Saturday, June 4, 2011

अहवाल : मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा - २०११

काल शुक्रवार दिनांक ३ जून ईसवी सन २०११ रोजी (न) ठरल्याप्रमाणे मराठी ब्लॉगर्सचा स्नेहमेळावा (न्यू जर्सी शाखा) अत्यंत थाटामाटात परंतु तितक्याच साधेपणाने संपन्न झाला. सदर मेळाव्या दरम्यान घडलेल्या अनेक लक्षवेधक घडामोडी, चित्ताकर्षक बाबी आणि सदरहू मेळाव्याचा अहवाल आमच्या जगभर पसरलेल्या आणि तत्कारणात न्यू जर्सी शाखेच्या मेळाव्यास उपस्थित राहू न शकलेल्या तमाम ब्लॉगु-ब्लगिनींपर्यंत पोचवताना आमच्या चित्तास अतीव आनंद होत आहे.

प्रमुख पाहुणे : रारा रोहण्णा उर्फ रोहणा उर्फ सेनापती उर्फ खानापती उर्फ श्री रोहन !!

("इतने नाम और एकही आदमी? बाकी लोग कहाँ है?" वाले फालतू जोक मारू नयेत. आम्हीही 'अंदाज अपना अपना' पाहिलेला आहे. तस्मात्‌ सदर विनोदास हसले जाणार नाही.)

अध्यक्ष : -------------------------------- करा --------------------------------

('करा' वरून अर्थबोध न होणार्‍यांनी DO वाचावे. तरीही अर्थबोध न होणार्‍यांनी वरील ओळ पुन्हा वाचावी.)

सूत्रसंचालन : सत्यवान वटवटे

विशेष उपस्थिती : ज्यु. वटवटे

प्रमुख व्यवस्थापक : सावित्री वटवटे आणि कुटुंबिय

प्रथम पुष्प

प्रमुख पाहुण्यांनी उत्सवस्थळी किमान तास दोन तास विलंबाने पोचावे या जगन्मान्य, समाजमान्य नियमाच्या पेकाटात कचकचीत लाथ हाणून आमच्या प्रपांनी चक्क वेळेच्या आधी ३० मिनिटे म्हणजे जर्सीतल्या घड्याळाप्रमाणे अंदाजे १२:१५ वाजता उत्सवस्थळी आगमन केले परंतु प्रमुख व्यवस्थापक अगोदरच पूर्ण तयारीत असल्याने कुठल्याही गडबड गोंधळाविना स्वागत समारंभपार पडून अध्यक्ष स्थानापन्न झाले. काही क्षणातच मा. ज्यु. वटवट्यांनी आपली 'विशेष उपस्थिती' जाणवून दिली. परंतु प्र.व्य. यांच्या चोख व्यवस्थेमुळे ती क्षणभंगुर ठरली आणि ज्यु वटवटे पुनःश्च शयनकक्षात निद्रिस्त झाले. त्यानंतर अध्यक्ष आणि सूत्रसंचालक यांच्यात काही नैमित्तिक विचारांची देवाणघेवाण (अनेक शब्दांबद्दल एक शब्द : गप्पा) झाल्यानंतर मेळाव्याचे स्थान तात्पुरते भोजनकक्षात हलवण्याविषयी एकमत झाले.

भोजनकक्षात तीच अनेकविध विचारांची ... आणि पदार्थांचीही... देवाणघेवाण पुढे चालवण्यात आली. साधाच परंतु चौरस, चौफेर, चौरंगी, चौढंगी वगैरे आहाराच्या सेवनानंतर मेळाव्याचे स्थान पुनःश्च एकवार प्रमुख कक्षात हलविले गेले. दरम्यान पुन्हा एकवार ज्यु वटवटे यांनी आपली विशेष उपस्थिती अधिक दमदारपणे जाणवून दिल्याने प्रव्य यांना प्रमुख कक्षातून काढता पाय घेऊन ज्यु वटवटे यांच्या सेवेस हजार व्हावे लागले.

