Monday, September 27, 2010

एक नवं डायट

१. माझा एक मित्र आहे. चहाबाजांना जसा दुपारी २ ला चहा लागतो तसं त्याला दुपारी चारला पेप्सी लागायचं. पेप्सी लागायचं म्हणजे पेप्सी'च' लागायचं. कोक, लिम्का, थम्सप वगैरे काही चालायचं नाही

२. माझी आजी आयुष्यभर ब्रुक बॉंडचा रेड लेबलचा चहा प्यायली. रेड लेबल सोडून इतर कुठलाही चहा तिला चालायचा नाही. म्हणजे रेड लेबल पेक्षा चांगला, महाग, भारी, इम्पोर्टेड वगैरे वगैरे काय पण असुदे.. सगळ्यांची विकेट उडायची. आणि घरात आम्ही पडलो सगळे कॉफी वाले. त्यामुळे 'तुम्हाला ते कळणार नाही' हे तिचं म्हणणंही ऐकून घ्यावं लागायचं.

३. आमच्याकडे पूर्वी वर्षानुवर्षं घरात कोलगेटची पेस्टच यायची. इतकी की थोडा मोठा होईपर्यंत मला कोलगेट सोडून इतर कोणीही टूथपेस्ट बनवत नाही असंच वाटायचं. किंवा पेस्ट आणि कोलगेट हे समानार्थी शब्द वाटायचे. म्हणजे आपण कॅनन ची झेरोक्स किंवा नेस्लेची कॅडबरी म्हणतो ना अगदी तसंच.

सुदैवाने मला कुठल्याच बाबतीत अशा कुठल्याच ब्रांडची सवय नव्हती. आवडती पेस्ट व्हिको होती पण तीच पाहिजे असं नाही. कुठलीही चालायची. आवडती नेसकॅफे पण चालायची कुठलीही. आता यापुढे मी फक्त आवडता ब्रांड सांगतो 'चालायचा/ची/चे' कुठला/ली/ले ही हे अध्याहृत आहे किंवा तुम्ही तुमच्या सोयीसाठी ते पुढे लावून घ्या दर वेळी.

आवडता शाम्पू गार्नियर फ्रुक्टीस पण ...
आवडता परफ्युम चंदनाचा कुठलाही पण..
आवडतं शेव्हिंग क्रीम जिलेट पण ...
आवडते क्लोदिंग ब्रांडस अ‍ॅरो, लुई फिलीप वगैरे पण..

असो.. सदरचा मुद्दा पटवायला इतके मुद्दे पुरे. उगाच लांबण नको (थोडक्यात 'वादि' ला किंवा उगाचंच सहज म्हणून मला गिफ्ट देताना निर्णय घेणं तरी सोप्पं जाईल. ;) )

