Sunday, May 13, 2012

च्यायला, हेही पत्रकार झाले !!



माननीय गिरीश सर,

ताकाला जाऊन भांडं लपवण्यात किंवा लपवलेलं भांडं तासभर इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर हळूच बाहेर काढण्यावर माझा विश्वास नाही. त्यामुळे पहिल्याच ओळीत सुरुवात करतो. सध्या लोकसत्तामध्ये 'वाचावे नेटके' नावाच्या एका सुमार सदराला संपादकीय पानावर स्थान मिळत आहे. लोकसत्ताची मतं पटत नसूनही मी अनेक वर्षं लोकसत्ता नियमित वाचतोय. परंतु मतं पटत नसली तरीही लोकसत्ता/संपादक इत्यादींवर वैयक्तिक चिखलफेक करणे वगैरे बालिश भानगडीत मी कधीच पडलेलो नाही. जेव्हा जेव्हा तीव्र मतभेद झाले तेव्हा तेव्हा त्या त्या बातमीच्या खाली मी माझी प्रतिक्रिया नोंदवली आहे. (छापणे-न छापणे लोकसत्ताच्या (तथाकथित) पॉलिसीवर अवलंबून..). जेव्हा असंवेदनशीलपणाचा कहर होतो आहे असं वाटलं (उदा दिनांक १५ जुलै२०११ चं चिदंबरम यांच्यावर लिहिलेलं अन्वयार्थ.) तेव्हा मी स्वतः तुम्हाला इमेल करून माझा तीव्र निषेध नोंदवला आहे. 

हे सगळं एवढ्या सविस्तरपणे मांडायचं कारण इतकंच की माझं भांडं स्वच्छ आहे परंतु वेळोवेळी लोकसत्ता उर्फ 'वाचावे नेटके' च्या नासलेल्या ताकाने ते खराब होतंय हे दाखवणं. लोकसत्तासारख्या आघाडीच्या (निदान मुंबईत तरी.) दैनिकाला ब्लॉगरांवर सदर लिहितोय असं दाखवून उगाच त्यांना टपल्या मारत सुटणे, अपमानास्पद बोलणे, टोमणे मारणे, वैयक्तिक हल्ले करणे, डिवचणे असे (माझ्या आणि सर्वसामान्य ब्लॉगर्सच्या दृष्टीने) हलक्या दर्जाचे प्रकार करणं शोभत नाही. तुमच्या या सदरात वैयक्तिक माझ्यावर विनाकारण, काहीही गरज नसताना आणि अजिबात संबंध नसताना दोन वेळा थेट आणि अनेकवेळा आडून हल्ले झालेले आहेत. त्या सगळ्यांची जंत्री मी या क्षणी देऊ शकतो आणि देऊ इच्छितो. पहिल्या वैयक्तिक हल्ल्याला मी त्याच भाषेत माझ्या ब्लॉगवरून उत्तर दिल्यानंतर हे प्रकार वाढले आहेत. पहिला थेट हल्ला झाला तो दिनांक १२ मार्चच्या लेखात. 

" काहीवेळा काय वाट्टेल तेकिंवा हरकतनायसारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते. "

श्री अभिनवगुप्त यांच्या लेखनाच्या दर्जा, खोली आणि व्याप्ती यावर थेट टिप्पणी करण्याचं टाळूनही मी त्यांचं एका गोष्टीसाठी कौतुक करू इच्छितो. ते म्हणजे सुरुवातीचे काही आठवडे त्यांनी भविष्य, पानिपत, भूकंप, पाकिस्तान, सिरीयामधली यादवी, आंतरराष्ट्रीय अनुवादक, इराण युद्ध, चित्रकला आणि कलासमीक्षक किंवा न्यूयॉर्क टाईम्स मधल्या संपादकीयांचा काही भाग अशा देशविदेशांतल्या अनेक ब्लॉग्जविषयी लिहूनही त्या विषयांमधल्या अंगभूत जडपणापायी आणि त्याहीपेक्षा श्री अभिनव गुप्त यांच्या अजून जड शब्द वापरून स्वतःच्या अगम्य शैलीत ते लिहिण्याच्या अट्टाहासापायीच त्यांनी हे विशेष चालत नसलेलं सदर "घटं भिंद्यात पटं छिंद्यात" करून का होईना चालवण्यासाठी त्यांनी बॉलीवूडछाप मार्गाचा आधार घेण्याचं ठरवलं. 

माज किंवा अहंकार म्हणून सांगत नाही परंतु माझ्या ब्लॉग हिट्स पावणे दोन लाखाच्या वर आहेत, २३४ जण माझ्या ब्लॉगचे फॉलोअर्स आहेत आणि किमान १३० जणांनी माझा ब्लॉग इमेल मधून सब्स्क्राईब केलेला आहे. 'काय वाटेल ते' ब्लॉग लिहिणारे महेंद्र कुलकर्णी तर समस्त ब्लॉगर्सचे आदर्श आहेत ते त्यांच्या लेखनाच्या वारंवारतेमुळे, विषयांच्या वैविध्यामुळे आणि कुठलाही विषय सोपा करून सांगण्याच्या त्यांच्या हातोटीमुळे. 'काय वाटेल ते' ची आजची वाचक संख्या जवळपास ९ लाख आहे, किमान ७१३ लोकांनी त्यांचा ब्लॉग इमेलमधून सब्स्क्राईब केलेला आहे. (आम्ही दोघेही कुठल्याही मराठी संकेतस्थळांवर लिहीत नाही (पूर्वी लिहीत असलो तरी आता सोडलं आहे) हे आमच्यातलं एक साम्य). मला वाटतं एवढी कारणमीमांसा आणि पुरावे दिल्यावर न चालणाऱ्या सदराला चालवण्यासाठी आमच्या ब्लॉग्सवर वैयक्तिक हल्ला का झाला असावा किंवा कोणाच्या 'प्रेरणेने' झाला असावा हे आपल्यासारख्या विद्वान आणि बॅलंस्ड संपादकाला समजावून सांगणे म्हणजे आपला (तुमचा) अपमान करण्यासारखं आहे. तेव्हा कारणमीमांसेचा भाग इथेच थांबवतो.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या १२ मार्चच्या लेखापर्यंत श्री अभिनव गुप्त हे निनावी होते. लेखाखाली कोणाचंही नाव नसायचं. परंतु निनावी हल्ले करणाऱ्या श्री गुप्त यांच्यावर अनेक ब्लॉग, फेसबुक भिंतीं आणि काही मराठी संकेतस्थळांवर टीका झाल्यानंतर अचानक 'हजला जावं' त्याप्रमाणे स्तंभलेखकाने त्या लेखांखाली श्री अभिनव गुप्त असं नाव द्यायला सुरुवात केली. (यातलं श्री हे मी माझ्या सोईने वापरलं असून काही चुकलं असल्यास आत्ताच माफी मागतो)

आता माझा नक्की आक्षेप कशावर आहे ते पुराव्यासकट सांगतो. 

भाग १ : वैयक्तिक हल्ले

१. माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन सर्वप्रथम थेट हल्ला झाला तो वर म्हटल्याप्रमाणे १२ मार्चच्या सदरात.

काहीवेळा काय वाट्टेल तेकिंवा हरकतनायसारखे मराठी ब्लॉग- त्यांना मिळणारा प्रतिसाद आणि प्रत्येक प्रतिसादाला पुन्हा लेखकानं दिलेली पोच वा उत्तरं पाहून वपुंसारख्याच लेखकांची आठवण (फक्त प्रतिसादापुरती) होते. 

२. १२ मार्चच्या सदरातलाच हा अजून एक उल्लेख पहा.

महिलांसाठीची दुपारची मासिकंहा सर्वच काळात हसण्यावारी नेण्याचा, पण मोठा वाचकवर्ग असलेला प्रकार होता. त्यात येणाऱ्या कथा वा लेखांवर वाचकांमधून मनात तरंग उमटले..पद्धतीच्या प्रतिक्रिया असत. त्या प्रतिक्रिया लिहून, टपालानं संबंधित मासिकापर्यंत पाठवल्या जाण्याची शक्यता फार कमी होती आणि जर कुणी पाठवलीच तर ती छापली जाई. अशा पत्रांना बाकीचे वाचक खुशीपत्रंसमजत आणि सोडून देत. 

आता तुम्हाला मुद्दा क्रमांक एक मधला विघ्नसंतोषीपणा लक्षात येईल !  

३. १२ मार्चच्या सदरातील आक्षेपार्ह उल्लेखामुळे संतापून श्री महेंद्र कुलकर्णी यांनी तुम्हाला म्हणजे श्री गिरीश कुबेर यांना थेट पत्र लिहिलं. ते पत्र चुकीचा मुलामा देऊन १९ मार्चच्या सदरात छापण्यात आलं. हे तुमच्या परवानगीने झालं की कसं यावर मी मतप्रदर्शन करू इच्छित नाही. तो तुमचा आणि श्री अभिनवगुप्त यांचा अंतर्गत प्रश्न आहे.

