मोठा विकांत असल्याने प्लॅटफॉर्मवर बराच वेळ वाट बघून झाल्यावर मग ट्रेन मिळाली. आत शिरताक्षणी बसायला मिळाल्याबद्दल स्वतःचेच कौतुकसोहळे साजरे करावेत असा काही प्रकार नव्हता. कारण सुट्ट्यांमुळे ट्रेन तशी रिकामीच होती. दिवसभर उन्हात भटकंती झाली होती. दिवसभर फिरल्यामुळे जास्त दमलोय की घामाची आंघोळ झाल्यामुळे असं विचित्र कोडं पडत होतं. ट्रेनमध्ये एसी वगैरे सगळं व्यवस्थित असूनही ते शोभेची वस्तू वाटावं अशी परिस्थिती होती. आमच्या समोर दोन बायका येऊन बसल्या. त्यांच्याबरोबर एक छोटीशी मुलगी होती. ४-५ वर्षांचीच असेल. छकुली अगदी गोड होती. गुलाबी गुलाबी बूट, त्याच रंगाची सशाच्या चेहर्याची गळ्यात अडकवलेली छोटूशी पर्स, मोठ्ठी फुलंफुलं असलेली जीन्स, छान गोल चेहरा. मधेच खुदकन गोड हसायची. छान होती एकदम.
लेकाला खेळवत त्याचं आणि आमचंही लक्ष उकाड्यापासून दूर वळवण्याचा व्यर्थ प्रयत्न आम्ही करत होतो. जरा वेळाने अगदीच घामाघूम झालो. अगदीच असह्य होत होतं. अचानक डोक्यात आलं. त्याचा टीशर्ट काढून टाकला आणि चांगला सैलसा बनियान त्याला घातला. जरा बरं वाटलं त्याला आणि त्यामुळे अर्थातच आम्हालाही. थोडा खेळायला लागला तो. त्याच्याबरोबर आमचीही बडबड, गप्पा, गाणी, खिदळणं चालू होतं. बघता बघता समोरच्या त्या छान गुलाबी बाहुलीशी लेकाची छान गट्टी जमली. तिच्याकडे बोट दाखवून हा खिदळत होता. तीही छान हसून त्याच्याकडे बघत होती. मधेच घामाने थबथबलेला चेहरा जरा कोरडा करावा म्हणून रुमाल काढला आणि चेहरा खसाखसा पुसत असताना अचानक एक गोष्ट जाणवली जी इतक्या वेळ बघूनही लक्षात आली नव्हती. छान गुलाबी बूट, गुलाबी पर्स, गोल चेहरा आणि .... आणि त्या चेहर्याभोवती घट्ट गुंडाळलेला तो जाड स्कार्फ. अगदी चेहरा झाकणारा बुरखा नसला तरी त्यातलाच एक प्रकार. हे का करायचं, का करतोय याबद्दलचं एक अक्षरही कळत नसताना, माहीत नसताना निव्वळ आई-बाप-आजी-आजोबा आणि अजून कोणकोण कुठकुठले ते धर्मरक्षक सांगतात म्हणून आणि धर्मात (!!) तसं सांगितलंय म्हणून आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे मरणाचं उकडत असतानाही गच्च रुमालाने चेहरा आवळून टाकाव्या लागणार्या त्या चिमुरडीची प्रचंड दया आली. किती मुली अशा अंध शिकवणींच्या आणि रीतीरीवाजांच्या बळी पडत असतील? स्वतःच्याच धर्माने परवानगी नाकारली म्हणून स्वतःच्याच धर्माच्या/देवाच्या प्रार्थनास्थळात जाऊ शकत नसतील? स्वतःचा धर्म सांगतो म्हणून आनंदाने (?) स्वतःच्या डोक्यावर सवती लादून घेत असतील?
अर्थात हे काही मी पहिल्यांदाच बघत नव्हतो किंवा नव्याने काहीतरी कळलं अशातलाही भाग नव्हता. पण त्या जीवघेण्या उकाड्यातला तो चेहर्याभोवती गच्च गुंडाळलेला रुमाल अनेक गोष्टी मनात पुन्हा जागवून गेला, प्रश्नांची पिल्लं सोडून गेला.
न राहवून मी लेकाचा चेहरा गार ओल्या वाईपने पुन्हा एकदा स्वच्छ पुसला आणि उगाचंच हातातल्या पेपरने त्याला वारा घालायला लागलो !!
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
नमस्कार,
ReplyDeleteमला काही माहीती हवी आहे. ब्लॉग डिझाईनींग बद्दल
उदा.
