मी : हे
तो : हाय
बरेच दिवस जातायेताना, प्रवेशद्वाराशी, एलिव्हेटरमध्ये, लॉबीत, पाण्याच्या फिल्टरजवळ, कॅन्टीनमध्ये गाठभेट होत असते. पण प्रत्यक्ष ओळख झालेली नसते. त्यामुळे आज ऑफिसमधून बाहेर पडताना तो दिसतो तेव्हा ओळख करून घ्यायची म्हणून मी आपणहून त्याला ग्रीट करतो. तो ही करतो. नाव, गाव वगैरे सांगून जुजबी ओळख होते. मी कॉफी प्यायला निघालेलो असतो आणि तो सहज वॉकसाठी. त्यामुळे आम्ही कॉफीशॉपच्या दिशेने चालायला लागतो. हळूहळू गप्पांना सुरुवात होते.
मला आधी तो मराठी वाटलेला असतो पण तो नसतो. [अर्थात त्यामुळे संभाषण हिंदीत होतं. परंतु ब्लॉग मराठी असल्याने संभाषणाचा भावानुवाद करतोय (खो-खो विरहित) ;) ]
मी : तू याच महिन्यात जॉईन झालास का?
तो : हो. पुढच्या आठवड्यात एक महिना होईल.
मी : कुठल्या टीममध्ये ?
तो त्याच्या ग्रुपचं नाव सांगतो.
मी : आधी कुठे होतास?
तो : मेनहेटनमध्ये.
मी : अच्छा. मनहॅटनमध्ये कुठे?
तो : मिडटाउन
मी (उगाच काहीतरी विचारायचं म्हणून) : सेंट्रल पार्कच्या जवळपास का?
तो : सेंट्रल पार्क??
मला त्याच्या प्रश्नाचा अर्थच कळत नाही. तो मला "सेंट्रल पार्क म्हणजे?" अशा अर्थाचा प्रश्न विचारतोय किंवा दुसरंच काहीतरी विचारतोय किंबहुना नक्की काय विचारतोय तेच क्षणभर कळत नाही. मी फक्त हम्म.. हुं... अशा काहीतरी निरर्थक अर्थाचं बोलून विषय बदलतो. (प्रसंगाचं गांभीर्य कळण्यासाठी : 'सेंट्रल पार्क' न्यूयॉर्कच्या मनहॅटन भागात मिडटाऊन आणि अपटाउन वगैरे परिसरात पसरलेलं अत्यंत विस्तीर्ण आणि अत्यंत प्रसिद्ध उद्यान आहे.)
तो न्यूयॉर्कमध्ये बहुतेक नवीनच आलेला असतो . बोलता बोलता आधी कुठे होतास, कुठे राहतोस वगैरे प्रश्नांची देवघेव होते. तो जवळपास दहा वर्षं न्यूयॉर्कमध्ये राहत आहे आणि त्यातली पाच वर्षं अपटाउनमधल्या एका कंपनीत होता हे ऐकून मी फक्त कोलमडायचाच बाकी राहतो. कधी एकदाचं ते कॉफीशॉप येतंय असं मला होऊन जातं. तिथे पोचतो तर नेमकी भलीमोठी रांग असते. आधीच्या धक्क्यातून जेमतेम सावरत असल्याने काय बोलायचं तेच मला कळत नाही.. आणि एवढ्या वेळ बडबड केल्यावर अचानक एकदम शांतही बसता येत नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी विचारतो..
मी : 'डार्क नाईट रायझेस' बघितलास का?
तो : परवा मुलांनी डीव्हीडी वर लावला होता. मी नाही बघितला.
मी : डीव्हीडी? अरे गेल्या आठवड्यात तर रिलीज झाला तो. डीव्हीडी कुठे मिळाली तुला? आधीचा भाग बघितला असेल त्यांनी.
तो : हो का? असेल असेल. त्यानंतर 'बीटल्स' ही लावला होता त्यांनी.
मी : 'बीटल्स' लावला होता? म्हणजे? बीटल्सचा कुठला अल्बम?
तो : अल्बम नाही चित्रपट.
मी : अरे 'बीटल्स' हा चित्रपट नाहीये.. असो... काही नाही.
तो : हो का? मला कल्पना नाही. मी इंग्रजी चित्रपट बघत नाही.
(............. छोटा पॉज .............)
मी : ______
तो : हिंदी बघतो
मी : (अरे वा वा)... एवढ्यात कुठला बघितलास?
तो : यलगार
मी : अरे तो तर किती जुना....... नाही.. काही नाही...
तो : ______
मी : ______
तो : ______
(................................................... मोठा पॉज ................................................... )
तोवर रांग थोडी पुढे सरकलेली असते.
मी : काय घेणार आहेस?
