प्रिय गिरीश कुबेर,
मी गेली अनेक वर्षं असंख्य नावं ठेवत ठेवत का होईना पण लोकसत्ता नियमितपणे वाचतोय. नावं ठेवण्याचं एक सर्वमान्य कारण म्हणजे कु(सु)मार केतकर आणि त्यांचे कॉंग्रेसचं लांगुलचालन करणारे अग्रलेख आणि अन्य बातम्या. कुमार केतकर बाहेर पडल्यानंतर वाचकांना एकांगी नसलेल्या, कॉंग्रेसचा, राहुलचा, सोनियाचा, मनमोहन सिंगांचा अनाठायी उदो उदो न करणाऱ्या निष्पक्षपाती बातम्या वाचायला मिळतील अशा अपेक्षेने माझ्यासारख्या अनेक सामान्य वाचकांनी सुटकेचा भलामोठा निःश्वास सोडला होता. पण तो आमचा भ्रमच आहे असं काहीकाही बातम्या वाचताना सतत जाणवत रहायचं. अर्थात कुमारसेनेच्या काळापेक्षा लोकसत्ताची आत्ताची कामगिरी नक्कीच उजवी होती.... हो.... आता होती असंच म्हणावं लागेल. त्याचं कारण म्हणजे आजचं (शुक्रवार दिनांक १५ जुलै२०११) अन्वयार्थ.
संपूर्ण लेखच प्रचंड संतापजनक आहे. पण काही काही वाक्यं इतकी भयंकर एकांगी, अर्धवट माहितीवर आधारित आणि मुख्यतः परवाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या दुर्दैवी जीवांच्या मृत्यूचा इतका प्रचंड मोठा अपमान करणारी आहेत की त्यासमोर राहुलचं "सरकार प्रत्येक हल्ला रोखू शकणार नाही" वालं बालिश वाक्यही अतिशय समंजस वाटावं किंवा मग दिग्याचं प्रत्येक वाक्य हे एखाद्या मोठ्या विचारवंताच्या थाटाचं वाटावं. ही बातमी (!!!!!) वाचून मला तर क्षणभर असंही वाटून गेलं की दिव्यभास्करात जम न बसू शकल्याने (ऐकीव माहिती आहे. ऐकीव माहितीवर आधारित बातम्या फक्त लोकसत्तेनेचा द्याव्यात असा कुठे नियम आहे??) सुमार केतकरांचं पुन्हा लोकसत्तेत आगमन झालं की काय किंवा मग हल्लीच्या उथळ पत्रकारितेच्या जमान्यातल्या नियमाप्रमाणे केतकरसाहेब अतिथी संपादक म्हणून पुन्हा आमच्या डोक्यावर बसणार की काय. आम्हा वाचकांच्या दुर्दैवाने हे असं काही जर चुकून माकून जरी घडलं ना तर तेव्हा तुम्ही पत्रकार लोक दंडाला त्या काळ्या पट्ट्या बांधून निषेध बिषेध करत हिंडता ना तसेच आम्ही वाचक लोक loksatta.com ला जाण्यापूर्वी काळे गॉगल लावून मगच 'कॉंग्रेस-सत्ता' च्या बातम्या वाचू.
असो.. मूळ मुद्द्याला मी थेटही सुरुवात करू शकलो असतो पण मुद्दाम थोडी पार्श्वभूमी तयार केली जेणेकरून या असल्या कणाहीन पत्रकारांचं दर्जाहीन वृत्तांकन वाचून एक सामान्य नागरिक आणि वाचक म्हणून आमचा किती संताप होत असेल याची एक अतिशय छोटीशी झलक तुम्हाला मिळावी यासाठी एवढी खरडेघाशी केली. मला खात्री आहे की आजच्या या अर्थहीन अन्वयार्थाच्या संदर्भात तुम्हाला पत्र पाठवून निषेध नोंदवणारी मी पहिली व्यक्ती नक्कीच नसेन. सुदैवाने अनेक सजग वाचक महाराष्ट्रात आणि जगभर आहेत. आणि त्या सगळ्यांनी त्यांचं मत मांडताना या अन्वयार्था..... शी.. हा शब्द मला फारच अस्थानी वाटतोय.. खरंतर याला मला कणाहीन पत्रकाराचा दर्जाहीन लेख उर्फ क. प. द. ले. असं म्हणावसं वाटतंय पण ते जाऊदे...... तर त्या सगळ्यांनी त्यांचं मत मांडताना या दुर्दैवी लेखात त्यांना काय काय गोष्टी खटकल्या हे सांगितलंच असेल पण तरीही माझ्या अल्पस्वप्ल्प बुद्धीला सुचलेल्या गोष्टी मी इथे मांडतो आणि तुम्हाला दुर्दैवाने त्या पुन्हा पुन्हा वाचायला लागत असल्याबद्दल तुमची क्षमाही मागतो.
आता या तिरसट लेखातले कुठले मुद्दे मला आवडले नाहीत असं विचारलं तर साला अख्खा लेखच मला कॉपी पेस्ट करून द्यावा लागेल आणि असं करण्यात कितीही तथ्यांश असला तरी मुद्द्याचं गांभीर्य कमी होण्याची नितांत भीती आहे. त्यामुळे मला प्रचंड खटकलेली आणि माझ्या संतापाचा कडेलोट करू पाहणारी निवडक मुक्ताफळंच इथे डकवतो.
>> १. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारी अपयश नाकारले नाही, पण त्याचबरोबर गेल्या ३१ महिन्यांत मोठा हल्ला झालेला नाही हेही लक्षात आणून दिले.
>> २. दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी येतात याची कल्पना सौम्य शब्दात पण पक्की आकडेवारी समोर ठेवून करून दिली.
>> ३. कितीही दक्षता बाळगली तरी दहशतवादी हल्ला थांबविता येत नाही. तो फक्त लांबविता येतो. चिदम्बरम यांना हीच बाब सांगायची होती.
>> ४. परंतु दहशतवादी हल्ल्यासारखी संवेदनशील घटना घडली की, नेत्याने जबाबदारीने कसे वागावे हे त्यांच्याकडून सर्वच नेत्यांनी शिकण्यासारखे आहे.
>> ५. ते बॉम्बस्फोट टाळू शकले नाहीत. मात्र देशाचा गृहमंत्री स्थिर बुद्धीने, विचारपूर्वक व संतुलित वृत्तीने परिस्थिती हाताळत आहे, हा संदेश त्यांच्या पत्रकार परिषदेतून गेला.
>> ६. मुंबईतील विशिष्ट समाज वा आर्थिक उलाढालीची केंद्रे यांनाच स्फोटाचे लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू नसावा असा दावा त्यांनी केला. पाकिस्तानवर कोणताही आरोप केला नाही, पण पाकिस्तानच्या प्रतिसादाबद्दल भारत समाधानी नाही हेही लपविले नाही.
>> ७. पोलीस चांगली कामगिरी करीत असले तरी या हल्ल्याबद्दल निश्चित माहिती नव्हती याची कबुली दिली.
>> ८. एकंदर चिदम्बरम यांची पत्रकार परिषद ही संतुलित. जबाबदार आणि आपले काम गंभीरपणे करणाऱ्या नेत्याची पत्रकार परिषद होती. आपले काम व आपल्या मर्यादा यांची त्यांना व्यवस्थित जाणीव आहे हे लक्षात येत होते.
ही दर्जाहीन बातमी छापणाऱ्या कणाहीन पत्रकाराचं नक्की काय म्हणणं आहे? दर ३१ महिन्यांनी आम्ही आमच्या मोबाईलवर रिमायंडर लावायचे का "की बाबा रे आता ३१ महिने झाले. उद्या बॉम्ब फुटणार हो SSSS". कुबेरसाहेब, तुम्हाला खरंच सांगतो. मला पी चिदंबरम यांच्या निष्क्रियतेचा भयंकर राग येतो. बट गेस व्हॉट.. ही बातमी... तेच ते हो.. दर्जाहीन वगैरे.. तर ती वाचून मला चिदंबरमपेक्षाही ही बातमी छापणाऱ्या पत्रकाराचाच विलक्षण राग आला. हे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकाराची 'रीडिंग बिटवीन द लाईन' करण्याची क्षमता कसली जबरी असेल हाच विचार माझ्या मनात राहून राहून येतोय !!! म्हणजे चिदुभाऊ एक वाक्य बोलले की त्याचा (आमच्यासारख्या) सर्वसामान्य लोकांच्या अधूबुद्धीत शिरू न शकणारा नक्की अर्थ कोणता? ते असं म्हणाले तेव्हा त्यांना नक्की काय म्हणायचं होतं, त्यामागे असलेली त्यांची भूमिका कोणती?, प्रत्येक वाक्य उच्चारल्यानंतर त्या वाक्याच्या अनुषंगाने (फक्त सदरहू पत्रकाराच्याच) लक्षात येणारे चिदुभाऊंचं कर्तृत्व अधोरेखित करणारे, त्यांच्यात दडलेले सुप्त गुण कोणते इत्यादी इत्यादींचं दहावीतल्या संदर्भांसहित स्पष्टीकरणच्या थाटात वर्णन करताना या बातमीदाराने इतक्या असंख्य अस्पर्श मुद्द्यांना शिताफीने स्पर्श केला आहे की त्याला दहावीत 'संस्प' मध्ये दहापैकी अकरा मार्क नक्की मिळाले असणार याची खात्री पटली !!
आता पहिलाच मुद्दा बघा ना. ए.. क.. ती.. स.. (आकड्यात लिहिलं की पटकन संपल्यासारखं वाटतं म्हणून मुद्दाम अक्षरात लिहितोय.) महिन्यात एकही बॉम्बस्फोट झाला नाही हे सांगायला ना चिदुभाऊची गरज होती ना तुमच्या त्या पेड न्यूजवाल्या पत्रकाराची. काये की सामान्य माणूस बुद्धीने कितीही अधू असला तरी ज्या हल्ल्यांत आपल्या घरातले, नातेवाईक, मित्र, शेजारीपाजारी, ओळखीचे, आपल्याबरोबर ऑफिसमध्ये काम करणारे लोक गेले तो हल्ला किती वर्षांपूर्वी झाला होता एवढं साधं गणित तो करू शकतो हो. कारण त्याला समांतर म्हणून अजून एक गणित त्याच्या (म्हणजे आमच्याच हो.. तुमच्या त्या संदर्भांसहित वाल्या पत्रकाराच्या नव्हे..) डोक्यात चालू असतं आणि ते म्हणजे गेले ३१ (मुद्दाम आकड्यात लिहिलंय. कारण सरकारच्या दृष्टीने ते फक्त ३१ आहे. पटकन म्हणून होणारं. ए क ती स सारखं लांबलचक नव्हे.) महिने आमच्या आप्तस्वकीयांच्या जीवाशी खेळणाऱ्या कसाब नावाच्या किड्यालाही आम्ही पोसतोय.. हे ते गणित. तो अजूनही मेला नाहीये हा संदर्भ आणि तो जिवंत असण्यामागे त्याचा महान धर्म कारणीभूत आहे हे त्याचं स्पष्टीकरण. तर ही एवढी सगळी गणितं डोक्यात घुमत असल्याने ३१ महिन्यात हल्ला झालेला नाही हे आम्हालाही माहित्ये. पण मग ३२ महिन्यात दोन प्रचंड मोठे हल्ले झाले हे साधंसुधं अपयश झालं का? मला तरी खरंच कळलं नाही नीट. तुमच्या त्या पत्रकाराला चिदुभाऊला विचारायला सांगाल का प्लीज? आणि त्यांनी त्याला समजावून सांगितलं की पुढच्या अन्वयार्थमध्ये त्याचं पुन्हा एक भलंमोठं 'संस्प'ही छापायला सांगा..
दुसरा मुद्दा.. आकडेवारी !!!! हाहाहाहाहा.. चिदुभाऊ खुर्चीत आल्यापासून मी तर त्याला फक्त आकडेवारी मांडतानाच बघतोय. नक्षलवादी हल्ल्यात अमुक इतके पोलीस मेले, अमुक इतके गावकरी मेले, बॉम्बहल्ल्यात इतके इतके लोक आणि तितके तितके पोलीस मेले. अहो आणि दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी येतात याची का आम्हाला कल्पना नाही?? अहो ज्या सामान्य माणसाला तीन आकडी किंमतीच्या भाज्या, तिसऱ्या आकड्याकडे विसावू पाहणारं पेट्रोल आणि चौथ्या आकड्याकडे सरकू पाहणारा गॅस इत्यादी बेसिक गोष्टी आकाशाला भिडलेल्या दारात खरेदी करायला भाग पाडलं जातं (आणि तेही घामाच्या पांढऱ्या पैशाने.. काळ्याबिळ्या नाही हो.) थोडक्यात रोजचं साधं आयुष्य जगतानाही इतक्या असंख्य अडचणींचा मुकाबला करावा लागतो त्याला सरकारच्या अडचणी माहित नसतील हे असं गृहीत धरणं आणि तसं बोलून दाखवणं म्हणजे शुद्ध दिग्विजयपणा झाला. तर ब्रोकन रेकॉर्ड प्रमाणे पुन्हा मुद्दा तोच.. दहशतवादाविरोधात लढताना किती अडचणी सांगणे आणि आकडेवार्या समोर मांडणे यात एखाद्या व्यक्तीचं गृहमंत्री म्हणून काय कर्तृत्व असू शकतं हो?
