संताप झाला होता नुसता. त्या तिरीमिरीतच घरी गेलो. कपाटातला खण उघडून ती छोटीशी डबी बाहेर काढली आणि टेबलावर ठेवली. त्यातून ते चार किडे बाहेर काढले आणि टेबलावर ठेवले. रागारागाने चौघांकडे बघत होतो. डोळे आग ओकत होते.
"पुन्हा एकदा जिंकलात तुम्ही"
ते शांतच होते. चेहर्यावर एक छद्मी विजयी हास्य होतं.
जमेल तेवढी आग डोळ्यातून ओकत पहिल्या किड्यावर खेकसलो.
"१५००० लोकांचा खून, २६ वर्षांचा लढा आणि त्याची शिक्षा १ लाख रुपडे दंड आणि २ वर्षं कैद? अरे शिक्षा होती की बक्षीशी ? हे असे हजारो माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या गुन्ह्याचे खटले २६-२६ वर्षं चालवता कसे तुम्ही लोक? आणि १ लाख रुपड्यांचा दंड? अरे त्या लोकांनी साधा खिसा झटकला तर तेवढे पैसे खाली पडतील. आणि तेवढा तुम्ही त्यांना दंड म्हणून लावता? आणि वर जामीनही? अशा गुन्ह्याला जामीन? अरे हा न्याय आहे की पैसे कमाईचं दुकान?"
त्या 'अन्यायालय' नावाच्या किड्याला माझं हे रूप अपेक्षित होतंच कारण त्याच्यासाठी ते नेहमीचं होतं. त्याने चेहर्यावर नेहमीचे निर्लज्ज भाव आणून बेशरम आवाजात बोलायला सुरुवात केली.
"हे बघ. उगाच आरडओरडा करू नकोस. एवढ्या मोठ्या खटल्याला २६ वर्षं लागणारच. त्यात काय एवढं? आणि त्यांच्यावर पोलिसांनी जे गुन्हे दाखल केले होते त्या गुन्ह्यांसाठी जास्तीत जास्त शिक्षा ही २ वर्षंच आहे आणि दंडही तेवढाच आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या गुन्ह्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त शिक्षा मिळाली आहे. आणि तो गुन्हा जामीनपात्र आहेच. त्यामुळे त्यासाठी एवढा त्रागा करायची आवश्यकता नाही. बाकी हे कायदे, नियम असे का आणि या अशा कलमांचे गुन्हे आरोपींवर का लावले ते मला माहित नाही. ते तू याला विचारू शकतोस"... माझ्या सगळ्या मुद्यांचं, शंकांचं, प्रश्नांचं यथास्थित समाधान केल्याचा आव आणत त्याने उरलेले सगळे प्रश्न बाजूला उभ्या असलेल्या किड्याकडे वळते केले. मी पुन्हा त्याच प्रश्नांचा भडीमार करू नये म्हणून मला बोलायची संधीच न देता तो 'सरकाट' नावाचा किडा थेट बोलायला लागला.
"तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नाही पण तरीही मला ठाऊक आहे की जे मी केलं आहे तो योग्य आणि न्यायाला धरून होतं आणि आहे. खटला सुरु झाल्यावर त्या अँडरसनला मीच तर अमेरिकेतून इथे आणलं, त्याच्यावर खटला चालवला. अरे त्याला मोकळं सोडलं असतं तर अनर्थ झाला असता, लोकांनी कायदा हातात घेतला असता. त्याला ठार केलं असतं. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असती. त्यामुळे मी केलं ते योग्यच होतं. आणि तुला काय वाटतं त्याला फाशीची शिक्षा द्यायला हवी होती? अरे ते शक्य नाही. आणि आता तर मुळीच शक्य नाही."
"आणि त्याचं कारण मी सांगतो." दुसर्या किड्याचं बोलणं संपतं ना संपतं तोच 'मानवाधिक्कार संघटना' नावाचा तिसरा किडा मध्ये लुडबुडला. "अँडरसनचं आता वय झालं आहे. त्यामुळे त्याचं वय, तब्येत वगैरे गोष्टी लक्षात घेता त्याच्यावर खटला चालवणं शक्य नाही. त्याला फाशीच काय कुठलीच शिक्षा करणं शक्य नाही. मानवाधिकाराच्या विरुद्ध आहे ते. आणि तसंही फाशीच्या शिक्षेला अनेक प्रगत देशात मान्यता नाही. एखाद्या व्यक्तीचा कायद्याने खून करायचा आपल्याला काय अधिकार तो आपल्याला कोणी दिला? त्याला मारल्याने ते मेलेले लोक परत येणार आहेत का?"
एव्हाना माझं डोकं गरगरायला लागलं होतं. तो सारा प्रकार असह्य होऊन मी दाणकन टेबलवर माझी मुठ आपटली.
"अरे तुम्ही किडेच. शेवटी किड्यांसारखाच विचार करणार. त्यात तुमची चूक नाही पण तरीही मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय माझ्या जीवाची तगमग कमी होणार नाही. मला उत्तरं मिळालीच पाहिजेत.
१. एवढ्या महत्वाच्या खटल्याचा, ज्यात हजारो जीव अक्षरशः तडफडत तडफडत गेले, नवीन येणारे कित्येक जीव जन्मतःच अपंगत्व घेऊन आले, ज्या दुर्घटनेमुळे एक पिढीच्या पिढी करपली, पुसली गेली अशा खटल्याचा निकाल लागायला २६ वर्षं लागतात? का???????? फास्टट्रॅक कोर्ट किंवा असंच काही करून लवकर निकाल का लावला गेला नाही? की फास्टट्रॅक कोर्ट हे सुद्धा फक्त रंगीबेरंगी नाव असलेलं एक अन्यायालयच आहे?
२. एवढ्या भयानक गुन्ह्यांसाठी एवढी कमी शिक्षा असलेली पर्यायाने अयोग्य कलमं आरोपींवर कोणी लावली? त्यात कोणाचे हितसंबंध गुंतले होते?
३. त्या अँडरसनला जामीन मिळवून देऊन सरकारी गाडीतून चोख बंदोबस्तात सोडणार्या नेत्यांच्या घरचे किती जण भोपाळ वायूदुर्घटनेचे बळी आहेत? किती जणांनी तो त्रास, छळ, यातना, अपंगत्व या सगळ्याला तोंड दिलं आहे?
४. भोपाळच्या पाण्यातून, हवेतून, जमिनीतून, वार्यातून त्या विषाचा अंश पूर्णतः काढून टाकण्याची जवाबदारी तुम्ही कधी पार पाडणार आहात? तेवढंच तुमच्या महापापाचं थोडंसं प्रायश्चित.. उरलेल्या जगल्या वाचलेल्यांचा दुवा तरी घ्या निदान.
५. प्रगत देशांच्या सोयीस्कर गोष्टींचं अंधानुकरण करणार्या आणि त्याची टिमकी वारंवार वाजवणार्या किती लोकांना हे ठाऊक आहे की अशा घटना परदेशात घडतात तेव्हा आरोपींना ३०-४०-५० वर्षांच्या शिक्षा होतात, फाशी किंवा तत्सम शिक्षा नाकारणार्या, त्यांचा निषेध करणार्या किती लोकांनी आपले आप्तजन भोपाळ दुर्घटनेत किंवा एकूणच दुर्दैवी अशा बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले यांसारख्या घटनांमध्ये गमावले आहेत?
६. तुमचं कणभरही वैयक्तिक नुकसान झालेलं नसताना लोकांच्या भावनांची खिल्ली उडवून त्यांना कायदा आणि मानवाधिकाराचे डोस पाजण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?
७. जे हजारो निरपराध लोक स्वतःचा काहीही दोष नसताना त्या भीषण वायुगळतीमुळे (किंवा भयानक बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ले यांमुळे) मृत्युमुखी पडले त्या सगळ्यांच्या मानवाधिकाराचं, त्यांच्या जगण्याच्या हक्काचं काय?
८. .......
----
--
----
---
---
--
१२ .......
-----
---
--
-
-
---
-
-
२५. ......
---
--
-
-
-
५७. .......
----
-
-
-
---
-
१०३. .......
----
---
-
--
-
२२१. .....
----
--
-
---
--
त्यानंतर असं बरंच बरंच बरंच काहीसं मी बोलत राहिलो, सांगत राहिलो, बडबडत राहिलो, माझी कैफियत मांडत राहिलो, मुद्दें सांगत राहिलो.... बर्याच वेळ !!! कारण यादी खूप मोठी होती.. मुद्दे, आरोप, प्रश्न अनेक होते. आणि सारेच अनुत्तरीत.. नेहमीसारखेच.. खूप वेळ अशी काहीशी बडबड करून झाल्यावर मी क्षणभर थांबलो. बघितलं तर ते चौघे शांतपणे उभे होते आणि गालातल्या गालात हसत होते. त्यांना काही फरक पडत नव्हता मी काय बोलतोय, काय सांगतोय, काय मागतोय, काय मांडतोय याच्याशी.. ते मुक्त होते. तृप्त होते. रक्त पिऊन पिऊन त्यांचे खिसे आणि पोटं भरलेली होती. 'जनता' नावाच्या एका क्षुद्र, तुच्छ, हलक्या जनावराच्या पोटतिडीकीने बोलण्याला त्यांच्या दृष्टीने एक निरर्थक, फालतू बडबड, अनाठायी केलेला त्रागा याउपर किंमत नव्हती. त्या बेशरम हास्यातून लोंबणारा क्षुद्र कोडगेपणा मला असह्य झाला. माझी उरली सुरली आशा संपुष्टात आली.
आणि संतापाने लाल होऊन, न राहवून त्या तिन्ही किड्यांना मी एका मागोमाग नखाने चिरडून चिरडून टाकलं... आणि हो.... त्या अँडरसन नावाच्या चौथ्या किड्यालाही............
मागे अफझल गुरु, कसाब वगैरे वगैरे किड्यांना चिरडून टाकलं होतं ना तसंच. अगदी तसंच. नेहमीप्रमाणेच... !!!
अजून करू तरी काय शकणार होतो मी !!!!!!
** हा लेख या अशा भाषेत टाकू की नको याचा बराच विचार करत होतो. पण जर माझ्या भावना (कितीही कठोर असल्या तरीही) मला माझ्या ब्लॉगवर व्यक्त करता येणार नसतील तर ते ब्लॉगच्या मूळ उद्देशाशी प्रतारणा करणारं ठरेल असं वाटलं. त्यामुळे त्या जशाच्या तशा मांडण्याचा प्रयत्न केला.
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Sunday, June 20, 2010
Thursday, June 17, 2010
पाव(चाळा)साळा आणि गम (भरे) बूट
मला पावसाळा आवडत नाही. कारण मला पाऊसच आवडत नाही. मला कल्पना आहे की मला शाहरुख आवडत नाही कारण त्याची स्टाईलच आवडत नाही किंवा मला द्रविड आवडत नाही कारण त्याची बॅटिंगच आवडत नाही किंवा मग अगदी काजोल आवडत नाही कारण तिची अॅक्टिंग आवडत नाही असं काहीतरी म्हणण्यासारखं हे आहे. जर कोणाला खरोखरच शाहरुख, द्रविड आणि काजोल (अरे हो.. आणि पाऊसही) आवडत नसतील तर तो योगायोग समजू नये. त्यांचं या एकखांबी तंबूत स्वागत आहे. कितीही वेड्यात काढलंत तरी ईलाज नाही. कारण हे शाश्वत आणि अंतिम नसलं तरीही माझ्यासाठी माझ्यापुरतं मात्र सत्य आहे.
पाऊस म्हटलं की लोकं एकदम नोस्टॅल्जिक होऊन मागे जात जात जात एकदम "आमच्या घरासमोर असलेल्या डबक्यात आम्ही कशा नावा करून सोडायचो.. कशा एकमेकांच्या होड्या सॉरी सॉरी नावा (नावा हे जास्त नोस्टॅल्जिक वाटतं खरं) पाण्यात बुडवायचो" किंवा मग "त्या बंड्याने कसं त्या चिंगीला धक्का देऊन पाण्यात पाडलं" किंवा "कसं ते डबक्यातलं पाणी तिच्या अंगावर उडवलं" पर्यंत मागे जाऊन येतात.. येतात कसले तिथेच थांबतात (राहतात या अर्थी. खरं तर थांबत नाहीत चालूच राहतात) म्हणणं जास्त योग्य. कोणावरही अविश्वास वगैरे दाखवणं असं काही नाही (आणि समजा मी दाखवलाच अविश्वास तर कोसळायला तुम्ही काय सरकार आहात का. उगाच कायच्याकाय) किंवा कदाचित माझ्या जात्याच कमी असलेल्या स्मरणशक्तीमुळेही (शंखपुष्पी की कायसं घेतल्यावर वाढायची म्हणे. च्यायला तेही आठवत नाही आता.. !!) असेल पण मला एकदाही "मी त्या प्रज्ञाची वेणी कशी ओढली होती" किंवा "त्या वैभवला कसा बदाबदा बुकलला होता" ते आठवत नाहीये. हो माझ्या बालपणात चिंग्या आणि बंडे (एक तितली अनेक तितलीया, एक बंड्या अनेक बंडे) वगैरे नव्हते. होत्या त्या प्रज्ञा, विद्या, वर्षा, वैभव, नवीन, राजेश वगैरेच... अरे हो पावसाच्या आठवणींबद्दल बोलायचं होतं नाही का. आणि ही वेणीवाली प्रज्ञा आणि बुकललेला वैभव आपल्या वरच्या यादीत नव्हताच की. उगाच केव्हाही काहीही आठवतं आणि म्हणे नाशतालज्यिक (हे 'नाशतालज्यिक' हे 'सलाम नमस्ते'वाल्या 'एकझ्याकली' च्या तालात वाचावे.)
