Monday, May 9, 2011

बँक नावाची शिवी : भाग ५ (अंतिम)

* भाग १ इथे  वाचा.
* भाग २ इथे  वाचा.
* भाग ३ इथे वाचा.
* भाग ४ इथे  वाचा. 


भाग ५ : सध्याची परिस्थिती नक्की कशी आहे? (व्हेअर आर वुई नाऊ?)

एकूणच या प्रकारामुळे अमेरिकन (आणि त्यामुळे आपोआपच जागतिक) आर्थिक विषमता कमालीची वाढली. करप्रणाली श्रीमंतांना पूरक बनवली गेली. ग्लेन हबर्डने बुश सरकारच्या काळात काम करताना अनेक करकपाती सुचवल्या आणि अंमलातही आणल्या. बुश सरकारने आर्थिक गुंतवणूक, त्यावरील नफा आणि डीव्हीडंड यावरचे अनेक महत्वाचे कर रद्द केले. हे कर रद्द केल्याने सर्वसामान्य गरीब माणसाला फायदा होईल असं भासवलं गेलं. परंतु प्रत्यक्षात हे असे महत्वाचे कर रद्द केल्याने एकूण लोकसंख्येच्या एक टक्का असलेल्या अतिधनिक नागरिकांना खूप मोठा फायदा झाला. १९८० आणि २००७ या दरम्यान मध्यमवर्गाचं अधिकाधिक आर्थिक खच्चीकरण झालं. घर, गाडी, वैद्यकीय सुविधा, शिक्षण या सगळ्यांच्या किंमती वाढल्या आणि या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अमेरिकन नागरिक भरभरून कर्जं घ्यायला लागला. तालाच्या ९०% लोकांचं अपरिमित आर्थिक नुकसान झालं आणि तेवढाच फायदा झाला तो या शृंखलेत वर असलेल्या १०% नागरिकांचा. !!!!

२००८ मध्ये अध्यक्ष म्हणून निवडून येण्यापूर्वीच्या भाषणांमधून बराक ओबामा यांनी वॉल स्ट्रीट आणि वॉशिंग्टनमधली वाढती आर्थिक हाव आणि आर्थिक शिथिलीकरण या दोन प्रमुख बाबींमुळे महामंदी आली आणि या दोन गोष्टी ताबडतोब बदलण्याचं प्रतिपादन केलं. अध्यक्ष झाल्यानंतर २००९ च्या सुमारास त्यांनी ताबडतोब आर्थिक पुनर्रचनेच्या आवश्यकतेचं सुतोवाच केलं. परंतु २०१० मध्ये जेव्हा प्रत्यक्ष आर्थिक पुनर्रचना केली गेली त्यावेळी कुठलेही विशेष बदल केले गेले नाहीत . गुणांकन एजन्सीज, लॉबीइंग आणि अन्य आर्थिक नियम यामधल्या बदलासंबंधी साधं भाष्यही केलं गेलं नाही. वॉल स्ट्रीटची आर्थिक पुनर्बांधणीशी निगडीत असलेल्या महत्वाच्या आर्थिक बाबींवरील मजबूत पकड अजूनही स्पष्ट दिसून येते.

ओबामा यांनी टिमोथी गाईटनर याची ट्रेजरी सेक्रेटरी पदावर निवड केली. हा तोच टिमोथी गाईटनर जो अतिशय नाजूक प्रसंगी न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा गव्हर्नर होता आणि ज्याने गोल्डमन सॅक्सला भरभरून आर्थिक मदत देववली.

विल्यम सी डडली
विल्यम सी डडली हा न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हचा नवीन अध्यक्ष आहे. हा तोच इसम ज्याने ग्लेन हबर्डसह लिहिलेल्या अहवालात डेरीव्हेटीव्हजची प्रचंड स्तुती केली होती.

मार्क पॅटरसन हा गाईटनरचा कर्मचारी-प्रमुख आहे. मार्क पॅटरसन गोल्डमनचा माजी लॉबीईस्ट होता.