१) स्वत:चा विजेड कोड कसा तयार करायचा?
२) तुमच्या ब्लॉगवर लावलेला फोटो जो अक्षरांचा मागील बाजुस दिसतो आहे. तो कसा लावायचा?
ह्या दोन्हीही सेटींग कशा करायच्या मला शिकवणार का?
कृपया संपर्क करावा
नमस्कार नागेश. आपला मेल आयडी कळवा. मेलवर सांगतो. आणि हो. विजेट कोड मी नाही तयार गेलाय. ९०% ब्लॉगर जनता ज्यांच्याकडून बनवून घेते त्या भुंगाबाबानेच मला विजेट कोड बनवून दिला आहे.
ReplyDeleteलहानपणापासून लादलेल्या गोष्टींमुळे त्याची सवय होऊन जाते आणि मग प्रतिकार होत नाही...
ReplyDeleteअस्वस्थ करणारं आहे....
होना रे.. हे लादलं जाणं प्रकरण आणि तेही काहीही कळत नसलेल्या वयापासून हे इतकं भयंकर आहे की मला त्यांच्या धर्मातल्या प्रत्येक बाईची अतीव करुणाच येते !!
ReplyDeleteइतक्या लहान मुलींना पडदा वगैरे घ्यायला लावत नाहीत. बहुतेक खूपच फॅनॅटीक असावेत ते लोकं.
ReplyDeleteबरेचदा त्या तशा वातावरणात राहिलं की ते सगळं बरोबर आहे असं वाटू लागतं. माझी एक परिचित ( दूरच्या नात्यातली)आहे सौदी अरेबिया मध्ये, तिला ते सगळं म्हणजे बुरखा घेणं वगैरे योग्य आहे असं वाटतंय हल्ली. सारखं तेच ते पाहून तेच सगळं बरं वाटू लागत असावं .
हो काका, तसंच असावं. पण ही म्हणजे हद्द झाली फॅनॅटीकपणाची.
ReplyDelete>> बरेचदा त्या तशा वातावरणात राहिलं की ते सगळं बरोबर आहे असं वाटू लागतं.
हो खरंय. गोबेल्सनीती.. दुसरं काय.. !!
कितीही धर्माभिमान असला तरी गरमीत एवढाश्या लहान मुलीच तोंड जाड स्कार्फ़ने गुंडाळण म्हणजे अतीच झाल...हे नुसत वाचतांना देखील आपल्याला उगाच थोडस गुदमरल्यासारख होते,त्या बायकांना खरच काही वाटत नसेल का...
ReplyDeleteआभार देवेन. होना.. अरे मलाही ते बघून कससंच झालं. आणि त्या बिचारीला त्याचं काही वाटतंही नव्हतं. ब्रेनवॉशिंग दुसरं काय.. !!
ReplyDeleteYou know best thing of your writing is,you fluenty takes it from A to B.And your way to propose things in such manner that reader thinks it is like sunlight and suddenly everything becomes Dark in one sentence.That the main thing needed to impact on readers mind.And believe me very few people have such fluency.Hats off to you dude,what else can I say,stupendous writing.
ReplyDeleteअरे एक गोष्ट मला कळत नाही. सगळी बंधनं, सगळ्या परंपरा सहसा स्त्रियांसाठीच का असतात प्रत्येक धर्मात. आणि एक बघशील तर पुरूषांपेक्षा स्त्रिया ह्या धर्माबाबतीत जास्त कट्टर असतात. म्हणजे बघ, सोवळं ओवळं(आपल्यात) आणि बुरखा(मुस्लिमांमध्ये) ह्या सगळ्या प्रकारांचं जास्त हिरीरीने समर्थन करणार्या बायकाच असतात. कदाचित पूर्वीपासून शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्यात आल्याचा हा परिणाम असावा, ज्याकारणे धर्म हा त्यांनी जसा सांगितला तसाच मानून घेतला.
ReplyDeleteआपलि पोस्ट वाचुन मला बेटी मेहमुदीचे "Not without my daughter" ह्या पुस्तक रुपाने लिहलेल्या आत्मचरीत्राची आठवण
ReplyDeleteझाली
खरच मुस्लीम स्तीयांना व मुलिना समाजात वावरताना फार बंधनांना
तोंड द्यावे लागते.
लेख आवडला.
