* भाग १ इथे वाचा
* भाग २ इथे वाचा
* भाग ३ इथे वाचा
मागोमाग दारही उघडलं गेलं. एका रापलेल्या चेहर्याच्या माणसाने आम्हाला बाहेर यायला फर्मावलं. आम्ही ताबडतोब बाहेर आलो. बाहेर येऊन आधी आमच्या मैत्रिणीं कशा आहेत ते पाहिलं.. त्या ठीक होत्या. सगळं ठीक वाटत होतं. आम्ही आत असताना त्यांची चौकशी चालू होती, त्यांना काही प्रश्न विचारले गेले, किंचित वादावादीही झाली (हे सगळं आम्हाला नंतर कळलं) !!
"नावं सांगा" अचानक समोरून आवाज आला....
समोरच्या टेबलाच्या मागे असलेल्या खुर्चीवरून तो आवाज येत होता. खुर्चीत बसलेला तेल लावून केस मागे फिरवलेला, उभट चेहर्याचा, चष्मिस, बुटका माणूस हळू आवाजात बोलत होता. सरकारी (??) ऑफिसर आणि एवढा मृदू आवाज हे समीकरण अगदीच न पटणारं, अविश्वसनीय होतं. पण तरीही ते सत्य होतं.
"मुलांनो, तुमची नावं सांगा" तो पुन्हा एकदा तेवढ्याच हळू आवाजात म्हणाला.
त्याच्यासमोर त्याच्या नावाची पाटी होती. तो खरंच (!!) फॉरेस्ट ऑफिसर होता. पण उगाचंच लवकर हायसं वाटून घेतल्याने काय होतं याचा अनुभव नुकताच घेतला असल्याने आम्ही तेव्हा काहीही वाटून घेतलं नाही. आम्ही भराभर आमची नावं सांगितली आणि त्याने ती भराभर लिहून घेतली. त्यानंतर तो हळू आवाजात बोलायला लागला आणि बोलतच गेला. जवळपास अर्धा तास तो बोलत होता. पण त्याचं बोलणं जेव्हा संपलं तेव्हा आमच्या लक्षात एकच गोष्ट आली होती --किंवा एक गोष्ट तो आमच्या डोक्यात प्लांट करण्यात यशस्वी झाला होता असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल-- की आम्ही एक मोठा गुन्हा केला आहे आणि त्यासाठी आम्हाला दंड भरायला लागणार आहे आणि दंड भरला नाही तर आम्ही वन-संरक्षण कायद्याअंतर्गत काही (बहुतेक दहा.. आता नक्की आकडा आठवत नाहीये) वर्षांसाठी तरी आत जाऊ शकतो.
त्याच्या म्हणण्याप्रमाणे
- आम्ही संरक्षित (??) वनक्षेत्रात आग लावली (??) होती.
- जे जळलं ते गवत अतिशय दुर्मिळ आणि म्हणूनच अतिशय किमती होतं.
- एका चौरस मीटर गवताची किंमत कमीतकमी दोनशे रुपये होती.
- आम्ही अंदाजे शंभर चौरस मीटर क्षेत्रफळातलं गवत जाळलं होतं.
- आणि त्यामुळेच दंड म्हणून आम्हाला वीस हजार रुपये भरायला लागणार होते.
- जर दंड भरला नाही तर वनखातं आम्हाला दुसर्या दिवशी कोर्टात उभं करणार होतं. आमच्यावर खटला
चालणार होता आणि खटला जर हरलो असतो तर आम्हाला निदान दहा वर्षं तरी आत जायला लागणार होतं.
सगळं भविष्य अंधकारमय झाल्यासारखं वाटलं. डोक्यावर हात मारून घेऊन मटकन खाली बसण्याची जी एक वेळ असते ती हीच असावी. खरंच सगळीकडे अंधार पसरला होता. आई-बाबा, मित्र, कॉलेज, नोकरी, पेपरात नाव, गुन्हा, शिक्षा, मनःस्ताप असं सगळं सगळं दोन मिनिटांत डोळ्यासमोरून तरळून गेलं. पण क्षणभरच....... !!
कारण यातल्या कुठल्याही गोष्टीला अर्थ नाहीये हे आम्हाला पुढच्याच क्षणी जाणवलं. त्याची ती आयडिया आमच्या डोक्यात प्लांट झाली होती खरी. पण तात्पुरतीच.... कारण लगेचच आम्हाला त्यातला फोलपणा जाणवला. सुदैवाने आमचे विचार, सारासार बुद्धी अजूनही जागृत होती.
- ते संरक्षित वनक्षेत्र होतं तर मग कुठेही तशी पाटी आणि/किंवा कुंपण का नव्हतं?....
