Sunday, June 27, 2010

मित्रेभ्या नमः : भाग २

** भाग १ इथे  वाचा

आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी....


रॉस गेलर (डेव्हिड श्विमर) : मोनिकाचा मोठा भाऊ, अतिशय हुशार त्यामुळे लहानपणापासूनच आईवडिलांचा लाडका आणि एक्झॅक्टली त्याच कारणामुळे मोनिकाचा नावडता असलेला, पीएच.डी., पेलिऑन्टॉलॉजिस्ट (म्हणजे बहुतेक भूगर्भशास्त्रज्ञ चुभूद्याघ्या), विज्ञानाची प्रचंड आवड, रेचलवर नववीमध्ये असल्यापासून अतिशय प्रेम करणारा पण ते प्रेम कधीच व्यक्त करू न शकणारा, घाबरट तर इतका की लोएस्ट-स्पीड लिमिटपेक्षाही हळू गाडी चालवल्याने लायसन्स जप्त करून घेणारा, तीनदा लग्न झालेला (पहिल्या बायकोशी ती लेसबियन असल्याने तर दुसरीशी लग्नाच्या दिवशीच झालेल्या गैरसमजांमुळे घटस्फोट), विज्ञान (डायनोसॉर्स, पेलिऑन्टॉलॉजी) आणि रेचलवर जीवापाड म्हणजे अगदी प्रचंड प्रेम करणारा आणि त्यासाठी आपल्या जवळच्या मित्रांशीही वेळोवेळी भांडणारा, चँडलरचा क्लासमेट आणि अतिशय जिवलग मित्र. असा हा अनेकानेक गुणविशेष असलेला आणि अनेक रूपडी असलेला 'रॉस' डेव्हिड श्विमरने आपल्या अप्रतिम अभिनयाने खासच रंगवलाय.

चँडलर बिंग (मॅथ्यु पेरी) : याचं सगळ्यांत मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सतत पीजे मारत राहणं, सदैव हलके फुलके विनोद टाकत राहणं. अगदी अगदी नॉनस्टॉप.. नवीन नवीन विचित्र शब्द वापरणं, चित्रविचित्र चेहेरे करत राहणं. पूर्ण ग्रुपमध्ये चांगली नोकरी, चांगला पगार असणारे चँडलर आणि रॉस हे दोघेच.
चँडलर हा जोईचा रूममेट आणि बेस्टबडी. सहाव्या सिझनमध्ये चँडलरचं मोनिकाशी अफेअर सुरु होऊन नंतर त्यांचं लग्न होण्याआधीपर्यंतचा चँडलर डेडली आहे. एकदम भन्नाट. लाईव्हली. त्याच्या बिनडोक जोक्स वर हसता हसता गडबडा लोळायची पाळी येते. याने आणि जोईने पहिले ५-६ सिझन्स नुसता धुमाकूळ घातला आहे. लग्नानंतर मात्र जरासा हळवा, शांत, किंचित दबून राहणारा असा वेगळाच चँडलर आपल्या दृष्टीस पडतो. मोनिका किंचित जास्त डॉमिनेटिंग दाखवली असल्याने 'चँडलर बिंग'चं धुंवाधार पात्र शेवटच्या ३-४ सिझन्समध्ये थोडसं मागे पडल्यासारखं वाटतं. चँडलरचे आधीचे विनोद, बाष्कळ बडबड, चमत्कारिक शब्दप्रयोग आणि विचित्र हावभाव हे सगळे लग्नानंतर एकदम कमी होऊन जातात. मला तरी वाटलं असं. पण त्याआधीचा चँडलर बघणं म्हणजे एक मेजवानी आहे.