४. आजच्या म्हणजे १४ मेच्या 'वाचावे नेटके' च्या सदरात पुन्हा एकवार माझ्या ब्लॉगचं नाव घेऊन हल्ला झालेला आहे. (आणि अवांतर म्हणजे ही टीका करताना श्री अभिनव गुप्त यांनी तळटीपा देण्याची एका ब्लॉगरची शैली जशीच्या तशी चोरली आहे !!!!)

तर तातडीनं वाचावे नेटकेबंदच करा, अशी मोहीम (अशा संभाव्य मोहिमेतले पहिले १५ ब्लॉगर तर घरचेच असल्यानं) सुरू व्हायला हरकत नाही.*
* (या वाक्यातील हरकत नाहीहा शब्द वाचावे नेटकेचा गटणेपणा अगदीच सिद्ध करणारा नाही काय?) 

कुबेर सर, माझ्या ब्लॉगचं युआरएल हरकतनाय.कॉम असं आहे (FYI)

भाग २ : मराठी ब्लॉगर कम्युनिटीवरील हल्ले

१. १२ मार्चच्या सदरात समस्त स्त्री ब्लॉगर्सना वेठीला धरलं गेलंय (हे मातृदिनाच्या दिवशी तुमच्यापर्यंत पोचावं हा अपूर्व योगायोगच !!).. हा उल्लेख पहा.

अनेकजणींचे  ब्लॉग आज दुपारच्या मासिकांची उणीव भरून काढतात. अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका मनातलंलिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत- स्वत:बद्दलच बोलणं सुरू असतं त्यांचं. त्यामुळे प्रतिसादही ओळखीपाळखीतून येतात. स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो. 

तुमचे श्री अभिनव गुप्त किती स्त्री ब्लॉगर्सचे ब्लॉग्ज वाचतात हा नियमित ब्लॉगिंग करणाऱ्या आणि मराठी ब्लॉगिंग क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या निदान माझ्यासारख्या ब्लॉगरसाठी आणि अन्य कित्येक ब्लॉगर्ससाठी मोठाच प्रश्न आहे. किंबहुना फक्त स्त्री-ब्लॉगर्सचेच नव्हे तर एकुणातच ते किती ब्लॉग्ज वाचतात आणि किती ब्लॉग्ज पूर्ण वाचतात हाच खरा प्रश्न आहे. कारण कुठल्याही पुस्तकाची चार पानं वाचून किंवा कुठलाही चित्रपट १५ मिनिटं बघून त्या पुस्तकाचं किंवा चित्रपटाचं समीक्षण करणं आणि कुठल्याही ब्लॉगवरचे २-३ लेख वाचून त्या ब्लॉगवर राष्ट्रीय दर्जाच्या वृत्तपत्रांतून लाथाळ्या झाडणं हा माझ्या दृष्टीने सारखाच प्रकार. फरक इतकाच की चित्रपट आणि पुस्तकाच्या बाबतीत असला बालिश प्रकार करणारे समीक्षक (आमच्या) सुदैवाने निदान आजच्या काळात तरी उपलब्ध नाहीत. (आणि श्री अभिनव गुप्तच्या प्रेरणेने असली फळी जन्मालाही न येओ ही सदिच्छा)

कदाचित तुम्ही म्हणाल की श्री अभिनव गुप्त संपूर्ण ब्लॉग वाचत नाहीत असा दावा तू कशाच्या आधारावर करतो आहेस? तर हे बघा त्याचं उत्तर.

२. ९ एप्रिलच्या सदरातला हां उल्लेख.

 ओळख करून घ्यावी आणि पुढे वाचत राहावेत अशा ब्लॉग वा संकेतस्थळांवरल्या ताज्या नोंदींआधारे त्यांवर टिप्पणी आणि भाष्य करताना, हेतू तपासण्यासाठी अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील, तेवढय़ा वाचणं इष्ट ठरतं. 

"अर्थातच जितक्या नोंदी वाचता येतील" म्हणजे काय? म्हणजे नक्की किती? हे कोण ठरवणार? श्री अभिनव गुप्त हे का ठरवणार? हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कसा?

"कारण श्री अभिनव गुप्त हे सदर चालवतात" असं बिनाशेंड्या-बुडख्याचं उत्तर इथे अर्थातच ग्राह्य नाही. असो.


३. आता अनेक छोटी छोटी उदाहरणं देतो की ज्यांत त्या त्या ब्लॉग्ज/ब्लॉगर्सवर विनाकारण हल्ले केले गेलेले आहेत. ५ मार्चच्या लेखात मुख्यमंत्री नावाच्या ब्लॉगवर टीका करण्यासाठी आणि लाथाळ्या झाडण्यासाठी खर्ची घातलेला एक संपूर्ण परिच्छेद. आणि दुसऱ्या परिच्छेदात दुसऱ्या एका ब्लॉगला वेठीस धरण्याचा प्रकार.

एक बाब स्पष्ट करून सांगतो की "जेव्हा तुम्ही तुमचं लेखन आंतरजालावर प्रसिद्ध करताय तेव्हा तुम्ही त्यावरील टीकेला तयार असलं पाहिजेत" वालं दिशाहीन आणि चुकीचं समर्थन इथे पूर्णतः गैरलागू आहे. कारण इथे श्री अभिनव गुप्त स्वतः लोकांकडून ब्लॉग्जच्या शिफारशी मागत आहेत (संदर्भ : २ जानेवारीच्या पहिल्या लेखात श्री अभिनव गुप्त (परंतु त्या दिवशी निनावी) यांनी केलेलं आवाहन). आणि जर लोकांनी स्वतःचे किंवा स्वतःला आवडणारे ब्लॉग्ज केवळ आणि केवळ श्री अभिनव गुप्त यांच्या मागणीप्रमाणे दिले तर श्री अभिनव गुप्त यांनी ते ब्लॉग 'संपूर्ण' (point to be noted, Me lord) वाचून ते आवडले नाहीत तर सोडून देऊन अन्य ब्लॉग्ज वाचावेत आणि जे आवडतील ते छापावेत असं अपेक्षित आहे. चांगल्या ब्लॉग्जच्या ओळखीसाठी हे सदर सुरु केलं असून (पुन्हा एकवार २ जानेवारीच्या आवाहनाचाच संदर्भ) जे ब्लॉग्ज आवडले नाहीत त्यांच्यावर लाथाळ्या झाडण्यासाठी नव्हे !

४. १९ मार्चच्या शीर्षकातच 'साडेतीन' टक्क्यासारख्या आक्षेपार्ह बाबीचा उल्लेख करून श्री अभिनव गुप्त यांना नक्की काय म्हणायचं आहे हे केवळ तेच जाणोत !

५. १९ मार्चच्या लेखातलं हे वाक्य स्तंभलेखकाच्या छुप्या हेतूंना बोलकं करण्यासाठी पुरेसं ठरावं.

अशा वेळी आणि अशा स्थितीत वाचावे नेट-केमुळे सध्यातरी गैरसमज होऊ आणि वाढू शकतात, याचा मासला ठरणारं एक पत्र सोबत आहे.  

पुन्हा एकदा १९ मार्च. शीर्षकात पुनःश्च एकवार साडेतीन टक्क्यांचा उल्लेख !! आणि त्याहीपुढे एका चांगल्या ब्लॉगचं कौतुक करण्यापूर्वी न चुकता ओढण्यात आलेले ताशेरे.

एक आहे प्रसाद चिक्षे यांचा ब्लॉग. मराठीत, आणि किमान गुगल-क्रोमवर उघडणे कठीण. शिवाय एका वेळी एकच नोंद येताना फार वेळ खाणारा हा ब्लॉग, असा विविध सिस्टीम्सवरचा अनुभव आहे. ही तांत्रिक अडथळय़ांची शर्यत जिंकलात, तर जणू बक्षीस म्हणून  

"गुगल क्रोमवर उघडू नका" हे एवढं साधं चार शब्दांत सांगणं किती सोपं आहे. परंतु श्री अभिनव गुप्त यांनी आपल्या अंगभूत (दुर्) गुणाने किमान ३८ शब्द त्यासाठी खर्ची घातले आहेत !!!

७. आता त्याच लेखात हा अजून एक आक्षेपार्ह उल्लेख 

नोंदींची भाषा बाळबोध म्हणावी, अशी आहे. ब्लॉगलेखक प्रसाद चिक्षे यांना भाजपसारख्या पक्षाच्या प्रसिद्धीविषयक कामासाठी बोलावणे आले होते असा निष्कर्ष ब्लॉगवरील कुठल्या तरी एका सूचक उल्लेखाचा जरा विचार केल्यावर काढता येत असला, तरी त्यावर विश्वास बसणे कठीण व्हावे, अशी भाषेची रीती! 

अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास श्री अभिनव गुप्त यांच्या निरर्थक आणि प्रामुख्याने शब्दबंबाळ मराठीपेक्षा मी कुठलंही साध्या भाषेतलं लिखाण कधीही आवडीने वाचेन. पण एखाद्या ब्लॉगरच्या भाषाशैलीवरून त्याला एखादा राजकीय पक्ष कामासाठी बोलावू शकेल की नाही यावर गृहीतक मांडणं हा निखळ मुर्खपणा !! या निरर्थक आणि बिनबुडाच्या मतप्रदर्शनाचा अधिकार श्री अभिनवगुप्त यांना दिला कोणी? ते भाजपचे राष्ट्रीय दर्जाचे नेते आहेत की भाषातज्ज्ञ??? माझ्या मते तरी "यापैकी नाही" हेच उत्तर योग्य आहे नाही का?

८. १२ मार्चच्या लेखातील स्त्री ब्लॉगर्सबद्दलच्या अवमानकारक उल्लेखानंतर त्या उल्लेखाच्या निषेधार्थ त्या लेखाखाली अनेक प्रतिक्रिया आल्या (आणि लोकसत्ताने त्यातल्या कित्येक छापल्याच नाहीत) आणि अनेक ब्लॉगलेखकांनी आपल्या ब्लॉगवर/फेसबुक भिंतीवर त्याबद्दल निषेध नोंदवला. त्यानंतर अचानक श्री अभिनव गुप्त यांना १२ मार्चपर्यंत स्त्री ब्लॉगर्सचे दुपारच्या मासिकांची उणीव भरून काढणारेब्लॉग्ज या निषेधमालिकांनंतर अचानक १९ मार्चच्या दिवसापासून  शुद्ध हेतूने लिहिले गेलेलेवाटायला लागले. कंप्लीट युटर्न !!! हा पहा १९ मार्चच्या लेखातला पुरावा.

आपण हेतूंबद्दल बोलत होतो.  अनेकदा, ब्लॉगलेखन करणाऱ्या स्त्रियांचे हेतू अधिक शुद्ध असल्याचं दिसतं. हा नियम नाही. असा लिंगविषमतामूलक नियम मानूही नये. पण तरीही दिसतं. ब्लॉगलेखन करणारा जो आवाज वाचकापर्यंत पोहोचतो, तो तपशिलांमधून जाणवतो. तपशील मांडणं म्हणजे माहिती देणंअपरिहार्यपणे आलंच. पण माहिती कशाची द्यायची आहे, त्यातून काय सांगायचं आहे, हे महत्त्वाचं मानण्याची वृत्ती असलेल्या २५ ब्लॉगरपैकी २० स्त्रियाच असतात.. आणि या सर्वच्या सर्व- म्हणजे वीसहीजणींच्या ब्लॉग-लिखाणात अनेकदा, स्वत:सकट सर्वाना पुन्हा पाहण्याची, तपासून घेण्याची विश्लेषक वृत्ती दिसते! स्वत:च्या जगण्याचे हेतू दुसऱ्यांच्या जगण्यातही  मिसळलेले असतात, ही व्यक्तिबाह्य अस्तित्वाची पातळी मान्य करणं बहुधा पुरुषांना जमत नसावं, त्यालाही सामाजिकच कारणं असावीत. पण हेतू तपासणारं विश्लेषण मराठी ब्लॉगांवरून करण्यात सध्या स्त्रिया पुढे आहेत. 

९. आता हा अजून एक विनोदी उल्लेख ९ एप्रिलच्या लेखातला.

(आणि वाचन, अभ्यास वगैरे नसावं) असं त्यांच्या ब्लॉगवरला मजकूर वाचून वाटत राहतं. मग लक्षात येतं की, फक्त तरुण वयावर खापर फोडून चालणार नाही. भाषा ज्या हेतूंसाठी वापरली जाते आहे, ब्लॉग ज्या प्रकारच्या संवादासाठी लिहिला जातो आहे, तो हेतू एकतर लेखकाला स्पष्ट आहे का आणि वाचकाला पटण्यासारखा आहे का, हे अखेर ब्लॉगचा मगदूर ठरवण्यासाठी महत्त्वाचं ठरतं

श्री अभिनव गुप्त यांनी लोकांच्या भाषेवर आक्षेप घेणे हे म्हणजे "शीशे के घर मे....." वाल्या संवादासारखं झालं !!

१०. आता ३० एप्रिलच्या लेखाची ही सुरुवातच बघा.

माझे जीवनगाणे माझ्या ब्लॉगमधून मी ऐकवणारहा आग्रह अनेकांचा असतो आणि तो अत्यंत कडक आग्रह असतो, हे वाचावे नेटकेबद्दल ज्या चर्चा- प्रतिसाद- प्रतिक्रिया बाहेर अन्यत्र चालताहेत, त्यांतून कुणाच्याही लक्षात येईल. 

थोडक्यात हे सगळं जाणूनबुजून चालू आहे आणि स्तंभलेखक त्यातला विकृत आनंद उपभोगत आहे हेच स्पष्ट होतं. यावरून जॉर्ज बर्नार्ड शॉचं "Never to wrestle with a pig. You get dirty, and besides, the pig likes it." वालं वाक्य आठवलं. असो.

भाग ३ : अशुद्ध, चुकीची आणि न समजणारी मराठी 

१. २७ फेब्रुवारीच्या लेखातला हा उल्लेख.

अभिनिवेश नाही, पण अतिरेकी निष्ठा! लेखक बहुतेकदा अभ्यासू, पण सारा अभ्यास त्या निष्ठांच्या कक्षेतला. मुद्दा अगदी वकिली बाण्यानं, जणू काही तर्कशुद्धपणेच पटवून दिलेला वरकरणी दिसेल, पण अर्धसत्यच लोकांपुढे मांडून तो आधार कसा निर्णायक आहे हे पटवण्याचा आटापिटा करणं, चुकीच्या किंवा अयोग्य मुद्दय़ांपायी शब्दांचं जाळं रचणं, हे दोष या लिखाणात नेहमीच असतात. 

स्वतः एवढं विचित्र, अतर्क्य आणि अगम्य मराठी लिहिणाऱ्या श्री अभिनव गुप्त यांनी अन्य ब्लॉगर्सवर "शब्दांचं जाळं रचणं" हा आरोप करणं हे म्हणजे विरोधाभासाचा माउंट एव्हरेस्ट म्हणावं लागेल !!

२. १२ मार्चच्या लेखातला हा उल्लेख म्हणजे इतर काही नसून फक्त स्वतःला माहित असणारे काही जडबंबाळ शब्द त्यांचे अर्थ न तपासता एकापुढे एक लिहिण्याचा हास्यास्पद प्रयत्न म्हटला पाहिजे !

आपल्या जीवनशैलीबद्दल आपल्याच भाषेत वाचायला मिळणं, ही विचक्षण नसलेल्या सामान्यवाचकांची गरज असते. ती कुठल्याही भाषेत असतेच. जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं, हाच या वाचनाचा उद्देश असू शकतो, पण वाचकांना तो या शब्दांमध्ये माहीत नसण्याचीच शक्यता अधिक असते! 

"विचक्षणा नसलेला सामान्य वाचक" आणि "जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करणं" ही दोन वाक्य दिनांक १२ ते १९ मार्चच्या आठवड्यात त्यांच्या अर्थांसाठी सर्वाधिकपणे गुगल केली गेली (आणि तरीही कोणालाही त्याचा अर्थ उमगला नाही) असं ऐकून आहे !!

३. ९ एप्रिलच्या लेखातला हा असाच अजून एक विनोदी उल्लेख.

स्त्री-ब्लॉगर फक्त स्वत:बद्दल लिहितात म्हणून त्या किती छानपैकी हेतू तपासू शकतात, असा छुपा वारही कुणी करू नये. 

असले तिरपागडे आरोप अन्य कोणी नाही तर स्वतः श्री श्री अभिनव गुप्त करताहेत हा तपशील ते सोयीने विसरताहेत. 

४. २३ एप्रिलच्या लेखातला शेवटच्या परिच्छेदातला हा उल्लेख बघा.

