मेलवर फॉरवर्ड होत होत, फिरत फिरत एक मस्त लेख मागे मेलबॉक्समध्ये आला होता. मेलवरून फिरत फिरत तो एक दिवस बझवर येऊन पोचला. आपल्या सचिन (तेंडुलकरांच्या) विषयीचा हा लेख टाईम मॅगझिनमध्येही आला होता (बहुतेक).. तर हा लेख बझवर पोचल्यावर आपल्याच सचिनने (पाटलांच्या) "तो मराठीत अनुवाद करून ब्लॉगवर टाक ना" अशी फर्माईश केली. सचिनसाठी (आणि कुठल्याही सचिनभक्तासाठी) जी-जान हजर करायला तयार असलेल्या माझ्यासारख्याला ही कल्पना जाम आवडली. तसंही नुकतंच त्या मावसबोलीतल्या कवितांच्या अनुवादाच्या खोखोचं भूत डोक्यावर बसलेलं होतंच. त्यामुळे त्याच मुडात झटपट हाही अनुवाद करून टाकला. पण घाबरू नका कारण
१. मूळ लेख वाचलाच पाहिजे अशी कळकळीची विनंती आणि महत्वाची अट असली तरीही अनुवाद वाचलाच पाहिजे अशी [(पाटलांचा) सचिन सोडून] कोणालाही अट नाही.
२. हा कुठल्याही प्रकारच्या खोखोचा उगम नाही. त्यामुळे वाचून झाल्यावर शेवटच्या ओळीत पुढच्या खो साठी आपलं नाव तर नाही ना अशी धास्ती न बाळगता बिनधास्त वाचता येण्याची हमी आहे.
३. खरं तर यात चुकण्यासारखं काहीही नसलं तरीही हा अनुवाद १००% अचूक आहे याची कुठलीही शाश्वती नाही आणि त्यामुळे तसा काही दावाही नाही.
पुणेरी पाट्या समाप्त. लेखन चालू.
मूळ लेख :
व्हेन सचिन तेंडुलकर ट्रॅव्हल्ड टू पाकिस्तान टू फेस वन ऑफ द फायनेस्ट बॉलिंग अटॅक्स एव्हर असेंबल्ड इन क्रिकेट, मायकल शुमाकर वॉज येट टू रेस अ एफ१ कार, लान्स आर्मस्ट्रॉंग हॅड नेव्हर बीन टू द टूर दी फ्रान्स, दिएगो मॅरादोना वॉज स्टील द कॅप्टन ऑफ अ वर्ल्ड चँपियन अर्जेंटिना टीम, पीट सँप्रस हॅड नेव्हर वन अ ग्रँडस्लाम. व्हेन सचिन तेंडुलकर एम्बार्क्ड ऑन अ ग्लोरियस करिअर टेमिंग इम्रान अँड कंपनी, रॉजर फेडरर वॉज अ नेम अनहर्ड ऑफ; लिओनेल मेसी वॉज इन हिज नॅपीज, युसेन बोल्ट वॉज अॅन अननोन कीड इन जमैकन बॅकवॉटर्स. द बर्लिन वॉल वॉज स्टील इनटॅक्ट, यु एस एस आर वॉज वन बिग, बिग कंट्री, डॉ मनमोहन सिंग वॉज येट टू ओपन द नेहरूविअन इकॉनॉमी. इट सीम्स व्हाईल टाईम वॉज हॅविंग हिज टोल ऑन एव्हरी इंडीव्हिज्युअल ऑन द फेस ऑफ धिस प्लॅनेट, हि एक्सक्युज्ड वन मॅन. टाईम स्टँड्स फ्रोझन इन फ्रंट ऑफ सचिन तेंडुलकर. वुई हॅव हॅड चँपियन्स, वुई हॅव हॅड लिजंड्स, बट वुई हॅव नेव्हर हॅड अनदर सचिन तेंडुलकर अँड वुई नेव्हर विल.