तर पुष्पीच्या (नाही ही वर्षा, विद्या, प्रज्ञाच्या यादीतली माझी मैत्रीण नाही हे औषधाचं नाव आहे. मगाशी सांगितलं नाही का. ज्यांना आठवत नाहीये त्यांनी पुष्पी घ्यावी) कृपेने किंवा जी कोणी असेल तिच्या कृपेने मी मागे जात जात जात जिथे जाऊन धाडकन आपटतो (आणि डोक्याला टेंगुळ येतं वगैरे वगैरे) ती आठवण म्हणजे नावांची, होड्यांची (दोन्ही एकच हो पण एक नाशतालज्यिक आणि दुसरं ना-नाशतालज्यिक.. आठवत नसेल तर आता मात्र नक्की पुष्पी घ्याच), डबक्यांची किंवा टेंगुळांचीही नव्हे तर वेगळीच आहे. डोंबिवलीच्या रस्त्यांवरून चालताना गिरगावात घेतलेले आणि त्यामुळे गिरगावातले रस्ते आणि पावसाला अनुसरून बनवलेले सँडल्स वापरताना जो एक त्रास (म्युनिसिपालटीच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला नसला तरी आमचंही बालपण हलाखीतच गेलंय. कळलं ना आता.. !!) होतो ना अगदी तसाच त्रास व्हायचा चालताना. ती चिखलाची चिकचिक, सगळीकडे साठलेलं पाणी सगळा नुसता किचकिचाट. (कुठे गेले रे सगळे पाऊस आवडतो म्हणणारे.). जाम वैताग यायचा ते पाण्याने, चिखलाने बरबटलेले सँडल्स घालून चालताना. पण माझ्या आई-बाबांच्या दृष्टीने मी अजून (म्हणजे तेव्हा) मोठा झालेलो नसल्याने मला गमबूट मिळणार नव्हते. (खरं तर याचा उच्चार 'गं बूट' असा असल्याने लिहितानाही 'गंबूट' असं लिहिलं पाहिजे. परंतु 'गंबूट' म्हणजे ते तंबूत बिंबूत असं काहीतरी विचित्र वाटतंय. त्यामुळे गमबूट असंच लिहितोय. परंतु लिखाण अधिक परिणामकारक वाटण्यासाठी तुम्ही 'गंबूट' असंच वाचा.) त्यामुळे मला वाटतं डोंबिवलीतले पहिले दोन पावसाळे मी त्या बरबट सँडल्सच्या साथीने काढले. त्यानंतर दोन वर्षांनी मी मोठा झाल्यावर म्हणजे गमबूट घेण्याइतका मोठा झाल्यावर त्या वर्षी मी पावसाची जेवढी वाट बघितली असेल तेवढी (अजून अजून मोठा झाल्यावर) दोघांनी एका छत्रीत चालायला मिळावं म्हणून पडाव्याश्या वाटणार्या पावसाचीही बघितली नसेल. बरं अतिशयोक्ती सोडून द्या. दुसरी उपमा सुचली नाही, आठवली नाही (पुष्पीनी, येना येना येना) म्हणून ही वापरली. थोडक्यात जाम लय भारी वाट बघितली होती त्यावर्षी. आणि ज्याप्रमाणे आकाशात चार काळे ढग जमा झाले की हार्बरच्या गाड्या बंद पडतात त्याप्रमाणे त्यावर्षीचे काळे ढग जमा झाल्यावर पहिला पाऊस पडण्याआधीच मी माझे सँडल्स बंद पडले असल्याचं आपलं खराब झाले असल्याचं आणि मला गमबूट(च) हवे असल्याचं घरात जाहीर केलं. काही झालं तरी त्या जुन्या, उष्ट्या सँडल्सनी मी यावर्षी पहिल्या पावसाला सामोरा जाणार नव्हतो. माझ्या गमबूटच्या मागणीला घरात मान्यताही मिळाली. झालं.. अचानक मला पावसाळा आवडायला लागला होता. निदान गमबूट मिळेपर्यंत तरी. जसा शुगरबॉक्सनंतर (आणि लग्नाच्या आधीपर्यंत) नवरा आवडायला लागतो ना मुलींना अगदी तसंच. (मुलींनो, हलकं घ्या. मुलांनो, अज्याबात कायपण हलकं नाय यात). तर बघता बघता तो सुवर्णदिन, प्लॅटिनम-क्षण माझ्या आयुष्यात उगवला. अगदी पहिला पाऊस पडायच्या आधी. त्यादिवशी संध्याकाळी दुकानात जाऊन आम्ही ते काळेभोर, मऊशार, देखणे, उत्तम, टिकाऊ गमबूट घेतले आणि दुसर्या क्षणीच मी ते पायात चढवले सुद्धा. आणि काय सांगू तो अनुभव अहाहा. दुकानातून घरी येताना सगळेजण माझ्याकडे आणि माझ्या गमबुटांकडेच बघताहेत असं वाटत होतं मला. अगदी पाडगांवकर बोलगाणीमध्ये म्हणतात ना तसंच.
त्या दिवशी रस्त्याने सिंहासारखा होतो हिंडत
पोलिससुद्धा माझ्याकडे आदराने होते बघत
हवं तर सिंहासारखं नको छाव्यासारखं म्हणू. म्हणजे लहान सिंह ना म्हणून छावा बाकी काही नाही. (तुम्हाला वाटतंय त्या अर्थी 'छावा' मी नंतर झालो. पण ते आत्ता नको. त्याच्याविषयी नंतर कधीतरी)
पण लोकांनी माझ्याकडे आदराने (मला तेव्हा आदराने वाटलं होतं पण खरं तर त्यांचं बघणं विचित्र या अर्थी होतं) बघण्याचं कारण वेगळंच होतं. आणि आमच्या मातोश्रींनी ते चटकन ओळखलं होतं. घरी आल्यावर, वीज कडाडावी तशा त्या कडाडल्या (आजची म्हण : पावसाळी लेखात विजेची उपमा) "असा लंगडत का चालत होतास ??". "घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लांपाशी" या म्हणीचा (सॉरी. या म्हणीशी तादात्म्य सांगणारी पावसाळी म्हण तयार करता आली नाही. त्यामुळे वरिजिनलच वापरतो आहे. शेवटी जुनं ते सोनं) अनुभव मला क्षणार्धात आला. "असा लंगडत का चालत होतास? चावले की काय नवीन बूट?" वीज पुन्हा कडाडली. ते गमबूट घालून दुकानातून पहिलं पाऊल बाहेर टाकल्यापासून ते थेट आत्तापर्यंत जो मी कळवळत चालत होतो ना तो सगळा त्रास, तो राग, बूट खसकन पायातून ओढून बाहेर काढून टाकला. बूट आणि राग दोन्हीही. बघतो तर दोन्ही पायांवर टाच आणि पोटरीच्या मध्ये जो एक असा बाहेर आलेला भाग असतो ना (काय म्हणतात त्याला मराठीत किंवा कुठल्याही भाषेत देव जाणे. तूर्तास आपण 'गमबूट चावण्याची जागा' असं म्हणू) तो अस्सा लाललाल झाला होता. 'गमबूट चावण्याची जागा' वर्णनातून कळली नसेल(च) तर त्यासाठी गुग्ल्याकडून हे चित्र उधार घेतलंय. त्यात ते खाली सर्वात शेवटच्या बाणाने जी जागा दाखवली आहे ना तिला (आमच्यात) 'गमबूट चावण्याची जागा' असे म्हणतात.
तर दोन्ही पायांवरच्या त्या 'गमबूट चावण्याच्या जागा' (एकूण चार. पाय नव्हे जागा.) एकदम लाल झाल्या होत्या. रबर घासून घासून, हुळहुळल्याने थोडी जखम झाल्यासारखीही झाली होती. मग त्यांना त्या बँडेड नामक चिकटपट्ट्या लावण्याचे कार्यक्रम झाले. पायात मोजे घालून त्यावर गमबूट घालण्याच्या सूचना मिळाल्या. अर्थात चावणं, दुखणं मात्र काही कमी झालं नाही. गमबूटवरचं प्रेम मात्र क्षणात ओसरलं. आणि पाऊस तर अजूनच नकोसा झाला तेव्हापासून. त्यानंतर ते पाऊस पडल्यावर मोजे ओले झाल्याने पाय चिकट होणे वगैरे प्रकार सुरु झाले. कालांतराने ते बूट चावणं प्रकरण कमी झालं नसलं तरी कदाचित त्या चावण्याची सवय झाल्याने काही विशेष वाटेनासं झालं असावं. (इतर कित्येक चावर्या गोष्टीं नाही का सहन करत आपण. त्यातलीच ही एक).
हे दुखरे पण सवयीचे झालेले बूट घालून असाच एकदा शाळेत मधल्या सुट्टीत खेळत होतो. शाळेत काहीतरी बांधकाम चालू होतं त्यामुळे मैदानात रेतीचा मोठ्ठा ढीग रचून ठेवलेला होता. सगळ्या कार्ट्यांच्या (मी सोडून) काय मनात आलं देव जाणे पण अचानक सगळेजण त्या ढिगाच्या दिशेने धावायला लागले आणि एकदम त्या ढिगावर उड्या मारायला लागले. अर्थात मीही त्यातलंच एक कार्ट असल्याने (च्यायला कबुल करावंच लागलं शेवटी.. अरेरे.) मीही धावत सुटलो आणि एकदम इश्टायलीत त्या ढिगावर एकदम लॉंग जंप, हाय जंप मारली. सगळी रेती शर्टवर, चेहर्यावर उडाली. अर्थात त्याचं मुळीच दु:ख नव्हतं. पण उठून उभा राहिलो, पाहिलं पाऊल टाकलं आणि एकदम सार्या जगाचं दु:ख, वेदना, यातना, त्रास, छळ, संकटं जणु माझ्याच शिरी ठेवल्यासारखा माझा चेहरा झाला. आधीच त्या 'गमबूट चावण्याच्या जागा' छळत होत्या ते दु:ख कमी होतं की काय म्हणून चढत्या भाजणीने अजून दु:ख उर्फ रेती बुटात भरली गेली आणि अक्षरशः एकही पाऊल टाकवेना. पाय उचलून खाली टेकवला की त्या एक-दीड सेकंदात असंख्य टोकदार, धारदार बाणांनी, तलवारींनी, भल्यांनी वार करावेत तसे त्या ओल्या, टणक, खरखरीत वाळूचे हल्ले पावलावर होत होते. कळवळत कळवळत हळूहळू दोन्ही बूट पायातून काढले तर पायाची अवस्था बघवत नव्हती. बूट नळाखाली धरून आत चिकटलेली रेती काढून टाकण्याचा सुपर-व्यर्थ प्रयत्न करून झाला. शेवटी घरी येताना अक्षरशः अनवाणी पायाने (हो त्याच त्या डबक्यांनी आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून) चालत घरी यायची पाळी आली. त्यादिवसापासून आयुष्यात कधीही गमबुटांचं नावही काढलं नाही......
तर आपटून टेंगुळ येण्याएवढं मागे गेल्यावर मला आठवतात ते पावसाचे अनुभव असेच भयंकर गंबुटी आहेत त्यामुळे टेंगळाच्या थोडं अलिकडे थांबायचं ठरवलं. पण तरी तिकडेही पावसाचा असाच एक निसरडा प्रसंग आठवतो. फुटबॉलच्या वर्ल्डकपवाला कुठलातरी एक पावसाळा होता. जास्त तपशीलात जात नाही कारण कुठला ते एक तर मला मला आठवत नाहीये आणि दुसरं म्हणजे ते आपल्या या प्रसंगाशी विशेष संबंधितही नाहीये. तर "फुटबॉल वर्ल्डकप चालू असताना फुटबॉल न खेळता क्रिकेट किंवा इतर काहीही खेळणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे" या आम्हीच तयार केलेल्या नियमाच्या आधारे दररोज संध्याकाळी शाळेतून आल्यावर आमचं जोरदार फुटबॉल खेळणं चालू होतं. पण हळूहळू पाऊस खूप वाढायला लागला इतका की आमच्या फुटबॉल ग्राउंडची फुलटू वाट लागली होती (हो. माझ्या लहानपणी भरपूर पाऊस पडायचा हे मला नक्की आठवतंय. थांकु पुष्पिनी). पण काहीही होवो आणि कोणीही असो नियम तो नियम त्यामुळे आम्ही तो नियम इमानेइतबारे आमच्या बिल्डिंगच्या गच्चीवर पाळायला सुरुवात केली. आणि पाऊस पडत असेल तर न थांबता उलट "पावसात फुटबॉल खेळताना उलट अजूनच मजा येते "असं म्हणून आणि एकमेकांना समजावत, सांभाळत (पक्षि दुसर्या पार्टीतल्या पोरांना ढकलत) आम्ही अजून उत्साहाने खेळायला लागलो. पण क्ले कोर्टची सर सिमेंट कोर्ट किंवा तुटक्या-चिपा कोर्टला कशी येणार म्हणा. त्यात डोक्यावर पाऊस. त्यामुळे दणादण धडपडणं, घसरणं, आपटणं हे प्रकार नियमित होऊ लागले. पण तरीही त्याचंही काही वाटायचं नाही. पण त्या दिवशीपर्यंतच. त्या दिवशी आमच्यातलाच एक दादा मुलगा (म्हणजे 'भाई' वाला नाही 'वयाने मोठा' वाला) जोरदार आपटला आणि तेही डोक्यावर. क्षणभर आम्ही सगळे एकदम सुन्न. २ मिनिटांनी तो उठून बसला आणि मनमोहन देसाई किंवा यश चोपडाच्या चित्रपटातले कॅरॅक्टर अॅक्टर्स ज्या थंडपणे म्हणतात अगदी त्याच थंडपणे "मै कहां हुं" चं मराठी व्हर्जन वदता झाला "काय झालंय मला?". आमची तर बोबडीच वळली. थोड्या वेळाने इतर दादा लोकांनी त्याला जरा सावकाश उठवून बसवलं. पाणीबिणी पाजलं आणि हळूहळू त्याला माणसांत आणलं.
तर टेंगळाच्या असं विरुद्ध दिशेने चालत चालत येताना असे बरेच बोचरे, टोचरे, निसरडे, धडपडे, भिजवे, चिखले, चिकटे, कपडे-खराब-करे, पाणी-उडवे, छत्री-उलटे, छत्री-विसरे, विंचीटर-हरवे, ट्रेक-कोरडे, कॉलेजात/हापिसात-पोचल्यावर-ट्रेन-बंद-पडे, बिन-लाईटे, घरभर-पाणी-भरे असे अनेकानेक अनुभव आहेत. पण सगळे देत बसलो तर कंटाळून तुम्ही त्या वरच्या 'X' च्या खुणेवर टिचकी माराल. म्हणून फक्त ओझरतं सांगितलं. आता सांगा मला का बरं आवडावा पाऊस एखाद्याला? सांगा.. !! एक तरी कारण द्या. पण नाही. त्या पावसाच्या भीतीने कोणी काही बोलत नाही. जसं "शेर कळत नाहीत" किंवा "गझला आवडत नाहीत" म्हंटल्यावर जसा एक तुच्छ कटाक्ष नशिबी येतो त्याप्रमाणे "मला पाऊस आवडत नाही" म्हंटल्यावर त्या तु.क. ची सर धावून येते. त्यामुळे शेवटी ते तु.क. चुकवण्यासाठी (आम्हालाही माणूस म्हणून जगू द्या !!! ;) ) शेवटी 'पाऊस आवडण्याची' मी एक माझ्यापुरतीच नियमावली काढली. मागे मैथिलीच्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देताना ती नियमावली लिहिली होतीच. अर्थात त्यात सगळे नियम कव्हर झाले नव्हते कदाचित. तीच नियमावली अजून थोडे नियम वाढवून इकडे देतो.
१. रात्री ११ ते सकाळी ६ मधेच पडावा. : उगाच दिवसा लुडबुड नको. गाड्या लेट होतात, रस्त्यावर पाणी साठतं, चिखल होतो, छत्र्या उडतात/हरवतात.
२. सगळ्या शेतांवर आणि धरणांवर जोरदार बरसावा. कधीही आणि कुठल्याही वेळी चालेल. आमची काही ना नाही. परंतु उगाच रस्त्यांवर पडून चिखल व्हायला नको. : "अरे पाऊस पाडला नाही तर आपण खाणार काय? शेती होणार नाही, धरणांत पाणी साठणार नाही, प्यायला पाणी मिळणार नाही" असा उपदेश माँसाहेबांकडून लहानपणी मिळाल्यावर या नियमाची निर्मिती केली गेली.
