आहे कुणाची मिजास?
>>सदस्य शक्यतो त्या परिसरातीलच असाव्यात असे म्हटले आहे
असाव्यात ? जिमखाने बहुदा स्त्रियांसाठीच असतात असा मटासमज दिसतो !
Devdatta देवदत्त Ganar गाणार - एखादा शब्द, वाक्य चुकीचे असेल तर काही वेळा मान्य करू. लोकसत्ताने तर अख्खा तक्ताच गायब केलाय. :)
प्रिंट साइज, पिक्सेल्स आणि रेजोल्युशनची आदर्श संख्या पुढे दिली आहे
पुढे काही दिलेच नाही :D
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=166687:2011-06-27-17-37-15&catid=357:tech-&Itemid=360
हेरंब ओक Heramb Oak - हाहाहा !!! लोकसत्ताही??
खरंच किती स्पर्धात्मक युग आहे !! प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे ;)
Aparna S - हा हा हा..त्या बातमीतला उपसंपादक नुसता डुलक्या काढत नाही आहे तर कायमचा सुट्टीवर गेलाय बहुतेक...
खरंच किती स्पर्धात्मक युग आहे lol...:)
abhijit n - ईईई सकाळ
http://www.esakal.com/esakal/20110629/4875771229316500457.htm
>>श्री. मुंडे यांनी नाराजीचा विस्फोट केल्यानंतर
विस्फोट??सकाळ वाल्यांसाठी हिंदी मराठी भेदाभेद भ्रम अमंगळ !
सिद्धार्थ . - विस्फोट गॅसचा पण होतो. माननीय नेते गेला आठवडा भर पावटे-बटाटे खाऊन मुंबई दिल्ली फिरत होते. खूप वास मारला.
Pankaj Z - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9038791.cms
शहरात "फटक्या", मोकाट कुत्र्यांचा सध्या
लोकांना "चाऊन" ?? !!
ठोस निर्णय "कांही" झाला नाही.
abhijit n - http://72.78.249.107/esakal/20110629/5631950444340755906.htm
>>कारवाई दरम्यान पोलिसांकडून कोणतीही अनुसूचित घटना घडलेली नाही
अनुसूचित?
अनुचित लिहिता लिहिता, सू का आठवे ईसकाळा?
Heramb Oak - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9563461.cms
>> उत्तम इंग्रजी लिहिण्यात, फाडफाड इंग्रजी बोलण्यात आणि अस्खलित वाचण्यात कोकणी आणि मल्याळी मुलांचा पहिला नंबर असल्याचं प्रमाणपत्र एका नामवंत संस्थेनं दिलंय. त्यामुळे मराठी मुलांच्या इंग्लिश स्पीकिंगची थट्टा करणा-या विद्वानांची बोलती बंद होणार आहे.
मटाबाबाने कोकणी आणि मल्ल्याळी मुलांना आपलसं केलं..!!!!!!!!!!!!!!!!!
कोकणी आणि मल्ल्याळी मुलांचा पहिला नंबर आल्याने मराठी मुलांच्या इंग्लिश स्पीकिंगची थट्टा करणा-या विद्वानांची बोलती बंद होणार आहे. !!!!! आवराच !!
सिद्धार्थ . - अय्यो हेओ आण्णा कोकणी आणि मल्ल्याळी क्या बी नही होता. मराटी पेपर तो मराटी लोगो को अच्चा बोलनेका.
Heramb Oak - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9579393.cms
हसन अलीचा जामीन मंजूर !!
मटाबाबाने ध चा मा केला.. अली चा नाही रे गधड्यांनो की अली ला !!
Swami Sanketanand - हे हिंदी " हसन अली की जमानत मंजूर " चे मराठी भाषांतर आहे ! हा नक्की आमचा नागपूरकर असावा ! :)
Swami Sanketanand - कोण ? नागपूरकर ? कुछ बोलनेका नहीं ! हाहाहा ! बाकी मटावाले हरामखोर आहेत यात संशय नाहीच..
Heramb Oak - राष्ट्रीय दर्जाच्या वृत्तपत्रात व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या चुका करणारा प्रत्येक माणूस मग भले तो नागपूरकर असो पुणेकर असो की मुंबईकर... तो हरामखोर सालाच !!
Swami Sanketanand - अरे सध्याच्या पत्रकारांत ना व्यासंग हा प्रकार राहिला नाही. मराठी वाचन जेमतेम, पोटासाठी म्हणून पत्रकारिता करायची.. अर्थात हा सगळा कचरा मटात कसा जातो हा विषयच संशोधनाचा आहे. आचार्य अत्रे आठवतात रे..
abhijit Nilegaonkar - >>राष्ट्रीय दर्जाच्या वृत्तपत्रात
मटा (पत्र नव्हे चावट मित्रा) चा राष्ट्रीय दर्जा वृत्तपत्रिकेत नव्हे तर आता पॉर्न फोटो पहिल्यापानावर झळकवण्यामध्ये आहे.
abhijit Nilegaonkar - ब्रेकिंग न्य़ूज पण झोपेतच छापतात मटा वाले.
>>>अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांच्या ताब्यात घेतले !
यांनी ???? पोलिसांच्या???
Deven . - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9614590.cms
>>>स्वत : आजारी असलेले शम्मी कपूर मोठ्या भावाला अखेरचा निरोप देण्यासाठी बाणगंगेपाशी पोहोचले???
हे लोक बातमी छापण्याआधी एकदाही परत वाचून बघत नाही का ....
Pravin Patade - ब्रेकिंग न्य़ूज
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अण्णा हजारे यांना अखेर अटक दाखवण्यात आली ।
Pankaj Z - आज पुन्हा ’मटा’ने लायकी दाखवली. उत्क्रांतीचा सिद्धांत यांना लागू होतच नाही का?
फोटोग्राफी दिनानिमित्त त्यांनी फोन करुन आर्टिकल मागवून घेतले. एकतर कालच्या फोटोग्राफी दिनाऐवजी आज छापले. आणि तेही अर्धेच ?
http://farm7.static.flickr.com/6208/6061348849_b0bc485c22_b.jpg
Heramb Oak - कसला चुकीचा आणि दिशाभूल करणारा मथळा आहे !!!!
अण्णा आंदोलनावर काँग्रेस काढणार पुस्तिका
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9678802.cms
Devdatta Ganar - गेल्या वर्षी आलेल्या चौथ्या भागाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे पाचव्या भागाबाबत कित्येकांच्या मनात शंका उपस्थित झाल्या होत्या. याला किती प्रतिसाद मिळेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते
http://72.78.249.107/esakal/20110821/5175527618985770046.htm
मालिका स्टार वरुन सोनी वर आली म्हणून गेल्या वर्षी शंका येणे स्वाभाविक आहे किंवा प्रतिसाद नसला तर शंका येऊ शकते. पण भरभरून प्रतिसाद दिल्यावर शंका कसली?
Nachiket Karve - आज कधी नव्हे तो सकाळी सकाळी सकाळ उघडला तर पहिल्याच फोटोखाली हे: अण्णा हजारे यांना पाठिंबा देण्यासाठी आज (रविवारी) दहा नागरिकांनी राजधानीत इंडिया गेट ते रामलीला मैदाना दरम्यान रॅली काढली.
Heramb Oak - >> ५ मच्चिमार बोटी बुडाल्या
मच्चिमार !!!!!!!!!!!!! सर्वोच्च आवरा !!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9849278.cms
Swami Sanketanand - घ्या, सकाळ पण मटाच्याच मार्गावर >> बहरली मेळघाटची कुश ("कूस" हवे होते ना ?)
http://www.esakal.com/esakal/20110903/4825861050317802022.htm
Heramb Oak - >> गणेश महिमेवर विश्वास असलेल्या शेख यांची गणेशाविषयी भक्ती दृढ होत गेली.
महिमेवर????? अरे ती काय चौधर्यांची महिमा आहे का?
महिम्यावर म्हणा रे मूर्खांनो.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9878879.cms
Heramb Oak - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9882203.cms
>>आंध्र प्रदेशातून सर्वात जास्त म्हणजे वर्षाला १ लाक विद्यार्थी निवडले जातात. त्या खालोखाल तमिळनाडूचा (१.८ लाक विद्यार्थी) क्रमांक लागतो.
