Thursday, April 26, 2012

सफरचंदी डोळा-वहीची प्रथमा

प्रत्येकाला आपला ब्लॉग आणि त्यावरची प्रत्येक पोस्ट ही अतिशय आवडती, महत्वाची वगैरे असते. अर्थात काही वेळा ती आवडती, काही वेळा महत्वाची तर काही वेळा किंबहुना कित्येकदा दोन्ही असते.... कसलं फालतू वाक्य आहे नाही हे?

ही 'कंपोस्ट' वाटू नये म्हणून जरा पाणी घालून वाढवतोय इतकंच. कारण छोटी असली तरी ही कंपोस्ट नाही. पोस्ट छोटी असण्याचं कारण वेगळं आहे. आणि पुरेसं तेल वाहून गेल्यावर नमन संपून प्रयोग सुरु होईल हेही चतुर चाणाक्ष इ इ वाचकांनी ओळखलंच असेल.

लोक शंभरावी, दोनशेवी, पाचशेवी पोस्ट किंवा मग दोन लाख, पाच लाख, दहा लाख वाचक वाली पोस्ट लिहितात परंतु आमच्या शब्द-असामर्थ्यामुळे तसे टप्पे गाठायचे म्हणजे आम्हास वर्षानुवर्षं थांबावं लागेल. असो.

घडा भरला.... मुद्दा सुरु....

तर ही पोस्ट माझ्या दृष्टीने महत्वाची अशासाठी की ही नव्याकोऱ्या 'सफरचंदी डोळा-वही' वरून लिहिलेली प्रथमा आहे. नव्याकोऱ्या अ‍ॅपल आय-पॅड वरून लिहिलेली पहिली पोस्ट... !!!! आणि कदाचित (नाही. नक्कीच) शेवटचीही. लय यळ लागला राव. आता कळलं ना छोटी का आहे पोस्ट ते? ;)

पण ते काय ते म्हणतात ना की आय-पॅड वापरण्यापेक्षा मिरवण्यासाठीच घेतला जातो.... त्यामुळे महत्वाची असो वा नसो, आवडती असो वा नसो (अर्थात माझ्यासाठी दोन्ही आहे म्हणा) पण तो आय-पॅडवाला नियम सिद्ध करण्यासाठी म्हणून काढलेली मिरवणूक म्हणा हवं तर. किंवा मग "जनातलं म्हणता म्हणता मनातलं लिहिणाऱ्या आणि स्वतःच्या आणि स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणाऱ्या" मराठी ब्लॉगरची पोस्ट म्हणा. ;)... कारण केवळ मराठी ब्लॉगर असल्यानेच नवीन आय-पॅड घेतल्याची पोस्ट ब्लॉगवर टाकू शकतोय. (काहीही चालतं आपल्या ब्लॉगवर)

 जय ब्लॉगिंग... जय आय-पॅड.... !!!!

54 comments:

  1. अभिनंदन.. अन दगडफेक करवून घ्यायची नसेल तर ब्लॉग लिहिणं सुरू ठेव.. ही धमकी आहे :D

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पंत, सुपरफास्ट कमेंटबद्दल सुपरलॉट धन्यवाद :)

      दगडफेक... धमकी... !!! हैद्राबाद सध्या अस्थिर आहे हे ऐकून होतो.. आता पटलं ;)

      Delete
  2. हेरंब,
    आयपँड खरेदी साठी तुला हार्दिक शुभेच्छा!

    (अँपल विरोधक/अँड्रोइड समर्थक) निरंजन :)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. धन्यवाद निरंजन.. पुणेरी पाटीबद्दलही धन्यवाद ;) (हघे)

      अरे मीही अ‍ॅपलचा चाहता वगैरे नाहीये. किंबहुना विरोधकच आहे. पॉड-फोन काही नाहीये माझ्याकडे. पण पॅड जामच आवडला. सहीये एकदम.

