Tuesday, August 3, 2010

सि... : भाग १

मी जे ट्राय करणार आहे तो प्रॉपर वे आहे का, ती प्रोसेस राईट आहे का, खरंच असं होईल का, झालं तरी मला हवे तसे रिझल्ट्स मिळतील का, काहीतरी विअर्ड होणार नाही ना, हा माझा क्रेझीनेस तर नाही ना असे ब्रेनमधले थाउजंडस ऑफ क्वेश्चन्स फर्मली साईडट्रॅक करून मी माझ्या डेस्कवर बसलो. उजव्या रिस्टवरचं बटन दाबून ब्रेनटॉप ऑन केला. लेफ्टआय व्हयू थोडा अ‍ॅडजस्ट करावा लागला नेहमीप्रमाणेच.. "काही झालं तरी हा लेफ्टव्हयू रिपेअर करायचाच उद्या" गेल्या टेन डेजमध्ये फिफ्टी टाईम्स केलेलं सेल्फप्रॉमिस मी फिफ्टीफर्स्ट टाईम केलं. एव्हाना पूर्ण रूममध्ये एकदम ब्राईट ब्लु लाईट पसरला होता. एकदा लास्ट टाईम यस/नो यस/नो च्या ड्युएलशी फाईट देत देत आईज मिटून घेतले. ऑलमोस्ट टेन मिनिट्स तसाच बसून जरा करेज आल्यावर फायनली ती 'माईंड-चेट'ची स्टिक ड्रॉवरमधून बाहेर काढली आणि रिस्ट-स्टिकला जोडली आणि........ त्यावरचा रेड स्वीच ऑन केला.. ब्रेनमध्ये फ्यु अ‍ॅंटस पळाल्यासारखं वाटलं आधी. नंतर त्या अ‍ॅंटस वाढत गेल्यासारखं वाटलं.. पण कपल ऑफ मिनट्सच.. मग सगळं शांत झालं. नंतर ग्रेट डिफिकल्टीने लक्षात ठेवलेले ते सिक्स वर्ड्स व्हिस्पर केले. "शिरीष आगत्, शिरीष ये, शिरीष आओ." फ्यु मिनिटस काहीच झालं नाही. सम टाईमनंतर अगेन त्या अ‍ॅंटस हलल्यासारखं फील झालं आणि सडनली त्या ब्लु लाईटला कट करत करत एक ग्रीन रे समोरच्या व्हाईट वॉलवर पडला. आधी वॉलवर ग्रीन डॉट दिसला आणि तो हळू हळू मोठा होत गेला. इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे एक्झॅक्टली यावेळी मी अगेन आईज क्लोज केले. एक्झॅक्टली आफ्टर थ्री अ‍ॅंड हाफ मिनटस आईज ओपन केले आणि डायरेक्ट समोरच्या वॉलकडे बघितलं. एका ओल्डीचा चेहरा वॉलवर दिसत होता. तो खूप टायर्ड वाटत होता. बाल्डी, खूपच विक, आईजखाली डार्क सर्कल्स.. पुअर चॅप. अ‍ॅन ओल्ड पुअर चॅप. आय वॉज नॉट शुअर वेदर ही कुड हेल्पड मी.. बट तरीही मी तसं काही दिसु दिलं नाही. ओल्डी एकटक माझ्याकडे बघत होता.