पण पण पण... (हा पण का आहे ते लवकरच कळेल.) .... कट्टा, नाका, अड्डा, चावडी या सगळ्या प्रकारांना सोशल नेटवर्किंगचं गोंडस लेबल लावून ओर्कुटने (निदान भारतात तरी) २००४ च्या आसपास प्रवेश केला. पडीक नेटकर या नात्याने आम्ही तेथे तातडीने रुजू झालो. सुरुवातीला काही महिने ऑर्कुट ऑर्कुट खेळून झाल्यावर काही दिवसांनी कंटाळा आल्याने तिथला वावर कमी झाला. कम्युनिटीज ढिगाने जॉईन केलेल्या असल्या तरी मी कधीच कुठल्याच कम्युनिटी पेजच्या डिस्कशनपेज/फोरम वर तासन् तास गप्पा मारत बसलोय, स्क्रॅपास्क्रॅपी करत राहिलोय असं कधीच झालं नाही. नंतर एक दिवस कळलं की आपल्याकडे जसं ऑर्कूट वापरतात तसं अमेरिकेत फेसबुक वापरतात आणि ते ऑर्कुटपेक्षा जाम भारी आहे. लगेच पडत्या फळाची आज्ञा झेलून आम्ही आमचा जामानिमा फेसबुकवर हलवला. पण ते खरोखरच ऑर्कुट पेक्षा जाम भारी आहे पक्षि हेवी आहे, त्यात चिकार गुंतागुंत आहे, बराच गोंधळ आहे, अजिबात लाईटवेट नाही हेही लक्षात आलं. त्यामुळे तिथूनही बाहेर पडणं झालं. बाहेर पडलो म्हणजे लॉगिन करणं बंद झालं. अकाऊंट मात्र सगळी आहेतच. कधीच कुठलंच डिलीट केलेलं नाही. लोकं कम्युनिटी जॉईन करण्याची आमंत्रणं, काही 'शेतकी' खेळ खेळण्याची आमंत्रणं पाठवत राहिली. पण त्याला 'बाणेदारपणे' [;)] नकार देत राहिलो. त्यानंतर (माझ्या आयुष्यात) आलेल्या मायस्पेस, हायफाय, बेबो, वेन अशा अनेक 'मी टू' (me too) सायटींवर जाऊन अकाऊंट ओपनिंगचं पुण्यकृत्य एक कर्तव्य म्हणून पार पाडलं पण रमलो कधीच नाही. दरम्यान एक-दोन मराठी संकेतस्थळांवरही हजेरी लावून झाली. पण तिथेही पुन्हा एक खातं अडवण्याइतकाच माझा रोल होता. अ‍ॅक्टीविटी शून्यच... तोवर आलं ट्वीटर.. लोकलज्जेस्तव तिकडचीही एक जागा अडवून बसलो. चिवचिवाट मात्र फारच्या फार कमी केला.

पण पण पण (वरचं पण वरतीच संपलं.. हे नवं आहे.) ..... पण पण पण (हे आत्ताचंच आहे) यावर्षीच्या फेब्रुवारीच्याच्या दरम्यान अचानक काहीतरी उलथापालथ झाली. गुगलने ढोलताशे घेऊन म्हणा, जबरदस्तीने म्हणा बझची गाय दावणीला बांधली. आणि तीही अशी घट्ट आणि शिताफीने की विचारता सोय नाही. म्हणजे एका सकाळी "तुम्हाला बझमध्ये सहभागी व्हायचं आहे का?" असं आवताण घेऊनच हजर. 'फुकट ते पौष्टिक' या लाडक्या नियमाला अनुसरून बझ म्हणजे नक्की काय हे ओ की ठो माहित नसताना सरळ 'यस्स' वर टिचकी मारून मोकळा झालो. पण गुगलबाबा इतरांसारखे कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांना अशा अकाऊंट अडवून बसणार्‍या लोकांचा (स्वतःविषयी लिहिताना 'शुंभांचा' लिहिणं हा शुंभपणा आहे म्हणून...) चांगलाच (म्हणजे वाईटच) अनुभव असणार. त्यामुळे त्यांनी शिताफीने तुमच्या अ‍ॅड्रेस बुकमध्ये असलेल्या लोकांना तुमच्या तुम्हाला आणि तुम्हाला त्यांच्या पाठलागावर लावलं. दुसरं म्हणजे तुम्ही चुकून माकून कुठल्या बझवर काही खरडलंत की रडकं, दंगेखोर, चुकार पोर बाहेर मस्ती करून लगेच आपल्या घरी पळून येऊन लपून बसावं त्याप्रमाणे ती खरड तुमच्या मेलबॉक्सात येऊन विराजमान व्हायला लागली. न वाचलेल्या मेल प्रमाणे न वाचलेल्या बझांची संख्याही ठळकपणे वाचण्याची (वाचायला लावण्याची, डोळ्यात भरण्याची काहीही म्हणा) सोय गुगलस्वामीमहाराजांनी करून ठेवली. थोडक्यात बझचा हा आंतरजालीय आयुष्यातला चंचूप्रवेश फारच हॅपनिंग ठरला. उठसुठ बझबझायला लागलो. जोक दिसला, कर बझ, एखादी महत्वाची बातमी दिसली, कर बझ. दरम्यान मब्लॉवि वर माझ्या ब्लॉगच्या अपडेट्स दिसणं बंद झालं होतं त्यामुळे तेव्हापासून नवीन पोस्टीही बझ करायला लागलो. दरम्यान देवकाकांचा "सुप्रभात मंडळी, या गप्पा मारायला" वाला आवताणाचा बझ एक दिवस कुठून कसा नजरेस पडला आणि त्यावर "सुप्रभात" असं एक उत्तर टाकून/टंकून मीही बझकट्ट्यात/मठात सामील झालो.

