अरे काय हे? किती पसारा करून ठेवतोस.. सगळीकडे काय तुझ्या वस्तू पसरून ठेवल्या आहेस? आवरणार कोण त्या ? मला काय तेवढं एकच काम आहे का? आणि हे एवढं सगळं आता फटाफट संपवायचं आहे. जरा आवडती भाजी नसली की जेवणाची नाटकं सुरु तुझी. हे बरंय. रोज नवीन नवीन भाज्या कुठून आणायच्या रे? सगळं खायला शिका जरा... काहीही टाकायचं नाही पानात.. !!
अग जाऊदेत.. आपण आहोत ना आवरायला.. त्याने पसारा नाही करायचा तर कोणी करायचा? आणि खाण्याचं काही नाही इतक्यात.. आत्ता त्याला हवं ते खाऊदेत. हळू हळू खायला लागेल तो सगळं...
तो हसतो.. तिचा माझ्याकडे बघून एक तुच्छ कटाक्ष............ पडदा पडतो.
**
बास झालं.. उगाच रात्री जागत बसायचं नाही. वेळेवर झोपा चला.. हे असं जागत बसायचं रात्री आणि मग सकाळी उठायचं नाव नाही.. आणि सारखं काय रे लॅपटॉपशी खेळतोस ? जरा इतर गोष्टींकडेही बघ. लॅपटॉपशिवाय इतरही खेळणी आहेत घरात.. !!!!
अग जागला थोडा तर काय बिघडतंय.. नंतर उठायचंच आहे त्याला लवकर आणि खेळला त्याच्या लॅपटॉपशी तर काय बिघडलं?
तो पुन्हा हसतो. तिचा पुन्हा एकदा माझ्याकडे बघून तुच्छ कटाक्ष................ पुन्हा पडदा पडतो.
**
हे बघ आंघोळीची नाटकं अजिबात चालणार नाहीत. आंघोळीचा कसला रे कंटाळा तुला... इतका आळशीपणा बरा नाही.. !!
ए काहीही काय? त्याची अंघोळीची अजिबात काही नाटकं नसतात हां. उलट जाम आवडते त्याला आंघोळ. मस्त एन्जोय करतो तो.
तिचा 'काय येडं गळ्यात बांधून घेतलंय' अशा अर्थाचा लूक...
अरे हो रे... त्याला आंघोळ आवडतेच.. तसं तर तो विशेष पसाराही करून ठेवत नाही आणि केला तरी त्याचा पसारा आवरायला एवढं काही वाटत नाही. अर्थात जेवणाची नाटकं अधूनमधून करतो तो पण तेही ठीक्के.. रात्री थोडासा जागला तरीही जरा गाणं म्हणून झोपवलं की झोपतो तो... उगाच जागत बसत नाही... आणि त्याच्या खेळण्यातल्या लॅपटॉपचा इतकाही काही त्रास नाहीये. उलट अधूनमधून त्याला कंटाळाच येतो लॅपटॉपचा तेव्हा इतर खेळण्यांशी खेळतो तो. त्याच्याविषयी तक्रारच नाहीये.
तिचा पुन्हा एकदा तुकतुकाट उर्फ तुच्छ कटाक्षांचा सुळसुळाट... तोही त्याचे असले नसलेले ५-६ दात काढून टाळ्या पिटायला लागतो. सगळी मिलीभगत च्यायला...
पुन्हा एकदा पडदा पडतो आणि यावेळी पडद्याबरोबर मीही...
ए टप्पर टप्पर ....
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
भारी.एवढी छोटी पोस्ट का रे?
ReplyDeleteआमचा कार्तिक अंघोळीच्या टब मधून बाहेर काढला की रडण सुरू.
त्याला जाम आवडते आंघोळ.
हम्म....बरचंसं शेम टू शेम....एकदा तिच्या नजरेतूनही ही पोस्ट लिहावी लागेल...:)
ReplyDeleteधन्स सागर..
ReplyDelete>> एवढी छोटी पोस्ट का रे?
अरे मागची पोस्ट खूप मोठी झाली होती म्हणून ही जरा छोटी केली. कॉम्पनसेशन ;) (खरं कारण हे की स्वतःची किती काढून घ्यायची रे पोस्टमधे.. म्हणून मुद्दाम छोटीच ठेवली ;) )
आदितेयलाही प्रचंड आवडते आंघोळ.. त्यालाही टबबाहेर काढलं की नुसती रडारड :)
:) .. अरे वा.. जरूर जरूर.. नेकी और पुछ पुछ !! लिहून टाक पटकन..