लुईस सॅक्स हा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे. हा मनुष्य ट्रायकेडिया या कंपनीचा प्रमुख होता. ट्रायकेडियाचा चुकीच्या आर्थिक गुंतावणूकीविरुद्ध बेटिंग करण्यामध्ये महत्वाचा सहभाग होता.

कमॉडिटी फ्युचर्स कमिशनच्या प्रमुखपदी आहे तो गॅरी गेन्सलर. या गेन्सलरची गोल्डमन सॅक्सचा प्रमुख असताना डेरीव्हेटीव्हजना कायद्याच्या बंधनात आणण्याच्या विरोधात महत्वाची भूमिका होती.

ओबामाचा चीफ ऑफ स्टाफ असलेला रॅम इमॅन्युअल याने आता बुडीतखात्यात गेलेल्या फ्रेडी मॅकच्या संचालक मंडळात असताना सव्वा तीन लाख डॉलर्सची कमाई केली होती.

लॉरा टायसन
मार्टीन फेल्टसीन आणि लॉरा टायसन हे दोघेही ओबामाच्या आर्थिक पुनर्रचना सल्लागार समितीचे सदस्य आहेत.

आणि ओबामाचा प्रमुख आर्थिक सल्लागार आहे तो म्हणजे लॅरी समर्स.

२००९ मध्ये ओबामाने बेन बर्नान्कीची फेडरल रिझर्व्हचा सेक्रेटरी म्हणून पुन्हा नेमणूक केली !!!

आर्थिक महामंदी ओसरल्यानंतर त्यातून सावरण्यासाठी आणि पुन्हा असा आर्थिक उद्रेक घडू नये यासाठी जगभरातल्या मोठमोठ्या देशांनी अनेक महत्वाचे कडक नियम तयार केले आणि त्यांची कसोशीने अंमलबजावणीही केली........... परंतु ज्या देशातल्या अवाढव्य धनपिपासू वृत्तीमुळे जगावर महामंदी लादली गेली त्या अमेरिकेने आणि ओबामा सरकारने भविष्यात हे प्रकार रोखण्याच्या दृष्टीने अजूनही कोणतीही हालचाल केलेली नाही !!!!!!!!!! त्यांच्या मते अजूनही हा एक छोटासा धक्का अस्जून स्थिती पूर्ववत होईल आणि असं पुन्हा कधीच होणार नाही.

२०१० च्या मध्यापर्यंत अजूनही कुठल्याही वित्तसंस्थेच्या प्रमुखावर कुठल्याही प्रकारच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा लावला गेलेला नाही की खटला चालवला गेलेला नाही. कोणालाही अटक झालेली नाही की कुठल्याही विशेष समितीची स्थापना झालेली नाही !!

आर्थिक फुगवट्याच्या काळात विविध वित्तसंस्थांच्या प्रमुखांना दिल्या गेलेल्या महाप्रचंड रकमेची वसुली करण्याच्या दृष्टीने ओबामा सरकारने कारवाई सोडा साधे प्रयत्नही केलेले नाहीत.

हा विरोधाभास पहा... २००९ मध्ये बेकारीचा दर १७ वर्षातल्या सर्वोच्च पातळीवर पोचला आणि त्याच वेळी

- मॉर्गन स्टॅनलीने त्यांच्या कर्मचाऱ्यांना १४ बिलियन डॉलर्स अक्षरशः वाटले. !!!!!!!!!!

- गोल्डमन सॅक्सने १६ बिलियन वाटले

अमेरिकेची अर्थप्रणाली ही अनेक दशकांपर्यंत अतिशय स्थिर आणि सुरक्षित होती. पण गेल्या काही वर्षात काही महत्वाचे बदल झाले. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे या प्रणालीने समाजाकडे चक्क पाठ फिरवली. राजकीय क्षेत्रातला भ्रष्टाचार वाढला आणि जागतिक अर्थव्यवस्थेला महाप्रचंड आर्थिक संकटाच्या खाईत ढकलून दिलं ! ज्या लोकांनी महत्वाच्या पदांवर बसवून ही आर्थिक महामंदी अमेरिकेवर आणि त्यामुळे आपोआपच संपूर्ण जगावर लादली ते लोभी गुन्हेगार अजूनही त्याच सत्तास्थानांवर आहेत. महत्वाचे निर्णय घेताहेत.