ब्लॉग लिहायला लागल्यापासून झालेला एक जबरदस्त फायदा म्हणजे अनेक नवीन, समविचारी, ग्रेट, भटक्या, खादाड, हृदयस्पर्शी, विनोदी, बिनधास्त लिहिणार्‍या अनेक लोकांशी खूप चांगली मैत्री झाली. कधीच कोणालाही भेटलेलो नसलो तरी अनेकांशी फोनवर बोलणी झाली, चॅट/स्काईपवर गप्पा झाल्या, भरपूर मेलामेली झाली. काही महिन्यांपूर्वी झालेली ओळख कैक जन्मांची असल्यासारखी वाटायला लागली. (हे वाक्य या पोस्टच्या आणि एकूणच या ब्लॉगच्या मूडशी विसंगत वाटणारं असलं तरी चालवून घ्या कारण ते खरं आहे.).. त्यावर कडी केली ती या बझने. पूर्वी फक्त एकमेकांच्या पोस्ट्सवर कमेंट टाकणारे आम्ही सगळेजण चॅट/मेल वगैरे वन-टू-वन संवादाच्या पलीकडे जाऊन बझवर जमून सामुहिक चॅटिंग करायला लागलो. खेचाखेची, विनोद, गप्पा, फोटो, गाणी या सगळ्याला नुसता ऊत आला. व्हर्च्युअल कट्ट्याचं व्हर्च्युअल रूप गळून पडलं. एकमेकांशी गळाभेटी घेत किंवा हाय-फाय करत भेटल्यासारख्या गप्पा रंगू लागल्या. थोडक्यात ब्लॉग, मेल, चॅटवर घडू शकलं नाही ते एक मोठं काम बझने केलं. लोकांमधलं अंतर अजून कमी केलं. सगळ्यांशी समोरासमोर बसून गप्पा मारण्याचं सुख मिळालं. हा या बझचा एक जब्ब्ब्ब्ब्ब्ब्बबरदस्त फायदा !!!

पण पण पण (हा आता तिसरा पण हे सुवाओअ ... तरीही).. इथेच कुठेतरी घोडं पेंड खायला लागलं. नाय नाय म्हणजे गप्पा वाढल्या, नाती वृद्धिंगत झालली वगैरेला पेंड खाणं कोण म्हणेल (इथेही वरचा शुंभवाला नियम लागू शकतो. असो.) पण या गप्पा वाढत चालल्या. रोज सकाळी उठल्यावर काल रात्रभर म्हंजी भारतातल्या दिवसभर काय काय गप्पा झाल्या त्या वाचल्याशिवाय दिवसाची सुरुवात होईनाशी झाली. ५०० खरडींनंतर बझ पडत असल्याने रोज एक बझ पाडल्याशिवाय चैन पडेनासं झालं. (मी करोडो रुपयांच्या पैजेवर सांगू शकतो की बझमधला हा किडा (बग बग) आपल्या मराठी ब्लॉगर्सच्या गँगला सोडून कोणाला माहितही नसेल). जाम धमाल यायची. खूप खूप म्हणजे अतिखूप गप्पा व्हायच्या. सगळे विषय चर्चिले जायचे, नवीन बातम्या, ब्लॉग्स, रक्तदानासारखे सामाजिक, सणासुदीचे सांस्कृतिक, भटकंती/ट्रेक, फोटो सगळ्यांवर गप्पा व्हायच्या. पण पण (आधीच्यातलाच हा उप-पण म्हणा हवं तर) या गप्पाटप्पा, खेचाखेची, टगेगिरी, धुमाकूळ या सगळ्यात खूप वेळ जातोय असं लक्षात आलं. फार उशिराने का होईना पण आलं खरं. आणि तेही बायकामुलं.... हा शब्द फक्त वर्णनात्मक सौंदर्यासाठी योजिला आहे हे सुवाओअ... जाउद्या कसं.... रिफ्रेजच करतो. आणि तेही बायको-मुलगा, वाचन, ब्लॉग्स, लिखाण, प्रतिक्रिया, पेपरवाचन, फोन अरे हो आणि हापिसातलं काम [घाईघाईत हा मुद्दा विसरणारच होतो ;) ] हे सगळं सांभाळून !!! नाय बा. आपल्या क्षमतेच्या (आपली ती क्षमता दुसर्‍याची ती लायकी) पलीकडलं होतं हे. बझबझाट कमी करावा हे कळत होतं पण वळत नव्हतं.