आणि च्यायला.. हेही ब्लॉगर झाले

आणि श्री अभिनव गुप्त यांची एकूण शब्दनिवड पाहता मला १०१% खात्री आहे की त्यांनी शीर्षकातही हाच शब्द वापरला असणार परंतु आपण किंवा आपल्यासारख्या एखाद्या ज्येष्ठ आणि ज्ञानी संपादक/पत्रकाराने वेळीच हस्तक्षेप करून 'च्यायला' ला 'अरेच्चा' मध्ये बदललं असेल. त्यामुळे २३ एप्रिलच्या लेखाचं शीर्षक 'वाचावे नेट-के : अरेच्चा.. हेही ब्लॉगर झाले !' असं मर्यादापूर्ण दिसतोय. माझ्या तीस वर्षांच्या वर्तमानपत्र वाचनाच्या अनुभवात  'च्यायला' सारखा शब्द संपादकीय पानावरील स्तंभात वाचण्याचा हा केवळ पहिला आणि कदाचित एकमेवच योग !!

ब्लॉगर्सवरील यथेच्छ लाथाळीने भरलेल्या या सदरातील आत्तापर्यंतच्या लेखांमध्ये एक अपवाद मात्र नक्कीच दिसला. तो म्हणजे श्री चंद्रशेखर आठवले यांच्या ब्लॉगविषयीचा ७ मे २०१२ चा लेख. पण अर्थात एकही अपशब्द न वापरता किंवा खोडसाळपणा न करता हा लेख लिहिण्याचं कारण म्हणजे म्हणजे श्री अभिनव गुप्त यांच्या विचारात झालेला बदल नसून श्री गोखले यांच्यासारख्या ज्ञानी, तल्लख आणि व्यासंगी ब्लॉगरबद्दल अपशब्द काढण्याएवढी आपली पात्रता नाही की प्राज्ञा नाही हे श्री अभिनव गुप्त यांनी त्यांच्या सुदैवाने ओळखलं हे आहे. !!!

आता अजून एक अतिशय महत्वाचं परंतु कित्येकांना न रुचणारं निरीक्षण नोंदवू इच्छितो. ज्या ब्लॉग्जची अतिशय स्तुती करण्यात आलेली आहे ते ब्लॉगर्स एक तर कुठल्या ना कुठल्या मराठी संकेतस्थळाचे प्रतिनिधी आहेत किंवा ज्यांनी कुठल्याही मराठी संकेतस्थळाशी जाणीवपूर्वकच संबंध ठेवलेला नाही (उदा श्री चंद्रशेखर आठवले). माझ्या ब्लॉगची शप्पत घेऊन सांगतो की त्यांच्याची माझं वैयक्तिक शत्रुत्व मुळीच नाही की त्या ब्लॉग्जचं कौतुक झाल्याबद्दल माझ्या मनात यत्किंचितही असूया नाही. उलट एक मराठी ब्लॉगर या नात्याने दुसऱ्या एका मराठी ब्लॉगरचं कौतुक होणं हे माझ्यासाठी खचितच अभिमानास्पद आहे आणि त्याउपर जाऊन म्हणायचं तर श्री अभिनवगुप्त सारख्या छिद्रान्वेषी इसमाला निदान कुठल्यातरी ब्लॉगबद्दल त्या ब्लॉगला लाथा न घालता निव्वळ स्तुरी करावीशी वाटली हे पाहून तर तो अभिमान अजूनच दुणावला. असो.

श्री अभिनव गुप्त यांच्या माझ्यासारख्या मराठी ब्लॉगर्सच्या ब्लॉगपोस्टमधील लिंक्स मधून (का होईना) वाचक वाचावे नेटके पर्यंत पोहोचोत अशा विक्षिप्त हेतूला बळी न पडता मुद्दामच वाचावे नेटकेच्या लिंक्स न देता लेखांतले आक्षेपार्ह उल्लेख इथे कारणांसहित नोंदवले आहेत. तुम्ही त्याची योग्य ती दखल घ्यालच. अर्थात फक्त दखलच आणि कारवाई नाही कारण "च्यायला, हेही पत्रकार झाले !!" 

दर सोमवारी प्रसिद्ध होणारे हे सगळे लेख इतक्या काळजीपूर्वक आणि बारकाईने वाचता की नाही याची खात्री नसल्याने मुद्दाम सगळे मुद्दे आणि आक्षेप कारणांसहित तुमच्यासमोर मांडत आहे. जाता जाता एकच छोटा प्रश्न विचारावासा वाटतो की इतक्या मोठ्या वृत्तपत्रात अशा प्रकारचं सदर चालवणं यासाठीची पात्रता काय आहे? कारण आजच्या घडीला कित्येक ब्लॉगर-पत्रकार आंतरजालावर आणि वर्तमानपत्रांमध्ये उपलब्ध आहेत जे वृत्तपत्रीय लेखन आणि ब्लॉगलेखन हे दोन्ही सारख्याच ताकदीने सांभाळतात आणि त्यातल्या कित्येकांना मी वैयक्तिक ओळखतो. कदाचित ते श्री अभिनव गुप्त यांच्यापेक्षा वयाने आणि पदाने कनिष्ठ असतील परंतु त्यांचं लेखनकौशल्य निर्विवादपणे श्री अभिनव गुप्त यांच्यापेक्षा ज्येष्ठ आहे तसंच कुठलाही पूर्वग्रह ठेवून दुषित लिखाण न करता निर्भेळ लेखनावर त्यांचा अधिक विश्वास आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकतो आणि अशी अनेक नावं मी याक्षणी सुचवूही शकतो !!

So, Mr Girish Kuber, Are you watching closely??

तळटीप : हेच पत्र मी श्री गिरीश कुबेर आणि श्री अभिनव गुप्त यांना त्यांच्या इमेल आयडीवर पाठवलं आहे.

65 comments:

  1. अरे हेरंब कशाबद्दल लिहिलंस हेच कळत नव्हतं बघ मग काही उल्लेखावरून एकदम पेटली की म्या पन कायबाय लिवलय याच इशयावर.. :)
    त्याला हा एकंच धंदा असावा पण आपण कशाला आपला वैयक्तिक वेळ घालवा म्हणून मी तरी ती अर्धवट बोजड बडबड वाचन कधीच सोडलाय अर्थात तुझ्यावर सारखा हल्ला त्याने करावा असा मुळीच अर्थ नाहीये आणि यासाठी माझी काही मदत होऊ शकणार असेल तर नक्की कळव
    As a fellow blogger I fully support you.. :)

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा अपर्णा. अनुल्लेखाने मारायच्या लायकीचंच सदर आहे ते पण हरकत नाय 'नाही' वगैरे सारख्या पाचकळ विनोदांनी जागा भरणारा स्तंभलेखक वारंवार काही गरज नसताना हल्ले करायला लागला तर मी कशाला शांत बसू? म्हणून तर म्हटलंय त्यांना की तुम्ही फक्त दखल घ्या.... 'कारवाई' मी करेन !!!

      Delete
  2. काय बोलू ???

    जगदंब जगदंब......

    पत्राला संपादकीय उत्तर येईल अशी अपेक्षा करतो....

    ReplyDelete
    Replies
    1. आता यापुढे आपण काही बोलायचं नाही. पाहत रहायचं ;)

      उत्तर येईल अशी मीही अपेक्षा करतो. आलं तर कळवीन.

      Delete
  3. संकेतस्थळांवरील कंपूबाजी ही आता माध्यमांचा वापर करून ब्लॉगसारख्या गोष्टींमध्ये बळावत चालली आहे ह्याचे 'वाचावे नेटके' हे प्रातिनिधीक उदाहरण वाटतेय. तसेच वृत्तमाध्यमांना चिखलफेक करायला काहीतरी शोधत रहावे लागते त्यात आता मराठी ब्लॉग हे साधन शोधले असेल त्यांनी.

    ReplyDelete
    Replies
    1. काही ठराविक दोन-तीन ब्लॉगर्सना टार्गेट करून हास्यास्पद वाटेल अशा पद्धतीने नालस्ती करण्यामागे कोणाचे 'हितसंबंध' गुंतले आहेत हे समजू शकतं. अशा विघ्नसंतोषी लोकांना एवढ्या मोठ्या पेपरात आपले चिमखडे बोल लिहायला संधी कशी दिली जाते हे मोठं कोडं आहे !

      Delete
  4. हा अभिनवगुप्त "अभिनव" असूनही "गुप्त" आहे? कमाल आहे! हम करे सो कायदा असा त्याचा नूर दिसतोय. त्याच्या मागल्या आठवड्यातल्या लेखावरची पहिली प्रतिक्रिया आणि आजच्या लेखाची सुरूवात पहा म्हणजे कळेल.

    >>विचक्षणा नसलेला सामान्य वाचक>> विचक्षणा नसते म्हणूनच तो "सामान्य" वाचक असतो ना! विचक्षणा असेल, तर असामान्य नाही का होणार? आणि असामान्य वाचक फक्त (फाटकी सदरं) कशाला वाचेल, तो ब्लॉग नावाची टीप्पणी नाही का लिहीणार? विचक्षणा असल्याने विचकित व विचलित न होता विवेकबुद्धी वापरून विवेचन करणं हे (अ)सामान्य वाचकाचं विचारशील काम आहे. तो गुप्त्या असाच विचारशील आहे का, हे विचारशील का त्याला?

