Friday, November 26, 2010

रिक्त

.









































































































































१९७५ साली इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीच्या आणि त्यांनी केलेल्या वृत्तपत्रांच्या मुस्कटदाबीच्या निषेधार्थ त्यावेळच्या वृत्तपत्रांनी अग्रलेखाची जागा कोरी ठेवून आपला निषेध व्यक्त केला होता असं मागे वाचलं होतं.

तीच कल्पना पुढे रेटून मुंबई हल्ल्याला दोन वर्षं पूर्ण होऊन गेल्यावरही कसाबला अजूनही फाशी देऊ न शकल्याबद्दल मोहन, प्रतिभा, सोनिया, राहुल, चिदु, प्रणब या भिकार**चा या रिकाम्या पोस्टने निषेध !! (या न्यायाने तर गुरूला अजूनही जिवंत ठेवल्याबद्दल हजारो ब्लॉग्ज रिकामे पाडावे लागतील !!!!!!!!!)

42 comments:

  1. आज सकाळी उज्ज्वल निकम ह्यांची मुलाखत रेडिओ वर ऐकली. ते म्हणाले,"ज्या प्रकाराची ही केस आहे, त्या मानाने ह्या केसची प्रगती बऱ्याच जलद गतीने चालू आहे. लवकरच निकाल जाहीर होईल."
    हे गुन्हेगार तर बाहेरचे होते. परंतु अंतर्गत जी भ्रष्टाचाराची कीड लागली आहे, ती आपल्याला अधिकाधिक पोखरत आहे. असे मला वाटते. आणि कधी ना कधी कुठे ना कुठे आपला ह्याला हातभार लागू नये असे वाटते.

    ReplyDelete
  2. >> जलद गतीने ??

    गतीविषयक नियम बदलले वाटतं !!

    मी तर म्हणतो अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्यान्वये जर त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी देता येत नसेल तर एका दिवसात असा कुठला तरी नवीन कायदा केला जावा आणि त्याला ताबडतोब हालहाल करून मारलं जावं !! आणि त्याच्या बरोबरीने त्या मानवतावादी पिशाच्चांनाही !!!!!!!

    ReplyDelete
  3. कसाबला सुधारण्याची संधी ह्या - मानवाधिकार आयोग...
    खटला परत सुरू करा - कसाब...

    झक मारली आणि ह्याला पकडला...सोडायाच तरी होत किवा मारायच तरी होत... पण भारताची आदर्श न्यायव्यवस्था आणि इथले हे भिकार** राजकारणी ह्यांनी..सोड काय बोलू. रिकामीच ठेवायला हवी होती कॉम्मेंट पण पण... :(

    ReplyDelete
  4. अरे कसाबची बाजू घेणार्‍या त्या मानवाधिकार संघटना आणि अजून कुठले कुठले धिकार वाले लोक असतील ना त्या सगळ्यांना फाशी द्यायचं त्या हरामखोराबरोबर.. घाण तरी जाईल.. फुकट कटकट च्यायला !!

    ReplyDelete
  5. सचिन, आपल्या सगळ्यांचे निषेध त्या बंद कानांपर्यंत पोचतीलसं वाटत नाही !

    ReplyDelete
  6. निषेध त्यांच्या कानांपर्यंत पोचण्याची शक्यता कमीच..पण व्यक्त करणं आपलं काम! :)

    ReplyDelete
  7. हेरंब,

    २६/११ ही आपल्या सर्वांसाठीच एक न भरून निघणारी जखम आहे. शून्य शब्दात तू तुझ्या ब्लॉगवर तिला बोलतं केलंस. अभिनंदन!
    कसाबला लवकरच फाशी होईल, अशी अशा करू. त्याच्यावर होणारा दर महा दोन करोड रुपयांचा खर्च निदान 'आपल्याच' भ्रष्ट नेत्यांच्या पोटात जाईल.
    असो... न राहवून, मी ही माझ्या ब्लॉगवर याच संबंधी पोस्ट लिहिली आहे.
    निवांत वेळी वाचून पहा: http://shekharsdhupkar.blogspot.com/

    - शेखर

    ReplyDelete
  8. तृप्ती, देवेन, भापो !!

    ReplyDelete
  9. बाबा, बरोबर... !

    कुणी निंदा, कुणी वंदा ...

    ReplyDelete
  10. आभार, शेखर.. आपण शब्दबंबाळ लिहिलं काय आणि मूक निषेध केला काय खुर्चीतल्या बोकडांना काही फरक पडत नाही हे आपलं दुर्दैव !!

