आता उरलेल्या तीन वीरांविषयी बोलू. हे तीन वीर म्हणजे रॉस गेलर, चँडलर बिंग आणि जोई ट्रिबियानी....
रॉस गेलर (डेव्हिड श्विमर) : मोनिकाचा मोठा भाऊ, अतिशय हुशार त्यामुळे लहानपणापासूनच आईवडिलांचा लाडका आणि एक्झॅक्टली त्याच कारणामुळे मोनिकाचा नावडता असलेला, पीएच.डी., पेलिऑन्टॉलॉजिस्ट (म्हणजे बहुतेक भूगर्भशास्त्रज्ञ चुभूद्याघ्या), विज्ञानाची प्रचंड आवड, रेचलवर नववीमध्ये असल्यापासून अतिशय प्रेम करणारा पण ते प्रेम कधीच व्यक्त करू न शकणारा, घाबरट तर इतका की लोएस्ट-स्पीड लिमिटपेक्षाही हळू गाडी चालवल्याने लायसन्स जप्त करून घेणारा, तीनदा लग्न झालेला (पहिल्या बायकोशी ती लेसबियन असल्याने तर दुसरीशी लग्नाच्या दिवशीच झालेल्या गैरसमजांमुळे घटस्फोट), विज्ञान (डायनोसॉर्स, पेलिऑन्टॉलॉजी) आणि रेचलवर जीवापाड म्हणजे अगदी प्रचंड प्रेम करणारा आणि त्यासाठी आपल्या जवळच्या मित्रांशीही वेळोवेळी भांडणारा, चँडलरचा क्लासमेट आणि अतिशय जिवलग मित्र. असा हा अनेकानेक गुणविशेष असलेला आणि अनेक रूपडी असलेला 'रॉस' डेव्हिड श्विमरने आपल्या अप्रतिम अभिनयाने खासच रंगवलाय.
चँडलर बिंग (मॅथ्यु पेरी) : याचं सगळ्यांत मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सतत पीजे मारत राहणं, सदैव हलके फुलके विनोद टाकत राहणं. अगदी अगदी नॉनस्टॉप.. नवीन नवीन विचित्र शब्द वापरणं, चित्रविचित्र चेहेरे करत राहणं. पूर्ण ग्रुपमध्ये चांगली नोकरी, चांगला पगार असणारे चँडलर आणि रॉस हे दोघेच.
चँडलर हा जोईचा रूममेट आणि बेस्टबडी. सहाव्या सिझनमध्ये चँडलरचं मोनिकाशी अफेअर सुरु होऊन नंतर त्यांचं लग्न होण्याआधीपर्यंतचा चँडलर डेडली आहे. एकदम भन्नाट. लाईव्हली. त्याच्या बिनडोक जोक्स वर हसता हसता गडबडा लोळायची पाळी येते. याने आणि जोईने पहिले ५-६ सिझन्स नुसता धुमाकूळ घातला आहे. लग्नानंतर मात्र जरासा हळवा, शांत, किंचित दबून राहणारा असा वेगळाच चँडलर आपल्या दृष्टीस पडतो. मोनिका किंचित जास्त डॉमिनेटिंग दाखवली असल्याने 'चँडलर बिंग'चं धुंवाधार पात्र शेवटच्या ३-४ सिझन्समध्ये थोडसं मागे पडल्यासारखं वाटतं. चँडलरचे आधीचे विनोद, बाष्कळ बडबड, चमत्कारिक शब्दप्रयोग आणि विचित्र हावभाव हे सगळे लग्नानंतर एकदम कमी होऊन जातात. मला तरी वाटलं असं. पण त्याआधीचा चँडलर बघणं म्हणजे एक मेजवानी आहे.