जोई ट्रिबियानी (मॅट ले-ब्लांक) : मुद्दाम मी जोई उर्फ जोसेफ ट्रिबियानीला शेवटी ठेवलं कारण याच्यावर लिहिता लिहिता माझा माझ्यावरच कंट्रोल राहणार नाही. फ्रेंड्समधलं हे माझं सगळ्यांत आवडतं पात्र. हो फिबीपेक्षाही किंचित वरच. कारण फिबी आणि याच्या बिनडोकपणामध्ये थोडा फरक आहे असं मला वाटतं. फिबी जेन्युइन बिनडोक वाटत नाही. कधी कधी ती निरागस, हलकीफुलकी, मुद्दाम येडेपणाचा आव आणणारी वाटते. पण जोई. अहं.. !!! १००% ओरिजनल, जेन्युइन, होममेड बिनडोकपणा बघायचा असेल तर या माणसाकडे बघावं. कम्प्लीट ट्यूबलाईट.. ९५% पीजे किंवा नॉर्मल जोक्स या माणसाला जवळपास १० मिनिटांनी कळतात आणि उरलेले ५%......... अहं.. नाही.. मुळीच नाही. उरलेले ५% जोक्स याला कळतच नाहीत..  इटालियन अमेरिकन. सहा बहिणी असलेल्या भल्या मोठ्या कुटुंबातला एकटा मुलगा. पेशाने कलाकार. फालतू जाहिरातींपासून ते भिकार नाटकांपर्यंत कशातही कामं करणारा. टीव्ही शोमध्ये प्रमुख भूमिका मिळवायचं स्वप्न बघत असणारा. (ते स्वप्न काही काळ पूर्णही होतं आणि मग त्याच्या स्वतःच्याच बिनडोकपणामुळे धुळीला मिळतं.). पण हा माणूस आवडण्याचं खरं कारण म्हणजे याचा प्रचंड बिनडोकपणा, बावळटपणा, वेंधळेपणा त्यातून निर्माण होणारे एकापेक्षा एक भयंकर विनोद, अफलातून संवाद आणि त्याचं 'अचूक' हा शब्दही थिटा पडावा इतकं भन्नाट टायमिंग. रुममेट असल्याने चँडलर याचा भयानक लाडका आणि बिनडोकपणाची लेव्हल सेम असल्याने फिबीही खूप आवडती. साधारण सहाव्या/सातव्या सिझनपासून म्हणजेच जिथपासून चँडलरचा प्रभाव कमी व्हायला लागतो तिथपासून जोईचं अधिराज्य सुरु होतं. शेवटचे ४-५ सिझन हा मनुष्य नुसता चेकाळल्यासारखा सुटलाय. याचे अनंत किस्से आहेत ते असे इथे ३-४ ओळीत सांगता येणार नाहीत. त्यासाठी त्याला पडद्यावर वावरतानाच बघायला हवं. आणि त्याने फ्लर्टिंगच्या दुनियेत अजरामर केलेल्या 'हाऊ यु डुइन' या डायलॉगला आणि ते म्हणण्याच्या त्याच्या युनिक शैलीला कोण विसरेल !!!!

खरं म्हंटलं तर ओळखच प्रमुख कार्यक्रमापेक्षा जास्त लांबली. पण ओळख आणि प्रमुख कार्यक्रम हे एकमेकांत इतके गुंतलेले, गुंफलेले आहेत की काही इलाज नव्हता. सगळ्यांचे स्वभाव विशेष सांगितले तरी सगळ्यांचं एक कॉमन स्वभाववैशिष्ट्य म्हणजे हे सगळे एकदम अनप्रेडिक्टेबल आणि एकदम इम्पल्सिव्ह आहेत. कधी काय होईल, काय करतील, कसे वागतील काहीच सांगता येणार नाही. म्हणजे एखादा प्रोग्राम बघून मोनिका शेअर ट्रेडिंग काय करायला लागते किंवा कॅरेबियन बेटांवर जाऊन तिकडच्या बायकांसारखे केसांचे विचित्र प्रकार काय करून घेते, फिबीला एकाच वेळी दोन-दोन बॉयफ्रेंडस काय आवडायला लागतात किंवा अचानक गाण्याचा अल्बम काढावासा किंवा केटरिंगचा बिझनेस करावासं कसं वाटायला लागतं, अचानक पैसे आहात आल्यावर जोई चित्रविचित्र वस्तूंनी आणि फर्निचरने घर कसं भरून टाकतो किंवा खिशात दमडीही नसताना निव्वळ भावनेच्या भरात लिलावात एक मोठं जहाज विकत घेण्यासाठी सर्वोच्च बोली कशी लावतो (अर्थात त्याचं खरं कारण म्हणजे लिलावात बोली लावून जिंकलेल्या गोष्टी आपल्याला विकत घ्याव्या लागतात हे या सदगृहस्थाला माहीतच नसतं :) ), चँडलरला आपलं नावच कसं अचानक आवडेनासं होतं आणि ते बदलण्याची त्याची धडपड कशी चालू होते किंवा अचानक त्याचा त्याच्या अतिशय चांगल्या नोकरीतला इंटरेस्ट कसा संपून जातो आणि तो ती सोडून देऊन दुसरी नोकरी कशी शोधायला लागतो, घरात एकट्याला कंटाळा येत असल्याने रॉस एक माकडच कसं पाळतो किंवा दोन वेगवेगळया लांबलांबच्या कॉलेजेसमध्ये शिकवताना न्यूयॉर्कच्या रस्त्यांतून स्केटिंग करत कसा जातो, आपल्या तिसाव्या वाढदिवसाला रेचल जोरजोरात रडायला कशी लागते किंवा हजार डॉलर्सची अशक्त, फिकट दिसणारी एक घाणेरडी मांजर विकत घेऊन ठेवते हे असे प्रकार चालू असतात. हे सगळे आत्ता संदर्भ सोडून सांगितल्याने विचित्र वाटणारे (आणि खरेही तेवढेच विचित्र असणारे) प्रकार प्रत्यक्षात बघणं म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे. सगळी टेन्शन्स, कटकटी, वैताग तात्पुरते का होईना पिटाळून लावण्याचा एक बेष्ट उपाय.