    तुझा लेख वाचला. छान लिहिला आहेस. कमेंटलोय तिकडे.

    ReplyDelete
  11. हरामखोर आहेत एकजात सगळे.... आपण डोकं फोडलं त्यांच्यापुढे तरी कवडीचा फरक पडणार नाही त्यांना...

    ReplyDelete
  12. हम्म्म्म... फाशीतर दिली गेली पाहिजे आणि ती देतिलच. पण कसाब प्रकरण हे खुप गंभीर स्वरुपाचे आहे. न्यायदानाची प्रक्रिया खुप जटिल आहे. त्याच्याकडुन माहिती मिळवणे, ती योग्य निकषांवर खोलवर तपासणे, योग्यप्रकारे त्याचे कागदपत्र बनवणे हि काही दिवसभरात होणारी कामं नाहीत. शिवाय त्याच्याकडुन मिळालेल्या माहितीच्या बळावर बाकी अनेक गोष्टींचा छडा लागू शकतो. पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्राचे नाजुक धागेदोरे हाती लागू शकतात किंवा लागले असल्यास ते योग्य रितीने कसे आवळायचे ह्याचे काम चालू असू शकते.
    I understand your emotions and feelings. पण हे एक प्रकारचं शीतयुद्ध आहे जिकडे भावूक होऊन निर्णय घेणं योग्य नाही. एक लांबची झडप मारायची म्हंटल्यावर दोन पावलं माघार घ्यावी लागते. भारताची काहीतरी खेळी असाविच ह्या बाबतीत.
    (I'm not against your thoughts, just trying to think from different perspective.)

    ReplyDelete
  13. सौरभ,
    तुझं म्हणणं मान्य आहे. पण, अजमल कसाबला फाशी न होणं ही प्रतीकात्मक गोष्ट आहे. भारतात कोणत्याच खटल्याचा निकाल वेळेवर लागत नाही. लोकांच्या सहनशक्तीलाही मर्यादा असते रे. १९८४ साली झालेल्या भोपाळ वायूगळतीच्या पीडितांना अजूनही योग्य तो न्याय मिळालेला नाही. योग्य ती माहिती मिळवणे, कागदपत्रे तयार करणे, ती योग्य निकषांवर तपासणे या प्रक्रियेला काही काळ लागेल हे मान्य आहे. पण, काहीच्या काही काळ निघून गेला तरीही या गोष्टी होत नाहीत आपल्या देशात हीच तर शोकांतिका आहे. आणि तोपर्यंत कसाबला जिवंत ठेवणं, त्याच्या सुरक्षेची व्यवस्था करणं या गोष्टींत कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. आणि हे सगळे पैसे सामान्य माणासाच्या टॅक्समधून जातात. आणखी किती काळ हे चालणार? आणि नेहमीच्या प्रोसीजरला वेळ लागतो हे मान्य आहे, पण अजमल कसाब, अफजल गुरू यांसारख्या राष्ट्रीय अस्मितेवर घाला घालणार्‍या लोकांसाठी तरी अपवाद केला पाहिजे ना नियमाला! आणि ते होत नाही म्हणून तर अतिरेकी सोकावतात. भारतात काहीही केलं तरीही आपल्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही असा समज होतो त्यांचा. आणि म्हणून दहशतवादी कृत्यं सुरूच राहतात. एकदा या लोकांना थोडी तरी जरब बसली तर पुढच्या वेळी असलं काहीतरी करताना ते निदान दहा वेळा विचार करतील. आणि ही जरब बसण्यासाठीच या अशा अतिमहत्त्वाच्या केसेसमध्ये लवकरात लवकर निकाल लावला गेला पाहिजे.

    ReplyDelete
  14. हेरंबा काय बोलू.... चिडून खूप बोलणे किंवा मौन ईतकेच उरते आपल्या हातात....

    तरिही नेहेमीप्रमाणे कुठे तरी खोलवर काहितरी दुर्दम्य आशावाद वाटतो (कशाच्या जोरावर देव जाणे)की आपण सगळे एकत्र झालो तर काहितरी बदल नक्कीच घडू शकतो....घडायला हवाय!!

    ReplyDelete
  15. अरे, उल्लेखित व्यक्तींच्या हृदयातली 'देशप्रेम' हि जागा रिकामी आहे...