- ते सो कॉल्ड गवत दुर्मिळ वगैरे नाही तर आपलं नेहमीचं साधं गवतच होतं हे सांगायला आमच्यापैकी कोणी वनस्पतीशास्त्रज्ञ असण्याची आवश्यकत नव्हती.
- आग लागण्यापूर्वी ज्या जागेवर आम्ही जीव मुठीत धरून उभे होतो त्या जागेला शंभर चौरस मीटरची जागा म्हणत असतील तर एकतर आम्हाला तरी पुन्हा गणित शिकायची आवश्यकता आहे किंवा तुम्हाला तरी. विशेष करून तुम्हालाच !
त्याच्या प्रत्येक प्रश्नाची आणि आक्षेपाची अशी चिरफाड आम्ही सहज करू शकत होतो. पण त्याने निष्पन्न काहीच झालं नसतं. उलट प्रकरण अजून गंभीर मात्र नक्कीच झालं असतं. त्यामुळे आम्ही त्याची सगळी बडबड ऐकून घेतली आणि शेवटी फक्त एवढंच म्हणालो
"आमच्याकडे वीस हजार रुपये नाहीत."
"बरं ते नंतर बघू." असं म्हणून त्याने एका फायलीत डोकं घातलं.
आता हा मध्येच हे काय वाचतोय, याच्या डोक्यात नक्की शिजतंय तरी काय असे विचार आमच्या डोक्यात थैमान घालत होते. जरा वेळाने त्याने फायलीतून डोकं बाहेर काढलं आणि आमच्यातल्या प्रत्येकाकडे एकेक करत रोखून बघायला लागला. होता होता मध्येच थांबून अचानक म्हणाला,
"अरे याच्या खांद्यातून रक्त येतंय का? काय झालं त्याला?" अचानक आलेल्या या प्रश्नाने आम्ही क्षणभर गांगरलो.
"तो उतरत असताना वाटेत घसरून पडला आणि दगडावर डोकं आपटलं."
"नाही पण मग खांद्यावर रक्त कसं?" त्याच्या त्या आवाजात उगाचंच एक वेगळा अर्थ दडला असल्यासारखं काहीतरी आम्हाला जाणवलं.
"अहो सरळ आहे. रक्त ओघळत खांद्यापर्यंत आलं. आमच्याकडे पाणी नव्हतं की मोठं बँडेड नव्हतं. तशीच कशीबशी जखम साफ करून रुमाल बांधला. पण तोवर बरंच रक्त गेलं." एव्हाना चाललेल्या प्रकाराने वैतागून जाऊन एका मुलीचा संयम संपला.
"बरं ठीक आहे. पण उतरताना घसरून पडला मग डोक्याच्या मागच्या बाजूला कसं काय एवढं लागलंय? पुढच्या बाजूला लागायला हवं ना? तुम्ही काहीतरी लपवताय... !!!!!! नक्की काहीतरी गडबड आहे."
"काहीही काय बडबडताय? तो उतरत असताना मागून उतरत असलेल्या एकीच्या पायाखालचा दगड निसटला आणि तो वेगाने घरंगळत येऊन पुढच्याच्या डोक्याला लागला. यात कसली आलीये गडबड? कसलं लपवणं? आता कसं, कुठून घसरून पडायचं ते काही कोणी ठरवून पडतं का?" आता मात्र तिला राहवत नव्हतं.
एक तर आम्ही कुठल्या परिस्थितीतून गेलोय दिवसभर, त्यात पुन्हा इथे अडकलोय आता आणि त्यात तुमचे हे निरर्थक प्रश्न !!! हे सगळे सगळे भाव तिच्या चेहर्यावर उफाळून आले होते. प्रकरण अगदीच हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर आमच्यातल्या एकाने तिला थांबवलं आणि त्या साहेबाला विचारलं.
"तुम्ही नक्की काय सुचवायचा प्रयत्न करताय? उतरताना मागून एक दगड घरंगळत आला याच्या डोक्याला लागला हे आम्ही तुम्हाला सांगतोय तर तुम्ही आम्हालाच उलटसुलट प्रश्न का विचारताय?"
"कारण सरळ आहे." अचानक इतका वेळ मृदू आवाजात बोलत असणारा माणूस हाच का असा प्रश्न पडावा इतकी जरब आवाजात आणून तो म्हणाला "कशावरून तो दगड घरंगळत आला होता? कशावरून तुम्हीच तुमच्या मित्राला मारायचा प्रयत्न केला नसेल?"
हा मात्र शुद्ध कहर होता. तो तारेत असल्यागत बडबडतोय याची आम्हाला खात्री झाली. पण तसं नव्हतं. तो मुद्दाम आम्हाला घाबरवण्यासाठी काहीही बडबडत होता. काहीतरी आरोप करत होता. आणि हे सगळं तो का करत होता ते आम्हाला लवकरच कळणार होतं.