गणपतीच्या आधीच्या आठवड्यात दिवसा वाढलेल्या ऑफिसच्या कामामुळे आणि रात्री मखराच्या तयारीमुळे नेटवर आणि त्यामुळे अर्थातच बझवर येणं खूप कमी झालं. तेव्हा तर रोज बझवर काय होत असेल, काय गप्पा होत असतील, त्या आपल्याला कधी वाचायला मिळतील असं वाटत होतं आठवडाभर. दॅट्स इट. तेव्हाच कळलं की हे अति होतंय आता. हाताबाहेर जायला लागलंय. 'मी कधीही कुठल्याही ब्रांडच्या आहारी गेलो नाही' हा मानाने मिरवायचा मुद्दा मला उपडा पाडून माझ्या छाताडावर उभा राहून तांडवनृत्य करतोय असं दिसायला लागलं (चला सुरुवातीच्या अर्थहीन पाल्हाळाची लिंक लागली तर !!).. अर्थात बझ वाईट असं म्हणायचं नाहीये मला पण अतिबझची सवय वाईट.. किंवा जाउदे ते ही नको. हा प्रकार मला झेपण्याच्या पलिकडचा होता असं म्हणू हवं तर. जे काय म्हणायचं ते म्हणू पण थोडक्यात या सर्वव्यापी बझच्या आहारी जाणं कमी करायला लागणार होतं. म्हणून मग प्रयोग म्हणून गणपतीनंतरचा एक आठवडा बझ करणं कमी केलं. त्यानंतर काही दिवस बझवर प्रतिक्रिया देणं, गप्पा मारणं कमी केलं, हळूहळू लाईक करणंही कमी केलं. एकदोघांशी चॅट करताना बझबंदीचा हा निर्णय त्यांच्या कानावर घातला. एकजण गंमतीने म्हणाला की "अरे, ऑफिसचं काम थोडं कमी कर" .. त्याला म्हटलं "अरे अजून कमी केलं तर मायनसात जाईल काम" ते बव्हंशी खरंही असावं.. असो.. जास्त एक्सपोजर नको ;)

तरीही अजूनही बझवर अधूनमधून डोकावणं होतंच. कारण कुठलंही डाएटिंग मला कधीच झेपलं नाहीये. पण हे डाएटिंग करायचंच असा पक्का विचार आहे. भलेही मग त्यासाठी घ-मेल्याच्या पायथ्याशी जाऊन 'बझ बंद करा' वर टिचकी मारावी लागली तरी बेहत्तर.

थोडक्यात मी आता बझवर नसेन. जनरली एखादा कोणी बझच्या गप्पांमध्ये दिसला नाही, त्याचे नवीन बझ दिसले नाहीत, बझला 'लाईक' केलं नाही की बझ्जनांमध्ये थोडी चलबिचल होते आणि ती व्यक्ती कुठे आहे, कशी आहे अशा काळजीपोटीच्या चौकश्या केल्या जातात. त्यामुळे "हमने वो सुन लिया तुमने कहा ही नही" टाईप त्या न विचारलेल्या प्रश्नांचं हे उत्तर समजा किंवा कंपन्या ज्याप्रमाणे नवीन अपडेट्स देण्यासाठी न्यूजलेटर पाठवतात तसं हे न्यूजलेटर समजा (पण हे पुन्हा पुन्हा येऊन पकवणारं न्यूजलेटर नाही) किंवा उगाच एक वाढीव रटाळ पोस्ट समजा किंवा मग नुसताच एक आगाऊपणा समजा. काय हवं ते समजा.