- लाक????
- १.८ मोठे की १ लाख?? ..... मट्या म्हणतोय म्हणजे नक्कीच १ लाख मोठे असणार !!
abhijit Nilegaonkar - Heramb Oak मट्या ! हाहा. भारीच.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9878756.cms >>टँकरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत ५ जण ठार झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ५ जणांचे मृतदेह हाती लागले असून.....
पाच जण ठार झाल्याची भीती आणि पुढच्याच वाक्यात ५ मृतदेह हाती लागले? स्वत: लिहिलेली बातमी हे वाचून पाहतात का हाच प्रश्न आहे.
abhijit Nilegaonkar - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9899817.cms >>आता तरी आम्हा सामान्यांचा विचार करा आणि जमलं तर या परत एकत्र, असं आवाहनच त्यांनी राज-उद्धव यांना केलं होतं. त्यामुळे ही भावंडं राज यांच्या विनंतीला तरी मान देणार का, याबद्दल कुतूहल होतं.
ही भावंडं राज यांच्या विनंतीला??? राज कशाला विनंती करेल. मटातील बटाट्यांनो जागे व्हा.
Heramb Oak - प्रचंड प्रचंड विनोदी बातमी !!
दोन ग्रॅमपेक्षा कमी कोकेन खरेदी केलंत तर शिक्षा भोगायला तयार रहा !!!! :P :P :P
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10232563.cms
Heramb Oak - आवराच..
>> दोन ग्रॅमपेक्षा कमी कोकेन खरेदी केल्याप्रकरणी सिनेस्टार फरदीन खान याला अमली पदार्थ विरोधी विभागाच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवले.
>>अमली पदार्थ कायद्यानुसार, दोन ग्रॅमपेक्षा कमी कोकेन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त सहा महिन्यांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितरित्या देण्याची तरतूद आहे.
Devdatta Ganar - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे रविवारपासून बेमुदत मौनव्रत सुरू करणार आहेत
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10366500.cms
अण्णा हजारे आज, रविवारपासून आत्मशांतीसाठी राळेगणसिद्धी येथे आठवडाभर मौनव्रत करणार आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10371919.cms
आठवडा = बेमुदत?
काल रात्री मटा वर बेमुदत अशी बातमी होती. पण त्याच वेळी सकाळ वर आठवडाभर अशी बातमी होती.
Heramb Oak - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10381156.cms
नकाल? नाकाला? की नकार??
.
.
.
ओह अच्छा अच्छा.. नि काल
Devdatta Ganar - आता तर कहर झाला.
शीर्षकः लिबियाचे राष्ट्रपती कर्नल गद्दाफी ठार
बातमी: लिबियाचे राष्ट्रपती मुहम्मर गद्दाफी यांना जखमी अवस्थेत अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10429087.cms
Siddharth T - हेडलाईन आणि प्रत्यक्ष बातमीत किती अंशांचा फरक आहे पहा... मटाला टांग दंडवत ...
जळगावात पारा ८५ अंशावर - http://tinyurl.com/6oyveh3
Heramb Oak - "टिंबच तर आहे च्यायला.. कुठेही दिलं तरी काय फरक पडतो" असं मटाचं साधं-सोपं गणित असावं ;)
Devdatta Ganar - किंवा टिंब दिला काय नी नाही दिला काय :)
( ह्याची भरपाई करायला पुढील वेळी बहुधा फक्त टिंब टिंब च लिहितील ;) )
Sagar B - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10829789.cms
अॅपल , आयफोन , सिंमबियन , जावा अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर हे वापरता येऊ शकते.
अॅपल व आयफोन हे वेगवेगळे आहेत का?
Amit Mohod - अरे, हा संपूर्ण थ्रेड मटा वाल्यांना पाठवा रे.. कदाचित ते त्यांचं proof-reading च काम outsource करतील.. हेरंबा, चांगला बिजनेस मिळेल भावा.. :)
सुहास झेले - अरे ह्या थ्रेडचं शीर्षक बदलून पाठवून दे परत त्यांना....हटके शीर्षक असेल तर, स्वतःला दिलेल्या शिव्यासुद्धा छापतील ते ;-)
सुहास झेले - नाही तर एक अतितुच्छ सजेशन... बझ्झ थ्रेड पाठवताना सगळ्यांत सुरुवातीला लेखक - आसबे म्हणून लिहावे
Siddharth T - >> बझ्झ थ्रेड पाठवताना सगळ्यांत सुरुवातीला लेखक - आसबे म्हणून लिहावे
Perfect... इफेक्ट सही, साईड-इफेक्ट नहीं...
Heramb Oak - >> भारताने चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी स्पधेर्त दुबळ्या पोलंडचा ७-० असा फडशा पाडला. तुषार व युवराज यांनी प्रत्येकी एक मोहरा टिपला.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10925186.cms
मटाच्या मायला !!!!! हॉकीमधे मटाच्या बापाने तरी कधी 'मोहरे' टिपले आहेत का??
सुहास झेले - 'फॉरेनच्या वाण्या'विरूद्ध कडकडीत 'शटर डाऊन'
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10940403.cms
फेकिंग न्यूज - अगर वॉल मार्ट को पता लग जाए कि उसे 'विदेशी किराना दुकान' कहा जा रहा है तो शायद वो खुद ही भारत आने से मना कर दे!
;-)
Heramb Oak - शेवटच्या दोन परिच्छेदांचा अर्थ सांगणाऱ्याला मटारत्न पुरस्कार देण्यात येईल !!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10984685.cms
>>>महाबाळेश्वर-पोलिस जीप मध्ये बसायचे- फिल्ममध्ये बसलो-
ओढों पे एसी बात चली आये- वैजयंती माला बरोबर डान्स- गाणे फेमस होईल, एक पोस्टपोन - डंबरू घेऊन एंट्री मारलो. कुणालाच माहिती नाही. व्ही आनंद यांना सांगितले., कुछभी कर- मुझे नाचना है-
महाबाळेश्वरमध्ये असताना- हुरहुन्नरी- जिंदादील माणूस- झोपलेलो- आजारी आहे, हे आवडायचे नाही.
मुंबईत एका मित्राकडे ओळख झाली होती. २००७ महाबाळेश्वर पोस्टिंग झाली. १९८६-८७ मध्ये ओळख झाली होती. महाबाळेश्वर घरचे रिलेशन झाले आहे. <<<
अरे ए आवरा रे आवरा !!!!!!!!!!!!
abhijit Nilegaonkar - शेवटचे दोन परिच्छेद मटाच्या निर्लज्जपणाच्या कळसोध्याय ठरावेत. शुद्धलेखनाच्या एक दोन चुका, एक दोन वाक्यांचा अर्थ न लागणे या माफक चुकांवरुन मटाची झेप आता दोन दोन परिच्छेदांचा अर्थ न लागणे इथपर्यंत येवून पोचली आहे! धन्य तो लेख, धन्य तो पत्रकार, धन्य त्याचे मॅनेजर,धन्य ते मटा ऑनलाइन चे संपादक आणि धन्य तो मटा !
Amit Mohod - हे गाणी हिट होईल, असे वाटल्यावर त्यांनी मात्र या गाण्यात नाचण्याचा आग्रहच धरला आणि नाचले .
"गाणी"????
Amit Mohod - * 'ज्वेल थीफ' या सिनेमाच्या आठवणही देव आनंद यांनी सावंत यांना सांगितली होती. - "सिनेमाच्या आठवणही"??
* तसेच अनेक फोटोही त्यांनी पोलिस बसून काढले . " पोलिस बसून"???
Devdatta Ganar - राज ठाकरेंना पाठवून दे हा बझ्झ... माहिती/माहित्या चा समाचार घेतला होता. इथेही पाहू ;)
Siddharth T - मी सांगितला असता अर्थ पण पुरस्कार म्हणून मटारत्न देऊन "घोर अपमान" केला जाणार असल्याने विचार बदलला.