ReplyDeleteरच्याक, ही पोस्ट तिच्या नजरेतून लिहिल्यासारखीच आहे. ;)
हेरंब, खरच की जरा चटदिशी आवरते घेतल्यासारखेच वाटले रे. अजून दोन -तीन उदा धावली असती नक्की :)
ReplyDeleteबाळं/कार्ट( हे माझ्या लेकाला उद्देशून आहे बर का.... :D ) कुठल्याही वयाची असोत आम्हां आयांना भारी हौस त्यांना वळण लावायची. मनातून मात्र भारी कौतुक असतं. उघड दाखवायची सोय बा/का व बाबालोकांनी ठेवलेली नाही नं.... नाहितर, " आधीच उल्हास तशात फाल्गून मास अशातली गत होऊन बसायची...."
लहानपणी आवडणारी आंघोळ शिंगे फुटल्यावर अगदी म्हातारवयातही अचानक इतकी का आवडेनाशी होते... या कोड्याचे उत्तर मी गेली अनेक वर्षे शोधतेच आहे.
हम.. खरंय. झालं थोडं चटचट.. काय माहित... एवढंच सुचलं लिहिताना आणि मग थंड.. एकेका पोस्टची एकेक तर्हा.. आधीच्यात फारच लांबण लागली होती :) (आणि खरं कारण सागरला सांगितलंच आहे :P)
ReplyDeleteआमचंही कार्टच आहे ग.. :) ... अनुजाला विचारण्याचं धाडस केलेलं नाहीये पण या सगळ्याच्या सगळ्या तक्रारी नक्की खर्या असतील (माझ्या बाबतीतल्या.. लेकाने काहीही केलेलं चालतं ;) )
मलाही आंघोळीचा प्रचंड कंटाळा आहे. पण नाईलाज्य... म्हणून मग विकांतात उशिरा आंघोळ करून (किंवा गोळी घेऊन) मी तेवढाच जरा बदला घेतो छोटासा.
जरा इतर गोष्टींकडेही बघ. लॅपटॉपशिवाय इतरही खेळणी आहेत घरात.. !!!!
ReplyDeleteआमच्या घरी पण सेम डायलॉग.. सकाळी उठल्या पासून काय लॅपटॉप घेउन बसताय? थोडी कामं करा घरातली. तेवढीच हालचाल होईल शरीराची .. etc.. :)
मस्तच !श्री शी अगदी सहमत..एकदम का आवरते घेतलेस??अजुन एक दोन उदाहरणॆ दिली असतीस...
ReplyDeleteपु.लं च्या भाषेत वळण हे कधी सरळ असु शकते का?? हे माहीत असुनही ते लावायचा अट्टाहास आम्हा आयांना का असतो हे मला ही अजुन समजले नाही...
लॅपटॉप हे सध्या घराघरातील खेळणॆ झाले आहे ह्यात विवादच नाही..आम्हाला ही अशा अनेक सुचना आणि खोचक प्रश्न विचारले जातातच..असो ! मस्त लिहिले आहेस.. as usual.
हा हा काका. घरोघरी मातीचे लॅपटॉप ;)
ReplyDeleteआमच्याकडेही सदैव लॅपटॉपचा उद्धार होत असतो.. बायको तर सवत म्हणते लॅपटॉपला :P
धन्स उमा .. :)
ReplyDeleteफारच लवकर आवरलं असं वाटतंय आता. तसंही खूप मोठी पोस्ट लिहायचं डोक्यात नव्हतं पण हे म्हणजे अगदीच लहान झाल्यासारखं वाटतंय. जमलं तर (आणि काही सुचलं तर) दुसरा भाग टाकतो.. :)
लॅपटॉपला आमच्या घरात (माझ्या दृष्टीने) इतकं महत्व आहे (असं बायकोला वाटतं) की ती म्हणते लॅपटॉप म्हणजे पहिला आदितेय आहे आणि ओरिजनलवाला दुसरा ;)
हेरंब, अगदी मस्त पोस्ट झालीये.