माझं अजून एक निरीक्षण म्हणजे सगळे सिझन्स एकापेक्षा एक जबरदस्त आहेत यात वादच नाही पण सहाव्या सिझनमध्ये हे गणित काहीतरी कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. तुलनेने रटाळ एपिसोड्स किंवा पात्रांना जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा येतात असं दाखवून जुन्याचा एपिसोड्समधल्या गोष्टी, किस्से पुन्हा पुन्हा दाखवले आहेत. तेव्हा त्यांच्याकडे नवीन कथा/कल्पना नसाव्यात किंवा टीममध्येच काहीतरी गडबड झाली असावी असा संशय उगाच येऊन जातो. पण हा एक सिझन सोडला तर बाकी सगळे सिझन्स म्हणजे नुसता धुमाकूळ आहे.

जाता जाता माझ्या प्रचंड आवडत्या काही निवडक एपिसोड्सची एक यादी देतो. जे नियमित फ्रेंड्स बघतात किंवा दहाही सिझन्स अनेकदा बघितले असणारे माझ्यासारखेच फ्रेंड्स-वेडे नक्कीच या यादीशी सहमत होतील. चुकूनमाकून काही भारी एपिसोड्स टाकायला विसरलो तर आठवणीने कमेंट्समध्ये टाका. हे कुठल्याही क्रमाने नाहीत. कुठलाही एपिसोड कधीही आणि कितीही वेळा बघितला तरी कधीच कंटाळा येणार नाही याची १०१% खात्री.

१. पोकर : यात मुलं विरुद्ध मुली असा पोकरचा सामना रंगतो. मुलींना आधी पोकर अजिबात खेळता येत नसतो आणि मग त्या एका पोकरतज्ज्ञ बाईकडून पोकर शिकतात आणि मुलांची वाट लावतात असा काहीसा हा एपिसोड. पण भन्नाट विनोदांनी आणि आचरट प्रकारांनी भरलेला.

२. फुटबॉल : यात रॉस गेलर आणि कंपनी वि. मोनिका गेलर आणि कंपनी असा अमेरिकन फुटबॉलचा (आपला सॉकरवाला फुटबॉल नव्हे) 'गेलर कप' साठीचा सामना रंगतो. ते खेळतानाची धमाल, गोल्स, मध्येच एका डच मुलीचं अवतरणं, तिच्यावरून जोई आणि चँडलरमध्ये रंगलेले वाद, रॉस आणि रेचलचं वेगळ्याच कारणावरून झालेलं भांडण अशा भारी यात गोष्टी आहेत.