खरं तर ज्याप्रमाणे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पायात पाय अडकवून वाटचाल चालू आहे त्याचप्रमाणे या बातमीतल्या मुद्द्यांचेही एकमेकांत पाय अडकलेलेच आहेत. कारण आता तिसरा मुद्दा बघा. अहो हा मुद्दा मांडण्यात 'चि'चं काय कर्तृत्व असेल हे तर मला अजूनही लक्षात येत नाहीये !! अर्थात तुमच्या त्या महान पत्रकाराला दिसलंही असेल कर्तृत्व पण त्याने ते अधिक विस्ताराने विस्कटून सांगण्याची काही तसदी घेतलेली नाही... कारण येताजाता अमेरिकेचा जप करणाऱ्या, अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर बनून राहणाऱ्या सरकारने त्याच अमेरिकन सरकारने एकदा झालेल्या महाहल्ल्यांमुळे सजग होऊन सुरक्षा यंत्रणा एवढी बळकट केली की त्यानंतर १० वर्षांत कितीही धमक्या आल्या तरी प्रत्यक्ष हल्ले झाले नाहीत ही बाब "कितीही दक्षता बाळगली तरी दहशतवादी हल्ला थांबविता येत नाही. तो फक्त लांबविता येतो." असं म्हणताना चिदुभाऊ विसरले आणि त्यांचं कौतुक करण्याच्या नादात या असल्या धेडगुजरी मुद्द्यावर आसूड ओढण्याचं तुमचा पत्रकारही विसरला !! असो.. चालायचंच...
खरं तर प्रत्येक मुद्द्याबद्दल प्रचंड विस्ताराने लिहिता येईल आणि इतकं लिहूनही तुमच्या त्या विशाल अंतःकरणाच्या पत्रकाराला त्या प्रत्येक ओळीत सामान्य माणसाला पर्वताप्रमाणे दिसणारे दोष/चुका/अपराध न दिसता त्या प्रत्येक वाक्यात, कृतीत रारा चिदंबरम साहेब यांचं महान कर्तृत्वच कसं दिसलं आणि ते त्याने एका शब्दाबद्दल अनेक शब्द वापरून विस्ताराने उद्धृतही कसं केलं हे माझ्यासारख्या अल्पमती माणसाला न झेपणारं आहे. अर्थात मला काय म्हणायचंय ते तुमच्या लक्षात आलंच असेल आणि अति झालं आणि हसू आलं (हे माझं सुमार केतकरांच्या बाबतीतलं आवडतं वाक्य आहे. पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी) असं माझ्या बाबतीत होऊ नये यासाठी फक्त अजून एकच खूप महत्वाचा आणि प्रचंड खटकलेला मुद्दा मांडून माझं रटाळ पुराण थांबवतो.
तर काय सांगत होतो?? हां.. तो चौथा मुद्दा वाचलात? काय लिहिलंय?? "दहशतवादी हल्ल्यासारखी संवेदनशील घटना घडली की" घडली की???? घडली की??? अशी भयानक घडली की जवाबदारीने वागायचं असतं गृहमंत्र्यासारख्या अतिमहत्वाच्या व्यक्तीने की ती घटना घडायच्या आधी?? किंवा थोडक्यात कायमच?? ही अशी घटना वारंवार (किंवा चिदुभाऊच्या भाषेत दर ३१ महिन्यांनी) होऊ नये म्हणून जवाबदारीने वागणं अपेक्षित आहे की घटना घडल्यानंतर??? मला तर क्षणभर काहीच उमगेनासं झालंय.
आमच्यासारख्या सामान्य जीवांना न कळलेले, कधीच न कळणारे अनेकानेक छुपे अर्थ हे खरे की बातमी वाचून डोक्यात शिरणारा साधासोपा अर्थ खरा? कोण खरं कोण खोटं? माझ्या तरी मते तुमच्या या धडाडीच्या पत्रकाराने पत्रकारितेतले आणि एकूणच पावसाळे आमच्यासारख्या सर्वसामान्य आणि किमान बुद्धीच्या वाचकांपेक्षा जास्त पाहिले असल्याने तोच बरोबर असेल असं मला तरी मनोमन वाटतंय. पण पुन्हा बातमी वाचल्यावर आम्हाला जे वाटतंय तेच खरं असावं असंही वाटतंय. थोडक्यात गोंधळ झालाय माझा. खूप मोठा गोंधळ. तुम्ही सोडवू शकाल तो गोंधळ? द्याल उत्तर? किंवा मग साध्या (आणि बिनडोक) वाक्यांतून ओढून ताणून अन्वयार्थ शोधून काढणाऱ्या तुमच्या महान पत्रकाराला तरी विचारा न याचं उत्तर आणि पुढच्या अन्वयार्थ मधून कळवा.. वाट बघतोय. शक्यतो पुढच्या स्फोटांच्या/हल्ल्यांच्या आत दिलंत तर अजून बरं कारण नाहीतर मग आम्हा लोकांचा अजून अजूनच गोंधळ उडत राहील. म्हणून म्हणतो लवकर द्या उत्तर.. द्याल ना?
-हेरंब ओक
हेच पत्र गिरीश कुबेर यांना त्यांच्या girish.kuber@expressindia.com या इमेल आयडीवरही पाठवलं आहे. !!
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Friday, July 15, 2011
Thursday, June 16, 2011
इचिभना... शाळा !!
सूर्या, फावड्या, जोश्या, शिरोडकर, चित्र्या, केवडा, सुकडी, चिमण्या, आंबेकर, घासू गोखल्या, संत्या, मिरीकर, मांडे, बिबीकर, भाईशेटया, आशक्या, जुवेकर, पिंगळ्या, गायकवाड, आप्पा, बेन्द्रीण, मांजरेकर सर, राजगुरू सर, परांजपे बाई.........
इ.. चि.. भ.. ना............ !!! इचिभना इचिभना मला एकदम शाळेतच गेल्यासारखं वाटायला लागलं !!!
शाळा... अंदाजे '७६ सालच्या डोंबिवलीतल्या (संदर्भ डास : डासिवली, मुंब्रा इ. इ. उल्लेख) एका साध्या टिपिकल मराठी शाळेत शिकणार्या पौगंडावस्थेतल्या कथानायकाचं वर्णन आणि त्याच्या व अनेकदा त्याच्या ग्रुपमधल्या त्याच्या वयाच्या मुलांच्या नजरेतून घडणारं तत्कालीन समाजाचं, शिक्षणपद्धतीचं, संस्कारांचं, राजकारणाचं, समाजकारणाचं, नाजूक वयातल्या मुलामुलींमधल्या सुप्त आकर्षणाचं, नातेसंबंधांचं, भावभावनांचं, साध्या सोप्या (वाटणार्या) शब्दांतलं चित्रण !!
मी मुद्दामच 'वाटणार्या' असं म्हणतोय. कारण अगदी साधे शब्द, सोपी वाक्यरचना वगैरे असली तरी वाचत असताना प्रचंड 'रीडिंग बिटवीन द लाईन्स' करावं लागतं. एकेका ओळीत, एकेका वाक्यात, एकेका शब्दांत त्या परिस्थितीला निरनिराळ्या कोनांतून बघणारे, त्यावर भाष्य करणारे कैक उल्लेख आहेत. जातीभेदावर आहेत, विषमतेवर आहेत, चंगळवादावर आहेत, दांभिकपणावर आहेत आणि अगदी म्हंटलं तर लहान मुलांच्या बाबतीत घेतल्या जाणार्या लैंगिक गैरफायद्यावरही आहेत. पण गंमत म्हणजे या सगळ्या सगळ्यावर काही भाष्य केलं जातोय याचा पुसटसा आभासही यातल्या एकाही वाक्यात नाहीये. वाचताना वाटत राहतं की आपण मराठी शाळेतल्या एका साध्यासुध्या मुलाची वर्षभराची गोष्ट वाचतोय ज्यात त्याचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, शिक्षक आहेत आणि त्याला 'लाईन' देणारी (वाचा आवडणारी, प्रेम करणारी इ. इ.) त्याची एक मैत्रीण आहे. पण प्रत्यक्षात मात्र या सार्या लेखनाचा आवाका समोर दिसतो त्यापेक्षा फारच विस्तृत आहे !!!
या संपूर्ण पुस्तकात मला सगळ्यात आवडलेला किस्सा म्हणजे अथर्वशीर्ष पठणाचा. देववादी, दैववादी, अंधश्रद्धाळू, पूर्णतः नवसावर विसंबून राहणारे वगैरे लोकांवर अत्यंत साध्या शब्दांत पण एकदम खणखणीत, सट्टाकदिशी लागणारा असा एक जबरदस्त फटकारा लेखकाने ओढलेला आहे. आणि त्यातल्याच एका छोट्याशा ओळीत जातीपातींवरही एक खणखणीत फटका ओढलेला आहे. कितीही झालं तरी तो परिच्छेद इथे देण्याचा मोह टाळता येत नाहीये.
================
(आईसाहेबांनी मला सांगितलं होतं की) गणपतीला म्हण की स्कॉलरशिप मिळाली तर एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवीन म्हणून. मला त्यावेळी जाम हसायला आलं होतं. गणपतीला पण आलं असणार. गणपती कशाला असलं काही ऐकतोय ? कारण त्याला माहित असणार की, आईसाहेब उकडीच्या मोदकांऐवजी कणकेच्या तळलेल्या मोदकांचा नैवेद्य दाखवणार. आणि तोसुद्धा सुक्या खोबर्याच्या खुळखुळ्या मोदकांचा.... आमच्या वर्गात फक्त बिबीकरला ती स्कॉलरशिप मिळाली..... नंतर आईसाहेब म्हणाल्या की, गणपतीला नवस करून काही उपयोग नाही. कुलस्वामिनीलाच करायला हवा होता. आता मी दहावीला गेल्यावर तसा त्या करतील.
मला तसं अथर्वशीर्ष येतं म्हणा. आमच्या बिल्डिंगीत पोंक्षेकाकांकडे वर्षातून एकदा सहस्त्रावर्तनाचा कार्यक्रम असतो. तेव्हा ते झाडून सगळ्यांकडचे पाट आणि माणसं गोळा करतात. निकमांकडचे फक्त पाट (ही ओळ म्हणजे तर तीन शब्दांत अक्षरशः उघडं करण्याचा सर्वोत्तम नमुना आहे !!! सलाम बोकीलसाहेब सलाम). पोंक्षेकाकांचा किरण तेव्हा आम्हाला आदल्या दिवशी सांगतो की उद्या आमच्याकडे गणपतीला गंडवायचा कार्यक्रम आहे म्हणून.कारण ते दहापंधरा लोक गोळा करतात. त्यांना साबुदाण्याची खिचडी आणि केळी देतात आणि त्यातल्या एकानं ते अथर्वशीर्ष म्हटलं तरी सगळ्यांनी म्हटलं असं समजतात आणि आकडा वाढवतात. त्यामुळे त्यांचा कार्यक्रम दोनतीन तासांत आवरतो. गणपतीला काय हे कळत नसणार? पण ह्यांचं चालूच..."
================
जातीपातींवर दबकत दबकत पण तेवढेच खणखणीत वार केल्याचे अजूनही छोटे छोटे अनेक नमुने आहेत. नरूमामासाठी देशमुखांच्या मुलीचं स्थळ आलेलं ऐकून मुकुंदाच्या आईने "आपल्यातल्या मुली काय मेल्या आहेत का?" या एका वाक्यातच त्या स्थळाची वासलात लावणे..
किंवा मग नरूमामाच्या लग्नात भेटलेल्या आशक्याबरोबरचा एक संवाद. मुकुंदाची आशक्या गायकवाडबरोबर छान गट्टी जमल्यानंतर मुकुंदा जेव्हा त्याला एकदा त्याच्या 'लाईन' बद्दल विचारतो आणि गायकवाड आणि त्याची 'लाईन' चं एकत्र भेटणं, बोलणं, फिरणं वगैरे चालू आहे हे पाहून आशक्या किती भाग्यवान आहे आणि त्याचं सगळं एकदम मस्त जमून गेलंय याबद्दल त्याचं अभिनंदन करतो. तेव्हा गायकवाड जे उत्तर देतो ते ऐकून तर एकदम चरकायलाच होतं. गायकवाड म्हणतो "जमलंय कसलं रे..? काही नाही जमलंय. कारण आम्ही 'बीशी' आहोत ना" !!!!!!!
किंवा मग नरुमामाच्या लग्नाविषयी शिरोडकरशी बोलताना मुकुंदाने मुद्दाम आईसाहेबांना कशी 'आपल्यातली'च मामी हवी होती हे सांगताना 'आपल्यातली'च वर विशेष भर देणे वगैरे सगळे प्रसंग अगदी नकळत आलेले पण अगदी लहान लहान मुलामुलींच्याही मनात अजाणतेपणी का होईना खोलवर रुजलेले तत्कालीन समाजातले जातीभेदाचे संस्कार अगदी ठळकपणे अधोरेखित करतात. (आताही यातलं काहीही फारसं बदललेलं आहे असा माझा मुळीच दावा नाही.)
