Thursday, July 19, 2012

चिवड्याच्या गोष्टीची पोस्ट !

कुरियरने आलेला मोठ्ठा खोका हातात घेऊन मी दार बंद केलं. सपासप वार करून सेलोटेप्स कापून टाकून खोका उघडला. भारतातून आलेल्या खोक्यात एक प्रकारची मायेची ऊब असते, प्रेम असतं, जिव्हाळा असतो. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यात चिवडा असतो. भरपूर चिवडा.. ताजा, खमंग, चविष्ट चिवडा !! पूर्ण खोका भरून वेगवेगळया आकाराच्या ४-५ पिशव्या भरून झाल्यावर उरल्यासुरल्या जागेत दाण्याचे लाडू आणि तत्सम लिंबूटिंबू पदार्थ, १-२ पुस्तकं वगैरेही असतात. पण मेन रोलमध्ये कायम चिवडाच ! तर यावेळीही अशाच चार पिशव्या होत्या. तीन लहान, झिपलॉक वाल्या पिशव्या आणि एक भली मोठी पिशवी. सगळं घर चिवडामय झालं !!

झिपलॉकवाल्या छोट्या पिशव्या ऑफिसला न्यायला बऱ्या पडतील म्हणून वरती शेल्फात टाकून दिल्या. मोठी पिशवी खोक्यातून बाहेर काढली. ती मोठी म्हणजे खरंच खुपच मोठी होती. अवाढव्य.. एकदम ढब्बू. तिला लावलेले दोन रबर काढले आणि पिशवी उघडायला गेलो तर ती उघडेना. दोन्ही टोकं एकदम घट्ट चिकटून बसली होती. पुन्हा प्रयत्न केला तरी उघडेना. यावेळी मोठी पिशवी पण झिपलॉक आहे की काय अशा विचाराने त्याप्रमाणे उघडायचा प्रयत्न केला. पण इल्ला. कुठे सेलोटेप लावलाय का म्हणून शोधलं तर तसंही काही नव्हतं. कदाचित स्टेपल केलं असावं म्हणून बघितलं तर ते ही नाही. समोर एवढा चिवडा दिसतोय पण खाता येत नाहीये या विचाराने मी कासावीस झालो.

पुन्हा एकदा शांतपणे नीट लक्ष देऊन पिशवी नक्की का उघडत नाहीये ते बघायचं ठरवलं. नीट चेक केलं तर लक्षात आलं की पिशवीची दोन्ही टोकं अगदी घट्ट चिकटून बसली आहेत. म्हणजे अगदी सराईत, अगदी प्रोफेशनल काम असावं तसं, स्टेपल नाही, सेलोटेप नाही, झिपलॉक नाही तरी पिशवी का उघडत नाहीये? पूर्वी ते दुकानदार मेणबत्तीवर पिशव्या धरून पॅक करायचे तसं काही केलं की काय आईने? कैच्याकै... एवढं करण्याची काय गरज होती? आई म्हणजे ना. या युगात मेणबत्तीने पॅकिंग? माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. पण ते सुपरपॅकिंग बघून विश्वास ठेवण्याशिवाय दुसरा काही पर्यायही नव्हता. काय रे देवा. स्टेपल/सेलोटेपच्या युगात हे असं पॅकिंग? आता उघडू कशी ही पिशवी आणि खाऊ कसा चिवडा? खरं म्हणजे एव्हाना चिवड्याचे दोन-चार बकाणे भरून व्हायला हवे होते तर आमचं गाडं पिशवीमध्येच अडकलं होतं !

मी वैतागून मोठी कात्री काढली. हे म्हणजे मधमाशी मारण्यासाठी एके-४७ वापरण्यासारखं होतं. पण काही इलाज नव्हता कारण मधासाठी आपलं ते चिवड्यासाठी एके-४७ काय तोफ, रणगाडा काहीही वापरायला मी मागेपुढे पाहिलं नसतं. कात्रीने मी पिशवीचं वरचं टोक कापून टाकलं. यकश्चित पिशवी उघडण्यासाठी कात्री वापरण्याचा प्रसंग कित्येक वर्षांनंतर आला होता. पण इतिहासाकडे दुर्लक्ष करून पिशवीत हात घातला आणि बकाणा भरला. अहाहाहा.. काय तो ठसका, काय ती चव. बेस्ट एकदम. एवढ्या चविष्ट, खमंग, खुसखुशीत चिवड्याबद्दल मी आईला मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याचा गुन्हा माफ करून टाकला. नंतर थोडा चिवडा डिशमध्ये काढून घ्यावा म्हणून पिशवी उचलली आणि..................

...
..
.
.
.
.
..
...