जोई ट्रिबियानी (मॅट ले-ब्लांक) : मुद्दाम मी जोई उर्फ जोसेफ ट्रिबियानीला शेवटी ठेवलं कारण याच्यावर लिहिता लिहिता माझा माझ्यावरच कंट्रोल राहणार नाही. फ्रेंड्समधलं हे माझं सगळ्यांत आवडतं पात्र. हो फिबीपेक्षाही किंचित वरच. कारण फिबी आणि याच्या बिनडोकपणामध्ये थोडा फरक आहे असं मला वाटतं. फिबी जेन्युइन बिनडोक वाटत नाही. कधी कधी ती निरागस, हलकीफुलकी, मुद्दाम येडेपणाचा आव आणणारी वाटते. पण जोई. अहं.. !!! १००% ओरिजनल, जेन्युइन, होममेड बिनडोकपणा बघायचा असेल तर या माणसाकडे बघावं. कम्प्लीट ट्यूबलाईट.. ९५% पीजे किंवा नॉर्मल जोक्स या माणसाला जवळपास १० मिनिटांनी कळतात आणि उरलेले ५%......... अहं.. नाही.. मुळीच नाही. उरलेले ५% जोक्स याला कळतच नाहीत.. इटालियन अमेरिकन. सहा बहिणी असलेल्या भल्या मोठ्या कुटुंबातला एकटा मुलगा. पेशाने कलाकार. फालतू जाहिरातींपासून ते भिकार नाटकांपर्यंत कशातही कामं करणारा. टीव्ही शोमध्ये प्रमुख भूमिका मिळवायचं स्वप्न बघत असणारा. (ते स्वप्न काही काळ पूर्णही होतं आणि मग त्याच्या स्वतःच्याच बिनडोकपणामुळे धुळीला मिळतं.). पण हा माणूस आवडण्याचं खरं कारण म्हणजे याचा प्रचंड बिनडोकपणा, बावळटपणा, वेंधळेपणा त्यातून निर्माण होणारे एकापेक्षा एक भयंकर विनोद, अफलातून संवाद आणि त्याचं 'अचूक' हा शब्दही थिटा पडावा इतकं भन्नाट टायमिंग. रुममेट असल्याने चँडलर याचा भयानक लाडका आणि बिनडोकपणाची लेव्हल सेम असल्याने फिबीही खूप आवडती. साधारण सहाव्या/सातव्या सिझनपासून म्हणजेच जिथपासून चँडलरचा प्रभाव कमी व्हायला लागतो तिथपासून जोईचं अधिराज्य सुरु होतं. शेवटचे ४-५ सिझन हा मनुष्य नुसता चेकाळल्यासारखा सुटलाय. याचे अनंत किस्से आहेत ते असे इथे ३-४ ओळीत सांगता येणार नाहीत. त्यासाठी त्याला पडद्यावर वावरतानाच बघायला हवं. आणि त्याने फ्लर्टिंगच्या दुनियेत अजरामर केलेल्या 'हाऊ यु डुइन' या डायलॉगला आणि ते म्हणण्याच्या त्याच्या युनिक शैलीला कोण विसरेल !!!!

माझं अजून एक निरीक्षण म्हणजे सगळे सिझन्स एकापेक्षा एक जबरदस्त आहेत यात वादच नाही पण सहाव्या सिझनमध्ये हे गणित काहीतरी कुठेतरी चुकल्यासारखं वाटतं. तुलनेने रटाळ एपिसोड्स किंवा पात्रांना जुन्या आठवणी पुन्हा पुन्हा येतात असं दाखवून जुन्याचा एपिसोड्समधल्या गोष्टी, किस्से पुन्हा पुन्हा दाखवले आहेत. तेव्हा त्यांच्याकडे नवीन कथा/कल्पना नसाव्यात किंवा टीममध्येच काहीतरी गडबड झाली असावी असा संशय उगाच येऊन जातो. पण हा एक सिझन सोडला तर बाकी सगळे सिझन्स म्हणजे नुसता धुमाकूळ आहे.
जाता जाता माझ्या प्रचंड आवडत्या काही निवडक एपिसोड्सची एक यादी देतो. जे नियमित फ्रेंड्स बघतात किंवा दहाही सिझन्स अनेकदा बघितले असणारे माझ्यासारखेच फ्रेंड्स-वेडे नक्कीच या यादीशी सहमत होतील. चुकूनमाकून काही भारी एपिसोड्स टाकायला विसरलो तर आठवणीने कमेंट्समध्ये टाका. हे कुठल्याही क्रमाने नाहीत. कुठलाही एपिसोड कधीही आणि कितीही वेळा बघितला तरी कधीच कंटाळा येणार नाही याची १०१% खात्री.