मुकुंदाच्या मनात जो एक सतत वैचारिक गोंधळ चालू असतो तो आवरायला थेट अशी मदत होते ती फक्त नरुमामाचीच. तो मामा कमी आणि मित्र जास्त असल्याने त्याच्याबरोबर इंग्रजी पिक्चर बघणे, बिनधास्त गप्पा मारणे, त्याच्याशी मुलींविषयी बोलणे, त्याला शाळेतल्या मुलींचे किस्से सांगणे असे प्रकार दर भेटीत होत असतातच. अनेक प्रसंगांत नरूमामाच मुकुंदाचं चुकीचं पडलेलं किंवा पडू पाहणारं पाउल जागेवर आणताना दिसतो. उदा 'सुकडी'ला चिडवण्याचा प्रसंग किंवा धीर करून 'शिरोडकर'शी बोलण्याचा प्रसंग. किंबहुना मुकुंदाच्या प्रत्येक कृतीवर, प्रतिक्रियेवर, वागण्याबोलण्यावर नरूमामाचाच प्रचंड पगडा आहे, फार मोठा प्रभाव आहे आणि पुस्तकातल्या वाक्यावाक्यात तो जाणवतो. पानोपानी नरुमामाचे दाखले सापडतात. मुकुंदाच्या प्रत्येक वाक्यात, विचारात, कृतीत, कृतीच्या पुष्ठ्यर्थ नरूमामाची उदाहरणं आहेत. अर्थातच नरूमामा हा त्या काळाच्या तुलनेत विचारांनी अधिक सुधारित असणार्या अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व करतो.
असं सगळंच जगावेगळं करणार्या नरुमामाने आधी (गंमतीतच) सांगितल्याप्रमाणे ख्रिश्चन मुलीशी लग्न न करता आईसाहेबांना आवडलेल्या 'आपल्यातल्याच' मुलीबरोबर लग्न करण्याचा निर्णय घेतल्यावर सगळ्यात जस्त हिरमोड होतो तो मुकुंदाचा. सामाजिक, वैचारिक जोखडं भिरकावून देऊन वेगळं काहीतरी करणार्या नरूमामाने प्रत्यक्षात मात्र एवढा मोठा निर्णय घेताना मळलेली वाटच चोखाळावी हे नरूमामाकडे एक ग्रेट मित्र, आदर्श माणूस म्हणून बघाणार्या, स्वप्नील आयुष्यात वावरणार्या मुकुंदाला पचवायला जड जातं.
पुस्तकात पानोपानी येणारे आणीबाणी उर्फ अनुशासनाचे उल्लेख आणि त्या अनुषंगाने येणारे प्रसंग हे तर निव्वळ अप्रतिम. १४-१५ वर्षांच्या मुलाच्या दृष्टीकोनातून आणीबाणीकडे बघून त्यावेळची सामाजिक, राजकीय परिस्थिती, लोकांची मतं, विचार मांडण्याची कल्पनाच कसली बेफाट आहे !! त्याकाळची परिस्थिती, आणीबाणीकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन, त्यांची मतं, आणीबाणीला ठाम विरोध करणारे ग्रुप्स आणि आणीबाणीला अनुशासन म्हणवून त्यापायी येणार्या शिस्तीचं कौतुक करणारे लोक आणि आणीबाणीच्या वेळी लोकांना आलेले अनुभव इत्यादी गोष्टी दहा अग्रलेख वाचून कळणार नाही एवढ्या चांगल्या रीतीने या पुस्तकातून कळतील कदाचित !!
मुकुंदाच्या मनातले गोंधळ शमवू शकणारी किंवा त्याच्या विचारांना चालना देणारी, मदत करणारी अजून दोन पात्रं म्हणजे बाबा आणि चित्र्या. बाबांची थेट अशी मदत फारच कमी होते. परंतु बुद्धिबळाविषयीची आवड वाढीला लावणे किंवा सर्वात महत्वाचं म्हणजे मुलींशी गैरवर्तणूकीच्या कथित आरोपावरून शाळेतून अगदी नाव काढायची पाळी आलेल्या मुकुंदाला विश्वासात घेऊन, प्रसंग समजावून घेऊन आणि आपल्या मुलाची काहीच चूक नाहीये हे कळल्यावर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून शांत व संयमित आवाजात मुकुंदाची बाजू थेट मुख्याध्यापक आणि तक्रारकर्ते यांना पटवून देण्याची त्यांची हातोटी दाखवणारा प्रसंग वाचून तर त्यांचा मोठेपणा अगदी थेट पोचतोच.
चाळीत टीव्ही आल्याने बुद्धिबळ संपल्यामुळे विषण्ण झालेले बाबा, मोकळ्या जागेत बुद्धिबळ खेळले न गेल्याने आणि टीव्हीपायी लोकं न जमल्याने आजुबाजुच्यांनी अंगणात कचरा टाकायला लागणे यांसारख्या अत्यंत छोट्या छोट्या प्रसंगांत चंगळवादावर अतिशय संयत आणि जवळपास शून्य शब्दांत लेखकाने ओढलेला कोरडा चांगलाच लागतो. चंगळवादावर ओढलेला असाच एक आसूड म्हणजे मुकुंदाच्या शाळा ते घर या मार्गावरचं पूर्ण पुस्तकभर डोकावणारं शेत पुस्तकाच्या शेवटच्या पानात एकाएकी नाहीसं होण्याच्या मार्गावर येतं तो प्रसंग.. तिकडे शेती करण्याऐवजी चाळी बांधायचं ठरवलं असल्याचं शंकर्याचे बाबा मुकुंदाला सहज सांगितल्याप्रमाणे सांगतात तेव्हा तर अगदी विषण्णच व्हायला होतं. पुस्तकातल्या निर्जीव पात्रांशीही आपण एवढे एकरूप होऊन गेलेलो असतो हे तोवर आपल्याला जाणवलेलंच नसतं.
मुकुंदाला आवरणारं आणि सावरणारं दुसरं एक महत्वाचं पात्र म्हणजे चित्र्या !! हा चित्र्या म्हणजे एक अवली कार्ट आहे. अतिशय हुशार, प्रचंड अभ्यासू, समजूतदार, परिस्थितीची चांगली जाण असणारं, आईबाबांमधल्या सततच्या भांडणांमुळे त्यांच्या प्रेमाला पारखा झालेलं, 'देवकी' पासून येणार्या कटु अनुभवांनी कंटाळून गेलेलं आणि घरातल्या या विचित्र परिस्थितीला कंटाळून जास्तीत जास्त वेळ त्याच्या आवडत्या वैज्ञानिक प्रयोगांत आणि ग्रुपचा नाका असलेल्या सुर्याच्या बिल्डिंगीत घालवणारं असं हे एक अतिशय इंटरेस्टिंग पात्र आहे. तो मुकुंदाला वेळोवेळी समजावतो, काही महत्वाची गुपितं फक्त मुकुंदाशीच शेअर करतो, आपल्या शांत आणि संयमित वागण्याने, गोड बोलण्याने आणि (मुकुंदाच्या भाषेत) गोर्यागोमट्या चेहर्याचा वापर करून ग्रुपला कित्येकदा मोठ्या संकटांतूनही वाचवतो. थोडक्यात नरूमामाला नियमित भेटता येत नसल्याने आणि त्याच्याकडून नियमितपणे मार्गदर्शन (!!!) मिळवता येत नसल्याने नरूमामानंतर चित्र्या हाच मुकुंदाचा एकमेव आधार असतो.
'शिरोडकर'बद्दल न लिहिता लेख संपवला तर मुकुंदा मला कधीही माफ करणार नाही. ('शाळे'त सर्वस्वी गुंतून गेल्याचा पुरावा यापेक्षा दुसरा देता येणार नाही :) ) .. कारण पुस्तकाचा निम्मा भाग हा शिरोडकरने व्यापलेला आहे. निम्म्या पानात प्रत्यक्षात आणि उरलेल्या निम्म्या पानात मुकुंदाच्या विचारांत, बोलण्यात, गप्पांत सगळीकडे. ही एक अतिशय गोड मुलगी आहे हा आपला विचार प्रत्येक पानागणिक अधिकाधिक पक्का होत जातो. तिचं मुकुंदाशी ओळख करणं, बोलणं, चोरून भेटायला जाणं वगैरे सगळं सगळं एकदम पटून जातं आपल्याला. आणि मुकुंदाची तिच्याबद्दलची इन्टेन्सिटी शाळेतल्या गाण्याच्या भेंड्यांचा प्रसंग, मुकुंदाने तिच्यासाठी मार खाण्याचा प्रसंग, स्काउट कॅम्पचा प्रसंग, तिच्यासाठी लांबचा क्लास लावण्याचा प्रकार इत्यादीमधून अधिकच ठळकपणे समोर येते. तिच्यासाठी चेसची स्पर्धा जिंकणं, तिच्यासाठी जीव खाउन अभ्यास करून निव्वळ शेवटच्या काही महिन्यात अभ्यास करून चांगले मार्क मिळवणं वगैरे वगैरे प्रकार प्रचंड आवडतातच आणि पटूनही जातात. किंवा नाईट कॉलेज शोधणं, मुंबईत भाड्याच्या घरात राहण्याची कल्पना करणं वगैरे प्रकार तर पटत नसूनही मुकुंदाच्या विचारांची भरारी आणि त्याची तयारी पाहून मनोमन हसायला आल्याशिवाय राहत नाही..
अर्थात हे पुस्तक नववीच्या एका टारगट ग्रुपविषयीचं असल्याने मुली, त्यांच्याबद्दलचे बिनधास्त उल्लेख, कट्ट्यावरची भाषा, नवीननवीन शब्द, शिव्या, 'ढिंगच्याक' गाणी, वात्रटपणा, आगाऊपणा या सगळ्याचा पुरेपूर वापर पुस्तकात आहे पण तो क्वचित कधीतरीच आक्षेपार्ह वाटतो किंवा बरेचदा वाटतही नाही. कारण सुरुवातीपासूनच आपण या पुस्तकात आणि विशेषतः मुकुंदात एवढे गुंतुन गेलेलो असतो की आपणही त्याच्याबरोबर शाळेत, कट्ट्यावर, सुर्याच्या बिल्डिंगीत, संध्याकाळच्या क्लासला, गुपचूप शिरोडकरच्या मागे, नरूमामाबरोबर इंग्रजी पिक्चरला, केटी आणि विजयच्या रुमवर, शाळेच्या रस्त्यावर असलेल्या शेतात जाऊन पोचलेलो असतो. त्यामुळे तो करतोय ते, बोलतोय ते, वागतोय तसं आपण ऑलरेडी वागायला लागलेलो असतो. आक्षेप घेण्याचा प्रश्न येतोच कुठे !!!!
थोडक्यात पुस्तकभर एवढे चढ-उतार येऊन, टक्केटोणपे खाऊन अचानक शेवटच्या काही पानांमध्ये मुकुंदाची आणि त्याच्या प्रेमाची घडी अगदी सुरळीतपणे बसणार आणि अगदी गोड गोड सुखांत शेवट वाचायला मिळणार असं वाटायला लागतं. आणि तेव्हा ते थोडंसं टिपिकल पुस्तकी वाटतंय की काय असं म्हणेम्हणेस्तोवर शेवटचं पान आलेलं असतं आणि तेवढ्यात.......... काही कळायच्या आत आपल्या पायाखालची चादर सर्रकन ओढली जाते. एकदम चटका बसून आपण वास्तवात येतो. स्वप्न संपल्यागत वाटतं... तसं म्हटलं तर पुस्तकाचा शेवट रूढार्थाने तितकासा काही ग्रेट किंवा जगावेगळा वगैरे नाहीये पण वर म्हटल्याप्रमाणे आपण मुकुंदामध्ये एवढे गुंतून गेलेले असतो की शेवटी मुकुंदाच्या मनावर जेवढा प्रचंड आघात होतो तेवढाच जोरदार धक्का आपल्यालाही बसतो. अगदी वेड्यागत होतं.
वपुंचं पार्टनर वाचताना त्यात शेवटी एके ठिकाणी "पार्टनर हा खराच होता की आपल्याला जसं व्हावंसं, वागावंसं वाटत होतं तसं वागणारी एक काल्पनिक व्यक्ती होती" अशा काहीश्या अर्थाचा एक उल्लेख आहे. त्याचप्रमाणे शाळा वाचताना आणि वाचून संपल्यावरही कित्येकांना अगदी स्वतःच्या शाळेविषयी वाचल्यासारखं, आपल्या त्यावेळच्या आयुष्याविषयी, त्यावेळी केलेल्या मस्ती, धम्माल, दंग्याविषयी आणि खोड्यांविषयी आठवतं, काही जणांना अगदी तसंच्या तसं नाही पण अनेक प्रसंग आपल्या शालेय जीवनाच्या जवळ जाणारे वाटतात किंवा कित्येकांना ही 'शाळा' म्हणजे फक्त पुस्तकात असणारी आणि आपल्या प्रत्यक्षातल्या नववी-दहावीच्या आयुष्यापेक्षा कित्येक मैल लांबची वाटते पण असंच सगळं आपल्यावेळीही आपल्या बाबतीतही घडलं असतं तर खूप धमाल आली असती असंही वाटत राहतं.
