Monday, August 9, 2010

इमोसनल अत्याचार अर्थात खो(टा) अनुवाद !!


यापूर्वीचा खो ही मला अपर्णानेच दिला होता आणि हा खो ही तिनेच दिलाय. पण त्या दोघांत एक मुख्य फरक आहे. आधीचा खो मस्त होता कारण तो सोप्पा होता. पण या वेळचा लय डेंजर. त्यामुळेच जेव्हापासून ही खोखोगिरी सुरु झालीये ना ब्लॉगविश्वात तेव्हापासून या खो वाल्या पोस्ट्स पासून मी चांगलाच टरकून होतो. खो वाली पोस्ट दिसली की ती उघडून त्यातली एकही ओळ न वाचता (स्वारी लोक्स) मी स्क्रोल करत थेट पोस्टच्या शेवटाकडे जायचो आणि तिथे पुढच्या खो साठी माझं नाव नाहीयेना हे बघायचो. तिथे प्रतिथयश नावं दिसली की सुटकेचा भलामोठा निःश्वास सोडून मग मोकळेपणी ती पोस्ट वाचायचो. पण दैवाला फार काळ हे सुख पाहवलं नाही आणि त्याने अखेरीस माझ्या हस्ते एका तरी मावसभावाचा छळ करण्याचं नक्की केलं आणि मी सेप्युलच्युरा नावाचा मावसभाऊ निवडला. तशा मला मावश्या दोनच. तिसरी मावशी फक्त दहावीत स्कोरिंगसाठी आणि संध्याकाळी शुभंकरोती म्हणण्यासाठी किंवा उगाचंच अधेमधे सुभाषितं टाकण्यासाठी. त्यामुळे तो मावसभाऊ/बहिण वाचली. आणि तसंही त्या दोन मावश्यांशी सख्य हे पुस्तकं/चित्रपट या पुरतंच मर्यादित. काव्य, कविता, पद्य वगैरे म्हणजे "बाब्बो... येडा झाला की काय रे !!".. थोडक्यात या दोन्ही मावश्यांची अपत्य निवडली आहेत ती कविता नसून थेट चित्रपट किंवा अल्बममधली गाणी आहेत. 

सेप्युलच्युरा किंवा फॉर दॅट म्याटर कुठल्याही 'डेथ/थ्रॅश मेटल' वाल्या ग्रुपची गाणी ही त्यातले गिटार, ड्रम्सचे पीसेस ऐकण्यासाठी असतात शब्द ऐकण्यासाठी नव्हे हा गैरसमज थोडाफार का होईना सेप्युलच्युराच्या बर्‍याच गाण्यांमधून खोडून काढला जातो. मेटल ऐकणार्‍यांना "यात तुला नक्की काय कळतं? किंवा "दिज आर (फॉर) सिक पिपल" असंही विचारलं/म्हटलं जातं आणि अर्थात ते थोडंफार खरंही आहे. सेप्युलच्युराची चार-पाच गाणी सलग ऐकली की डोकं बधीर होऊन जातं.... अर्थगर्भतेमुळे नव्हे तर वाद्यतांडवामुळे.. पण तरीही मला सेप्युलच्युराची गाणी आवडतात. हा ग्रुप आता विभक्त झाला पण त्यापूर्वी त्यांनी उत्तमोत्तम गाणी दिली आहेत. आणि त्यातलं अ‍ॅटीट्युड हे माझं सगळ्यांत लाडकं. 

अ‍ॅटीट्युड

वन वीक ऑफ स्ट्रगलिंग
ऑन द रिअल वर्ल्ड इज
सो यु कॅन सी !!!

फील युअर सोल अँड
शेप अप युअर माईंड टू वॉरफेअर
इटस् ऑल फॉर रिअल

लिव्ह युअर लाईफ
नॉट द वे दे टॉट यु
डू व्हॉट यु फील !

सर्व्हाईव द जंगल
गिव्ह मी ब्लड
गिव्ह मी पेन
दिज स्कार्स वोन्ट हील

व्हॉट वेर यु थिंकिंग
व्हॉट अ वंडरफुल वर्ल्ड !!!
यु'आर फुल ऑफ शिट

लिव्ह इट बिहाईंड
दे डोंट केअर इफ यु क्राय
ऑल इज लेफ्ट इज पेन

कॅन यु टेक इट ?
कॅन यु टेक इट ?
कॅन यु टेक इट ?
कॅन यु टेक इट ?

