काळा सुट घातलेला एक गोरागोमटा तरुण लंडनच्या रस्त्यावरून हिंडत असतो. मधेच तो एका हॉटेलमध्ये शिरतो आणि कॉफी ऑर्डर करतो. तेवढ्यात त्याच्या बाजूच्याच टेबलवर एक लांब केसवाला, दाढी वाढलेला माणूस येऊन बसतो आणि त्या गोर्या तरुणाला काही वेळ न्याहाळत रहातो. थोड्या वेळाने तो गोरा तरुण उठतो आणि थेट त्या लांब केसवाल्या माणसाच्या टेबलाजवळ जातो आणि त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसतो. उगाच आडवळणं न घेता तो त्याला थेट दरडावून विचारतो की "तू माझा पाठलाग का करतो आहेस? काय हवंय तुला?". सुरुवातीला थोडे आढेवेढे घेऊन झाल्यावर आणि गोर्या माणसाचे आरोप नाकारून झाल्यावरही तो बधत नाही हे पाहिल्यावर तो लांब केसवाला हळूहळू बोलायला लागतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो एक होतकरू लेखक असतो. तो एक पुस्तक लिहीत असतो आणि त्यासाठी नवीन नवीन पात्र मिळवण्यासाठी तो असाच कोणाचाही पाठलाग करत असतो. (त्याचे पाठलागाचे विशेष नियम असतात. तेही कालांतराने 'कळतात'). पुढे मग बोलता बोलता त्या गोर्याच्या संमतीने त्याच्या बॅगची झडती घेऊन झाल्यावर तो एक भुरटा चोर आहे हे त्या लांब केसवाल्याला कळतं आणि लांब केसवाला खरंच अतिशय निरुपद्रवी आहे याची खात्री त्या गोर्याला पटते. अशा तर्हेने जुजबी गप्पा आणि (खर्या) ओळखी झाल्यावर लेखक त्या चोराबरोबर भटकायला तयार होतो. ते ३-४ घरांमध्ये फुटकळ चोर्या करतात. चोर त्या प्रत्येक घरातून उगाचंच काहीबाही गोष्टी लंपास करतो. सीडीज, पत्रं, रुमाल, अंतर्वस्त्रं, इअररिंग्स असं काहीही चोरतो. अशा चोर्या करताना केलेल्या शोधाशोधीमुळे त्या त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व समजायला मदत होते असं चोराचं म्हणणं असतं. लेखकालाही ते पटतं. एका चोरीत तर ते पकडले गेले असतानाही चोराच्या हुशारीमुळे तिथून सटकतात. दरम्यान लेखक एका मुलीच्या प्रेमात पडतो. बोलता बोलता त्याला कळतं की त्या मुलीच्या काही आक्षेपार्ह फोटोंमुळे एकजण तिला ब्लॅकमेल करत असतो. ते फोटो ब्लॅकमेलरच्या कपाटात असतात. लेखक तिला वचन देतो की तो काहीही करून तिला ते फोटो आणून देईल आणि तिची त्या ब्लॅकमेलरच्या तावडीतून सुटका करेल आणि वचन दिल्याप्रमाणे तो त्या चोरीच्या तयारीलाही लागतो. त्यानंतर बरेच उलटसुलट प्रसंग घडतात परंतु ते स्पॉयलर असल्याने इथेच थांबणं योग्य.