पण कुठल्याही स्वरुपात का होईना आपण 'या शाळे'ला आपल्या शाळेशी रिलेट करतोच आणि मला वाटतं हेच 'शाळा' चं सर्वात मोठं यश आहे आणि त्याबद्दल मिलिंद बोकीलांचे कितीही आभार मानले तरी ते मुकुंदाच्या शिरोडकरवर असलेल्या, चित्र्याच्या 'केवडा'वर असलेल्या, 'सुकडी'च्या महेशवर असलेल्या, आंबेकरच्या मांजरेकर सरांवर असलेल्या प्रेमापेक्षा आणि समस्त पोरापोरींच्या मनात बेंद्रीणीबद्दल, आप्पाबद्दल आणि केवड्याच्या बापाबद्दल असणार्या रागापेक्षा कित्येक पटीने कमीच असतील !!!!
* या शाळेचा पहिला वर्ग 'ऋतू हिरवा २०११ ' इथे भरला होता.

Saturday, June 4, 2011
अहवाल : मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा - २०११
काल शुक्रवार दिनांक ३ जून ईसवी सन २०११ रोजी (न) ठरल्याप्रमाणे मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा (न्यू जर्सी शाखा) अत्यंत थाटामाटात परंतु तितक्याच साधेपणाने संपन्न झाला. सदर मेळाव्या दरम्यान घडलेल्या अनेक लक्षवेधक घडामोडी, चित्ताकर्षक बाबी आणि सदरहू मेळाव्याचा अहवाल आमच्या जगभर पसरलेल्या आणि तत्कारणात न्यू जर्सी शाखेच्या मेळाव्यास उपस्थित राहू न शकलेल्या तमाम ब्लॉगु-ब्लगिनींपर्यंत पोचवताना आमच्या चित्तास अतीव आनंद होत आहे.
प्रमुख पाहुणे : रारा रोहण्णा उर्फ रोहणा उर्फ सेनापती उर्फ खानापती उर्फ श्री रोहन !!
("इतने नाम और एकही आदमी? बाकी लोग कहाँ है?" वाले फालतू जोक मारू नयेत. आम्हीही 'अंदाज अपना अपना' पाहिलेला आहे. तस्मात् सदर विनोदास हसले जाणार नाही.)
अध्यक्ष : -------------------------------- करा --------------------------------
('करा' वरून अर्थबोध न होणार्यांनी DO वाचावे. तरीही अर्थबोध न होणार्यांनी वरील ओळ पुन्हा वाचावी.)
सूत्रसंचालन : सत्यवान वटवटे
विशेष उपस्थिती : ज्यु. वटवटे
प्रमुख व्यवस्थापक : सावित्री वटवटे आणि कुटुंबिय
प्रथम पुष्प
प्रमुख पाहुण्यांनी उत्सवस्थळी किमान तास दोन तास विलंबाने पोचावे या जगन्मान्य, समाजमान्य नियमाच्या पेकाटात कचकचीत लाथ हाणून आमच्या प्रपांनी चक्क वेळेच्या आधी ३० मिनिटे म्हणजे जर्सीतल्या घड्याळाप्रमाणे अंदाजे १२:१५ वाजता उत्सवस्थळी आगमन केले परंतु प्रमुख व्यवस्थापक अगोदरच पूर्ण तयारीत असल्याने कुठल्याही गडबड गोंधळाविना स्वागत समारंभपार पडून अध्यक्ष स्थानापन्न झाले. काही क्षणातच मा. ज्यु. वटवट्यांनी आपली 'विशेष उपस्थिती' जाणवून दिली. परंतु प्र.व्य. यांच्या चोख व्यवस्थेमुळे ती क्षणभंगुर ठरली आणि ज्यु वटवटे पुनःश्च शयनकक्षात निद्रिस्त झाले. त्यानंतर अध्यक्ष आणि सूत्रसंचालक यांच्यात काही नैमित्तिक विचारांची देवाणघेवाण (अनेक शब्दांबद्दल एक शब्द : गप्पा) झाल्यानंतर मेळाव्याचे स्थान तात्पुरते भोजनकक्षात हलवण्याविषयी एकमत झाले.
भोजनकक्षात तीच अनेकविध विचारांची ... आणि पदार्थांचीही... देवाणघेवाण पुढे चालवण्यात आली. साधाच परंतु चौरस, चौफेर, चौरंगी, चौढंगी वगैरे आहाराच्या सेवनानंतर मेळाव्याचे स्थान पुनःश्च एकवार प्रमुख कक्षात हलविले गेले. दरम्यान पुन्हा एकवार ज्यु वटवटे यांनी आपली विशेष उपस्थिती अधिक दमदारपणे जाणवून दिल्याने प्रव्य यांना प्रमुख कक्षातून काढता पाय घेऊन ज्यु वटवटे यांच्या सेवेस हजार व्हावे लागले.
अध्यक्षांचे आगमन होताहोताच सुसं यांनी त्यांच्या आगमनाविषयी "सेनापती येती घरा तोचि दिवाळी दसरा " अशी बझ-दवंडी पिटून ठेवली होती. तेव्हा जगभर पसरलेल्या परंतु जर्सी मेळाव्यास हजर न राहू शकलेल्या तमाम ब्लॉगबांधवांना अ./प्र.पा. यांच्या आगमानाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी अ./प्र.पा. आणि सु.सं. यांनी आंतरजालावर प्रवेश करून तमाम ब्लॉगु-ब्लगिनींची मतं जाणून घेतली.
तदनंतर'कॉपी' रोखण्यासाठी 'पेस्ट' ...... आपलं सोरी... 'बेस्ट' उपाय कोणता?, माननीय राष्ट्रपुरुष हे आपल्या तीर्थस्वरूपांची खाजगी मालमत्ता असल्यागत मानून अन्य जातीय/पंथीय लोकांना उद्देशून द्वेषपूर्वक लिखाण करणार्या ब्लॉग्जचा कसा बंदोबस्त करता येईल, वगैरे वगैरे किरकोळ विषय टाळून पामुख्याने खादाडी, भटकंती वगैरे वगैरे महत्वाच्या विषयांवर महत्वाची चर्चा चालू होती.
चर्चेदरम्यान अचानकच घड्याळात (पहाटेचे) चार वाजल्याचे पाहून आपले घड्याळ दोन तीन तास पुढे तर गेले नाही ना अशा अगम्य विचाराने सु.सं. आणि अ./प्र.पा. यांनी कक्षातील अन्य घड्याळे, ऊर्ध्वपट, 'नेत्र'-ध्वनी, 'नेत्र'-कुंडी वगैरे समस्त नेत्रांच्या नेत्रांत डोकावून बघून खरोखरच चार वाजले असल्याची खात्री करून घेतल्यावर त्यांचे नेत्र विस्फारलेच. प्रत्यक्षात खरोखरच चार वाजले आहेत याची जाणीव झाल्यावर त्यांनी मेळाव्याचे प्रथम पुष्प तिथेच थांबवण्याचा निर्णय घेऊन निद्रानगरीत प्रवेश केला.
द्वितीय पुष्प
द्वितीय पुष्प तुलनेने घाईगर्दीचे ठरणार याची आधीच कल्पना होती. त्यामुळे चहापान आणि अन्य प्रातःविधी उरकून झाल्यावर आणि केवळ चार तासांच्या निद्रेच्या भांडवलावर सु.सं. आणि अ./प्र.पा. यांनी लगेचच मेळाव्याच्या द्वितीय पुष्पास प्रारंभ केला. चर्चा सुरु होते ना होते तोच काही वेळातच ती तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि त्याला कारणही तसंच जोरदार होतं. कारण बटाटेवडे आणि मँगो मिल्कशेकचं आगमन झालं होतं !!!!!!
यानंतर चर्चा पूर्णवेळ फक्त ब्लॉगर्स, खादाडी आणि ब्लॉगर्सची खादाडी या विषयांभोवतीच फिरत होती. काही काळातच खादाडीच्या दुनियेतून आम्हाला पुन्हा जर्सीत अर्थात वास्तव जगात परत यावं लागलं कारण प्रमुख पाहुण्यांच्या निर्गमनाची घटिका समीप येत चालली होती. काही तासांतच त्यांना मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्याच्या मुंबई शाखेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहायचं होतं.
खादाडी, गप्पा, जागरणं इत्यादींनी भरलेल्या या दोन पुष्पांच्या दरम्यान एक महत्वाचं काम राहूनच गेलं होतं ते म्हणजे फोटोसेशन. जर्सी ब्लॉगर्स मेळाव्याचा पुरावा ;) पण वेळेअभावी अतिशय घाईगडबडीतच फोटोसेशन पार पडलं, निघताना गळाभेट झाली, "पुन्हा लवकरच आणि नक्की भेटू" च्या वचनांच्या देवाणघेवाणी झाल्या.
सेनापतींच्या हस्ते मराठी ब्लॉगर्सच्या जर्सी शाखेतर्फे मुंबई शाखेच्या ब्लॉगर्स मेळाव्यासाठी भरघोस, भरदार, जोरदार शुभेच्छा पाठवण्यात आल्या आहेत. त्या मिळालेल्या आहेत की नाहीत हे उद्याचे मुंबई शाखेचे अहवाल वाचून कळेलच ;)
थोडक्यात जर्सी शाखा कृत मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा - २०११ अतिशय आनंदात, सुखासमाधानात पार पडला. सदर मेळाव्याच्या जोरदार यशामुळे जर्सी शाखेच्या कार्यकर्त्यांचा दुणावलेला उत्साह लक्षात घेता पुढील सप्ताहात अशाच तर्हेचा अजून एक मेळावा साजरा करण्याचे योजिले आहे. यथावकाश त्याचाही अहवाल येईलच. धन्यवाद...
-समाप्त
==========
लागोपाठ तिसरा ब्लॉगर मेळावा बुडतोय (म्हणजे मला यायला जमत नाहीये याअर्थी. मेळावे अगदी जोरदार चाललेत हो.) हे पाहून तिन्ही किंवा निदान कुठल्याही दोन किंवा अगदी कुठल्याही एका का होईना मेळाव्याला उपस्थिती लावू शकणार्या माझ्याच ब्लॉगु-ब्लगिनींचा मला कमालीचा हेवा वाटायला लागला (नो हार्ड फिलिंग्ज. इट्स अॅन ऑनेस्ट कन्फेशन). काही करून कुठला का होईना मेळावा अटेंड करावाच असं वाटायला लागलं. त्यामुळे गेल्या वर्षी उचक्या-भूकंपाच्या रुपात केली होती तशीच यावर्षी अधिक व्यापक प्रमाणात म्हणजेच थेट (मिनी)मेळावा साजरा करून त्याचा अहवाल छापण्यापर्यंतची लुडबुड करण्याचा आगाऊपणा कंटिन्यू केलाय. कृपया तरीही आहे तो लोभ असाच असावा.
ब्लॉगरु तितुका मेळा(वा)वा l
ब्लॉगर धर्म वाढवावा ll
जय ब्लॉगिंग !!!!!!

Friday, May 13, 2011
कंपोस्ट-३ : गुग्ल्या आणि कं
- तुम्ही ब्लॉग लिहीत असाल,
- ब्लॉगवर मोठमोठाल्या पोस्ट्स टाकत असाल,
- आणि त्या मोठमोठाल्या पोस्ट्स पब्लिश करायच्या आधी ब्लॉगरवर सेव्ह न करता 'घमेल्या'तल्या ड्राफ्टमधे सेव्ह करत असाल...
वर सांगितलेल्या तिन्ही अटींमध्ये तुम्ही-म्हणजे तुमचा ब्लॉग-बसत असेल तर ही छोटीशी पोस्ट उर्फ कंपोस्ट तुमच्यासाठीच आहे. (नाही. ब्लॉगर कित्येक तास बंद पडलं होतं त्याच्याशी या कंपोस्टचा काहीही संबंध नाही.)
पण यावेळी थोडं वेगळं आहे. ही कंपोस्ट माझ्या कं विषयी नसून राजाधिराज, सिंहासनाधिश्वर, महासम्राट (गो-ब्राह्मणप्रतिपालक मुद्दाम लिहिलं नाहीये. उगाच वाद होतात त्या शब्दाने ;) ) गुगल महाराजांच्या कं विषयी आहे. आणि कंपोस्ट असल्याने अर्थातच छोटीशी आहे.
पेबची गोष्ट लिहिताना आठवून, वेळ काढून, तुकड्यातुकड्यात लिहायला मला जवळपास ४-५ दिवस लागले होते. चांगली सवय की वाईट सवय किंवा चूक की बरोबर ते माहित नाही पण पोस्ट लिहिताना मी ती घमेल्याच्या मसुद्यांमध्ये (जीमेल ड्राफ्ट) मधे लिहितो. थोडा भाग लिहून झाल्यावर लिखाण बंद करायचं असेल तर ते तिकडेच सेव्ह करून ठेवतो. तर त्या सवयीप्रमाणे ४-५ रात्री जागून लिहून शुक्रवारी रात्री (अॅक्च्युअली शनिवारी पहाटे) पेब बर्यापैकी पूर्ण केलं आणि शनिवारी सकाळी पुन्हा एकदा नीट वाचून चेक करून पहिला भाग टाकायचा असं ठरवलं.