अध्यक्षांचे आगमन होताहोताच सुसं यांनी त्यांच्या आगमनाविषयी "सेनापती येती घरा तोचि दिवाळी दसरा " अशी बझ-दवंडी पिटून ठेवली होती. तेव्हा जगभर पसरलेल्या परंतु जर्सी मेळाव्यास हजर न राहू शकलेल्या तमाम ब्लॉगबांधवांना अ./प्र.पा. यांच्या आगमानाविषयी काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी अ./प्र.पा. आणि सु.सं. यांनी आंतरजालावर प्रवेश करून तमाम ब्लॉगु-ब्लगिनींची मतं जाणून घेतली.

तदनंतर'कॉपी' रोखण्यासाठी 'पेस्ट' ...... आपलं सोरी... 'बेस्ट' उपाय कोणता?, माननीय राष्ट्रपुरुष हे आपल्या तीर्थस्वरूपांची खाजगी मालमत्ता असल्यागत मानून अन्य जातीय/पंथीय लोकांना उद्देशून द्वेषपूर्वक लिखाण करणार्‍या ब्लॉग्जचा कसा बंदोबस्त करता येईल, वगैरे वगैरे किरकोळ विषय टाळून पामुख्याने खादाडी, भटकंती वगैरे वगैरे महत्वाच्या विषयांवर महत्वाची चर्चा चालू होती.

चर्चेदरम्यान अचानकच घड्याळात (पहाटेचे) चार वाजल्याचे पाहून आपले घड्याळ दोन तीन तास पुढे तर गेले नाही ना अशा अगम्य विचाराने सु.सं. आणि अ./प्र.पा. यांनी कक्षातील अन्य घड्याळे, ऊर्ध्वपट, 'नेत्र'-ध्वनी, 'नेत्र'-कुंडी वगैरे समस्त नेत्रांच्या नेत्रांत डोकावून बघून खरोखरच चार वाजले असल्याची खात्री करून घेतल्यावर त्यांचे नेत्र विस्फारलेच. प्रत्यक्षात खरोखरच चार वाजले आहेत याची जाणीव झाल्यावर त्यांनी मेळाव्याचे प्रथम पुष्प तिथेच थांबवण्याचा निर्णय घेऊन निद्रानगरीत प्रवेश केला.

द्वितीय पुष्प

द्वितीय पुष्प तुलनेने घाईगर्दीचे ठरणार याची आधीच कल्पना होती. त्यामुळे चहापान आणि अन्य प्रातःविधी उरकून झाल्यावर आणि केवळ चार तासांच्या निद्रेच्या भांडवलावर सु.सं. आणि अ./प्र.पा. यांनी लगेचच मेळाव्याच्या द्वितीय पुष्पास प्रारंभ केला. चर्चा सुरु होते ना होते तोच काही वेळातच ती तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घ्यावा लागला आणि त्याला कारणही तसंच जोरदार होतं. कारण बटाटेवडे आणि मँगो मिल्कशेकचं आगमन झालं होतं !!!!!!

यानंतर चर्चा पूर्णवेळ फक्त ब्लॉगर्स, खादाडी आणि ब्लॉगर्सची खादाडी या विषयांभोवतीच फिरत होती. काही काळातच खादाडीच्या दुनियेतून आम्हाला पुन्हा जर्सीत अर्थात वास्तव जगात परत यावं लागलं कारण प्रमुख पाहुण्यांच्या निर्गमनाची घटिका समीप येत चालली होती. काही तासांतच त्यांना मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळाव्याच्या मुंबई शाखेच्या कार्यक्रमासाठी उपस्थित रहायचं होतं.

खादाडी, गप्पा, जागरणं इत्यादींनी भरलेल्या या दोन पुष्पांच्या दरम्यान एक महत्वाचं काम राहूनच गेलं होतं ते म्हणजे फोटोसेशन. जर्सी ब्लॉगर्स मेळाव्याचा पुरावा ;) पण वेळेअभावी अतिशय घाईगडबडीतच फोटोसेशन पार पडलं, निघताना गळाभेट झाली, "पुन्हा लवकरच आणि नक्की भेटू" च्या वचनांच्या देवाणघेवाणी झाल्या.