अनुवाद :
ज्यावेळी सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या इतिहासातल्या काही सार्वकालिक सर्वोत्कृष्ट आणि धारदार गोलंदाजींपैकी एकीला सामोरा जाण्यासाठी पाकिस्तानच्या दिशेने रवाना झाला होता त्यावेळी, मायकल शुमाकर तोवर त्याच्या आयुष्यातली एकही एफ-१ गाडीची शर्यत खेळलेला नव्हता, लान्स आर्मस्ट्रॉंगने तोवर एकदाही टूर दी फ्रान्स शर्यतीत साधा भागही घेतलेला नव्हता, त्या क्षणीही दिएगो मॅरादोनाच अर्जेंटिनाच्या विश्विजेत्या फुटबॉल संघाचा कर्णधार होता, पीट सँप्रसला अजूनही आपल्या आयुष्यातलं पाहिलं ग्रँडस्लाम जिंकायचं होतं. ज्यावेळी सचिन तेंडुलकरने इम्रान आणि त्याच्या साथीदारांवर वर्चस्व गाजवून आपल्या दैदिप्यमान कारकीर्दीची सुरुवात केली होती त्यावेळी रॉजर फेडरर हे नाव कोणाच्या कानावरही पडलेलं नव्हतं, लिओनेल मेसी तर लंगोटात बागडत होता, युसेन बोल्ट जमैकाच्या खाड्यांमध्ये खेळणारा एक अज्ञात, सामान्य चिमुरडा होता. बर्लिनची भिंत अद्यापही अतिशय दिमाखात उभी होती, यु एस एस आर (रशिया) तेव्हा एक प्रचंड विराट आणि विशाल असा देश होता , डॉ मनमोहन सिंग यांनी अजूनही नेहरूंच्या काळातली अर्थव्यवस्था 'खुली' केलेली नव्हती.
थोडक्यात या सर्वशक्तिमान अशा काळाने पृथ्वीतलावरच्या प्रत्येक जीवाला तावून सुलाखून घेऊन त्याच्या त्याच्या पदरात त्याचं त्याचं माप पुरेपूर घालत असताना एका माणसाला मात्र यातून (आश्चर्यकारकरित्या) वगळलं. हा महाप्रतापी काळ सचिन तेंडुलकरसमोर नतमस्तक झाला. अनेक रथी झाले, महारथी निपजले परंतु अतिरथीं सचिन तेंडुलकर यापूर्वी कधी झाला नाही आणि यापुढे कधी होणे नाही.
तळटीप : क्र २ ची अट लक्षात आहे हो पण कोणाला जर असेच काही चांगल्या पुस्तकांमधले, उत्तम मासिकांमधले उत्कृष्ट उतारे माहीत असतील तर हा वैयक्तिक खो समजून अनुवाद करून ब्लॉगवर टाकण्याचे करावे ही विनंती.
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
वाह मस्तच रे, मराठीमध्ये वाचला की ते अजुन प्रभावी वाटत...
ReplyDeleteदेवबाप्पाला सलाम
भाषांतर एकदम मस्त...च झालंय. :)
ReplyDeleteबघूया मला काही चांगले लेख वा माहिती मिळाली तर मीही हा खो घेऊन हा स्तुत्य प्रयोग माझ्यापुरतातरी पुढे चालू ठेवतो.
वा फारच छान !
ReplyDeleteनागेश
http://blogmajha.blogspot.com/
हेरंब तुझ्याबरोबरच सचिन पाटलांचेहि धन्यवाद :)
ReplyDeleteमराठीमध्ये वाचला की ते अजुन प्रभावी वाटत... +1
जबर्या रे...
ReplyDeleteसचिन आहेच आपला हिरा!
फारच सुंदर ,झकास सचिन आपला चांगला हिरोच आहे
ReplyDeleteभन्नाट अनुवाद केलायस तू...खूप आवडला.... आणि "अनेक रथी झाले, महारथी निपजले परंतु अतिरथीं सचिन तेंडुलकर यापूर्वी कधी झाला नाही आणि यापुढे कधी होणे नाही..." अगदी अगदी खरय... :)
ReplyDelete:) :) :) :)
ReplyDeleteआमच्या विनंतीस मान देऊन श्री.हेरंब ओक यांनी एक छान अनुवाद आपणास वाचावयास दिल्याबद्दल त्यांचे कैच्याकै कट्ट्यातर्फे हार्दिक आभार ,हार्दिक आभार,हार्दिक आभार.
----------------------------------
अनुवाद लय भारी बर का......
सचिनबद्दल काय बोलायचे...शब्द अपुरे पडायचे...
ReplyDeleteग्रेटच आहे तो...
अनुवाद छान-नेहमीप्रमाणे!
सचिनबद्दल जितक बोलु तितक कमीच रे...बाकी अनुवाद भारीच
ReplyDeleteसचिन सचिन आणि सचिन. एकमेव. सारी खुदाई एकतरफ और अपना सचिन एकतरफ. आणि तो आपला आहे. :)
ReplyDeleteहेरंब, अनुवाद आवडला.