    ReplyDelete
  16. ओकलाहोमा शहरात १९९५ साली झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी टिमोथी मॅकवेहला सुद्धा मृत्यूदंड द्यायचा निकाल एप्रिल २००१ साली दिला गेला. त्यानंतर त्याला जून २००१ मधे त्याला विषारी इंजक्शन देऊन त्याचा वध करण्यात आला. म्हणजेच, न्याय प्रक्रिया थोडी संथ असतेच. हा, अफझल गुरूच्या बाबतीत मी तुझ्या मताशी सहमत आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकाला मधे नमूद केलं आहे, की ही शिक्षा सर्वस्वीपणे परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारावर दिली जात आहे. तर केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधारे, खरंच एखाद्याला फाशी द्यायची का?

    ReplyDelete
  17. २६/११ चा जो अहवाल बनविला त्या अहवालासोबत अशोक चव्हाण, छगन भुजबळ हे छायाचित्र काढून घेताना दाखवलेत. हा काय प्रकार कळला नाही. ती काय अभिमानाची गोष्ट आहे का?

    तसेच पाटील आणि खडसे हे कसाबला भेटायला गेले होते. कसाबसोबतही ह्यांनी छायाचित्र काढून घ्यायचे बाकी आहे आता.

    :( :(

    ReplyDelete
  18. श्रद्धांजली....
    १.मौन ठेवुन
    २.मेणबत्त्या पेटवुन (आमच्या सायबाचा मेणबत्त्यांचा साइड बिजनेस आहे...समद्या तिथुनच आणल्या व्हत्या...लय येळ जळत्यात ह्या मेणबत्त्या)
    ३. अगदी भला मोठा पुष्पगुच्छ ठेवुन (सोबत मिडीया पण)
    ४.पुतळे जाळुन (बेंबीच्या देठापासुन बोंब मारली...आमच्या पक्षाचा बॅनर कसला झॅक चमकत होता)
    ५. तीन-चार नवोदित गायक, एक नवीनच सुरु झालेला वाद्यवृंद (बजेट श्रद्धांजली आहे बॉस)घेउन देशभक्तीची होती नव्हती ती सर्व गाणी वाजवुन (काय पब्लीक व्हत...मुन्नी वाजवायच व्हत पण)
    ६.पांढरे फ़ुगे सोडुन (आपल्याच गल्लीमधली पोर ठेवली व्हती फ़ुगे विकायला...शॉलीड धंदा झाला राव)
    ७.एक मोठी सभा ठेवली व्हती...अगदी पांढरी फ़ट्ट कापड घालुन व्हती समदी...(सभा जिथ झाली तिथ जवळच चहा,वडा पाव,बिडी-काडी याचा स्टॉल लावला व्हता...चांगली कमाइ झाली)..सायबानी पाकिस्तानला कसल्या हग्यादम दिला म्हनुन सांगु..मग पाकिस्तानच्या नावानी आमी बी शिमगा केला..पोर व्हती की आपली..पब्लीक शॉलीड येड झाल बर का.

    दिवसभर एवढ दमल्यावर संध्याकाळी मस्तपैकी देशी अन विदेशी दोन्ही लावल्या...मग कस बर वाटल.


    बगीतल ना किती देशप्रेम आहे ते.

    (हे सर्व चालु असताना कसाब ने मस्त बिर्याणी हाणली अन करकरेंच्या व कामठेंच्या घरी फ़क्त टी.वी.च चालु होता न्युज वाल्यांनी दाखवल की सगळ २६/११ च्या त्या क्लिप बघुनच पोट भरल... ओंबळेच्या घरी चुल पेटलीच नाही....उन्नीकृष्णन चे वडील संदीपच्या आठवणीत अश्रुंच्या सहवासातच राहिले...साळ्सकर,शिंदे अन अजुन कोण बर विसरलो बघा हे असच होत...यांच्या कुटुंबाच काय ते काही माहित नाही बुवा.)

    ReplyDelete
  19. आपली न्यायसस्था फार विलंब करते गुन्हा कशाप्रकारचा आहे व किती महत्त्व कोणत्या गोष्टीला द्यावे ह्याचा काही ताळमेळ नाही, कसाबची चोकशी काय करतात ,त्याच्यावर किती खर्च (पैसे)करतात, त्याला फाशीची शिक्षा झाली आहे, सरकारने त्याची केस निकालात काढण्यास विलंब न लावता फाशी द्यावी,