३. ट्रेकला गेलो असलो की दिवसभर नॉनस्टॉप पडावा. : स्पष्टीकरणाची गरज नाही.
४. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एकेकदा इतका पडावा की गाड्या बंद पडतील. : तेवढीच मस्त सुट्टी. कारण आयत्या वेळी म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी मिळालेल्या/घेतलेल्या सुट्टीची मजा 'प्लान्ड लिव्ह' मध्ये नाही.
५. वरच्या अटीतला पाऊस सोमवारीच पडावा. किंवा फार तर शुक्रवारी. : लॉंग वीकांत !! तुका म्हणे त्यातल्या त्यात..
तळटीप : लेखात दिलेली सर्व मतं ही लेखकाची लेख लिहीत असतानाच्या मानसिक अवस्थेतील मते आहेत आणि त्या सर्व मतांशी लेखक आत्ता म्हणजे लेख लिहून झाल्यावर सहमत असेलच असे नाही याची कृपया नोंद घ्यावी. परंतु काहीही झाले तरीही लेखकाला पाऊस आवडत नाही (उन्हाळ्यात सोडून) हे मात्र नक्की. !!!

Thursday, June 10, 2010
प्रतिक्रिया न देण्याच्या लायकीची पोस्ट उर्फ 'लाउड थिंकिंग'
कधी कधी होतं काय माहित्ये ? ब्लॉग एकदम मंदावून जातो. मंदावून कसला. किंबहुना निपचित पडतो, उसासे टाकतो, कण्हायला लागतो. काही म्हणजे काही हालचाल होत नाही तिथे. इतका म्हणजे इतका आळसटलेला, ढिम्म, मंद, हतबल झालेला असतो ना की घरपानावरून (होमपेज) उंदीर फिरवला तरी शेवटच्या पोस्टची धूळ चिकटते उंदराच्या पायांना. इतSSSSका मंद. वर्षानुवर्षं साफ न केलेल्या किंवा गृहिणीचा हात न फिरलेल्या एखाद्या ओसाड घरासारखा. (इथे 'वर्षानुवर्षं'चा अर्थ आठवडानुआठवडं आणि 'गृहिणी'चा अर्थ ब्लॉगर पक्षि मी स्वतः असा घ्यावा हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. (परंतु ज्यांनी ओळखले नाहीये त्यांच्यासाठी मुद्दाम कंसांची योजना केली आहे.) )
बरं निपचित पडलाय तर त्याची कारणं काय? तर नेहमीचीच.. विशेष वेगळी नाहीत. ठराविकच म्हणा हवं तर किंवा घासून गुळगुळीत झालेली म्हणा. काय म्हणताय त्याने फरक पडत नाही. परिणाम एकच. ब्लॉगच्या तोंडावरची माशी हलत नाही. तर या माशीची म्हणजे माशी न हलण्याची ठराविक, घागु झालेली काही कारणं.
१. काही न सुचणे. अगदी काहीच काहीच न सुचणे. टोट्टाल ब्लँक. ब्लॉगर म्हणून नव्हे तर एक नागरिक, समाजप्रिय माणूस, सजग व्यक्ती या नात्याने हे कारण म्हणजे धोक्याची घंटाच. आपल्या आजूबाजूला एवढ्या चांगल्या, उत्तम, बर्या, टाकाऊ, वाईट, दु:खद घटना घडताहेत आणि त्याबद्दल आपल्याला आपलं मत नाही? हे फारच भयंकर. ब्लॉग लिहीत नसलात तर काही हरकत नाही. कारण तुमचे व्यक्त होण्याचे मार्ग वेगळे आहेत असं आपण समजू शकतो. पण ब्लॉग/डायरी/कविता असं काहीकाही लिहिताय तरी ब्लॉगवर पोस्ट टाकायला किंवा नवीन कविता करायला विषय मिळत नसेल तर भयानक अवस्था. आपण आपल्या आवरणात, कोषात नको तेवढे गुंतलो आहोत, आजूबाजूला, सभोवताली काय घडतंय ते बघायची, जाणून घेण्याची इच्छा आणि शक्ती दोन्ही मारून गेलंय आपलं. उठा.. बेसिनसमोर उभं राहून गार गार पाण्याचे ८-१० हबके मारा. जागे व्हा, उठा, जागृत व्हा, जागरूक व्हा.. डोळ्यासमोर (आणि डोक्यातही) आलेला मरगळीचा पदर हरवला, नाहीसा झाला, आसपासचं दिसू लागलं तर मग तुमचा हा आजार भयानक स्वरूपाचा नव्हता हे निश्चित. आता बघा आपोआप सगळ्या बातम्या दिसायला लागतील. युनियन कार्बाईडचा अमानुषपण, न्यायालयाने स्वतःच उडवलेली कायदा आणि न्यायव्यवस्थेची खिल्ली, क्रीडामंत्र्यांनी आपलं सॉरी कृषिमंत्र्यांनी ताशी एक या गतीने उलटसुलट फिरवलेली विधानं, अतिरेकी, नक्षलवादी, माओवादी आणि असेच अजून कुठल्या कुठल्या 'वादां'चे बुरखे पांघरलेली अमानुष/भीषण/क्रूर या शब्दांना निरर्थक आणि निस्तेज करून टाकणारी श्वापदं. अर्थात हेच दिसावं/दिसेल/लिहावं असा अट्टाहास नाही. इतरही काही गोष्टी दिसतील ज्या आपल्या थेट जीवनमरणाशी निगडीत नसतील. तुलनेने कमी त्रासाच्या असतील. जाऊदे. भरकटायला नको जास्त. मुद्दा हा की बरंच काही चांगलं/वाईट घडतंय आजूबाजूला. डोळे, मन आणि लॅपटॉप उघडा असला की झालं.
सुदैवाने क्रमांक १ चं कारण लागू होत नाहीये मला. का ते क्रमांक २ मध्ये सांगतो.
२. दुसरं कारण असतं की हे सगळं आपल्याला दिसत असतं. आपण विदीर्ण होत असतो/आनंदी होत असतो. नवीन मुद्दे सुचत असतात. त्यांच्या आपण नोंदी करतो मनातल्या मनात. टिपणं काढून ठेवतो मेंदूत कुठेतरी. त्या सगळ्या नोंदी/टिपणं मग ब्लॉगवर येतात ड्राफ्ट मोड मध्ये. पण झालं.. इथेच कुठेतरी माशी शिंकते, घोडं पेंड खातं. एवढे विषय, मुद्दे, गप्पा, कथा, कविता अर्धवट तयार असतात.
पण आयत्या वेळी 'पावसात भिजायला गेलेल्या चिमुरड्याने पाऊस वाढला तरी घरात न येत हटवादीपणे बाहेरच रहावं' तसा हटवादीपणा करत ते मुद्दे, त्या अर्धवट पोस्ट्स पूर्णत्वाला येताना मात्र हटवादीपणा करतात. म्हणजे अर्धवट अर्धवट अवस्थेत ८-१०-१२ लेख तयार असतात. पण प्रत्यक्षात हातात काय तर शून्य. आधीची पोस्ट लिहून कित्येक दिवस सरलेले असतात आणि सरतही असतात. पण पोस्ट्सची संख्या मात्र आहे तेवढीच. हा प्रत्यक्षात उतरवणं, व्यक्त होणं हा प्रकार जमला पाहिजे खरंतर. आणि तोही जास्त वेळ न घेता.
तर हे दुसरं कारण लागू होतंय मला. अनेक अर्धवट पोस्ट्स पडल्या आहेत अपूर्णावस्थेत. पण मेंदू शिंचा साथ देत नाही.
अजूनही एक कारण आहे. सगळ्यांत लोकप्रिय. उपरोध नाही. खरंच.. आयची आन.. सगळ्यांत लोकप्रिय, सगळ्यांचं लाडकं-आवडतं, सगळ्यांत सुयोग्य, सगळ्याचंच असणारं, नेहमीचंच आणि अगदी खरं...
३. तर हे सगळ्यांचं लाडकं असलेलं कारण म्हणजे "वेळ नसणे". वेळ, वक्त, टाईम, समय.. कसा वेळ जातो तेच कळत नाही. अनेक गोष्टी, मुद्दे ब्लॉगवर टाकायचे असतात. पण वेळच मिळत नाही. आणि कधीतरी जागून किंवा वीकांताला लिहावं म्हटलं तर तोवर तो विषय एवढा जुना होऊन जातो की बर्याच ब्लॉग आणि वर्तमानपत्रं यातही तो येऊन गेलेला असतो. त्यामुळे लिहिला जात नाही. आणि पुन्हा सोमवारपासून तेच ते "वेळ नाही" वालं चक्र चालू होतं आणि चालूच रहातं.
वर म्हटलं तसं माझं कारण मधलं आहे. चला ब्लॉग न लिहिण्याच्या कारणांमध्येही मध्यमवर्गीय आहे हे बघून बरं वाटलं ;)
मी काय लिहितोय, काय बडबडतोय, काय टंकतोय मलाच माझं काही कळत नाहीये. मागे कोणीतरी म्हणालं होतं त्याप्रमाणे फुकट जागा मिळाली आहे म्हणून टाका काहीतरी असं वाटत असेल हे. हो. यावेळी तरी हे असंच आहे. काही सुचत नाही, सुचलेलं उतरत नाही आणि ते का उतरत नाही याचं जरा लाउड थिंकिंग करत होतो आणि तेच मग पोस्टमध्ये उतरवलं. ही पोस्ट प्रतिक्रिया मिळण्याच्या लायकीची नाही. त्यामुळे प्रत्येक प्रतिक्रिया म्हणजे बोनस आहे. तरीही प्रतिक्रिया आल्याच तर ते माझं नशीब आणि तुमचा विनय झाला... !!!

Wednesday, June 2, 2010
माझे देव-दिलीप-राज
अतिशय मुख्य सूचना : हा संपूर्ण लेख आणि त्यातली मतं ही माझ्या दृष्टीने लिहिलेली आहेत. अनेक विधानं अनेकांना पटणार नाहीत. जे जे विधान पटत नाहीये त्याच्या सुरुवातीला "माझ्या दृष्टीने" किंवा "माझ्या मते" असे लिहून वाचावे. बाकी,
१. गजनी, रंग दे बसंती, लगान, जोधा अकबर, कमीने, भूत अप्रतिम/टाकाऊ आहे.
२. लता, हिमेश, आशा, अलका, सोनू, श्रेया यांना पर्याय नाही/यांच्याएवढ्या एकांगी गाणारं कोणी नाही.
३. करण जोहर, राजकुमार संतोषी, राजकुमार हिरानी, रामू, विक्रम भट्ट यांच्यासारखा दिग्दर्शक होणे नाही/यांचे मेंदू गुडघ्यात आहेत
ही आणि अशी इतर अनेक वाक्यं आपण वेळोवेळी ऐकतोच. त्या प्रत्येकाला "माझ्या दृष्टीने" किंवा "माझ्या मते" चा प्रिफिक्स लावला की सगळी कोडी सुटतात आणि सगळ्या शंका मिटतात :)
**
मला कळायला लागल्यापासून जेव्हा जेव्हा मी वाचन (अर्थात अवांतर) करतोय तेव्हापासून मला एक लक्षात यायला लागलं होतं की चित्रपट, संगीत, दिग्दर्शन, अभिनय यातलं काहीही कणभरही करता आलं नाही तरीही या सगळ्या गोष्टींसंबंधी जे जे मिळेल ते ते सगळं वाचून काढण्याची आपल्याला जबरदस्त आवड आहे हे मात्र नक्की. आणि त्यासाठी हिंदी/मराठी चित्रपटच हवेत अशी काही सक्ती नव्हती. हॉलिवूड किंवा जगभरातल्या विविध भाषांमध्ये निर्माण होणारे कुठल्याही चांगल्याचुंगल्या चित्रपटांबद्दल काहीही वाचायला मला आवडायचं. माझ्या लहानपणी चित्रपट विषयावर निघणार्या जरातरी दर्जेदार मासिक/पाक्षिकांमध्ये जी, चंदेरी (बाकीची आता आठवत नाहीत) ही काही आघाडीची नावं. त्यांच्या दिवाळी अंकांवर तर मी तुटून पडायचो. बाबा कधी एकदा दिवाळी अंक आणतायत आणि कधी एकदा मी त्यावर तुटून पडून, त्यांचं पान न् पान वाचून काढून त्यांचा फडशा पाडतो असं व्हायचं मला. तर असेच अनेक लेख वाचताना वारंवार ज्यांच्या नावांचा उल्लेख व्हायचा ते त्रिदेव म्हणजे देव-राज-दिलीप, राज-दिलीप-देव, दिलीप-देव-राज.. क्रम वेगवेगळा पण नावं तीच. लेख लिहिणार्या व्यक्तीच्या आवडीनिवडीप्रमाणे क्रम बदलत असतील कदाचित पण नावं तीच. तर अशा रीतीने या तिघांचे विशेष चित्रपट न बघताही (कारण आमच्या घरात "चित्रपट-बघणे" यासाठीचं पोषक वातावरण नव्हतं :) ) मी त्यांचा पंखा झालो. माझ्या वयाच्या इतर अनेकांसाठी असणारा देव आनंद माझ्यासाठी देव होता, राज कपूर राज होता आणि दिलीप कुमार हाही असाच दिलीप. कालांतराने त्यांचे चित्रपट बघितल्यावर दिलीप सदैव (म्हणजे अगदी त्याच्या तरुणपणीही) म्हातारा दिसत असल्याने ('अतिशय मुख्य सूचना' वाचणे) पुन्हा दिलीप कुमार झाला आणि राज सदैव बावळट/मंद दिसत असल्याने ('अतिशय मुख्य सूचना' विसरू नका) पुन्हा राज कपूर झाला. पण अभिनयाची वेगळी शैली, एका श्वासात सगळाच्या सगळा संवाद, मग तो कितीका मोठा असेना, म्हणण्याची लकब, सतत हात हलवत हलवत बोलण्याची स्टाईल, आणि डोळ्यातले मिश्कील भाव यामुळे बालपणी मासिकांतून भेटलेला देव मोठेपणी त्याचे अनेक चित्रपट बघितल्यावरही 'देव'च राहिला त्याचा 'देव आनंद' झाला नाही.