      Delete
  3. आय-पॅड वापरण्यापेक्षा मिरवण्यासाठीच घेतला जातो.

    >> तुझं मिरवून झालं की इकडे पाठव. फोटू लई भारी दिसतात म्हणे त्याच्यावर. मीही पाहून घेतो.

    ReplyDelete
    Replies
    1. एवढ्यात नाही होणार मिरवून... आत्ताशी तर सुरुवात केलीये रे :)

      Delete
  4. अभिनंदन !! अभिनंदन ! :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्स अनघा.. मला वाटलं तू म्हणशील (सेमी)सेम पिंच ;)

      Delete
  5. आय ला .. सही आहे.... हाबिणंदण :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. आय ला... हाहाहाहाहा..

      धन्स अण्णा..

      Delete
  6. An Apple Post a Day...
    Keeps FB, G+ Away...

    गुरुदेवांचा आदर्श घ्या आणि (हाफिसात अप्सरा नसली तरी) रोजच्या रोज पोस्ट लिवा राव :D

    ReplyDelete
    Replies
    1. >> An Apple Post a Day...
      Keeps FB, G+ Away...

      महान !! :))

      गुरुदेव एके काळी रोज लिहायचे रे.. आता बोंब आहे.. पण खरंय वाढवल्या पाहिजेत पोस्टा :)

      Delete
  7. हे चित्रही आजच दिसायचे होते का?

    https://www.facebook.com/photo.php?fbid=368425939860948&set=a.192504010786476.36956.145950418775169&type=1&theater

    ReplyDelete
    Replies
    1. अरे मी पक्का मुंबईकर आहे.. त्यामुळे कोणी आय-पॅडला एक भिकार म्हणालं तर मी दहा भिकार म्हणून मोकळा होतो ;)

      Delete
  8. लईच राव..
    अन शेवटची का बाबा?? कर की तो आय-पॅड पुरता वसूल! ;)

    ReplyDelete
    Replies
    1. अरे शेवटची यासाठी की ते मराठी अ‍ॅप वापरून पोस्ट लिहायला खूप वेळ लागतो. त्यामुळे आय-पॅड वरून पोस्ट टाकणं अवघड दिसतंय.

      Delete
  9. :D :D :D loulyyy.... abh-iNandan :D

    ReplyDelete
  10. चला म्हणजे मेळाव्यात केलेलं मार्केटिंग मार्गी लागल तर....चल आता तुझ्याशी बोलताना Apple to apple वाटेल....:)
    रच्याक आताच बघते तुझ्याच ब्लॉगवर २०१० मध्ये ११० आकडा दिसतोय मला..आणि काय वरती गमजा मारून राहिलास रे?? लिहिता हो लगोलग सत्यवाना....... :)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. यप्प.. आय-पॅड २ नवीन आला तेव्हापासून डोक्यात घोळत होतं ते वर्षभरानंतर आय-पॅड ३ आल्यावर प्रत्यक्षात आलं :)

      >> चल आता तुझ्याशी बोलताना Apple to apple वाटेल....:)

      अगदी अगदी.. २०१० मध्ये ११० होता आकडा?? बाब्बो. कोण लिहायचं एवढं? ;)

      Delete
  11. हेरंबा, हे काय बरं नाही राव.
    बाकी सफरचंद डोळा वही साठी अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रद्धा. नक्की काय बरं नाही ते कळलं नाही..

      असो. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.

      Delete
  12. ' सफरचंदी डोळा-वही ' - हा शब्द प्रयोग भावला

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा अमोल.. ते आपलं असंच उगाच टीपी.

      Delete
  13. शेवटचा पॅरा दणदणीत..
    हाबिणंदण ;)

    ReplyDelete
    Replies
    1. हेहेहे.. धन्स विशाल.. 'तो' हँगओव्हर उतरायला थोडा वेळ लागेल ;)

      Delete
  14. तुम्ही गेलात सफरचंदाच्या मांडवाखालून !!! :)

    ReplyDelete
    Replies
    1. >> सफरचंदाच्या मांडवाखालून

      हाहाहा.. लोळतोय.. :))))

      धन्यवाद.