VI NE - i repost same thing from above but its true again & again
:-
hey friends
stop this if u wanna read any language paper then go here
http://www.epapergallery.com/index.htm
all may not b there but maximum are available - all scanned /epaper - u can feel of reading the original copy of printed paper
note- when u click any title it opens in pop up so afterwards u can copy that in browser or can directly read from pop up
enjoy
म टा - महाराष्ट्राचं टाकावू दैनिक
Suhaas Salve - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11002194.cms
ajun ek great baatami !
Amit Mohod - related batami : पाकिस्तान ने बंदर के बदले की किसी भारतीय नेता की मांग, सरकार करवाएगी ऑनलाइन सर्वे
http://hindi.fakingnews.com/2011/12/pak-demands-indian-leader-in-lieu-of-monkey/
Devdatta Ganar - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11016813.cms _'रिटेल' क्षेत्राची दारे परकी गुंतवणुकीसाठी (एफडीआय) उघडी करण्यास विरोध करणा-या पक्षांची मते विचारात घेऊन केंद्र सरकारने नमते घेऊन याबाबतच्या निर्णयास 'स्थगिती' देण्याच्या भूमिका घेतला होती _
एकवचनी/अनेकवचनी, स्त्रीलिंगी/पुल्लिंगी गोंधळ?
Amit Mohod - हल्ली आपण सगळे बझ्झकरी (हा बझ्झ वाचणारे ह्या अर्थी) , म.टा, त्यातील बातम्या वाचण्या पेक्षा त्यातील चुका शोधण्यासाठी आणि त्या या बझ्झ वर टाकण्या साठी वाचतो, असा म.टा वाल्यांना दाट संशय आला आहे म्हणे.. :D
सुहास झेले - 'मोरा'च्या पाठीवरून देशभर हिंडा!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11013413.cms
मायला बातमीचं शीर्षक वाचून हडबडलो एकदम...तसं सवय आहे म्हणा.. तरी ;-)
-------------------------------------------------------------------
आता ही परवाचीच गोष्ट बघा ना.
पेपर : मटा
दिनांक : ३० एप्रिल
सदर : अग्रलेख.... (होय होय अग्रलेख.. संपादकीय पान !!)
शीर्षक : लक्ष्मणाला वनवास
आता यातल्या शेवटच्या परिच्छेदातली पहिली ओळ वाचा.
"११ वर्षे हा प्रदीर्घ काळ आहे आणि लक्ष्मण आता या शिक्षेला आवाहनही देतीलच."
शिक्षेला आवाहन??? आमच्या मराठीच्या बाईंनी आम्हाला शिक्षेला आव्हान की कायसंसं शिकवलं होतं. पण ते चूक असावं. संपादक साहेब कसे चुकतील??
आता कोणी म्हणेल "बरं बाबा चुकला एक शब्द. मग त्यात एवढं विशेष? भलेही संपादकीयातला असला म्हणून काय झालं? त्याच्यासाठी वेगळी पोस्ट टाकण्याची काय 'आवशक्यता' ? सॉरी.. काय आवश्यकता?"..... म्म्म्म्म वो ही तो बात हय.. सचिनची प्रत्येक धाव हा ज्याप्रमाणे नवीन विक्रम असतो त्याप्रमाणे मटानेही संपादकीयात अशी (म्हणजे अर्थ पार बदलून टाकणारी) मोठी चूक करून स्वतःचे आधीचे सगळे विक्रम मोडून टाकलेत. पूर्वी कसं छोट्या छोट्या बातम्यांमध्ये, (कदाचित) शिकाऊ पत्रकारांनी केलेल्या चुका असत पण यावेळी खुद्द संपादक महाशयच त्यांना सामील आहेत !! हा विक्रम मराठी वृत्तपत्रविश्वात पुढची दहा हजार वर्षं कोणी मोडू शकणार नाही याची आम्ही गवाही सॉरी.. ग्वाही देतो !!!
तर वेगळी पोस्ट टाकण्याचं कारण हेच की हा शंभरावा घाव होता. आधीच्या नव्व्याण्णव घावांची जंत्री आम्ही सर्व बझर/ब्लॉगर मंडळींनी पूर्वी बझवर मांडली होती. आज ती यादी समस्त ब्लॉगर वाचकांना खुली करून देण्याची वेळ आलीये.. कारण शेवटची आशा म्हणजे संपादक होते पण ते साहेबही अखेरीस त्यांच्या शिकाऊ पत्रकारांच्या साच्यातलेच बनलेले आहेत हे दुर्दैवाने उघड झालं.
आता कोणी म्हणेल की "आम्ही हे असंच लिहिणार!! एवढा त्रास होतो तर कशाला वाचता वर्तमानपत्र. नका वाचू ना." तर अशांना आमचं एवढंच सांगणं आहे की "हा ब्लॉगही आमचा आहे आणि आम्ही असेच लिहिणार.. नसेल झेपत तर ..... !!!! "
असो. तर हा त्या बझचा दुवा. खाली पूर्ण बझही चिकटवतो आहेच. आम्ही शोधलेली प्रत्येक चूक कुठल्या बातमीतली आहे याचे दुवेही सुदैवाने आम्ही संग्रहित करून ठेवले होते. त्यामुळे उगाच आकसापोटी हे काही चाललंय अशातलाही भाग नाही... सगळं अगदी "पुराव्याने शाबीत करीन!!" ;)
साधारण एक वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल २०११ मध्ये हा बझ चालू झाला आणि जवळपास पुढचे ८-१० महिने हा चालू होता, वहात होता अक्षरशः आणि (दु)सुदैवाने तो असाच वाहता राहील याची जीवापाड काळजी मटा (आणि अधून मधून लोकसत्ता, सकाळ इ इ ) नी घेतली. शेवटी आम्ही कंटाळलो आणि थांबवला तो बझ. पण अर्थातच मटा काही थांबला नाही आणि ते त्यांनी आज 'आवाहन' देऊन सिद्ध केलंच आहे. खेदपूर्वक एवढंच सांगावंसं वाटतं की आम्ही मटाचे संपादक आणि ऑनलाईन संपादक यांच्याशी वैयक्तिक संपर्क करून हा प्रकार थांबवण्याविषयी कळकळीची विनंती केली होती. परंतु काहीही फरक पडलेला नाही हे आपण पाहतोच आहोत !!! असो... एन्जॉय..
-------------------------------------------------------------------
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow /7922435.cms
वर्स्ट वर्स्ट वर्स्ट वर्स्ट वर्स्ट ऑफ मटा !!!!
>> पाकिस्तानी खेळाडूंना इंग्लिश भाषेची पुरेशी जाणकारी नसल्याने ही सगळी माहिती उर्दू भाषेतही पुरवण्यात आलीय.
जाणकारी ????
>> या श्रेणीतील खेळाडूला वनडेसाठी साडेतीन लाख रुपये, वनडेसाठी तीन लाख, तर टी-२०साठी अडीच लाख रुपये मॅचफी मिळते.
नक्की किती? साडे तीन की तीन लाख?
>> २५ हजार रुपायांचा विशेष भत्ता मिळतो.
रु पा यांचा??
>> विशेष एखाद्या खेळाडूला मिळाणारी बक्षीस रक्कमही संघात वाटून घेतली जाते
विशेष एखाद्या म्हणजे काय?
मि ळा णारी ???????
बक्षीस रक्कम??????? की बक्षिसाची रक्कम?
अर्ध्या बातमीत एवढ्या चुका???????
एवढं झाल्यावर मात्र मी ती बातमी सोडून दिली आणि मटा वाचणं निदान आजच्यापुरता तरी बंद केलं आणि लोकसत्ता वाचायला घेतला !

276 comments
हे असलं वाचून मला माझ्या शुद्धलेखनाबद्दल शंका यायला लागली आहे!!!!
हे म्हणजे आशीर्वाद ला आर्शिवाद किंवा औद्योगिकीकरण ला औद्योगीकरण म्हणण्यासारखं झालं
"तीन ते आठ सामन्यांना मुकावे लागेल" असं म्हणायचं असावं
अवघड मटाचे...
अधिका-यात?