"जिया ओ SSS जिया ओ जिया कुछ बोल दो","फुलोंके रंग से दिल की कलम से", "मै जिंदगी का साथ निभाता चला गया", "दिल का भंवर करे पुकार " म्हणत नूतन बरोबर कुतुब मिनार उतरणारा देव हे सगळं दिग्दर्शक सांगतोय म्हणून नाही तर स्वतः, खरोखर, मनापासून, आतून, नॅच्युरली, सहजतेने करतोय असं वाटायचं आणि पटायचंही. अर्थात कालांतराने उतरत उतरत देव किती खाली गेला त्याचा हिशोब मांडायचा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही. तर माझ्या आधीच्या पिढीला स्वप्नांच्या मनोहारी राज्यात भुलवून, भुरळ पाडून आपल्या असामान्य अभिनयाने त्यांच्या मनावर काही दशकं राज्य करणार्या त्रिदेवांचे आजच्या काळातले किंवा अगदी आत्ताच्या काळातले नाही तरी गेल्या वीस वर्षांतले उत्तराधिकारी कोण असं मला कोणी विचारलं तर मी क्षणाचाही विलंब न करता सांगू शकेन की आजच्या काळातले ते तिघेजण म्हणजे अनिल, अजय आणि नाना. ते कपूर, देवगण, पाटेकर विसरून कैक वर्षं झाली. मित्राला कधी पूर्ण नावाने हाक मारतं का कोणी? सचिनला सचिनच म्हणायचं उगाच सचिन तेंडूलकर कशाला..? तसंच हे.
तर या तिघांची आपापली शैली आहे. अभिनय, संवादफेक, चालणं, बोलणं, सरसर बदलणारे हावभाव, देहबोली, भावनांचं प्रकटीकरण या सगळ्या सगळ्याची प्रत्येकाची एक विशिष्ट शैली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जब्बरदस्त ताकदीचा अभिनय. कमालीचा सशक्त. कालपरवाचे जॉन अब्राहम, सैफ, अक्षय (कुठलाही घ्या काय फरक पडतोय.. किंवा चला दोन्ही घ्या), विवेक, सुनील, शहीद, संजूबाबा, अनेक वेळेला शाहरुख, क्वचित काही वेळेला आमीर (वाचा वाचा 'अतिशय मुख्य सूचना'), दर वेळेला सलमान, या सगळ्यांत आणि अनिल-अजय-नाना या तिघांत आढळणारा हा महत्वाचा फरक. आता यांचे किती चित्रपट फ्लॉप झालेत, त्या चित्रपटातला तो प्रसंग, शेवट, सुरुवात, मध्य, गाणी, वगैरे कसे फालतू आहेत वगैरे सांगण्यात काही अर्थ नाही. निदान इथेतरी.. कारण ते गैरलागूच नाही तर चूक आहे. चित्रपटाचा सर्वेसर्वा हा दिग्दर्शक असतो त्यामुळे एखादा प्रसंग, त्यांची लांबी, सत्यासत्यता, आणि चित्रपटाचं एकूणच यश या सगळ्याची संपूर्ण जवाबदारी दिग्दर्शकाची असते. (टी-२० मध्ये ओव्हररेट कमी झाला की कप्तानाच्या मानधनातून पैसे कापून घेतात ना तसंच हे.). आणि या तिघांचे कुठलेही चित्रपट कितीही अयशस्वी झाले असले तरी त्या अपयशाचा कर्ता करविता, त्या मुर्ख प्रसंगांचा आणि कथारहित चित्रपटांचा धनी कोणीतरी वेगळा होता.. निदान या तिघांचा अभिनय हे कारण तर कधीच नव्हतं. उलट टुक्कारातल्या टुक्कार चित्रपटातही या तिघांचेही अभिनय नेहमीप्रमाणेच सर्वोच्च दर्जाचे आहेत. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी आलेला नानाचा 'एक' हा चित्रपट. अतिशय भिकार चित्रपट पण त्याच्या वाट्याला आलेल्या जेमतेम ४-५ प्रसंगांतून त्याने तो चित्रपट चित्रपटगृहात किमान एक आठवडा तरी चालेल याची दक्षता घेतली. अन्यथा बॉबी देओलने तो चित्रपट पहिल्या खेळालाच खड्ड्यात घालण्याची पुरेपूर तयारी केली होती. अनिलचा 'मुसाफिर' किंवा अजयचा 'कयामत'ही त्याच पठडीतले. या लोकांच्या बळावरच या चित्रपटांचा मान टाकण्याचा कालावधी निदान काही आठवड्यांनी तरी पुढे ढकलला गेला.
खरं तर हा लेख लिहायला सुरुवात करताना मी या तिघांवर वेगवेगळं लिहिण्याचं ठरवलं होतं परंतु अभिनयक्षमता, स्टाईल, भूमिकांमधील विविधता, संवादफेक, प्रसंग रंगवण्याची हातोटी हे सगळे गुण या तिघांत एवढे सामाईक आहेत की प्रत्येकाविषयी लिहिताना पुनरुक्तीचा दोष माथी आला असता. त्यामुळे तो टाळून सगळ्यांवर एकत्रच लिहिण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करतो.

अप्रतिम अभिनयक्षमता आणि अतिशय उस्फुर्त व बोलके हावभाव या महत्वाच्या गुणांबरोबरच या तिघांनाउत्तमरित्या साधलेलं कसब म्हणजे भूमिकेत झोकून देणं. 'गंगाजल'मध्ये कायदा हातात घेणार्यांना शासन करणारा, बाणेदारपणे, ऐटीत चालत जाणारा एसपी अमित कुमार असो की 'जख्म'मध्ये जातीय दंगलींमध्ये असहायपणे लढणारा गायक अजय असो (या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे), स्वार्थापायी आणि पैशासाठी खून पाडत प्रसंगी आपल्या प्रेयसीलाही शत्रूच्या गोळीला बळी पडू देणारा 'खाकी' मधला यशवंत आंग्रे असो की आपल्या पत्नीची तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी भेट घडवून आणण्यासाठी धडपड करणारा 'हम दिल दे चुके' मधला विवश नवरा वनराज... 'पुकार' मध्ये देशासाठी जीवाची बाजी लावायला तयार असणारा मेजर जयदेव असो की 'बेटा' मधला आपल्या आईसाठी जीव द्यायला तयार असणारा भोळसट राजू, आपल्या मुलाला शोधण्यासाठी जीवाचं रान करणारा 'कॅलकटा मेल' मधला अविनाश असो की बलात्कारीत तरुणीला आपल्या घरात आश्रय देणारा 'हमारा दिल आपके पास है' मधला अविनाश ... "किसीको तो ये कचरा साफ करना पडेगाहीच ना" असं म्हणत दणादण एन्काऊन्टर्स करणारा 'अब तक ५६' वाला इन्स्पेक्टर साधू आगाशे असो की आग दिसली की आपल्या अपराधीपणाची भावना जागृत होऊन फटाफटा डोक्यावर हात मारून घेणारा 'परिंदा' मधला अन्ना असो, बायकोचा पाठलाग करत तिला मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारा 'अग्निसाक्षी' मधला विश्वनाथ असो की अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा 'अंकुश' मधला रवी असो.. हे सर्वजण त्या त्या वेळेला एसपी अमित कुमार, वनराज, राजू, मेजर जयदेव, अन्ना, इन्स्पेक्टर साधू आगाशेच वाटतात. त्यांच्यातून कधीही अजय, अनिल किंवा नाना डोकावत नाहीत की त्यांचा सूक्ष्मसा मागमूसही दिसत नाही हे त्यांचं प्रमुख यश. इतके की सस्पेंड झालेल्या एसपी अमित कुमारला न्याय मिळाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, वनराजची तगमग आपल्याला पाहवत नाही आणि कितीही लाडकी असली (आठवा 'अतिशय मुख्य सूचना') तरी ऐश्वर्याचा राग आल्याशिवाय रहात नाही, हा राजू एवढा मंद कसा असा प्रश्न पडतो आणि मेजर जयदेव क्लॉक टॉवरच्या दोलकावरून माधुरीला हात देऊन उतरवेपर्यंत आपल्या जीवात जीव येत नाही, शेवटी जॅकीने अन्नाला जाळून मारल्यावरच आपल्या जीवाची तगमग शांत होते आणि साधू आगाशेने जमीरच्या गोटात घुसून त्याला ठार मारल्यावर आपण मनोमन साधूला सलाम ठोकतो.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत किंवा अनेकदा वेगळ्या भूमिका, वेगळे चित्रपट करूनही वेगळं करूनही यांनी कधी त्याचे डिंडिम पिटले नाहीत. उगाच कशाची (अनावश्यक) प्रसिद्धी नाही की कसला गाजावाजा नाही. कधी उगाचच दिग्दर्शनात ढवळाढवळ केल्याचं ऐकिवात नाही की स्वतःला बुद्धिवादी आणि परफेक्शनिस्ट म्हणवून घेण्याचा किंवा स्वतःला ब्रांड म्हणून सादर करण्याचा वृथा अट्टाहास बाळगला नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे (सुरुवातीचा काळ वगळता) निवडक चित्रपटच स्वीकारले. उगाच चलती आहे म्हणून भारंभार चित्रपट साईन केले नाहीत की उगाचच वर्षातून फक्त एक म्हणजे एकच चित्रपट करायचा असे दंडक वगैरे घालून घेतले नाहीत. दर वेळी अगदी वेगळ्याच भूमिका केल्यात असंही नाही पण चाकोरीबद्धपणा, तोचतोचपणा शक्यतो टाळायचा प्रयत्न केला. अर्थात त्यांचे सगळेच्या सगळे चित्रपट दरवेळी दणदणीत यशस्वी झालेच असं मुळीच नाही. चिक्कार चित्रपटांनी दणदणीत मारही खाल्ला. पण आधी म्हंटल्याप्रमाणे त्याचं कारण यांचा अभिनय होता असं कधीच झालं नाही.
तसंच स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याचा अट्टाहास नाही किंवा पत्रकार/पुरस्कार सोहळे मॅनेज करण्याची कला आणि इच्छा नाही त्यामुळे ढीगाने अॅवार्डस नाहीत. पण अर्थात त्यामुळे अॅवार्डस फंक्शन्सवर कधी बहिष्कार घातल्याचं स्मरत नाही किंवा उगाच सगळ्याच फंक्शन्स आणि पार्ट्यांना हजेर्या लावत सुटलेत असंही कधी झालं नाही. उगाच डझनावारी मासिकांच्या मुखपृष्ठांवर चमकणं नाही की पहिल्या स्थानासाठी कधी चुरस नाही. पीत प्रसिद्धीचा आधार घेत आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला हातभार लावण्याचे प्रकार नाहीत की उगाच अनाठायी वाद ओढवून घेऊन प्रसिद्धीचे झोत आपल्याकडे वळवून घेण्याची व्यर्थ खटपट नाही. अभिनय करणं आपलं काम आहे हे ओळखून, स्वतःच्या मर्यादा/व्याप्ती लक्षात घेऊन आपल्या परिघात राहून सतत उत्तमोत्तम भूमिका (दरवेळीच चित्रपट नव्हे) देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र केला आणि अजूनही करताहेत.
पण हल्ली उगाचच प्रयोगशीलतेच्या/वेगळेपणाच्या नावावर प्रेक्षकांना निर्बुद्ध समजून त्यांच्यावर मल्टिप्लेक्सी चित्रपटांचा मारा करण्याचं जे सत्र चालू आहे ते पाहून या त्रिदेवांचे जातीचे अभिनय बघायला मिळण्याचं प्रमाण फार कमी होतंय. अभिनय कशाशी खातात हे ठाऊक नसलेल्यांच्या या भाऊगर्दीत जातिवंत अभिनयाचा गळा घोटला जाण्याचीच शक्यता अधिक. तसंही अजयचा अपवाद वगळता बाकीच्या दोघांचं वय आता उतरणीला लागलं असल्याने (नाना : ५९, अनिल : ५१, अजय : ४१) हे केंद्रस्थानी असलेल्या भूमिका बघायला मिळणं कठीण आहेच आणि उत्तरोत्तर ते अजूनच अवघड होत जाणार. त्यामुळे यांचे उतरणीला लागलेले देव आनंद, दिलीप कुमार होण्यापेक्षा सदैव आपल्या नजरेतले 'देव-दिलीप-राज'च राहोत ही सदिच्छा !!!
जाता जाता : असाच विचार करत असताना हॉलीवुडातले माझे देव-दिलीप-राज कोण याचं उत्तर शोधत होतो. पण नंतर लक्षात आलं की हॉलीवुडात (माझ्यासाठी) दिलीप-राज नाहीतच. आहे तो फक्त देवच आणि त्याचं नाव टॉम हॅन्क्स !!!
-- सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.
१. गजनी, रंग दे बसंती, लगान, जोधा अकबर, कमीने, भूत अप्रतिम/टाकाऊ आहे.
२. लता, हिमेश, आशा, अलका, सोनू, श्रेया यांना पर्याय नाही/यांच्याएवढ्या एकांगी गाणारं कोणी नाही.
३. करण जोहर, राजकुमार संतोषी, राजकुमार हिरानी, रामू, विक्रम भट्ट यांच्यासारखा दिग्दर्शक होणे नाही/यांचे मेंदू गुडघ्यात आहेत
ही आणि अशी इतर अनेक वाक्यं आपण वेळोवेळी ऐकतोच. त्या प्रत्येकाला "माझ्या दृष्टीने" किंवा "माझ्या मते" चा प्रिफिक्स लावला की सगळी कोडी सुटतात आणि सगळ्या शंका मिटतात :)
**
मला कळायला लागल्यापासून जेव्हा जेव्हा मी वाचन (अर्थात अवांतर) करतोय तेव्हापासून मला एक लक्षात यायला लागलं होतं की चित्रपट, संगीत, दिग्दर्शन, अभिनय यातलं काहीही कणभरही करता आलं नाही तरीही या सगळ्या गोष्टींसंबंधी जे जे मिळेल ते ते सगळं वाचून काढण्याची आपल्याला जबरदस्त आवड आहे हे मात्र नक्की. आणि त्यासाठी हिंदी/मराठी चित्रपटच हवेत अशी काही सक्ती नव्हती. हॉलिवूड किंवा जगभरातल्या विविध भाषांमध्ये निर्माण होणारे कुठल्याही चांगल्याचुंगल्या चित्रपटांबद्दल काहीही वाचायला मला आवडायचं. माझ्या लहानपणी चित्रपट विषयावर निघणार्या जरातरी दर्जेदार मासिक/पाक्षिकांमध्ये जी, चंदेरी (बाकीची आता आठवत नाहीत) ही काही आघाडीची नावं. त्यांच्या दिवाळी अंकांवर तर मी तुटून पडायचो. बाबा कधी एकदा दिवाळी अंक आणतायत आणि कधी एकदा मी त्यावर तुटून पडून, त्यांचं पान न् पान वाचून काढून त्यांचा फडशा पाडतो असं व्हायचं मला. तर असेच अनेक लेख वाचताना वारंवार ज्यांच्या नावांचा उल्लेख व्हायचा ते त्रिदेव म्हणजे देव-राज-दिलीप, राज-दिलीप-देव, दिलीप-देव-राज.. क्रम वेगवेगळा पण नावं तीच. लेख लिहिणार्या व्यक्तीच्या आवडीनिवडीप्रमाणे क्रम बदलत असतील कदाचित पण नावं तीच. तर अशा रीतीने या तिघांचे विशेष चित्रपट न बघताही (कारण आमच्या घरात "चित्रपट-बघणे" यासाठीचं पोषक वातावरण नव्हतं :) ) मी त्यांचा पंखा झालो. माझ्या वयाच्या इतर अनेकांसाठी असणारा देव आनंद माझ्यासाठी देव होता, राज कपूर राज होता आणि दिलीप कुमार हाही असाच दिलीप. कालांतराने त्यांचे चित्रपट बघितल्यावर दिलीप सदैव (म्हणजे अगदी त्याच्या तरुणपणीही) म्हातारा दिसत असल्याने ('अतिशय मुख्य सूचना' वाचणे) पुन्हा दिलीप कुमार झाला आणि राज सदैव बावळट/मंद दिसत असल्याने ('अतिशय मुख्य सूचना' विसरू नका) पुन्हा राज कपूर झाला. पण अभिनयाची वेगळी शैली, एका श्वासात सगळाच्या सगळा संवाद, मग तो कितीका मोठा असेना, म्हणण्याची लकब, सतत हात हलवत हलवत बोलण्याची स्टाईल, आणि डोळ्यातले मिश्कील भाव यामुळे बालपणी मासिकांतून भेटलेला देव मोठेपणी त्याचे अनेक चित्रपट बघितल्यावरही 'देव'च राहिला त्याचा 'देव आनंद' झाला नाही.