सेनापतींच्या हस्ते मराठी ब्लॉगर्सच्या जर्सी शाखेतर्फे मुंबई शाखेच्या ब्लॉगर्स मेळाव्यासाठी भरघोस, भरदार, जोरदार शुभेच्छा पाठवण्यात आल्या आहेत. त्या मिळालेल्या आहेत की नाहीत हे उद्याचे मुंबई शाखेचे अहवाल वाचून कळेलच ;)

थोडक्यात जर्सी शाखा कृत मराठी ब्लॉगर्स स्नेहमेळावा - २०११ अतिशय आनंदात, सुखासमाधानात पार पडला. सदर मेळाव्याच्या जोरदार यशामुळे जर्सी शाखेच्या कार्यकर्त्यांचा दुणावलेला उत्साह लक्षात घेता पुढील सप्ताहात अशाच तर्‍हेचा अजून एक मेळावा साजरा करण्याचे योजिले आहे. यथावकाश त्याचाही अहवाल येईलच. धन्यवाद...

-समाप्त

==========

लागोपाठ तिसरा ब्लॉगर मेळावा बुडतोय (म्हणजे मला यायला जमत नाहीये याअर्थी. मेळावे अगदी जोरदार चाललेत हो.) हे पाहून तिन्ही किंवा निदान कुठल्याही दोन किंवा अगदी कुठल्याही एका का होईना मेळाव्याला उपस्थिती लावू शकणार्‍या माझ्याच ब्लॉगु-ब्लगिनींचा मला कमालीचा हेवा वाटायला लागला (नो हार्ड फिलिंग्ज. इट्स अ‍ॅन ऑनेस्ट कन्फेशन). काही करून कुठला का होईना मेळावा अटेंड करावाच असं वाटायला लागलं. त्यामुळे गेल्या वर्षी उचक्या-भूकंपाच्या  रुपात केली होती तशीच यावर्षी अधिक व्यापक प्रमाणात म्हणजेच थेट (मिनी)मेळावा साजरा करून त्याचा अहवाल छापण्यापर्यंतची लुडबुड करण्याचा आगाऊपणा कंटिन्यू केलाय. कृपया तरीही आहे तो लोभ असाच असावा.

ब्लॉगरु तितुका मेळा(वा)वा l
ब्लॉगर धर्म वाढवावा ll

जय ब्लॉगिंग !!!!!!

38 comments:

  1. सरतेशेवटी इतके दिवस हुकलेली, न्यायाधीश आणि सेनापती यांची भेट होऊन मिनी मेळावा पार पडल्याचे वृत्त ऐकून आणि वृत्तांत वाचून मनी आनंद जाहीला. असे हजारो मेळावे घडत राहो, आणि बटाटेवडे आणि मँगो मिल्कशेकच्या फैरी झडो...

    सेनापातींचा विजय असो...
    न्यायाधीशांचा विजय असो आणि थोडा निषेधसुद्धा असो, निषेध का ते सांगायला नको.. :)

    मस्त आलाय रे फोटो.. :)

    ReplyDelete
  2. आईग्ग... कसले सज्जन दिसताहेत दोघे... फोटोचा रंग का उडालाय??? मला एकदम करण-अर्जुन मधल्या सल्लू-शामृगाची आठवण आली. मेळाव्याच्या इत्यंभूत लेखासाठी आभार... :) :D ;)

    ReplyDelete
  3. काय राव तुम्ही इतकं करून ज्यु. वटवट्यांचा फोटू नाय टाकला...

    ReplyDelete
  4. >>आईग्ग... कसले सज्जन दिसताहेत दोघे...
    आणि
    >>मला एकदम करण-अर्जुन मधल्या सल्लू-शामृगाची आठवण आली.
    एव्हढीच प्रतिक्रिया आत्ता... सविस्तर उत्तर मुंबई शाखेच्या मेळाव्यानंतर दिले जाईल :D

    ReplyDelete
  5. "मेरे करण अर्जुन आयेंगे" म्हणाणारी एक बाई काल पासून गप्प का झाली हे सौरभची प्रतिक्रिया वाचून कळले :D

    सेनापतींचा इतका जुना फोटो आजच पहातोय :D
    आदि महाराजांना फोटोतून गनिमी काव्याने बाजूला करण्यात आल्याचा स्पष्ट पुरावा असल्याने मराठी ब्लॉगर्सतर्फे निषेध म्हणून रामदेव बाबा आणखी एक दिवस उपोषण करतील.