    ’विचक्षणा’ या शब्दाचा अर्थ समजला तर मलाही सांग बरं. मी भाबडेपणे विचक्षणा म्हणजे "थरो नॉलेज = संपूर्ण ज्ञान" असं गृहीत धरून चालते आहे आणि त्याच गृहीताच्या आधारावर मी वरील वक्तव्य केलं आहे.

    त्या येड्याला सांग की संस्कृत येत असलं म्हणून जड शब्द वापरल्याने लेख भारी होत नसतो. संकृत ज्ञानेश्वरांनासुद्धा माहित होतं पण तरिही त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली.

    ReplyDelete
    Replies
    1. होय कांचन. कोणी एखादी छोटीशी विरोधी प्रतिक्रिया वगैरे दिली हे येडं लगेच त्याच्या अगम्य लिहिण्याच्या स्टायलीत तेवढीच प्रतिक्रिया क्वोट करतं आणि तेही 'बुडाच्या खाली' वगैरे मुर्ख श्बाद्प्रयोग वापरून. लोकसत्ताला शाब्दिक पक्षाघात आलेला आहे असल्या लोकांमुळे !

      आणि जड लिहिण्यासाठी त्या शब्दांचे अर्थ माहित असलेच पाहिजेत असं नव्हे. तो काय जे माहित आहेत ते शब्द फक्त एकापुढे एक जोडतो आणि काहीतरी वाक्य तयार करतो ! या माणसाला ज्ञानेश्वरीचं उदाहरण देणं म्हणजे गाढवापुढे वाचली ज्ञानेश्वरी असं होईल.

      असो जोक्स अपार्ट पण अति करायला लागला आणि लोकसत्ताने त्याला वेळीच आवर घालायचं मनावर घेतलं नाही तर माझ्याकडेही इतर उपाय आहेत हे त्यांनी विसरू नये !

      Delete
  5. एकदम सडेतोड आणि मुद्देसुद ! हां, आत ही बाब "च्यायला" त्या पत्रकाराना समजते की नाही ते अलहिदा.
    पाचकळ विनोदांनी जागा भरणारा स्तंभलेखक वारंवार काही गरज नसताना हल्ले करायला लागला तर मी कशाला शांत बसू? म्हणून तर म्हटलंय त्यांना की तुम्ही फक्त दखल घ्या.... 'कारवाई' मी करेन !!!++++++
    समस्त ब्लॉगर्स तुझ्या सोबत आहोत रे आम्ही..
    खूप झालं त्या फाटक्याचं आता..

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दीपक. हे असले 'च्यायला' पत्रकार अशा लेखांनी सरळ येणाऱ्यातले नाहीत. तो फाटक्या आत्ताही लपून बसून मजा बघत असेल आणि पुढच्या सोमवारी पुन्हा काहीतरी घाण करून ठेवेल त्याच्या लेखात. पण यावेळी मी सोडणार नाही. इतरही बरेच उपाय आहेत आपल्याकडे.

      फाटक्या,वाचतोयस ना रे?

      Delete
  6. >>>समस्त ब्लॉगर्स तुझ्या सोबत आहोत रे आम्ही.
    ++++ १०० !!!

    हे म्हणता येतेय कारण तू काय लिहू पहातो आहेस ते आम्हाला ’समजतं’ आहे.... बाकि आजचा नेटकेतला लेख (???? ) वाचायचा नुकताच प्रयत्न केलाय मी... चक्कर येतेय अक्षरश: !!

    (श्री. अभिनवगुप्त यांस : असे वैयक्तिक आरोप करायची आम्हा ब्लॉगर्सना सवय नाही... तूम्ही बरेच ब्लॉग वाचता असे दिसते.. त्यात हेरंबचा तर नियमाने .... तेव्हा एकच सांगेन " सतत इतरांना नावं ठेवाल आणि ते ही विनाकारण, तर वाचकांना तूमची मानसिकता न समजण्याइतपत ते खूळे असते तर तीन तीन वर्ष आम्ही ब्लॉग्स लिहूच शकलो नसतो... आणि जे लिहितोय त्या बळावर इतकी नाती जोडूच शकलो नसतो.... आणि काय सांगणार एकदा आम्हा ब्लॉगर्सच्या पोस्टनंतर येणाऱ्या प्रतिक्रीया आणि तुमच्या लेखांनतर (????) येणाऱ्या प्रतिक्रीया वाचून पहा, तुमचे तूम्हालाच समजेल लोक कुठे जोडले जाताहेत ते... !!" )

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद तन्वी. मला सगळ्यात संताप येतोय ते माकडाच्या हाती कोलीत देणाऱ्यांचा. त्याची लायकी, पात्रता, योग्यता न तपासता वाटेल ते बरळायला त्याला जागा उपलब्ध करून देणाऱ्यांचा..

      तन्वे, एवढ्या सिव्हील भाषेत समजण्याएवढा त्याचा मेंदू प्रगत झाला नाहीये अजून. गंमत सांगतो. आत्ता आपण इथे ज्या प्रतिक्रिया दिल्यात त्यातली वाक्य एकत्र करून तो त्याच्या पुढच्या सोमवारच्या लेखात काहीतरी घुसडेल आणि टीका करण्यासाठी काहीतरी अगम्य शब्दांत लिहील !! सो टिपिकल संस्थळ मेंटालिटी !! त्याला कोणाची फूस आहे हेही समजू शकतंय. लायकी नसताना पद मिळालं की गैरवापर व्हायचाच. तीन वर्षं??? अग असलं फडतूस सदर ६-८ महिने चाललं तरी पुष्कळ झालं. आणि मुख्य म्हणजे सर्व स्तरांतून या हिडीस लेखमालेबद्दल तक्रारी येत असताना तो अजून किती आठवडे हे चालू ठेवू शकेल हे ही पाहणं महत्वाचं ! सगळीकडे 'प्रहार' बाजी चालत नाही हे लवकरच समजेल त्याला !!

      कालच फेबुवर एक पोल घेतला होता या सदराविषयी. सदर चालू राहावं या बाजूने एकही मत मिळालं नाही...

      फाटक्या, वाचतोयस ना? या सगळ्या वाक्यांची सरमिसळ करून तिरपागडं लिहिण्यासाठी नीट पाठ कर ही सगळी वाक्यं. मूर्खासारखं स्वतःच्या मनाचं काहीतरी लिहिशील आणि पुन्हा शाब्दिक फटके खाशील सगळीकडून.

      Delete
  7. जाऊ दे हेरंब! किती त्रास करून घेशील. म्हणतात न हाथी चाले बजार कुत्ते भौन्के हजार! जळ कुटेपणा आहे झाल!

    ReplyDelete
    Replies
    1. माधुरी, त्रास करून घेत नाहीये अजिबात. मोजुनी पैन्जारा मारण्याच्या लायकीच्या माणसाला त्याची जागा दाखवून देतोय !

      एका मोठ्या पेपरातली काही फुटकळ स्क्वे इंचाची जागा लाभल्याने लायकीपेक्षा जास्त उंच उडी मारतोय तो.

      फाटक्या, तू आणि तुझी चिल्लीपिल्ली वाचताय ना हे सगळं? पुढच्या 'लिहावे फाटके' मध्ये आणि तुझ्या त्या टिपिकल संकेतस्थळावर आलं पाहिजे सगळं छापून.. क्या समझे ????

      Delete
  8. अत्यंत खालच्या पातळीवर उतरला आहे सदर लेखक.. संपादकांनी दखल घ्यायलाच हवी आता. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या व्यासपीठाचा वापर वैयक्तिक (निरर्थक) टीकाटिप्पण्या आणि सूडासाठी करणं आक्षेपार्हच नाही तर मूर्खपणाचं आणि उथळपणाचंच द्योतक आहे!
    योग्य लिहिलं आहेस.

    ReplyDelete
    Replies
    1. बाबा, बघत राहा. दार आठवड्यागणिक तो अजून अजून खाली उतरत जातो की नाही. After all pig enjoys !!