"जिया ओ SSS जिया ओ जिया कुछ बोल दो","फुलोंके रंग से दिल की कलम से", "मै जिंदगी का साथ निभाता चला गया", "दिल का भंवर करे पुकार " म्हणत नूतन बरोबर कुतुब मिनार उतरणारा देव हे सगळं दिग्दर्शक सांगतोय म्हणून नाही तर स्वतः, खरोखर, मनापासून, आतून, नॅच्युरली, सहजतेने करतोय असं वाटायचं आणि पटायचंही. अर्थात कालांतराने उतरत उतरत देव किती खाली गेला त्याचा हिशोब मांडायचा प्रस्तुत लेखाचा हेतू नाही. तर माझ्या आधीच्या पिढीला स्वप्नांच्या मनोहारी राज्यात भुलवून, भुरळ पाडून आपल्या असामान्य अभिनयाने त्यांच्या मनावर काही दशकं राज्य करणार्या त्रिदेवांचे आजच्या काळातले किंवा अगदी आत्ताच्या काळातले नाही तरी गेल्या वीस वर्षांतले उत्तराधिकारी कोण असं मला कोणी विचारलं तर मी क्षणाचाही विलंब न करता सांगू शकेन की आजच्या काळातले ते तिघेजण म्हणजे अनिल, अजय आणि नाना. ते कपूर, देवगण, पाटेकर विसरून कैक वर्षं झाली. मित्राला कधी पूर्ण नावाने हाक मारतं का कोणी? सचिनला सचिनच म्हणायचं उगाच सचिन तेंडूलकर कशाला..? तसंच हे.
तर या तिघांची आपापली शैली आहे. अभिनय, संवादफेक, चालणं, बोलणं, सरसर बदलणारे हावभाव, देहबोली, भावनांचं प्रकटीकरण या सगळ्या सगळ्याची प्रत्येकाची एक विशिष्ट शैली आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जब्बरदस्त ताकदीचा अभिनय. कमालीचा सशक्त. कालपरवाचे जॉन अब्राहम, सैफ, अक्षय (कुठलाही घ्या काय फरक पडतोय.. किंवा चला दोन्ही घ्या), विवेक, सुनील, शहीद, संजूबाबा, अनेक वेळेला शाहरुख, क्वचित काही वेळेला आमीर (वाचा वाचा 'अतिशय मुख्य सूचना'), दर वेळेला सलमान, या सगळ्यांत आणि अनिल-अजय-नाना या तिघांत आढळणारा हा महत्वाचा फरक. आता यांचे किती चित्रपट फ्लॉप झालेत, त्या चित्रपटातला तो प्रसंग, शेवट, सुरुवात, मध्य, गाणी, वगैरे कसे फालतू आहेत वगैरे सांगण्यात काही अर्थ नाही. निदान इथेतरी.. कारण ते गैरलागूच नाही तर चूक आहे. चित्रपटाचा सर्वेसर्वा हा दिग्दर्शक असतो त्यामुळे एखादा प्रसंग, त्यांची लांबी, सत्यासत्यता, आणि चित्रपटाचं एकूणच यश या सगळ्याची संपूर्ण जवाबदारी दिग्दर्शकाची असते. (टी-२० मध्ये ओव्हररेट कमी झाला की कप्तानाच्या मानधनातून पैसे कापून घेतात ना तसंच हे.). आणि या तिघांचे कुठलेही चित्रपट कितीही अयशस्वी झाले असले तरी त्या अपयशाचा कर्ता करविता, त्या मुर्ख प्रसंगांचा आणि कथारहित चित्रपटांचा धनी कोणीतरी वेगळा होता.. निदान या तिघांचा अभिनय हे कारण तर कधीच नव्हतं. उलट टुक्कारातल्या टुक्कार चित्रपटातही या तिघांचेही अभिनय नेहमीप्रमाणेच सर्वोच्च दर्जाचे आहेत. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी आलेला नानाचा 'एक' हा चित्रपट. अतिशय भिकार चित्रपट पण त्याच्या वाट्याला आलेल्या जेमतेम ४-५ प्रसंगांतून त्याने तो चित्रपट चित्रपटगृहात किमान एक आठवडा तरी चालेल याची दक्षता घेतली. अन्यथा बॉबी देओलने तो चित्रपट पहिल्या खेळालाच खड्ड्यात घालण्याची पुरेपूर तयारी केली होती. अनिलचा 'मुसाफिर' किंवा अजयचा 'कयामत'ही त्याच पठडीतले. या लोकांच्या बळावरच या चित्रपटांचा मान टाकण्याचा कालावधी निदान काही आठवड्यांनी तरी पुढे ढकलला गेला.
खरं तर हा लेख लिहायला सुरुवात करताना मी या तिघांवर वेगवेगळं लिहिण्याचं ठरवलं होतं परंतु अभिनयक्षमता, स्टाईल, भूमिकांमधील विविधता, संवादफेक, प्रसंग रंगवण्याची हातोटी हे सगळे गुण या तिघांत एवढे सामाईक आहेत की प्रत्येकाविषयी लिहिताना पुनरुक्तीचा दोष माथी आला असता. त्यामुळे तो टाळून सगळ्यांवर एकत्रच लिहिण्याचा अल्पस्वल्प प्रयत्न करतो.

अप्रतिम अभिनयक्षमता आणि अतिशय उस्फुर्त व बोलके हावभाव या महत्वाच्या गुणांबरोबरच या तिघांनाउत्तमरित्या साधलेलं कसब म्हणजे भूमिकेत झोकून देणं. 'गंगाजल'मध्ये कायदा हातात घेणार्यांना शासन करणारा, बाणेदारपणे, ऐटीत चालत जाणारा एसपी अमित कुमार असो की 'जख्म'मध्ये जातीय दंगलींमध्ये असहायपणे लढणारा गायक अजय असो (या भूमिकेसाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे), स्वार्थापायी आणि पैशासाठी खून पाडत प्रसंगी आपल्या प्रेयसीलाही शत्रूच्या गोळीला बळी पडू देणारा 'खाकी' मधला यशवंत आंग्रे असो की आपल्या पत्नीची तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराशी भेट घडवून आणण्यासाठी धडपड करणारा 'हम दिल दे चुके' मधला विवश नवरा वनराज... 'पुकार' मध्ये देशासाठी जीवाची बाजी लावायला तयार असणारा मेजर जयदेव असो की 'बेटा' मधला आपल्या आईसाठी जीव द्यायला तयार असणारा भोळसट राजू, आपल्या मुलाला शोधण्यासाठी जीवाचं रान करणारा 'कॅलकटा मेल' मधला अविनाश असो की बलात्कारीत तरुणीला आपल्या घरात आश्रय देणारा 'हमारा दिल आपके पास है' मधला अविनाश ... "किसीको तो ये कचरा साफ करना पडेगाहीच ना" असं म्हणत दणादण एन्काऊन्टर्स करणारा 'अब तक ५६' वाला इन्स्पेक्टर साधू आगाशे असो की आग दिसली की आपल्या अपराधीपणाची भावना जागृत होऊन फटाफटा डोक्यावर हात मारून घेणारा 'परिंदा' मधला अन्ना असो, बायकोचा पाठलाग करत तिला मिळवण्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारा 'अग्निसाक्षी' मधला विश्वनाथ असो की अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा 'अंकुश' मधला रवी असो.. हे सर्वजण त्या त्या वेळेला एसपी अमित कुमार, वनराज, राजू, मेजर जयदेव, अन्ना, इन्स्पेक्टर साधू आगाशेच वाटतात. त्यांच्यातून कधीही अजय, अनिल किंवा नाना डोकावत नाहीत की त्यांचा सूक्ष्मसा मागमूसही दिसत नाही हे त्यांचं प्रमुख यश. इतके की सस्पेंड झालेल्या एसपी अमित कुमारला न्याय मिळाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही, वनराजची तगमग आपल्याला पाहवत नाही आणि कितीही लाडकी असली (आठवा 'अतिशय मुख्य सूचना') तरी ऐश्वर्याचा राग आल्याशिवाय रहात नाही, हा राजू एवढा मंद कसा असा प्रश्न पडतो आणि मेजर जयदेव क्लॉक टॉवरच्या दोलकावरून माधुरीला हात देऊन उतरवेपर्यंत आपल्या जीवात जीव येत नाही, शेवटी जॅकीने अन्नाला जाळून मारल्यावरच आपल्या जीवाची तगमग शांत होते आणि साधू आगाशेने जमीरच्या गोटात घुसून त्याला ठार मारल्यावर आपण मनोमन साधूला सलाम ठोकतो.दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सतत किंवा अनेकदा वेगळ्या भूमिका, वेगळे चित्रपट करूनही वेगळं करूनही यांनी कधी त्याचे डिंडिम पिटले नाहीत. उगाच कशाची (अनावश्यक) प्रसिद्धी नाही की कसला गाजावाजा नाही. कधी उगाचच दिग्दर्शनात ढवळाढवळ केल्याचं ऐकिवात नाही की स्वतःला बुद्धिवादी आणि परफेक्शनिस्ट म्हणवून घेण्याचा किंवा स्वतःला ब्रांड म्हणून सादर करण्याचा वृथा अट्टाहास बाळगला नाही.
तिसरी गोष्ट म्हणजे (सुरुवातीचा काळ वगळता) निवडक चित्रपटच स्वीकारले. उगाच चलती आहे म्हणून भारंभार चित्रपट साईन केले नाहीत की उगाचच वर्षातून फक्त एक म्हणजे एकच चित्रपट करायचा असे दंडक वगैरे घालून घेतले नाहीत. दर वेळी अगदी वेगळ्याच भूमिका केल्यात असंही नाही पण चाकोरीबद्धपणा, तोचतोचपणा शक्यतो टाळायचा प्रयत्न केला. अर्थात त्यांचे सगळेच्या सगळे चित्रपट दरवेळी दणदणीत यशस्वी झालेच असं मुळीच नाही. चिक्कार चित्रपटांनी दणदणीत मारही खाल्ला. पण आधी म्हंटल्याप्रमाणे त्याचं कारण यांचा अभिनय होता असं कधीच झालं नाही.
तसंच स्वतःची प्रसिद्धी करून घेण्याचा अट्टाहास नाही किंवा पत्रकार/पुरस्कार सोहळे मॅनेज करण्याची कला आणि इच्छा नाही त्यामुळे ढीगाने अॅवार्डस नाहीत. पण अर्थात त्यामुळे अॅवार्डस फंक्शन्सवर कधी बहिष्कार घातल्याचं स्मरत नाही किंवा उगाच सगळ्याच फंक्शन्स आणि पार्ट्यांना हजेर्या लावत सुटलेत असंही कधी झालं नाही. उगाच डझनावारी मासिकांच्या मुखपृष्ठांवर चमकणं नाही की पहिल्या स्थानासाठी कधी चुरस नाही. पीत प्रसिद्धीचा आधार घेत आगामी चित्रपटाच्या प्रमोशनला हातभार लावण्याचे प्रकार नाहीत की उगाच अनाठायी वाद ओढवून घेऊन प्रसिद्धीचे झोत आपल्याकडे वळवून घेण्याची व्यर्थ खटपट नाही. अभिनय करणं आपलं काम आहे हे ओळखून, स्वतःच्या मर्यादा/व्याप्ती लक्षात घेऊन आपल्या परिघात राहून सतत उत्तमोत्तम भूमिका (दरवेळीच चित्रपट नव्हे) देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र केला आणि अजूनही करताहेत.पण हल्ली उगाचच प्रयोगशीलतेच्या/वेगळेपणाच्या नावावर प्रेक्षकांना निर्बुद्ध समजून त्यांच्यावर मल्टिप्लेक्सी चित्रपटांचा मारा करण्याचं जे सत्र चालू आहे ते पाहून या त्रिदेवांचे जातीचे अभिनय बघायला मिळण्याचं प्रमाण फार कमी होतंय. अभिनय कशाशी खातात हे ठाऊक नसलेल्यांच्या या भाऊगर्दीत जातिवंत अभिनयाचा गळा घोटला जाण्याचीच शक्यता अधिक. तसंही अजयचा अपवाद वगळता बाकीच्या दोघांचं वय आता उतरणीला लागलं असल्याने (नाना : ५९, अनिल : ५१, अजय : ४१) हे केंद्रस्थानी असलेल्या भूमिका बघायला मिळणं कठीण आहेच आणि उत्तरोत्तर ते अजूनच अवघड होत जाणार. त्यामुळे यांचे उतरणीला लागलेले देव आनंद, दिलीप कुमार होण्यापेक्षा सदैव आपल्या नजरेतले 'देव-दिलीप-राज'च राहोत ही सदिच्छा !!!
जाता जाता : असाच विचार करत असताना हॉलीवुडातले माझे देव-दिलीप-राज कोण याचं उत्तर शोधत होतो. पण नंतर लक्षात आलं की हॉलीवुडात (माझ्यासाठी) दिलीप-राज नाहीतच. आहे तो फक्त देवच आणि त्याचं नाव टॉम हॅन्क्स !!!
-- सर्व छायाचित्रे आंतरजालावरून साभार.
Thursday, May 27, 2010
कंटाळा पुराण - तृतीयोध्याय
काही कारणांनी ग्रंथालयात जाऊन जुन्या पोथ्या, पुराणं चाळण्याचा योग नुकताच आला. चाळता चाळता अचानक या जिव्हाळ्याच्या विषयावरचं पुराण नजरेस पडलं. पुराणाचं नाव होतं "कंटाळा पुराण" !!! आपल्या एवढ्या आवडीच्या विषयावर एखादं पुस्तक आणि तेही चक्क पुराण असेल याची तोवर कल्पनाही नव्हती. थोडक्यात "पुराणकाळीही लोक कंटाळत असत तर".. !! या कल्पनेने जेवढं हायसं वाटलं तेवढाच आनंदही झाला. हे पुराण निश्चित कधी लिहिलं गेलं असावं हे स्पष्ट होत नाही. परंतु काही उल्लेखांवरून ते फार तर पाचशे-सहाशे वर्षांपूर्वीचं असावं असा अंदाज बांधता येतो. गंमतीचा भाग म्हणजे या पुराणाचा फक्त 'तिसरा अध्याय'च उपलब्ध आहे असं कळलं. अधिक चौकशीनंतर याचा हा एवढा एकच अध्याय लिहिला गेला असून त्याच्या 'मागे-पुढे' काही नाही अशी मौलिक माहितीही मिळाली.