    ReplyDelete
  20. निरपराध्याला शिक्षा होऊ नये यासाठी कायदा असतो आणि म्हणूनच एखाद्या संशयित व्यक्तीचे अपराधित्व सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा देता येत नाही. न्याय व्यवस्थेला भावूक होऊन निर्णय नाही घेता येत पण त्याबरोबर हे खरच आहे कि एखाद्या खटल्याची न्यायप्रक्रिया राज्यकर्त्यांच्या दबावाने गतिशील करता येऊ शकते. कसाबला कैदी म्हणूनच वागणूक मिळावी आणि त्याचे फाजील लाड करू नयेत. कसाबला आणि जबाबदार असणाऱ्या इतर लोकांना योग्य ती शिक्षा होण्याइतकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे कि असा हल्लाच पुन्हा कधीही होऊ नये यासाठी प्रयत्न करणं आणि दुर्दैवाने झालाच तर निरपराध लोकांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये एव्हढी आपली सुरक्षा यंत्रणा सक्षम असणं. मला तर शंका आहे कि अजूनही पोळीचे अधिकाऱ्यांना दिली जाणारी शस्त्रास्त्रे, चिलखत आता तरी उत्तम दर्ज्याची आहेत का? निषेध खरं त्याचा जास्त व्हायला हवा. योगेश मुंढेंची प्रतिक्रिया आवडली. ....अजनबी दोस्त

    ReplyDelete
  21. संकेत, खरंय रे.. सगळे हरामखोर एकजात.. पण आपल्यालाच राहवत नाही ना बोलल्याशिवाय !!

    ReplyDelete
  22. सौरभ, तुला काय म्हणायचंय ते मला कळलं, लक्षात आलं.. पण पटलं असं म्हणू शकत नाही. तुला एक सांगतो. आपलाच देश, आपलीच न्यायप्रक्रिया, आपलेच न्यायाधीश, आपलेच वकील, आपलंच सरकार.. त्यामुळे त्यात जटील वगैरे असं काही नसतं रे.. निदान नसावं.. तुला काय वाटतं आपण सगळे पुरावे दिले तरी पाकिस्तान मान्य करणार आहे का? किंवा आत्तापर्यंत इतके पुरावे दिले आपण त्यांना... काय फरक पडला? (काय उखाडू शकलो आपण?).. त्यामुळे पुरावे गोळा करणे, कागदपत्र बनवणे वगैरे यात काही जटील किंवा वेळखाऊ नाहीये.. अभाव आहे तो फक्त इच्छाशक्तीचा.. खुर्चीतल्या हलकटांनी मनात आणलं तर एका क्षणात निर्णय होऊ शकतात. गुरूच्या बाबतीतही अजून एक.. इतर वेळी हगल्या पादल्या न्यायालयाचा अपमान झाला म्हणून घोषा लावणारे न्यायाधीश गुरूला फाशी न देऊन होणाऱ्या न्यायालयाच्या अपमानाबद्दल चकार शब्द उच्चारत नाहीत.. थोडक्यात हे जे चाललंय तो सगळा फार्स आहे रे.. !!

    ReplyDelete
  23. संकेत, तुझ्या दुसऱ्या प्रतिक्रियेतल्या शब्दाशब्दाशी सहमत.. मला अगदी असंच म्हणायचं आहे !

    ReplyDelete
  24. तन्वी, बदल तर नक्कीच होऊ शकतो. फार अवघड नाहीये ते. फक्त हा बदल होऊ नये असं वाटणारे जे बगळे खुर्च्यांत आहेत ना त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे.. मे बी 'रंग दे बसंती' वे !!!

    ReplyDelete
  25. विनय, ओकलाहोमा शहरातल्या त्या घटनेविषयी मला कल्पना नाही. पण मुंबई २६/११ ला भारताचं ९/११ समजलं जातं. ९/११ ला उत्तर देण्यासाठी याच अमेरिकेने काय केलं हे साऱ्या जगाने पाहिलं. तिने विरोधकांचा विचार केला नाही.. युएन ला फाट्यावर मारलं आणि दोन मोठे देश बेचिराख केले. सद्दाम कैक वर्षं अमेरिकेच्या हातात लागत नव्हता पण तो लागल्या लागल्या अमेरिकेने त्याच्यावर वेळखाऊ खटले नाही चालवले. एक घाव दोन तुकडे करत खटला चालवल्यासारखं करून ताबडतोब फाशीच दिलं त्याला. तेव्हा का नाही वेळ लागला ओकलाहोमा सारखा? कारण त्यांनाही कुठल्या खटल्याला किती प्राधान्य द्यायचं हे माहिती आहे. त्यामुळे हे न्यायप्रकिया संथ वगैरे सगळं बकवास आहे. हे म्हणजे अमेरिकेने उगाच इतर देशांना सांगायच्या गोष्टी आहेत. त्या आपण पाळायच्या की नाहीत हे आपल्या हातात आहे. शेवटी २६/११ ला शेकडो लोक आपले मारले गेलेत, अमेरिकेचे नाहीत !!!