३. क्विझ : एका साध्या गोष्टीवरून पैजा लागून शेवटी मोनिकाचं अपार्टमेंट (फ्लॅट) डावावर लावलं जाईपर्यंत प्रकरण चढत जातं. स्पर्धा असते कोण कोणाला किती जास्त ओळखतं, कोणाला एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी जास्त माहित आहेत याबाबत. मोनिका आणि रेचल वि. जोई आणि चँडलर अशा टीम्स असतात. प्रश्न काढणारा आणि जजगिरी करणारा असतो रॉस (फिबीचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं या एपिसोडमध्ये त्यामुळे ती क्विझमध्ये नाहीये.). तर या प्रकारात एकेक भन्नाट प्रश्न, त्यांची तितकीच भन्नाट उत्तरं, शेवटी लायटनिंग राउंड आणि त्याचा धक्कादायक निकाल सगळंच तुफ्फान मजेशीर.

४. चँडलर आणि जोई वेगळे होतात आणि परत एकत्र येतात ते तीन एपिसोड्स : छोट्याशा कारणावरून गैरसमज होऊन जोई चँडलरच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडतो. पण दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नाही. तेवढ्यात चँडलरला एक दुसरा रूममेट मिळतो. पण तो जाम विक्षिप्त आणि चक्रम असतो. काही दिवसांनी चँडलर आणि जोई पुन्हा एकत्र येतात. हे तीन एपिसोड्स जबरदस्त आहेत. जाम धमाल येते बघायला. नुसतेच हसवतात असं नाही तर कधीकधी नकळतपणे डोळ्यात थोडंसं का होईना पाणीही आणतात.

५. रेचलची बहिण (क्रिस्टीना अ‍ॅपलगेट) थँक्सगिव्हिंगला येते तो एपिसोड : या एपिसोडमध्ये क्रिस्टीना अ‍ॅपलगेटने रेचलच्या बावळट बहिणीचं काम अप्रतिम केलं आहे. छोट्याछोट्या गोष्टींवरून तिची आणि रेचलची होणारी भांडणं, तिचं मंदासारखं वागणं, विचित्र प्रश्न विचारणं आणि साध्या प्रश्नांना महाबिनडोक उत्तरं देणं हे सगळे प्रकार बघून हसून हसून तोंड फाटायची पाळी येते.

६. जोई चँडलरला पेटीत कोंडून ठेवतो तो एपिसोड : चँडलरने केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे चँडलर आणि जोईमध्ये कडाक्याचं भांडण होतं. चँडलर जोईची हजार वेळा माफी मागतो आणि तो म्हणेल ते करायला तयार असतो. तेव्हा जोई त्याच्या चमत्कारिक स्वभावाप्रमाणेच चँडलरला एका पेटीत कोंडून घेण्याची चमत्कारिक शिक्षा करतो. (अर्थात तो असं का करतो त्यालाही एक पार्श्वभूमी आहेच.) आणि त्यादरम्यान अनेक भयंकर विनोदी आणि काही अतिशय हळवे प्रसंग घडून जातात. पहायलाच हवा असा हा एपिसोड..

७. लॉटरी : सगळेजण मिळून काही लॉटरीची तिकिटं घेतात. पण फिबीच्या मुर्खपणामुळे ती रस्त्यावर पडतात. ती कुठल्यातरी माणसाला सापडून तो माणूस रातोरात करोडपती होतो. त्यामुळे सगळे फिबीवर जाम वैतागतात. त्यावेळी फिबीची माफी मागण्याची अनोखी पद्धत आणि त्या अनोख्या पद्धतीतली गंमत न कळल्याने वेड्यासारखा वागणारा जोई. हे सगळं बघताना हसून हसून वाट लागते.

८. रॉस आणि रेचलचं ब्रेकऑफ होतं तो एपिसोड : काही विनोदी संवाद सोडले तर हा एपिसोड बघायला खूप कठीण जातो. एकदम हळवं व्हायला होतं. खूप छान रंगवलेला प्रसंग !!

असे अजूनही चिक्कार एपिसोड्स आहेत किंवा काही काही एपिसोड्स मधले निवडक प्रसंग आहेत जे या यादीत टाकता येतील. पण कुठलाही प्रसंग असो की कुठलाही संवाद, त्यांची प्रेक्षकांना क्षणभरात आपलंसं करून घेण्याची, सगळी टेन्शन्स विसरायला लावून त्यांच्या चेहर्‍यावर एक छोटीशी का होईना स्मितरेषा आणण्याची आणि बघता बघता त्या छोट्या स्मितरेषेचं नाना पाटेकरच्या मंदूने (मंदिरा बेदीने) केळं आडवं खाल्ल्यावर तिचं हसणं जसं दिसतं तितक्याच आडवेपणाने आपल्याला हसायला लावण्याची हातोटी वादातीत आहे.

