Monday, March 15, 2010

अजून एक ...

ह्म्म्म.. आतषबाजी आत्ताच संपली असेल. सगळे आता जमले असतील बोर्डस् आणि बॅनर्स तयार करायला. तसंच उद्याच्या घोषणा तयार झाल्या असतील. त्या म्हणून, घोकून झाल्या असतील. रस्ते, महत्वाचे चौक आता साफ करून झाले असतील. रांगोळ्या काढायलाही सुरुवात होईल आता. कितवं वर्षं बरं हे सगळं असं लांब बसून आठवण्याचं? हम्म ६-७ तरी नक्की झाली. :-( .. 


दिवाळीचे फटाके आणि फराळ नसल्याने, गणपतीच्या आरत्या आणि विसर्जनाच्या मिरवणुका नसल्याने, होळीची, धुळवडीची बोंबाबोंब आणि रंगरंगोटी नसल्याने गुढीपाडव्याचं आकर्षण वाटण्याचं कधीच काहीच कारण नव्हतं पूर्वी. उलट या सगळ्यांच्या मानाने तो सोबर सण. म्हणजे सकाळी लवकर उठा, गुढी वगैरे उभारा, मोठ्या माणसांच्या पाया पडा, श्रीखंड/बासुंदी वगैरे जे पक्वान्न घरी असेल ते खा. झालं !! पुढे काय? काSSही नाही. तर त्यामुळे गुढी पाडवा हा आवडत्या सणांच्या यादीत कधीच नव्हता. पण साधारण दहा-बारा (चू भू दे घे) वर्षांपूर्वी डोंबिवलीच्या 'गणेश मंदिर संस्थान प्रतिष्ठान' च्या डोक्यातून एक असामान्य कल्पना जन्माला आली. ती म्हणजे 'नववर्ष स्वागत यात्रेची'. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बिनआवाजी फटक्यांच्या आतषबाजीने नववर्ष स्वागताची सुरुवात करून गुढी पाडव्याच्या दिवशी भल्या पहाटे डोंबिवलीतल्या सगळ्या सामाजिक, सांस्कृतिक संस्था, युवकवर्ग यांनी मोठ्या संख्येने भागशाळा मैदानात उपस्थित रहायचं आणि तिथून ही स्वागतयात्रा पूर्ण डोंबिवलीभर फिरणार अशी ही कल्पना. प्रत्येक संस्था त्या यात्रेतून काहीना काही विषय मांडण्याचा प्रयत्न करणार, पथनाट्य बसवणार, गीतं बसवणार, त्यासाठीचे बॅनर्स, घोषणा तयार करणार आणि जनजागृती करायचा प्रयत्न करणार अशी साधारण योजना होती. पहिल्याच वर्षी स्वागतयात्रेला अपूर्व सहभाग लाभला आणि उत्तरोत्तर तो वाढतच गेला. यात्रेवर हेलीकॉप्टरने पुष्पवृष्टी, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, नंतर तर आठवडाभर चालणारे असे कार्यक्रम अशी एकेक चढती पायरी होती. हा हा म्हणता हे स्वागतयात्रेचं लोण ठाणे, दादर, गिरगाव, वाशी, पनवेल, नाशिक, सातारा, (आणि चक्क :P) पुणे असं महाराष्ट्रभर पसरलं. आणि बघता बघता गुढी पाडवा माझ्या आवडत्या सणांच्या यादीमध्ये "टॉप-३" स्थानांत विराजमान झाला.

आमच्या संस्थेने गेल्या वर्षी मतदानाबद्दल जागरुकता निर्माण करणारं पथनाट्य बसवलं होतं. (मी नाहीये त्यात :( ) ...  ते खाली चिकटवतोय..



आणि तूर्तास तरी त्या सार्‍या घोषणा इथूनच !!