शिक्षणाचा आभाव ,व परंपरेने आलेल्या धार्मिक गोष्टी (अंधश्रध्या ) असू ह्या पाठीमागे आसू शकते
ReplyDeleteAtich jhale re he... evadhya ukadyat chotyasha mulila ase...shee...!!! Tya mulisathi rather dharmachya bandhanat adakalelya sagalya bayaka-mulin sathi vaait vatale...aani ek kshan kharech mi kitti sukhi aahe ha vichar suddha aala manat...!!!
ReplyDeleteअसे माझ्यातरी पाहण्यात आले नव्हते अजून आणि ऐकण्यात हि
ReplyDeleteहे ऐकून धक्काच बसला
याला कट्टरता म्हणाव कि गुलामगिरी ?
Hey Anee, Thanks for such a kind words. It was so nice. Thanks a lot.. !!
ReplyDeleteबाबा, अगदी बरोबर बोललास. अन्य धर्मांतल्या प्रथांविषयी कल्पना नाही पण हिंदु आणि मुस्लीम धर्मांमध्ये तरी बऱ्याचशा प्रथा स्त्रियांना जाचकच असतात आणि अनेकदा अमानुषही.. आणि हिरीरीने समर्थन करण्याविषयी म्हणशील तर बिचाऱ्यांचं ब्रेन वॉशिंग इतक्या लहान वयात असल्यापासून केलेलं असतं की त्यांना योग्य/अयोग्य याचं भानच नसतं. आता मी या प्रसंगांत वर्णन केलेली मुलगीच बघ ना. तिला बिचारीला काहीच कळत नाहीये तरी ब्रेन वॉशिंगमुळे ती अशा जाचक प्रथेची बळी पडली आहे आणि पुढे जाऊन ती तिच्या मुलींना तशाच बंधनात अडकवणार हे नक्की.. चक्र चालूच राहणार.. दुर्दैव !!
ReplyDeleteसुधीरजी प्रतिक्रियेबद्दल आभार आणि ब्लॉगवर स्वागत.
ReplyDelete"Not without my daughter" बद्दल खूप ऐकलं आहे पण वाचायचा योग नाही आला अजून.
काका, बरोबर आहे. शिक्षणाचा अभाव हे एक प्रमुख कारण आहेच..
ReplyDeleteहो ग मैथिली. मलाही त्या कोवळ्या जीवाकडे बघून खूप वाईट वाटलं.
ReplyDeleteअग आणि निव्वळ धर्म सांगतो म्हणून बायकोला/बहिणीला/मुलीला अशा अमानुष प्रथा पाळायची सक्ती करावी लागत नाही हे पाहता मीही सुखीच !!
हो विक्रम. भयानक आहे खरं. हा बुरखा म्हणजे या मलेशियन किंवा इराणी बायका चेहऱ्याभोवती गुंडाळतात तसा होता..
ReplyDelete>> याला कट्टरता म्हणाव कि गुलामगिरी ?
कट्टरतेतून आलेली गुलामगिरी !!!
हेरंब...धर्म बनवणारे पण हेच अन् धर्माचे कायदे बनवणारे पण हेच.
ReplyDeleteधर्मानुसार काय चांगल अन् काय वाईट हे कोणी ठरवल???
देव असो किंवा अल्ला...त्याची कृपादृष्टी व्हावी किंवा त्याचा कोप होऊ नये..म्हणून काय करावे???.हे कोणी सांगितल?
देव किंवा अल्ला...यांनी स्वतः हे लिहून ठेवलय का???
"ज्या गोष्टी तुमच्या विवेकबुद्धीला पटतात....ज्यातुन तुम्हाला आयुष्याचा निखळ आनंद मिळतो त्याच करा.....देव तुमच्या- आमच्या मध्येच आहे"......
(च्यायला...मी ह.भ.प. झालो की काय??????)
ह.भ.प. प. पु. योगेश बुवा... :)
ReplyDeleteअगदी मनातलं बोललात. खरं तर एवढी साधी सोपी व्याख्या आहे धर्माची. दुर्दैवाने मुठभर लोकांनी धर्माला आपल्या दावणीला बांधून ठेवलं आहे. :(
हेरंब, केवळ तेवढ्यासाठी मुलीच्या जातीला जन्माला यायला नको असं वाटेल (अगदी हिंदुसुद्धा....) जाऊदे भरकटत नाही कारण मुळात मला माझं स्त्रीजातीत जन्माला येणं आवडतं आणि लढतो आम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत. काहीवेळा फ़क्त तो आवाज कुठेतरी दबवला जातो काही प्रथा मोडूनही काढल्या गेल्यात. काय आहे शेवटी सगळंच काही आहे तसंच चालत नाही पण वेळ जावा लागतो या पुरुषप्रधान संस्कृतीशी झगडताना...