अर्थात फ्रेंड्सवर अशीही टीका झाली की यातले विनोद

१. खूप उथळ आहेत.
२. खूप प्रेडिक्टेबल आहेत
३. खूप बालिश आहेत.
४. तोचतोचपणा आहे.
५. दर्जाहीन आहेत.

वैयक्तिकरित्या मला यातला एकही आरोप मान्य नाही. कारण सगळ्या (हो जवळपास ९९%) विनोदांचा दर्जा, निवड खूप उच्च आहे, सगळे विनोद, त्यांची शैली फार वेगळी आहे त्यात अजिबात काहीही प्रेडिक्टेबल नाही, बालीशपणा किंवा तोचतोचपणा तर अजिबात नाही. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती !!

पण मला मात्र हे मित्र अतिशय प्राणप्रिय आहेत, अतिशय जिवलग आहेत आणि याचं कारण फ्रेंड्सच्याच भाषेत सांगायचं झालं तर

No one could ever know me
No one could ever see me 
Since you're the only one who knows what it's like to be me 
Someone to face the day with 
Make it through all the best with 
Someone who always laughs at 
Even when I'm at my worst, I'm best with you
Yeah!
I'll be there for you
I'll be there for you...... !!!!

या रेम्ब्रंड्सच्या गाण्याचे पूर्ण शब्द पुढीलप्रमाणे. ते इथेही मिळतील.


So no one told you life was gonna be this way
Your job's a joke, you're broke, your love life's D.O.A.
It's like you're always stuck in second gear
When it hasn't been your day, your week, your month, or even
your year, but

{Chorus}

I'll be there for you
When the rain starts to pour
I'll be there for you
Like I've been there before
I'll be there for you
'Cause you're there for me too

You're still in bed at ten and work began at eight
You've burned your breakfast so far, things are going great
Your mama warned you there'd be days like these
But she didn't tell you when the world has brought you down to your knees, and

{Chorus}

No one could ever know me
No one could ever see me
Since you're the only one who knows what it's like to be me
Someone to face the day with
Make it through all the best with
Someone who always laughs at
Even when I'm at my worst, I'm best with you
Yeah!

{Chorus}

I'll be there for you
I'll be there for you
I'll be there for you
'Cause you're there for me too
 


* सर्व 'मित्रचित्रां'साठी अर्थातच गुगल नावाच्या फ्रेंडचे आभार !!

33 comments:

 1. मस्तच रे !
  आजून फ्रेंड्स सीरीझ पूर्ण पाहिली नाहीये. लगेचच कामाला लावतो इंटरनेट ! :)

  ReplyDelete
 2. नचिकेत, तुझ्यासारख्या सिरीजवेड्याने फ्रेंड्स सिरीज बघितली नाहीये म्हणजे आश्चर्यच :) .. इंटरनेट कामाला लाव आणि पटकन बघून टाक !!

  ReplyDelete
 3. सत्यवाना....फ्रेण्ड्स सिरीज घेऊन आलोय मित्राकडून...आता आजपासून सुरूवात करतो पाहायला....

  आपण जी माहिती आम्हा सोबत शेअर (मराठी प्रतिशब्द आठवत नाही रे) त्याबद्दल मंडळ आपल आभारी आहे.

  ReplyDelete
 4. एकदम फेवरिटचा आवडता विषय आहे की रे!
  तो एपिसोड ज्यामध्ये रिचेल आणि फिबी जोईला विचारतात, त्यांना माहिती आहे का की आम्हाला माहिती आहे ते?
  आणि इकडे मो.चॅं. त्याला विचारतात, जोई, त्यांना माहिती आहे हे आम्हाला माहिती आहे हे त्यांना सांगू नकोस.. :))
  त्यावेळेचे जोईचे एक्सप्रेशन्स भन्नाट!
  BTW, मला चॅंडलर आवडतो, लग्नानंतर त्याला उगाचच दबल्यासारखा दाखवला.:(

  ReplyDelete
 5. मी बहुधा आता संपूर्ण सिझन्सचा सेट मिळतोय ते विकत घेतेय. तू एवढं लिहिलंयंस की काही एपिसोड्स मी न पाहिल्याची रूखरूख लागून राहिली आहे.