>>वादग्रस्त बहुमजली आदर्श इमारत पाडावी, असा आदेस केंद्रीय पर्यावरण खात्याने आदर्श सोसायटीलाच दिला होता.
आदेस??
>>आदेशाची अमलबजावणी करण्यासाठी
अमलबजावणी की अम्मलबजावणी?
>>परवानग्या एमएमआरडीने दिल्या असल्याने इमारत पाडण्याची कारवाई ...
एमएमआरडीने की एमएमआरडीएने??
लष्करच्या की लष्कराच्या? ( क्षणभर हे लष्कर ए तोयबा बद्दल बोलत आहेत का काय असे वाटले)
खालील वाक्याचा अर्थ लावता येत नसल्याने मटा पुढे हात टेकून चुका शोधणे थांबवत आहे.
>>सीबीआयच्या अधिका-यांनी फाटक कुटुंबियांच्या नावावर मुंबईत ३ आणि दिल्लीतील १ अशा चार लॉकर्सच्या चाव्या तसेच , ५० लाखांच्या फिस्क्ड डिपॉडिस्टची कागदपत्रे , २७ बँक अकांऊंट्सबाबतची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7968302.cms >>शिर्डीच्या रामनवमी उत्सवाच्या शतक महोत्सवानिमित्त मंगळवारी शिडीर्मध्ये भक्तांची अलोट गदीर् उसळली होती.
शिडीर्मध्ये?? गदीर् ??
पहिल्या शब्दात शिर्डी व्यवस्थित लिहिता येते मग नंतर का नाही?
असे कसे? आपण तर ते शब्द बरोबर लिहिलेत आणि इतर संकेतस्थळेही ह्याच फाँटवर चालतात. ते कसे बरोबर असतात? :)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7981165.cms >>पाणीपुरीवाले भय्ये पुरीशी स्वच्छता बाळगत नसल्याचे कारण देत....
पुरीशी?
http://72.78.249.107/esakal/20110414/4958660690133934496.htm
जागा शिल्लक आहे म्हणजे प्रतिसाद लाभतोय? आणि आकडे वेगळे सांगत आहेत? वाक्य काही कळले नाही बुवा.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7988054.cms >>गेले काही दिवस राजकीय आदोंलनाचा
आदोंलन की आंदोलन?
>>या विषयावर निर्णय घेण्यासाठी आजा गृहराज्यमंत्र्याच्या बैठक बोलावली होती.
आजा??
गृहराज्यमंत्र्याच्या??
>>उद्यापासून या निर्णयाची अंमलबाजावणीही होईल.
अंमलबाजावणी??
>>अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे
निर्मुलन की निर्मूलन
>>पुरुषांना गाभा-यात जिथंपर्यंत प्रवेश दिला जातो
जिथं??
>>१० ते ११ : ३० यावेळात
यावेळात की या वेळेत?
>>भाजपच्या नेत्या नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली दहा एक महिलांनी बुधवारी गाभारात प्रवेश केला होता
गाभारात??
http://www.funny-potato.com/read-this.html
देगा ऑफिसातून दिसत नाही तो दुवा. घरी गेल्यावर पाहीन.
मटा ला आवरा..... त्यांची शब्दरचना आता डोक्यात जायला लागलीय...
एवढी मोठी न्यूज पेपरात टाकल्यावर सरप्राईज ??
सोर्स: अजून कोण? मटा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7998116.cms >>अभिषेक काळात पुरुषांबरोबर महिलांनाही गाभा-यात देण्याचा निर्णय शुक्रवारी .....
काय देण्याचा? प्रवेश लिहायचं विसरले वाटतं !
>>
या बातमीतील पहिले दोन्ही परिच्छेद समान आहेत. कोणतीही वेगळी माहिती ते पुरवत नाहीत
>>त्यांच्यासमवेत मनसे महिला आघाडीच्या ११ अकरा महिलाही उपस्थित होत्या
११ अकरा? म्हणजे ११ गुणिले ११ की फक्त अकरा?
>>देवस्थान समिती व देवीच्या पुजारी मंडळीत महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत
मंडळीत??मंडळात म्हणायचे असावे
>>अभिषेक काळात महिलांना गाभा-यात प्रवेश देण्याचा पाच मिनिटांत झाला
काय पाच मिनिटांत झाला? निर्णय लिहिण्याचे विसरले असावेत
>>सरकारकडून प्राप्त होणा-या १२० कोटी रुपयांच्या नियोजन कसे करावे...
रुपयांच्या नियोजन? की रुपयांचे नियोजन
मुखजीर्?वा वा क्या बात है !
>>स्थापन झालेल्या मसुदा समितीची बहुचचिर्त बैठक शनिवारी येथे उत्साहात पार पडली
बहुचचिर्त?? आता मात्र कमाल झाली
>>ध्वनिमुदणाची फीत नंतर सार्वजनिक केली जाईल.
ध्वनिमुदणाची की ध्वनिमुद्रणाची??
हाहाहा कमाल आहे !!!
उठा ले उठा ले !!!!!!!!!! इन मटावालोंको !!!!!!!!!!!!!!
त्यांचे ही म्हणणे आहे पहा..
Doesn’t compete with any other Marathi daily in the whole state due to different and unique content
नवा दिवस नव्या चुका
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8018239.cms
>> घडवून आणलेल्या आत्मघाती बॉम्ब हल्ल्यामध्ये
आत्मघाती??? की आत्मघातकी?
>> त्या सुरक्षा घे-याजवळ असतानाच
सुरक्षा घे-याजवळ??? म्हणजे नक्की कुठे? सुरक्षा चौकीजवळ का? मग तसं म्हणा ना.. हिंदीवाल्या "'सुरक्षा घेरे' कें पास" चा आंधळा अनुवाद कशाला?
>> या स्फोटात ५ सैनिक मारले गेल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत असले
प्रत्यक्षदर्शी ?? म्हणजे काय? 'साक्षीदार' किंवा सरळ 'घटना पाहणारे' असं म्हणा ना? सरळ सरळ हिंदी शब्द का वापरताय ??
MaTaa is a piece of s%^t !!
पालिकेचे काय दाखल झाले? पथक लिहिण्यास विसरले असावेत.
>> इथे वीजेची व्यवस्था
वीजेची की विजेची?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8023884.cms >> कलम १४४ अनुसार ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
१४४ अनुसार असा शब्द प्रयोग मराठीत होतो का? सहसा १४४ या कलमानुसार असा वापर मराठीत होतो. ’अनुसार’ हा शब्द गुगल करुन पहा. तो हिंदीत वापरला जातो असे दिसेल.
>>रत्नागिरी बंदच्या समर्थनासाठी शिवसैनिक मोठया प्रमाणावर रस्त्यावर उतरले आहे.
आहे की आहेत?
>>शहरातील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहे.
आहे की आहेत?
>>सोमवारी पोलिसांच्या गोळीबारात तबरेज या आंदोलकाचा मृत्यू झाला होता....तरबेज यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास
एकदा तबरेज म्हणता एकदा तरबेज म्हणता. कमाल आहे! त्या व्यक्तीचे Tavrez Sejkar असे नाव माझ्या वाचण्यात आले आहे.
>>मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आंदोलकांच्या पुढील मागण्या केल्या आहेत.
आंदोलकांच्या की आंदोलकांनी?
>>तरबेज यांच्यावर एकच गोळी झाडली गेली
पुन्हा तरबेज
>>आदेश देणारे प्रातअधिकारी
प्रातअधिकारी की प्रांतअधिकारी
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8033249.cms
>>शिवसेनेने मनोहर जोशी, दत्ताजी नलावडे, गजानन कीतिर्कर, रामदास कदम अशी
कीतिर्कर
>>सकाळी ९ वाजेपर्यंत र्कफ्यू जारी केला आहे.
र्कफ्यू?? कसा उच्चार करायचा या शब्दाचा?
>>त्यातच तबरेजच्या मृतदेहाचे पोस्टमॉटेर्म होणार असल्याचे समजताच
पोस्टमॉटेर्म?
