Monday, February 28, 2011

(तत.. तत..) पप.. पप.... पेब !! : भाग-३

* भाग १ इथे  वाचा
* भाग २ इथे  वाचा

एवढ्यात अचानक जोरात चित्कारल्याचा आवाज आला. तो आमच्यातल्याच एकाचा आवाज होता आणि तो आनंदातिशयाने ओरडत होता. तो बाकी ग्रुपच्या थोडा पुढे होता आणि खाणाखुणा करून आम्हाला बोलवत होता. त्याचा तो आनंदाने ओसंडून वाहणारा चेहरा पाहून सगळेजण अक्षरशः धावतच त्याच्याकडे गेलो. तो जिकडे उभा होता तिथून पायथा, रस्ता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही सकाळी ओलांडलेला पोल्ट्री फार्म दिसत होता. बघता बघता आमचे चेहरे उजळले. काय करावं काही सुचेना. वेड्यासारखे ओरडत एकदा त्या पोल्ट्री फार्मकडे आणि एकदा एकमेकांच्या चेहर्‍यांकडे बघत होतो. प्रचंड आनंद झाला होता. लवकरच या दिवसभराच्या कटकटीतून आम्ही सुटणार होतो. पण... !!!

आमच्या फुग्याला क्षणभरातच टाचणी लागली. खालचा रस्ता, पोल्ट्री फार्म वगैरे सगळं दिसत होतं पण दिसत नव्हती ती एकच गोष्ट. आम्ही उभे होतो त्या टेकडीवरून खाली त्या पोल्ट्री फार्मपर्यंत जाण्याची वाट...... !!!!

पक्की वाट नाही की साधी छोटीशी पायवाट नाही. उलट सगळीकडे एक तर वाळलेलं गवत होतं किंवा मग निसरडे खडक.आता मात्र चांगलंच टेन्शन यायला लागलं होतं. दिवसभर पुरवून पुरवून वापरलेला पेशन्स आता मात्र संपला होता. सकाळपासून एकही गोष्ट धड झाली नव्हती. अर्थात सारखं सारखं तेच तेच रडगाणं गाऊनही उपयोग नव्हता. साडेपाच होत आले होते. बघता बघता आकाशातला सोनेरी रंग कमीकमी होत जात होता. लवकरच अंधार पडणार होता त्यामुळे तातडीने काहीतरी करायला लागणार होतं. आम्ही निर्णय घेतला. इथून उतरत खाली जाणं तर शक्य नव्हतं, आमच्या हातात वेळही नव्हता. आम्हाला एकच मार्ग सुचत होता, एकच पर्याय दिसत होता. आता विचार केला तर त्या पर्यायाला तितकासा अर्थ नव्हता हे लगेच लक्षात येतं. पण त्यावेळी तरी आमची सारासार विचार करण्याची बुद्धी खुंटली असावी.

आम्ही खाली पोचू शकत नसल्याने खालच्यांचं (जे तिथे होते की नव्हते हेही आम्हाला दिसत नव्हतं) लक्ष आमच्याकडे वेधून घेणं हा एकमेव पर्याय आम्हाला दिसत होता. अर्थात खाली असलेल्या लोकांचं लक्ष आमच्याकडे गेलं तरी "आम्ही चुकलो आहोत, खाली यायचा रस्ता कुठून आहे?" वगैरे गोष्टी आम्ही त्यांना कशा विचारणार होतो या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आत्ताही नाही आणि तेव्हाही आमच्याकडे नव्हतं. पण मी वर म्हटल्याप्रमाणे आम्ही कोणी एवढा विचारही केला नव्हता.....

आमच्याकडे जुनी वर्तमानपत्रं होती. आमच्याकडे काडेपेटी होती. लक्ष वेधून घेण्याचा एकमेव मार्ग आम्हाला दिसत होता. बघता बघता वर्तमानपत्रांच्या गुंडाळ्या केल्या गेल्या आणि त्यांच्या टोकाशी पेटती काडी धरण्यात आली. सगळे कागद एकदम संपू नयेत म्हणून एका वेळी एकच वर्तमानपत्र पेटवण्याची हुशारी (!!) आम्ही दाखवत होतो. खरंच खाली कोणी होतं की नाही याचाही काही अंदाज येत नव्हता. पेटवलेलं वर्तमानपत्र जोरजोरात हलवून आमच्याकडे लक्ष वेधून घेण्याचा आमचे अयशस्वी प्रयत्न चालूच होते. एकेक करत कागद संपत चाललेले बघून आमचा दिवसभर ताणून धरलेला उरला सुरला पेशन्सही संपला. कदाचित एकच पेटवलेला पेपर त्यांना दिसत नसेल म्हणून आम्ही उरलेले सगळे पेपर एका वेळी पेटवण्याचं ठरवलं आणि बघता बघता ते पेटवलेही. शेवटचा पेपर जाळून संपत चालला होता. पण ढिम्म........ शून्य.......... खाली (न)असलेल्या कोणालाही वर काय चाललंय इकडे लक्ष देण्याची काहीएक फिकीर पडली नव्हती. शेवटचा कागद अगदी बोटाला चटका बसेल इतक्या अखेरच्या क्षणापर्यंत हातात धरला गेला होता. हाताला जेव्हा चांगलाच चटका बसला त्यावेळी तो कागद हातातून खाली पडला. आणि खल्लास.........

