Friday, February 11, 2011

द्वि..... ज

डॉक्टरांची परवानगी मिळताच त्या लगबगीने आत गेल्या. छान उगवतीची सूर्यकिरणं खोलीभर पसरलेली ... कसं छान प्रसन्न वाटत होतं.. तिच्याशी नजरानजर होताच त्या तोंडभर हसल्या. तीही हसली. क्षीणपणे. फार थकलेली दिसत होती. साहजिकच आहे. पहिल्या वेळी त्रास होतोच थोडा. त्यांनी मायेने तिच्या कपाळावरून हात फिरवला. नंतर हळूच बाजूला ठेवलेल्या सश्याच्या पिल्लाच्या गालावरून. पिल्लू गाढ झोपेत होतं. दोघीही हसल्या.

"अवी?" क्षीण आवाजात तिने विचारलं.

"अवी निघालाय. पहाटेच्या फ्लाईटने. येईलच. तू पड शांतपणे"

ती फक्त हसली.

"खूप त्रास होतोय का?"

"हुं" ऐकू जाईल न जाईल अशा अस्पष्ट आवाजात ती हुंकारली.

पहिल्यांदा बातमी कळली तो दिवस, दुसर्‍या-तिसर्‍या महिन्यापासून सुरु झालेल्या त्या उलट्या, डोकेदुखी, मळमळ, कधी भूक गायब तर कधी झोप, अशक्तपणा, दमणूक, वासांची अ‍ॅलर्जी, पाय/हात/डोकं दुखणे अशा असंख्य असंख्य गोष्टींच्या चक्रातून निघालेले गेले नऊ महिने आणि शेवटी एकदाचं त्या त्या कापसाच्या पुंजक्याचा चेहरा बघायला मिळण्याची वेळ. सगळं झरकन डोळ्यासमोरून सरकून गेलं त्यांच्या...

"त्रास होतोच ग पोरी.. होईल सगळं नीट. कितीही झालं तरी शेवटी बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म !!"


*****

भटजींनी मुलाला त्याच्या मांडीवर बसायला सांगितलं. मंत्र म्हटले. नंतर त्याला मुलाच्या कानात नाव सांगायला सांगितलं. मंत्र चालूच होते. तो मुलाच्या कानात हळूच नाव पुटपुटला. मंत्र संपल्यावर गुरुजी म्हणाले "हा तुझा दुसरा जन्म बेटा. मुंज झाली की दुसरा जन्म सुरु होतो मुलाचा. सुखी भव"


*****

एक जन्म चार अक्षतांच्या दाण्यांनी मिळणारा तर दुसरा नऊ महिन्यांच्या खडतर तपश्चर्येनंतर... !

एक जान्हव्याच्या ब्रह्मगाठीला बांधलेला तर दुसरा नाळेत गुंडाळलेला.. !

कुठल्याही जातीला/प्रथेला नावं ठेवण्याचा उद्देश नाही. फक्त एक विसंगती जाणवली. थोडी मोठी वाटली. म्हणून लाउड थिंकिंग केलं.. झालं...!

50 comments:

  1. दोन फुल एक हाफ सारखी पोस्ट...
    मला विचारशील तर पहिला जरा जास्तच ताजा आहे...दुसरा कधीच कळणार नाही...आणि एक हाफवर नो कॉमेंट.....

    ReplyDelete
  2. रच्याक, आज सटासट दोन दोन कमेंट म्हणजे माझा दिवस सो फार कसा आहे संगयाला नको....जळवत नाही रे मी नुसतं FYI...:)

    ReplyDelete
  3. :)

    donhee madhye jameen aasamaanache antar aahe. barobar aahe, visangatee khup moThee aahe.

    ReplyDelete
  4. ही विसंगती तुला जाणवली हेच एक विचारी आणि संवेदनशील माणसाचं लक्षण आहे....
    खूप छान. :)

    ReplyDelete
  5. खरेच! एकाच तराजूत तोलल्या जाणार्‍या दोन्ही, पण दोघींत जमीन आसमानाचा फरक. :( भापो.