**

"तू काय डिसाईड केलं आहेस फायनली?"
"कशाबद्दल?"
"यु नो मी कशाबद्दल बोलते आहे ते."
"?"
"ऑफ कोर्स तुझ्या थिसीस बद्दल, डॅम इट."
"आय थिंक मी तुला ऑलरेडी कल्पना दिली आहे. माझा डिसिजन फायनल आहे."
"देन आय होप तुझ्याही हे लक्षात असेल की यु आर ऑल अलोन. ऑल बाय युअरसेल्फ. नोबडी इज ऑन युअर साईड ऑफ द टेबल."
"नो वरीज. आय नो ते कसं हँडल करायचं. आय रिअली नो!!"
"का हा क्रेझीनेस? कशासाठी? यु टू नो की या टॉपीकवर इनफ रिसर्च झालेला आहे. एव्हरीबडी नो द रिझल्ट्स. हाऊ इज युअर सो कॉल्ड रिसर्च इज गॉन्ना चेंज द डॅम हिस्टरी. मला तर नीट आयडियाही नाहीये की तू यावर रिसर्च कसा करणार आहेस. इम्पॉर्टंट ऑफ ऑल थिंग्स, तुला गाईडही मिळणार नाही त्या डॉ. वाँग शु शिवाय इतर कोणी. अ‍ॅंड यु नो ही इज द क्रेझीएस्ट क्रिएचर अलाईव्ह.
"माईंड युअर लँग्वेज.. प्लीज !!"
"सॉरी. पण या क्रेझीनेसपायी तू तुझं करिअर स्पॉइल करू नयेस एवढीच इच्छा आहे."
"डोंट वरी. आय वोन्ट. पण माझा डिसिजन पक्का आहे."
"गुड बाय देन."
"गुड बाय."

**

"गुड मॉर्निंग, डॉ. वाँग शु"
"ओह, नीच, कम ऑन इन"
"नॉट नीच,सर.. नीश"
"या या व्हॉटेव्हर.. ओके लिसन. आय डोंट हॅव मच टाईम. रशिंग फॉर अ लेक्चर. आपलं माईंडफोनवर झालेलं डिस्कशन तुझ्या लक्षात असेलच. हे ते डिव्हाईस, हे त्याचं मॅन्युअल व्हिच आय अ‍ॅम शुअर यु वोन्ट नीड. तरीही जस्ट इन केस... ही इंटरप्रिटर स्टिक. धिस इज मस्ट.. या सगळ्या थिंग्स नीट कनेक्ट झाल्या आणि तू म्हणतोस त्याप्रमाणे 'तो' जर खरोखर एक्झिस्ट करत असेल तर तो नक्की येईलच. तो आला की माझी रिस्पोन्सिबिलिटी संपली. तो आल्यावर काय करायचं, त्याच्याशी काय बोलायचं हे टोटली तुझ्यावर आहे. यावर तुझा मन्थ्स ऑफ स्टडी, रिसर्च डिपेंड आहे.. त्यासाठी नेसेसरी असणारी इन्फर्मेशन त्याच्याकडून कशी एक्स्ट्रॅक्ट करायची, तुझ्या थिसीसमधले इन्फर्मेशन लुपहोल्स फील करण्यासाठी ती कशी युज करायची, अनअ‍ॅन्सर्ड क्वेश्चन्स कसे क्लिअर करून घ्यायचे हे सगळं सगळं अपटू यु आहे. इथे गाईड म्हणून माझं काम संपतं. तुला जे काही करायचं आहे ते कर बट बी क्विक."
"थँक्स अ टन्स डॉक.."
"आय रिपीट, बेटर बी क्विक.. तुझ्याकडे फक्त टू मन्थ्स आहेत.. आय विश यु अ लक दो... कीप इन माईंड युअर थिसीस सबमिशन डेट इज स्टील जून फर्स्ट २५१०.... नॉट २५११... हे हे हे"
"हो सर.. लक्षात आहे."

**

आय वॉज नॉट शुअर वेदर ही कुड हेल्पड मी.. बट तरीही मी तसं काही दिसु दिलं नाही. ओल्डी एकटक माझ्याकडे बघत होता.