द ओन्ली वे
टू गेट अवे
किल युअर प्राईड
अ‍ॅटीट्युड

आय वोन्ट टेक इट
आय वोन्ट टेक इट
आय वोन्ट टेक इट
आय वोन्ट टेक इट

सो इन द एंड
आय वॉन्ट टू सी सम रिस्पेक्ट
(आय सेड)
यु बेटर शो सम रिस्पेक्ट
(आय सेड)
अ‍ॅटीट्युड अँड रिस्पेक्ट

या गाण्याचा व्हिडीओ बघा. त्या (केशरी जर्सी घातलेला) मॅक्स कॅव्हलेराने गिटार असलं काही वाजवलं आहे की बस्स्स !!!


मूळ गाणं वाचून आणि ऐकून झाल्यावरही जर स्वैर (उर्फ भरकटलेला) अनुवाद वाचायची शक्ती, इच्छा आणि धाडस असेल तर आम्ही अडवणारे कोण?

टीप : हा अनुवाद साफ चूक असू शकतो. पण हा मला लागलेला आणि आवडलेला अर्थ आहे. जाणकारांनी सुचवलेल्या सुधारणा नक्कीच प्रातःस्मरणीय असतील.

वृत्ती

फक्त आठवडाभर कर जरा मेहनत
या वास्तव जगात
म्हणजे कळेल मग

आत्म्याला तयार कर
आणि कर मनाला निबर
युद्धासाठी..
हे सारं आहे फार फार खरं

नको जगुस तुझं जीवन
तुला कोणी पढवल्याप्रमाणे
जे तुला हवं तेच कर !

रक्त आटव घाम गाळ
या निर्दयी जगाच्या जंगलात
(तरीही) या जखमा नाहीत भरणार

आणि तुला काय वाटत होतं रे?
हे जग खूप छान सुंदर आहे?
तू महामुर्ख बेअक्कल आहेस गधड्या.. !!!

सगळं सोडून दे
इथे तुझ्या अश्रुंची ना कोणाला पर्वा
इथे सार्‍यांनाच आहेत आपापल्या यातना

आहे का हे शक्य तुला?
आहे का हे शक्य तुला?
आहे का हे शक्य तुला?
आहे का हे शक्य तुला?

एकच आहे मार्ग
निसटून जाण्याचा
तुझा आत्मसन्मान दे सोडून
आणि बदल तुझी वृत्ती

माझ्यासाठी तरी हे केवळ अशक्य
माझ्यासाठी तरी हे केवळ अशक्य
माझ्यासाठी तरी हे केवळ अशक्य
माझ्यासाठी तरी हे केवळ अशक्य

अखेरीस, मिळालाच पाहिजे मला माझ्या वाटचा आदर
(ऐकताय ना?)
भल्यासाठी सांगतोय मिळालाच पाहिजे मला माझ्या वाटचा आदर
(ऐकताय ना?)
वृत्ती आणि आदर


दुसरं गाणं म्हणजे असंच मला प्रचंड आवडणारं, हळवं करून सोडणारं.. हजारो वेळा ऐकलं असेल हे गाणं पण ऐकलं आणि डोळ्यात पाणी आलं नाही असं कधीच झालं नाही. 

चिठ्ठी आई है

चिठ्ठी आई है आई है
चिठ्ठी आई है
चिठ्ठी आई है वतनसे
चिठ्ठी आई है

बडे दिनोंके बाद
हम बेवतनोंको याद
वतन की मिट्टी आई है..

उपर मेरा नाम लिखा है
अंदर ये पैगाम लिखा है
ऑ परदेस को जानेवाले
लौटके फिर ना आनेवाले
सात समुंदर पार गया तू
हमको जिंदा मार गया तू
खून के रिश्ते तोड गया तू
आंखमे आंसू छोड गया तू
कम खाते है कम सोते है
बहुत जियादा हम रोते है

चिठ्ठी आई है

सुनी हो गयी शहर की गलियां
काटे बन गई बाग की कालियां
केहते है सावन के झुले
भूल गया तू हम नाही भुले
तेरे बिन जाब आई दिवाली
दीप नही दिल जले है खाली
तेरे बिन जब आई होली
पिचकारीसे छुटी गोली
पिपल सुना पनघट सुना
घर शमशान का बना नमुना
फसल कटी आई बैसाखी 
तेरा आना रह गया बाकी