आणि सगळं घर चिवडामय झालं !!!!!!!! माझ्या पायाशी चिवड्याची भलीमोठी रास तयार झाली. दुसऱ्या टोकाने पिशवी उघडी होती !! स्टेपलच्या पिनांचा त्रास होऊ नये किंवा पिशवी उघडताना सेलोटेप चिकटू नये यासाठी आईने पिशवीचं तोंड चांगलं ४-५ वेळा फोल्ड करून त्यावर चांगले दोन मोठे रबर लावून दिले होते (जे मी पोस्टच्या सुरुवातीलाच काढले होते). थोडक्यात मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याच्या मध्ययुगात आई नव्हती तर आईने असं केलं असेल असं वाटणारा मी होतो !!

ती रास बघून 'छोटा चेतन' मधली मुलं आईस्क्रीमच्या डोंगरात उड्या मारता मारता एकीकडे आईस्क्रीम खातात किंवा अंकल स्क्रुज (ज जेवणातला, जहाजातला नव्हे) त्याच्या पैशाच्या राशीत यथेच्छ डुबक्या मारतो तद्वत चिवड्याच्या राशीत अगदी डुबक्या मारल्या नाहीत तरी निदान तोंड तरी घालावं असं मला वाटून गेलं. पण तरीही तो मोह टाळून मी सगळा चिवडा पुन्हा त्या पिशवीत भरून ती पिशवी मस्त हवाबंद डब्यात भरून टाकली.

हल्ली कधी कधी चिवडा खाताना एखादा घास किंचित विचित्र लागला तरी चुकून मीठ/लिंबू वगैरे काहीतरी कमीजास्त झालं असेल किंवा नीट ढवळला गेला नसेल अशी स्वतःची समजून घालून मी त्या चवीकडे साफ दुर्लक्ष करून खमंग चिवड्याचा पुढचा घास तोंडात कोंबतो !!!

63 comments:

 1. हाहाहाहाहा.... थोडक्यात चिवड्यापायी वडा झाला म्हणायचा तुझा! ;)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. यप्प.. चिवडावडा ;)

   Delete
 2. हा हा हा हा ... लई भारी.

  आईच्या चिवडा हातचा चिवडा म्हणजे पर्वणी रे... :) :)

  ReplyDelete
  Replies
  1. हेहे आभार्स.. खरंच यार.. स्वर्गसुख एकदम !!

   Delete
 3. चिवडा !!!! कुठून घेते आई ???? पत्ता सांगा ! :) :)

  मस्त ! हे असे खोके मी आणि माझी आई भरभरून बऱ्याचदा अमेरिकेला पाठवत असतो ! त्यामुळे ही तुझी पोस्ट अगदी जवळची ! :) :)

  ReplyDelete
  Replies
  1. घेते? छे छे.. कंप्लीट होममेड. मी आईला नेहमी म्हणतो की तू चिवडा करून विकायला सुरुवात केलीस तर चितळे/पितळे रस्त्यावर येतील !

   Delete
 4. महिन्यातून चार वेळा असे चिवड्याचे बकाणे भरणार्‍या मला तुला असलेली चिवड्याची नॉव्हेल्टी काय समजणार बापडी... :(

  बाकी दाण्याच्या लाडवांना लिंबूटिंबू बोलायचं काम नाही!

  ReplyDelete
  Replies
  1. सांभाळून राजे. अतिपरिचयात् अवज्ञा नको व्हायला...
   (ही जळक्या कोल्ह्याची आंबट द्राक्षं आहेत हे नॉव्हेल्टीकुमार समजलेच असतील म्हणा ;))

   Delete
 5. चिवडाप्रेमापायी दाण्याचे लाडूसुद्धा लिंबूटिंबू ठरतात हे नव्यानेचं कळलं :-)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. होय खरं आहे. ठरतातच ;)

   Delete
 6. अहाहा चिवड्याची रास.... भारीच... चिवडा आपुनका भी विक पॉइन्ट... आता आईला सांगतेच करायला.... :)

  ReplyDelete
  Replies
  1. >> अहाहा चिवड्याची रास

   प्राची, आपली रास सेम दिसतेय ;)

   Delete
 7. चिवडा म्हणाला मी वेडा कुंभार

  ReplyDelete
 8. असं करतोस नां... म्हणून आम्ही तुला काही पाठवत नाही. :D

  आत्ता पिशवीतला चिवडा संपला की कारपेट खाली शोधत बसशील एखादा कण कुठे शिल्लक आहे का ते?