"जयजयजयजय जय भवानी,जयजयजयजय जय शिवाजी"
"भार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रत माता की जSSSSSSSSय"
"वंदेSSSSSS मातरम् !!!!! "

सर्वांना गुढी पाडव्याच्या, हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक, मन:पूर्वक शुभेच्छा !!!

24 comments:

  1. गुढी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा..

    ReplyDelete
  2. छानच कल्पना...
    गुढी पाडव्याच्या, हिंदू नववर्षदिनाच्या हार्दिक, मन:पूर्वक शुभेच्छा !!!

    ReplyDelete
  3. चला धरु रिंगण... गुढी उभी उंचावुन ... !!!

    हिंदू नववर्षदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ... !

    ReplyDelete
  4. हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! नववर्ष आपणास सुख समृद्धीचे जावो!!!!

    ReplyDelete
  5. हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा

    ReplyDelete
  6. "जयजयजयजय जय भवानी,जयजयजयजय जय शिवाजी"
    "भार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रत माता की जSSSSSSSSय"
    "वंदेSSSSSS मातरम् !!!!! "


    एकदम सहीच..... गुडी पाडव्याच्या शुभेच्छा.....

    ReplyDelete
  7. आम्ही डोंबिवलीलाच रहायचो, मागच्या वर्षी ठाण्याला शिफ्ट झालो, डों. चा फडके रोड सजला असेल आता आणि उद्या पाय ठेवायला पण जागा उरणार नाही.
    ठाण्याची स्वागतयात्रा बघायला जाणार आहोत.
    नविन वर्षाच्या शुभेच्छा!
    सोनाली

    ReplyDelete
  8. हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! नववर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे जावो!!!!

    ReplyDelete
  9. सुहास, गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  10. आभार आनंद. नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  11. रोहन, नववर्षारंभाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  12. मनमौजी, हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! हे वर्ष आपणास भरभराटीचे व समाधानाचे जाओ.

    ReplyDelete
  13. काका, तुम्हालाही हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  14. आभार सागर. गुढीपाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

    "भार्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रत माता की जSSSSSSSSय"

    ReplyDelete
  15. सोनाली, नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !! वा वा. मला इतकं बरं वाटतंय ब्लॉगविश्वात डोंबिवलीचं कोणीतरी भेटलं हे बघून. फडके रोड मस्तच सजला असेल आता आणि उत्साह अगदी भरभरून वहात असेल. उद्याचं तर काही विचारायला नको !!

    ReplyDelete
  16. आभार तन्वी. तुम्हा सर्वांनाही नववर्ष भरभराटीचे व समाधानाचे जाओ !!

    ReplyDelete
  17. हेरंब, गुढीपाडव्याच्या अनेक शुभेच्छा!!! नववर्ष उन्नती व सुखासमाधानाचे जाओ!!

    ReplyDelete
  18. आभार भाग्यश्रीताई.. नूतन वर्षाच्या अनेक शुभेच्छा आणि हे वर्ष समाधानाचे आणि भरभराटीचे जाओ ही सदिच्छा !!

    ReplyDelete
  19. श्रीखंड पुरी
    रेशमी गुढी
    लिंबाचे पान
    नववर्ष जावो छान

    तुम्हाला गुढी पाडव्याच्या व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!

    ReplyDelete
  20. छान कविता इरावतीजी !!

    तुम्हालाही गुढी पाडव्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  21. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !!

    ReplyDelete
  22. धन्यवाद अपर्णा. हिंदु नववर्षदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

    ReplyDelete
  23. Gudhipadavyachya aani navin varshachya hardik subhechhaa tula aani tuzya gharachyana suddha(kutumbiy sounds too formal).... especially aaditey la shubhechha de mazya kadun... :)

    ReplyDelete
  24. आभार मैथिली आणि तुला आणि तुझ्या घरच्यांनाही ('कुटुंबीय' बद्दल सहमत) हिंदुनववर्षदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! घरी गेल्यावर तुझ्या स्पेशल शुभेच्छा देतो आदितेयला.

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...