थोडक्यात आमच्या बझायुष्याची इति झाली. अर्थात हा कोमा आहे की खरोखरची इति आहे हे काळच ठरवेल.. (हेही वाक्य या पोस्टच्या आणि एकूणच या ब्लॉगच्या मूडशी विसंगत वाटणारं असलं तरी पुन्हा एकदा प्लीज चालवून घ्या कारण हेही खरं आहे.) .. हात्तिच्या "आमच्या बझायुष्याची इति झाली" हा एका वाक्यात कळणारा निरोप देण्यासाठी ब्रांडविश्व ते फेसबुक, ऑर्कुट, बझचे फायदे वाली एवढी मोठी वरात काढली होय ??????

होय.. होय.... होयच !!!! अहो कारण आता बझ नाही त्यामुळे वेळच वेळ आहे !!! नाही का? ;)

आणि दुसरी गोष्ट म्हणजे नेहमी फालतू का होईना पण विनोदी, सामाजिक, चित्रपट/पुस्तकं या विषयांवर लिहून झाल्यावर कधीतरी सहज म्हणून कितीही नॉनग्लॅमरस असलं तरीही आपल्याला वाटलं ते लिहिलं तर हरकत नाय ना? ;)

** नेहमीच्या सवयीप्रमाणे ही पोस्ट पण बझ करणार होतो.. ;) वाचलो :P

46 comments:

  1. :( :(

    तु लवकरच कोमातुन बाहेर याव ही प्रार्थना.

    ReplyDelete
  2. >>नेहमीच्या सवयीप्रमाणे ही पोस्ट पण बझ करणार होतो.. ;) वाचलो :P
    आणि मी नेमकं हेच प्रतिक्रियेमध्ये लिहिणार होतो...
    :(:(:(:(

    ReplyDelete
  3. उद्या ब्लॉगिंगचा आणि आमच्याशी चॅट करण्याचा कंटाळा येऊ नये...
    आवडलं नाहीच.. पण तुझा निर्णय... :(

    ReplyDelete
  4. हे सहीच आहे "don't be अद्दीक्टेद" मित्रांचा कंटाळा यायचा चान्स नाही आनंद

    ReplyDelete
  5. :(...
    Mala tar he Addcition sodavat naahiye...

    ReplyDelete
  6. उद्या ब्लॉगिंगचा आणि आमच्याशी चॅट करण्याचा कंटाळा येऊ नये...
    आवडलं नाहीच.. पण तुझा निर्णय..+१ :(

    ReplyDelete
  7. बझ्झवर (सध्यातरी) अल्पविराम घेण्यामागची तुझी भावना समजऊ शकते. सध्या माझंही तेच मत आहे. म्हणूनच माझाही फार काळ बझ्झबझाट नसतो. पण मी बझ्झ पूर्णपणे बंद मात्र केलेलं नाही. कालच्या पूर्ण दिवसात मला बझ्झचे अपडेट्स मिळणं बंद झालं होतं. त्यामुळे कोण काय बझ्झतंय हे अजिबात कळत नव्हतं, तेव्हाच ठरवलं बझ्झवर वावर कमी असला तरी वाफ (वाचू फक्त) मोडमधे असायला हरकत नाही.

    ;-) एक मात्र खरं हं! बझ्झचा ५०० लिमिटचा किडा आपल्यालाच माहिती!

    ReplyDelete
  8. काश... ही पोस्ट तू १ एप्रिलला टाकली असतीस?

    मला नोकरीमध्ये असा ब्रँडचा कंटाळा येतो बघ ;-) वत्सा तूदेखील ब्रँडचा शिक्का बसेल म्हणून जाता येता राजीनामा सुरळी करून xxx का?