      स्वतःची ब्लॉग काढून तो चालवण्याची किंवा लोकप्रिय करण्याची लायकी नाही, ओळखीपाळखीत मोठ्या वृत्तपत्रातली जागा (लिहिण्याची आणि खुर्चीची दोन्ही) मिळाली. आता लिहायचं काय बरं?? तर त्याच्या त्या घरच्या १५ कच्च्याबच्च्यांना हाताशी धरून लिहितोय बापडा काहीतरी !! एवढ्या उथळ, संथ, मंद आणि निरर्थक माणसाला एवढ्या मोठ्या पेपरात लिहायला मिळतं कसं हाच मोठा प्रश्न आहे.. पूर्वी तो एक मस्त ब्लॉग होता पत्रकारांचा.. नाव आठवत नाही आता. असल्या खोट्या आणि उद्दाम पत्रकारांची बिंगं मस्त फोडायचा. सध्या बंद आहे बहुतेक. तो ब्लॉग चालू असता तर दोन मिनिटात या फाटक्याला रस्त्यावर आणला असता !!

      फाटक्या, तू वैयक्तिक पातळीवर उतरलास तर तुझ्यापेक्षा वाईट पातळीवर मी उतरू शकतो हे लक्षात ठेव. "खटासी असावे खट, उद्धटासी उद्धट" !!

      Delete
  9. आज लिहावे नेट-के वाचायला सुरवात केली तेव्हा * वाचून मुद्दाम पूर्ण सदर वाचलं आणि लक्षात आल बाष्कळ बडबड छापण्यात लोकसत्ताने जागा वाया घालवली आहे! हेरंब ,तुम्हाला ठाम पाठिंबा!
    तसंही गुप्त राहून अभिनव लिहिल्याच भासवण्याच्या प्रयत्नापेक्षा हे सडेतोड बर!

    ReplyDelete
    Replies
    1. वाचावे* so called..

      Delete
    2. धन्यवाद पल्लवी.. विनाशकाले विपरीत बुद्धी चालू आहे लोकसत्ताची !! जे काय असेल ते असो, माझ्या नादाला त्यांनी लागू नये. बास इतकंच..* पुढच्या सोमवारच्या 'लिहावे फाटके' मध्ये पुन्हा उद्दाम आणि उद्धट कमेंट्सबद्दल छापून येईल बघ. आणि त्याच्या चौपट उद्धटपणे त्याला उत्तरं देतो की नाही बघ. आणि अजून एक मार्गही आहे. बघू.

      Delete
    3. * बास इतकंच याचा अर्थ हे संपलं असं नाही तर "फाटक्या, ये तो शुरुआत है"

      Delete
    4. अजून एक *

      पल्लवी, मला एकेरी उल्लेख धावेल. :)

      Delete
    5. जशास तसे!
      लोकसत्ता मी अगदी लहानपणापासून वाचते आहे.लोकसत्ताला 'जशास' विभागात आलेलं पचायला जड जात आहे.
      अजून एक मार्ग? ....

      Delete
    6. *'तुझ्या' पत्राला उत्तर दिल्यास पोस्ट कर :)

      Delete
  10. ब्लॉगिंग विश्वातील कंपूबाजी ची कीड वेळीच नष्ट करण्यासाठी सर्व मराठी ब्लॉगर चे सह्या असणारे ह्या प्रवृत्तीचा निषेध करणारे पत्र एखाद्या वृत्तपत्र अथवा मराठी वाहिनीला द्यावे. लोकसत्ता ची राजकीय मते पटली नाही तरी इतर साहित्य व त्यातील लेख आवडीने वाचतो. पण अश्या प्रवूत्तीविरूढ संघटीत होऊन यल्गार केला पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. निनाद, ही ब्लॉगिंग विश्वातली कीड नाहीये. कुठलाही ब्लॉगर अन्य ब्लॉगर्सबद्दल असं विचित्र काहीतरी छापून आणायला मदत करणार नाही किंवा छापून आलेलं आवडीने वाचणार नाही. ही 'कंपूबाजीची कीड' वेगळीच आहे. त्या 'कीडीने' या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या माकडाला हाताशी धरलंय आणि स्वतःचा अजेंडा राबवतायत. बघू अजून किती काळ चालतंय हे सगळं. !

      Delete
  11. मला या सगळ्याची काही कल्पना नव्हती, म्हणून मी 'वाचावे नेटके' मधला एक लेख वाचून पहिला. गेला एक आठवडा मी त्याचा अर्थ लावतो आहे! इतकं अगम्य लिहायला हे स्वत:ला समजतात तरी कोण? असो.
    >> "अनेक ब्लॉगलेखक वा लेखिका ‘मनातलं’ लिहूनलिहून जनातलं काही बोलतच नाहीत.." म्हणजे काय? कोणी काय लिहावं आणि काय लिहू नये हे तुम्ही कोण सांगणार टिकोजी? आणि समजा कोणाला लिहावं वाटलं स्वत:विषयी, तर तुम्ही वाचू नका ते! तुम्हाला वाचायचं आमंत्रण दिलंय कोणी?
    >>"स्वत:च्या किंवा स्वकीयांच्या जीवनशैलीची अपरिहार्यता साजरी करण्याचा हेतूच अनेक ब्लॉगांमधून दिसत राहातो. " याचा अर्थ काय?
    छिद्रान्वेषणाची खाज ( आणि पोटदुखी ) हेच यामागचं कारण आहे. वैयक्तिक, उथळ आणि अकारण टिका करणं अत्यंत आक्षेपार्ह आहे, आणि त्याला आवर घातला गेला पाहिजे. योग्य उत्तर!

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अश्विन. अरे एक लेख नव्हे एकही लेख वाचून समजण्याच्या लायकीचा नाहीये. कारण एकाही शब्दाला काही अर्थच नाहीये फक्त एक मोठा पेपर आणि 'अन्य काही' डोकी हाताशी असल्याने काहीतरी बाष्कळ बकवास करणं चालू आहे ! छिद्रान्वेषणा आणि विघ्नसंतोषीपणा यांच्या मिलनातून तयार झालेलं हे अजब रसायन आहे. काय फाटक्या, बरोबर ना?

      Delete
  12. मला असे वाटते की या कडे आता दुर्लक्ष करायला हवे. जाऊ दे . काही फरक पडत नाही त्याच्या लिखाणामुळे. उलट तुझ्यावर टिका केल्या शिवाय त्याचा लेख पूर्ण होत नाही यावरून तु त्याच्या दृष्टीने किती मह्त्वाचा आहे हे लक्षात येते.

    ReplyDelete
    Replies
    1. व्यक्ती आणि पत्रकार दोन्ही दृष्टीने एवढ्या नतद्रष्ट असलेल्या व्यक्तीच्या दृष्टीने आपण महत्वाचं असणं यासारखी मोठी शिक्षा नाही काका. थेट दुर्लक्ष नाही करायचं. एक वेगळी आयडिया आहे. पुढच्या सोमवारी कळेलच.

      फाटक्या, आता सांभाळूनच राहा तू. वैयक्तिक पातळीवर उतरायला वर्तमानपत्रांना कितीही म्हटलं तरी एक मर्यादा असते. मी ब्लॉगर आहे. आणि हा माझ्या मालकीचा ब्लॉग आहे. मी हवं तेवढ्या वैयक्तिक पातळीवर उतरू शकतो हे लक्षात ठेव. पुढच्या सोमवारचा आणि त्यापुढचे सगळे लेख मर्यादेत राहून लिही. जर का पुन्हा अगम्य शब्दांचा फालतू खेळ केलास आणि संपूर्ण ब्लॉग न वाचता उगाच अडाण्यासारखी टीका करत सुटलास तर तुझी काही खैर नाही. तुझ्या टाळक्यात या अतरंगी कल्पना भरवणाऱ्या तुझ्या चिल्ल्यापिल्ल्यांनाही हे सांगून ठेव !!

      Delete
  13. नमस्कार सर्व वाचक मंडळी,

    सर्वप्रथम अशा प्रकारच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक क्षमा मागतो.
    एवढ्या वाईट थराला जाऊन मी आत्तापर्यंत कधीही प्रतिक्रिया किंवा प्रतिक्रियांना उत्तरं दिलेली नाहीत आणि यापुढेही कधीच देणार नाही.

    यापेक्षाही जहाल विषयांवर माझ्या ब्लॉगवर यापूर्वीही खडाजंग्या झालेल्या आहेत. परंतु जवळपास प्रत्येक वेळी समोरची व्यक्तीही कधीही हिणकस प्रकारे वैयक्तिक पातळीवर उतरली नव्हती आणि त्यामुळेच सगळे वादविवाद हे तात्विक किंवा मुद्द्यांवरच आधारित होते. (काही '(अ)सन्माननीय' अपवाद वगळता)...