:-)
ReplyDeleteअनुवाद आवडला.
ReplyDeleteतो मूळ लेख भन्नाटच आहे. तो पहिल्यांदा वाचला तेंव्हा भरून आलं होतं. अनुवाद मस्तच. बाकी देवबाप्पाबद्दल काहीच बोलणार नाही.
ReplyDeleteसुंदर रे, मूळ लेखाइतकाच अनुवाद सुंदर झाला आहे.. बेश्ट...
ReplyDeleteHeramb,
ReplyDeleteAnuvad jamla..
Abhinandan, Kalchya `SAKAL' madhye tuze naav v olakh aali aahe. Sakal madhye ek blogers chi olakh mhanun ek column aahe tyamadhye.
Dinesh
भन्नाट अनुवाद ............mi fakt anuwaadach wachala mag jamala tar english pan wachen yaat kay te samaj....:)
ReplyDeletesakal chi link pathaw na....hardik abhinandan...(ani ho aksharala hasu naye....aajakal mala devnagimadhe lihyala wel mileparyant sagala sambhashan samapala asta..)
ReplyDeleteधन्स सुहास.. हो रे मलाही ते जाणवलं. मराठीतून हे वाचताना बाप्पा अजूनच महान वाटतो. !!
ReplyDeleteझम्प्या, ब्लॉगवर स्वागत आणि प्रतिक्रियेबद्दल आभार्स..
ReplyDeleteजरूर... खोसाठी शुभेच्छा.. !!
आभार नागेश..
ReplyDeleteधन्स विक्रम.. पाटीलसाहेबांचे आभार महत्वाचे :)
ReplyDeleteविभी, हा हिरा आपल्या काळात जन्माला आला आणि एवढ्या जवळून त्याचा पराक्रम आपल्याला बघायला मिळाला हे आपलं भाग्यच..
ReplyDeleteआभार काका.. सचिन आहेच हिरो !!
ReplyDeleteधन्यु मैथिली.. :)
ReplyDeleteअतिरथी सचिनची कृपा :)
थोरल्या आणि धाकल्या दोन्ही सचिनरावांचे आभार.. :)
ReplyDeleteआभार सागर.. त्याच अपुर्या शब्दात कसाबसा अनुवाद केला ;)
ReplyDeleteदेवेन, आभार.. खरंय.. कितीही बोललं/लिहिलं तरी समाधान होत नाही..
ReplyDeleteआभार श्रीताई... तो खरंच एकमेव आहे. एकमेवाद्वितीय आहे..
ReplyDelete>> आणि तो आपला आहे.
हे सगळ्यात ब्येष्ट...
सविताताई :)
ReplyDeleteआभार मंदारशेठ.
ReplyDeleteअगदी अगदी.. मीही जेव्हा तो लेख पहिल्यांदा वाचला होता तेव्हा प्रेमातच पडलो होतो लेखाच्या.. आभार सिद्धार्थ..
ReplyDeleteआनंदा, खूप आभार.. !!
ReplyDeleteदिनेश, अनेक आभार..
ReplyDeleteसकाळमधला लेख वाचून आवर्जून कळवल्याबद्दल धन्यवाद..
बाप रे.. अपर्णा, ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे. पण मूळ लेख वाचच..
ReplyDeleteआणि ही 'इ-सकाळ'ची लिंक ... आभार ग :)
नाही. तुझ्या अक्षराला कोणीही हसत नाहीये इथे.. दोन दोन लॅपटॉप्सवर मारामारी करण्यापेक्षा किंचित खराब अक्षर आलं तरी काही बिघडत नाही.. ;)
:) दोन दोन लॅपटॉप्सवर मारामारी khee khee khee....suruch aahe ti.....
ReplyDeleteहा हा.. ते दिसतंच आहे ;)
ReplyDeleteआणि हो.. आधीच्या कमेंटमध्ये लिंक द्यायची राहिलीच..
ही ती लिंक : http://www.esakal.in/ar/220810_blog_it_heramb.aspx
परत वाचतोय रे ही पोस्ट...धन्स रे धन्स. काय वाटत हे वाचताना. यार सचिन तो सचिन आहे बस...
ReplyDeleteधन्स रे सुहास :)
ReplyDeleteमीही आज 'देवबाप्पा सचिन' मधल्या सगळ्या पोस्ट्स पुन्हा वाचल्या आज :)