चिठ्ठी आई है

पेहले जब तू खत लिखता था
कागज मे चेहरा दिखता था
बंद हुआ ये मेल भी अब तो
खत्म हुआ ये खेल भी अब तो
डोलीमे जब बैठी बेहना
रस्ता देख रहे थे नैना
मै तो बाप हुं मेरा क्या है
तेरी मां का हाल बुरा है
तेरी बिवी करती है सेवा
सुरतसे लगती है बेवा
तुने पैसा बहोत कमाया
इस पैसेने देस छुडाया
देस पराया छोडके आजा
पंछी पिंजरा तोडके आजा
आजा उम्र बहोत है छोटी
अपने घरमे भी है रोटी

चिठ्ठी आई है

हा चिठ्ठीचा व्हिडीओ


आणि हा माझा क्षीण प्रयत्न. अर्थात आपल्या मातीतली भाषा असल्याने चुकांची शक्यता (किंचितच) कमी...

पत्र आलं रे

पत्र आलं रे आलं रे
पत्र आलं रे
पत्र आलं रे देशातून
पत्र आलं रे

कितीक दिवसांनी
आम्हा भरकटलेल्यांना
आपल्या मातीची आठवण आली रे 

वरती लिहिलंय माझं नाव रे 
आत निरोप असा आहे रे
बा परदेशी जाणार्‍या तू
परतुनी कधी ना येणार्‍या तू
सात समुद्रापार गेलास तू
आम्हाला जिवंतपणी ठार केलंस तू
रक्ताची नाती तोडून गेलास तू
डोळ्यात पाणी ठेवून गेलास तू
कमी आता खातो कमीच आता झोपतो
खूपच बेटा मी रडतो 

पत्र आलं रे

वैराण झाल्यात गल्ल्या गावातल्या 
काटे बनल्यात कळ्या बागेतल्या
साद घालताहेत झोके श्रावणातले 
विसरलास तू ना आम्ही विसरलो
तुझ्यावाचून आली जी दिवाळी
पणत्या नाही रे, जळलं हे हृदयच रिक्त
तुझ्यावाचून आली जी होळी
पिचकारीतून सुटे रे गोळी
पिंपळपार निस्तेज, ते कारंजंही एकलं
घर जणु स्मशानाचा अवतारच दुसरा
कापणी झाली सरला ऋतू
यायचा बाकी राहिलास रे तू

पत्र आलं रे

पूर्वी जेव्हा तुझं पत्र यायचं
कागदात तुझं रूप दिसायचं
बंद पडला तो रिवाज आताशा
थंड झाला तो आवाज आताशा
छोटी निघाली सासरी जायला
लागले नयन वळूनी पहायला
मी आहे बाप मला दे सोडून
तुझ्या आईचे हाल बघवेना
बायको तुझी करते सेवा
चेहर्‍यावरून भासे विधवा
तू रुपडे तर चिकार कमवलेस
त्या रुपड्यांनी देश गमावलास
देश परका सोडून ये रे
सोनेरी पिंजरा तोडून ये रे
ये रे आयुष्य नाही मोठं फार
आपल्याही घरात आहेत रोट्या चार

पत्र आलं रे

हुश्श...

माझा खो ज्यांनी हे प्रकार यापूर्वीही कैक वेळा आणि अशा खोखो शिवायही अतिशय सहजतेने आणि सक्षमपणे पेलले आहेत त्या मोकळं आकाश वाल्या गौरीला आणि दवबिंदू देवेनला 

35 comments:

  1. टिपीकल सत्यवान फ़्लेवर....

    >>नको जगुस तुझं जीवन
    तुला कोणी पढवल्याप्रमाणे
    जे तुला हवं तेच कर !

    लय भारी...जबराट...

    ReplyDelete
  2. यवगेशा, एवढ्या फास्ट प्रतिक्रिया.. धन्स धन्स :D

    हा (ही) फ्लेवर आवडला हे ऐकून खूप बरं वाटलं..

    ReplyDelete
  3. सत्यवान फ्लेवर....
    शब्द आवडला!
    पण अनुवाद लैच भारी!

    ReplyDelete
  4. हेरंबा बाप माणुस आहेस!!!
    (म्हणजे आदिचा ’बाप’ आहेसच पण व्यक्ती म्हणुनही बाप आहेस!! :) )
    मानले अक्षरश: तुला..... भन्नाट अनुवाद केलायेस.... तू Boyzone चे no matter what ऐकले आहेस का?

    I can't deny what I believe,
    I can't be what I'm not!!

    ते ही असलेच आहे रे भन्नाट!!!