एवढा वेळ शहाण्यासारखं आमच्याकडे पाहणार्‍या आणि आमच्या सभोवती जिकडे नजर जाईल तिथवर पसरलेल्या त्या वाळलेल्या गवताने बघता बघता पेट घेतला. अचानक सगळीकडे ज्वाळा दिसायला लागल्या. ती आग विझवण्याचे आकाशाला ठिगळ लावण्याचे आमचे निष्फळ प्रयत्न करून झाले. पण आग काही दाद देईना.... !!!

त्यानंतर जे झालं ते कसं झालं हे मला तेव्हाही कळलं नव्हतं आणि आताही आठवत नाहीये. अंधुक अंधुकसं एवढं मात्र नक्की आठवतंय की बघावं तिकडे मोठमोठ्या ज्वाळांचं तांडव चालू होतं. ती धग असह्य झाल्यावर, पायाखालचं गवत जळायला लागल्यावर आमच्यातल्या प्रत्येकाने काहीही विचार न करता जिथून दिसेल तिथून, जिथून सुचेल तिथून खालच्या दिशेने उड्या घेतल्या. खरचटत, धडपडत, घसरत, पडत खाली आलो. काही मिनिटांपूर्वी इथून कसं उतरायचं वगैरेचे भंपक विचार करणारे आम्ही पाचव्या मिनिटाला (धडपडत का होईना पण) खाली आलो होतो. जवळपास प्रत्येकाचे गुढगे फुटले होते. कोपर, दंड, पाठ, मनगट अशा कुठल्या ना कुठल्या अवयवावर रक्तदान केल्याच्या खुणा उमटल्या होत्या. केस पिंजारले होते. चेहरे धुळीने माखले होते. पण कोणालाही त्याचं कसलंही दुःख नव्हतं. वाईट रीतीने अडकलेलो असताना अचानक सुटका झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर अगदी स्पष्ट दिसत होता. त्यासमोर या जखमा वगैरे फारच क्षुल्लक होत्या.

अजूनही तो पोल्ट्री फार्म अगदी जवळ असा नव्हता पण तिथपर्यंत जाण्याची वाट मात्र चंद्रप्रकाशात स्पष्ट दिसत होती. पोल्ट्री फार्म क्रॉस केला की आम्ही सुटणार होतो. जसजसा तो पोल्ट्री फार्म जवळ यायला लागला तसतसा आमचा उत्साह वाढत चालला होता.

आम्ही एव्हाना त्या फार्मच्या एवढे जवळ येऊन पोचलो होतो की दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या. पहिली म्हणजे सकाळी जाताना लागलेला पोल्ट्री फार्म आणि आम्हाला आत्ता समोर दिसत असलेला फार्म वेगवेगळे होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे या पोल्ट्री फार्मच्या आजूबाजूला साधारण १५-२० घरांचा एक पाडा (छोटं गाव) होता. अचानक इतका वेळ विसरलेल्या किंवा दाबून ठेवलेल्या तहान-भूक वगैरे वगैरेची आम्हाला तीव्रतेने जाणीव झाली. पण तो पाडा इतका छोटा दिसत होता की तिथे खायला वगैरे काही मिळणं ही गोष्ट अगदीच दुरापास्त होती. पण निदान पाणी तरी नक्की मिळेल या आशेने आम्ही तिथल्या पहिल्या घरासमोर जाऊन उभे राहिलो आणि पाणी द्यायची विनंती केली. त्यांनी जणु आमच्या स्वागतासाठी पाणी तयारच ठेवलेलं असल्यागत भराभर पाण्याने भरलेले तांब्ये आमच्या हातात दिले.