तो : म्म्म्म... माहीत नाही.. मी कधी घेतली नाहीये कॉफी.
मी : अरे हे दुकान नवीनच आहे. मीही जास्त वेळा नाही आलोय इथे.
तो : ह्म्म्म.
मी : जनरली काय घेतोस?
तो : मी बाहेर कधीच पीत नाही कॉफी.
मी : अच्छा
तो : तू काय घेतोस?
मी : कपॅचिनो.... सो.. तू कुठली टेस्ट करतोयस?
तो (काही वेळ समोरचा बोर्ड निरखून झाल्यावर) : मोचा
मी (बावरून इकडे तिकडे बघत) : यु मीन मोका?
तो : नाही रे. ते बघ. मोचा.
मी : (शक्यतो कमीतकमी शब्द वापरून आणि कमीत कमी उद्धट वाटेल अशा बेताने) अरे ते 'मोका' आहे.
तो : अच्छा. मी म्हणालो ना तुला मी कधीच बाहेर कॉफी घेत नाही.
मी ("अरे पण इतक्या वर्षांत निदान एकदा तरी ऐकलं/वाचलं/पाहिलं असशीलच ना?" हे सारे संवाद गिळून टाकून) : हम्म. चालायचंच !!!
तोवर रांग अजून पुढे सरकते आणि साहेबांचा नंबर येतो.
कॉफीवाली बाई : हाऊ कॅन आय हेल्प यु सर?
तो : वन मोचा.
कॉबा : एक्स्क्युज मी?
तो : वन मोचा.
कॉबा : यु मीन मोका?
तो : यस.
माझं लक्षच नाहीये असं दाखवत मी इकडे तिकडे बघायला लागतो. तो पैसे देऊन आणि 'मोचा'चा कप घेऊन बाजूला सरकतो. मी पुढे होतो.
कॉबा : हाऊ कॅन आय हेल्प यु सर?
मी : कॅन आय हॅव वन मोचा प्लीज?
कॉबा (चेहरा वेडावाकडा करत आणि कपाळाला प्रचंड आठ्या घालत) : डु यु (ऑल्सो) मीन मोका?
मी : य्या य्या.... वॉड्डेवर (च्या मायला) !!!
टीप : पोस्ट चुकून उद्धट वाटत असली तरी कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाहीये. आणि यात काडीचाही कल्पनाविस्तार नसून उलट थोडीफार 'टोन-डाउन'च केलेली आहे !

हा हा हा ... लैच ;-)
ReplyDeleteकंटाळा झटक रे भावा.... बिगीबिगी पोष्टि लिव :) :)
हेहे.. धन्स रे.
Delete>> कंटाळा झटक रे भावा
कंटाळा? अरे ११ दिवसांत २ पोस्ट्स (चित्रपटाची धरून ३) म्हणजे माझ्या आणि ब्लॉगच्याही दृष्टीने कामसूपणाची परिसीमा आहे ;)
चित्रपटाबद्दल वाचून मला क्षणभर तू माझाशीच बोलतो आहेस की काय असंच वाटलं!
ReplyDeleteहाहाहा पंकज. तू यल्गार युगात जगत नाहीयेस एवढं तरी नक्की ;)
Deleteकधी कधी एखाद्या अनोळखी माणसाबरोबर बोलताना असे अनुभव येतात कि वाटत झक मारली आणि ह्याच्याशी बोलायला सुरुवात केली ...
ReplyDeleteबाकी 'यलगार' ... :) :) :)
यप्प अगदी खरंय देवेन. तसंच काहीसं झालं माझं. :)
Deletenakki deshi asanar... sorry pan rahavat nahiye :)
ReplyDeleteश्रद्धा, हो देसीच आहे. :)
DeleteHahahah Yalgaar! Mahaprachand !
ReplyDeleteMuraariLal loga ki kami nahin duniya mein dost :)
Hehehe :D:D
हेहेहे.. अगदी अगदी. एक ढुंढो दस मिलेंगे !
Deleteप्रचंड प्रचंड भारी.....लोलकल्लोळ.
ReplyDeleteबाकी सवांद वाढवायला चित्रपट नेहमीच मदतीला येतात.(अस नाही)
आभार्स सपा..
Delete>> (अस नाही)
महाप्रचंड !! "असं नाही" हेच खरं !
कठीण आहे ! :D
ReplyDeleteएकदम :D
Deleteहाहाहा...
ReplyDeleteमी : आधी कुठे होतास?
तो : मेनहेटनमध्ये.
नक्की गुज्जू दिसतोय ;)
हाहा.. क्लोज.. राजस्थानचा आहे.
Deleteसा न वि वि...इथे भेटलात पण वर भेटू नका हो..असं माझी एक मैत्रीण म्हणायची त्याची आठवण झाली...