--------------------------

इतके एकामागोमाग एक धक्के बसल्याने माहितीपट संपताना डोकं चक्रावून गेलेलं असतं. हे सगळं वाचून तुमचं डोकं गरगरत नसेल तर तो दोष सर्वस्वी माझ्या लिखाणाचा आहे. प्रत्यक्ष माहितीपट प्रचंड प्रभावी आहे. अनेक उदाहरणं, असंख्य छोटेछोटे पुरावे, कित्येक मुलाखती, अनेक वस्तुस्थितीदर्शक पुरावे यांचा आपल्यावर एकामागोमाग एक एवढा मारा होतो की त्यामुळे अक्षरशः पायाखालची जमीन सरकल्याचा भास होतो.  च्यायला हे $#%$^ लोक कित्येक वर्षं आपल्याला हातोहात फसवतायत चक्क आणि आपण फसतोय हे आपल्याला कळतही नाहीये.. आणि पहिल्या भागाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण एवढे निराधार आहोत की सगळं कळत, दिसत असूनही आपण कोणाचंही काहीही वाकडं करू शकत नाही. हे सारं असंच चालू आहे कित्येक वर्षं आणि पुढची अनेक वर्षं असंच चालू राहणार. सतत चालू राहणार. ज्यांच्या अमाप हावेपायी आणि कृष्णकृत्यांपायी सर्वसामान्य निर्दोष माणसाला आपला श्रमाचा पैसा हातातून निसटताना पाहावा लागतोय ते गुन्हेगार अजूनही तिथेच आहेत. सरकारात आहेत.. मानाची, महत्वाची आणि जवाबदारीची पदं अजूनही उपभोगत आहेत आणि कदाचित भविष्यातल्या महामंदीची तयारी करतायत. अर्थात ते काहीच गमावणार नाहीयेत.. सर्वस्व गमावणार आहोत ते आपण !! थोडक्यात भविष्यात येऊ घातलेल्या अशा अनेकानेक महामंद्यांना तोंड देण्याची तयारी करा हे नक्की.. !!

- समाप्त

35 comments:

 1. Heramb,

  After a long time, I went on Marathiblogs.net and saw your post. Read all 5 parts. Great job on informing many people who are unaware of this huge scandal.

  Being a home owner and small time investors during that time, I had been a witness and victim of this huge scandal. Fortunately, I exited real estate at right time, so did not loose money there, but had already lost a significant amount in the internet bubble. During those times all these folks, Greenspan, Robin Rubin were heroes to us. Greenspan was like god of financial markets. Later on, his real face was uncovered.

  Ultimately, wherever you go, greed is causing great threat to the entire humankind India, America alike..

  BTW excuse me for the message in English.

  ReplyDelete
 2. apratim heramb!! sampurna chitra dolyasamor ubha rahila

  ReplyDelete
 3. हेरंब... ५ भाग सलग वाचले... अगदीच सर्व डोक्यात शिरले नाही पण अंदाज आले... रूपरेषा कळली.. त्या डोक्युमेंट्रीची लिंक कुठाय? म्हणजे कसाय की वाचण्यापेक्षा ऐकणे-बघणे झाले की लगेच डोक्यात शिरेल... :) तू किती दिवस ह्यावर नोंदी घेत होतास? लिखाण करत होतास? हे लिखाण खरच जबरदस्त अभ्यासपूर्वक आहे...

  ReplyDelete
 4. आज लोकसत्तात, मला वाटतं 'लोकमानस' मध्ये...एक पत्र वाचनात आलं. त्या माणसाने त्याच्या पत्राच्या शेवटी म्हटले होते...'ओसामा मेल्याचे दु:ख नाही, पण अमेरिका सोकावते...' हे तेव्हाही पटले होते व आताही तुझे हे लेख वाचून तेच मनात आले.