    ReplyDelete
  6. दोन फुल एक हाफ सारखी पोस्ट... +++++
    अगदी खरं लिहिलं आहेस.. विसंगती आहे... :(

    ReplyDelete
  7. ही विसंगती तुला जाणवली हेच एक विचारी आणि संवेदनशील माणसाचं लक्षण आहे....

    + १ असेच म्हणतो.

    ReplyDelete
  8. यप्प... दोन्हीमध्ये पार जमीन आसामानाचा फरक आहे... :(

    ReplyDelete
  9. अतिशय कमी शब्दात संवेदना खूपच छान मांडली आहे..

    ReplyDelete
  10. संवेदनशील... आवडलं! :)

    ReplyDelete
  11. सुंदर, आवडला,

    ReplyDelete
  12. अग जसं सुचलं तसं लिहून टाकलं... पण खरंच.. दोन फुल एक हाफ सारखंच वाटतंय :) .. आभार.

    आणि मी ४८ तासांनी उत्तरं देतोय म्हणजे माझा विकांत कसा गेला असेल हे तुझ्या लक्षात आलं असेलच :)

    ReplyDelete
  13. हेरंबा ..

    विचारात टाकलंस.... लेकाची मुंज नुकतीच झालीये आणि तुझी ही पोस्ट आली तेव्हा लेकीचा वाढदिवस होता, मुंजीच्या आणि गौरीच्या जन्माच्या संमिश्र आठवणी मनात होत्या त्यामूळे कमेंटले नाही लवकर :)

    एक सांगू, असा संवेदनशील विचार करणाऱ्या पुरूषांचे प्रमाण वाढले तर या नैसर्गिक आणि प्रथांमधे असलेल्या जन्मातले अंतर जरा कमी होईल ....

    पोस्टबाबत जियो!!!

    ReplyDelete
  14. अनघा, आभार.. मधून मधून काहीतरी जाणवत राहतं उगाच

    ReplyDelete
  15. श्रीताई, आभार..

    खरंच.. दोन्ही पारड्यात किती फरक आहे ना?

    ReplyDelete
  16. खरंय सुहास.. आभार प्रतिक्रियेबद्दल..

    ReplyDelete
  17. अनुजा अनेक धन्यवाद.

    ReplyDelete
  18. मनःपूर्वक धन्यवाद विशालभाऊ..

    आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा..

    ReplyDelete
  19. भारत, मनःपूर्वक आभार.

    ReplyDelete
  20. बाबा, अनेक आभार.

    ReplyDelete
  21. विक्रांत, अरे नाही. जातीवाचक वगैरे मला म्हणायचं नव्हतं. पोस्टच्या शेवटी जातीचा उल्लेख आलाय तो मुंजीच्या संदर्भात. द्विज म्हणजे ब्राह्मण अशा अर्थी.. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की एका व्यक्तीला दुसरा जन्म मिळतो तो अनंत वेदनांनंतर आणि दुसऱ्या व्यक्तीला जवळपास काहीही न करता...

    सगळ्यात महत्वाचं सांगतो.. यात दोष कोणाचाच नाही... असलाच तर पहिल्या बाबतीत निसर्गाचा आणि दुसऱ्या बाबतीत आपल्या प्रथांचा.. इतकंच.

    ReplyDelete
  22. सिद्धार्थ, आभार.. हल्ली स्मॉलच जास्त सुचतं :)

    ReplyDelete
  23. काका, अनेक आभार.

    ReplyDelete
  24. तन्वी,

    मोठ्ठा योगायोग.. ! तुला तर जास्तच जाणवली असेल पोस्ट.. कुठलेही संवेदनशील विचार क्वचितपणे दिसण्याऐवजी नियमितपणे दिसू लागणं हे सगळ्यात महत्वाचं. ते लवकर होवो.

    ReplyDelete
  25. मस्त आहे पोस्ट. दुसरा भाग म्हणजे व्रतबंधानंतर ज्ञान प्राप्तीसाठी योग्य वय झाले असा अर्थ~ म्हणून दुसरा जन्म असे म्हंटले जात असावे. पोस्ट नक्कीच विचार करायला लावणारे.

    ReplyDelete
  26. आभार काका..

    हो कदाचित तसंही असेल पण तरी पहिल्या प्रोसेसचा मानाने ही प्रोसेस किती सोपी नाही का?