या पुराणात त्यावेळच्या समाजातल्या ढोंगीपणावर, अन्यायावर, खोटेपणावर कडक ताशेरे ओढण्यात आले आहेत. अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यात आली आहे. कोणीही कुठलेही उच्च-नीच असे भेद मानण्याचे कारण नाही कारण सर्वांच्या हृदयी 'तो'च वसत असतो असा महान संदेश स्पष्ट शब्दांत देण्यात आला आहे. तो आश्चर्यकारकरित्या आपल्या आजच्या समाजाला आणि आपल्या अनेक अपसमजांना चपखलपणे लागू होताना पाहून मती कुंठीत होते. अर्थात एवढं उच्च दर्जाचं, प्रबोधनपर लेखन असूनही आपल्या आद्य धर्मग्रंथांत, वेद/पुराणात या पुराणाला स्थान कसे दिले गेले नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटते. जाणकारांच्या मते वेद, पुराण हे 'अपौरुषेय' आहेत म्हणजेच ते कुठल्याही व्यक्तीच्या तोंडून जन्माला आलेले नसून प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून जन्माला आले आहेत. त्यामुळे ते अपौरुषेय आहेत. तो नियम या 'कंटाळा पुराणा'ला लागू केला असता ते अपौरुषेय या व्याख्येत बसत नाही. परंतु टीकाकारांच्या मते 'अपौरुषेय' चा हा नियम ही फक्त एक पळवाट आहे. तेव्हाच्या समाजाचं तंतोतंत चित्रण आणि रुढी, परंपरा, विषमता यांच्यावर चढवलेला हल्ला सहन न झाल्याने या ग्रंथाला धर्मग्रंथाचा दर्जा दिला गेला नाही.
खरे खोटे कंटाळेश्वर जाणे. आपण थेट 'कंटाळा पुराण' काय आहे ते प्रत्यक्षच बघू.
----------------------
|| आद्य कंटाळेश्वर प्रसन्न ||
कंटाळा पुराण - तृतीयोध्याय
"कंटाळा पुराण - तृतीयोध्याय" असे वदल्याने संभ्रमित होणे नसे. आम्ही यापूर्वीच लेखनास आरंभ करण्याचा विचार केलेल्या प्रथमोध्यायाचा अतीव कंटाळ्यामुळे प्रत्यक्षात प्रारंभ झालाच नाही. द्वितीयोध्यायाचा आरंभ करून केवळ '|| आद्य' अतःपर लेखणीतून उतरवून झाल्यावर त्या अपरंपार कंटाळ्याने आम्हास द्वितीयोध्याय लिहिण्यापासून रोखले. अंतिमतः आवश्यक शारीरिक आणि मानसिक बळ संग्रहित करून निग्रहाने तृतीयोध्याय प्रसवण्याचे अंत:करणी ठसविले. हे 'कंटाळा पुराण' त्या आद्य कंटाळेश्वराच्या चरणी सादर...
म्हणती कंटाळा | जीवाचा हा चाळा |
त्याजला जिव्हाळा | लावू नये ||१||
करेल तो घात | सोडा त्याची साथ |
देई त्याला मात | तोचि स्वामी ||२||
भावार्थ : (किंचित का होईना कं चा अंमल असल्याने दोन्ही श्लोकांचे भावार्थ एकत्रित देत आहोत !!) आजच्या जगात सदैव कंटाळ्यास आणि कंटाळणार्यांस नाही नाही ते बोलून, त्यांचा उपमर्द करून, त्यांना कंटाळ्यापासून फारकत घेण्याचे सुचवले जाते. त्याविषयी हे वरील दोन श्लोक आहेत.
कोणी म्हणो काही | कं जात नाही |
तो वसो राही | अंतर्यामी ||३||
भावार्थ : अशा लोकांना उद्देशून महाराजांनी 'कोणी म्हणो काही | कं जात नाही |' असे ठामपणे सांगितले आहे.
अशा लोकांना उद्देशून महाराजांनी पुढील श्लोकांमध्ये अधिक विस्ताराने लिहून एकेका मुद्द्याचा व्यवस्थित परामर्श घेतला आहे. महाराजांचे एकच सांगणे आहे. "आळस, वीट आणि त्याचे इतर अनेक सुहृद ही कंटाळ्याचीच अपत्ये आहेत. आणि यातले कुठले ना कुठले अपत्य हे प्रत्येक प्राणीमात्रात अंशरुपाने का होईना आढळतेच. त्यामुळे निव्वळ कंटाळ्यावर आणि कंटाळणार्यांवर टीका करण्यात काहीच हशील नाही की त्यात कुठलाही पुरुषार्थ नाही."
आठवा 'आळस' | कंटाळ्याचा भास |
देई अर्थ खास | कंटाळ्याला ||४||
कंटाळ्या ऐवजी | येई मुखामाजी |
खरा खरा आजि | 'वीट' आला ||५||
कधी म्हणो जातो | 'वैताग'च येतो |
अर्थ उमटतो | कंटाळ्याचा ||६||
हिंदीचिया मुखी | येते सुखासुखी |
देतो जेव्हा हाकी | "'पक' गया यार" ||७||
कधी कंटाळ्याचे | वाजती पडघम |
म्हणती 'बोरडम' | आंग्ल भाषी ||८||
म्हणे सत्यवान | 'कं' महान |
त्याचीच तहान | लागो राहे ||९||
भावार्थ : घसा दाटून आल्याने आणि भावनांचा कल्लोळ उफाळल्याने आणि मुख्य म्हणजे वरील श्लोकांचा भावार्थ समजावून सांगून महाराजांचा उपमर्द करण्याची इच्छा नसल्याने येथेच विरमतो.
असा हा महान 'कं' आचंद्रसूर्य नांदो !!

Wednesday, May 26, 2010
रहाशील?
तू शेजारी झोपलेला असतोस. किंचित चुळबुळ करत... काल किरकिर करत, रडत झोपला असल्याचा मागमूसही नसतो चेहर्यावर. ते गोबरे गाल, लांब पापण्या, इवलुसे ओठ.. मी एकटक बघत रहाते तुझ्याकडे आणि न राहवून चटकन पापी घेते तुझी. तुझी झोप चाळवते. मी पुन्हा पापी घेते.. दुसर्या गालाची.. तुझी पुन्हा थोडी हालचाल होते. तुझा छोटुसा तळवा मी हातात घेते आणि गुदगुल्या करते.. हळूच.. तू खुदकन हसतोस. माझी बोटं हळूहळू वर चढत जातात.. दंडावर, काखेत आणि शेवटी मानेला. तू दरवेळी हसत असतोस. हसणं वाढतच जातं. अक्षरशः खिदळायला लागतोस बघता बघता.. खिदळता खिदळता माझ्या कुशीत शिरतोस आणि खिदळत रहातोस.. घुसळत रहातोस.. !!
रहाशील असाच नेहमी? असाच लहानसा... असाच नेहमी घुसळत, खिदळत.. नेहमी माझ्या कुशीत..
या शशुल्या पिल्लाला हातावर घेऊन बाबुडा आला होता माझ्याकडे .. ते तुझं पहिलं दर्शन.. डॉक्टरांना किती वेळा सांगितलं तरी त्यांनी दाखवलंच नव्हतं तुला. नुसतं लांबून दाखवलं. पिल्लांना काही असं लांबून दाखवतात का? :( .. पण बाबाने तुला आणल्यावर मात्र मी लगेच बाबाकडून तुला माझ्याकडे घेतलं. डोळे भरून पहात होते तुझ्याकडे तर मधेच बाबा म्हणतो "अरे, याला हे चायनीज नाक कुठून आलं?" .. कळतच नाही त्याला.. सगळ्या पिल्लांची नाकं सुरुवातीला तशीच असतात.. हो किनई रे..
तुझं पाहिलं रडं, पहिलं हसू, पहिल्यांदा उपडं पडणं, पहिलं रांगणं, पहिला दात, पाहिलं पाउल, पाहिलं धडपडणं, पहिला ताप सगळं सगळं आठवतंय मला. पहिल्या रांगण्याचं, पहिल्या पावलाचं, पहिल्या दाताचं ते कौतुक, तो अवर्णनीय आनंद... पहिल्या तापातली ती प्रचंड काळजी, अस्वस्थता, हुरहूर. रडण्या-जागरणामुळे झालेली क्वचित चिडचिड.. तुझं ते सारखं धडपडणं.. पहिल्यांदा पडला होतास तेव्हा तर तुझ्यापेक्षा जास्त मीच रडले होते.. आठवतंय सगळंच. एक दीड वर्ष होऊन गेलं तरीही सगळं कालपरवाच घडून गेल्यासारखं वाटतंय. या गोष्टी काही विसरण्याच्या थोडीच आहेत. मीही काहीही बडबडते..
तू रांगता रांगता चालायला आणि चालता चालता धावायला कधी लागलास ते कळलंच नाही. तसंच तुझ्या त्या बडबडीचंही.. बडबड कसली खरं तर.. नुसतं अं अं, ब्या ब्या, द्या द्या .. किंवा नुसतंच आरडाओरडा करणं नाहीतर किंचाळत राहणं. पण मला तेही आवडतं. माझं सगळ्यात आवडतं म्हणजे तुझं मला 'आई' म्हणण्याऐवजी 'आ' 'आ' म्हणणं !! :)
या प्रत्येक पहिलेपणात मी रमायचेच पण तेवढेच पुढचेही वेध लागलेले असायचे. पालथा पडायला लागलास तेव्हा रांगशील कधी असं वाटायचं.. रांगायला लागल्यावर उभा कधी रहाशील याचीच हुरहूर.. उभा रहातोयस ना रहातोयस तोवर "आता पटकन मोठा होऊन पावलं टाकायला लाग" असं म्हणाले होते मी..
पण अचानक त्या पुढे पुढे जाणार्या पावलांचा वेग जाणवतो. हळूहळूच पण अटळ असणारा असा.. डे-केअर, प्ले-स्कूल, शाळा.. जाऊदे.. पुढचं नाहीच बोलत..
नावं वेगळी, टप्पे वेगळे.. पण सगळ्याचा परिणाम एकच. तू दुरावणार माझ्यापासून.. लांब जाणार. कमी वेळ मिळणार.. आत्तासारखं २४ तास एकत्र नाही रहाता येणार. हव्या तेव्हा गप्पा मारता नाही येणार सारख्या सारख्या.. तुझ्या गप्पा, बडबड ऐकता नाही येणार हवी तेव्हा.. हवं तेव्हा कुशीत घेऊन घुसळता नाही येणार.. हव्या तेव्हा पाप्या नाही घेता येणार.. तू तिथे रडलास तर इथे मला कळणारही नाही !!! तू माझ्या शेजारी नसशील तेव्हा माझं काय होईल कल्पनाही करवत नाही. रडेन का मी.. जाउदे..
तू शाळेतून येऊन बोबड्या बोलांनी दिवसभर काय केलंस शाळेत, काय गप्पा मारल्यास, काय खेळलास, काय खाऊ खाल्लास, काय मस्ती केलीस असं सारं सारं सांगत रहाशील. मी आवडीने ऐकतही राहीन. पण त्या तेवढ्या तासा-दोन तासात तुझी किती आठवण आली हे कोणाला सांगू? हसतील सगळे. तुही हसशील. अजून मोठा झालास की तर अजून हसशील.
प्रत्येक नवीन टप्पा, तुझी प्रगती हवीहवीशी वाटणारीच. पण या टप्प्यात मला ते जड जाईल कदाचित.. कदाचित नाही नक्कीच.. त्यापेक्षा तू असाच रहा ना. असाच छोटूला, लहानसा, रडका, थोडासा हट्टी, सारखं 'आ आ' करत माझ्या मागे लागणारा, आरडाओरडा करणारा, किंचाळणारा, हवी ती गोष्ट मिळाली नाही तर तमाशा करणारा, मधेच उगाचच खुद्कन हसणारा, उगाच उड्या मारणारा, पसारा करणारा, धिंगाणा करणारा, धावत येऊन पायाला विळखा घालणारा... नकोच होऊस मोठा.
कोणी म्हणेल काय बाई आहे. लोकं म्हणतात "मोठा हो, औक्षवंत हो" आणि ही बाई म्हणते आहे की असाच रहा, लहानच रहा.. जाउदे आपल्याला काय लोकांशी. त्यांना काय कळतंय. या तुझ्यामाझ्यातल्या गप्पा आपल्यालाच कळणार. म्हणून म्हणते नकोच होऊस मोठा. असाच रहा ना. नेहमीच.. कायम.. रहाशील??

Friday, May 21, 2010
मराठी (आणि) ब्लॉगिंग आणि इतर .... !!!
आम्ही मागे एकदा आमच्या संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त नाटक बसवत होतो. लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळा हौशी मामला होता. पण सगळ्यांना नाटकात काम करायची आवड, इच्छा होती आणि त्याप्रमाणे आपलं शिक्षण, नोकरी आणि इतर उद्योग सांभाळून सगळे जण नाटकात काम करत होते. आमच्या दिग्दर्शक मित्राबरोबर नाटकाची आवड असणारे त्याचे २-३ मित्रही तालमीला येत. दिग्दर्शक सीन समजावून सांगत असताना, संवाद, शब्दफेक, हावभाव, स्टेजचा वापर या सगळ्या गोष्टी समजावून सांगत असताना त्याचे हे मित्रही अनाहूत 'सल्ले' देत असत. हा संवाद म्हणताना टोन असा असा असायला हवा, असे असे हातवारे हवेत वगैरे मतं मांडली जात. हे दिग्दर्शकाने सांगितलं असतं तर कोणाला काही वाटलं नसतं पण उगाच त्याचे मित्र आहोत म्हणून आपल्यालाही दिग्दर्शन करण्याचा अधिकार आपसूकच प्राप्त होतो या विचारातून दिले जाणारे हे अनाहूत सल्ले अनेकदा त्रासदायक वाटत. पण दिग्दर्शक सगळ्यांचाच मित्र आणि ती टाळकी त्याचे मित्र म्हणून कोणी विशेष लक्ष देत नव्हतं. कालांतराने नाटकात दोन अतिशय छोट्या भूमिका करायला आम्हाला कलाकार मिळेनात. तेव्हा याच दोन टाळक्यांना या भूमिका देऊ असं ठरलं. ते दोघेही आनंदाने तयार झाले. पण...
सगळ्यांसमोर उभं राहून फक्त पाहिलं वाक्य म्हणताना त्यांची अशी काही तारांबळ उडाली की बास रे बास !!!!