      Delete
  15. अभिनंदन...!
    BTW या डोळा वही, डोळा वोही स्पर्श (iPod Touch) यावर मराठी टायपिंग कसं करतात तेच माहित नाहीये मला..तुम्ही काय केलंत?

    ReplyDelete
  16. धन्यवाद चैतन्य.

    अरे मराठी टायपिंग साठी एक अ‍ॅप आहे.. इथून डालो करून घे.

    http://bit.ly/gsbUhe

    ReplyDelete
    Replies
    1. मिळालं..सहीच..!!! आता मी पण एकदातरी डोळा वहीत ब्लॉगून बघतो...\m/

      Delete
    2. अरे वा.. गुड.. वापरून बघ..

      Delete
  17. मघाशी पत्र सेन्ट फ्रॉम आयपॅड आलं तेव्हांच वळखलं व्हतं म्या... :) चला आता आपल्या तिघांनांही खेळता येईल की. बाकी ब्लॉग आपलाच म्हटल्यावर.... :D:D...

    जय ब्लॉगिंग... जय आय-पॅड.... !!!!

    ReplyDelete
    Replies
    1. हेहेहे.. हो.. धम्माल येईल अ‍ॅपलवरून कॉन्फ करायला :)

      जय ब्लॉगिंग... जय आय-पॅड.... !!!!

      Delete
  18. सिद्ध्या काय रे, ती माझी कमेन्ट होती.. ;)
    हेरंबा, सकाळी ती तुझ्या ब्लॉगवर पब्लिश झालीच नाही.आमच्या गरीबाच्या डेल वरुन दिली होती रे .. ;)

    Anywayz Some modifiction to siddhu's comment.

    Now write a post everyday or pass that Apple to long away...

    you know my address.. ;)

    Congo Bhavaa :)

    ReplyDelete
    Replies
    1. हो रे.. काहीतरी गडबड झाली. मला मेल आलं पण कमेंट पब्लिशच नाही झाली. नियमित पोस्टलो नाही तरी आयपॅड कुठेही पासबिस केला जाणार नाही याची कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी ;)

      धन्यवाद भावा..

      Delete
  19. अभिनंदन.. "आय पॅड वर पुन्हा पोस्ट टाकणं कठीण दिसतंय" मग कशाला वापरतोस ? दे पाठवून इथे, मी वापरीन मराठी पोस्टायला..

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. अहो पोस्ट वाचायला, फेबु सर्फायला, घमेलं चेक करायला उपयोग होतोय की ;)

      Delete
  20. म्हणजे आता तू पण लै भारी... :D

    ReplyDelete
    Replies
    1. वितीन (V 3.0) नाव प्रथमच ऐकले. नितीन ऐकले होते ह्याआधी. :P प्रचंड आवरा. :D

      Delete
    2. वितीन... महाप्रचंड आवरा !!

      Delete
  21. सतरंगी सफ़रचंदी डोळे वाल्यांच हार्दिक हाबिणंदण.

    भावा पार्टी :) :) :)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भावा.. एकदा भेटलो की भरपूर पार्ट्या करू.. भरपूर ड्यू आहेत.. (दोन्हीकडून) .. "एकदा तुम्हाला आम्हाला पार्टी द्यायचीये" ;)

      Delete
  22. Replies
    1. हाहाहा.. धन्यक्स नागेश ;)

      Delete
  23. अभिनंदन!
    आणि आभार्स सफरचंदी डोळे मिरवताना सामील करून घेतल्याबद्दल!

    ReplyDelete
  24. धन्यवाद पल्लवी :)

    ReplyDelete
  25. अभिनंदन मितरा (मित्रा) आवाहन (आव्हान) स्वीकारत रहा
    खुप च मस्त लिहितोस

    ReplyDelete
  26. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...