ReplyDeleteya whadever ने मला काय आठवल बर... :P
कणेकर ? फ़टकेबाज़ी ? मला तरी शीर्षक वाचून आधी तेच आठवलं ! :P
Deleteहाहाहा अपर्णा. अगदी तशा कॅटेगरीचा नाहीये :)
Deleteहम जानते है की तुला काय आठवलं.
संकेत, फटकेबाजी मध्ये असं आहे का? मला आठवत नाहीये आता.
Deleteहाहाहाहा... भारी किस्सा... मला माझ्या कॉलेजजीवनात घडलेला ’बास’(=='BUS') चा किस्सा आठवला !
ReplyDeleteहाहा. धन्स.. बास चा कुठला किस्सा?
Deleteलई भारी पोस्ट!!माझ्या बाबतीतहि बऱ्याच वेळा असंच होतं.काही बोलायला सुचलं नाही अनोळखी व्यक्तीशी कि movies विषयी बोलायला लागतो.
ReplyDeleteआभार्स.. अगदी अगदी.. चित्रपट आणि क्रिकेट हे कुठल्याही भारतीयाशी बोलण्यासाठी बेस्ट विषय आहेत. या दोन बाबतीत समोरच्याला इंटरेस्ट नसेल तर काय बोलायचं तेच कळत नाही !
Deleteaa bail muzhe mar......... kititari vel hasatiye:D
ReplyDeleteप्रतिक्रियेबद्दल आभार्स, अनघा..
Deleteब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.
काही माणसे लईच बोर असतात. आपल्या सारख्या वटवटरावांनी अशांच्या नादी लागून वेळ आणि मूड खराब करून घेऊ नये.
ReplyDeleteयप्प सागरशेठ.. पण ओळख होईपर्यंत बोरपणाची कल्पनाच नव्हती. आता सांभाळून असतो :)
Deleteहा हा हा :)
ReplyDeleteसाउथ इंडियन वाटला मला... आपल्यापेक्षा अगदीच भिन्न प्रकृतीची व्यक्ती समोर आल्यावर एक-एक क्षण सुद्धा युगासारखा वाटतो :)
धन्स प्राची. नोप. मारवाडी आहे.
Delete>> आपल्यापेक्षा अगदीच भिन्न प्रकृतीची व्यक्ती समोर आल्यावर एक-एक क्षण सुद्धा युगासारखा वाटतो :)
अगदी अगदी.. मलाही काय करावं तेच सुचत नव्हतं !
मारवाडी पण काय? आमच्या हापिसात एक साउथ इंडियन मोचा म्हणायचा :)
Deleteहाहाहा... भाऊ-भाऊ असतील ;)
DeleteHEHEHEHEHEHE Ashakya!
ReplyDelete:DDD.. आभार्स मंदार्स ;)
Delete:-D
ReplyDelete:-D
Delete:-D
Ha...Ha...Ha...Ya varun mala aathaval..Punyat jevha navin McDonalds suru zal tevha mitrane "McDonalds" ch naav asal bhayanak ghetal ki bassss....
ReplyDeleteAre ashi lok bhetat mhnun tar blog post la subject milato ;)
>> "McDonalds" ch naav asal bhayanak ghetal ki bassss....
Deleteहाहाहा.. मी कल्पना करू शकतो :P
>>>
ReplyDeleteमोचा
>>>
हाहा "लौघिंग" आउट लाउड :)
हाहाहा... मला आधी कळेना कुठून 'लॉग'आउट होतोयस.. लोल्झ..
Deleteअसा माणूस खरंच आहे?? ख्या ख्या ख्या....
ReplyDeleteहाहाहा.. यस.. १०१% आहे !
DeleteStill he got satisfactory marks in TOEFL or IELTS!!!!
ReplyDeleteHahaha.. Never checked with him.
Deletemast
ReplyDeleteधन्यवाद प्रवीण.
Deleteयल्गारच्या जमान्यातील आहे म्हणजे ह्याच्या कॉंप्यूटरवर लवकरच Y2K प्रॉब्लेम होणार :D
ReplyDeleteख्याख्याख्या.. नक्कीच !
Deleteमोचा.. खरा भारतीय आहे तो, बरोबर भारतीय उच्चार केला. जसे लेव्हीस, नाईक , लेव्ही स्ट्रस जीन्स वगैरे...
ReplyDeleteस्केड्य़ुल पण म्हणत असावा.. :)
हाहाहा.. खरंय :)
Deleteengliss ijj a phanni lang-veg... :-| :D
ReplyDeleteyassar. you tru said.
Deleteहा हा... ध्यान आहे अगदी ! :D:D:D
ReplyDeleteहाहाहा.. अग खरंच म्याड प्रकार आहे !
Delete