पण शनिवारी सकाळी उठून बघतो तर काय !! शेवटचे दोन भाग गायब !! पुन्हा पुन्हा शोधलं पण जैसे थे. आणि नेमका मी पहिला भाग जस्ट टाकला होता. त्यामुळे रात्री बसून शेवटचे दोन भाग संपवायचे असं ठरवलं आणि त्याप्रमाणे शनिवारी रात्री बसून ते संपवलेही. एकच चूक केली की सगळे भाग वेगवेगळया ड्राफ्टसमधे सेव्ह करण्याऐवजी एकत्र सेव्ह केले आणि रविवारी सकाळी व्हायचं तेच झालं. पुन्हा दोन भाग गायब होते !!!!
आधीच्या वेळी कदाचित अति झोप आल्याने मी सेव्ह करायला विसरलो असेन (खरंतर ड्राफ्टस ऑटोसेव्ह होतात.. पण तरीही) असा संशयाचा फायदा मी घमेल्याला दिला होता पण यावेळी मात्र मला पक्कं आठवत होतं की मी ड्राफ्ट नक्की सेव्ह केला होता. आणि त्यानंतर आयुष्यात पहिल्यांदा मी गुग्ल्यावर अविश्वास व्यक्त केला. प्रचंड राग आला होता त्याचा. तोवर दुसरा भाग टाकून झाला होता. त्यामुळे त्या रात्री (म्हणजे रविवारी रात्री, सोमवारी सकाळी ऑफिसला जायचं असूनही) रात्रभर जागून पुन्हा एकदा शेवटचे दोन भाग नीट लिहून काढले आणि सगळे भाग वेगवेगळ्या ड्राफ्टसमधे सेव्ह केले. मग उरलेल्या दोन दिवसात शेवटच्या भागांवर फायनल हात फिरवून ते पोस्ट केले.
नंतर 'इनसाईड जॉब' बघून झाल्यावर पुन्हा एकदा लंब्याचवड्या पोस्टस लिहायची खुमखुमी आली :P .. पण यावेळी आठवणीने वेगवेगळे ड्राफ्टस बनवले होते. पण तरीही प्रत्येक भागाला वेगळा ड्राफ्ट बनवला नव्हता.. एका ड्राफ्टमधे दोन-तीन भाग एकत्र असं सेव्ह केलं आणि व्हायचं तेच झालं. शेवटचे दोन भाग पुन्हा यावेळीही उडाले. !!!! :(
त्यानंतर आधीप्रमाणेच जागरणं करून, पुन्हा पुन्हा माहितीपट बघून सगळे भाग पुन्हा लिहिले. या सगळ्याला जवळपास १५-२० दिवस लागले आणि थोडक्यात पोस्ट किमान वीस दिवसांनी तरी लांबली. यावेळी मात्र एका भागाला एक ड्राफ्ट असं करून पोस्ट्स सेव्ह केल्या असल्याने वाचलो.
दोन्ही पोस्ट्स पूर्ण लिहून झाल्यावर सहज कुतूहल म्हणून नेटवर ड्राफ्टच्या साईझ लिमिटबद्दल काही माहिती मिळते का म्हणून शोधाशोध केली (म्हणजे पुन्हा गुगलवरच.. आईशप्पत $%^$). अर्थातच कुठेच काहीच सापडलं नाही. मग पुन्हा एकदा माझ्या पोस्ट्स बघितल्या आणि एक गोष्ट लक्षात आली. 'पेब' चे पाहिले पाच भाग मिळून अंदाजे ३२७५ शब्द होतात आणि 'इनसाईड जॉब'चे पहिले तीन भाग मिळून अंदाजे ३७१७ शब्द होतात. थोडक्यात घमेल्याच्या ड्राफ्टसमधे या आकड्यांच्या आसपास कुठेतरी काहीतरी गफलत नक्की आहे. यापेक्षा जास्त शब्दसंख्या झाली की घमेलं टांग देतं. अजिबात रिस्क घ्यायची नसेल तर ३००० शब्द अँड दॅट्स ऑल असं म्हणू. !!
वरची सगळी बडबड ऐकून तुमच्या डोक्यात दोन विचार नक्की आले असतील. एक म्हणजे ही खरंच कंपोस्ट असेल तर हा एवढी बडबड का करतोय.. ही खरंच कंपोस्ट आहे का? तर हो आहे. कारण आता लवकरच ही संपणार आहे
आणि दुसरी गोष्ट म्हणजे "च्यायला, ब्लॉगसाठी हा किती मेहनत करतो, दोन-चार रात्री जागतो, १५-२० दिवस लिहीतो अँड व्हॉट नॉट !!" हे दाखवण्यासाठी हे लिहिलंय असं वाटतंय. किंबहुना आता वाचताना मलाही ते तसंच वाटतंय ;) ... पण तरीही तुम्हाला बरं वाटावं म्हणून क्षणभर ते खरं आहे असंही समजू पण तरीही एवढी बडबड वाचल्यावर तुम्हाला ३००० शब्दांच्या लिमिटविषयी तरी कळलं ना? आणि तेही न जागता ;) थोडक्यात आपल्या दोघांसाठीही विन-विनचं आहे हे.. नाही का?
तर तात्पर्य एकच.... ३००० शब्दांपेक्षा जास्त शब्दांचे लेख गुगल ड्राफ्टमधे सेव्ह करू नका आणि केलेत तर विसरून जा कारण कितीही कामसू आणि आज्ञाधारक असला तरीही गुग्ल्यालाही कधीकधी कं येतोच !! ;)
* तळटीप : ही पोस्ट मात्र (कंपोस्ट असल्याने) एका बैठकीतच संपवलेली आहे ;)

Monday, May 9, 2011
बँक नावाची शिवी : भाग ५ (अंतिम)
* भाग १ इथे वाचा.
* भाग २ इथे वाचा.
* भाग ३ इथे वाचा.
* भाग ४ इथे वाचा.
भाग ५ : सध्याची परिस्थिती नक्की कशी आहे? (व्हेअर आर वुई नाऊ?)
एकूणच या प्रकारामुळे अमेरिकन (आणि त्यामुळे आपोआपच जागतिक) आर्थिक विषमता कमालीची वाढली. करप्रणाली श्रीमंतांना पूरक बनवली गेली. ग्लेन हबर्डने बुश सरकारच्या काळात काम करताना अनेक करकपाती सुचवल्या आणि अंमलातही आणल्या. बुश सरकारने आर्थिक गुंतवणूक, त्यावरील नफा आणि डीव्हीडंड यावरचे अनेक महत्वाचे कर रद्द केले. हे कर रद्द केल्याने सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा होईल असं भासवलं गेलं. परंतु प्रत्यक्षात हे असे महत्वाचे कर रद्द केल्याने एकूण लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या अतिधनिक नागरिकांना खूप मोठा फायदा झाला. १९८० आणि २००७ या दरम्यान मध्यमवर्गाचं अधिकाधिक आर्थिक खच्चीकरण झालं. घर, गाडी, वैद्यकीय सुविधा, शिक्षण या सगळ्यांच्या किंमती वाढल्या आणि या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकन नागरिक भरभरून कर्जं घ्यायला लागला. तालाच्या ९०% लोकांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालं आणि तेवढाच फायदा झाला तो या शृंखलेत वर असलेल्या १०% नागरिकांचा. !!!!
२००८ मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वीच्या भाषणांमधून बराक ओबामा यांनी वॉल स्ट्रीट आणि वॉशिंग्टनमधली वाढती आर्थिक हाव आणि आर्थिक शिथिलीकरण या दोन प्रमुख बाबींमुळे महामंदी आली आणि या दोन गोष्टी ताबडतोब बदलण्याचं प्रतिपादन केलं. अध्यक्ष झाल्यानंतर २००९ च्या सुमारास त्यांनी ताबडतोब आर्थिक पुनर्रचनेच्या आवश्यकतेचं सुतोवाच केलं. परंतु २०१० मध्ये जेव्हा प्रत्यक्ष आर्थिक पुनर्रचना केली गेली त्यावेळी कुठलेही विशेष बदल केले गेले नाहीत . गुणांकन एजन्सीज, लॉबीइंग आणि अन्य आर्थिक नियम यामधल्या बदलासंबंधी साधं भाष्यही केलं गेलं नाही. वॉल स्ट्रीटची आर्थिक पुनर्बांधणीशी निगडीत असलेल्या महत्वाच्या आर्थिक बाबींवरील मजबूत पकड अजूनही स्पष्ट दिसून येते.
ओबामा यांनी टिमोथी गाईटनर याची ट्रेजरी सेक्रेटरी पदावर निवड केली. हा तोच टिमोथी गाईटनर जो अतिशय नाजूक प्रसंगी न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर होता आणि ज्याने गोल्डमन सॅक्सला भरभरून आर्थिक मदत देववली.
विल्यम सी डडली हा न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा नवीन अध्यक्ष आहे. हा तोच इसम ज्याने ग्लेन हबर्डसह लिहिलेल्या अहवालात डेरीव्हेटीव्हजची प्रचंड स्तुती केली होती.
मार्क पॅटरसन हा गाईटनरचा कर्मचारी-प्रमुख आहे. मार्क पॅटरसन गोल्डमनचा माजी लॉबीईस्ट होता.
लुईस सॅक्स हा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे. हा मनुष्य ट्रायकेडिया या कंपनीचा प्रमुख होता. ट्रायकेडियाचा चुकीच्या आर्थिक गुंतावणूकीविरुद्ध बेटिंग करण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता.
कमॉडिटी फ्युचर्स कमिशनच्या प्रमुखपदी आहे तो गॅरी गेन्सलर. या गेन्सलरची गोल्डमन सॅक्सचा प्रमुख असताना डेरीव्हेटीव्हजना कायद्याच्या बंधनात आणण्याच्या विरोधात महत्वाची भूमिका होती.
ओबामाचा चीफ ऑफ स्टाफ असलेला रॅम इमॅन्युअल याने आता बुडीतखात्यात गेलेल्या फ्रेडी मॅकच्या संचालक मंडळात असताना सव्वा तीन लाख डॉलर्सची कमाई केली होती.
मार्टीन फेल्टसीन आणि लॉरा टायसन हे दोघेही ओबामाच्या आर्थिक पुनर्रचना सल्लागार समितीचे सदस्य आहेत.
आणि ओबामाचा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे तो म्हणजे लॅरी समर्स.
२००९ मध्ये ओबामाने बेन बर्नान्कीची फेडरल रिझर्व्हचा सेक्रेटरी म्हणून पुन्हा नेमणूक केली !!!
आर्थिक महामंदी ओसरल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी आणि पुन्हा असा आर्थिक उद्रेक घडू नये यासाठी जगभरातल्या मोठमोठ्या देशांनी अनेक महत्वाचे कडक नियम तयार केले आणि त्यांची कसोशीने अंमलबजावणीही केली........... परंतु ज्या देशातल्या अवाढव्य धनपिपासू वृत्तीमुळे जगावर महामंदी लादली गेली त्या अमेरिकेने आणि ओबामा सरकारने भविष्यात हे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने अजूनही कोणतीही हालचाल केलेली नाही !!!!!!!!!! त्यांच्या मते अजूनही हा एक छोटासा धक्का अस्जून स्थिती पूर्ववत होईल आणि असं पुन्हा कधीच होणार नाही.
२०१० च्या मध्यापर्यंत अजूनही कुठल्याही वित्तसंस्थेच्या प्रमुखावर कुठल्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा लावला गेलेला नाही की खटला चालवला गेलेला नाही. कोणालाही अटक झालेली नाही की कुठल्याही विशेष समितीची स्थापना झालेली नाही !!
आर्थिक फुगवट्याच्या काळात विविध वित्तसंस्थांच्या प्रमुखांना दिल्या गेलेल्या महाप्रचंड रकमेची वसुली करण्याच्या दृष्टीने ओबामा सरकारने कारवाई सोडा साधे प्रयत्नही केलेले नाहीत.
हा विरोधाभास पहा... २००९ मध्ये बेकारीचा दर १७ वर्षातल्या सर्वोच्च पातळीवर पोचला आणि त्याच वेळी
- मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना १४ बिलियन डॉलर्स अक्षरशः वाटले. !!!!!!!!!!
- गोल्डमन सॅक्सने १६ बिलियन वाटले
अमेरिकेची अर्थप्रणाली ही अनेक दशकांपर्यंत अतिशय स्थिर आणि सुरक्षित होती. पण गेल्या काही वर्षात काही महत्वाचे बदल झाले. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे या प्रणालीने समाजाकडे चक्क पाठ फिरवली. राजकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला महाप्रचंड आर्थिक संकटाच्या खाईत ढकलून दिलं ! ज्या लोकांनी महत्वाच्या पदांवर बसवून ही आर्थिक महामंदी अमेरिकेवर आणि त्यामुळे आपोआपच संपूर्ण जगावर लादली ते लोभी गुन्हेगार अजूनही त्याच सत्तास्थानांवर आहेत. महत्वाचे निर्णय घेताहेत.