    रत्नागिरीहून बरोबर आणलेले आंबे संपले असल्याने मँगोशेक प्राशन करणार्‍या लोकांचा निषेध म्हणून पुढचा सीजन येईपर्यंत मी हापूसला तोंड देखील लावणार नाही.

    ReplyDelete
  6. ही उद्याच्या मेळ्याव्याची रंगित तालिम होती का!!
    काही असो !
    यावर्षीच्या मेळ्याव्याचे ठीकाण ठरविण्यासाठी विशेष सर्वेक्षण करण्यात आले होते !
    तरीही पुढील अखिल विश्व मराठी ब्लॉगर मेळावा च्यामारिकेत भरवण्यात यावा यासाठी आम्ही समितीपुढे अहवाल ठेवू इच्छितो. !!

    जय ब्लॉगिंग !

    ReplyDelete
  7. या मेळाव्यापासून ज्यांना मुद्दाम प्रयत्नपूर्वक वगळण्यात आले व त्यांच्या निषेधाचा आवाज पण बंद करण्यात आला, अशा जबरदस्तीच्या कृत्यांचा मी निषेध करतो. त्यांच्या (ज्यू.वटवटे )सत्याग्रहाच्या प्रयत्नांचा फोटो इथे देण्यात यावा.

    ReplyDelete
  8. वाह वाह !!! सहिच की रे !!!
    बाकी खरचं खुप सज्जन दिसत आहात दोघेही...:D

    ReplyDelete
  9. अरे खरंच दोघंही एकदम सज्जन दिसताहेत. ( पण आहेत का??) ह्या मेळाव्याला उपस्थित रहाण्याची खूप इच्छा होती, पण मुंबई मेळावा पण नेमका त्याच दरम्यान आल्याने जमले नाही. इतर फोटो पण लवकर टाकण्यात यावेत. मॅंगो शेक आणि वड्यांचे फोटो न टाकल्याचा णिशेढ!

    ReplyDelete
  10. अहवाल कुठे?? मला फ़क्त
    कुठल्याही एका का होईना मेळाव्याला उपस्थिती लावू शकणार्‍या माझ्याच ब्लॉगु-ब्लगिनींचा मला कमालीचा हेवा वाटायला लागला
    हेच दिसतंय...हेव्याचा अहवाल देण्यासाठी पोस्ट आणि ज्यु.वटवटेंचे थोडेसे केस दिसतील असा फ़ोटो टाकल्याबद्दल फ़ार्फ़ार हाबार दोस्ता....:P

    जय हो ब्लॉगिंग...:)

    रच्याक ...ब्लॉगर मेळावा आज आहे या पार्श्वभुमीवर हे असलं फ़कस्त तुलाच सुचु शकतं रे बाबा हेरंबा... _/\_

    ReplyDelete
  11. सत्यवानाच्या अहवालाचे जाहीर वाचन केले जावे मेळाव्यात...
    ज्यू. वटवटे यांनी फोटोतून बाहेर काढल्याबद्दल बरेच हट्ट करावेत...न्यायाधीशांना त्यांचे हट्ट पुरवण्याची शिक्षा ठोठावण्यात येत आहे.

    ReplyDelete
  12. मा.श्री.वटवटे सत्यवान,
    आपल्या कृत्याची गृहमंत्रालयाने दखल घेतली असुन चिदु भाउंनी चौकशीसाठी एक सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.समिती खालील गोष्टींची चौकशी करण्यात येणार आहे.
    १.फ़ोटोमधील साळसुद अन सज्जनेताचा भाव आणणारे नक्की सत्यवान अन सेनापती आहेत की फ़ोशॊ ची अदाकारी याबद्दलचा सखोल तपास.
    २.ज्यु.वटवटे यांना सदर फ़ोटो मधुन जाणीवपुर्वक वगळण्यात आल आहे यामागील नक्की कोणता "कावा" आहे?
    ३.अहवालात जाहीर केलेल्या खादाडीची शहानिशा करण्यात येणार आहे.गुप्तचरांच्या अहवालानुसार याहुन जास्त खादाडी झालेली आहे परंतु णि..षे..ध अन उपोषणाच्या भितीने सर्व माहिती देण्यात आलेली नाही.