  ReplyDelete
 6. मी फ्रेंड्सचा एकही एपिसोड धड नाही बघितला...
  होय मी खरंच सांगतोय...
  म्हणूनच मागल्या पोस्टलाही कमेंटलो नाही..काय कमेंटावं हा विचार करत होतो...लोक काय काय म्हणतील अश्या युगपुरुषसुलभ लज्जेमुळे गप्प होतो..
  असो...आता मी बोललोय..हलकं वाटतंय...
  कधी बघेनसं वाटतही नाही..का ठाऊक नाही! खरंच, ह्यात उगाच कसलाही माज़, शोबाजी नाही...
  हार्ड डिस्कवर सगळे एपिसोड्स आहेत..अनेकांना देऊन पुण्यही कमावलंय..पण स्वतः कधीच नाही पाहिले...
  असो...पाहू कधी योग आला तर..ईश्वरेच्छा बलीयसी!

  ReplyDelete
 7. मी सर्व सिजन (सहावा देखील) मिळवून पाहणारच... नंतर पारायणं आलीच....

  ReplyDelete
 8. अरे सही योगेश. लगेच कामाला लागलास पण. मस्तच. बघून झाले की कळव कसे वाटले ते. अर्थात सगळे सिझन्स बघून व्हायला ३-४ (किंवा जास्तच) महिने लागतील निदान. ~ २५० एपिसोड्स !!

  ReplyDelete
 9. अरे वा मीनल. तुझाही फेव्हरेट चा आवडता वाटतं.. मज्जाच..

  हा हा हा हा. आठवला तो एपिसोड. मो.चॅं. चं प्रकरण लपवतानाचे जे ५-६ एपिसोड्स आहेत त्या सगळ्यांत जोईचा अभिनय जब्बरदस्त आहे एकदम. वाट लागते हसून हसून.

  >>लग्नानंतर त्याला उगाचच दबल्यासारखा दाखवला.:(

  हो ना. जुना चॅंडलर जाम भारी होता.

  ReplyDelete
 10. कांचन, यस्स... मस्तच.. घेऊन टाक !

  अग आणि अजूनही बरेच एपिसोड्स आहेत की पूर्ण एपिसोड नाही पण काही काही सिन्स जामच भारी आहेत. मीनलने वर सांगितलेला एपिसोड. किंवा रॉस आणि जोईचं भांडण होतं तो दहाव्या सिझनमधल्या एपिसोडमधला एक सिन.. बरेच बरेच आहेत.. सगळे संपवून टाक म्हणजे रुखरुख संपेल :)

  ReplyDelete
 11. युगपुरुषसुलभ लज्जा !! हा हा ..

  तुला खरं सांगू का 'माज़, शोबाजी' म्हणून बघत नसतास तर एक वेळ चाललं असतं. काहीच कारण नसताना न बघणं हे पटायला अवघड जातंय. म्हणून सांगतो. प्लीज बघच. एका युगपुरुषाने दुसर्‍या युगपुरुषाला केलेली विनंती समज ;) ..

  भाग-१ ला ऋयामने दिलेली प्रतिक्रिया बघ. त्यातही त्याने तेच म्हटलंय.

  ReplyDelete
 12. आनंदा, बघच रे. आणि सहावा तर नक्कीच बघ त्याशिवाय तुला इतर सिझन्सचं महत्व कळणार नाही ;) .. अर्थात सहावाही खुप्प्प्प बोरिंग नाहीये. जुने जुने सिन्स बघायला मजाच येते. पण तरीही.

  आणि एकदा व्यसन लागलं की पारायणं आपोआप सुरु होतातच. स्टार वर्ल्ड वर रात्री ११:३० किंवा १२:३० (depending on EST/EDT.. डेलाईट सेव्हिंगचा आणि स्टार वर्ल्डच्या वेळेचा काय संबंध हे विचारू नकोस.) ला आणि पाहते ६:३० ला असतं.