--------------------------
इतके एकामागोमाग एक धक्के बसल्याने माहितीपट संपताना डोकं चक्रावून गेलेलं असतं. हे सगळं वाचून तुमचं डोकं गरगरत नसेल तर तो दोष सर्वस्वी माझ्या लिखाणाचा आहे. प्रत्यक्ष माहितीपट प्रचंड प्रभावी आहे. अनेक उदाहरणं, असंख्य छोटेछोटे पुरावे, कित्येक मुलाखती, अनेक वस्तुस्थितीदर्शक पुरावे यांचा आपल्यावर एकामागोमाग एक एवढा मारा होतो की त्यामुळे अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्याचा भास होतो. च्यायला हे $#%$^ लोक कित्येक वर्षं आपल्याला हातोहात फसवतायत चक्क आणि आपण फसतोय हे आपल्याला कळतही नाहीये.. आणि पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण एवढे निराधार आहोत की सगळं कळत, दिसत असूनही आपण कोणाचंही काहीही वाकडं करू शकत नाही. हे सारं असंच चालू आहे कित्येक वर्षं आणि पुढची अनेक वर्षं असंच चालू राहणार. सतत चालू राहणार. ज्यांच्या अमाप हावेपायी आणि कृष्णकृत्यांपायी सर्वसामान्य निर्दोष माणसाला आपला श्रमाचा पैसा हातातून निसटताना पाहावा लागतोय ते गुन्हेगार अजूनही तिथेच आहेत. सरकारात आहेत.. मानाची, महत्वाची आणि जवाबदारीची पदं अजूनही उपभोगत आहेत आणि कदाचित भविष्यातल्या महामंदीची तयारी करतायत. अर्थात ते काहीच गमावणार नाहीयेत.. सर्वस्व गमावणार आहोत ते आपण !! थोडक्यात भविष्यात येऊ घातलेल्या अशा अनेकानेक महामंद्यांना तोंड देण्याची तयारी करा हे नक्की.. !!
- समाप्त
* भाग २ इथे वाचा.
* भाग ३ इथे वाचा.
* भाग ४ इथे वाचा.
भाग ५ : सध्याची परिस्थिती नक्की कशी आहे? (व्हेअर आर वुई नाऊ?)
एकूणच या प्रकारामुळे अमेरिकन (आणि त्यामुळे आपोआपच जागतिक) आर्थिक विषमता कमालीची वाढली. करप्रणाली श्रीमंतांना पूरक बनवली गेली. ग्लेन हबर्डने बुश सरकारच्या काळात काम करताना अनेक करकपाती सुचवल्या आणि अंमलातही आणल्या. बुश सरकारने आर्थिक गुंतवणूक, त्यावरील नफा आणि डीव्हीडंड यावरचे अनेक महत्वाचे कर रद्द केले. हे कर रद्द केल्याने सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा होईल असं भासवलं गेलं. परंतु प्रत्यक्षात हे असे महत्वाचे कर रद्द केल्याने एकूण लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या अतिधनिक नागरिकांना खूप मोठा फायदा झाला. १९८० आणि २००७ या दरम्यान मध्यमवर्गाचं अधिकाधिक आर्थिक खच्चीकरण झालं. घर, गाडी, वैद्यकीय सुविधा, शिक्षण या सगळ्यांच्या किंमती वाढल्या आणि या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकन नागरिक भरभरून कर्जं घ्यायला लागला. तालाच्या ९०% लोकांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालं आणि तेवढाच फायदा झाला तो या शृंखलेत वर असलेल्या १०% नागरिकांचा. !!!!
२००८ मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वीच्या भाषणांमधून बराक ओबामा यांनी वॉल स्ट्रीट आणि वॉशिंग्टनमधली वाढती आर्थिक हाव आणि आर्थिक शिथिलीकरण या दोन प्रमुख बाबींमुळे महामंदी आली आणि या दोन गोष्टी ताबडतोब बदलण्याचं प्रतिपादन केलं. अध्यक्ष झाल्यानंतर २००९ च्या सुमारास त्यांनी ताबडतोब आर्थिक पुनर्रचनेच्या आवश्यकतेचं सुतोवाच केलं. परंतु २०१० मध्ये जेव्हा प्रत्यक्ष आर्थिक पुनर्रचना केली गेली त्यावेळी कुठलेही विशेष बदल केले गेले नाहीत . गुणांकन एजन्सीज, लॉबीइंग आणि अन्य आर्थिक नियम यामधल्या बदलासंबंधी साधं भाष्यही केलं गेलं नाही. वॉल स्ट्रीटची आर्थिक पुनर्बांधणीशी निगडीत असलेल्या महत्वाच्या आर्थिक बाबींवरील मजबूत पकड अजूनही स्पष्ट दिसून येते.
ओबामा यांनी टिमोथी गाईटनर याची ट्रेजरी सेक्रेटरी पदावर निवड केली. हा तोच टिमोथी गाईटनर जो अतिशय नाजूक प्रसंगी न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर होता आणि ज्याने गोल्डमन सॅक्सला भरभरून आर्थिक मदत देववली.
![]() |
| विल्यम सी डडली |
मार्क पॅटरसन हा गाईटनरचा कर्मचारी-प्रमुख आहे. मार्क पॅटरसन गोल्डमनचा माजी लॉबीईस्ट होता.
लुईस सॅक्स हा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे. हा मनुष्य ट्रायकेडिया या कंपनीचा प्रमुख होता. ट्रायकेडियाचा चुकीच्या आर्थिक गुंतावणूकीविरुद्ध बेटिंग करण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता.
कमॉडिटी फ्युचर्स कमिशनच्या प्रमुखपदी आहे तो गॅरी गेन्सलर. या गेन्सलरची गोल्डमन सॅक्सचा प्रमुख असताना डेरीव्हेटीव्हजना कायद्याच्या बंधनात आणण्याच्या विरोधात महत्वाची भूमिका होती.
ओबामाचा चीफ ऑफ स्टाफ असलेला रॅम इमॅन्युअल याने आता बुडीतखात्यात गेलेल्या फ्रेडी मॅकच्या संचालक मंडळात असताना सव्वा तीन लाख डॉलर्सची कमाई केली होती.
![]() |
| लॉरा टायसन |
आणि ओबामाचा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे तो म्हणजे लॅरी समर्स.
२००९ मध्ये ओबामाने बेन बर्नान्कीची फेडरल रिझर्व्हचा सेक्रेटरी म्हणून पुन्हा नेमणूक केली !!!
आर्थिक महामंदी ओसरल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी आणि पुन्हा असा आर्थिक उद्रेक घडू नये यासाठी जगभरातल्या मोठमोठ्या देशांनी अनेक महत्वाचे कडक नियम तयार केले आणि त्यांची कसोशीने अंमलबजावणीही केली........... परंतु ज्या देशातल्या अवाढव्य धनपिपासू वृत्तीमुळे जगावर महामंदी लादली गेली त्या अमेरिकेने आणि ओबामा सरकारने भविष्यात हे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने अजूनही कोणतीही हालचाल केलेली नाही !!!!!!!!!! त्यांच्या मते अजूनही हा एक छोटासा धक्का अस्जून स्थिती पूर्ववत होईल आणि असं पुन्हा कधीच होणार नाही.
२०१० च्या मध्यापर्यंत अजूनही कुठल्याही वित्तसंस्थेच्या प्रमुखावर कुठल्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा लावला गेलेला नाही की खटला चालवला गेलेला नाही. कोणालाही अटक झालेली नाही की कुठल्याही विशेष समितीची स्थापना झालेली नाही !!
आर्थिक फुगवट्याच्या काळात विविध वित्तसंस्थांच्या प्रमुखांना दिल्या गेलेल्या महाप्रचंड रकमेची वसुली करण्याच्या दृष्टीने ओबामा सरकारने कारवाई सोडा साधे प्रयत्नही केलेले नाहीत.
हा विरोधाभास पहा... २००९ मध्ये बेकारीचा दर १७ वर्षातल्या सर्वोच्च पातळीवर पोचला आणि त्याच वेळी
- मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना १४ बिलियन डॉलर्स अक्षरशः वाटले. !!!!!!!!!!
- गोल्डमन सॅक्सने १६ बिलियन वाटले
अमेरिकेची अर्थप्रणाली ही अनेक दशकांपर्यंत अतिशय स्थिर आणि सुरक्षित होती. पण गेल्या काही वर्षात काही महत्वाचे बदल झाले. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे या प्रणालीने समाजाकडे चक्क पाठ फिरवली. राजकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला महाप्रचंड आर्थिक संकटाच्या खाईत ढकलून दिलं ! ज्या लोकांनी महत्वाच्या पदांवर बसवून ही आर्थिक महामंदी अमेरिकेवर आणि त्यामुळे आपोआपच संपूर्ण जगावर लादली ते लोभी गुन्हेगार अजूनही त्याच सत्तास्थानांवर आहेत. महत्वाचे निर्णय घेताहेत.
--------------------------
इतके एकामागोमाग एक धक्के बसल्याने माहितीपट संपताना डोकं चक्रावून गेलेलं असतं. हे सगळं वाचून तुमचं डोकं गरगरत नसेल तर तो दोष सर्वस्वी माझ्या लिखाणाचा आहे. प्रत्यक्ष माहितीपट प्रचंड प्रभावी आहे. अनेक उदाहरणं, असंख्य छोटेछोटे पुरावे, कित्येक मुलाखती, अनेक वस्तुस्थितीदर्शक पुरावे यांचा आपल्यावर एकामागोमाग एक एवढा मारा होतो की त्यामुळे अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्याचा भास होतो. च्यायला हे $#%$^ लोक कित्येक वर्षं आपल्याला हातोहात फसवतायत चक्क आणि आपण फसतोय हे आपल्याला कळतही नाहीये.. आणि पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण एवढे निराधार आहोत की सगळं कळत, दिसत असूनही आपण कोणाचंही काहीही वाकडं करू शकत नाही. हे सारं असंच चालू आहे कित्येक वर्षं आणि पुढची अनेक वर्षं असंच चालू राहणार. सतत चालू राहणार. ज्यांच्या अमाप हावेपायी आणि कृष्णकृत्यांपायी सर्वसामान्य निर्दोष माणसाला आपला श्रमाचा पैसा हातातून निसटताना पाहावा लागतोय ते गुन्हेगार अजूनही तिथेच आहेत. सरकारात आहेत.. मानाची, महत्वाची आणि जवाबदारीची पदं अजूनही उपभोगत आहेत आणि कदाचित भविष्यातल्या महामंदीची तयारी करतायत. अर्थात ते काहीच गमावणार नाहीयेत.. सर्वस्व गमावणार आहोत ते आपण !! थोडक्यात भविष्यात येऊ घातलेल्या अशा अनेकानेक महामंद्यांना तोंड देण्याची तयारी करा हे नक्की.. !!
- समाप्त
बँक नावाची शिवी : भाग ४
* भाग १ इथे वाचा.
भाग ४ : जवाबदारी !!
ज्या व्यक्तींच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांच्या स्वतःच्याच अतिविशाल बँका, कंपन्या बुडाल्या ते लोक (सीईओज) मात्र त्यांनी साठवलेली गडगंज माया व्यवस्थितपणे घेऊन बाहेर पडले. लिमन ब्रदर्सच्या पाच उच्चाधिकाऱ्यांनी २०० आणि २००७ या सात वर्षात १ बिलियन डॉलर्सची माया कमावली आणि लिमन बुडल्यावरही त्यांचे पैसे त्यांच्याकडे सुरक्षित होते. त्यातल्या एका पैश्यालाही धक्का लागला नाही !!!!
कंट्रीवाईडचा प्रमुख कार्यकारी अधिकारी अँजेलो मोझिलो याने २००३ आणि २००८ या पाच वर्षांत ४७० मिलियन डॉलर्स कमावले. कंट्रीवाईड बुडण्याआधीच्या एका वर्षात त्याच्याकडे असलेले कंट्रीवाईडचे शेअर्स विकून त्याने १४० मिलियन डॉलर्स कमावले ते वेगळेच.
मेरील लिंचचा प्रमुख कार्यकारी अधिकारी स्टॅन ओ'निल याची फक्त २००६ आणि २००७ मधली कमाई ९० मिलियन डॉलर्स होती. मेरीलला बुडवल्यानंतर त्याने राजीनामा दिला (खरं तर त्याला संचालक मंडळाने काढून टाकायला हवं होतं) आणि त्याला भत्त्याच्या स्वरुपात १६० मिलियन डॉलर्स मिळाले.
ओ'निल नंतर आलेल्या जॉन थेनने २००७ मध्ये ८७ मिलियन डॉलर्स कमावले. आणि मेरीलला सरकारने पैसे देऊन वाचवल्यानंतर फक्त दोनच महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर २००८ मध्ये थेन आणि संचालक मंडळातल्या सदस्यांनी करोडो डॉलर्स बोनस म्हणून आपापसात वाटून घेतले !!