ReplyDeleteआजकाल लोक जेवढे जास्त शिकायला लागलेत तेवढे ते जास्त धर्मामध्ये अडकायला लागलेत.
ReplyDeleteअरे १२ वी पर्यंत गावाकडे असताना धर्म जागृती / सत्संग वैगेरे काहीच नव्हत.आता गेलो तर प्रत्येक महानगरपालिकेच्या शाळेत धर्म जागृती / स्त्साग चाललेला असतो.
आणि हे लोक तर आता देवळाच्या बाहेर उभा राहून पत्रक वाटायला सुरवात केली आहे.
जेवढे जास्त आधूनिकतेकडे जायला लागलेत त्यापेक्षा जास्त धर्मंड व्हायला लागलेत अस नाही का वाटत ?
kuthla bhunga widget code banvun deto jara sang naa, mala majhy blog sathi banvyacha ahe, email id asen tar de plz
ReplyDeleteहो मी सुध्दा हे अनुभवले आहे..दुबई ला असताना मी अशा अनेक लहान मुलिंना गच्च गुरफ़टलेले पाहिले आहे..त्यांना बघुन आम्हालाच घाम सुटायचा..हेरंब,तु Not without my Daughter वाचलेच असेल..किती भयानक स्थिती सांगितली आहे त्यात...दयनीय स्थिती..
ReplyDeleteअपर्णा, सहमत. मला अनेकदा इतकं बरं वाटतं की मुलगा म्हणून जन्माला आलोय याचं. !!
ReplyDeleteआजच्या काळातही हे असे प्रकार चालू ठेवणं म्हणजे शुद्ध अन्याय आहे. अर्थातच परिस्थिती थोडीफार का होईना बदलते आहे. पण वेळ लागेल बराच :(
सचिन, मला तर वाटतं जगाला पुढे नेणारा जो एक फोर्स आहे तेवढ्याच जोमाने जगाला मागे नेणाराही एक फोर्स आहे. दुर्दैवाने अनेकदा या मागे नेणाऱ्या शक्तीचा प्रभाव जास्त असतो. बदललं पाहिजे हे सगळं लवकर. बदलेल.. होप सो !!
ReplyDeleteअजय, तुला मेल केलंय.
ReplyDeleteउमा, या लोकांनी निदान लहान मुलींना तरी यापासून दूर ठेवलं पाहिजे. रुमाल गच्च आवळणं हे एक प्रकारचं बंधनच आणि उमलत्या वयात ही असली फालतू बंधनं हवीत कशाला !!
ReplyDeleteअग नाही नां. 'Not without my Daughter' बद्दल ऐकलंय खूप पण वाचायचा योग नाही आला :( .. यावेळच्या लायब्ररी ट्रीपमध्ये ग्रिशमला थोडी विश्रांती देतो आणि 'Not without my Daughter' घेतो.
हेरंब,जीव गुदमरला नुसते वाचूनच. ' Not without my Daughter 'वाच आणि सिनेमाही पाहाच.( पुढचे पंधरा दिवस घुसमट होणार हे पक्के ) धर्मकारण हे कायम बायकांच्याच माथी का मारले जाते हे कोडे सुटतच नाही.
ReplyDeleteश्रीताई, अगदी... अगदी असंच जीव गुदमरल्यासारखं वाटत होतं आम्हालाही. 'Not without my Daughter' वाचतोच आता नक्की. मला तरी हिंदू आणि मुस्लीम हे जगातले दोन मोठे धर्म स्त्रियांच्या विरुद्ध दिसले. ख्रिश्चन, ज्यु, बौद्ध, जैन, शीख वगैरे धर्म/पंथांत असा भेदभाव आढळत नाही विशेष.
ReplyDeleteलहान मुलींना सुध्दा मूल म्हणून न वागवता मुलगी म्हणून वाढवले जाते हे वाईट वाटण्याजोगेच..
ReplyDeleteमलाही एकदम "Not without my daughter" चीच आठवण झाली.
भाग्यश्रीताई म्हणते तस,पुस्तक वाचच!
खरंच. त्यांना काही कळायच्या आतच स्त्रीत्वाचे (!!) नियम त्यांच्यावर लादले जातायत.
ReplyDeleteअग परवा लायब्ररीत "Not without my daughter" चा शोध घेतला पण अव्हेलेबल नव्हतं. आता बहुतेक विकतच घेऊन टाकेन.