  तुझ्या अभ्यासू वृत्तीचे व इतका कुटील विषय सोप्प्या शब्दात समजावून सांगण्याच्या हातोटीचे कौतुक आहे. :)

  ReplyDelete
 5. हेरंब खूपच छान माहिती दिलीस.आमचे दातार साहेब फार पूर्वी पासून अमेरिकन कंपन्यावर नाराजच असायचे.त्यांचे म्हणणे एकाच असायचे "अहो,काही नाही हि सगळे ४२० लोकं आहेत.बडा घर पोकळ वासा, कधी रातोरात येथून गाशा गुंडाळून पळून जातील ते कळणार सुद्धा नाही." कारण विचारल्यावर नुसते म्हणायचे "तुम्हाला कळेल एक दिवस.का नि कसे ते" असे हि म्हणायचे.तुझ्या ह्या लेखा मुळे आता का नि कसे ते थोडे थोडे लक्षात यायला लागले आहे. धन्यवाद.

  ReplyDelete
 6. निरंजन,

  बऱ्याच दिवसांनी तुझी प्रतिक्रिया बघून बरं वाटलं.

  >> Fortunately, I exited real estate at right time,

  खरंच नशीबवान म्हंटलं पाहिजे. पण या रुबीन, ग्रीनस्पॅन आणि अशा कित्येक मोठ्या माशांच्या लोभी वृत्तीपायी सर्वसामान्य कुटुंबांची वाताहत झाली.

  >> Ultimately, wherever you go, greed is causing great threat to the entire humankind India, America alike..

  SO so true !! :(

  ReplyDelete
 7. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद निवेदिता. जमलं तर तो माहितीपट नक्की बघ.

  आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

  ReplyDelete
 8. रोहणा, आभार रे..

  हो मी तर म्हणेन की हा माहितीपट बघितलाचचचच पाहिजे.. मी पाठवतो तुला टोरंट..

  >> तू किती दिवस ह्यावर नोंदी घेत होतास? लिखाण करत होतास?

  तो एक मोठा जोक आहे. अरे मी गेल्या महिन्यात माहितीपट बघितला आणि लगेच लिहायला सुरुवात केली. दोन आठवड्यात पुन्हा पुन्हा माहितीपट नीट बघून सगळं लिहून झालं. आणि नंतर ब्लॉगवर टाकायच्या वेळी बघतो तर शेवटच्या दोन भागांचं लिखाण गुगल (घमेल्यातले ड्राफ्ट) ने खाऊन टाकलं. पेब च्या बाबतीतही सेम असंच झालं होतं. शेवटचा भाग गुगलने खाल्ला होता. घमेल्याच्या ड्राफ्टमधे हा एक किडा आहे. त्यावर लवकरच एक पोस्ट टाकेन. थोडक्यात सांगायचं तर शेवटच्या दोन-अडीच भागांचं पूर्ण लिखाण पुन्हा करावं लागलं. त्यासाठी माहितीपट पुन्हा नीट बघावा लागला. नोंदी काढाव्या लागल्या. फार सव्यापसव्य करून मग टाकलेत हे पाच भाग :)

  ReplyDelete
 9. अनघा, तू पुन्हा रागावशील म्हणून आभार म्हणत नाही.. (आभार्स म्हणतो :P)

  तो माहितीपट नक्की बघ. मी समजावून सांगू न शकलेल्या अनेक गोष्टींबद्दलही खूप चांगली माहिती मिळेल त्यात.

  ReplyDelete
 10. mynac दादा,

  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.. अरे खरंच.. फार वरच्या पातळीवर घडतात हे उद्योग. हे असे माहितीपट बघायला मिळाल्याने आपल्याला थोडी तरी माहिती मिळते की हे सगळं कसं पद्धतशीरपणे घडवून आणलं जातं. अशाही कित्येक गोष्टी असतील की ज्या या माहितीपटातही आल्या नसतील !!!

  जमलं तर माहितीपट नक्की बघ..