    आपला,
    चिदु भाउ

    ReplyDelete
  13. अखेरीस याची देही याच डोळा ची साक्ष पटवत रोहणा तुला कडकडून भेटला. :D:D

    मध्यरात्री वेळकाळ न पाहता आपण निदान दहा मिनिटे तरी बोललो... मस्त वाटले. अर्थात बटाटेवडे व मिल्कशेकच्या जोरदार निषेधाचा विसर पडू दे नको.

    तुम्ही दोघे खरेच सज्जन दिसताय की रे.:P ( कोणितरी कोप्यामुप्याक्षनाही विचारायला हवे.. ;))

    आदिचा फोटू का कापलास रे सत्यवाना? :(

    सगळे मेळावे जोरदार रंग आणि भरपेट खादाडी ला रहे... नुसते जळवा लेको. :)

    ReplyDelete
  14. तुमच्या इतक्या भन्नाट पोस्ट वर आलेल्या प्रतिक्र्या पण तेव्हढ्याच भन्नाटआहेत.
    पण मी राजीवशी सहमत आहे.तेव्हा ज्यु.वटवट्यांचे दर्शन घडूद्या.

    ReplyDelete
  15. हो अण्णा.. एकदाची भेट झालीच.. :)) धम्माल आली एकदम..

    असे मेळावे नको आता. आता एक मेळावा तुम्हा सगळ्यांबरोबर करायचा आहे.. बघू लवकरच :)

    ReplyDelete
  16. >> सल्लू-शामृग

    ख्याख्याख्या.. अरे इतकेही सज्जन नाही आम्ही.. Like Monica says "Camera aads 10 pounds (of sajjan-ness) ;)"

    ReplyDelete
  17. आल्हादराव, आमाला पावर नाय ;)

    ReplyDelete
  18. बाबानु, उत्तर मुंबई शाखेचा मेळावा झाला की राव.. कुठे आहे सविस्तर अहवाल? :)

    ReplyDelete
  19. >> "मेरे करण अर्जुन आयेंगे"

    च्यायला तुम्ही सगळेजण आमच्या जीवावरच उठलात की ;)

    आणि रामदेवबाबा आता उपोषणातला उ सुद्धा म्हणणार नाही रे आता. त्यामुळे आम्ही निर्धास्त ;)

    >> रत्नागिरीहून बरोबर आणलेले आंबे

    हे असं मुद्दाम सांगण्याच्या गनिमी काव्याचा महानिषेध !!

    ReplyDelete
  20. हाहा दीपक. यस.. तसंच.. पण रंगीत तालमीचा काही फायदा झाला की नाही हे तुम्ही कोणीच अजून सांगितलेलं नाही. वृत्तांत टाका यार भरभर..

    >> तरीही पुढील अखिल विश्व मराठी ब्लॉगर मेळावा च्यामारिकेत भरवण्यात यावा यासाठी आम्ही समितीपुढे अहवाल ठेवू इच्छितो. !!

    सही जवाब !! अमेरिकेतली ३ मतं नक्की या प्रस्तावाला :)

    ReplyDelete
  21. राजीवकाका, मेळाव्यापासून नाही वगळलं. त्यांची तर विशेष उपस्थिती होती. फोटूतून वगळलंय.. बाकी त्यांच्या निषेधाचे आवाज रोज आमचे कान किटवत असतातच :)

    ReplyDelete
  22. धन्स धन्स माऊ..