    अर्थात तुम्ही हे सगळं जाणताच. जो जाणत नाही तो म्हणजे पूर्ण ब्लॉग न वाचता इतरांच्या अकलेने अनाठायी टीका करणारा श्री अभिनव गुप्त. ब्लॉगवर प्रतिक्रिया आणि त्यांना उत्तरं देण्याची पद्धत कशी असते हे श्री अभिनव गुप्त यांना कळावं म्हणून ही प्रतिक्रिया देत आहे. 'इतर ठिकाणांसारखं' खोट्या नावांच्या मागे लपून वैयक्तिक टीका करण्याच्या विकृतपणाला ब्लॉगविश्वात स्थान नाही हे त्याला समजावं म्हणून ही प्रतिक्रिया आहे. पण ब्लॉगर्सच्या मॅच्युअर्ड वागण्याला त्यांचा दुर्बळपणा समजून येता जाता व्यक्तिगत पातळीवर घसरायला लागल्यास नाईलाजाने आणि दुर्दैवाने एका ब्लॉगरलाही त्याच्यावर व्यक्तिगत टीका करणाऱ्यांना कसं त्याच भाषेत उत्तरं देता येतं हे दाखवण्यासाठी वरच्या सगळ्या जहाल प्रतिक्रिया होत्या. त्या प्रतिक्रियांबद्दल आणि अशा भाषेबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांची (अर्थातच रा रा अभिनव गुप्त यांची सोडून) क्षमा मागतो.

    श्री अभिनव गुप्त, पुढच्या सोमवारच्या लेखात जेव्हा माझ्या इतर प्रतिक्रियांचा आणि त्यातल्या भाषेचा उल्लेख जेव्हा कराल तेव्हा मी अशी भाषा का वापरली हे सांगणाऱ्या माझ्या या प्रतिक्रियेचाही उल्लेख करा जमलं तर. अर्थात जमलं तरच. कारण..... !! असो कारणं तुम्ही जाणताच.

    ReplyDelete
  14. Shame on loksatta. What the hell that editor is doing? Who is the editor of loksatta? I have seen that vachave netake as I thought its by Madhuri Purandare. But it seems that it has been written by some Idiot. Sorry for language, but that.

    ReplyDelete
    Replies
    1. My name is Gajanan Sawarkar , just do not knOw how to add the sam. When iam writting my name the comment is not getting published

      Delete
    2. Thanks. Let's hope they'll understand and try to improve.

      Delete
  15. a thought. is the editor writing this article and trying out a new genre ? otherwise why else would this column continue despite its low ( using 'low' for the loss of any other word below it)quality!

    कुबेरांनी आपल्या वैचारिकतेशी आणि बौद्धिक समजाशी फ़ारकत घेतलेली दिसते.
    असा कोण आहे ज्याला ते एव्हढा पाठींबा देताहेत?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरुणाताई. हा अभिनव गुप्त जो कोणी आहे त्याला या लोकांनी चढवून ठेवलं आहे हे नक्की. एखाद्या भांडवलदाराच्या/जाहिरातदाराच्या वशिल्याचा तट्टू असावा.

      Delete
  16. Lokasatta tar me lahan panapasunach vachat nahi....
    tyamule ya prakarabaddal kahi far asa kallal nahi. Pan yapudhe me "Harkatnay" sobat "Kay vattel te" suddha vachayala suruvat karen . in-fact kelich ahe :)

    ReplyDelete
  17. अरुणाताई,
    "कुबेरांनी आपल्या वैचारिकतेशी आणि बौद्धिक समजाशी फ़ारकत घेतलेली दिसते."
    खरं आहे.. मला पण तसंच वाटतंय.
    पेपरचा स्वतःच्या वैय्यक्तिक शत्रूत्वाचा वचपा काढण्यासाठी एक पत्रकार इतका घाणेरडा वापर करतोय, आणि संपादक डोळे मिटून घेतोय. कठीण आहे यांचं. माझ्या बरोबर प्रहार मधे असतांना पण

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद राघव.

      >> स्वतःच्या वैय्यक्तिक शत्रूत्वाचा वचपा काढण्यासाठी

      आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे हे जे काही वैयक्तिक शत्रुत्व वगैरे आहे त्याची मला यत्किंचितही कल्पना नाही. या माकडाने स्वतःच स्वतःचे काहीतरी समज गैरसमज करून घेतले आहेत किंवा कोणीतरी त्याचे करून दिले आहेत म्हणून उचललं बुड आणि लागला लिहायला... सॉरी उचलला हात असं म्हणायचं होतं मला. फाटक्याच्या लेखाने सवयीने बुड लिहिलं गेलं..

      फाटक्या, अजून एक रे बाबा.. ते घरचे १५ जण वगैरे अकलेचे तारे जे तू तोडले आहेस ते नक्की काय आहे? सगळेजण मला विचारतायत. एकच सांगतो. घरचं वगैरे सोडच तुझा आणि माझा काडीचाही संबंध नाही. त्यामुळे घरचे १५ वगैरे वाक्य जरा जपूनच बरळ. तुझ्या 'त्या' सायटीवरच्या लोकांबद्दल बोलत असलास तर स्पष्ट नावं घेऊन बोल. की स्वतःप्रमाणेच इतरांची नावं सांगण्याएवढीही धमक नाहीये तुझ्यात????? जे काय असेल ते असो... फॉर द रेकॉर्ड, तुझा आणि माझा यत्किंचितही काडीचाही संबंध नाही. १५ जण घरचे वगैरे तुझ्या डोक्यात काय चालू आहे देवच जाणे !

      Delete
  18. हेरंब,
    असं म्हणतात की 'निंदकाचे घर असावे शेजारी', फार मनाला लावून घेऊ नकोस रे या शेजाऱ्याचं. तू आपला चालत (लिहित राहा) नेटका.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रद्धा. असल्यांच्या शेजारी काय एका गावात/देशातही राहायची वेळ येऊ नये कोणावर !

      Delete
  19. अतिशय घृणास्पद प्रकार आहे हा. असो, त्यांची लायकी तेच दाखवून देत आहेत. जे वाचक असे लेख एन्जॉय करत असतील त्यांना तसंही दर्जेदार ब्लोग्स मध्ये काहीच रस नसेल. आणि चाणाक्ष वाचक असे काहीबाही वाचून त्यांची कीवच करतील. तुम्हाला पूर्ण पाठींबा...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद प्राची. लिहिणाऱ्याला तो घृणास्पद वाटत नाही यावरून त्याची लायकी कळतेच. आणि मुख्य म्हणजे कोणीही वाचक त्याचे लेख एन्जॉय करणं तर सोडच वाचतही नाहीयेत म्हणून तर अशी पब्लिसिटी मिळवण्यासाठी असं खालच्या पातळीला उतरावं लागतंय त्याला. अजून २-४ आठवड्यात वाचकच हे सदर बंद पाडतात की नाही बघ !

      Delete
  20. "हा सुर्य आणि हा जयद्रथ" केलयस यार अगदी. महेंद्रदादांचं पत्र लगेच छापलं होतं त्यांनी, आता हे पण पत्र छापुन दाखवाच म्हणावे त्यांना.
    हXXXX लेकाचे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विशाल.

      महेंद्रकाकांचं पत्र उलट्या पद्धतीने छापण्यासाठी आवश्यक असणारा दळभद्रीपणा आणि माझं पत्र थेट छापण्यासाठी आवश्यक असणारा निडरपणा या दोन्हीचं योग्य मिश्रण असल्याने हे पत्र काही छापून येणार नाही एवढं नक्की. अरे त्या लोकांनी त्या भिक्कार लेखाखाली माझी एकही प्रतिक्रिया छापलेली नाही तर हे पूर्ण पत्र कुठलं छापणार आहेत !!

      Delete
  21. हेरंब, जो तू आणि महेंद्रकाकांनी प्रथम एकवार निषेध केला होता तो योग्यच होता. पण आता तू फार महत्व दिलंयस या व्यक्तीला आणि त्याच्या सदराला. तू नकळत या सदराचा टीआरपी वाढवायलाही मदत करतो आहेस.


    अगदी दुर्लक्ष करावं हे योग्य नाही तसं अति महत्व देणंही योग्य नाही असं वाटतं. वाचकांच्या सूज्ञपणावर माझा इतका विलक्षण विश्वास आहे की त्यांना वाचून बरोबर ठरवता येतं काय बरं, काय वाईट, काय अतिरंजित आणि काय गोलमाल.. टीकेसाठी टीका म्हणून कोणी जडजंबाल शब्दात काही लिहीत असेल तर तेही वाचकांना तिथल्यातिथे उघड दिसतंच. हायलाईट करुन दाखवावं लागत नाही.

    वाचकप्रियता या एकाच निकषावर सर्व ठरवावं रे. बाकी सर्व निरुपयोगी..

    ReplyDelete
    Replies
    1. नचिकेत,

      तू म्हणतोस त्याच्याशी मी अगदी अगदी अगदी पूर्णतः सहमत आहे. टीआरपी वाढवला जातो आहे आणि थोडक्यात मी त्याच्या प्लानला बळी पाडतोय हेही कळतंय. म्हणून यावेळी मी त्याच्याशी बोलतच नाहीये. थेट संपादकांशी बोलतोय. एवढं करूनही जर हा खोडसाळपणा थांबला नाही तर त्याचा टीआरपी न वाढवता त्याला आणि त्याच्या सदराला साफ बुडवायचे इतरही मार्ग आहेतच की.