  ReplyDelete
 11. torrent -

  http://torrents.thepiratebay.org/6185752/Inside.Job.LiMiTED.BDRip.XviD-DEFACED.6185752.TPB.torrent

  btw post was superb
  u r great in simplifying that thing
  i was so surprised to read this

  indian say's America is great
  american say's India is great
  but actually all are S(H)AME

  ReplyDelete
 12. हेरंब, पाची भाग एकदम वाचुन प्रतिक्रिया देतेय..काही काही संदर्भ पुन्हा फ़िल्म पाहुन कळतील पण तो दोष तुझ्या लिखाणाचा नाही माझ्य वाचनाचा आहे...असो..
  तू "हाउस ऑफ़ कार्डस" पाहिलंस का सिएनबिसी वर २००९ मध्ये यायचं. खरं तर अमेरिकन ग्रीड नावाने सिएनबिसी वर जे येतं ते सगळंच पाहिलंस तर धक्यावर धक्के बसतात...त्यासाठी वेगळा ब्लॉगच काढावा लागेल..पण ते जाऊदे..मूळ पदावर येते परत..
  निरंजनसारखं सुदैव नाही म्हणून अडकलेल्या लोकांपैकी आम्ही आहोत हे तर तुला माहित आहेच...तू सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांनी पैसे कमवले वर ते त्यांच्याकडेच राहिले आणि भरडले जातो आहोत नित्यनियमाने कर भरणारे आपण....
  तुझी पोस्ट खरंच अप्रतिम आहे...ही वाचुन मला पुन्हा एकदा हाउस ऑफ़ कार्डस वर लिहावंसं वाटतंय..तेव्हा सुरु केलं आणि माझ्या डिव्हीआर मधुन कार्यक्रम उडाला....
  हे सगळं वाचुन मला यावेळच्या ऑस्करमधलं Charles Forgueson ने म्हटलेलं वाक्य इथे लिहावंसं वाटतंय.....
  " 3 years after horrifific crisis caused by massive fraud, not a single financial executive is gone to jail and that is wrong..."

  ReplyDelete
 13. धन्यवाद अपर्णा. फिल्म नक्की पहा.. अनेक नवीन संदर्भ काळातील.. 'हाउस ऑफ़ कार्डस' नाही पण 'अमेरिकन ग्रीड' चे काही भाग मी बघितले आहेत. खरंच धक्क्यावर धक्के बसतात ते बघताना !!

  काहीही चूक नसताना भरडला जाणारा सर्वसामान्य माणूस आणि तीव्र हावेपोटी प्रचंड माया गोळा करून दोषी असूनही त्यातून सहीसलामत सुटणारे गुन्हेगार ही दोन टोकं आहेत अक्षरशः !!!

  तू "हाउस ऑफ़ कार्डस" वर नक्की लिही.. वाचायला आवडेल.

  ReplyDelete
 14. धन्यवाद VINE,

  खरंच सगळे एकाच माळेचे मणी आहेत !! :(

  ReplyDelete
 15. आज वाचून संपवले ५ भाग. जर का व्यवस्थित नियमांचे पालन केले गले असते तर ना इतकी महागाई वाढली असती आणि ना हि मंदी आली असती.

  ReplyDelete
 16. अरे आपल्याकडेही सध्या हेच चालले आहे. राजकारणातल्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार.रोज एक नवा घोटाळा उघडकीस येतो. कॉग्रेसचे सरकार मात्र भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे चे तुणतुणे वाजवत बसलेले आहेत. वाढती महागाई. आणि आपण काहीही कारू शकत नाही यावर. आपल्या श्रमाचा पैसा ही असाच चालला आहे.

  ReplyDelete
 17. जबरदस्त लेख आणि माहिती हेरंबा!
  धाप लागली वाचता वाचता! :)
  धन्स भाऊ!

  ReplyDelete
 18. धाप लागली वाचता वाचता... अक्षरश: .... हेरंबा पुन्हा एकदा वाचेन रे हे प्रकरणं... कितपत झेपलेय हेच समजत नाहीये आत्ता...

  तुझं मात्र पुन्हा एकवार कौतूक....

  ReplyDelete
 19. टोरंट आणि प्रतिक्रिया दोन्हीबद्दल धन्स, VINE

  नक्की बघ माहितीपट.