ते अडखळत होते, शब्द चुकत होते, वाक्य पूर्ण करता येत नव्हतं. हावभाव, हातवारे, आवाजातला चढउतार, संवादफेक, स्टेज कव्हर करणं वगैरे वगैरे तर फार फार पुढच्या गोष्टी होत्या.
हे सगळं आत्ता आठवण्याचं कारण म्हणजे नीरजा पटवर्धन यांनी मायबोलीवर लिहिलेल्या ब्लॉगर्सच्या लेखाला मिळालेल्या प्रतिक्रिया. १-२ गोष्टी वगळता नीरजा यांचा लेख मला पटला. मराठी ब्लॉगर्सच्या ज्या गोष्टी त्यांना खटकल्या आहेत त्या का खटकल्या आहेत हे त्यांनी योग्य शब्दांत आणि सौम्य भाषेत सांगितलं आहे. त्यामुळे या लेखाचा विषय तो लेख नाही तर त्या लेखावर भरभरून आलेल्या प्रतिक्रिया हा आहे. (सध्या तरी) तीन पानं भरून आहेत. सगळ्या वाचा. काही प्रतिक्रिया विचारी आहेत, संयत आहेत, बॅलन्स्ड आहेत. पण अशा प्रतिक्रियांची संख्या तुलनेने कमीच. इतर अनेक प्रतिक्रियांमध्ये उथळपणा, आगाऊपणा, ब्लॉगर्सना क:पदार्थ लेखणार्या तुच्छ भावना, स्वतःबद्दलच्या (माझ्या दृष्टीने अनाकलनीय) गर्वाचा (इथे मी गर्व हा गर्व या वाईट अर्थानेच वापरतो आहे. हल्ली वापरला जातो त्या अभिमान या अर्थी नव्हे.) सोसच जास्त. मला प्रामुख्याने खटकलेल्या काही प्रतिक्रिया देतो इथे. (>> च्या खाली मी माझं उत्तर लिहिलं आहे असं वगैरे काही नाही. आधी कोणीतरी लिहिलेल्या प्रतिक्रियेवर पुढच्या व्यक्तीने दिलेली ती प्रतिक्रिया आहे. गोंधळ होऊ नये म्हणून मुद्दाम सांगितलं.)
------
- जरी काही दर्जेदार असले तरी माणशी एक ब्लॉग जर निघाला तर कुणाकुणाचे आणि कितीकिती आणि कायकाय वाचायचे हा प्रश्न उरणारच!
मग त्यातुन आपल्या ब्लॉगचा टीआरपी वाढावा म्हणुन वेगवेगळी मार्केटिंग गिमिक्स वापरली जाण्याचीच आणि दर्जाकडे दु:र्लक्ष (हा शब्द अशुद्ध आहे हे मला माहीत आहे. पण प्रतिक्रियेतला शब्द जसाच्या तसा दिला आहे.) होण्याचीच शक्यता अधिक वाटते!
- >> बाकी ब्लॉग संस्क्रुती वाढेल तसे विषयाचे वैविध्य वाढेल यात शंकाच नाही.
वैविध्य वाढेलही कदाचित पण दर्जाचे काय?
प्रिंट प्रकारात निदान प्रकाशन तरी काही निकषांवर हे साहित्य पडताळुन घ्यायचे... इथे तर ते ही मॉडरेशन नाही!
- अनेक मराठी blog वाचताना मला खटकलेली गोष्ट म्हणजे खुप nostalgic (प्रवीण दवणे छापाचे) लिखाण . विनोदी लिखाणात तोच तोच मराठी मध्यमवर्गीयपणातुन निर्माण होणारा विनोद (इथे पुलछाप म्हणायला हरकत नाही,हा प्रभाव शिरिष कणेकर, मंगला गोडबोले ह्यांच्या लिखाणातही जाणवतो ). हे इतके तेच तेच होते की मग कधीकधी खरे लिखाण असले तरी खोटे वाटायला लागते.
सामाजिक बांधिलकिच्या जाणिवेतुन केलेले लिखाणही कुठेतरी शाळु/teenager types असते (उदा. systemमधे भ्रष्टाचार आहे,राजकारणी वाईट असेच काहीतरी).
- प्रथितरश (वरचाच कंस पुन्हा एकदा.. असो..) ब्लॉगर्स स्वतःच्या मनाने शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करताना दिसतात. ह्या लोकांकडून तू मराठी भाषेसाठी काही करण्याची अपेक्षा करते आहेस का ?
- जिथे फॉर्मचे बंधन नाही, जिथे वाट्टेल ते लिहीता येऊ शकते तिथेही अनुभवांची/कल्पनांची वानवा का? मराठी समाजमनाचे प्रतिबिंब म्हणुन पाहिले तर वैचारिक दिवाळखोरीच जास्त दिसते, आणि तसाच समाज असेल तर कोण काय करणार.
- इतकं बोरिंग झालंय मराठी ब्लॉगविश्व.. काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करायचे! किंवा चक्क टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडायचे.. सर्च इंजिन ऑप्टीमायझेशनचा उत्तम नमुना! लेटेस्ट हॉट टॉपिक असल्याने व 'तू मला छान म्हण, मी तुला म्हणतो' अशा प्रकारच्या कंपुबाजीने(!) कमेंट्स तर बख्खळ पडतात व लेखक समाधान करून घेतो की तो लेख फार भारी जमला होता वगैरे..
- ब्लॉग अकाउंट फुकट काढता येतं. त्यातुनच इतकं पीक उगवलय. बरं बहुत करुन साचेबब्द्ध आयुष्य असलेल्या लोकांच्या अनुभवविश्वात वैविध्य कुठुन येणार ? त्यात प्रतिभेची वानवा.
- आता इतकी प्रचंड गर्दी आलीय की निसटले जाते हे लिखाण, आणि मग उरतात नुसत्याच प्राची ला गच्ची टाईप कविता किंवा फॉर्वर्डेड माल स्वतःच्या ब्लॉगवर टाकणारी जनता.. अरे ही कुठली ब्लॉग काढायची प्रेरणा?
------
सिंडरेला यांच्या १-२ प्रतिक्रिया आणि स्वाती_आंबोळे यांच्या सगळ्याच प्रतिक्रिया पटल्या. निव्वळ त्या प्रतिक्रिया (सिंडरेला यांच्या प्रतिक्रियांमधले काही मुद्दे वगळता) ब्लॉगर्सच्या बाजूने आहेत म्हणून नव्हे तर त्या एकांगी नाहीत म्हणून.
आणि ही आहे शर्मिला फडके यांची प्रतिक्रिया. मला सगळ्यांत जास्त आणि पूर्णपणे पटलेली एकमेव प्रतिक्रिया. कारण त्यांनी अतिशय विचारपूर्वक, इतरांप्रमाणे उगाच आक्रस्ताळेपणा न करता, सगळ्या बाजूंचा सारासार विचार करून, समतोल राखत, ब्लॉगर्सची बाजू अतिशय योग्य रीतीने मांडली आहे. अतिशय माहितीपूर्ण प्रतिक्रिया आहे ही. खाली वाचा.
------
- नेटबाहेरच्या जगात गेली काही वर्षे अमाप संख्येने मराठी पुस्तके निघत आहेत पण त्यापैकी नव्वद टक्के पुस्तकांना दुसर्यांदा आवर्जून वाचावे इतकेही वाचनमूल्य नाही. मग मराठी ब्लॉगर्सकडून इतक्याच 'साहित्य निर्मितीची' अपेक्षा करणे चुकीचेच. पण असं असूनही उद्याचे दर्जेदार साहित्य किंवा कंटेपररी साहित्य हे ह्या ब्लॉग्जवरच्या पोस्ट्समधूनच निर्माण होऊ शकेल इतकी क्षमता नक्कीच निर्माण झाली आहे काही ब्लॉगर्समधे.
डायरीवजा लिखाण हा ब्लॉग्जचा काहीतरी 'कमीपणा' मानला जातो पण उलट मला तर ती ब्लॉग्जची स्ट्रेन्ग्थ वाटते. ब्लॉग्ज लिहिणारे सुरुवात 'मी' पासून करत असले तर ते योग्यच. अक्षरशः जगाच्या कानाकोपर्यात पसरलेले मराठी ब्लॉगर्स यानिमित्ताने आपले विविध क्षेत्रातले, विविध समाजांमधले अनुभव शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवात शाळकरी निबंधासारखी झाली तरी त्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगणे, पलीकडे जाणे यातूनच होते. अनुभवांना थेटपणे भिडून लिखाण करण्याची कुवत त्यांच्यापैकी काहींमधे निर्माण अवश्य होते आहे.
डायरीवजा किंवा 'मी'च्या लिखाणामधे कल्ट साहित्यकृती निर्माण होण्याची किती ताकद असते हे कित्येक क्लासिक्सनी ऑलरेडी दाखवून दिलेले आहे. कोसलाही याचेच उत्कृष्ट उदाहरण.
ब्लॉगर्समधे गुणवत्ता, क्षमता आहे फक्त कमतरता आहे ती सातत्याची आणि वेगवेगळे फॉर्म्स धीटपणे हाताळण्याची. आणि अजून एक वेगळेपणा म्हणजे येणार्या इन्स्टन्ट प्रतिक्रिया. ज्या बाहेरच्या जगातल्या लेखकांना कधीच मिळू शकत नाहीत. आपले पुढचे पोस्ट जास्त दर्जेदार किंवा वेगळे करण्याची स्फुर्ती ब्लॉगर्सना यातूनच मिळू शकते मात्र उगीच सामान्य लिखाणाला चढवले गेले तर ब्लॉगर कमी कालावधीत संपूही शकतो. यात मला वाटतं वाचकांचीही जबाबदारी खूप आहे. प्रतिक्रिया देताना परखड वस्तुनिष्ठपणा दाखवणे वाचकाला जमले पाहिजे आणि क्रिटिसिझम योग्य त्या स्पिरीटने घेणे ब्लॉगरला जमले तरच तो पुढे जाऊ शकेल.
वेगळ्या स्टाईलची भाषा, काहीतरी नवा वेगळा विचार, नवा फॉर्म ब्लॉगिंगमधे अचूक पकडता येऊ शकतो. मात्र असा प्रयत्न करणारे खूप कमी. जे करताहेत त्यांचे कौतुक आहे आणि करत नाहीत त्यांनी तो आवर्जून करायला हवा.
डायरीवजा लिखाणाने सुरुवात करुन स्वतःची स्टाईल मिळणे, मग त्यापुढे जाऊन काही वेगळे मांडणे, स्वतःच्या अनुभवांतून वाचकांना स्वतःशी जोडणे, अनुभवांच्या पलिकडचे काहीतरी वाचकांच्या पदरात टाकणे, भाषा समृद्ध करत नेणे, संदर्भ मिळवण्याचा प्रयत्न करणे हे करणारे काही ब्लॉगर्स बस्केने उल्लेख केले आहेतच. माझ्या माहितीप्रमाणे त्यातल्या एका ब्लॉगरला मराठीतल्या मान्यवर प्रकाशकांनी ऑलरेडी तिचे पोस्ट्स संकलित करण्याची ऑफर दिली होती. मराठी प्रकाशकांनी असे जास्तीतजास्त प्रयत्न आता करायला हवेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशी काही सीमारेषा मराठी साहित्यकृतींमधे पुढल्या काळात नसावी.
ब्लॉगर्समधे गेल्या काही महिन्यांमधे पेन्शनर्स लिखाणाचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरुन जाताना दिसले अमुक की टाक त्यावर पोस्ट टाईप उत्साह त्यांच्यात अमाप ओसंडून जातो आहे. ब्लॉगर्सचा दर्जा आणि संख्या याचे प्रमाण यामुळे विपरित होईल की काय अशी भिती साहजिकच वाटते. पण हा ब्लॉगर्सचा एक वेगळा, स्वतंत्र प्रकार आहे आणि त्यांचा वाचकही वेगळाच रहाणार. यामुळे तरुण, उत्साही ब्लॉगर्सनी आपला ब्लॉगिंगचा उत्साह गमावता कामा नये. लिहित रहायला हवे.
चांगले, सकस असे काही जन्मतःच प्रत्येकवेळी नसते. ते घडत जाते. ज्यांच्यात क्षमता आहे ते घडतील. बाकी फोलपटे उडून जातील आपोआप.
------
शर्मिला फडके यांचा ब्लॉगही अतिशय उत्तम आहे. नक्की वाचा. !! असो.
तर या अशा प्रतिक्रिया टाकणार्या लोकांच्या प्रोफाईल्समध्ये डोकावून मी मुद्दाम त्यांच्या ब्लॉग्सला भेटी देऊन आलो (अनेकांचे तर स्वतःचे ब्लॉग्सही नाहीयेत. निदान प्रोफाईलमध्ये ब्लॉगची लिंक तरी नाहीये.) आणि मला सुरुवातीला सांगितलेली नाटकाची गोष्ट आठवली. याउपर काही लिहीत नाही. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे. पण मला काही काही प्रश्न राहून राहून पडले.
१. आपण स्वतः एका ओळीचीही निर्मिती न करता किंवा केलीच तरी नियमितपणे न लिहिता आणि अगदी नियमितपणे आणि दर्जेदार लिहीत असलो तरीही त्यामुळे समग्र मराठी ब्लॉगविश्वावर चिखलफेक (यातून समस्त मराठी माणसाचं दैवत पुल ही सुटलेलं नाही बरं.) करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? हे म्हणजे संभाजी ब्रिगेड सारखी स्वघोषित 'सेन्सॉरबोर्ड गिरी' झाली. संभाजी ब्रिगेड चित्रपट थेटरमध्ये घुसून चित्रपट डायरेक्ट बंद पाडते आणि हे लोक असल्या प्रतिक्रियांमुळे नवख्या ब्लॉगर्सचं खच्चीकरण करून त्यांना लिखाणापासून परावृत्त करून पर्यायाने त्यांचे ब्लॉग्स बंद पडायला कारणीभूत ठरतात. याउलट मला तरी आत्तापर्यंत कुठल्याही मराठी ब्लॉगवर इतर कुठल्या मराठी संस्थळाची किंवा त्याच्या सदस्यांची अशा प्रकारे नाचक्की करणारे लेख वाचायला मिळाल्याचं स्मरत नाही.
२. एखादी व्यक्ती कसं आणि किती उत्तम लिहिते यावर तिच्या लिखाणाचा दर्जा अवलंबून असतो की ती कुठल्या संस्थळावर लिहिते यावर? (त्याशिवाय का यांना ९५% ब्लॉग्स वाचण्याच्या लायकीचे वाटत नाहीत?)