>>जमाव संतापला आणि त्यांनी थेट पोस्टमॉटेर्म रूममध्येच
पुन्हा पोस्टमॉटेर्म?
>>यावेळी दोन स्वीपरना जबर मारहाण केली.
स्वीपर? सफाई कर्मचारी हा मराठी शब्द सापडला नाही वाटतं !
>>तबरेजच्या मृतदेहाचे पोस्टमॉटेर्म रोखण्याभोवतीच फिरत होता.
पोस्टमॉटेर्म??
>>कीतिर्कर, कदम यांनी सिव्हिल सर्जन, डॉक्टरांची भेट घेऊन
कीतिर्कर
>>राजकीय दबावाखाली पोस्टमॉटेर्म केल्यास खबरदार
पोस्टमॉटेर्म??
>>अखेर दुपारी तीनला पोस्टमॉटेर्म झालेच
पोस्टमॉटेर्म?
>>यावेळी चचेर्ला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी
चचेर्ला
>>गोळीबाराबरोबरच जैतापूरमधील उदेकामागे कुणाची
उदेकामागे?
>>सभागृहात गाजलेल्या या चचेर्त उद्योगमंत्री नारायण राणे यांनीही
चचेर्त
>>असा आरोप केंदीय पर्यावरण मंत्री
केंदीय??
गोष्टींवर की गोष्टीवर?
>>वानखेडेवर रंगणारी ही लढतीत गुरू व चेला
ही लढतीत?
आवरा
आहेत???
>>आताही अशीच परिस्थिती उद्भभवल्याने बोर्डाने कडक भूमिका घेत सर्व खेळाडूंना परतीचा आदेश दिला
उद्भभवल्याने? दोनदा भ?
>>कुमार संगक्काररकडे
दोनदा क व दोनदा र ?
रफाराच्या चुकांना वाचक कंटाळू नयेत म्हणून मटाने या आगळ्या वेगळ्या चुका केवळ वाचकांच्या आनंदासाठी आणल्या आहेत!
हाहाहा.. च्यायला मटालाच कंटाळलो आहोत आता !!
आशा करुया की संबंधितांना लवकरच अक्कल येईल !!!
stop this if u wanna read any language paper then go here
http://www.epapergallery.com/index.htm
all may not b there but maximum are available - all scanned - u can feel of reading the original copy of printed paper
note- when u click any title it opens in pop up so afterwards u can copy that in browser or can directly read from pop up
enjoy
म टा - महाराष्ट्राचं टाकावू दैनिक
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8132647.cms
मटा ने मोठ्या अभिमानाने सरकारवर टीका करत ही चूक दाखवलीय. पण वृत्तपत्रात छापायच्या आधी त्यांना ती चूक दर्शविण्याचे कष्ट घेतले नाहीत... तसेच्या तसे छापले. ;)
http://batmeedar.blogspot.com/2011/04/blog-post_4264.html
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8148208.cms >>गेली १० वषेर् सुरू असलेल्या या मोहिमेला
वषेर्
>>ओबामांच्या कारकिदीर्त यश मिळाल्याने
कारकिदीर्त??
>>पुढील वषीर् होणाऱ्या
वषीर् ??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8146969.cms >>कोणललाच थांगपत्ता लागू दिलेला नाही .
कोणललाच??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8148255.cms >>तालिबानने चचेर्स यावे
चचेर्स ?
>>साथ सोडून चचेर्साठी तयार व्हावे
चचेर्साठी ??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8138973.cms >>तिच्या प्रकृतीला अध्याप कोणताही त्रास जालेला नसून
अध्याप? बाप रे बाप
जालेला? मस्तच की
>>किरणोत्सारी पाणी तात्परत्या साठवण टाकीत
तात्परत्या?? बघा चुका करण्यात मटावाले किती तत्पर आहेत ते
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8147967.cms
>>दीनानाथ नाट्यगृहात झालेल्या समारंभात हा हे डंपर व मदतीचा निधी आनंदवनाच्या हवाली करण्यात आला.
हा हे? हा लिहावे हे की या विवंचनेत असणा-या पत्रकाराने दोन्ही शब्द लिहून आपली विवंचना संपवलेली दिसते.
>>नाटकाचे निर्माते दिलीप जाधव आणि निमिर्ती सावंत यांनी हा प्रयोग मोफत दिला.
निमिर्ती????
>>तसेच ५१हजारांची मदतीचा धनादेशही त्यांनी डॉ. विकास आमटे यांच्या हाती सुपूर्द करण्यात आला
५१हजारांची???
सुपूर्द की सुपूर्त??
सुपूर्द करण्यात आला? की केला? काय वाक्य रचना आनंदी आनंद गडे !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8206579.cms >>सोलापुरात व्यापा-यांच्या कडकडीत बंद
व्यापा-यांच्या??
so ur browser is not able to properly read that font
u ill need RAJANIKANT FONT to read ma ta correctly
so ur browser is not able to properly read that font >>>>
माझ्या घरी येणार वृत्तपत्राचा कागद पण तो फोन्ट नाही समजू शकत बहुतेक... येडच आहे... कोणाला माहित आहे का अशा कागदा साठी काय इन्स्टाल कराव लागेल! हे हे हे ... !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8254170.cms >>मुख्यमंत्री मायावती यांच्याशी घेतलेला हा पंग्यामुळे अखेर रात्री उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना अटक केली.
हा पंग्यामुळे???
च्यायला मटाशीच पंगा घेऊन दंगा करून झाला तरी त्यांना ढिम्म काही फरक पडत नाही.
खरोखरीच मटा आता फक्त पोराटोरांनी उकिडवं बसायला वापरायच्या लायकीचाच राहिलाय !!!!!!!!
धरण या शब्दाचा मला तरी पाणी अडवण्यासाठी बांधतात तो असा एकच अर्थ माहित आहे.
>>मायावती सरकारविरोधात शेतक-यां छेडलेल्या आंदोलनात
शेतक-यां?? निषाद लावायचे विसरले की काय !
>>ग्रेटर नोएडातील भट्टा पारसूल , भट्टा परसौलमधील घटना
पारसूल की परसौल एकदा काय ते ठरवा हो !
'विकिलिक्स' या संकेतस्थळाने गेला काही काळ अमेरिकी दूतावासांच्या हजारो तारांचा तपशील फोडून जगभर मोठा गदारोळ उठविला होता.
cables चे थेट भाषांतर? :)
घसरणीची भीतीने??
>>वाढत्या महागाईमुळे आथिर्क वाढीला
आथिर्क ??
>>'सेन्सेक्स' निदेर्शांक १८,६१०.०२
निदेर्शांक??
>>औद्योगिक उत्पादनाच्या निदेर्शांकाची आकडेवारी
निदेर्शांकाची
>>उत्पादन घटल्यास आथिर्क वाढ
आथिर्क ?
>>झाल्याचे ब्रोकरेज र्फम्सकडून
र्फम्सकडून??
आणि आता येत आहे मटाची आजवरची सर्वात जबराट चूक !
>>वाढत्या महागाईमुळे रिर्झव्ह बँकेला
रिर्झव्ह??????????????????????????
(मोठ्याने उच्चार करुन पाहू नये. परिणामास बझकार जबाबदार नाही. मटास पकडावे !)
(मोठ्याने उच्चार करुन पाहू नये. परिणामास बझकार जबाबदार नाही. मटास पकडावे !).... LOL
>>'नभ मेघांनी आक्रमिले'... अशी स्थिती असतानाही रसिकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद पाहून ठाण्यातील भारतीय इनोव्हेशन्सच्या 'द स्वरा शो'च्या पहिल्याच आवर्तनाला उत्तम प्रतिसाद लाभला.
नक्की काय म्हणायचंय??? च्यायला चांगल्या बातमीचीही वाट लावून टाकतात $%^$%&^
>> आसिफ बलवा आणि राजीव अगरवाल हे कुसेगाव फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक असून शाहिद बलवाचे त्या कंपनीचा एक भागिदार होती.
या वाक्याचा अर्थ समजावून सांगणार्या व्यक्तीस मटा आयुष्यभर मोफत देण्यात येईल !!!!! ;)
त्या व्यक्तीस आयुष्यभर मटोनेअर मोफत देण्यात येईल.