'मोमेंटो'वाल्या (Memento असं स्पेलिंग असलेल्या या शब्दाचा खरा उच्चार 'मेमेंटो' असा नाही... तर 'मोमेंटो' किंवा 'ममेंटो' असाच आहे. ) क्रिस्टोफर नोलनच्या 'फॉलोइंग'ची कथा थोडक्यात आणि सरळपणे सांगायची झाल्यास मी तरी अशी सांगेन. (खरं तर 'फॉलोइंग' हा नोलनचा 'मोमेंटो'च्या आधीचा चित्रपट पण 'मोमेंटो'मुळे नोलनला जास्त प्रसिद्धी मिळाली त्यामुळे 'मोमेंटो'वाला क्रिस्टोफर नोलन असं म्हणतोय.) पण एवढ्या सरळपणे कथा, दृष्य, प्रसंग मांडेल तो नोलन कसला. तो त्याच्या टिपिकल शैलीत गुंतागुंत करून सगळे प्रसंग आपल्यासमोर मांडतो. चित्रपटात सुरुवातीला आपल्याला दिसतात ते लंडनचे गजबजलेले रस्ते, त्याच्या पार्श्वभूमीवर मागून त्या लेखकाचा आवाज येत असतो. तो पाठलाग का, कसा आणि कोणाचा करतो हे सांगत असतो. त्यानंतर वर सांगितलेला हॉटेलचा प्रसंग घडतो. पुढच्याच प्रसंगात ते एका घरासमोर उभे राहून घराचं दार डुप्लिकेट चावीने उघडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसतात. तिथे चोरी करून झाल्यावर अचानक दुसर्या मग तिसर्या घरात चोरी करताना दिसतात. मधेच लेखक एका मुलीशी हॉटेलात बोलत बसलेला दिसतो तर पुढच्या प्रसंगात तिच्या घरी असतो. तिच्या बॉयफ्रेंडने एका माणसाला तिच्या डोळ्यासमोर कसं हालहाल करून मारलेलं असतं ते ती सांगते. अचानक पुढचा प्रसंग सुरु होऊन त्यात तो लेखक एक छोटी पेटी उघडतो आणि त्यात त्याला काय काय मिळालं हे त्या चोराला फोनवर सांगतो. पुन्हा तो अचानक त्या मुलीला भेटतो ते एकदम वेगळ्याच रुपात. त्याचे केस बारीक कापलेले असतात आणि स्वच्छ दाढी केलेली असते. अचानक पुढच्या प्रसंगात डोळा सुजलेल्या अवस्थेत तो त्या मुलीच्या घराखाली दिसतो. पुढच्या प्रसंगात तो केस कापलेल्या आणि स्वच्छ दाढी केलेल्या नवीन रुपातच दिसतो पण डोळा सुजलेला नसतो. त्या प्रसंगात तो त्या चोराला भेटतो. तिथे त्यांची बोलाचाली होते, हाणामारी होते. पुन्हा पुढच्या प्रसंगात लेखक ते फोटो चोरण्यासाठी एका घरात शिरतो आणि ते कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असतो.
कळतंय काही ?? काहीतरी कळतंय का ? नाही ना? हीच तर आहे नोलनची खासियत. हा माणूस छोट्याछोट्या प्रसंगांचे उलटसुलट तुकडे करून काळाच्या परिमाणालाच धोबीपछाड देतो. जेमतेम सत्तर मिनिटांच्या असलेल्या चित्रपटात पहिली पस्तीस मिनिटं हे असेच सगळे अगम्य आणि अतर्क्य प्रसंग घडत असतात. एकाही दृश्याचा ना संदर्भ लागतो ना अर्थ कळतो. पस्तीस मिनिटांनी वैतागून जाऊन मी चित्रपट बंद करणार होतो. पण तरीही तसाच चिकाटीने बघत राहिलो. त्यानंतरच्या वीस मिनिटांत बर्याच घटना उलगडत जातात. अनेक प्रसंगांचे अर्थ कळत जातात. आधी घडलेल्या अनेक छोट्या छोट्या घटना ज्यांना आपण किरकोळ म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सोडून दिलेल्या असतात (किंवा अनेकदा टिपलेल्याही नसतात) अशा घटना अचानक वेगळंच रूप घेऊन आपल्यापुढे येतात. त्या वीस मिनिटांत बराच चित्रपट आपल्याला समजतो. आधीच्या ३५ मिनिटांच्या नीरस रोलरकोस्टर राईड मधून आपण थोडेफार