१. पोकर : यात मुलं विरुद्ध मुली असा पोकरचा सामना रंगतो. मुलींना आधी पोकर अजिबात खेळता येत नसतो आणि मग त्या एका पोकरतज्ज्ञ बाईकडून पोकर शिकतात आणि मुलांची वाट लावतात असा काहीसा हा एपिसोड. पण भन्नाट विनोदांनी आणि आचरट प्रकारांनी भरलेला.
२. फुटबॉल : यात रॉस गेलर आणि कंपनी वि. मोनिका गेलर आणि कंपनी असा अमेरिकन फुटबॉलचा (आपला सॉकरवाला फुटबॉल नव्हे) 'गेलर कप' साठीचा सामना रंगतो. ते खेळतानाची धमाल, गोल्स, मध्येच एका डच मुलीचं अवतरणं, तिच्यावरून जोई आणि चँडलरमध्ये रंगलेले वाद, रॉस आणि रेचलचं वेगळ्याच कारणावरून झालेलं भांडण अशा भारी यात गोष्टी आहेत.
३. क्विझ : एका साध्या गोष्टीवरून पैजा लागून शेवटी मोनिकाचं अपार्टमेंट (फ्लॅट) डावावर लावलं जाईपर्यंत प्रकरण चढत जातं. स्पर्धा असते कोण कोणाला किती जास्त ओळखतं, कोणाला एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी जास्त माहित आहेत याबाबत. मोनिका आणि रेचल वि. जोई आणि चँडलर अशा टीम्स असतात. प्रश्न काढणारा आणि जजगिरी करणारा असतो रॉस (फिबीचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं या एपिसोडमध्ये त्यामुळे ती क्विझमध्ये नाहीये.). तर या प्रकारात एकेक भन्नाट प्रश्न, त्यांची तितकीच भन्नाट उत्तरं, शेवटी लायटनिंग राउंड आणि त्याचा धक्कादायक निकाल सगळंच तुफ्फान मजेशीर.
४. चँडलर आणि जोई वेगळे होतात आणि परत एकत्र येतात ते तीन एपिसोड्स : छोट्याशा कारणावरून गैरसमज होऊन जोई चँडलरच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडतो. पण दोघांनाही एकमेकांशिवाय चैन पडत नाही. तेवढ्यात चँडलरला एक दुसरा रूममेट मिळतो. पण तो जाम विक्षिप्त आणि चक्रम असतो. काही दिवसांनी चँडलर आणि जोई पुन्हा एकत्र येतात. हे तीन एपिसोड्स जबरदस्त आहेत. जाम धमाल येते बघायला. नुसतेच हसवतात असं नाही तर कधीकधी नकळतपणे डोळ्यात थोडंसं का होईना पाणीही आणतात.
५. रेचलची बहिण (क्रिस्टीना अॅपलगेट) थँक्सगिव्हिंगला येते तो एपिसोड : या एपिसोडमध्ये क्रिस्टीना अॅपलगेटने रेचलच्या बावळट बहिणीचं काम अप्रतिम केलं आहे. छोट्याछोट्या गोष्टींवरून तिची आणि रेचलची होणारी भांडणं, तिचं मंदासारखं वागणं, विचित्र प्रश्न विचारणं आणि साध्या प्रश्नांना महाबिनडोक उत्तरं देणं हे सगळे प्रकार बघून हसून हसून तोंड फाटायची पाळी येते.
६. जोई चँडलरला पेटीत कोंडून ठेवतो तो एपिसोड : चँडलरने केलेल्या एका मोठ्या चुकीमुळे चँडलर आणि जोईमध्ये कडाक्याचं भांडण होतं. चँडलर जोईची हजार वेळा माफी मागतो आणि तो म्हणेल ते करायला तयार असतो. तेव्हा जोई त्याच्या चमत्कारिक स्वभावाप्रमाणेच चँडलरला एका पेटीत कोंडून घेण्याची चमत्कारिक शिक्षा करतो. (अर्थात तो असं का करतो त्यालाही एक पार्श्वभूमी आहेच.) आणि त्यादरम्यान अनेक भयंकर विनोदी आणि काही अतिशय हळवे प्रसंग घडून जातात. पहायलाच हवा असा हा एपिसोड..