२००८ च्या मार्च मध्ये एआयजीच्या फायनान्शिअल प्रोडक्ट डिव्हिजनला ११ बिलियन डॉलर्सचा तोटा झाला. त्याबद्दल त्या डिव्हिजनचा प्रमुख असणारा जोसेफ कॅसेनो याची हकालपट्टी करण्याऐवजी कंपनीने दरमहा १ मिलियन डॉलर्सच्या पगारावर त्याची नेमणूक सल्लागार (कन्सल्टंट) म्हणून केली !!!!
अमेरिकन अर्थव्यवस्थेला आपल्या मनाप्रमाणे वाकवणारी आणि तरीही सरकारात दिमाखाने मिरवणारी अशी अनेक नावं उदाहरण म्हणून बघता येतील
- मार्टीन फेल्डस्टीन हा हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक असलेला विद्वान अर्थतज्ज्ञ. रेगन सरकारचा प्रमुख आर्थिक सल्लागार आणि शिथिलीकरणाचा (फायनान्शिअल डीरेग्युलेशन) कट्टर समर्थक ज्याने शिथिलीकरणासाठी विशेष मदत केली. १९८८ ते २००९ पर्यंत तो एआयजी आणि एआयजी फायनान्शिअल प्रोडक्टसच्या संचालक मंडळावर होता. यादरम्यान त्याने करोडो डॉलर्स कमावले.
ग्लेन हबर्ड हा कोलंबिया बिझनेस स्कूलचा डीन आणि बुश सरकारमधला एक प्रमुख आर्थिक सल्लागार होता.
ग्लेन हबर्ड, मार्टीन फेल्डस्टीन आणि यांच्यासारख्या असंख्य वित्तीय अभ्यासक/अर्थतज्ज्ञांनी अर्थव्यवस्थेला हवं तसं वळवून, सरकारला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडून करोडो डॉलर्सची माया गुपचूप गोळा केली आणि अजूनही करत आहेत.
बेअर स्टर्नचे दोन हेज फंड अधिकारी राल्फ सिऑफि आणि मॅथ्यू टॅनीन या दोघांना आर्थिक घोटाळ्याबद्दल अटक झाली. ग्लेन हबर्डने १ लाख डॉलर्स घेऊन ते दोघे निर्दोष असल्याचं प्रमाणपत्र दिलं. अशा रीतीने हबर्डने मेटलाईफच्या संचालक मंडळात राहून अडीच लाख डॉलर्स कमावले.
- लॉरा टायसन (जिने या माहितीपटासाठी मुलाखत द्यायला नकार दिला.), कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची प्राध्यापिका... ही क्लिंटन सरकारमध्ये राष्ट्रीय आर्थिक समितीच्या अध्यक्षपदी होती. सरकारमधून बाहेर पडल्यावर वार्षिक साडेतीन लाख डॉलर्सच्या भरभक्कम पगारावर ती मॉर्गन स्टॅनलीच्या संचालक मंडळात रुजू झाली.
- रुथ सिमन्स ही ब्राउन विद्यापीठाची अध्यक्षा वार्षिक तीन लाख डॉलर्सचं पॅकेज घेऊन गोल्डमन सॅक्सच्या संचालक मंडळात रुजू झाली.
लॅरी समर्स ज्याचा आर्थिक शिथिलीकरणाच्या निर्णयात अतिशय प्रमुख सहभाग होता. तो २००१ साली हार्वर्ड विद्यापीठाचा अध्यक्ष बनला. त्यावेळी त्याने अनेक हेज फंड्सचा सल्लागार म्हणून अक्षरशः लाखो डॉलर्स जोडले.
फ्रेडरिक मिश्किन : जो अमेरिकन अर्थव्यवस्था बुडायला आली असताना फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर होता आणि योग्य ते उपाय योजण्याऐवजी आपल्या पदाचा राजीनामा देऊन पळून आला. या फ्रेडरिक मिश्किनने २००६ साली आईसलँड बद्दल, तिथल्या अर्थव्यवस्था आणि इतर महत्वाच्या बाबींबद्दलच्या एका महत्वाच्या अहवालाचं लिखाण केलं. त्यात त्याने आईसलँडच्या अर्थव्यवस्थेचं तोंड फाटेस्तोवर कौतुक केलं. परंतु त्याच्या अहवालातल्या माहितीला, मतांना कुठल्याही आर्थिक अभ्यासाची, शोधाची, पार्श्वभूमी नव्हती. तो अहवाल अतिशय चुकीचा, खोटा आणि म्हणूनच धक्कादायक होता. आईसलँडच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या चांगल्या (पण नितांत खोट्या) माहितीने भरलेला अहवाल पुरवण्यासाठी आईसलँड चेंबर ऑफ कॉमर्सने मिश्किनला सव्वालाख डॉलर्सची घसघशीत रक्कम पुरवली. या माणसाचं वार्षिक उत्पन्न अंदाजे ६ ते १७ मिलियन डॉलर्स आहे !!!
रिचर्ड पोर्टस, ब्रिटनमधला अत्यंत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि लंडन बिझनेस स्कुलचा प्राध्यापक यानेही २००७ मध्ये आईसलँड चेंबर ऑफ कॉमर्सच्या विनंतीवरून आईसलँडबद्दल एक अहवाल लिहिला. हा अहवाल देखील आईसलँडच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या अमाप परंतु खोट्या स्तुतीने भरलेला होता.
आर्थिक फुगवटा अत्युच्च शिखरावर असताना २००४ मध्ये ग्लेन हबर्ड आणि विलियम सी डडली (गोल्डमन सॅक्सचा प्रमुख अर्थतज्ज्ञ) या दोघांनी मिळून अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल एक महत्वाचा अहवाल लिहिला. या अहवालात हबर्डने डेरीव्हेटीव्हज आणि सिक्युरिटायझेशन चेनचं प्रचंड कौतुक केलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेतले धोके कमी झाले आणि आर्थिक सक्षमीकरण वाढलं. यामुळे अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि सुरक्षित होऊन महामंदीसदृश संकट येण्याची शक्यता जवळपास निकालात निघाली.
* भाग ५ (अंतिम भाग) इथे वाचा
* भाग २ इथे वाचा.
* भाग ३ इथे वाचा.
ज्या व्यक्तींच्या चुकीच्या निर्णयांमुळे त्यांच्या स्वतःच्याच अतिविशाल बँका, कंपन्या बुडाल्या ते लोक (सीईओज) मात्र त्यांनी साठवलेली गडगंज माया व्यवस्थितपणे घेऊन बाहेर पडले. लिमन ब्रदर्सच्या पाच उच्चाधिकाऱ्यांनी २०० आणि २००७ या सात वर्षात १ बिलियन डॉलर्सची माया कमावली आणि लिमन बुडल्यावरही त्यांचे पैसे त्यांच्याकडे सुरक्षित होते. त्यातल्या एका पैश्यालाही धक्का लागला नाही !!!!
![]() |
| अँजेलो मोझिलो |
कंट्रीवाईडचा प्रमुख कार्यकारी अधिकारी अँजेलो मोझिलो याने २००३ आणि २००८ या पाच वर्षांत ४७० मिलियन डॉलर्स कमावले. कंट्रीवाईड बुडण्याआधीच्या एका वर्षात त्याच्याकडे असलेले कंट्रीवाईडचे शेअर्स विकून त्याने १४० मिलियन डॉलर्स कमावले ते वेगळेच.
मेरील लिंचचा प्रमुख कार्यकारी अधिकारी स्टॅन ओ'निल याची फक्त २००६ आणि २००७ मधली कमाई ९० मिलियन डॉलर्स होती. मेरीलला बुडवल्यानंतर त्याने राजीनामा दिला (खरं तर त्याला संचालक मंडळाने काढून टाकायला हवं होतं) आणि त्याला भत्त्याच्या स्वरुपात १६० मिलियन डॉलर्स मिळाले.
ओ'निल नंतर आलेल्या जॉन थेनने २००७ मध्ये ८७ मिलियन डॉलर्स कमावले. आणि मेरीलला सरकारने पैसे देऊन वाचवल्यानंतर फक्त दोनच महिन्यांनी म्हणजेच डिसेंबर २००८ मध्ये थेन आणि संचालक मंडळातल्या सदस्यांनी करोडो डॉलर्स बोनस म्हणून आपापसात वाटून घेतले !!
![]() |
| स्टॅन ओ'निल |
अमेरिकन बँक्स आता पूर्वीपेक्षाही अधिक बलाढ्य, अवाढव्य आणि अधिक शक्तिशाली झाल्या आहेत. अनेक छोट्या बँकांना मोठ्या बँकांनी विकत घेतलंय किंवा त्यांचं विलीनीकरण झालंय. अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वीसारखी होण्यासाठी (म्हणजे सगळ्या आर्थिक नाड्या पुन्हा आपल्या हातात येण्यासाठी) अमेरिकन वित्तक्षेत्र पाण्यासारखा पैसा ओततंय. अनेक राजकारण्यांना खिशात घालण्याचे प्रयत्न केले जातायत, अनेकजण त्यांचे बाहुले बनलेत देखील. पण अजून एक महत्वाचं क्षेत्र आहे ज्यात हे लोक प्रचंड गुंतवणूक करतायत. हे असं क्षेत्र आहे की जे ज्यात गुंतवणूक होते आहे हेच कोणाला माहित नाहीये आणि ते म्हणजे फायनान्शिअल स्टडीज.
![]() |
| जॉन थेन |
इकॉनॉमिक्स शिकवणारं हे क्षेत्र, विद्यापीठं यांच्याकडे त्यांनी मोर्चा वळवला आहे. वित्तक्षेत्रावरची बंधनं शिथिल करण्यासाठी अनेक अर्थतज्ज्ञ, अभ्यासक, प्राध्यापक यांनी हिरीरीने मोहिमा चालवल्या आहेत. १९८० पासून या प्रकाराला विशेष जोर चढला आहे आणि हेच लोक अमेरिकेच्या सरकारी आणि महत्वाच्या राजनैतिक नियमांची आखणी करत आहेत. हे असे प्राध्यापक, अर्थतज्ज्ञ अनेक कंपन्यांच्या सल्लागार मंडळात काम बघताहेत आणि आपसूकच त्या कंपन्यांना फायदे होतील अशा प्रकारचे नियम तयार करण्यासाठी सरकारवर दबाव आणतायत किंवा शक्य असेल तिथे स्वतःच असे नियम बनवतायत.
अमेरिकन अर्थव्यवस्थेला आपल्या मनाप्रमाणे वाकवणारी आणि तरीही सरकारात दिमाखाने मिरवणारी अशी अनेक नावं उदाहरण म्हणून बघता येतील
![]() |
| मार्टीन फेल्डस्टीन |
ग्लेन हबर्ड हा कोलंबिया बिझनेस स्कूलचा डीन आणि बुश सरकारमधला एक प्रमुख आर्थिक सल्लागार होता.
ग्लेन हबर्ड, मार्टीन फेल्डस्टीन आणि यांच्यासारख्या असंख्य वित्तीय अभ्यासक/अर्थतज्ज्ञांनी अर्थव्यवस्थेला हवं तसं वळवून, सरकारला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडून करोडो डॉलर्सची माया गुपचूप गोळा केली आणि अजूनही करत आहेत.
![]() |
| ग्लेन हबर्ड |
- लॉरा टायसन (जिने या माहितीपटासाठी मुलाखत द्यायला नकार दिला.), कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीची प्राध्यापिका... ही क्लिंटन सरकारमध्ये राष्ट्रीय आर्थिक समितीच्या अध्यक्षपदी होती. सरकारमधून बाहेर पडल्यावर वार्षिक साडेतीन लाख डॉलर्सच्या भरभक्कम पगारावर ती मॉर्गन स्टॅनलीच्या संचालक मंडळात रुजू झाली.
- रुथ सिमन्स ही ब्राउन विद्यापीठाची अध्यक्षा वार्षिक तीन लाख डॉलर्सचं पॅकेज घेऊन गोल्डमन सॅक्सच्या संचालक मंडळात रुजू झाली.
लॅरी समर्स ज्याचा आर्थिक शिथिलीकरणाच्या निर्णयात अतिशय प्रमुख सहभाग होता. तो २००१ साली हार्वर्ड विद्यापीठाचा अध्यक्ष बनला. त्यावेळी त्याने अनेक हेज फंड्सचा सल्लागार म्हणून अक्षरशः लाखो डॉलर्स जोडले.
![]() |
| फ्रेडरिक मिश्किन |
![]() |
| रिचर्ड पोर्टस |
आर्थिक फुगवटा अत्युच्च शिखरावर असताना २००४ मध्ये ग्लेन हबर्ड आणि विलियम सी डडली (गोल्डमन सॅक्सचा प्रमुख अर्थतज्ज्ञ) या दोघांनी मिळून अमेरिकन अर्थव्यवस्थेबद्दल एक महत्वाचा अहवाल लिहिला. या अहवालात हबर्डने डेरीव्हेटीव्हज आणि सिक्युरिटायझेशन चेनचं प्रचंड कौतुक केलं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेतले धोके कमी झाले आणि आर्थिक सक्षमीकरण वाढलं. यामुळे अर्थव्यवस्था अधिक स्थिर आणि सुरक्षित होऊन महामंदीसदृश संकट येण्याची शक्यता जवळपास निकालात निघाली.
* भाग ५ (अंतिम भाग) इथे वाचा
बँक नावाची शिवी : भाग ३
* भाग १ इथे वाचा.