स्थिरावतो. चांगला कोण, वाईट कोण, कोणाचा हेतू काय, कोणी कोणाला वापरलंय हे थोडंथोडं लक्षात यायला लागतं. आणि हे 'थोडंथोडं लक्षात यायला लागतं' असं आपण म्हणून आपण थोडेफार स्थिरावतोय ना स्थिरावतोय तोच शेवटच्या दहा मिनिटांत आपल्या पायाखालची चादर खेचली जाते. भूकंप होऊन पायाखालची जमीन सरकते आहे असा भास होतो. कारण इतक्या खटाटोपानंतर आपण ज्या गृहितकाशी स्थिरावलो असतो त्याच गृहितकावर घाव घालून त्याचे तुकडे केले जातात. अशक्य धक्का बसतो. एक नवीनच मांडणी आपल्यासमोर येते. आपल्याला पूर्णतः संभ्रमात टाकते. आणि आपला त्यावर विश्वास बसायला लागतोय आणि अजून काही धक्का तर नाही ना असा विचार करेपर्यंत चित्रपट संपतो. आपण पुन्हा एकदा चित्रपट बघायचं मनोमन ठरवून टाकतो. कारण काही न उलगडलेल्या कोड्यांची किंवा पहिल्या अर्ध्या तासातल्या अनेक अर्थहीन घटनांची उत्तरं मिळाल्याशिवाय आपल्याला चैन पडत नसतं. आपण पुन्हा एकदा चित्रपट वेगळ्या नजरेने बघतो आणि मोठ्ठंच्या मोठ्ठं कोडं उलगडल्यासारखं वाटतं. एका कोड्याची उकल झाल्याचं समाधान लाभतं.
हा चित्रपट निओ-न्वार किंवा मॉडर्न-न्वार फिल्म (Film Noir) प्रकारातला आहे. मतकरींच्या ब्लॉगमुळे एव्हाना आपल्याला या शब्दाचा परिचय झालेलाच आहे. Noir या फ्रेंच शब्दाचा अर्थ काळा. म्हणजे रूढार्थाने 'न्वार फिल्म'चा अर्थ काळा चित्रपट. थोडक्यात 'चांगलं विरुद्ध वाईट, सत्याचा असत्यावर विजय, चांगली व्यक्ती म्हणजे नायक आणि ती खलनायकावर विजय मिळवते' असल्या टिपिकल, पुस्तकी कल्पनांना नाकारून खलनायकाला केंद्रस्थानी ठेवून त्याच्या अनुषंगाने मांडलेला गुन्हेगारीपट. यात केंद्रस्थानी असलेली व्यक्ती ही खरोखरीच वाईट असते. उगाच चांगला व्हिलन (!) वाली बाळबोध कल्पना इथे लागू होत नाही. थोडक्यात 'अमिरोंका दुष्मन, गरीबोंका मसीहा' वाला प्रकार नाही. फक्त स्वतःचा मसीहा असलेला आणि स्वतः सोडून सगळ्यांचा दुष्मन असलेल्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून मांडलेली कथा. असे न्वारपट युरोप आणि अमेरिकेत ४०-५० च्या दशकात मुबलक प्रमाणात आले आणि त्यांच्या वेगळेपणामुळे प्रेक्षकांनी ते उचलूनही धरले. विकीवर शोधताना ही न्वारपटांची यादीच सापडली. आपल्या इथेही हा न्वार प्रकार थोडाफार हाताळला गेला. फिदा, जॉनी गद्दार, कमीने ही त्याची काही ठळक उदाहरणं.
अजून एक गोष्ट म्हणजे ब्लॅक अॅंड व्हाईटच्या जमान्यातला नसूनही नोलनने हा चित्रपट ब्लॅक अॅंड व्हाईट केला आहे. माझ्या अल्पस्वल्प मतीनुसार दोन कारणं असावीत. एक तर त्याला जुन्या न्वारपटाचा लुक देण्यासाठी असावं आणि दुसरी गोष्ट म्हणजे 'न्वार' शब्दाचा कृष्णकृत्यांशी असलेला संबंध अधोरेखित करण्यासाठीही असावं. अर्थात हे चूकही असेल. जाणकारांनी योग्य मार्गदर्शन करावं. मी फक्त मला लागलेला अर्थ सांगितला.
थोडक्यात 'आधीच न्वार, त्यात नोलनची हाताळणी' असं जबरदस्त मिश्रण आहे हे आणि ही दोन विलक्षण रसायनं एकत्र आलेली बघणं म्हणजे प्रेक्षकांच्या दृष्टीने खरीखुरी मेजवानीच. चुकवू नये अशी. काय मग? कधी निघताय 'पाठलागा'वर ??