ReplyDelete(सद्या आम्हीं सुखी आहोत म्हणायचं कारण अजून तरी असल् काही ऐकायला मिळत नाही)
पोस्ट छोटी होण्याचं कारण म्हणजे घरात किती शिव्या खातो हे जगाला जास्त कळू न देणं ;)
ReplyDeleteआदितेय रॉक्स!!!!
आंघोळीच्या गोळीबाबत मी सुद्धा तुला सहमत रे... कंटाळवाणा प्रकार आहे तो ;)
संवाद हे ऐकण्यासाठी असतात,काम केलेकी तेवढीच अंगाची व व्यायमाची सवय होते ,आपणच(सर्वानीच लहान मुले सोडून) सवय स्वताच करावी म्हणजे प्रश्नच नाही. प्रसारा हा होणारच त्यात वेशेष काही नाही, लहान मुले प्रसारा करणारच त्यांना तेवढाच आनंद मिळतो,घर घर की कहाणी ,सुंदर अप्रतिम लेख वाटला, लहान मुलांना वेळ काळ नसतो, म्हणून तुकारामांनी म्हटले आहे की लहान पण देग देवा,,,, ,हे काय उगीच नाही,अनुभवाचे लिखाण तुला चांगले जमते,
ReplyDeleteअरे, पसारा लहान मुलांनी नाही करायचा तर कुणी? (हे आत्ता म्हणतेय. आमचं आलं की मीही तुझ्या बायकोच्या पार्टीत जाईन. हे हे!) आंघोळीचा कंटाळा मला पण येतो. लहानपणी मी आईला आंघोळ न करण्याचं कारण ’पाणी वाचवा अभियान’ असं देत असे. लॅपटॉपसारख्या आमच्याकडे डेस्कटॉपला शिव्या पडतात. नवरा त्याला माझा बॉयफ्रेन्ड म्हणतो. म्हणजे हेच खरं - ’घरोघरी त्याच परी’.
ReplyDeletezakkkasss jaaam avdla :)
ReplyDeleteजबर्या म्हण...लेका बोले बापा लागे!
ReplyDeleteउत्तम!
पण खरंच थोडी छोटी झाली पोस्ट!
आभार्स सचिन... सुखी आहेस खरा. पण अजून काही महिने/वर्षंच ;)
ReplyDeleteहा हा हा आनंद.. झाकली मुठ .. ;)
ReplyDeleteअरे तो नेहमीच रॉकत असतो.. वाट आमची लागते.
आंघोळीसारखा कंटाळवाणा प्रकार नाही जगात !!
काका आभार :) दुखरे अनुभव दुसरं काय ;)
ReplyDeleteअग पसार्याचं तर काही विचारू नकोस (म्हणजे आदितेयच्या :) ) .. आपण आवरल्या आवरल्या पुढच्या क्षणी पुन्हा तेवढाच झालेला असतो :) .. हा हा 'पाणी वाचवा अभियान' भारी आहे !!
ReplyDeleteडेस्कटॉप बॉयफ्रेन्ड !! लोल.. आमच्याकडे सवत तुमच्याकडे बॉयफ्रेन्ड हा हा हा.. अगदी 'त्याच परी' आहेत :)
आभार्स विदुला :D
ReplyDeleteधन्स बाबा.. आमच्या छळाच्या कर्मकहाणीतून अशा अनेक नव्या म्हणी जन्म घेतील !!.. असो जरा अतीच होतंय..
ReplyDeleteअरे छोट्या पोस्टचं म्हणशील तर वर सांगितलं तसंच.. जसं सुचलं तसं लिहिलं.. खूप काही लिहायचं डोक्यात नव्हतंच तसंही.. जस्ट त्या डायलॉग्जचा पंच द्यायचा होता.. असो.. पुढची पोस्ट मोठी टाकतो :P
घरोघरी मातीच्या चुली!
ReplyDeleteहा हा मंदार.. खरंय.. :)
ReplyDeleteYou've a SON?????????????????????????????????
ReplyDeleteIndeed :DDDD ..
ReplyDeleteCheck out all the posts with the label आदितेय..
or here u go..
http://www.harkatnay.com/search/label/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AF
ए टप्पर टप्पर ....
ReplyDeletefantastic....
only to laugh is the remedy for all...
this quote applies on your post...
well conversation style n presentation is cool solid!
तुमची ही पोस्ट इतकी छोटी झाली कि मी ३-४ वेळा डबल क्लिक करून पाहिल अजून पुढे काय आहे म्हणून!