    >> तर केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधारे, खरंच एखाद्याला फाशी द्यायची का?

    आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या *प्रत्येकाला* केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांचा आधारेच काय तर निव्वळ संशयाच्या आधारेही फाशी दिली तरी ते योग्य ठरेल. !!!

    ReplyDelete
  26. लीना, अगदी अगदी सहमत !!

    ReplyDelete
  27. देवदत्त, सगळा मुर्खपणा आहे च्यायला.. उद्या कसाबबरोबरही फोटो काढून घेतला तरी रंच आश्चर्य वाटायला नको !!

    ReplyDelete
  28. योगेश, काय लिहू रे??? हे सगळं अगदी असंच, अगदी अगदी असंच झालं असणार !!!! :((

    ReplyDelete
  29. काका, खरं आहे. पण हे या लोकांच्या टाळक्यात शिरलं तर नशीब !!

    ReplyDelete
  30. अजनबी दोस्त,

    सीसीटीव्हीचं रेकॉर्डिंग बघून, शेकडो लोकांच्या साक्षी नोंदवून, असंख्य पुरावे मिळूनही जर न्यायालयाला आरोपीला शिक्षा देता येत नसेल तर अशा न्यायव्यवस्थेचा उपयोगच काय? त्यांनी घरी बसावं. निदान जनमत तरी लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी हेही विसरता कामा नये की लोकांसाठी न्यायव्यवस्था आहे न्यायव्यवस्थेसाठी लोक नाहीत !! देशाविरुद्ध युद्ध पुकारलेल्या आरोपीची न्यायप्रक्रिया जलद करता येत नसेल तर अशी न्यायव्यवस्था बरखास्त झाली पाहिजे !!!!

    दुसरं मत पटलं.. हल्ला पुन्हा कधीच होऊ नये या दृष्टीने तयारी केली गेली पाहिजे. पण तसं काहीच होतंयस दिसत नाही !! आपण जीव देवाच्या हवाली करून पुढचा हल्ला होण्याची वाट बघत रहायचं.. बस !!! :(

    ReplyDelete
  31. चौपाटीवर खांबाला बांधून ठेऊन चपलांनी मारुन मारून ठार मारलं पाहीजे. आणि चपला मारणारे जे त्या हल्ल्यात गेले त्यांचे नातलग आणि घरचे हवेत.

    ReplyDelete
  32. मंदार, सर्वसामान्य जनतेची हीच अपेक्षा आहे. खरंच असं होऊ शकलं तर !!!

    ReplyDelete
  33. >> जलद गतीने ??

    गतीविषयक नियम बदलले वाटतं !!

    मी तर म्हणतो अस्तित्वात असलेल्या कुठल्याही कायद्यान्वये जर त्या नराधमाला लवकरात लवकर फाशी देता येत नसेल तर एका दिवसात असा कुठला तरी नवीन कायदा केला जावा आणि त्याला ताबडतोब हालहाल करून मारलं जावं !! आणि त्याच्या बरोबरीने त्या मानवतावादी पिशाच्चांनाही !!!!!!!

    +++++++++......

    ReplyDelete
  34. पोस्ट लोड व्हायला जरा वेळ लागत होता. आधी फक्त 'रिक्त' इतकेच दिसत होते.. म्हटले ह्याने खरच रिक्त पोस्ट टाकली आहे काय... नो कंटेंट...

    खाली बघतो तर खरच रिक्त... :(

    ReplyDelete
  35. अरे वृत्तपत्रांनी अग्रलेखाची जागा कोरी ठेवून आपला निषेध नोंदवण्याची ती कल्पना मला खूप भावली. नतद्रष्ट सरकारचा निषेध करण्याचा एक अभिनव मार्ग होता तो. आणि सध्याच्या निष्क्रीय सरकारचा निषेध नोंदवण्याचा याहून चांगला मार्ग मला तरी दिसत नाही !!

    ReplyDelete

समाधान

समाज माध्यमं आणि एकूणच समाजात सध्या अहमहमिकेने चर्चिला जाणारा ज्वलंत मुद्दा म्हणजे राम मंदिर. हिरीरीने मांडल्या जाणाऱ्या मतमतांतराच्या गलबल्...