  ReplyDelete
 20. अगदी खरंय श्रेता.. आपल्या इथे दिवसागणिक नवीन घोटाळे होतायत पण त्यांची सगळी लफडी, कुलंगडी बाहेर काढणारा एकही माहितीपट अजूनपर्यंत तयार झालेला नाही :( अर्थात माहितीपटांशिवाय कळतंय तेही पुरेसं विमनस्क करणारं आहे !!

  ReplyDelete
 21. धन्स बाबा.. अरे मीही नुसता चक्रावून गेलो होतो हे सारे प्रकार पाहताना !!

  ReplyDelete
 22. तन्वे, अग सारंच फार कठीण आणि संतापजनक आहे.. आणि उगाच आपल्यासारखे सर्वसामान्य त्यात भरडले गेले :(

  'इनसाईड जॉब' नक्की बघ

  ReplyDelete
 23. कमाल आहे रे सगळी....केवढे मोठे चक्र आहे हे!
  एवढे सगळे इतक्या सोप्या(?) भाषेत लिहिल्याबद्दल तुझे कौतुक आहेच...
  एक मात्र आहे...हे सगळे टॉप लेवलचे लोक प्रचंड बुद्धिमान आहेत...
  ते सगळे पैसा कमावणे या एका हेतूनेच झपाटलेले आहेत याचे वाईट वाटते!
  या सगळ्यांना एवढी पैशाची हाव नसती तर बर्‍याच चांगल्या गोष्टी करू शकले असते हे लोक.

  ReplyDelete
 24. सागरा,

  अरे याच्यापेक्षा सोप्या भाषेत काय लिहिणार रे? त्यापेक्षा 'इनसाईड जॉब' प्रत्यक्ष बघणं उत्तम.

  >> या सगळ्यांना एवढी पैशाची हाव नसती तर बर्‍याच चांगल्या गोष्टी करू शकले असते हे लोक.

  खरंय.. कित्येक समाजोपयोगी कामं होऊ शकली असती :((

  ReplyDelete
 25. काय करतात हि लोकं इतका पैसा कमावून? सरकार पण ह्यात का सामील होत... आणि कुठे दडवतात इतका पैसा..? कुठल्या अद्भूत आणि अगम्य संशोधनात लावतात कि खरंच चक्क खाऊन टाकतात?
  बोल तू भंडावलस् कि नाही माझ डोक! :)

  पण हे फक्त अमेरिकेचाच पैसा खातात का? तर नाही ... अमेरिकेपेक्षा उरलेल्या जगाचा जास्त पैसा खातात हि लोकं (आणि म्हणूनच च्यामारी सरकार त्यांना मदत करत असाव).
  सगळ्या अमेरिकेतर देशांनी गुंतवणूक म्हणून अशा ठिकाणी पैसे ओतले होते... सगळ्यांचा पैसा गेला ह्या लोकांच्या घशात ... अवघ्या ३ वर्षात हे घडवलं... अगदी पटत जेव्हा सत्यवान वटवट करतो कि "हा माहितीपट बघितल्यानंतर तुम्ही आपल्या बँकेत ठेवलेल्या पैश्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कमालीचे साशंक व्हाल." अशा किती लोकांचे पैसे गेले असतील .. आणि आता अशी गरीब सरकार ह्याच्या प्रायवेट जागा होतील... ह्यांच्या तालावर नाचतील... आणि हे अघोरी आनंद घेतील .. कसला? काय माहित... समाज प्रगती पेक्षा सत्ता प्यारी! अमेरिकी लोकांचे पैसे पण गेले असतीलच, पण जगभरच्या लोकांचे खुपच जास्त गेले असतील... अमेरिकन सरकार ७०० बिलिअन डॉलर ची मदत करू शकत तेंव्हा गणित नक्कीच कुठेतरी चुकलेल असत

  वटवट्ट्या मित्रा... लेखाबददल आभार्स!

  ReplyDelete
 26. धन्यवाद अभिषेक.. प्रतिक्रियेबद्दल आभार..