    ReplyDelete
  27. धन्यवाद विक्रम.

    ReplyDelete
  28. द्विज म्हण्जे दोनदा जन्म घेतलेला. एकदा आईच्या पोतातून आनि दुसरा व्रतबन्धन झाल्यावर.
    पूर्वी व्रतबन्धन होते ब्रम्हचर्याचे.गुरुग्रुही राहून, खडतर कष्ट करून विद्या सम्पादन करावी लागत होती.लहान्पणाचे लाद, आराम सोडावा लागत होता, म्हणून तो दुसराच जन्म.
    आज्च्या काळात या अह्ब्दाला खास अर्थ नाही राहीला.मुन्ज कर्तात तो एक सोपस्कार म्हणून.त्यानन्तर विद्या व्रत ग्यावे लागते, त्याची शुचिता पाळावी लागते, हे कोणी त्या मुलाला समजावून पण सान्गत नाही.
    पण तुमचा मुद्दा आणी तुमचे विचार बरोबर आहेत.

    ReplyDelete
  29. अरुणाताई, प्रतिक्रियेबद्दल आभार. व्रतबंधानंतर मिळणारा दुसरा (!) जन्म आणि स्त्रीला बाळंतपणानंतर मिळणारा दुसरा जन्म या दोन 'दुसऱ्या' जन्मान्माधली तफावत जाणवली आणि त्यातूनच ही छोटी पोस्ट लिहिली. वरच्या एका प्रतिक्रियेत म्हटल्याप्रमाणे दोष कोणाचाच नाही. असलाच तर निसर्गाचा आणि आपल्या प्रथांचा.

    ReplyDelete
  30. balantpan yachach arth bal kinva anta. mhanunach mulga nahi tar aai hone mhanajech 'dwij' hone nahi ka? Dwij cha dusra arth aahe pakshi. ekda andyat ani dusryanda andyabher yenara janma'
    Ayla, kharaach ki! mhanunach aapan ekhadya lahan kinva adnyani mansala ' too andyat aahes" ase mhanto!
    chhan post aahe.

    ReplyDelete
  31. धन्यवाद चंद्रशेखर. बरोबर द्विज चा दुसरा अर्थ पक्षी असाही आहे.

    ReplyDelete
  32. long time since the last article.. aNee kharach ya goshteebadaalchee sensitivity ta haLu haLu kahee lokanmadhye taree disayala lagaliye ha plus point.

    ReplyDelete
  33. :) very nice... small but quite deep thinking :) liked it :)

    ReplyDelete
  34. स्मिता, कालपासूनच एक जुन्या ट्रेकचा अनुभव लिहायला सुरुवात केलीये. पहिला भाग काल टाकला आहे. तो वाचलात का?

    आणि सेन्सिटिव्हीटीबद्दल... हम्म्म्म बऱ्याच गोष्टी डाचत असतात आणि मग त्या अशा पोस्टमधून बाहेर पडतात..

    ReplyDelete
  35. धन्स सौरभ.. कधी कधी छोट्या गोष्टींमध्येही खूप अर्थ दडलेले असतात.. जशी ही तफावत.. आणि अशा गोष्टी जाणवल्या की उगाच वाईटही वाटतं कधीकधी.

    ReplyDelete
  36. पटल रे तुझ म्हणण ...

    >>>>ही विसंगती तुला जाणवली हेच एक विचारी आणि संवेदनशील माणसाचं लक्षण आहे... +१११११

    ReplyDelete
  37. मनःपूर्वक धन्यवाद, देवेन.

    ReplyDelete
  38. काय लिहिलंय राव.... मला उगाच एक वेगळा प्रश्न... हिंदू धर्मशास्त्रात फक्त ब्राह्मणांना नाही तर प्रत्येक हिंदूला मुंज करण्याचा आणि शेंडी ठेवण्याचा अधिकार आहे असे कुठेशी ऐकले - वाचले होते... काही कल्पना?

    ReplyDelete
  39. रोहणा, कल्पना नाही. पण मी तर म्हणेन की असंच असायला हवं !! :)

    ReplyDelete
  40. धन्यवाद संकेत :)

    ReplyDelete

मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!

पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...