मनातली वटवट मनातच न राहू देता कागदावर आलेली बरी असते बर्याचदा. निदान स्वतःसाठी तरी. त्याचाच एक प्रयत्न.. आणि कितीही *वटवट* केली तरी ती (शक्यतो :) ) *सत्य* च असणार हे नक्की !!
Subscribe to:
Post Comments (Atom)
मतकरींच्या 'न वाचवल्या जाणाऱ्या पण वाचायलाच हव्यात अशा' कथा. जौळ आणि इन्व्हेस्टमेंट!
पुलंना विनोदी लेखक म्हणणं जितकं चुकीचं आहे तितकंच चुकीचं आहे रत्नाकर मतकरींना गूढ कथाकार संबोधणं. मतकरींनी बालसाहित्य/नाट्य विषयात विपुल लेख...

-
सातव्या शतकात सौदीत जन्माला आलेला इस्लाम, नंतरच्या काही शतकांतच वावटळीप्रमाणे जगभर पसरला. अमेरिका , आफ्रिका , युरोप , आशिया अशी सर्वत्र घोडद...
-
तीन मुलांची आई असलेली ही बाई सिंगल-मदर असल्याने आणि नुकतीच तिच्या गाडीच्या अपघाताची केस हरल्याने घर चालवण्यासाठी ताबडतोब मिळेल त्या नोकरीच्य...
-
समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...
अरे माझाही असच झाल नोलांन चा आहे म्हणून डा. केला आणि पाह्यला सुरवात केली आणि १० मि. बंद केला.
ReplyDeleteआता तू परवा बझ्झ सांगीतलस मस्त आहे आणि पोस्ट लिह्योय यावर तेव्हा म्हंटल आता तुझी पोस्ट वाचल्यावरच पहावा म्हणजे समजेल म्हणून तुझ्या या पोस्ट ची वाट पाहत होतो परवा पासून.
आता आज शामको च देखता मै ये फिल्लम.
सचिन, अरे माझ्या इतर काही मित्रांच्या बाबतीतही असंच झालं होतं. अनेकांनी १५-२० मिनिटं बघून सोडून दिला होता. मी ३५ मिनिटं कसाबसा तग धरला नंतर बंद करणार होतो कारण पहाटेचे ३ वाजले होते. पण तेवढ्यात जरा मजा यायला लागली. आणि शेवटी तर हादरलो आणि नोलनला मनोमन सलाम ठोकला.
ReplyDeleteबघ संध्याकाळी आणि कळव कसा वाटला ते.
हेरंब,
ReplyDeleteचित्रपटाच परीक्षण फार सुंदर झालय. हा चित्रपट नक्कीच पाहायला हवा.
आभार निरंजन.. हा चित्रपट मस्ट वॉच आहे. मी गेल्या दोन दिवसांत तीनदा बघितला. पहिल्यांदा बघितला तेव्हा अनेक कोडी सुटली नव्हती म्हणून दुसर्यांदा बघितला. आणि दोनदा बघितल्यावर इतका आवडला की पुन्हा तिसर्यांदा बघितला. :)
ReplyDeletemi sudha jarro pahin ata ha
ReplyDeleteआता पाहणे भाग आहे...
ReplyDeleteआता पाहणे भाग आहे...
ReplyDelete+1
हा चित्रपट पाहणे भाग :)
ReplyDeleteमोमेंटो पाहिला आहे तो सुदधा बराच गुंतागुंतीचाच आहे आता हयाच्याबद्दल वाचुन हा ही पाहावासा वाटतो आहे...बघुया योग कधी जुळतो ते...(नेट डाउन आहे,बीएसएनएल कोलमडल आहे रे आमच्याइकडच..)
ReplyDeleteअजय, नक्की बघ.
ReplyDeleteबाबा, तुला तर नक्की आवडेलच..
ReplyDeleteतन्वी, माहेरी वेळ मिळतोय तोवरच बघून घे ग )
ReplyDeleteमंदार, नक्की बघ. जाम सही आहे.