  ReplyDelete
 13. दोन्ही पोष्टा ब्येश्टच झाल्यात..माझंही friends ची नातं थोडंसं तुझं माझं जमेना प्रकारचं आहे....पण बर्‍यापैकी पाहिलंय..फ़क्त मी पाहायला लागले तेच त्यांच्या शेवटच्या सिझनला आणि तेव्हा ते थोडं उतरलं होतं म्हणून मग नंतर पुन्हा पाहिलं तेव्हा आधीपेक्षा बरं वाटलं...अर्थात घरातच त्याचा डाय हार्ड पंखा असल्यामुळे मग एकदा त्याला गिफ़्ट म्हणून एक सिझन दिलाही...:)

  Minal's fav dialogue is even mine...
  DO they know that they know that we know....asa kahi tari pan phoebee solid mast mhanate te...:)

  ReplyDelete
 14. अपर्णा, अग एकदा १ ते १० असे सगळे सिझन्स लायनीत बघून टाक मग बघ 'तुझ्यावाचून करमेना' असं नातं होऊन जातं की नाही ते.
  चला कोणीतरी आहे ना डाय हार्ड पंखा.. ते महत्वाचं.

  आणि त्या "you know i know they don't know" वाल्या डायलॉगला जोईने जे एक्स्प्रेशन्स दिले आहेत त्याला तोड नाही.. खरंच !!

  ReplyDelete
 15. फ़्रेंडस पाहायची उत्सुकता अजुन चाळवलीस हया पोस्टातुन..
  मला तुझ्या आवडत्या एपिसोडसच्या टोरंट लिंक्स मेल कर ना..

  ReplyDelete
 16. आभार देवेन.. अरे एकदा बघायला लागलास की नियमित बघायला लागशील. ते एपिसोड्स नक्की कुठल्या सिझनमध्ये आहेत ते मला आठवत नाहीये. पण सगळे सिझन्स बघण्याजोगे आहेत. सगळ्या सिझन्सच्या टोरंट्स इथे मिळतील.

  http://thepiratebay.org/search/friends%20season/0/99/0

  ReplyDelete
 17. Wikipedia saathi lihile ahes vatate article.

  Tithe publish kar.

  Comprehensive and perfect.

  I too love this show and agree to all your observations.

  Wish it ran further..

  ReplyDelete
 18. हेरंबा अगदी मस्त. मीही कधी मालिके च्या वाट्याला जात नाही.
  अगदी वर्षभर पडुन होते हे डीस्कवर. आणि सारखे सारखे चित्रपट पाहुन कंटाऴालो म्हणुन एक भाग पाहिला आणि काय सांगु तुला‌ पंखा झालो मी या मालिकेचा. तीन दिवसात सगळे सिझन पाहुन काढले.

  ReplyDelete
 19. आभार नचिकेत. हे फ्रेंड्स डोक्यात एवढे घट्ट बसले आहेत की आपोआप पोस्टमध्ये उतरले :-)

  आज प्रथमच कमेंट दिलीस. ब्लॉगवर स्वागत.. !!

  ReplyDelete
 20. धन्स सचिन.. अगदी अगदी. माझंही असंच काहीसं झालं होतं पण एकदा फ्रेंड्स बघितलं की त्याचं अक्षरशः व्यसन लागतं.

  तीन दिवसांत सगळे सिझन्स? बाब्बो !!! दिवसरात्र तेच बघत होतास की काय ? :D

  ReplyDelete
 21. हेरंब, अरे माझी एक ड्राफ्ट पोस्ट इथे प्रसिद्ध केलीस की तू इथे ;)

  माझा आणि सिरियल्सचा संबंध कमीच. पण जर्मनीत असताना चौथा सिझन मिळाला, आणि मग बाकी सगळे सिझन मिळवून बघितले. घरी एकटीने जेवताना रोज एक तरी एपिसोड बघायचा जो नेम सुरू झाला, तो माणसांमध्ये परतल्यावर सुद्धा मोडायला जड जातो. कुठेही, कधीही वीस मिनिटं मिळाली की पुढचा एपिसोड बघायलाच लागतो. कितवं पारायण याचा हिशोब नाही उरला आता.

  तुझ्या ‘बेस्ट ऑफ फ्रेंड्स’मध्ये ’उनागी’चा एपिसोड कसा नाही?

  ReplyDelete
 22. हा हा गौरी.. तूही टाक की एक पोस्ट. माझ्या पोस्ट मध्ये बरंच काही कव्हर व्हायचं राहिलं असू शकतं. आणि तुझ्या व्ह्यू मध्ये वाचायला मजा येईलच.