खरंच सांगतो, आयुष्यात एका वेळी एकदम प्यायलं नसेल एवढं पाणी त्यादिवशी पहिल्यांदा प्यायलो. तहान भागल्यावरही निव्वळ प्यायचं म्हणून प्यायलो, चेहर्‍यावर ओतलं, मानेवर ओतलं, हात धुतले. पुन्हा भरपूर पाणी प्यायलो. पुन्हा पुन्हा प्यायलो. पाणी पिऊन मस्त ताजेतवाने होऊन आम्ही निघणार एवढ्यात..........

एवढ्यात तिथल्या एका माणसाने आमची वाट अडवली........ !!!!!!!!!!

क्रमशः

- भाग ४ इथे  वाचा.

42 comments:

  1. अरे काय रे हेरंब परत क्रमश: तीव्र निषेध :(
    अनुभव मस्तच आणि थरारक...

    ReplyDelete
  2. अरे काय हे? हावरटासारखे सगळे अनुभव एकाच वेळी कशाला घेतले? अगदी आग लावण्यापर्यंत मजल गेली तुमची? अरारा...

    BTW आठळ्या हा बरोबर शब्द आहे पण कोकणात त्याचा हटला असा अपभ्रंश केला जातो.

    ReplyDelete
  3. सुहास, काय करणार यार.. जाम लांबलचक गोष्ट आहे.. त्यामुळे असे बरेच निषेध स्वीकारण्याची मी सवय करून घेतोय :)

    ReplyDelete
  4. हे काय ... पुन्हा क्रमशः :(

    ReplyDelete
  5. हाहाहा सिद्धार्थ.. अगदी अगदी असंच झालं बघ :) जास्तच झाला जरा हावरटपणा.

    हम्म.. मला हटला हा शब्द माहितच नव्हता.. अंदाजाने अर्थ लावला..

    ReplyDelete
  6. गौरी, अजून वेळ आहे क्रमशः संपायला..

    सगळ्यांनाच सांगून टाकतो.. अजून निदान कमीत कमी २-३ भाग तरी आहेतच आहेत.. प्लीज निषेधुनका लोक्स.. :(

    ReplyDelete
  7. >>> अरे काय हे? हावरटासारखे सगळे अनुभव एकाच वेळी कशाला घेतले? अगदी आग लावण्यापर्यंत मजल गेली तुमची? अरारा...
    +१००

    अरे पुन्हा आपले शब्दांशी लंगडी, आटापाट्या, प्रसंगी धोबीपछाड (हा तूला या प्रसंगी स्वत:लाही ;) )आणि शेवटी क्र....म.... श: ....

    मग काय आम्ही काय वेगळे लिहीणार होय, आमचेही तेच.... नि... षे..... ध.....

    आयला पण अरे त्या माणसाला काय चोर, दरोडेखोर वाटलात का तूम्ही... लिही रे पटकन...

    ReplyDelete
  8. अजून निदान कमीत कमी २-३ भाग तरी आहेतच आहेत..

    चांगली आणि वाईट(क्रमश:) बातमी एकत्र? ;-)

    ReplyDelete
  9. तन्वे... हाहाहा नडलाच हावरटपणा.. अग आम्हालाच एवढे धोबीपछाड पडले त्यादिवशी की विचारता सोय नाही..

    >> आयला पण अरे त्या माणसाला काय चोर, दरोडेखोर वाटलात का तूम्ही... लिही रे पटकन...

    वो एक लंबी कहानी हय.. उद्या सांगतो :) .. आता झोपायला जातोय.. सगळ्यांना टाटा.. आता यापुढच्या प्रतिक्रियांना उत्तरं उद्या..

    ReplyDelete
  10. काय हे एकाच ट्रेक मध्ये सगळे उपद्व्याप केलेत कि काय तुम्ही

    ReplyDelete
  11. पण हा सर्वात नाट्यमय क्रमश होता.

    अधिकारी बंधू आठवले.

    ReplyDelete
  12. ए हे काय रे क्रमशः....खुप खुप मस्त लिहिले आहेस..चित्तथरारक अनुभव नं....लवकर लवकर टाक रे...असे वाट बघत बसायला ज्याम कंटाळा येतो..

    ReplyDelete
  13. भन्नाटटटटटटटट !!!.
    मी एकदमच तीनही भाग वाचले. आता पुढ्चे भाग लवकरात लवकर येऊ देत.
    @ arjun deshpande
    >> पण हा सर्वात नाट्यमय क्रमश होता.

    अधिकारी बंधू आठवले.