  ReplyDelete
  Replies
  1. >> कारपेट खाली शोधत बसशील

   झालं ते ही करून झालं.. तुला काही पाठवायचंच असेल तर रत्नांगिरीचे हापूस पाठव ;)

   Delete
  2. सिद्ध्या त्याला नको तर नको...मला पाठवं....आंबे, मासे, खडखडे लाडू...मोठीच लिस्ट आहे......मेलवरच बोलु ;)

   Delete
  3. मी कुठे नको म्हटलंय ? त्यालाही जर्सी जवळ आहे ओरेगावापेक्षा (कमी माईल्स ;) )

   Delete
 9. :) :) :)

  अहाहा!!!भारीच... चिवडा आपुनका भी विक पॉइन्ट...

  ReplyDelete
  Replies
  1. अरे वा.. अजून एक जण :)

   Delete
 10. आजच चिवड्याची ऑर्डर दिलीय रे... :)

  ReplyDelete
  Replies
  1. धन्स रोहणा.. पत्ता माहित्ये ना? ;)

   Delete
 11. हा हा हा एक नंबर :)

  चिवडा... मोठ्ठा विक पॉईंट, डिश खराब करायच्या भानगडीत आपण पडत नाही, डब्यातूनच सरळ बोकणा भरतो...

  ReplyDelete
  Replies
  1. हाहा.. अगदी अगदी नागेश.. डब्यातून तोंडात !

   Delete
 12. एकदम झकास सत्यवाना...!!!
  छान लिहिलंस... माझ पण कधी कधी होतं असं.. म्हणजे वाटतं कि आई चुकली...पण खर तर तसं नसतं...असुदे...तू कर मज्जा आणि हळू हळू खा ठसका लागेल :)

  ReplyDelete
  Replies
  1. >> म्हणजे वाटतं कि आई चुकली...पण खर तर तसं नसतं.

   अगदी अगदी अगदी परिचित !! त्यादिवशी मला अगदी सेम हेच वाटत होतं सारखं सारखं !!

   Delete
 13. आज चिवडा बनवावा म्हणते! :P

  ReplyDelete
  Replies
  1. इथे पाठवून दिलास तर मोफत 'कीवे' टेस्टिंग करून देईन ;)

   Delete
 14. म्हणून आम्ही आईला आमच्या लाडक्या दुकानातलं फ़रसाण, काजु कतली (ती सांगावी लागत नाही जावयासाठी आपोआप येते) आणि असंच सगळं मागवतो..अर्थात मग आमच्याकडे येतात ते लाडू..कितीही जगप्रसिद्ध डब्यात पार्सल केले तरी लाडूचं पीठच होतं हे आम्ही सांगायचं आणि तरी तिने निगुतीने ते एक एक करत नातवासाठी वळायचे हे गेली काही पार्सल सुरू आहे..
  इतक्या सुंदर, विनोदी फ़टकार्‍यांनी भरलेल्या पोस्टीवरही मला हळवं व्हायला काय होतंय रे...... :(

  ReplyDelete
  Replies
  1. चिवड्याच्या पोस्टीने हळवं व्हायला होणारच गो !

   Delete
 15. असो अवांतर लिहायचं राहिलं म्हणजे म्हणून आपल्या ब्लॉगमेळाव्याला मला दाण्यांचे लाडू मिळाले होते का??? मला चिवडा आवडतो हे जगप्रसिद्ध सत्य असतानाही...अर्थात लाडू पण य्म्म्म....:)

  ReplyDelete
  Replies
  1. होय. तू येण्याआधी चिवड्याचा फडशा पाडून झाला होता !!

   Heramb doesn't share chivada !! (हे "Joey doesn't share food" च्या तालावर वाचणे ;) )

   Delete
  2. http://www.youtube.com/watch?v=m6fq3Jkh9Es

   Delete
  3. व्हीडिओ दिलास ते बरं केलंस..:) you know the reaosn why....:P

   पण फ़ारा दिवसांपासून तुला जोईच म्हणायचं होतं....लाईक मांइड्स काय??
   हे हे चिवडा खाणारा जोई..आपलं चिवडा न देणारा जोई...:)

   Delete
  4. 'चिवडा न देणारा जोई'.. यप्प.. परफेक्ट !

   Delete
 16. तुझ्या ब्लॉगपोस्ट वाचायला वेळच मिळत नाही, कारण ऑफिसातून बॅन आहेत आणि घरून वेळ नसतो (पण आता बहुतेक मिळेल ;) हाहा). असो विषयांतर नको.

  तुझ्या ब्लॉगपोस्ट वाचणं एक निर्मळ आनंदाची गोष्ट असते तसंच या पोस्टच्या बाबतीत झालं. मजा आली.

  ReplyDelete
  Replies
  1. विषयांतर विशेष आवडलं गेलं आहे याची नोंद घेणे ;)

   मनःपूर्वक आभार मंदार.. म्हणजे विषयांतराबद्दल नव्हे, पोस्टबद्दल ! ;)

   Delete
 17. >>> मेणबत्तीने पिशवी पॅक करण्याच्या मध्ययुगात आई नव्हती तर आईने असं केलं असेल असं वाटणारा मी होतो !!