असो प्रश्न अनेक आहेत पण मला मूळ मुद्द्यापासून भरकटायचं नाहीये त्यामुळे प्रश्नावली तूर्तास इथेच थांबवतो. मला वैयक्तिकरित्या उद्देशून कोणीही काहीही लिहिलेलं नसलं तरीही समस्त 'मराठी ब्लॉगर्सना' उद्देशून ताशेरे झाडण्यात आले असल्याने मला मराठी ब्लॉगर्सची बाजू मांडणं आवश्यक वाटतं. (इथे मी समस्त मराठी ब्लॉगर्स मंडळींचा प्रतिनिधी म्हणून हे मांडतोय असा कुठल्याही प्रकारचा माझा दावा नाही. मी फक्त मराठी ब्लॉगर म्हणून माझी बाजू मांडतोय आणि अनेकांची बाजू हीच असेल याची मला खात्री आहे..... उगाच कोणी काही विचारण्याच्या आधीच स्पष्टीकरणं देऊन टाकलेली बरी असतात अनेकदा. नाहीतर पुन्हा एखादा प्रतिक्रिया टाकलेला/ली येऊन विचारायचा/ची "तुम्ही ठेका घेतला आहे का मराठी ब्लॉग विश्वाचा")
१. आत्तापर्यंत किती मराठी पुस्तकं लिहिली गेली असतील? एक अगदी अंदाजे आकडा म्हणून १००० धरू. (मला वेड लागलेलं नाही. खरा आकडा यापेक्षा कित्येक पट अधिक आहे. तरीही तूर्तास आपण अगदी छोटा आकडा धरू).
२. साधारण किती वर्षं पुस्तकं निर्मितीचं काम चालू आहे? पुन्हा अंदाजे १०० वर्षं धरू.
आता हेच दोन प्रश्न आपण आता मराठी चित्रपट आणि मराठी संगीत/गीतं यांना अनुसरून विचारू.
तर आता मला सांगा गेल्या १०० वर्षांत निघालेल्या १००० पुस्तकांपैकी सगळीच्या सगळी पुस्तकं चांगली होती का? गेल्या १०० वर्षांत निघालेलं प्रत्येक मराठी गाणं, प्रत्येक मराठी चित्रपट हा सर्वोत्तम होता का? प्रत्येकाचा दर्जा अत्युच्च होता का? चित्रपटांच्या विषयात कमालीचं वैविध्य होतं का? प्रत्येक पुस्तकं/गाणं/चित्रपट भावनेला स्पर्शून जाणारं, अनुभवाची नवीन कवाडं खुलं करणारं, प्रचंड माहितीपूर्ण, सहज प्रयोग म्हणून न करता नवनवीन संकल्पना मांडणारं, नवीन शोध लावणारं असं काही होतं का???
जर मराठी लेखक, चित्रपटकर्ते, संगीतकार/गीतकार १०० वर्षं मिळूनही निर्माण होणारं एकूणएक, प्रत्येक पुस्तक/चित्रपट/गाणं हे प्रेक्षकाला/वाचकाला आवडणारं बनवू शकले नाहीत आणि हे आपण मान्यही करतो तर मग तोच नियम मराठी ब्लॉगविश्वाला लागू का होत नाही? मराठी ब्लॉगविश्वात जन्माला येणारा एकूण एक, प्रत्येक लेख हा वेगळा, अत्त्युच्च दर्जाचा असावा हा अट्टाहास का? (आता कोणी म्हणेल की आम्ही प्रतिक्रियेत म्हटलं आहे की ५% ब्लॉग्स वाचनीय असतात. पण ती शुध्द तांत्रिक पळवाट आहे. ५% ब्लॉग्सना चांगलं म्हटलं तरीही एकूणच मराठी ब्लॉगविश्वाबद्दल असणारा अनाकलनीय आकस लपून रहात नाही.)
इंटरनेट खर्या अर्थाने घरोघरी सुरु होऊन आत्ताशी जेमतेम दहा-पंधरा वर्षं झाली आहेत. त्यात ब्लॉग प्रकरण सुरु झालं अंदाजे ६-७ वर्षांपूर्वी आणि त्यातही मराठी टंकायच्या सोयी उपलब्ध होऊन, पूर्णतः मराठीत लिहिले जाणारे ब्लॉग्स सुरु होऊन तर जेमतेम २-३ वर्षं झाली आहेत. तर थोडक्यात वय वर्ष ३ असणार्या या बाळाकडून किती जलद आणि किती मोठ्ठाल्या अपेक्षा ठेवायच्या?
लोक आत्ता कुठे मराठी लिहायला लागले आहेत. गेल्या वर्षभरात अनेक नवीन ब्लॉग्स सुरु झाले. अनेक नवीन लोक लिहिते झाले. नवनवीन कल्पना, शैली, वर्णनं, बाज, प्रकार यायला आत्ता कुठे सुरुवात होते आहे. माझ्या स्वतःच्या ब्लॉगलाही अजून दोन आकडी संख्या (महिन्यांची) गाठायची आहे. तर अशा वेळी नवीन ब्लॉगर्सना प्रेरणा मिळेल असं काही लिहिता येत नसेल तरी निदान त्यांना झोंबेल किंवा त्यांचा उपमर्द होईल असं तरी आपल्या हातून लिहिलं जाणार नाही याची दक्षता घेणं हे (कमीत कमी आंतरजालावरच्या तरी) प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य नाही का? सगळे ब्लॉग्स अत्त्युच्च दर्जाचे नाहीत हे मान्य करू पण म्हणून काय सगळेच ब्लॉग्स टाकाऊ आहेत, दर्जाहीन आहेत, अर्थहीन आहेत, पाट्या टाकणारे आहेत?
दुसरी गोष्ट आणि अजून महत्वाची म्हणजे वर दिलेल्या उदाहरणाप्रमाणे चित्रपट, संगीत, पुस्तकं वाल्यांप्रमाणे ब्लॉगर्स काही (अजून तरी) व्यावसायिक नाहीत. व्यावसायिक इंग्रजी ब्लॉगर्स आहेत पण मराठीत त्याची संख्या जवळपास नगण्य आहे. आपले नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि इतर सगळ्या बाबी सांभाळून चालवला जाणारा प्रकार आहे हा. पूर्णतः हौशी. (तसं नसतं तर ब्लॉगर्स मेळाव्याचा संपूर्ण खर्च कोणी एका अनामिकाने उचलला नसता. स्वतःच्या प्रोडक्टचे/ब्लॉगचे पोस्टर्स, बॅनर्स लावून त्या मेळाव्यातून व्यावसायिक फायदा काढला असता.) थोडक्यात या हौशी प्रकाराच्या यशाची मोजमाप करताना व्यावसायिक फुटपट्ट्या वापरणं सर्वस्वी अयोग्य.
अजून एक म्हणजे सरसकट सगळ्या ब्लॉगर्सच्या अकलेचे बाजारभाव काढणार्यांनी नियमितपणे किती ब्लॉग्स (लिहिले म्हणत नाहीये मी) वाचले आहेत हा प्रश्नच आहे आणि त्यांची (ब्लॉग्स न वाचता केलेली) निरीक्षणं बघून तो प्रश्न म्हणजे वस्तुस्थिती आहे याबद्दल दुमत नसावं. निदान मराठी ब्लॉगर्सचं तरी. मराठी ब्लॉग विश्वातून सलग दोन-तीन आठवडे नजर फिरवली तरी लक्षात येईल की इथे अनियमित पण दर्जेदार लिहिणारे तर आहेतच आहेत पण नियमित आणि दर्जेदार अशा दुर्मिळ मिश्रणाचं कसबही सहजतेने साधणारे अनेक अनेक अनेक लोक आहेत. माझ्या ब्लॉगवर 'माझे ब्लॉगु ब्लगिनी' खाली जी चित्र दिसतायत ना तिथे टिचक्या मारून ते ब्लॉग्स वाचून बघा आणि दुसरं म्हणजे 'मला हे भावतं' च्या खाली जी यादी आहे ना तेही ब्लॉग्स आवर्जून वाचा. बरं यातल्या एकालाही मी वैयक्तिकरित्या ओळखत नाही, कोणालाही कधीच भेटलेलोही नाही. ज्या काही ओळखी आहेत त्या ब्लॉग्समुळेच. सगळे ब्लॉग्स वाचून झाले की मग "मराठी ब्लॉग्समध्ये विविधता नाही, दर्जा नाही, वैचारिक दिवाळखोरी आहे, अनुभवांची/कल्पनांची वानवा आहे, फुकट अकाउंट आहे म्हणून ब्लॉग काढले आहेत" ही वाक्य पुन्हा एकदा म्हणून बघा. काहीतरी चुकल्यासारखं जाणवेल (चिखलफेक करणार्या सरसकट सगळ्यांना जाणवेलच असा दावा अजिबात नाही. पण निदान काही जणांना तरी जाणवेल.. !!). आणि हे झाले मला माहीत असलेले काही ब्लॉग्स पण मला/आपल्याला माहीत नसलेले किंवा आपल्या नजरेस पडले नसलेले इतरही अनेक मराठी ब्लॉग्स असतीलच की. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे अशी आगपाखड करण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला कोणी आणि कसा दिला? नैतिक अधिकार म्हणतोय मी अधिकार नाही. किंवा सोप्प्या शब्दांत म्हणजे आपलं त्या क्षेत्रात भरीव नाही तरी निदान काहीतरी कार्य आहे म्हणून आपण टीका करू शकतो या जाणीवेतून केली गेलेली टीका असेल तर ठीक आहे. "मी वाचक आहे आणि ब्लॉग्स नेटवर उपलब्ध आहेत म्हणून मी त्यांच्यावर तोंडसुख घेणार" वाल्या अधिकाराविषयी बोलतच नाहीये मी. त्यातून पुन्हा "पैसे मोजून तिकीट काढून चित्रपट बघितलाय त्यामुळे मला एखाद्या रामगोपाल वर्माला किंवा मधुर भांडारकरला नावं ठेवण्याचा पूर्ण अधिकार आहे" हा मुद्दाही इथे गैरलागू आहे. तिकीट काढून चित्रपट बघितलाय त्यामुळे निर्माता/दिग्दर्शकावर तिखट टीका करण्याचा जो अधिकार आपल्याला लाभतो त्याच अधिकाराने ब्लॉग्सवर (जे वाचायला विनामुल्य असतात) आणि ब्लॉगर्सवर टीका करणंही कदाचित चुकीचं नाही असं म्हणू आपण. पण टीका करताना आपण कुठल्या पातळीवर उतरतो, कुठली भाषा वापरतो याचं भान ठेवणं हेही तेवढंच महत्वाचं. एखादं मराठी संस्थळ म्हणजे इंटरनेटवरील समस्त मराठी विश्व नव्हे हे जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढ्या लवकर माझ्या म्हणण्याचा अर्थ कळायला मदत होईल. असो.. !!
मध्यमवर्गीय विनोद, शाळू विनोद, मॉडरेशन नसलेलं लिखाण, शब्दांची वाट्टेल ती तोडफोड करणारे, असल्या लोकांकडून मराठीसाठी काय होणार, अनुभवांची/कल्पनांची वानवा असणारं लिखाण, अतिशय बोरिंग, टिपिकल, मोनोटोनस, कंपूबाजी करणारे (या शब्दाला तर मी प्रचंड हसलो. कारण अशा कित्येक मराठी संस्थळांवर किती कंपूबाजी चालू असते आणि तिथले सभासदच त्यावर कशी टीका करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. असो.), बख्खळ कमेंट्स घेणारे (यामागचा आक्षेपच मला कळला नाही. ब्लॉगेटिकेट्स बद्दलच्या अज्ञानातून हे असं म्हटलं गेलं असावं कदाचित), वैचारिक दिवाळखोरी, बौद्धिक दिवाळखोरी, ब्लॉग्सची प्रचंड गर्दी (यात आक्षेपार्ह काय आहे? मराठी संस्थळावर खोर्याने सभासदसंख्या झाल्यावर सुखावणारे हेच लोक पण यांच्या मते ब्लॉग्सची गर्दी मात्र होता कामा नये.) अशा वस्तुस्थितीची जाणीव न ठेवता केल्या जाणार्या आढ्यताखोर, शेलक्या विशेषणांनी भरलेल्या तुच्छतादर्शक प्रतिक्रिया देण्याची गरज आहे का दरवेळी आपलं मत मांडताना?
"हो SSSSSS य .... आहे. अगदी आहे. पूर्ण आहे. कारण पब्लिकली छापल्या जाणार्या प्रत्येक लिखाणावर माझं मत देण्याचा मला पूर्ण अधिकार आहे." असं उत्तर मिळण्याचीच अधिक शक्यता आहे. पण वर म्हंटल्याप्रमाणे ते मत कुठल्याही भाषेत (लँग्वेज याअर्थी नव्हे पद्धत याअर्थी म्हणतोय) अगदी अपमानजनक भाषेत दिलं गेलं असल्याने मलाही उत्तर द्यावं लागलं आणि एवढं मोठ्ठं उत्तर तिथे प्रतिक्रिया म्हणून देण्यापेक्षा माझ्या ब्लॉगवरच लिहिलं तर समस्त मराठी ब्लॉगजगताला (जगातला प्रत्येक मराठी माणूस माझा ब्लॉग वाचतो असा मुर्खासारखा दावा अजिबात नाहीये इथे.) ब्लॉगविश्वाच्या बाहेर मराठी ब्लॉगर्सविषयी काय मतं आहेत ते लक्षात येईल आणि ते (आणि मीही) आपलं लेखन अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न करतील या हेतूने इथे लिहिलं. ;-)
पण कितीही झालं तरीही ब्लॉगर्सना "काहीतरी रोजचेच अनुभव शब्दबद्ध करणारे, टीव्हीवरच्या बातम्या पकडून त्यावर लेख पाडणारे, बोरिंग लिहिणारे, तेचतेच लिहिणारे, वैचारिक दिवाळखोरी असणारे, अनुभवांची/कल्पनांची वानवा असणारे, दर्जाहीन लिहिणारे" अशा पदव्या बहाल करणार्यांचं मराठी ब्लॉग किंवा एकूणच मराठी संस्थळांवरचं किंवा मराठी भाषेकरता दिलेलं योगदान काय आणि किती आणि तरीही अशी अपमानास्पद विशेषणं वापरण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले हे प्रश्न उरतातच !!

Subscribe to:
Posts (Atom)
२०२५ ची वाचनपूर्ती
२०२५ च्या वर्षात जाडजूड पुस्तकांची आणि त्याचबरोबर इंग्रजी पुस्तकांची संख्या जास्त असल्याने अंतिम आकड्यावर थोडा परिणाम झाला. पण तरीही अर्धशतक...
-
वाचकाला एखाद्या पूर्णतः भिन्न अशा आणि जवळपास अविश्वसनीय वाटावं अशा विश्वाची ओळख घडवून आणून , त्या विश्वातले रीतिरिवाज , नियम , जीवनशैली , चा...
-
जेरेमी : आलं ना सगळं लक्षात? हेरंब : ह्म्म्म जेरेमी : पुन्हा सांगू का? हेरंब : म्म्म्म.. चालेल.. जेरेमी : बरं.. थोडक्यात सांगतो. वर गेल्...
-
मी 'स्लमडॉग मिलिनियर' प्रदर्शित झाल्या झाल्या लगेच पहिला होता. कारण खूप ऐकलं होतं त्याबद्दल. आणि मांजरेकरचा आक्रस्ताळेपणा आणि शेवटी ...