Thursday, June 24, 2010

तूच !!

खरं तर कविता लिहिणं हा माझा प्रांत नाही पण पावसावर काहीतरी लिहायचंय म्हंटलं आणि खरडायला बसलो तर गद्याऐवजी आपोआप कविताच उतरली. पूर्वी यमक जुळवण्याचे आटोकाट प्रयत्न करत र ला ट जोडत सामाजिक आणि कैच्याकै कविता लिहिल्या होत्या. पण मुक्तछंदातला हा पहिलाच प्रयत्न. !!

पाऊस पडायचाय अजून... पण
भरकटणार्‍या वार्‍याने फरपटणारी पानं
क्षण दोन क्षणापुरतं आकाश चंदेरी करणार्‍या वीजा
झाडांची सळसळ आणि ढगांचा कल्लोळ
पाऊस येणार हे मनोमन पटत असतं...

पण अचानक बघता बघता
सगळं गायब होऊन जातं.
वारा थंडावतो, वीजा मालवतात..
पावसाच्या वाकोल्या लांबूनच दिसतात..

आणि मग अचानक कधीतरी ध्यानीमनीही नसताना
रोरावत, रौद्रावत, घोंघावत, येतोस अचानक...
बेसावध क्षणी गाठावं तसा..
कपड्यांची शुद्ध नसते की रूपाचं भान..
अवचित मागून येऊन विळखा घालावास तसा.

कधी कधी मात्र कशाचाच मागमूस नसतो.
ना कसली चाहूल ना कसल्या पाउलखुणा
हलकेच येतोस अंदाज घेतोस
अचानक समोर उभा राहून हनुवटीखाली बोट ठेवून
माझा झुकला चेहरा वर करावास तसा.

पण आताशा आताशा...
मागमूसच नसतो तुझा...
दिसत नाहीस की भेटत नाहीस
चाहुली नाही की खाणाखुणा नाहीत
धिंगाणा नाही की हळुवारपणाही नाही.
पुन्हा पुन्हा त्या लांबून दिसणार्‍या वाकोल्या फक्त.

हल्ली वेड्यासारखा वागतोस.
पाऊसही आणि तूही...
लवकर ये.. येशील??
सांग ना.... !!

ही कविता ऋतू हिरवा  या पावसाळी विशेषांकातही प्रसिद्ध झाली आहे.

39 comments:

  1. स्क्रॉल करताना कवितेचा आकार झुंबरासारखा दिस्तोय!

    ReplyDelete
  2. अरे? गेला पण तो आकार? बदलली का सेटींग?

    ReplyDelete
  3. अलाइनमेंट नीट होत नव्हतं. आता ठीक केलंय.

    ReplyDelete
  4. ओहो! वी आर स्पिकींग रीअल टाईम फ्रॉम टू एंडस ऑफ वर्ल्ड~!!!!!

    ReplyDelete
  5. झक्कास झालीये,
    कविता पण जांभई सारखी संसर्गजन्य असते नाही, समोरच्याची वाचली कि आपल्याला पण करावीशी वाटते.

    ReplyDelete
  6. आभार अमृता.. आणि ब्लॉगवर स्वागत.. !
    मग कधी येतेय तुझ्या ब्लॉगवर पण जांभई आपलं कविता? ;)

    ReplyDelete
  7. हल्ली वेड्यासारखा वागतोस.
    पाऊसही आणि तूही...

    :)

    ReplyDelete
  8. भारी हेरंबराव आवडेश..

    ReplyDelete
  9. धन्स सुहासराव.. :)

    ReplyDelete
  10. हल्ली वेड्यासारखा वागतोस.
    पाऊसही आणि तूही...

    लय भारी!!!

    मस्त जमली आहे.

    ReplyDelete
  11. कशाला आता कविलोकांच्या पोटावर पाय द्यायला निघालास रे हेरंबा.... :)

    ReplyDelete
  12. देवेन, अरे मी काहीबाही पोष्टी टाकून कसाबसा स्वत:चं पोट भरणारा माणूस.. मी कुठला कोणाच्या पोटावर पाय देणार :)

    ReplyDelete
  13. हेरंबा, आता जादूच्या पोतडीतून एक एक आयटम बाहेर यायला लागलेत म्हणायचे. लेख, कंस आता कविता...

    ReplyDelete
  14. bhakti soman- mast zaliy re kavita.americat jaun tuzyatlya chan goshti kaltatayt, baher yetayat, cha vattay. tuzykadun khup shiknyasarkha ahe.

    ReplyDelete
  15. ’ऋतू हिरवा” मी आधीच वाचली होती.:)सही आहे. पाऊस कंडिशनली आवडतो म्हणता म्हणता कविताही केलीस तू. म्हणजे मनातून तुला तो आवडतो. पकड्या रे पकड्या...:D

    ReplyDelete
  16. हा हा.. आभार कांचन. कविता हा कधीतरी बाहेर येणार आयटम आहे :)

    ReplyDelete
  17. भक्ती, आभार. अमेरिका काय किंवा भारत काय कुठेही असलो तरी माझ्याकडून शिकण्यासारखं खूप आहेच :P ;)

    ReplyDelete
  18. हा हा श्रीताई, मला वाटलेलंच कोणीतरी असं पकडणार. म्हणून तर त्या लेखाच्या खाली डिस्क्लेमर टाकून ठेवला होता ;)

    ReplyDelete
  19. मंदार, आभार. आणि ब्लॉगवर स्वागत. !!

    ReplyDelete
  20. apratim... mala te ' achanak samor ubha rahun hanuvatikhali bit thevun, maaza zukla chehara var karavaas tas' ... he sahi vatala. shevat pan chaan ahe. waah waah...

    ReplyDelete
  21. varacha anonymous me ahe.. parag. cheers :)

    ReplyDelete
  22. हल्ली वेड्यासारखा वागतोस.
    पाऊसही आणि तूही...


    mastch ...

    ReplyDelete
  23. आभार बायनरी-बंड्या !

    ReplyDelete
  24. पण तुला तर पाउस आवडत नाही ना???

    ReplyDelete
  25. अरे म्हणून तर या आधीच्या पोस्टमध्ये तळटीप दिली होती ना ;)

    पण हो. मला पावसाळा आवडत नाही हे तेवढंच खरं. म्हणजे कंडीशनली आवडतो.. :)

    ReplyDelete
  26. herambji chhan kavita ahe.vatat nahi ki pahilach prayatn

    ReplyDelete
  27. प्रथमेश, आभार. आधीही काही कविता केल्या आहेत पण यमक जुळवत जुळवत. मुक्तछंदाचा पहिलाच प्रयत्न. :)

    आणि हो. ब्लॉगवर स्वागत. असेच भेट देत रहा.

    ReplyDelete
  28. कविता पण छान लिहितोस.. :)

    ReplyDelete
  29. :) .. काका आभार.. असंच कधीतरी..

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...