      वाचक तर आधीपासूनच या भिक्कार सदराला कंटाळले होते आणि आता तर सरळ सरळ शिव्या घालताहेत. त्याच्या सदराखालच्या प्रतिक्रिया बघ. अर्थात लोकसत्ता कित्येक प्रतिक्रिया छापत नाहीये पण कित्येक जणांचे मेल्स येताहेत.

      >> वाचकप्रियता या एकाच निकषावर सर्व ठरवावं रे. बाकी सर्व निरुपयोगी..

      अगदी खरं आहे ! बिचारा फाटके. त्या दुर्दैवी जीवाला 'वाचकप्रियता' म्हणजे काय हे कधीच कळू शकणार नाही ;)

      Delete
  22. हे वाक्य पहा शेवटचं " ‘आम्हीही लिहितो’ पद्धतीच्या मराठी लेखकवर्गाचं लिखाण छापणाऱ्या मासिकांना दुपारच्या निवांत वेळी सर्वाधिक वाचकवर्ग लाभे. म्हणून ही दुपारची मासिकं. अशा लेखकवर्गाकडे, रूढ जीवनशैलीत जे काही अपरिहार्य मानलं जातं त्याला आव्हान देण्याची लेखकीय कुवत नसते, असं तेव्हाच्या समीक्षकांनी दाखवून दिलं आहे."
    त्या येड**ला काय म्हणायचं आहे? च्यु** सा*. स्वतःला तरी क्ळतं का काय लिहितो ते? लोकसत्ता लवकरच बंद करण्याचा उद्योग हा अभी आणि गिरीश मिळून करताहेत बहूतेक. तसाही हल्ली क्रेडीब्लिटी राहिलेलीच नाही या पेपरची, या पेक्षा कुमार बरा होता असे वाटते. कमीत कमी त्याचा स्टाफ वर कंट्रोल तर होता, ह्याला तर तो च्यु** अभि** अजिबात जुमानत नाही. कारण काय असेल ते असो..

    ReplyDelete
  23. माझ्यामते सदराला 'वाचावे कीचकट' किंवा 'वाचावे खवचट' आणि लेखकसाहेबांना 'अभिनव खुपतं' ही नावं ठीक आहेत. :D

    "जर तुम्ही एखादी गोष्ट सोप्या शब्दात सांगता येत नसेल तर तुम्हाला ती पुरेशी कळालेली नसते." - अल्बर्ट आइन्स्टाइन.

    ReplyDelete
    Replies
    1. हाहाहा.. धन्यवाद मिलिंद. आइन्स्टाइनचा क्वोट बेस्ट आहे. It says everything !!

      असो. ब्लॉगवर स्वागत.. अशीच भेट देत राहा. आणि या असल्या पोस्टवर ब्लॉगवर स्वागत करावं लागतंय त्याबद्दल सॉरी !

      Delete
  24. आयच्यान जर का लोकसत्ते ने ह्यो चिवत्यापणा थांबवला नाही तर जंक्शन इज्जत जाणार लोकसत्तेची, तरी म्हणत होतो दोन दिवस मेस चे डबे विचित्र का लागत होते चवीला....... परत मेस चे डबे पण लोकसत्तेवर ठेऊन जेवणार नाही मी!!!!!!!...... (मिरर,मिड्डे वर डबे ठेवले तर जरा जास्तच चवदार होतात)

    -सोन्याबा्पू

    ReplyDelete
  25. हेरंब,
    तू, महेंद्र आणि विद्याधरची मुद्देसूद पोस्ट हे त्यावेळी अतिशय योग्य होतं.
    पण आता मला मलाही नचिकेतप्रमाणे ह्या मूर्खपणाकडे दुर्लक्ष करावं असं वाटतं. अशाच काही कारणांसाठी मटा बंद केला होता. आज आता लोकसत्ता देखील बंद करावा काय असं सतत मनात येतंय. नाहीतरी फक्त रंगीबेरंगी जाहिराती, अशुद्ध, बाजारी भाषेतील लिखाण बघून रोज सकाळी डोकं फिरवून घेण्याची हौस नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. हो अनघा. मलाही नचिकेतचं म्हणणं मान्य आहे. किंबहुना कित्येकांना तसंच वाटत असेल. अर्थातच यापुढे मी त्याला टीआरपी मिळवून देणार नाही. इतर मार्ग आहेतच.

      Delete
  26. मी तीन-चार दिवस वाट बघत होतो की संपादक पत्राला काय प्रतिक्रिया देतायत त्याची..काही कळवलं का त्यांनी?
    कळवायला तोंड नसणारे...पण तरीही उत्सुकता आहे!
    एकूणच पत्रकारिता प्रकाराचा दर्जा घसरतोय..पण ब्लॉगिंगसारख्या विषयात वैयक्तिक पातळीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष टीका (अपमान) करायची वेळ पत्रकारांवर येणं हा खरंच गंभीर प्रश्न आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय चैतन्य. पण असो. आता संपला विषय.

      Delete
  27. बापरे, त्या माणसाच्या अकलेची धाव अगदीच १ फूट आहे, कुंपणापर्यंत सुद्धा नाही. तुम्ही कशाला मनस्ताप करून घेताय? अशा लोकांना स्वतःवर टीका झाली तरी भाव वधारल्यासारखं वाटतं. :) ते सुख कशाला मिळू द्यायचं त्याला?

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद केतकी. होय आता दुर्लक्ष करायचंच ठरवलं आहे.

      Delete
  28. तू त्याची अशाप्रकारे दखल घ्यावी हीच त्याची इच्छा असणार आणि तेच घडले :P
    त्याची इच्छा गेली तेल लावत आपल्या मनातली वटवट मनात का ठेवायची पण?
    लोकसत्ता वैगेरे प्रकारचे वर्तमानपत्र मी वाचत नाही त्यामुळे वरच्या गुप्त माणसाबद्दल काहीही कल्पना नाही याबद्दल क्षमा असावी .
    बाकी तू तुझ्या स्टायलने त्याला घेतला हे भारी केले ;)

    ReplyDelete
    Replies
    1. बाकी वरील प्रतिक्रिया एवढ्यासाठीच दिली कि लोकांना मी अजून जिवंत आहे हे समजावे ;) :D

      Delete
    2. कशाला जिवाला लावून घेताय राव. नाहीतर, लोकसत्ताने संपादकीय पानाची रया घालवणारे असे हे तद्दन, टाकाऊ, भंकस, बोगस आणि बुळचाट सदर का सुरु केलं हाच प्रश्न आहे. एकीकडे लिहीत नाहीत म्हणून..आणि दुसरीकडे ब्लाग का असेना मराठीत नव्या गोष्टीची भर पडतेय..ना. मग यांची का...खरतर अस्सल कोल्हापुरीत..त्याची काढायची इच्छा होतेय.पण..असो..त्याच्यात आणि आपल्यात फरक तो काय...

      Delete
    3. हो विक्रम. एकदा काय तो सोक्षमोक्ष लावायचाच होता. आता सुटलो.

      Delete
    4. धन्यवाद अनामिक...

      Delete
  29. नाठाळाचे माथी , हाणावी काठी
    द्यावी कानापाठी , तयाचीया

    नाठाळाचे मुखी , सदा जन निंदा
    नसे काही धंदा , तयालागी

    नाठाळाचे मनी , वाईट विचार
    तयाचा आचार , दुर्जनाचा

    नाठाळासी कधी , घालू नये भिक
    पाठीशी चाबुक , लावा त्याच्या
    कुबेर साहेब कुठल्याही मेल ला उत्तर देत नाहीत.

    एक जबाबदार संपादक म्हणून त्यांनी तमाम ब्लॉग विश्वातून होणार्या विरोधाची दखल आतापर्यंत त्यांनी घेतली पाहिजे होती, जे अजूनही घडले नाही म्हणूनच थोडे वाईट वाटते.

    अमोल सुरोशे (नांदापूरकर)

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अमोल. आपण आपलं काम केलं. त्यांना काय हवा तो निर्णय घ्यायला ते मोकळे आहेत. मात्र आपल्यासाठी हा विषय संपला आता हे नक्की.

      Delete

ब्रिटनच्या डोळ्यांत इस्लाम 'प्रेमा' चं झणझणीत अंजन घालणारा डग्लस मरे

गेल्या आठवड्यात डग्लस मरे ( Douglas Murray) या ब्रिटिश लेखकाचं ' द स्ट्रेंज डेथ ऑफ युरोप ' (The Strange Death of Europe) हे पुस्तक व...