फार म्हणजे फार भारी.. व्याकरणाची विविध रूपे एकाच वाक्यात समजावून सांगण्याची हातोटी फक्त मटाकडे आहे! :D
जबरी पोस्ट होईल.. हे असंच जरी ब्लॉग वर टाकलं तरी एक परीपुर्ण पोस्ट होऊ शकते. लोकांनाही समजेल मटा किती महा टाकाऊ पेपर आहे ते..
बातमी आणि जुना संदर्भ बरोबर असला तरी ह्यांचाही थांबा चुकला ;)
लोकलने चुकवला स्टेशनचा थांबा! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8564414.cms
ह्या बातमीत जरी सेवाग्राम एक्स्प्रेसने भांडुपचा थांबा चुकवल्याची घटना ताजी असताना
असे म्हटले आहे तरी मूळ थांबा 'ठाणे' आहे.
त्यांनी स्वतःचीच बातमी नीट वाचली नाही :)
'सेवाग्राम' विसरली ठाण्याचा थांबा! http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8157498.cms
मिझुरी शहर केव्हा पासून झालं?
>>कन्सास, मिसौरी, डल्लास, टोपेका आणि विचिता, ओक्लाहोमा शहर व टुल्सा या शहरांनाही धोक्याचा इशारा दिला आहे.
सब घोडे बारा टक्के. स्टेट असो वा शहर सगळ्यांना शहर बनवून टाकले आहे. उच्चार तर कसले भारी कन्सास डल्लास मिसौरी ! आय हाय क्या बात है ।
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=159303:2011-05-25-19-25-56&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी केंद्राच्या अतिरिक्त साह्य निधीतील उर्वरित रक्कम रोखण्यात आली आहे, असे केंद्रीय नगरविकास राज्यमंत्री सौगत राय यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्राद्वारे कळविले आहे.
>>http://72.78.249.107/esakal/20110526/4698720559456139118.htm
जनतेला आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याचा उद्दिष्ट.
महारा÷ट्रातून केंद्रात आल्यानंतर
करा गणित करा ८७०००*४५ =३९,१५,००० चाळीस लाख म्हणजे काही चार कोटी नव्हे. मटावाले गणितात पण नापास !
या प्रकाराबाबत अनेक ग्राहकांनी मोबाईल कंपन्यांच्या कारभारात सुधारणा झालेला दिसत नाही
http://www.esakal.com/esakal/20110627/4840611939287415951.htm
याआधी रविवारी ( २६ जुलै २०११ ) जुन्या मुंबई-पुणे हायवे जवळ असलेल्या माऊंट व्ह्यू रिसॉर्टवर रेव्ह पार्टी सुरू झाली
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9015086.cms
तसंच हे वाक्य :-
"पार्टीत सहभागी झालेल्या २३१ तरुण आणि ५९ तरुणींना रक्ताचे नमुने घेऊन सोडून देण्यात आले आहे आणि बाकीच्यांना ताब्यात ठेवण्यात आले आहे. पार्टीत तब्बल ३०० जण सहभागी झाले होते."
२३१+५९=३००
मग बाकी किती राहिले ज्यांना सॊडून देण्यात आले??
मजास? मटाला काही बोलण्याची आहे कुणाची मिजास?
>>सदस्य शक्यतो त्या परिसरातीलच असाव्यात असे म्हटले आहे
असाव्यात ? जिमखाने बहुदा स्त्रियांसाठीच असतात असा मटासमज दिसतो !
प्रिंट साइज, पिक्सेल्स आणि रेजोल्युशनची आदर्श संख्या पुढे दिली आहे
पुढे काही दिलेच नाही :D
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=166687:2011-06-27-17-37-15&catid=357:tech-&Itemid=360
खरंच किती स्पर्धात्मक युग आहे !! प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे ;)
खरंच किती स्पर्धात्मक युग आहे lol...:)
http://www.esakal.com/esakal/20110629/4875771229316500457.htm
>>श्री. मुंडे यांनी नाराजीचा विस्फोट केल्यानंतर
विस्फोट??सकाळ वाल्यांसाठी हिंदी मराठी भेदाभेद भ्रम अमंगळ !
शहरात "फटक्या", मोकाट कुत्र्यांचा सध्या
लोकांना "चाऊन" ?? !!
ठोस निर्णय "कांही" झाला नाही.
>>कारवाई दरम्यान पोलिसांकडून कोणतीही अनुसूचित घटना घडलेली नाही
अनुसूचित?
अनुचित लिहिता लिहिता, सू का आठवे ईसकाळा?
>> उत्तम इंग्रजी लिहिण्यात, फाडफाड इंग्रजी बोलण्यात आणि अस्खलित वाचण्यात कोकणी आणि मल्याळी मुलांचा पहिला नंबर असल्याचं प्रमाणपत्र एका नामवंत संस्थेनं दिलंय. त्यामुळे मराठी मुलांच्या इंग्लिश स्पीकिंगची थट्टा करणा-या विद्वानांची बोलती बंद होणार आहे.
मटाबाबाने कोकणी आणि मल्ल्याळी मुलांना आपलसं केलं..!!!!!!!!!!!!!!!!!
कोकणी आणि मल्ल्याळी मुलांचा पहिला नंबर आल्याने मराठी मुलांच्या इंग्लिश स्पीकिंगची थट्टा करणा-या विद्वानांची बोलती बंद होणार आहे. !!!!! आवराच !!
हसन अलीचा जामीन मंजूर !!
मटाबाबाने ध चा मा केला.. अली चा नाही रे गधड्यांनो की अली ला !!
मटा (पत्र नव्हे चावट मित्रा) चा राष्ट्रीय दर्जा वृत्तपत्रिकेत नव्हे तर आता पॉर्न फोटो पहिल्यापानावर झळकवण्यामध्ये आहे.
>>>अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल यांनी पोलिसांच्या ताब्यात घेतले !
यांनी ???? पोलिसांच्या???
>>>स्वत : आजारी असलेले शम्मी कपूर मोठ्या भावाला अखेरचा निरोप देण्यासाठी बाणगंगेपाशी पोहोचले???
हे लोक बातमी छापण्याआधी एकदाही परत वाचून बघत नाही का ....
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अण्णा हजारे यांना अखेर अटक दाखवण्यात आली ।
फोटोग्राफी दिनानिमित्त त्यांनी फोन करुन आर्टिकल मागवून घेतले. एकतर कालच्या फोटोग्राफी दिनाऐवजी आज छापले. आणि तेही अर्धेच ?
http://farm7.static.flickr.com/6208/6061348849_b0bc485c22_b.jpg
अण्णा आंदोलनावर काँग्रेस काढणार पुस्तिका
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9678802.cms
http://72.78.249.107/esakal/20110821/5175527618985770046.htm
मालिका स्टार वरुन सोनी वर आली म्हणून गेल्या वर्षी शंका येणे स्वाभाविक आहे किंवा प्रतिसाद नसला तर शंका येऊ शकते. पण भरभरून प्रतिसाद दिल्यावर शंका कसली?
मच्चिमार !!!!!!!!!!!!! सर्वोच्च आवरा !!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9849278.cms
http://www.esakal.com/esakal/20110903/4825861050317802022.htm
महिमेवर????? अरे ती काय चौधर्यांची महिमा आहे का?
महिम्यावर म्हणा रे मूर्खांनो.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9878879.cms
>>आंध्र प्रदेशातून सर्वात जास्त म्हणजे वर्षाला १ लाक विद्यार्थी निवडले जातात. त्या खालोखाल तमिळनाडूचा (१.८ लाक विद्यार्थी) क्रमांक लागतो.
- लाक????
- १.८ मोठे की १ लाख?? ..... मट्या म्हणतोय म्हणजे नक्कीच १ लाख मोठे असणार !!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/9878756.cms >>टँकरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत ५ जण ठार झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ५ जणांचे मृतदेह हाती लागले असून.....
पाच जण ठार झाल्याची भीती आणि पुढच्याच वाक्यात ५ मृतदेह हाती लागले? स्वत: लिहिलेली बातमी हे वाचून पाहतात का हाच प्रश्न आहे.