"हाय"
".."
"आर यु अ 'शिरीष' ड्युड?"
".."
"कॅन यु हिअर मी?"
"तू कोण आहेस?"
"सॉरी. व्हॉट?"
"हे काय चाललंय?"
"व्हॉट?? ओह शूट !!! वेट.. जस्ट अ सेक.. लेट मी इन्सर्ट दॅट डॅम इंटरप्रिटर स्टिक." एवढी इम्पॉर्टंट थिंग मी कशी विसरलो असा विचार करत मी ती इंटरप्रिटर स्टिक रिस्ट-स्टिकला कनेक्ट केली. फॉर अ मोमेंट ब्रेनमधल्या अ‍ॅंटस पुन्हा हलल्यासारख्या वाटल्या. पण सगळं लगेच नॉर्मलही झालं.
"नमस्कार, हाय.. तुम्ही शिरीष आहात का?"
"अं? हो.. सॉरी माझं डोकं जरा जड झाल्यासारखं वाटतंय."
वॉव. द इंटरप्रिटर स्टिक वॉज इंडीड वर्किंग..
"तुम्हाला त्रास होतोय का?"
"थोडा.. पण आता ठीक आहे. हे सगळं काय आहे नक्की?"
"सांगतो. मला तुमची मदत हवी आहे. खूप महत्वाचं काम आहे माझं तुमच्याकडे."
"मदत? मी काय मदत करणार?"
"सगळं सांगतो. पण त्यापूर्वी एक. तुम्हाला आता माझं बोलणं व्यवस्थित कळतं आहे ना?"
"हो आधीपेक्षा कैक पटींनी उत्तम. आधीचं ते इंग्लिश, चायनीज, उर्दू किंवा अशा अनेक विचित्र भाषांचं मिश्रण वाटत होतं. काहीच कळत नव्हतं."
"सॉरी. हल्ली या सगळ्या भाषा इतक्या मिसळल्या गेल्या आहेत ना एकमेकीत की आपोआपच इंग्लि-चायनीज भाषाच जास्त वापरली जाते. आणि आता मलाही तुमचं बोलणं अगदी नीट कळतंय. तुम्ही बोलताय ती कुठली भाषा आहे नक्की?"
"अरे ही मराठी भाषा आहे. माझी मातृभाषा." त्याचा फेस स्लाईटली शाईन झाल्यासारखा वाटला. "आणि तुझीही बहुतेक."
"ओक्के.. ठीके.. आता मी तुम्हाला पहिल्यापासून सगळं सांगतो. मी नीश उर्फ रजनीश चाफेकर. 'हिस्टरी युनिव्हर्सिटी ऑफ अर्थ' मधून प्राचीन इतिहासावर पीएचडी करतो आहे. त्यासाठी मला तीन प्रबंध सादर करायचे आहेत. पहिल्या दोन प्रबंधांचं काम झालं आहे. त्यासाठी मला भरपूर स्टडी मटेरियल मिळालं, गाईड्सही चांगले लाभले. तिसर्‍या प्रबंधासाठी एक विषय माझ्या डोक्यात होता पहिल्यापासून. डॅडकडून ऐकलं होतं थोडंसं. पण त्याचीही माहिती ऐकीवच. म्हणून बरीच माहिती शोधायचा प्रयत्न केला. बरीच माहिती मिळालीही पण विसंगत. मी या विषयाचा जेवढा अभ्यास केला आहे किंवा जेवढा त्याच्या मुळाशी गेलो आहे त्यानुसार मला ही माहिती अपूर्ण, अर्धवट किंवा एकसुरी वाटली. का त्याची कल्पना नाही. कदाचित मी चूकही असेन पण तरीही. त्यामुळे मी अजुनअजून माहिती शोधत गेलो. असंख्य ग्रंथ धुंडाळले. थोडेफार धागेदोरे हाताशी लागले. या विषयासाठी गाईड म्हणून मदत करायलाही कोणी तयार होईना. सर्वांच्या मते  हा एक डेड सब्जेक्ट होता. एक दिवस अचानक मला डॉ. वाँग शुं चं नाव कळलं. फोनवरून त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मी त्यांना भेटायला जाऊन थडकलो. त्यांना सगळं एक्स्प्लेन केलं. मला काहीही झालं तरी हाच विषय कसा घ्यायचा आहे आणि त्यासाठी मला गाईड कसा मिळत नाहीये हे मी त्यांना सांगितलं. त्यांनीही सगळं ऐकून घेतलं. त्यांच्याकडची या विषयावरची १०-१२ पुस्तकं दिली आणि म्हणाले...
"ही पुस्तकं तू वाचच पण तरीही सांगतो. त्याने विशेष काही फायदा होणार नाही. तुला हवी असलेली माहिती तुला कुठल्याच पुस्तकात मिळणार नाही. जी मिळेल ती अर्धवट, बनावट, निखालस खोटी असेल. त्या माहितीच्या आधारावर जरी तू प्रबंध लिहिलास तरी तो म्हणजे अशा ऐकीव, अर्धवट माहितीवर आधारित असंख्य प्रबंधांमध्ये फक्त एक भर टाकणारा ठरेल. तुला डॉक्टरेट मिळेल पण त्या विषयाला, त्याच्या अवाक्याला अजिबात न्याय मिळणार नाही."