  ReplyDelete
 27. एका दमात इतकं बऱ्याच वर्षांनी वाचलं. नावं लक्षात राहिली नाही पण बरचसं कळलं. काही प्रश्न मनात घोटाळाताहेत.
  १. ओबामांनी अजुनही अर्थव्यवस्था योग्य (कायदेशीर) मार्गावर आणण्यासाठी काहिही प्रयत्न केले नाहीत, त्याचा पुढे काय परिणाम होईल? पुन्हा अमेरिकेत आणि पर्यायने जगात मंदी येईल का? का अमेरिकाही इतर काही देशांसारखी दिवाळखोइत जाईल?

  २. भारतातही असेच काही होत आहे का? किंवा होईल का?

  ३. मध्यंतरी चीनमध्ये भरमसाट कर्ज घेउन बांधकामे चालु असल्याचे वाचले होते, तोही हाच प्रकार असु शकतो का?

  ४. भारतीय बैंका अशाच नफाखोरी करुन पैसा कमवत असतील का?

  डॊक्युमेंटरी बघतोच. पण हा लेख एकदम जबर्दस्त वाटला.

  ReplyDelete
 28. मी शेअर मार्केटमध्ये काही प्रमाणात अॅक्टीव असल्यामुळे ह्यातली बरीचशी माहिती आधी होतीच पण इतक्या डीटेलात ती माहिती नव्हती... तुझ्या मेहनतीला सलाम... अजूनही बर्याच गोष्टींवर पडदा टाकायचा प्रयत्न चालू आहे.अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या अंतिम स्थितीला पोहोचल्या आहेत , पण त्याचा अमेरिकेच्या वित्तीय संस्थावर परिणाम होणार असल्यामुळे अजूनही त्या देशांना कर्ज वैगेरे वाटले जातेय...... :(

  ReplyDelete
 29. विजय, काही प्रश्नांची उत्तरं त्या डॉक्युमेंटरीत दिलेली आहेत किंवा इनडायरेक्टपणे सुचवली आहेत. नक्की बघ.. खूप डीटेल्स आहेत त्यात. अनेक गोष्टी नव्याने कळतात.. प्रतिक्रियेबद्दल आभार !

  ReplyDelete
 30. खरंच रे देवेन.. सगळाच भयंकर प्रकार आहे.. नक्की बघ ही डॉक्युमेंटरी.. खूप डीटेल्स दिलेत त्यांनी.

  ReplyDelete
 31. herambji
  mi ek senior banker ahe.
  tyamule hyatil bryach goshti mala mhit hotyach. aapan khoop changlya paddhatine sangitlyat
  jamlyas achut godbole yaanche 'arthat' he pustak vacha.
  ajun ek gosht

  thanks to manmohansing.

  in spite of pressures from usa,he did not take following decisions
  1.leberalisation in insurance sector
  2.privatisation of nationalised banks
  3.decontrolling of commodity market(mhanje jeevanavashyak vastuncha vaydebazar)
  aare, loakanna kimmat nahi re manmohansingachi!
  hech jar bhartat ghadale aste tar?

  ReplyDelete
 32. herambji
  mi ek senior banker ahe.
  tyamule hyatil bryach goshti mala mhit hotyach. aapan khoop changlya paddhatine sangitlyat
  jamlyas achut godbole yaanche 'arthat' he pustak vacha.
  ajun ek gosht

  thanks to manmohansing.

  in spite of pressures from usa,he did not take following decisions
  1.leberalisation in insurance sector
  2.privatisation of nationalised banks
  3.decontrolling of commodity market(mhanje jeevanavashyak vastuncha vaydebazar)
  aare, loakanna kimmat nahi re manmohansingachi!
  hech jar bhartat ghadale aste tar?

  ReplyDelete
 33. धन्यवाद चंद्रशेखरजी. 'अर्थात' नक्की वाचतो.

  ReplyDelete
 34. dont call me chandrashekhar"g"
  i am not that much older

  ReplyDelete

डेक्स्टर नावाचा रक्तपुरुष !!

सिरीयल किलर ही विक्षिप्त , खुनशी , क्रूर , अमानुष असणारी , खून करून गायब होणारी आणि स्थानिक पोलीस खात्याला चक्रावून टाकणारी अशी एखादी व्यक्त...