  चौथा सिझन. वॉव. म्हणजे तू वन ऑफ द बेस्ट सिझननेच सुरुवात केलीस तर. मग तर त्याचं व्यसन लागणारच..

  मीही पारायणांचा हिशोब ठेवणं कधीच सोडून दिलंय.

  'उनागी' राहिला खरा. अजूनही काही राहिले असावेत.. उनागी म्हंटल्यावर मला आत्ता दोन बोटं वळवून चेहर्‍यावर चित्रविचित्र भाव आणून ओरडणारा रॉस डोळ्यासमोर उभा राहिला.. हेहे..

  ReplyDelete
 23. guess what... मी अजुन हि मालिका पाहिली नाही. इतकं ऐकुन आहे... पण कधी ईच्छा झाली नाही. someday in future... :)

  ReplyDelete
 24. सौरभ :) .. खरं सांगायचं तर माझा विश्वास बसत नाहीये.. :) ..

  ठीक्के.. वेळ मिळेल तेव्हा सुरु कर. बेटर लेट दॅन नेव्हर... but it's a MUST WATCH !!

  पहिल्या भागावर ऋयामने दिलेली प्रतिक्रिया वाच. माझं अगदी हेच म्हणणं आहे :)

  ReplyDelete
 25. १. खूप उथळ आहेत.
  २. खूप प्रेडिक्टेबल आहेत
  ३. खूप बालिश आहेत.
  ४. तोचतोचपणा आहे.
  ५. दर्जाहीन आहेत....

  असं बोलतात लोकं ? वेडे कुठले ! लक्ष नको रे देऊ तू त्यांच्याकडे ! I'll be there for you...!
  :p :D

  ReplyDelete
 26. अग हो ना.. असं बोलणारे लोकही आहेत.. खरंच लक्ष नको द्यायला त्यांच्याकडे..

  >> I'll be there for you... !

  I'll be there for you
  'Cause you're there for me too !!!!!!

  ReplyDelete
 27. आज सर्व एपिसोड्स किमान एकदा बघुन संपलेत... कितीतरी एपिसोड्स अनेकदाही बघितल्या गेले आहेत... जबरी...

  ReplyDelete
 28. खरंच भन्नाट प्रकार आहे हा !! कितीही वेळा बघत राहण्यासारखा !! प्रतिक्रियेबद्दल आभार.

  ReplyDelete
 29. माझा विश्वासच बसत नाही कि असेही लोक आहेत ज्यांनी फ्रेंड्स सिरीयल पहिली नाही...
  "WE WERE ON A BREAK"... remember this?

  ReplyDelete
 30. हाहाहाहा मंदार.. तुही फ्रेंड्सचा कट्टर चाहता आहेस तर ! :))

  ReplyDelete
 31. एकदा पाहायला लागल्यावर महिना दीड महिन्यातच १० सीजन संपवून टाकले होते.. :D

  ReplyDelete
  Replies
  1. प्राजक्ता, खरंय.. हा प्रकारच आहे वेड लावणारा !

   ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार. अशीच भेट देत राहा.

   Delete
 32. heramb,

  friends hi aattaparyantchi jagatli best sitcom asel... HIMYM friends chi brashta nakkal vatate.. (friends group, bar madhe bhetne vagaire) pan ya saha jananmadhe niragasta aahe, originality aahe, te selfish pan aahet, bhekad pan aahe, aani ekmekanchi kalji karnare pan aahet... mhanaje agadi regular, average characters aahet.. (samanya jantesarakha mhanaycha hota mala).... pan phoebe tula bindok vatate... mala ti intelligent vatate, weird tar ti aahech.. pan kadhi kadhi samorchyala kashi gappa basavate ... e.g. (the one where heckle dies madhe) theory of evolution varcha ticha vaad.. aani "TOW no one is ready" suddha dhamal episode aahe..

  ReplyDelete

हिंसक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं प्रत्ययकारी चित्रण : 'राजकीय हत्या'

आपल्या (तथाकथित!) सुसंस्कृत समाजात नियमितपणे घडणाऱ्या मोर्चे ,  धरणी , आंदोलनं यांसारख्या घटना किंवा अगदी सार्वजनिक उत्सव , समारंभ , मिरवणुक...