"अशक्य. मी हे करू शकत नाही. तुम्ही चुकीची, अर्धवट माहिती कुठे मिळेल हे सांगितलंत. पण त्याची काहीच आवश्यकता नव्हती. ती मला कुठेही मिळाली असती. मी तुमच्याकडे आलोय ते खास कारणासाठी. ते कारण म्हणजे तुम्ही ही जी खरी माहिती म्हणता आहात ती फक्त तुम्हीच पुरवू शकता असं मला अनेकांकडून कळलं आणि म्हणूनच मी इथपर्यंत आलो. त्या माहितीशिवाय माझ्या प्रबंधाला काहीही अर्थ नाही. मी खोट्या  माहितीच्या आधारे प्रबंध लिहिणार नाही. प्लीज मला ती माहिती द्याल का? प्लीज.. प्लीज.."
"माझ्याकडेही ती माहिती नाही."
"काय?? म्हणजे?"
"हो. ती माहिती माझ्याकडेही नाही पण ती कशी मिळवायची याचा उपाय मात्र आहे. तो उपाय मी तुला सांगू शकतो."
"चालेल. तो उपायही चालेल. काय करावं लागेल मला?"
"नीट लक्ष देऊन ऐक. मी तुला जे सांगतो आहे ते तुला चमत्कारिकही वाटू शकतं. पण त्याला इलाज नाही."
"चालेल. चमत्कारिकही चालेल."
"नीट ऐक. सुमारे साडेपाचशे-सहाशे वर्षांपूर्वी त्यावेळच्या आशिया खंडात एक जरा विचित्र वाटणारी अशी पद्धत अस्तित्वात होती. लोक आपल्या मृत झालेल्या नातेवाईकांशी, त्यांच्या आत्म्यांशी संभाषण साधू शकत असत."
"काय? म्हणजे?"
"म्हणून मी तुला आधीच म्हटलं की हे जरा चमत्कारिक वाटेल. असो. तर त्या क्रियेला ते प्लान्चेट म्हणत असत. अनेकांचा त्यावर विश्वास नव्हता. बरेचजण त्याला 'प्लान करून चिट करणे' असंही म्हणत गंमतीने. पण तरीही अनेकांचा त्यावर विश्वास होताच. कालांतराने ती प्रथा बंद पडली. काही वर्षांपूर्वी त्या प्रथेविषयी माहिती देणारं एक पुस्तक अपघातानेच माझ्या हाती लागलं. ते पूर्ण वाचून आपल्यालाही असं काही करता येईल का असं वाटून मी ती पद्धत थोडी मॉडीफाय करून नवीन पद्धत शोधून काढली. ब्रेन-चेट नावाची. काही आत्म्यांना बोलावून मी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा यशस्वी प्रयत्नही केला. इट वर्क्ड.. इट वर्क्स.. !!"
"वॉव !! काय सांगता काय.. !!"
"पण या पद्धतीत दोन छोटे बग्स आहेत ते मला सॉल्व्ह करता आले नाहीत. एक म्हणजे माझ्या या पद्धतीनुसार फक्त ब्लड रिलेशनमधल्या व्यक्तीशीच संपर्क साधता येऊ शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त पाचशे वर्षंच मागे जाता येतं. थोडक्यात पाचशे वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या आणि तुझ्या ब्लड रिलेशन मध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीशी तू ब्रेन-चेट मार्फत संवाद साधू शकतोस. पण अशी विचित्र पद्धत एका पीएचडी थिसीसचा बेस म्हणून वापरणं हे कसं योग्य/अयोग्य आहे याची मला कल्पना नाही. पण तुझा थिसीस लिहिण्यासाठी आवश्यक ती खरी.. लक्षात घे खरी माहिती मात्र या पद्धतीतून नक्कीच मिळेल. अर्थात हा माझा प्रयोग मी कोणालाही सांगितलेला नाही कारण कोणालाच ते पटणार नाही किंवा कोणी त्यावर विश्वासही ठेवणार नाहीत. असा काही प्रयोग मी करणार होतो, केला होता अशी कुणकुण काही लोकांना लागली होती. पण त्या बातम्यांविषयी मी कधीच काहीच भाष्य केलं नाही. त्या बातम्या स्वीकारल्या नाहीत की नाकारल्या नाहीत."
"थँक्स डॉक.. थँक्स अ टन..!!"
"ऑल द बेस्ट, माय बॉय..!"