    ReplyDelete
  9. हेरंब, अरे बझ्झ बंद करण्यापेक्षा बझ्झवर वावर कमी कर...

    ReplyDelete
  10. Wish you all the best for No Buzz :-) Keep the determination.

    ReplyDelete
  11. >>>> अरे हो आणि हापिसातलं काम [घाईघाईत हा मुद्दा विसरणारच होतो ;)......... :)

    अरे पण प्राण्या आज मब्लॉवि आमच्याकडे गंडले होते, नव्या पोस्टा दिसेनात आणि तुझा बझही नाही मग आम्हा पामरास्नी तुमची नवी पोस्ट कळावी कशी राव??? हे बझ ’लिमिटेड डाएट’ कर ना... अरे ठरव झेपते सगळे....

    पोस्ट मात्र लय भारी रे... आणि बाबा रे ( म्हणजे तू, विभी नाही ;)... पांचट जोक वन्स अगेन.. असु दे!!!) घ-मेल्या काय रे आता, रच्याक झाले तुनळी झाली आता हे नवे... आवर हेरंब!!! :)

    लिहीत रहा...

    >>>>उद्या ब्लॉगिंगचा आणि आमच्याशी चॅट करण्याचा कंटाळा येऊ नये...
    हे बाकि खरं रे!!!

    ReplyDelete
  12. रजनीदेवाचे आभार(thank rajnigod ), मी बझ्बझ करत नाही. त्यामुळे diet चा प्रश्नच नाही.. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच. मर्यादेत राहून बझ्बझ खेळ. एकदम एवढ्या लोकांच्या शिव्या खाऊ नकोस.

    ReplyDelete
  13. tari mi tula wicharat hote ki tula itka buzzbuzzat kasa parwadato?? aaso...pan majhyasarkhe (adhun madhu) buzzkari loka aahet tyanchya pasun shik kahi tari....:)
    POst ekdam BHANNNNNNNNNNNNNNNNNNAt..................solid aawadali....Somwarsarkhya diwashi fakt ashyach posta wachawu shaktat.....kamgaar mandalina...:)

    ReplyDelete
  14. यवगेश, प्रयत्न तर चालू आहेत. बघुया..

    ReplyDelete
  15. बाबा, तुझी प्रतिक्रिया मी आधीच पोस्टमध्ये लिहून टाकल्याने रडक्या स्मायलीज टाकल्या आहेस का? हेहे लोल.. ;)

    ReplyDelete
  16. अरे ब्लॉगिंगचा आणि विशेषतः तुझ्याशी तर चॅट करण्याचा कंटाळा येणार आहेच.. आलाच आहे !!!!!

    अजून काय लिहिणार.. एकदा वाट्टेल ते, कैच्याकै लिहायचं ठरवलंस तर मग मी का मागे राहू??

    अरे आणि कंटाळा आलं म्हणून मी बझ सोडतोय असं कुठेच म्हटलं नाहीये मी. माझ्या टाईम मॅनेजमेंटचे लोचे आहेत रे. तो तुमचा कोणाचा किंवा बझचा दोष नाही.. माझाच दोष आहे. आणि तसेही चॅट, फोन, स्काईपवर भेटूच रे !!

    ReplyDelete
  17. सचिन, :) अरे काय यार तुम्ही सगळे उलटे कंस टाकताय?

    ReplyDelete
  18. आभार स्नेहल. तेच... ते व्यसन सोडवण्याचाच तर हा प्रयत्न आहे.

    >> मित्रांचा कंटाळा यायचा चान्स नाही आनंद

    अगदी अगदी बरोबर.. ऐकतोयस ना आंद्या?

    स्नेहल, ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत रहा.

    ReplyDelete
  19. आका, माझंही तसंच काहीसं झाल्याचं लक्षात आल्यावर तातडीने उपाययोजना केली.

    ReplyDelete
  20. काय यार देवेन तू पण आनंदासारखाच? मग तुलाही तेच शेम (इथे श्लेष आहे ;) ) उत्तर !!