ही भावंडं राज यांच्या विनंतीला??? राज कशाला विनंती करेल. मटातील बटाट्यांनो जागे व्हा.
दोन ग्रॅमपेक्षा कमी कोकेन खरेदी केलंत तर शिक्षा भोगायला तयार रहा !!!! :P :P :P
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10232563.cms
>> दोन ग्रॅमपेक्षा कमी कोकेन खरेदी केल्याप्रकरणी सिनेस्टार फरदीन खान याला अमली पदार्थ विरोधी विभागाच्या विशेष कोर्टाने दोषी ठरवले.
>>अमली पदार्थ कायद्यानुसार, दोन ग्रॅमपेक्षा कमी कोकेन खरेदी करण्यासाठी जास्तीत जास्त सहा महिन्यांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितरित्या देण्याची तरतूद आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10366500.cms
अण्णा हजारे आज, रविवारपासून आत्मशांतीसाठी राळेगणसिद्धी येथे आठवडाभर मौनव्रत करणार आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10371919.cms
आठवडा = बेमुदत?
काल रात्री मटा वर बेमुदत अशी बातमी होती. पण त्याच वेळी सकाळ वर आठवडाभर अशी बातमी होती.
नकाल? नाकाला? की नकार??
.
.
.
ओह अच्छा अच्छा.. नि काल
शीर्षकः लिबियाचे राष्ट्रपती कर्नल गद्दाफी ठार
बातमी: लिबियाचे राष्ट्रपती मुहम्मर गद्दाफी यांना जखमी अवस्थेत अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10429087.cms
जळगावात पारा ८५ अंशावर - http://tinyurl.com/6oyveh3
( ह्याची भरपाई करायला पुढील वेळी बहुधा फक्त टिंब टिंब च लिहितील ;) )
अॅपल , आयफोन , सिंमबियन , जावा अशा सगळ्याच प्लॅटफॉर्मवर हे वापरता येऊ शकते.
अॅपल व आयफोन हे वेगवेगळे आहेत का?
Perfect... इफेक्ट सही, साईड-इफेक्ट नहीं...
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10925186.cms
मटाच्या मायला !!!!! हॉकीमधे मटाच्या बापाने तरी कधी 'मोहरे' टिपले आहेत का??
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10940403.cms
फेकिंग न्यूज - अगर वॉल मार्ट को पता लग जाए कि उसे 'विदेशी किराना दुकान' कहा जा रहा है तो शायद वो खुद ही भारत आने से मना कर दे!
;-)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10984685.cms
>>>महाबाळेश्वर-पोलिस जीप मध्ये बसायचे- फिल्ममध्ये बसलो-
ओढों पे एसी बात चली आये- वैजयंती माला बरोबर डान्स- गाणे फेमस होईल, एक पोस्टपोन - डंबरू घेऊन एंट्री मारलो. कुणालाच माहिती नाही. व्ही आनंद यांना सांगितले., कुछभी कर- मुझे नाचना है-
महाबाळेश्वरमध्ये असताना- हुरहुन्नरी- जिंदादील माणूस- झोपलेलो- आजारी आहे, हे आवडायचे नाही.
मुंबईत एका मित्राकडे ओळख झाली होती. २००७ महाबाळेश्वर पोस्टिंग झाली. १९८६-८७ मध्ये ओळख झाली होती. महाबाळेश्वर घरचे रिलेशन झाले आहे. <<<
अरे ए आवरा रे आवरा !!!!!!!!!!!!
"गाणी"????
* तसेच अनेक फोटोही त्यांनी पोलिस बसून काढले . " पोलिस बसून"???
:-
hey friends
stop this if u wanna read any language paper then go here
http://www.epapergallery.com/index.htm
all may not b there but maximum are available - all scanned /epaper - u can feel of reading the original copy of printed paper
note- when u click any title it opens in pop up so afterwards u can copy that in browser or can directly read from pop up
enjoy
म टा - महाराष्ट्राचं टाकावू दैनिक
ajun ek great baatami !
http://hindi.fakingnews.com/2011/12/pak-demands-indian-leader-in-lieu-of-monkey/
एकवचनी/अनेकवचनी, स्त्रीलिंगी/पुल्लिंगी गोंधळ?
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11013413.cms
मायला बातमीचं शीर्षक वाचून हडबडलो एकदम...तसं सवय आहे म्हणा.. तरी ;-)
-------------------------------------------------------------------
अरे आपला बझ वाचला तर मला आवाहन ही क्षम्य चूक वाटून राहिली बघ....तू इतका का चिडतोस पण?? म्हणजे अजून तू वर्तमानपत्रातलं मराठी वाचतोस??? धन्य..तुलाच नमस्कार करतील सगळी लोकं..पूर्वी ते अमृत (mostly) मध्ये "उपसंपादकाच्या डुलक्या" यायचं आठवतंय का? सध्या ते सदर बंद करून संपूर्ण वर्तमानपत्रच दिलं जातंय अशी एक खात्रीलायक बातमी आहे... :D :P :D
ReplyDeleteअवांतर... हे वाचून मला बझच्या आठवणीने नॉस्टॅल्जिक व्हायला होतंय...:(
हाहाहा खरंय.. बझ वाचून मलाही 'आवाहन' फार सामान्य वाटायला लागलं !! पण तरीही एक मोठा फरक आहेच. आधीच्या चुका सामान्य बातम्यांमध्ये होत्या. पण ही चूक चक्क थेट संपादकीयात आहे.
Delete>> सध्या ते सदर बंद करून संपूर्ण वर्तमानपत्रच दिलं जातंय
हाहाहा.. अगदी अगदी..
>> हे वाचून मला बझच्या आठवणीने नॉस्टॅल्जिक व्हायला होतंय
हो ना.. फेबु असो की जीप्लस.. बझची सर कोणालाच नाही !!
या आणि अशा चुका किती जणांच्या लक्षात येतात आणि किती जणांना त्याबद्दल कळकळीने काही म्हणावंसं वाटतं हासुद्धा एक ‘विषयच' आहे!
ReplyDeleteआणि इंटरनेटवर लिहिताय म्हंटल्यावर कोण विचारतंय शुद्धलेखनाबद्दल? लिहिताय होय? लिहा ना... पोटभर आणि अशुद्ध; कितीही! फक्त म.टा. नव्हे... सकाळ, क्वचित लोकसत्ताही. वाचताना कित्येक वाक्यांत खडा लागल्यासारखे शब्द लागतात, चिडचिड होते... आता मी कळवायला लागले आहे ते लेख लिहिणाऱ्यांना. मला हेच कळत नाही की चूक झाल्याचं त्यांचं त्यांना तरी कळत असतं का? हा निष्काळजीपणा की अज्ञान??
वाह! कोणीतरी याबद्दल लिहिलं, फार बरं वाटलं! :)
धन्यवाद अर्निका.. खरंय.. सध्या वर्तमानपत्रं, टीव्ही, जाहिराती, सिरियल्स इ इ मधलं मराठी वाचून/ऐकून संबंधितांना उलटं टांगून त्यांच्या अशुद्ध मराठीची धुरी त्यांच्याच नाकात द्यावीशी वाटते !! खरंच फार चीडचीड होते.. सुदैवाने ब्लॉग आहे हाताशी :)
Deleteआयचा घोव मटाच्या... शंभरी भरली राव... :D
ReplyDeleteमी आजपर्यंत चुकीचे मराठी 'शिकालो' ह्याचा मला 'साक्षत्कार' झाला.
छ्या रे.. दुर्दैवाने मटाची शंभरी कधीच भरणार नाही. त्यांचे भांडवलदार आहेत त्यांना पैसे पुरवायला आणि त्यांना हवं ते छापून घ्यायला :(
Deleteहोय.. आपण सग्ळेच अतीचशय चूकिचि मर्हाटी शीक्लो हाओत.. !