  चिवड्याचे दोन घास लवकर मिळेनात म्हणून काय काय म्हणून विचार करून होतो. असो ....

  चिवडा म्हणजे स्वर्गसुख.

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा सपा.. होय. झालं खरं असं :)

   >> चिवडा म्हणजे स्वर्गसुख.
   सौ टका सच !

   Delete
 18. चिवडा समोर असताना खायचा सोडून तुला मध्ययुग वगैरे आठवत होतं. श्या...

  बादवे, पेणला चिवडापण आणणार आहे. इकडे काय मस्त पाऊस पडतोय. चिवडा आणि उकडलेल्या शेंगा. आजूबाजूला जळका धूर ;-)

  ReplyDelete
  Replies
  1. अरे चिवडा 'समोर' नव्हता ना.. ;)

   >> आजूबाजूला जळका धूर

   $%^%&^&*@##%

   Delete
 19. हाहाहा.. चिवड्याची पिशवी लवकर न उघडणे.. लाडवांच्या डब्याचं झाकण घट्ट बसणे हे हमखास प्रकार होतातच.. चिवड्याचा घास तोंडात कोंबणार आता थोड्या वेळात :D

  ReplyDelete
  Replies
  1. अगदी अगदी.. मर्फीचे (देसी) नियम ;)

   Delete
 20. शेवटचं वाक्य डेंजर आहे.. :)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहा. अग वाटतं तेवढं डेंजर नाहीये ;)

   Delete
 21. _/\_

  कहर आहेस रे पोरा :)

  ReplyDelete
  Replies
  1. हेहे.. धन्स.. चिवडे के लिए कुछभी करेगा !

   Delete
 22. लईछ! तो अंकल स्क्रुजचा सीन आठवून हसायला आलं ..
  बादवे चिअवडाखानेके लिये हम किधर भी जा सकते हैं..

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा दीपक. धन्स... 'किधर भी' मध्ये जर्सी सिटी आहे ना? आजा बिनधास्त.

   Delete
  2. बेसिकली दिप्याला म्हणायचय... खाणे के लिए हम किधर भी जा सकते है.... :)

   Delete
 23. चिवडा खाताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या दृष्टीने हे आहे.. की प्रत्त्येक बोकाण्याबरोबर चिवड्यातले दाणे,डाळी,खोबऱ्याचा काप(अहाहा..),मिरची ह्यापैकी काहीतरी आलंच पाहिजे...(परत एकदा अहाहाहा...)
  आणि जो हे न बघता..न शोधता... बर्रोबर बोकाण्यात ह्यापैकी काहींचा समावेश करू शकतो.. तो खरा चिवडाकार......!! (कलाकार ह्या धर्तीवर)

  मजा आ गया चिवडा वाचके.... :)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. तू ही तरबेज चिवडाकार दिसते आहेस.. एन्जॉय :))

   Delete
 24. चिवड्या सारखाच खमंग प्रसंग आणि वर्णनही तेवढच रुचकर ... चिवड्याच्या राशींमध्ये मनसोक्त डुंबत असलेला अंकल स्क्रुज (हो तो जेवणातल्या ज वाला .. :) ) रूपातला हेरंब सारखा डोळ्यासमोर येतोय... :)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. आभार्स देवेनबिंदु ;)

   Delete
 25. हल्ली कधी कधी चिवडा खाताना एखादा घास किंचित विचित्र लागला तरी चुकून मीठ/लिंबू वगैरे काहीतरी कमीजास्त झालं असेल किंवा नीट ढवळला गेला नसेल अशी स्वतःची समजून घालून मी त्या चवीकडे साफ दुर्लक्ष करून खमंग चिवड्याचा पुढचा घास तोंडात कोंबतो !!!>>>

  हाहाहा... :) श्लेष... भारी होता....

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा.. धन्यवाद आनंदा.

   Delete
 26. एका चिवड्याची सीमा लांघून मनाला हळवं करुन सोडणारी गोष्ट, :)

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहा. चिवड्याचे सीमोल्लंघन.

   Delete
 27. 'माझे खाद्यजीवन' मध्ये पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे 'हा एवढा चिवडा कोण संपवणार?' असे म्हणून बघता बघता तो फस्त होऊन जातो आणि चिवडा संपल्यावरही हळूच त्याच्या तळाशी उरलेले तिखट-मीठ अंगठ्याने चेपून जिभेवर टेकवण्यात चिवडा खाण्याचा खरा आनंद आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. हाहाहाहा.. येल्लो और एक चिवडा बहाद्दर :D

   Delete

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...