ReplyDeleteआता म्हणी बदलायला हव्या-घरोघरी डेस्कटोप/ लेपटोप! आता माती ही गेली आणी चुलीही गेल्या!
पण एकन्दरीत मस्त.
हा हा हा..
ReplyDeleteयोग, इतक्या छान मनमोकळ्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्स !!
अरुणाताई, आभार्स.. आधी जरा मोठी लिहिण्याचा प्रयत्न करत होतो पण मग त्या डायलॉग्जमधे जे मुख्य पंचेस मला अपेक्षित होते त्यांचा परिणाम कमी झाल्यासारखा वाटत होता. म्हणून मग ते डायलॉग्ज केंद्रस्थानी ठेवून बाकीचं अनावश्यक वाटणारं सगळं काढून टाकलं :)
ReplyDeleteघरोघरी डेस्कटॉप/लॅपटॉप हे तर अगदी खरंच :)
:D :D :D
ReplyDeleteलय भार्री...
( Btw, तुझी पोस्ट इतकी छोटी कशी काय??? अरे छोटी पोस्ट publish करणे हे माझ्या सारख्या महाआळशी लोकांचे काम....तुझ्या सारख्या Active लोकांचे नाही... ;) )
धन्स मैथिली :)
ReplyDeleteअग मीही आळशीच आहे पण त्याचा या पोस्टच्या लाम्बीशी काही संबंध नाही. ही पोस्ट एवढीच लिहिण्यात मजा होती. :)
Hhhmm...OKk... :)
ReplyDeleteछान! आपलेच गुण(!) लेकात आले तर त्याची काय बरे चूक?
ReplyDeleteनेहमीप्रमाणेच मस्त पोस्ट
धन्स निरंजन.. हो ना.. ते तर आहेच... म्हणून तर 'लेका बोले' म्हंटलंय :)
ReplyDeleteजो 'त्रास' आपण आपल्या लहानपणी बाबांना देतो तोच आपल्याला बाबा झाल्यावर सहन करावा लागतो.... ए टप्पर टप्पर .... टप्पर टप्पर ....हा हा हा ... !!!
ReplyDeleteहा हा रोहणा.. बरोबर रे.. अगदी तस्साच प्रकार आहे हा :)
ReplyDeleteसगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्याला हा त्रास हवा हवासा वाटतो.
ReplyDeleteअगदी खरं अरुणाताई.. हा त्रास खुपच हवाहवासा आणि आवडीचा.. :)
ReplyDeleteहेरंबा सगळ सविस्तर लिह ना....
ReplyDeleteह्यानंतर आदितेय आणि तुला पडलेल्या फ़टक्यांबद्दल वैगेरे.. :)
असो आदितेय महाराज कि जय...!!!
>>>>अग पसार्याचं तर काही विचारू नकोस (म्हणजे आदितेयच्या :) ) .. आपण आवरल्या आवरल्या पुढच्या क्षणी पुन्हा तेवढाच झालेला असतो :) ....हेरंबा समजू शकते रे...
ReplyDeleteआणि लॅपटॉपच्या वापराबद्दल तुला मागे सांगितलचं होतं ना ’ माझ्यामते माझ्या वैश्विक हजेरीला अधिक महत्व आहे घरातल्या प्रेझेंस पेक्षा’ असे अमितचे मत आहे.... :)
आपण आपल्या दोन कानांचा वापर करत चॅटिंग बिटिंग चालू द्यावे ....
बाकि आदितेय जिंदाबाद!!! :)
देवेंद्रा, आदितेयला फटके? अरे शक्य आहे का..? आणि मला ..... म्म्म्म्म असो.. ;)
ReplyDeleteअग पसारा म्हणजे आमच्या घराचं अविभाज्य अंग झालेलं आहे आता.
ReplyDeleteहाहा आणि अमितचं मत एकदम कैच्याकै भार्री आहे. काही करून ते अनुजाच्या कानावर पडता काम नये याची मला दक्षता घ्यावी लागेल. नाहीतर मलाही तेच दररोज ऐकावं लागेल ;)
>>आपण आपल्या दोन कानांचा वापर करत चॅटिंग बिटिंग चालू द्यावे ....
+१ ;)
:D :D :D मस्स्स्त :D
ReplyDelete:D :D :D.. सौरभ, हाबार्स :)
ReplyDelete