    +1000

    ReplyDelete
  14. काय हे हेरंब!
    आता मी फक्त एकच आशा करू शकते...
    जितक्या कमी पोस्टा तितके हे भीतीदायक अनुभव कमी असण्याची फक्त आशा करू शकते!
    (ह्याचा अर्थ असा नाही की ह्या पोस्टा चांगल्या नाहीयेत. तर असा अर्थ आहे...की आता ३ पोस्टा वाचून मला कळलंय की दर पोस्ट म्हणजे तुमचा एक जीवघेणा प्रसंग आहे! म्हणजे ह्या तुमच्या ट्रेकवरील पोस्टांचा नंबर वाढता असावा अशी इच्छा काही मी बाळगू शकत नाही!)
    :)

    ReplyDelete
  15. अत्यंत उत्कंठावर्धक ’क्रमश:’. एवढा थरारक अनुभव! टरकवणारा ट्रेक आहे हा.

    ReplyDelete
  16. वा वा!! पराक्रमी आहात की तुम्ही :P

    त्यावेळी झालेल्या या गंभीर घटनांचा तू पुरेपूर समाचार घेतला आहेस, ब्लॅक कॉमेडीचा एकदम डोसेज..

    माझा क्रमशःला निषेध नाही.. येऊदे पुढचे भाग लवकर

    ReplyDelete
  17. हेरंबा, अरे एकाच ट्रेक मधे इतके ’ नाना ’ अनुभव घ्यायचे म्हणजे अतीच झाल्ं रे! :D आणि तो लागलेला जाळ विझला की... ?

    पूर्व कल्पना असल्याने जोरदा निषेधत नाहीये पण उत्कंठा जाम वाढलीये आता... प्रतिक्षा प्रतिक्षा... तुम्ही जशी वाटेची, पाण्याची, जेवणाची तशी आमची तुझ्या पोस्टची... :)

    ReplyDelete
  18. आताशा मला शंका येतेय की हे खरेच घडलेले की तू प्रथम पुरुषी एकवचनी सस्पेन्स, हॉरर,थ्रिलर कथा लिहतोयस.
    येऊ देत पुढचे भाग, नो निषेध माझ्याकडून !!
    सुपरलाईक हे वेगळे सांगायलाच हवे का?

    ReplyDelete
  19. सुहास :D :D.. तुही प्रतिक्रिया क्रमशः टाकायला लागलास ;)

    ReplyDelete
  20. लीना, तसंच काहीसं.. मलाही आता लिहितान जाणवतंय जरा अतीच झाले उपद्व्याप ! :)

    ReplyDelete
  21. अधिकारी बंधू... हाहाहा अर्जुन. अरे तो संपूर्ण प्रसंगच एवढा नाट्यमय होता की काही विचारू नकोस.

    आणि हो. ब्लॉगवर स्वागत.अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete
  22. आज पुढचा भाग वाचल्याशिवाय झोपायच नही अस ठरवलं आहे.किती वेळ आहे अजून

    ReplyDelete
  23. धन्स धन्स माऊ.. हो ग.. फारच चित्तथरारक, भयंकर होता तो सगळा प्रकार !! कसेबसे सुटलो त्यातून..

    अग आणि आता थोडेच क्रमशः उरले आहेत. :)

    ReplyDelete
  24. अनेक आभार्स प्रज्ञा :) पुढचे भाग लवकरच टाकतो.

    आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete
  25. अनघा.. खरंय तुझं. पण दुर्दैवाने अजून निम्मेही भाग झालेले नाहीत.. :(

    कदाचित मी फेकतोय असंही वाटू शकेल कोणाला (मी तुमच्या जागी असतो तर कदाचित मलाही वाटलं असतं) पण फार भयंकर अनुभव घेतले होते त्यावेळी. पुढच्या पोस्ट्समधून कळेलच..

    ReplyDelete
  26. कांचन, हो.. फारच थरारक प्रकरण होतं ते एकूणच !! जन्माचे धडे शिकवणारा ट्रेक !

    ReplyDelete
  27. धन्स आनंदा.. अरे करतोय काय.. पराक्रम न करून सांगतोय कोणाला? इलाजच नव्हता..

    पोस्ट उगाच सरळसोट फ्लॅट वाटायला नको म्हणून अधून मधून डोह देतोय कॉमेडीचे :) .. पण प्रत्येक भागागणिक विनोदांची संख्या कमी झाल्याचं जाणवेल तुला. आमच्या बाबतीत तेव्हा एक्झॅकली असंच घडलं होतं. दुपारपासून कमी कमी होत गेलेले जोक्स रात्रीपर्यंत जवळपास शून्यावर आले होते.