    >>नको जगुस तुझं जीवन
    तुला कोणी पढवल्याप्रमाणे
    जे तुला हवं तेच कर !
    क्या बात है हेरंब!!!!

    चिठ्ठी या प्रकारावरच माझे प्रचंड प्रेम आहे.... अतिशय सुंदर प्रकार आहे तो!! यावेळेसही भारतात गेल्यावर आमच्या पोस्टमन काकांशी गप्पा मारल्या मी!!!
    तू ते गाणे निवडलेस याला कारण तू भारताबाहेर आहेस ईतकेच नसेल असे माझे मत कारण हे गाणे भारतात असतानाही तूला नक्कीच आवडत असणार....

    तू लिहिलेला अनुवाद केवळ जबराट!!!!

    लिहीत रहा रे!!!

    ReplyDelete
  5. सत्यवान फ्लेवर..............


    आणि तुला काय वाटत होतं रे?
    हे जग खूप छान सुंदर आहे?
    तू महामुर्ख बेअक्कल आहेस गधड्या.. !!!

    खरय रे अगदी सुट्टीच्या दिवशी पण सुट्टी नसते या जगात......

    ReplyDelete
  6. मला अजूनही जमलेले नाही . नचिकेत ने खो दिला पण अजूनही काही सुचत नाही.
    बाकी हे जमलं मस्त!

    ReplyDelete
  7. सत्यवान फ्लेवर..
    खरे आहे भौ..
    >>ये रे आयुष्य नाही मोठं फार

    आपल्याही घरात आहेत रोट्या चार

    सहज-सोपा झालाय अनुवाद.

    ReplyDelete
  8. mool gaane chhan ahe. anuvad uttam.
    jamlyas "sandese aate hai " ya bordermadhil ganyacha asaach anuvad karoon bagh

    ReplyDelete
  9. यवगेशचा लय भारी शब्द आहे तो :)
    आभार बाबा..

    ReplyDelete
  10. बाप रे तन्वे... हरभरा भर आभार ;)

    Boyzone चं गाणं ऐकलं नाहीये पण

    I can't deny what I believe,
    I can't be what I'm not!!
    हे जाम आवडलं

    अगदी बरोबर... भारतात असतानाही 'चिठ्ठी आई है' माझं अतिशय आवडतं होतंच आणि भारताबाहेर असताना तर ते जास्तच आवडतं.. एक वेगळीच हुरहूर जाणवते ते ऐकताना...

    जोवर तुम्ही लोक सहन करताय तोवर नक्कीच लिहीत रहाणार ;)

    ReplyDelete
  11. हा हा... अरे "यु'आर फुल ऑफ शिट" चं सोज्वळ भाषेत भाषांतर करताना अजून काय लिहिणार.. ;) मी त्यातल्या त्यात भावना पोचवण्याचा प्रयत्न केला.. अरेरे, विकांताच्या कामाचा राग अजूनही गेला नाही वाटतं डोक्यातून.. :)

    ReplyDelete
  12. अनेक आभार, नचिकेत.

    ReplyDelete
  13. धन्स काका.. अहो मलाही जमेलसं वाटत नव्हतं. पण लिहायला बसलो आणि गेलं जमून..

    तुम्ही मागे बझवर सांगितलेल्या तुमच्या आवडत्या जुन्या इंग्लिश गाण्यांचा अनुवाद करा ना.

    ReplyDelete
  14. खूप आभार मीनल...

    असाच आपला लोकल फ्लेव्हर ग.. :)

    ReplyDelete
  15. चंद्रशेखर, ब्लॉगवर मनःपूर्वक स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल खूप आभार.

    "संदेसे आते है" हेही साधारणतः त्याच धर्तीचं गाणं आहे. प्रयत्न करून बघतो..

    ReplyDelete
  16. सत्यवाना, लय झ्याक अनुवाद केला की राव. आटिट्यूडचा हा वीडियो जाम आवडतो, गिटार ऐकून पाय थिरावतात आणि कितीक दिवसांनी आम्हा भरकटलेल्यांना आपल्या मातीची आठवण आली रे ...वाह पेटलायस एकदम :)

    ReplyDelete
  17. तू ही पोस्ट टाकलेली काल रात्री एक वाजता मी पाहीली पण तेव्हां डोळे -डोके व मन टोटल असहकार मूड मध्ये होते....

    आत्ता जरा हुश्श करून टेकले ती थेट चिठ्ठीवरच मन उतरले. ( माझं गाण्ं पळवलं... :( ) मस्तच झालेत रे दोन्ही अनुवाद.