ReplyDeleteदेवेन, गुंतागुंतीच्या बाबतीत तर हा 'मोमेंटो'पेक्षाही वरचढ वाटला मला. कारण 'मोमेंटो'ला काहीतरी पॅटर्न आहे आणि सुरुवातीच्या दोन-तीन प्रसंगांनंतर तो पॅटर्न कळतोही. पण 'फॉलोइंग' मध्ये काहीच पॅटर्न नाही. सगळं रँडमली घडत राहतं. त्यामुळे सुरुवातीला खूप वेळ काही कळतच नाही आणि जेव्हा सगळं कळतं तेव्हा आपण हादरून जातो..
ReplyDeleteहेरंब, काल पहिला हा चित्रपट. केवळ अप्रतिम.
ReplyDeleteकाळ्या-पांढरयाचा (फक्त काळाच जास्त आहे)जबरी इफेक्ट केलाय.
दुसऱ्यांदा पाह्यला खरच मजा येते.
हेरंब
ReplyDeleteइंग्रजीच आहे ना? की मेमेंटो प्रमाणे दुसऱ्या भाषेतला आहे?
सचिन, अप्रतिमच आहे हा चित्रपट.
ReplyDelete>>काळ्या-पांढरयाचा (फक्त काळाच जास्त आहे)जबरी इफेक्ट केलाय.
दुसऱ्यांदा पाह्यला खरच मजा येते.
+१ +१
काका, फॉलोइंग आणि मोमेंटो दोन्ही इंग्रजीच आहेत.
ReplyDeletesahi re .. ek number lihile aahhes..
ReplyDeletechitrapat nakkich pahaayalaa havaa..
Thanks
आभार महेश.. नक्की बघ. जाम भारी चित्रपट आहे..
ReplyDeleteहेरंब,अरे हा चित्रपट कसा सुटला माझ्याकडून... ममेंटों मी तीन वेळा पाहिला. फारच जबरी बनवलाय. आता इतके उद्युक्त करणारे परिक्षण तू लिहीलेस... लगेचच पाहावा लागेल. :)
ReplyDeleteएक शब्द .. जब्बरदस्त.
ReplyDeleteनॉन लिनियर मांडणी मुळे खरंच काय चाललंय हे कळत नाही सुरुवातीला.. पण एकदा कळायला लागलं की धक्क्यावर धक्के बसत जातात.. शेवट तर कळसच.. जेमतेम ७० मिनिटाचा, पण अनुभव बनुन जातो. पार्श्वसंगीत सुद्धा संयत पण अप्रतिम साथ देतं.
चोराची टॅगलाईन पण खुप आवडली "You take it away, and show them what they had." शेवटी नायकाला याची आठवण नक्की आली असेलच...
तूझं परिक्षण नेहमीप्रमाणेच अप्रतिम. सुंदर चित्रपट रिकमेंड केल्याबद्दल आभार. क्रिस्टोफर नोलान दिग्दर्शीत लिऑनार्डो अभिनित 'इन्सेप्श्न' आज इथं रिलीज होत आहे.. आता तो पहावा लागणारच...
कालच पाहिला.खूप छान आहे. पण समजायला खूप अवघड आहे. इथे थोडं वाचलं होतं, म्हणून पुर्ण पाहू शकलो, नाहीतर सरळ बंद करून टाकला असता.. :)
ReplyDeleteसिनेमाचे परीक्षण आवडले ,सुंदर आहे,
ReplyDeleteIf you clearly observe Nolans filmography you will come to know that,he turns unreliabilty in reliable way by using Non Linear script.and hence viewer doesn't even feel that he is being cheated.Again he makes viewer restless throughout,where viewer gets attached to movie.and that is the main power of Chris Nolan.After following you should follow Insomnia because that one will really blow your mind.
ReplyDeleteश्रीताई, फॉलोइंगही मोमेंटो इतकाच सुंदर आहे. किंबहुना मी तर म्हणेन जास्त गुंतागुंतीचा आहे. नक्की बघ !!