" हा व्रूत्तपर्तीय स्वातंत्रावर घाला आहे.आम्हाला तूम्ही निपक्शपणे लिहू देत नाही.. तुमचावर दाव ठोकण्यात येईल. "
ReplyDeleteबझ्झचे दिवस आठवले. नॉस्टल्जिया.. आणि तू अजूनही त्याच उत्साहाने मटा वाचत असल्याचे(चुका काढत असल्याचे) पाहून डोळे पाणावले. मी कधीचेच हात टेकलेत.
त्यांना पत्राद्वारे ’आव्हान’ करूनही काही फ़ायदा होत नाही. :D
खरंय संकेत.. लवकरच माझा ब्लॉग बंद पडणार आहे बहुतेक ;) लोस आणि मटा दोघांशीही पंगे घेतलेत ;) असो.. हु केअर्स?
Deleteबझचे दिवस ग्रेट होते बॉस !! आपल्या सगळ्यांच्या मैत्रीचा बेस :)
मटा वाचनाच्या मनोरंजनमुल्याची तुला कल्पना दिसत नाही. अरे फुल टाईमपास होतो. मटा.. महाराष्ट्राचं टाकाऊ दैनिक !
hehehehe..
ReplyDeleteshuddhh-lekanaache classes ghetale pahijet ya lokan sathi
धन्यवाद योगिनी..
Deleteअग क्लास घेणारा स्वतःचं व्याकरण विसरेल दोन तासात. ;)
प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा !
पूर्वी कुठेसं संपादकाच्या डुलक्या नावाचं सदर असायचं .. पण एवढ्या चुका पाहून तर संपादक डुलक्या खातोय कि काहीसं पिऊन डुलतोय असा संभ्रम होऊ लागला आहे..
ReplyDeleteमला तर वाटतं मटावाल्यांना फक्त पान ३ चे फोटो बारकाईने पहायच्या सूचना असाव्यात :-)
मला तर वाटतं मटावाल्यांना फक्त पान ३ चे फोटो बारकाईने पहायच्या सूचना असाव्यात :-) >> उगीच नाही त्यांना मटाबाबा डॉट कॉम म्हणत.. हा लेख या बाबतीत पुरेसा बोलका आहे...
Deletehttp://goo.gl/nbKFq
हो निरंजन.. अमृत मध्ये असायचं ते सदर. (अपर्णाच्या कमेंटमुळे मला कळलं ते) :)
Delete>> मला तर वाटतं मटावाल्यांना फक्त पान ३ चे फोटो बारकाईने पहायच्या सूचना असाव्यात :-)
खरंय.. पान तीनपुढे त्यांना इतर बातम्यांचं महत्व शून्य आहे जवळपास ! आणि दुर्दैव म्हणजे त्यांना वाटतं वाचकही पण-३ वाचण्यासाठीच मटा वाचतात !!!!
पियु, खरंय.. काकांचा लेख बेस्ट आहे. मागे एकदा मटाच्या संपादकांना मीही पत्र पाठवलं होतं या बद्दल.. परिणाम शून्य !
दोन अवांतर कमेंट्स:
ReplyDelete१. बझ्झ्च्या आठवणीने खरंच डोळे पाणावले.
२. इतर भाषांमधील वृत्तपत्रात पण अश्या चुका होत असतील का? आणि तेही असं चुकीचं व्याकरण सहन करत असतील का??
१. +१
Delete२. इतर भाषांमधले ब्लॉग्ज शोधावे लागतील ;)
लैच... हे ब्येस केलंस बघ. :) :)
ReplyDeleteअण्णा, तुम्हीच कधीपासून मागे लागला होतात ना :) आज 'संपादकांच्या आवाहनाने' मी ती संधी साधून घेतली ;)
Deleteह ह पु वा.....
ReplyDeleteलोटपोट
हेहेहे.. धन्यवाद श्रद्धा..
Deleteब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.
'आलिया भोगासी'च्या पुढची अवस्था आहे ही :-(
ReplyDeleteखरंच. वाचकांच्या नाशिबीचे भोग कधी संपणार आहेत देव जाणे !
Deleteसमस्या ही नाहीये की ते चुका करताहेत.. समस्या ही आहे की सर्वांनी कानीकपाळी ओरडून सांगूनही ते हे गांभीर्याने घेत नाहीयेत..
ReplyDeleteअसो.. जसा तू ही अजून वाचतोच आहेस तसाच मीही अजून मटा वाचतोच.. त्यांनी कितीही एकांगी अन अशुद्धलेखनयुक्त अग्रलेख लिहिले तरीही..
मराठी भाषेत बर्यापैकी अद्यतनित होणार्या बहुतेक एकमेव वृत्तपत्राच्या संस्थळाला प्रोत्साहन देण्यासाठी तरी... :)
अगदी अगदी बाबा.. त्यांना अक्षरशः काही एक पडली नाहीये.. मला त्या 'KONY 2012' सारखं 'मटा २०१२' सुरु करावंसं वाटतंय.. या वर्षभरात सुधारा नाहीतर बंद करा !!
Deleteअरे असे तेवीसशे साठ बझ्झ लिहले तरी ते सुधारणार नाहीत.
ReplyDeleteआपण पण नां मॅडच आहे झालं :D
खरंय. दहा गुणिले दहा भागिले शंभर म्हणजे आपण एकच मॅड !
Deleteजवळपास १०-११ वर्षांपूर्वी दैनिक लोकसत्ताच्या पहिल्या पानावर खाली उजव्या कोपऱ्यात जवळपास चतुर्थांश पान कुठल्यातरी पावडरची जाहिरात आली होती. जरा जास्तच ठळक अक्षरात "धाम येतो आहे का?" असा प्रश्न विचारला होता. माझ्या काकाने लोकसत्ताला फोन केला तेव्हा तिथल्या माणसाने थातुरमातुर उत्तर दिलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत मी छापील आणि इ-पेपर कधीच इतका सिरीअसली वाचला नाहीये. हे सगळं वाचल्यावर तर वाटतंय की 'अज्ञानात सुख असतं' तसं 'बेफिकीरीत सुख असतं'.. 'वृत्तपत्रीय' लिखाण 'शासतरशुद्ध' असावं म्हणून 'प्रयतन-शील ' असणाऱ्या सर्व लोकांना 'शुभेच्चा'!
ReplyDeleteहाहाहाहा !!! "धाम येतो आहे का?" !! कसलं भयंकर वाक्य आहे !
Deleteअरे मीही सिरीयसली वाचत नाही. निव्वळ फुकटचं मनोरंजन म्हणूनच वाचायचं.. पण संपादकीयात इतकी मोठ्ठी अर्थ बदलून टाकणारी चूक पाहिल्यावर डोकं फिरलं नुसतं !
वृत्तपत्रीय लेखन मी 'असं' कधीच वाचल नव्हत आणि कधी लक्षात आलंच तर दुर्लक्ष केल आहे. ( लोकसत्ताबद्दल बोलते आहे )
ReplyDeleteअज्ञानातील सुख!-(मी म. टा. वाचत नाही.)
तुमच्या प्रयत्नांना शुभेच्छा!!
हाहा.. होय हे वेगळ्याच प्रकारचं वृत्तपत्रीय लिखाण आहे ;)
Deleteलोस काय आणि मटा काय सगळे एकाच अशुद्धलेखनाच्या माळेचे मणी !
http://epaper.loksatta.com/36400/indian-express/06-05-2012#page/29/2
Deleteरविवार वृत्तांत लोकसत्ता! ६ मे २०१२
नित्कृष्ट नाट्यगृहे!!! ;)
नित्कृष्ट सॉरी.. निकृष्ट लोकसत्ता !!
Delete:)
Deleteधन्यवाद मान्यवर... जर तुमच्या ठायी असामान्य धैर्य असेल तर शेवटपर्यंत वाचा.. 'रुपा यांचा' हे काहीच वाटणार नाही !
ReplyDeleteतुमचा लेख पूर्वीच वाचला आहे. प्रतिक्रियाही दिली आहे.
वर म्हटल्याप्रमाणे हे असलं तिरपागडं मराठी वाचून/ऐकून संबंधितांना उलटं टांगून त्यांच्या अशुद्ध मराठीची धुरी त्यांच्याच नाकात द्यावीशी वाटते..