    सत्यवान फ्लेवर... एकदम पर्फेक्ट उपमा. :)

    आता तू सुटलास पण विभीने कधीचा मला खो दिलायं... आणि मी अजूनही लटकलेलीच आहे. कुछ तो ढुंढनाच पडेगा अभी... पर डोका कामच नही करतायं नं....

    ReplyDelete
  18. कसं काय इतकं छान लिहायला जमत बुवा! मी बरेचदा तुझा ब्लोग वाचते, पण प्रतिक्रिया द्यायचा मुहूर्त आज लागला...छानच आहे सत्यवानाची वटवट!!!

    ReplyDelete
  19. भारी रे ...पण मला का अडकवलस हया चक्रव्युहात... :)

    ReplyDelete
  20. मला Attitude चा अनुवाद खूप खूप आवडला.
    तुझ्या ह्या अनुवादासाठी धन्यवाद रे

    ReplyDelete
  21. सुझे, आभार्स :) .. चला तू पण अ‍ॅटीट्युड चा पंखा आहेस तर.. सहीच..
    अरे आणि चिठ्ठी तर सदैव डोक्यात असतेच !

    ReplyDelete
  22. हाहाहा श्रीताई... समहाऊ मला इंट्युशन होतं की आपली चिठ्ठी पळवली जाणार त्यामुळे त्या रात्री १ वाजेपर्यंत जागून पोस्ट टाकून दिली.. वाचलो.. हेहे.. अग तुझं कलेक्शन एवढं भारी आहे. तुला चिक्कार गाणी/कविता मिळतील मावसबोलीतल्या.. आभार..

    हो.. हा नवीनच फ्लेव्हर काढलाय योग्याने.

    खरंच सुटलो मी.. तुही लवकरच सुटशील पण एकदम भारी अनुवाद टाकून.. :)

    ReplyDelete
  23. दिपाली, हरभऱ्याचं पीक जास्त झालंय यंदाच्या हंगामात ;)

    एकुणात बरेच मूक वाचक दिसताहेत.. ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट (आणि प्रतिक्रियाही) देत रहा..

    ReplyDelete
  24. आभार देवेन..

    >> पण मला का अडकवलस हया चक्रव्युहात... :)

    याचं कारण हे आहे..

    http://davbindu.wordpress.com/category/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/

    थोडक्यात आम्ही अडकवणारे कोण. तू आधीपासूनच अडकलेला होतास. हम तो सिर्फ निमित्तमात्र है.. ;)

    ReplyDelete
  25. सागरा, खूप खूप आभार आणि धन्यवादासाठी अजून जास्त आभार :)

    ReplyDelete
  26. खूप सुंदर छान आवडला

    ReplyDelete
  27. हेरंब मराठीत प्रतिक्रिया द्यायची म्हणून थांबले आणि जरा जास्तच उशीर झाला बघ....हे मी पहिल्यांदा वाचलं तेव्हा तुझं ते "फक्त आठवडाभर कर जरा मेहनत या वास्तव जगात म्हणजे कळेल मग" अक्षरश: जगून आले होते..माझ्या लेटेस्ट पोश्टेवरुन लक्षात आलं असेल...
    त्यानंतर आज घरुन आलेलं पार्सल आणि चिट्ठी वाचली आणि या ब्लॉगवर आलेय..काय लिहू तुझ्या चिट्ठीबद्द्ल?? आईच्या हातची गुळपापडी हातात घेताना आत्ता तू फ़ोन केलास तर एक शब्दही बोलु शक्णार नाहीये मी...
    मला वाटतं माझा खो तू नेहमीस सार्थकी लावतोस सो तुला नेहमीचं टार्गेट करणार यापुढे....

    ReplyDelete
  28. चला.. खो देणारीला खो आवडला ना... झालं तर मग.. तुझी लेटेष्ट दगदग पोस्ट वाचली आणि कळली तुझी आठवडाभराची मेहनत आणि २६ तासांचा प्रवासही :) .. म्हणून जर्सीहून उडायचं.. कळलं? ;)

    >> मला वाटतं माझा खो तू नेहमीस सार्थकी लावतोस सो तुला नेहमीचं टार्गेट करणार यापुढे....

    अजून काय प्रकार शिल्लक राहिलेत खो चे?

    ReplyDelete
  29. मस्तच रे.... :)
    Sorry for cmmntng tooo late....!!!

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...