    ReplyDelete
  28. श्रीताई, खरंच 'नाना' प्रकारचे अनुभव घेतले.. जन्मभर पुरणारे.. त्या जाळाचं नंतर काय झालं आम्हाला कळलंच नाही. विझला असावा.

    >> तुम्ही जशी वाटेची, पाण्याची, जेवणाची तशी आमची तुझ्या पोस्टची... :)

    आम्हाला जशी तुकड्यातुकड्यात, रखडत वाट मिळाली तशीच तुम्हालाही भागाभागातून पोस्ट मिळेल.. हेहे :)

    ReplyDelete
  29. सागर, लवकरच पुढचा भाग.

    ReplyDelete
  30. हाहा स्वामी. माझी आधी तशीच आयडिया होती. म्हणजे तर मग शेवट होईपर्यंत सतत टेन्शन असतं. पण कदाचित ती विश्वसनीय वाटली नसती. उलट मी लिहितोय ती एकूण एक घटना जशीच्या तशी घडलेली आहे. एकूण एक प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. :)

    पुढचे भाग टाकतो लवकरच.

    ReplyDelete
  31. साबोबा, असं नको करूस यार. पुढचा भाग झालाय लिहून पण शुद्धलेखनाच्या/ व्याकरणाच्या चुका आहेत बऱ्याच.. घाईघाईत लिहिल्याने. आणि काही प्रसंगांची कंटिन्यूटीही जोडायची आहे. वेळ लागेल अजून.. पण तोवर तू जागू नकोस.. कारण बराच वेळ लागेल त्याला.. तू सकाळी उठशील तेव्हा नक्की तयार असेल पुढचा भाग.. एवढंच सांगतो :)

    ReplyDelete
  32. मी ठरवलं होतं पुर्ण झाल्याशिवाय प्रतिसाद द्यायचा नाही, पण आज राहवलं नाही म्हणुन निषेध व्यक्त करायला आलो. असं आमचा जिव टांगणीला लावणं बरं नव्हे भौ :)
    पुढचा भाग लवकर पाहीजे....

    ReplyDelete
  33. विशाल :).. निषेध स्वीकारण्याची सवयच करून घेतोय मी आता :)

    जस्ट टाकलाय बघ पुढचा भाग..

    ReplyDelete
  34. हेरंब वाचनीय, उत्कृष्ठ आणि काय हे पाणी इतका प्यायलात कि एक अंघोळ झाली असती. क्रमश: असला तरी उत्सुकता आहे पुढील भागाची..... लवकरच पोस्टवा

    ReplyDelete
  35. सत्यवाना...काय भयानक पेटवल होतस रे बाबा...बर झाल मी अगदी योग्य निर्णय घेतला होता...नाही तर तुझी ही पोस्ट वाचुन पुढची पोस्ट येईपर्यंत माझ्या मेंदुला उधई लागली असती.

    ReplyDelete
  36. कल्पेश, आंघोळीएवढीच तहान लागली होती रे :)

    ReplyDelete
  37. हाहा योगेश.. काय होतंय, काय होतंय म्हणून तुझ्या डोक्यातही वणवा पेटला असता कदाचित :)

    ReplyDelete
  38. पेब ला 'बिकटगड' हे नव तुम्हीच दिले का रे??? ह्यापेक्षा माथेरान बाजूने रेल रस्त्याने जरा खाली उतरून शिडीवरून पेबला नीट पोचला असतात... :D
    मला वाचताना जरा मज्जा येतेय पण तेंव्हा काय हालत झाली असेल हे स्वानुभवावरून कळू शकते... :)

    ReplyDelete
  39. >> पेब ला 'बिकटगड' हे नव तुम्हीच दिले का रे???

    हाहाहाहा.. जबराट !!

    खरंय ... अरे लिहिताना मी पुन्हा एकदा ते सगळे प्रसंग आठवून हादरलो होतो.. जरा काही कमी जास्त झालं असतं त्या रात्री तर.... !!!

    ReplyDelete
  40. अरे अरे अरे... तुमच्या दुर्दैवाचे दशावतार संपतच नाहीयेत. आणि वाचकांच्यापण... असलेली सगळी उत्सुकता दाबून ठेवून ‘क्रमशः’ वर समाधान मानावं लागतंय. :-)

    ReplyDelete
  41. हाहाहा.. तरी तू इतर वाचकांच्यापेक्षा सुदैवीच रे. सगळं एका फटक्यात वाचतो आहेस :)

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...