"ओ. तोंड सांभाळून बोला. आमच्या आईवडिलांनी असले संस्कार केलेले नाहीत आमच्यावर" मगासच्या रणरागिणीने पुन्हा समशेर फिरवली.
"तोंडं तुम्ही सांभाळा तुमची. 'दुर्मिळ गवत जाळणं' एवढ्या एकाच आरोपाखाली तुम्हाला अटक होईल असं नाही एवढंच सांगायचा मी प्रयत्न करतोय. त्याच्याबरोबरच खुनाचा कट, खुनाचा प्रयत्न असेही आरोप लागतील."
हे सगळं खरंच चाललंय का मी एक मोठं दुःस्वप्न बघतोय असं मला वाटायला लागलं. कदाचित एवढ्यात जाग येईल आणि हे सगळं खोटं होतं, स्वप्न होतं हे कळेल असं सारखं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. तो जंगली ऑफिसर बोलतच होता बोलतच होता. बराच वेळ तीच तीच बडबड करून झाल्यावर अखेरीस तो म्हणाला.
"बोला मग आता काय करताय?"
"........" आमची तर बोलतीच बंद झाली होती.
"म्हणजे दंड भरताय की कोर्टात जाताय उद्या?"
ओओ... अहा.. ओक्के !!!!!!!! त्याच्या त्या प्रश्नात एक छुपी हिंट होती आणि एवढ्या वेळ फिरवून फिरवून बडबड करत तो तेच आम्हाला सुचवण्याचा प्रयत्न करत होता. सरकारी ऑफिसरकडून दुसरी काय अपेक्षा असणार म्हणा. पण आम्हाला एवढ्या वेळात हे कसं लक्षात आलं नाही याचंच आश्चर्य वाटत होतं.
अर्थात त्यात काही नवलही नव्हतं. आजचा दिवसच असा होता की आज काहीही घडलं असतं (म्हणजे वाईट) तरी आम्हाला आश्चर्य वाटलं नसतं. त्याच्या पलीकडे गेलो होतो आम्ही एव्हाना.
"साहेब, आमच्याकडे दंड भरायला पैसे नाहीयेत. आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. त्यामुळे एवढा दंड भरणं आम्हाला कोणालाच शक्य नाहीये."
"ठीके मग तुमच्या आईवडिलांना घेऊन या. ते भरतील दंड"
"......" आता याच्यावर काय बोलणार म्हणून आम्ही पुन्हा एकदा गप्प बसलो. पण आमच्या डोळ्यात फारच आर्तता वगैरे दाटली असावी. त्याला अचानक आमच्याबद्दल कणव दाटून आली.
"बरं एक करा दोन हजार रुपये द्या मी सोडतो तुम्हाला"
ते ऐकून आम्ही सगळे प्रचंड खुश झालो. पण तरीही एक प्रॉब्लेम होताच.. आमच्याकडे दोन हजार रुपये नव्हते... खरंच नव्हते... जवळपास सगळे शिकत होते आणि जेमतेम १-२ जण नोकरी करणारे होते. आणि काहीही असलं तरी ट्रेकला कोणी हजारो रुपये घेऊन जातं का? तस्मात प्रत्येकी अंदाजे शंभर रुपये गृहीत धरता आमच्याकडेही जेमतेम हजार एक रुपये असावेत.
"साहेब आमच्याकडे हजार रुपये असतील अंदाजे. ते घ्या आणि प्लीज आम्हाला जाऊद्या."
"नाही. दोन हजार तरी पाहिजेतच. एक हजार असतील तर एकालाच सोडेन.. !!!!!"
"एकालाच? म्हणजे?" क्षणभर काही रजिस्टरच होईना टाळक्यात. हा मनुष्य काय बडबडतोय ??
"नाही. दोन हजार दिले असतेत तर मी दोघांना सोडण्याचा विचार करत होतो. म्हणजे कसं एकाने जाण्यापेक्षा दोघांनी गेलेलं बरं. दोघांनी जा आणि तुमच्या पालकांकडून उरलेले अठरा हजार रुपये घेऊन या असं म्हणत होतो मी. तोवर बाकीचे इथेच राहतील. पण काही हरकत नाही. एक हजार देत असाल तर एकालाच जाऊन उरलेले पैसे आणावे लागतील. बोला कोण जातंय तुमच्यातलं??"
क्रमशः
(यानंतर फक्त एकच क्रमशः शिल्लक आहे.)
- भाग ६ इथे वाचा.
* भाग २ इथे वाचा
* भाग ३ इथे वाचा
* भाग ४ इथे वाचा