    अग ते फक्त दाखवायचे दात आहेत ;)

    ReplyDelete
  23. हो ना काका.. आमचीही खूप इच्छा होती की मुंबई शाखेच्या एखाद्या प्रतिनिधीने हजेरी लावावी या मेळाव्याला. पण :(

    अहो शेक आणि वड्यांच्या वेळी फोटू काढायचं लक्षातच नव्हतं. हा फोटो अक्षरशः निघण्यापूर्वी १ मिनिट आधी काढलाय :)

    ReplyDelete
  24. हाहा अपर्णा.. बरोबर.. तुला योग्य तेवढंच दिसतंय ;) ,, अग आणि ज्युचे केस एवढे पसरलेले आहेत की कितीही झालं तरी ते फोटोतून काढता आलेच नाहीत :)

    अग हा अहवाल त्या 'हेव्या'पोटीच जन्माला आलाय. ;)

    ReplyDelete
  25. सागरा, केलं का मग जाहीर वाचन मेळाव्यात? :)

    अरे शिक्षा न ठोठावताही ज्यु महाभयंकर हट्ट करत असतातच आणि त्यांचे हट्ट पुरवले जात असतातच.. सो ऑल इज सेम ;)

    ReplyDelete
  26. मान्यवर,

    >> प्रादेशिकता आणि प्रांतवाद

    ख्याख्या.. मला अशी पुणेरी टिपणी अपेक्षित होतीच.. हेहे

    अहो आमचे आंबे टीनवाले. भारतातल्या आंब्यांशी कशी बरोबरी करणार !!

    ReplyDelete
  27. मा चिदु भाउ,

    आपण रारा रामदेवसाहेब यांचा राग न्यूजर्सी शाखेवर काढत आहात की काय अशी पुसटशी शंका आमच्या मनास चाटून गेली आहे. परंतु आपण चिदु भाउ आहात. आपण योग्यच असणार. आम्हाला काय कळतंय. तेव्हा एक डाव माफी द्यावी. सदर गुन्ह्याचे परिमार्जन पुढील मेळाव्यात केले जाईल :)

    ReplyDelete
  28. हो.. रोहणाने बोहनी केली अखेरीस :) .. पहिला नंबर पटकावला :)

    >> अर्थात बटाटेवडे व मिल्कशेकच्या जोरदार निषेधाचा विसर पडू दे नको.

    पोटोबा इ-बुक वाल्यांनी हे असं बोलणं म्हणजे एकदम कैच्याकै ;)


    >> कोप्यामुप्याक्षनाही

    प्रचंड !!!


    >> सगळे मेळावे जोरदार रंग आणि भरपेट खादाडी ला रहे... नुसते जळवा लेको. :)

    पुढच्या मेळाव्याला आपण नक्की जायचं भारतात.. क्या बोलती? :)

    ReplyDelete
  29. हाहाहा.. धन्यवाद अरुणाताई. ज्यु वटवट्याचे फोटू टाकतो लवकरच.

    ReplyDelete
  30. च्यामेरीकेत माझी कंपनी न्युजर्सीच्या नेमक्या उलट दिशेला असल्याचं अतिव दुःख आज मला होत आहे... न्युजर्सीचा पहिला वहिला मेळावा भरवण्याचा आणि त्यात हादडण्याचा मान न मिळाल्यामुळं अत्यंत दुःखी, शोकाकूल, कष्टी आहे मी :(

    ReplyDelete
  31. आप्पा, पूर्णतः सहमत..

    मीही !!!

    ReplyDelete
  32. धन्यवाद सोनाली :)

    ReplyDelete
  33. सेनापती आणि न्यायाधीश भेटीचा छान वृत्तांत ...
    >>>मला एकदम करण-अर्जुन मधल्या सल्लू-शामृगाची आठवण आली... +१
    बाकी खादाडीपेक्षा ज्यू वटवटे ह्यांना फोटूतून सोयीस्कररीत्या बाहेर ठेवल्याचा घोर निषेध... :)
    ह्या संदर्भात आंदोलन झालच पाहिजे, युवराज ऐकत आहात ना... ;)

    ReplyDelete
  34. हेहे देवेन.. धन्यवाद रे.. युवराज फक्त बाबाचं ऐकतात ;)

    ReplyDelete

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...