ReplyDeleteआनंदा, 'नॉन लिनियर मांडणी' हे नोलनचं शक्तीस्थळ आहे हे फॉलोइंग आणि मोमेंटोवरून दिसून येतंच. exactly, मलाही चोराची टॅगलाईन जाम आवडली. काही गोष्टी लिहायच्या राहून गेल्या असं तुला जे म्हणालो होतो ना त्यातली ही एक.
ReplyDeleteइन्सेप्शन बघावा लागणार आहेच. (imdb रेटिंग ९.५ आहे !!) .. पण तोही मी डालो करून बघेन कारण एकदा बघून काहीही कळणार नाही हे नक्की. ;)
अगदी.. मी म्हंटलं ना काका सुरुवातीला काहीच कळत नाही आणि बंद करून टाकावासा वाटायला लागतो. पण थोडी चिकाटी ठेवल्याने एक अत्त्युच्च दर्जाचा अनुभव मिळतो. माझ्या २-३ मित्रांनी अशीच सुरुवातीची १५-२० मिनिटं बघून कंटाळून बंद केला होता. :)
ReplyDeleteकाका, अनेक आभार.
ReplyDeleteYes.. completely agree.. And when u realise u've been cheated, ur feelings are like a mixture of huge shock and great respect for Nolan :)
ReplyDelete>>After following you should follow Insomnia
I did the exact same thing.. LITERALLY.. I was done with 'following' at 3 AM and I watched Insomnia after that :) .. But my honest (it may look blunt) opinion is Insomnia iS quite an ordinary movie. If you watch it removing Nolan's name off it, u may like it. But otherwise it's pretty disappointing. The last thing I'd expect from the maker of Memento and Following is the simple, plain, straight storyline and script with ordinary dialogues. I insist, remove Nolan's name and one may like it but not otherwise. So it might have been due to the overexpectation from my end.
aamhi ingraji (english) chitrapatanchya vatyala far kami jato....pan tumche parikshan vachun hi vat aata pakadayala harakat nahi asa vatu lagalay
ReplyDeleteAnd yes Inception will definitely fulfill expectations!!
ReplyDeleteGreatest Sci Fi ever watched!
सुषमेय, तू बाकीचे कुठले इंग्रजी चित्रपट बघितले नाहीस तरी एकवेळ चालेल पण 'फॉलोइंग' नक्की बघच. आणि मी हे असं यासाठी म्हणतोय की मला खात्री आहे की फॉलोइंग बघितल्यानंतर तू आपोआपच इंग्रजी चित्रपट बघायला लागशीलच. :)
ReplyDeleteYes Anee, Completely agree !! Am dieing to watch it and since movie-hall is out of question for me as of now (Thanks to 15 months handsome guy in our home) I've already started downloading it from torrent. Tonight'll be Inception night probably :)
ReplyDeleteपहायला हवा..
ReplyDeleteआणि तू सांगितले आहेस तसे काही बारकावे लक्षात ठेवून पहायला हवा.
मीनल, जाम गुंतागुंत आहे. त्यामुळे सगळे बारकावे लक्षात ठेवून बघितला तर माझ्यासारखा दोनदा बघावा लागणार नाही :)
ReplyDeleteअलीकडेच वटवट वाचायला सुरुवात केली..या पोस्टवर तर ही उशिरा^२ कमेंट आहे....पण ही पोस्ट वाचूनच फॉलोविंग पहिला...आवडला!!
ReplyDeleteहिंदीवाल्यांनी 'फिदा' कुठून पैदा केला त्याचाही अंदाज आला...
नोलानला सलाम! :)
प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, चैतन्य.
Deleteफॉलोइंग खरंच जबरी आहे. मी अधून मधून पाहतो पुन्हा पुन्हा.. गेल्याच आठवड्यात पाहिला :)
अरे हो.. बरोबर.. फिदाची स्टोरीलाईनही अशीच काहीशी आहे नाही का.. लक्षातच आलं नव्हतं हे माझ्या.
प्रतिक्रियेबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत. अशीच भेट देत राहा.
लेख सुंदर झालाय, न पाहता वाचलंय आता वाचून परत पाहतो.
ReplyDeleteपाहिल्यानंतर वेगळा अनुभव येईल..