"पण तू कसला एवढं रिसर्च करतो आहेस? तुझ्या रिसर्चमध्ये मी तुला काय मदत करणार? तुझ्या रिसर्चचा विषय काय आहे? आणि त्या रिसर्चशी माझा कसा आणि काय संबंध?"

-- क्रमशः

- भाग २ इथे  वाचा.

22 comments:

 1. एक गोष्ट सांगू?

  पुढल्या भागाची वाट बघतोय,
  मला पण कोणा मृत आत्म्याशी असा बोलायला आवडेल रे :)

  ReplyDelete
 2. पण हा आत्मा जरा वेगळा आहे रे.. कळेलच उद्याच्या भागात :)

  ReplyDelete
 3. नक्कीच, वाट बघतोय :)

  ReplyDelete
 4. अरे वा! हटके झालेयं रे. पुढच्या भागाची वाट पाहतेय. :)मराठी आत्मा आहे तेव्हां.... केशवकुमार इस्टाईलमें शालजोडी, की ठाकरेबाजी.... का बारा-मातीकर...:D मला बाबा सावरकर-टिळक आवडेल.


  एकेकाळी हे प्लॅंचेट फारच बोकाळलं होतं. मला आठवतेयं, बहुतेक मी सातवीत असेन.... शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक छोटुशी नाटुकलीही सादर केली होती. स्टेजवर मेणबत्त्या, पाट त्यावर उपडी वाटी आणि १ ते १० आकडे व अल्फाबेट्स... एकदम काहितरी भन्नाट वाटले होते. :D

  ReplyDelete
 5. पुढील भाग येउ द्या....च्यामारी हे क्रमशः नव्हत तर आयुष्य कस सपक झाल होत...डोक्यात कसलाच भुंगा भुण भुणायचा नाही....झाल आता परत "क्रमशः" नावाच्या भुंग्या मुळे आयुष्य चटपटीत झाल..:) :)

  ReplyDelete
 6. wow.. जाम interesting आहे!
  मस्त लिहीलं आहे एकदम.. पुढचा भाग लवकर टाक

  ReplyDelete
 7. ऍक्चुअली मॉर्निंगला जरा घाईतच पोस्ट रिड केलं, लिटिल कन्फ्युज झाले आधि जरा वर्क पेंडिंग होतच किचनमधे, मग डिसाईड केलं दुपारी जरा निवांतपणे पुन्हा रिड करावे... :)

  नाउ व्हेन आय हॅव डन विद द रिडिंग मग कमेंट लिहायला स्टार्ट केलं....

  तर राजे मला क्रमश: झेपत नाही त्याबद्दल आधि णीशेढ!!!
  पण वेगळाच विषय आणि मस्त मांडतोयेस त्याबद्दल तो णिशेढ जरा सौम्य..:)
  पुढच्या भागाची वाट पहातेय... लवकर लिहा!!!

  ReplyDelete
 8. क्रमशः निषेध!
  लवक्र येऊ द्या!

  ReplyDelete
 9. आला.. पोरगा फोर्मात आला... :) कथा चांगली घेतली आहेस लिहायला.. आता पूर्ण झाली कीच प्रतिक्रया देइन... आणि हो कालच नाणेघाटच्या पोस्टमध्ये टाइम मशीन मध्ये बसून ३५० वर्ष मागे जाण्याची इच्छा व्यक्त केली होती... :)

  ReplyDelete
 10. इंटरेस्टींग आहे... लवकर पुढचा भाग येऊ दे....