७. लॉटरी : सगळेजण मिळून काही लॉटरीची तिकिटं घेतात. पण फिबीच्या मुर्खपणामुळे ती रस्त्यावर पडतात. ती कुठल्यातरी माणसाला सापडून तो माणूस रातोरात करोडपती होतो. त्यामुळे सगळे फिबीवर जाम वैतागतात. त्यावेळी फिबीची माफी मागण्याची अनोखी पद्धत आणि त्या अनोख्या पद्धतीतली गंमत न कळल्याने वेड्यासारखा वागणारा जोई. हे सगळं बघताना हसून हसून वाट लागते.
८. रॉस आणि रेचलचं ब्रेकऑफ होतं तो एपिसोड : काही विनोदी संवाद सोडले तर हा एपिसोड बघायला खूप कठीण जातो. एकदम हळवं व्हायला होतं. खूप छान रंगवलेला प्रसंग !!
असे अजूनही चिक्कार एपिसोड्स आहेत किंवा काही काही एपिसोड्स मधले निवडक प्रसंग आहेत जे या यादीत टाकता येतील. पण कुठलाही प्रसंग असो की कुठलाही संवाद, त्यांची प्रेक्षकांना क्षणभरात आपलंसं करून घेण्याची, सगळी टेन्शन्स विसरायला लावून त्यांच्या चेहर्यावर एक छोटीशी का होईना स्मितरेषा आणण्याची आणि बघता बघता त्या छोट्या स्मितरेषेचं नाना पाटेकरच्या मंदूने (मंदिरा बेदीने) केळं आडवं खाल्ल्यावर तिचं हसणं जसं दिसतं तितक्याच आडवेपणाने आपल्याला हसायला लावण्याची हातोटी वादातीत आहे.
अर्थात फ्रेंड्सवर अशीही टीका झाली की यातले विनोद
१. खूप उथळ आहेत.
२. खूप प्रेडिक्टेबल आहेत
३. खूप बालिश आहेत.
४. तोचतोचपणा आहे.
५. दर्जाहीन आहेत.
वैयक्तिकरित्या मला यातला एकही आरोप मान्य नाही. कारण सगळ्या (हो जवळपास ९९%) विनोदांचा दर्जा, निवड खूप उच्च आहे, सगळे विनोद, त्यांची शैली फार वेगळी आहे त्यात अजिबात काहीही प्रेडिक्टेबल नाही, बालीशपणा किंवा तोचतोचपणा तर अजिबात नाही. असो. व्यक्ती तितक्या प्रकृती !!
पण मला मात्र हे मित्र अतिशय प्राणप्रिय आहेत, अतिशय जिवलग आहेत आणि याचं कारण फ्रेंड्सच्याच भाषेत सांगायचं झालं तर
No one could ever know me
No one could ever see me
Since you're the only one who knows what it's like to be me
Someone to face the day with
Make it through all the best with
Someone who always laughs at
Even when I'm at my worst, I'm best with you
Yeah!
I'll be there for you
I'll be there for you...... !!!!
या रेम्ब्रंड्सच्या गाण्याचे पूर्ण शब्द पुढीलप्रमाणे. ते इथेही मिळतील.
So no one told you life was gonna be this way
Your job's a joke, you're broke, your love life's D.O.A.
It's like you're always stuck in second gear
When it hasn't been your day, your week, your month, or even
your year, but
{Chorus}
I'll be there for you
When the rain starts to pour
I'll be there for you
Like I've been there before
I'll be there for you
'Cause you're there for me too
You're still in bed at ten and work began at eight
You've burned your breakfast so far, things are going great
Your mama warned you there'd be days like these
But she didn't tell you when the world has brought you down to your knees, and
{Chorus}
No one could ever know me
No one could ever see me
Since you're the only one who knows what it's like to be me
Someone to face the day with
Make it through all the best with
Someone who always laughs at
Even when I'm at my worst, I'm best with you
Yeah!
{Chorus}
I'll be there for you
I'll be there for you
I'll be there for you
'Cause you're there for me too
* सर्व 'मित्रचित्रां'साठी अर्थातच गुगल नावाच्या फ्रेंडचे आभार !!