भाग ३ : महासंकट !! (द क्रायसिस)
बेन बर्नान्की २००६ मध्ये फेडरल रिझर्व्ह बोर्डाचा चेअरमन बनला. त्याच वर्षी सबप्राईम कर्जांचं वितरण सर्वाधिक झालं. हा योगायोग खचितच नव्हता !! अनेक अर्थतज्ज्ञ, अभ्यासक इत्यादींकडून धोक्याच्या अनेकानेक सूचना मिळूनही बर्नान्कीने ते रोखण्यासाठी कुठलीही पावलं उचलली नाहीत. उलट त्याच्यामते "हे अतिशय प्रगतीचं लक्षण असून घाबरण्याचं काही कारण नाही कारण अमेरिकेच्या इतिहासात घरांच्या किंमती आत्तापर्यंत कधीही घसरलेल्या नाहीत !!" बर्नान्कीने या माहितीपटासाठी मुलाखत देण्यास अर्थातच नकार दिला !
तब्बल २००४ पासून एफबीआयने वाढत जाणाऱ्या घरांच्या किंमती आणि सहजगत्या उपलब्ध होणारी कर्जं याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कर्जांसाठी दिलेल्या कागदपत्रात गडबड असल्याची भीतीही व्यक्त केली होती. पण त्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं गेलं. २००५ मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी, २००६ मध्ये नुरील रुबिनी या न्यूयॉर्क विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापकाने, २००७ मध्ये अॅलन स्लोन या फॉर्च्युन मासिकाच्या ख्यातनाम पत्रकाराने, २००७ मध्ये हेज फंड मॅनेजर बिल अॅकमन याने आणि २००८ मध्ये चार्ल्स मॉरिस या अभ्यासकाने वेळोवेळी या धोकादायक कर्जांच्या बाबतीत अनेक पेपर्स सदर केले, लेख लिहिले, पुस्तकं लिहीली, किंबहुना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही अमेरिकन सरकारला वेळोवेळी धोक्याच्या सूचना दिल्या. परंतु कसलाही परिणाम झाला नाही.
२००८ च्या दरम्यान कर्जवसुलीसाठी होणाऱ्या घरांच्या लिलावांनी विक्रमी संख्या गाठली !!!! गृहकर्जं आता बँकांना विकली जाईनाशी झाली. सीडीओजच्या व्यवहारांचं मार्केट साफ कोसळलं ज्यामुळे वित्तसंस्थांकडे अब्जावधी डॉलर्सची कर्जं, अन्य सीडीओ आणि प्रत्यक्ष घरं पडून राहिली आणि ती विकत घेण्यासाठी कोणीही ग्राहक मिळेनासा झाला. कारण लोकांकडे पैसेच नव्हते. हा कर्जांचा फुगवटा फुटला तेव्हा सरकार आणि फेडरल रिझर्व्ह त्याला तोंड देण्यासाठी सज्ज नव्हते. कारण या संकटाच्या व्याप्तीची त्यांना तोवर काही कल्पनाच आलेली नव्हती !
२००८ च्या फेब्रुवारी महिन्यातल्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीतही अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरी हेन्री पॉलसन याचे उद्गार होते "आर्थिक क्षेत्र मजबूत आहे. भरघोस वृद्धी होते आहे. आणि ज्याअर्थी भरघोस वृद्धी होते आहे त्याअर्थी महामंदी कशी येईल बरं? " आणि विशेष म्हणजे पॉलसनने हे उद्गार काढायच्या आधी चार महिने महामंदी ऑलरेडी सुरु झाली होती !!!!!!
१६ मार्च २००८ ला अवाढव्य वित्तसंस्था 'बेअर स्टर्न' च्या तिजोरीत खडखडाट झाला आणि 'जे पी मॉर्गन चेस' ने केवळ २ डॉलर प्रतिशेअर देऊन तिला विकत घेतलं. अर्थात यासाठी केंद्र सरकारने ३० बिलियन डॉलर्सची मदत दिली होती. त्यावेळीही सरकारने ताबडतोब पुढे होऊन या सगळ्या घोटाळ्यात हस्तक्षेप करून सगळी सुतराम आपल्या हातात घ्यायला हवी होती. पण दुर्दैवाने तसं घडलं नाही !!
७ सप्टेंबर २००८ ला सरकारने 'फ्रेडी मॅक' आणि 'फॅनी मे' या दोन एके काळच्या प्रचंड मोठ्या पण आता बुडीत खात्यात चाललेल्या गृहकर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांना ताब्यात घेतलं. तरीही पॉलसनच्या मते त्यात घाबरण्यासारखं काहीही नव्हतं.
दोनच दिवसांनी लीमन ब्रदर्सने ३.२ मिलियन डॉलर्सचा विक्रमी तोटा नोंदवला आणि त्यांचा शेअर गडगडला.
या कंपन्या बुडण्याच्या काही दिवस/महिने आधी यांची गुणांकनं (रेटिंग्ज) काय होती ते पाहू. फार धक्कादायक निकाल आहेत हे.
- बुडण्याच्या फक्त एक महिना आधीच बेअर स्टर्नचं गुणांकन ए२ (एए)होतं थोडक्यात अतिशय उत्तम आणि सुरक्षित गुंतवणूक असं हे रेटिंग होतं.
- लिमन ब्रदर्स : बुडण्याच्या फक्त काही दिवस आधी ए२.
- एआयजी : बुडण्याच्या फक्त काही दिवस आधी एए
- 'फ्रेडी मॅक' आणि 'फॅनी मे : एएए !!!!!!!!
- सिटीग्रुप, मेरील : एए
आपण या रेटिंग्जचे अर्थ पहिल्या भागात बघितलेच आहेत तरीही पुन्हा एकदा इथे बघू.
एएए : सर्वोत्कृष्ट
एए : उत्तम
ए : चांगलं
बीबीबी : बरं
बीबी : वाईट
बी : धोकादायक
१२ सप्टेंबर २००८ ला लिमन ब्रदर्सच्या तिजोरीत खडखडाट झाला आणि संपूर्ण वित्तक्षेत्र धोक्यात आलं. शेवटच्या क्षणी हेन्री पॉलसन आणि टिमोथी गाईटनर या न्यूयॉर्कच्या फेडरल रिझर्व्हच्या गव्हर्नर्सनी लिमन ब्रदर्सला वाचवण्याच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी सगळ्या प्रमुख बँकांच्या प्रमुखांची बैठक बोलावली.
परंतु त्याच सुमारास मेरील लिंच ही अजून एक महाबलाढ्य वित्तसंस्था/बँक धोक्यात आली होती. १४ सप्टेंबरला बँक ऑफ अमेरिकाने मेरीलला विकत घेतलं. लिमन ब्रदर्सला वाचवण्यासाठी/विकत घेण्यासाठी बारक्लेज बँक ही एकमेव ब्रिटीश बँक तयार होती. परंतु त्या बदल्यात त्यांना अमेरिकन सरकारकडून फायनान्शियल गॅरंटी हवी होती. पॉलसनने त्याला नकार दिला !!!!!!!!!!!!!! थोडक्यात लिमन काय किंवा अमेरिकन सरकार काय यापैकी कोणीही बँकरप्सीपासून वाचण्याची कसलीही काहीही तयारी केलेली नव्हती.
लिमन ब्रदर्सची बँकरप्सी केस सांभाळणारे वकील हार्वे मिलर म्हणतात "फेडरल रिझर्व्हला लिमन ब्रदर्सच्या बँकरप्सीची अंमलबजावणी १४ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी करून टाकायची होती. आम्ही त्यांना त्यांच्या निश्चयाचा पुनर्विचार करण्यासंबंधी बऱ्याच वेळा सुचवलं. पण त्यांच्या मते ते काय करताहेत आणि त्याचे परिणाम काय होतील याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांच्या मते आर्थिक स्थिती पूर्ववत आणण्यासाठी, शेअर बाजारात स्थैर्य आणण्यासाठी हे करणं अत्यावश्यकच आहे !!!!"
पॉलसन आणि बर्नान्कीने अन्य देशातल्या बँकरप्सी कायद्यांचा, नियमांचा आणि परिणामांचा अजिबात अभ्यास केलेला नव्हता हे तर उघड आहे. बँकरप्सीच्या ब्रिटीश कायद्यान्वये (लिमन ब्रदर्स ही ब्रिटीश कंपनी असल्याने) लिमन ब्रदर्सचं लंडनमधलं ऑफिस ताबडतोब बंद करावं लागलं. जगभरातले लिमनशी संबंधित सगळे व्यवहार क्षणार्धात ठप्प झाले. त्याच आठवड्यात एआयजी आपोआपच क्रेडीट डिफॉल्ट स्वापवाल्या ग्राहकांना १३ बिलियन डॉलर्स देणं लागले. परंतु त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता. १७ सप्टेंबरला एआयजीला सरकारने विकत घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी पॉलसन आणि बर्नान्कीने केंद्र सरकारकडे बँकांना वाचवण्यासाठी ७०० बिलियन डॉलर्स देण्यासाठी हात पसरले.
क्रेडीट डिफॉल्ट स्वापवरची बंधनं शिथिल करण्यासाठी आणि वित्तसंस्थांचं लिव्हरेज लिमिट (बँकेचा स्वतःचा पैसा आणि कर्जाऊ पैसा यांचं गुणोत्तर) वाढवण्यासाठी आग्रही असणारा थोडक्यात ज्या दोन प्रमुख गोष्टींमुळे एवढं मोठं महाभारत घडलं त्यासाठीचा जवाबदार माणूस पॉलसनच होता. अर्थातच हेन्री पॉलसनने या माहितीपटासाठी मुलाखत देण्यास नकार दिला.
एआयजी बुडाल्यावर (म्हणजे प्रचंड पैसे ओतून सरकारने वाचवल्यावर) त्यांच्या क्रेडीट डिफॉल्ट स्वापचे प्रमुख ग्राहक असलेल्या गोल्डमन सॅक्सला दुसऱ्याच दिवशी ६१ बिलियन डॉलर्स दिले गेले. स्वतः वाचण्यासाठी सरकारकडून ७०० बिलियन घेणाऱ्या बँकेने दुसऱ्याने बुडू नये म्हणून आपल्याला भीक म्हणून मिळालेल्या ७०० बिलियन मधले ६१ बिलियन काढून दुसर्याला देणं हा शुद्ध मुर्खपणा होता. पॉलसन, बर्नान्की आणि गायटनरच्या या धक्कादायक निर्णयामुळे अमेरिकन करदात्यांच्या १५० बिलियन डॉलर्स एवढ्या प्रचंड कराच्या पैशाचं नुकसान झालं.
यानंतर जगभरात एक भीतीचं वातावरण पसरलं, महामंदी येणार, आली याविषयी लोकांची खात्री झाली. अमेरिका आणि युरोपमधली बेकारी १०% झाली. महामंदीने बघता बघता संपूर्ण जगाला विळखा घातला. डिसेंबर २००८ च्या दरम्यान प्रचंड विशाल अशा जनरल मोटर्स या अमेरिकन कंपनीभोवती आणि त्याच बरोबर क्रायसलर या कंपनीभोवती बँकरप्सीचं वादळ घोंघावू लागलं. अमेरिकन लोकांची क्रयशक्ती, खर्च करण्याची क्षमता कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम चीनी बाजारावर झाला. चीनमधल्या जवळपास एक कोटी नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.
सिंगापूरची एक कंपनी वार्षिक वीस टक्क्यांच्या भरधाव वेगाने मोठी होत होती आणि अचानक त्यांच्या वाढीचा वेग वजा नऊ टक्क्यांवर आला. निर्यात तीस टक्क्यांनी कमी झाली.
अशा प्रकारच्या कुठल्याही वाईट घटनेत सगळ्यात जास्त भरडला जातो तो सर्वात गरीब माणूस हा नियम आहे. इथेही तेच झालं. रोजंदारीवर काम करणारे, हातावर पोट असणारे लोक अक्षरशः रस्त्यावर आले. घरदार सोडून जाऊन रस्त्यावर अक्षरशः तंबू ठोकून राहण्याची पाळी त्यांच्यावर आली.
भाग ४ इथे वाचा.

| पॉलसन, बर्नान्की आणि गाईटनर |

Subscribe to:
Posts (Atom)
२०२५ ची वाचनपूर्ती
२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...
-
वाचकाला एखाद्या पूर्णतः भिन्न अशा आणि जवळपास अविश्वसनीय वाटावं अशा विश्वाची ओळख घडवून आणून , त्या विश्वातले रीतिरिवाज , नियम , जीवनशैली , चा...
-
जेरेमी : आलं ना सगळं लक्षात? हेरंब : ह्म्म्म जेरेमी : पुन्हा सांगू का? हेरंब : म्म्म्म.. चालेल.. जेरेमी : बरं.. थोडक्यात सांगतो. वर गेल्...
-
मी 'स्लमडॉग मिलिनियर' प्रदर्शित झाल्या झाल्या लगेच पहिला होता. कारण खूप ऐकलं होतं त्याबद्दल. आणि मांजरेकरचा आक्रस्ताळेपणा आणि शेवटी ...