    ReplyDelete
  21. कांचन, अग माझा तोच तर प्रॉब्लेम झालाय. लिमिटेड बझाबझी करायची असं ठरवूनही ते शक्य होत नाही. माझा तेवढा कंट्रोल नाही. डायरेक्ट 'तुपाशी' होत होतं म्हणून मग 'उपाशी' चा निर्णय घ्यावा लागला. कदाचित वाफ मोड मध्ये येईनही पुन्हा. पण एवढ्यात तरी नाहीच..

    >> बझ्झचा ५०० लिमिटचा किडा आपल्यालाच माहिती!
    आपण पहिला बझ पाडेपर्यंत गुग्ल्याला तरी माहित होता की नाही काय माहित ;)

    ReplyDelete
  22. सिद्धार्थ, १ एप्रिलपर्यंत एवढा आधीन झालो नव्हतो बझ च्या :P लोल..

    अरे कंटाळा आला म्हणून नाही टाकलेत पेपर. अति होतंय आणि इतर काही करायला वेळ मिळत नाहीये (जे सर्वस्वी माझं लिमिटेशन आहे) म्हणून तर हे करावं लागलं.

    ReplyDelete
  23. भारत, अरे तेच तर जमत नाहीये ना.. एक तो इस पार या उस पार..!!

    ReplyDelete
  24. सागर, होईल रे सवय हळूहळू. एवढं काही नाही. बझ सोडून बाकी सगळीकडे भेटूच की आपण.

    ReplyDelete
  25. आभार सविताताई.. निश्चयाचा गड राखणं कसं जमतं तेच आता बघायचं !

    ReplyDelete
  26. अग मग ब्लॉगर अकाऊंट वरून फॉलो कर ना बझ म्हणजे मग तुला तुझ्या ब्लॉगर किंवा गुगल रीडर मध्ये दिसतील नवीन अपडेट्स. किंवा मग इमेंल वरून अपडेट्स मागव. अग हे 'लिमिटेड डाएट' वगैरे म्हणजे फार कठीण काम आहे. निष्काम कर्मयोग्यांची कामं ती. आमास्नी कशी जमायची !!

    अग घ-मेलं तर माझा सगळ्यात लाडका शब्द आहे :) .. रच्याक, रच्याक आणि आभार्स हे मायबोलीवरून साभार आणि तूनळी तर देवकाकांच्याच बझ कट्ट्यावरून साभार घेतलेला आहे. त्यात मी मिरवण्यासारखं काहीच नाही :) .. लिहीत तर राहणारच ग..

    आणि तू काय आनंदा आणि देवेनला साथ देतेस? ब्लॉगिंग आणि तुम्हा लोकांशी चॅटिंगचा कंटाळा येणं हे या जन्मात तरी शक्य आहे का? काहीतरी उगाच !!!!!!!!!!

    ReplyDelete
  27. संकेतअण्णा, अरे बझबझाट करण्यातही एक आगळी मजा आहे. सहा महिने मी ती मजा यथेच्छ उपभोगली आहे. त्यामुळेच आता डायट करावं लागतंय. हो रे.. लोक्स तर तुटून पडलेत एकदम.. तुटून तरी नाहीतर उलटे कंस तरी !!

    ReplyDelete
  28. अग नाही ना परवडत. म्हणून तर एकदम ब्रेक मारावा लागला ना आता :( तुमच्यासारखे अधूनमधून बझ करणारे लोक्स महान आहेत एवढंच म्हणेन मी. मला नाही जमत ते.. क्या करे कंट्रोल ही नाही होता.. :)

    >> POst ekdam BHANNNNNNNNNNNNNNNNNNAt

    यावरून मला 'तुमचा खेळ होतो..' आठवलं ;) लोल :D

    ReplyDelete
  29. हे काहीस एक्सपेक्टेड होत मला, असो. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक सुद्धा वाईट हे मनापासून मान्य...पण एकदम कोमामध्ये जाउ नकोस हेरंब, अधूनमधून भेट देत रहा...भेटूच :)

    ReplyDelete
  30. ह्म्म्म.. एक्सपेक्टेड ? वा बरंय.. कसं काय पण?