  ReplyDelete
 11. श्रीताई, धन्स..

  तू दिलेले ऑप्शन्स सही आहेत एकदम. पण उत्तर 'यापैकी नाही' असं आहे :) .. मी पुन्हा एकदा वाचून बघितलं तेव्हा मलाही तुझे ऑप्शन्स पटले. पण पुढच्या भागात जे घडणार आहे त्याची (एकूण विषयाची) एक अगदी छोटीशी हिंट मी दिली आहे या भागात.. असो नाहीतर दुसरा भाग टाकतोय लवकरच..

  माझ्या आजीला, तिच्या बहिणीला वगैरे जाम वेड होतं या प्लांचेट प्रकारचं. मी लहान असताना बऱ्याचदा हे प्रकार झाले आहेत आमच्या घरी :)

  ReplyDelete
 12. हाहा योगेश.. आभार्स.. जास्त चटपटीत होणार नाहीये आयुष्य. पुढच्या भागातच संपेल कथा :)

  ReplyDelete
 13. खूप आभार जास्वंदी.. आज टाकतोय पुढचा भाग.

  ReplyDelete
 14. हा हा हा हा .. तन्वे, ते तसलं तोडकं मोडकं लिहिताना मला किती त्रास झाला असेल हे आलं ना आता तुझ्या लक्षात..

  अग क्रमशः केलं नसतं तर खूपच मोठी झाली असती कथा. आणि मोठे लेख/कथा वाचताना लोक कंटाळतात. आणि अर्थात पुढचा भाग नीट तयारही नव्हता काल.. आता ऑलमोस्ट तयार आहे. थोड्या वेळाने टाकतो.. विषय जास्त वेगळा वाटणार नाही कदाचित.. पण हो मांडणी जरा वेगळी करण्याचा प्रयत्न केला आहे.

  ReplyDelete
 15. येणार येणार बाबा.. थोड्याच वेळात..

  ReplyDelete
 16. धन्यवाद (तुला धन्स आवडत नाही म्हणून पूर्ण लिहिलंय बघ :) ) रोहणा.. जरा वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

  हो ते वाचलं.. पण कथेतल्या काळाप्रमाणे ३५० वर्षं मागे गेलास तर तू (आजच्या) वर्तमानकाळात येशील परत.. लोल ;)

  ReplyDelete
 17. धन्स आनंदा. आज टाकतोय पुढचा भाग.

  ReplyDelete
 18. वाट पाहतोय दुसर्‍या भागाची
  काहीतरी हटके लिहीत आहेस आवडल.
  "उजव्या रिस्टवरचं बटन दाबून ब्रेनटॉप ऑन केला. लेफ्टआय व्हयू थोडा अ‍ॅडजस्ट करावा लागला नेहमीप्रमाणेच.. "काही झालं तरी हा लेफ्टव्हयू रिपेअर करायचाच उद्या"
  या वाक्यापासून कथा आवडली आहे.अजून ताण तुझ्या कल्पनाशक्तीला
  अन येवू देत भन्नाट हॉलिवूड मध्ये दाखवतात तस

  ReplyDelete
 19. :) आभार सागरा.. पण भाग २ पूर्णतः वेगळा आहे रे.. हे सुरुवातीचं सायफाय प्रकरण फक्त तोंडी लावण्यापुरतं आहे.. अँटमॉसफिअर क्रिएट करण्यासाठी.. मूळ विषय खूप वेगळा आहे..जरा वेळाने टाकतोय दुसरा भाग.. कळेलच तुला :)

  ReplyDelete
 20. मस्त...
  आता पुढील भाग वाचतोय....................

  ReplyDelete

हिंसक आंतरराष्ट्रीय राजकारणाचं प्रत्ययकारी चित्रण : 'राजकीय हत्या'

आपल्या (तथाकथित!) सुसंस्कृत समाजात नियमितपणे घडणाऱ्या मोर्चे ,  धरणी , आंदोलनं यांसारख्या घटना किंवा अगदी सार्वजनिक उत्सव , समारंभ , मिरवणुक...