    हो रे अतिरेकच होत होता.. दोष माझाच.. कारण माझाच कंट्रोल होत नाही. म्हणून हा उपाय.. बघू कसं होतं पुढे ते..

    भेटत तर राहूच रे.. :)

    ReplyDelete
  31. मीही ऑर्कुटच्या बाबतीत डाएट केलं होतं मध्ये. ऑर्कुटवर नवीन होतो तेव्हा प्रचंड आकर्षण होतं मला ऑर्कुटचं. तेव्हा दिवसाचे १५०-२०० स्क्रॅप्स यायचे मला आणि मीही तेवढेच स्क्रॅप्स करायचो लोकांना. त्यानंतर दीड महिन्यात १०,००० पेक्षा जास्त स्क्रॅप्स झाले होते माझे! मग काही काळानंतर डाएटिंग चालू केलं आणि आता व्यवस्थित सडपातळ झालो आहे... (म्हणजे आमचं ऑर्कुटिंग कमी झालं आहे. आता आठवड्याला एखादा स्क्रॅप येतो कोणाचातरी... ;-) )

    ReplyDelete
  32. डायटींग आवश्यकच. मी सुद्धा डायटींग करणारे आता, बघू जमतं का..
    हरकत नाय :)

    ReplyDelete
  33. डाएटींग छान...फार जरुरी आहे ते...कुठल्याही प्रकारचे addiction नकोच...
    तु जो काही निर्णय घेतला असशील तो नक्कीच विचार करुन घेतला असशील..सो...लगे रहो...

    ReplyDelete
  34. संकेत, ह्म्म्म. ऑर्कुटही addictive च आहे. मी सुरुवातीला झालो होतो addict. पण फार फार थोड्या दिवसांसाठी.नंतर लगेच आवरलं. पण बझची नशा काही औरच होती.. I already miss that :(

    ReplyDelete
  35. मंदार, डाएटिंग खरंच आवश्यक रे. तुला माबोचं डाएटिंग करावं लागेल बहुतेक.. ख्याख्याख्या ;)

    ReplyDelete
  36. माऊ, ह्म्म्म.. अग वाईट तर वाटलंच खूप पण खूप वेळ जात होता.. नाईलाज झाला :( .. आभार..

    ReplyDelete
  37. हेरंबा... ह्यासाठी इतकी मोठी पोस्ट. कमाल आहे बाबा तुझी. :) माझे बझ तर कधीच कमी झालेले आहे.

    ReplyDelete
  38. १००% सहमत. मला तर अश्या साईटवर कसा वेळ जातो समजतच नाही - त्यामुळे तिथे जायचंच नाही, फार तर ’वाफ’ मोडमध्ये, असं ठरवलंय.

    ReplyDelete
  39. हा हा हा रोहणा.. अरे सांगितलं ना.. आता बझ बंद आहे त्यामुळे वेळच वेळ आहे ;)

    >> माझे बझ तर कधीच कमी झालेले आहे.

    अरे तुम्हा लोकांना ते जमतं आणि मला तेच तर जमत नाही :( म्हणून सरळ बंद करून टाकलं दुकान.. :)

    ReplyDelete
  40. सहीये गौरी.. तुला तर मी कधीच बझवर वगैरे बघितलं नाहीये.. सही कंट्रोल आहे तुझा.. मी सध्या तर 'वाफ' मोडातही नाहीये.. काही महिन्यांनी येईन कदाचित वाफात :)

    ReplyDelete
  41. मैथिली, कंस उलटे आलेत ;)

    ReplyDelete
  42. एक मात्र खरं हं! बझ्झचा ५०० लिमिटचा किडा आपल्यालाच (मराठी माणसांनाच)माहिती... अगदी अगदी... फारच गप्पिष्ट जमात आहे हि... :)

    ReplyDelete
  43. हेहे अभिषेक.. अगदी अगदी..

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...